अन्नपूर्णा या पुस्तकावर कित्येक महिला आणि परदेशात जाणारी, एकटी राहणारी तरुणाई स्वयंपाक करायला शिकली. त्यांच्या या पुस्तकाने विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले. सध्या या पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे.
October 23, 2021
बॉलीवूड मधील जेष्ठ अभिनेते दादामुनी उर्फ अशोक कुमार यांचा जन्म. १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला.
१९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैया, या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणाऱ्या या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हिरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.
दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे.
शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती.
सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले.
अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे.
अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ रोजी निधन झाले.
https://www.youtube.com/watch?v=FvXTWi2YED8
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
October 13, 2021
‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.
May 10, 2019
शिक्षणतज्ज्ञ व संगीततज्ज्ञ अशी दोन्ही बिरुदं असणारे पं. नारायण बोडस ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३३ रोजी सांगली येथे झाला. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले.
नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात 'सौभाग्यरमा' या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाऱ्या दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी असाच बोलक्या चेहऱ्याचा, भारदस्त आवाजाचा व चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच 'सं. शारदम्' या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली. जनलोकां विस्मय हा, माता वचन दे सदा देशा, या लता शिकवती ही त्यांची काही गाजलेली नाट्यपदं होत.
रंगभूमीवर वावरण्याचे व्यसन काही औरच असते व ते भलेभले सोडू शकत नाहीत. पण नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि १९९३ मध्ये गोव्यात संगीत सौभद्र मध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. १२ वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६ सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता. २०१६ मध्ये नारायणराव बोडस यांच्या भगिनी आणि ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांचं निधन झालं.
पं.नारायणराव बोडस यांचे चिरंजीव केदार बोडस त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. पं.नारायणराव बोडस यांचे २७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 20, 2019
सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त होते. त्यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी झाला. सिनेसृष्टीत सुनील दत्त यांनी सिनेमाची निर्मिती, अभिनय, दिग्दर्शकसारख्या अनेक भूमिका साकारल्या. जवळपास चार दशकांपर्यंत त्यांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांचे पात्र वास्तविक जीवनाच्या जवळचे असायचे. त्यांचे व्यक्तीमत्वसुध्दा तशाच पात्रांनी प्रभावित राहिले. फाळणीच्या दरम्यान त्यांचे कुटुंबिय भारतात आले होते. त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि सोबतच नोकरीसुध्दा केली.
सुनील यांनी रेडिओ सीलोनमध्ये हिंदी उद्घोषकच्या रुपात काम केले. त्यांनी 'रेल्वे प्लॅटफॉर्म'पासून फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. 'मदर इंडिया' सिनेमाने त्यांच्या करिअरला एक नवीन वळण दिले आहे. सुनील दत्त भारतीय सिनेसृष्टीत अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्या सिनेमाची पन्नास ते साठ दशकांमध्ये छाप प्रेक्षकांवर राहिलेली आहे. 'मदर इंडिया'च्या यशानंतर 'साधना', 'सुजाता', 'मुझे जीने दो', 'खानदान', 'पडोसन'सारख्या यशस्वी सिनेमांनी भारतीय प्रेक्षकांमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून त्यांना ओळख निर्माण केली. सुनील दत्त आणि नर्गिस यांची प्रेमकथा एखाद्या फिल्मी लव्ह-स्टोरीप्रमाणे आहे. 'मदर इंडिया' सिनेमात सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. एक दिवशी शुटिंगदरम्यान त्यांच्या सेटवर आग लागली. सेटवर लागलेल्या आगीत नर्गिस अडकल्या. ते पाहून सुनील दत्त यांनी आपला जीव धोक्यात टाकून आगीत उडी मारली. या घटनेने सुनील आणि नर्गिस यांना जवळ आणले. त्यानंतर एकमेकांना भेटण्याचे सत्र सुरू झाले आणि दोघे लग्नगाठीत अडकले.
बी. आर. चोप्रासोबत 'गुमराह', 'वक्त', 'हमराज' सारख्या सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या आयुष्यातील 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमात पहिल्यांदा त्यांनी मुलगा संजय दत्तसह काम केले होते. त्यापूर्वी 'क्षत्रिय' आणि 'राकी' सिनेमातसुध्दा दोघांनी एकत्र काम केले परंतु सिनेमातील एकाही दृश्यात ते एकत्र दिसले नाहीत.
सुनील दत्त यांचे २५ मे २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
June 6, 2017
राजकारणात प्रवेश करण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होते.
February 6, 2022
सी. रामचंद्र यांचे पूर्ण नाव रामचंद्र चितळीकर, ‘सी. रामचंद्र’ हे नाव त्यांनी सिने दिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांची ठिकठिकाणी बदली होत.त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले.
शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीत क्षेत्राविषयी निस्सीम प्रेम व भक्ती असल्याने याच विषयात कारकीर्द गडवण्याच्या हेतूने नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त प्रवेश घेऊन त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले; व उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला. जयकोडी या तमीळ चित्रपटासाठी त्यांनी प्रथम संगीतरचना केली. सुखी जवान हा त्यांनी संगीत दिलेला पहिला हिंदी चित्रपट!
भगवान यांनी तो निर्माण केला. त्यात सारे जहाँसे अच्छा या इक्बाल यांच्या विख्यात गीतासाठी सी रामचंद्र यांनी चाल दिली. या जोडीचा अलबेला हा चित्रपट तुफान चालला. त्यात मास्टर भगवानची नृत्ये आणि सी.रामचंद्र यांचे अफलातून संगीत यांची जादू आजही कायम आहे. त्यातील भोली सुरत दिलके खोटे हे गीत तर जाम धमाल आहे.
सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले सरगम,पतंगा, सगाई, अनारकली इत्यादी अनेक चित्रपट आले. काही संगीतदृष्टया चांगलेच गाजले. त्यात अनारकली हा ऑल टाईम ग्रेट आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत सुमारे २५० हिंदी, मराठी, तमिळ , तेलुगु चित्रपटाना संगीत दिले. त्यांच्या बहराचा काळ १९४४ ते १९५५ हा मानला जातो. १९४९ ते १९५८ या काळात त्यांच्यासह लता मंगेशकर गात असत. पण नंतर त्यांचा वाद झाला. पण लता आणि त्यांचे बिनसले आणि ते नंतर जवळजवळ या व्यवसायातून बाहेर फेकले गेले.
१९६० नंतर त्यांची कारकीर्द संपली. १९६४ च्या सुमारास कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख मे भर लो पानी या गीताला सी. रामचंद्र यांनी संगीत दिले. लता मंगेशकर यांनी ते गीत गायिले होते. त्यांनी हलक्या फुलक्या पाश्चात्य संगीतावर मनापासून प्रेम केले आणि त्या संगीताच्या सादरीकरणाचे एक नवे युगच निर्माण केले. भारतीय संगीत आणि पाश्वात्य संगीताचा एक अप्रतिम संगम त्यांनी घडविला. कव्वाली या संगीत प्रकाराला संजीवनी देण्यातहि त्यांचा महत्वाचा वाटा होता. अनारकली या १९५३ साली आलेल्या चित्रपटात त्यांनी यह जिंदगी उसी की है या गीताला दिलेलं संगीत अत्यंत सुंदर आहे. त्या गीतात वापरलेली सतार अविस्मरणीय आहे. ते अष्टपैलू संगीतकार होते. मा.सी.रामचंद्रांनी माझ्या जीवनाची सरगम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे. सी. रामचंद्र यांचे ५ जानेवारी १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 12, 2019
३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. “मर्दहो, उठा !” अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!”
July 19, 2021
सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यांचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी झाला. सोनालीने अभिनेत्री म्हणून १९९४ मध्ये आलेल्या झालेल्या 'आग' सिनेमातून पदार्पण केले होते. सोनालीला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टार सिनेमांत काम केले. सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही तरी तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान (इंग्लिश बाबू देशी मेम), सलमान खान (हम साथ साथ है) आमिर खान (सरफरोश), अमिताभ बच्चन (मेजर साहब), अजय देवगण (दिलजले, जख्म) आणि अक्षय कुमार (तराजू) यांची नावे सामील आहेत. सोनालीने आपल्या ११ वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास ३० सिनेमे केले. शिवाय तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी सिनेमांतसुध्दा काम केले आहे. २००३ मध्ये रिलीज झालेल्या 'कल हो ना हो' सिनेमानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दहा वर्षानंतर २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' सिनेमातून सोनालीने कमबॅक केले. सोनाली बराच काळ चित्रपटांपासून दूर होती.
कमबॅक करत तिनं एक-दोन चित्रपट केलेही, पण नंतर तिनं टीव्हीकडे मोर्चा वळवला. 'क्या मस्ती क्या धूम', 'इंडियन आयडॉल', 'इंडियास गॉट टॅलेंट', 'सिनेस्टार की खोज' असे एकामागोमाग एक रिअॅलिटी शोज तिला मिळत गेले. सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अनाहत’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील ‘छम छम करता है ये नशिला बदन’ या गाण्याच्या तालावर आपल्या सर्वांना थिरकायला लावून सोनाली ने एक धक्का दिला होता. सोनाली ने ‘पालकत्व’ या विषयावर एका उत्तम, दर्जेदार पुस्तकाचे लिखाण केले आहे. हे पुस्तक कथेच्या स्वरुपात आणि तिच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे. पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना येणारे सुखद अनुभव याबरोबरच आयुष्यातील चढ-उतार त्यांनी नीटनेटकेपणे मांडले आहेत. या पुस्तकात सोनाली बेंद्रे ने आपल्या मुलासोबतचे वेगवेगळे अनुभव मांडले असून चांगले पालक होण्यासाठी नेमके काय करायला हवे हे समजते. सोनालीने निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 1, 2018
राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्याथ स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत. ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता. त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणाऱ्या स्त्रीयांची मोजणी सुरु केली.
May 27, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti