रामानंद सागर यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. रामानंद रसागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्मात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, समाजातील लोक त्यांना नगरश्रेष्ठ म्हणून संबोधत. रामानंद यांचे मूळ नाव चंद्रमौली होते, ते त्यांचे मामा सागर यांना दत्तक गेले. दत्तक विधानानंतर त्यांचे नाव रामानंद ठेवले गेले. मामाच्या घरी गरिबी असल्यामुळे लहान वयात ट्रक क्लिनर, ऑफिस कार्यालयात शिपायाचे काम अशी विविध कामे त्यांनी केली. मुळात साहित्याची आवड असल्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी ‘प्रितम प्रतीक्षा’ हे काव्य काश्मीर येथील प्रताप कॉलेजच्या मासिकासाठी लिहिले. पंजाब युनिव्हर्सिटीने त्यांना ‘मुन्शी फझल’ असा पर्शियन किताब व सुवर्णपदक बहाल केले. १९३३ पासून साहित्य-काव्य-लेखन कार्यात ते मग्न झाले. वृत्तपत्रांतून स्तंभ लेखनाचे काम मिळाले. त्यांच्या लेखणीतील एक निराळी जादू लोकांना प्रभावित करू लागली. पंजाबमधील ‘मिलाप’ या वृत्तदैनिक पत्रिकेमध्ये पत्रकार म्हणून नियुक्ती झाली. ३२ कथा, ३ प्रदीर्घ कथा, २ नाटके, कादंबरी, दूरदर्शन मालिकांसाठी लिखाण केले. १९४२ मध्ये त्यांना क्षयरोगाने पछाडले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले. स्वत:च्या अनुभवावरून ‘एका क्षयरोग्याची डायरी’ हे लिखाण केले. आयुष्याला वेगळं वळण मिळावं म्हणून कुटुंबासह ते मुंबईला आले. बरेच दिवस मुंबईत त्यांचा जम बसत नव्हता. त्या हालाखीच्या दिवसांत त्यांनी ‘और इन्सान मर गया’ हे उर्दू, हिंदी भाषेत अप्रतिम वास्तव चित्रण सादर केले. या पुस्तकाला अमाप लोकप्रियता लाभली. १९४२ मध्ये प्रकाशित झालेला दिलीपकुमारचा प्रथम चित्रपट ‘ज्वारभाटा’ याचे कथा लेखन केले. तेव्हापासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत लेखन निर्मितीला सुरुवात केली आणि भारतीय चित्रपटसृष्टीत एखाद्या तळपत्या ताऱ्यासारखे ते चमकत राहिले. त्या आधी लाहोर येथे तयार केलेल्या ‘रायडर ऑफ द रेल रोड’ या मूकचित्रपट निर्मितीच्या वेळी क्लॅपर बायचे कामही त्यांनी केले. कुठलेही काम करण्यात कमीपणा मानायचा नाही असा त्यांचा स्वभाव होता. १९४९ मध्ये आर के निर्मित ‘बरसात’ चित्रपटाचे कथानक संवादलेखन केल्यामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. त्या आधी पृथ्वी थिएटरच्या नाटकासाठी त्यांनी लेखन केले होते. १९५० मध्ये सागर आर्टस्’ या चित्रपटसंस्थेची स्थापना केली. १९५१ मध्ये ‘मेहमान’, ‘बाझूबंद’, १९५० मध्ये ‘बडी बहू’, १९५३ मध्ये ‘संगदिल’, १९५५ मध्ये ‘इन्सानियत’, १९५८ मध्ये ‘पैगाम’, ‘राजकुमार’, ‘कोहिनूर’ या चित्रपटासाठी लेखन केले. तसेच १२ दूरदर्शन मालिका चित्रित केल्या. १९६० ते १९६४ या कालावधीत ‘घुंघट’, ‘जिन्दगी’ या चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शक, प्रोडय़ुसर म्हणून काम केले. मद्रास येथील जेमिनी या चित्रपटसंस्थेला आर्थिक सहाय्य केले होते. १९८६ सालापर्यंतच २५ चित्रपटांची निर्मिती केली. २९ चित्रपटांसाठी कथानक लेखन केले- त्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. ‘आरझू’, ‘ललकार’, ‘चरस’, ‘बगावत’ या चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवाचे यश प्राप्त केले. २५ चित्रपटांना सिल्व्हर ज्युबिलीचे यश लाभले. सागर आर्टस्च्या जवळपास २५ यशस्वी चित्रपटांचे सरासरी एकत्रित यश एकटय़ा ‘रामायण’ व ‘श्रीकृष्ण’ मालिकेला मिळाले. दूरदर्शनच्या माध्यमातून डॉक्टर रामानंद सागर यांनी निदर्शनास आणून या माध्यमातून ते उत्कृष्ट वापर करून जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकतात व ज्ञान, मनोरंजन पुरवू शकतात हे दाखवून दिले. चित्रपटांमधून व्यावसायिक यश मिळविल्यानंतर १९८७ मध्ये रामानंद सागर छोटय़ा पडद्याकडे वळले व त्यांना धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा प्राप्त झाली. १९८५ ते २००२ या कालावधीत सुमारे २००० तासांचे चित्रीकरण त्यांनी दूरदर्शन मालिकांसाठी केले. ‘रामायण’ या मालिकेचे डॉ. रामानंद सागर यांनी भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचे सृजनात्मक पद्धतीने सादरीकरण करून सर्वसामान्य जनमानसात मानाचे स्थान मिळविले. रामायणाची संकल्पना कल्पनेने सादर करून, लेखन, दिग्दर्शन, निर्माता या नात्याने तिन्ही आघाडय़ा यशस्वीरीत्या सांभाळून धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा त्यांना प्राप्त झाली. तद्नंतर ‘श्रीकृष्ण’ ही महामालिका दूरदर्शनसाठी केली. ‘रामायण’, ‘अलिफ लैला’, ‘जय गंगा मय्या’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. फ्रान्स, जपान, लंडन बी. बी. सी.वर त्यांच्या कथांचे वाचनही झाले. भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरविले. त्याआधी १९९७ मध्ये डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लिट.) जम्मू युनिव्हर्सिटी, ‘साहित्य वाचस्पती’ हिंदी साहित्य संमेलन प्रयाग-अलाहाबाद यांनी पदवी प्रदान करून गौरविले. मा.रामानंद सागर यांचे १२ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.शरद मेहेत्रे.
December 29, 2016
फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वांत प्रतिभाशाली फुटबॉलपटू आहे. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ रोजी मॅडीइरा, पोर्तुगाल येथे झाला. महान फुटबॉलपटू पेल यांनी रोनाल्डोहला सर्वश्रेष्ठय फुटबॉलपटू संबोधलेले आहे. रोनाल्डोचे वडील जोस डिनिस ऐवियरो अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष रोनाल्ड रीगनमुळे चांगलेच प्रभावीत झाले होते. त्यांच्यापासून प्रेरीत होऊन त्यांरनी मुलाचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सांतोस ऐवियरो’असे ठेवले होते.पुढे त्याूचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’असे पडले. वयाच्याा १४ व्याड वर्षी रोनाल्डोटने शाळेतील शिक्षकाला बुट आणि खुर्ची फेकून मारली होती. त्यासमुळे त्याळला शाळा सोडावी लागली होती. लहानपणी रोनाल्डो ची आई त्याला ‘रडके बाळ’ असे म्हणत असे. कारण रोनल्डोअ लहानपणी खुप रागीट होता आणि राग आल्या नंतर जोरजोरात रडत होता.
रोनाल्डोने २००२-०३ मध्ये मॅनचेस्टर युनाइटेडला जोडला गेल्यां नतर त्याजने 28 नंबरची जर्सी मागितली हेाती. परंतु नाइलाजास्तेव त्याेला सात नंबरची जर्सी देण्याात आली. आणि पुढे हीच त्यांची ओळख बनली. जॉनी बेरी, जॉर्ज बेस्ट, स्टीव कूपेल, ब्रायन रॉब्सन, एरिक कैंटोना आणि डेविड बेकहम हे सुध्दाे ७ नंबरची जर्सी परिधान करत. जवळपास पाच वर्षांपासून मॉडेल इरिना शायक सोबत क्लोज रिलेशनशिपमध्येु आहे. इरिना सपुर मॉडेल असून तिने २०१४ मध्येय हॉलीवुड फिल्म 'हरक्यूलिस'मध्येे कामसुध्दा केले आहे. रियल माद्रिद व पोर्तुगालचा स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने देशातर्फे आणि क्लबतर्फे खेळताना २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने कारकिर्दीत चॅम्पियन्स लीगचे तिसरे जेतेपद आणि पोर्तुगालसह युरो २०१६ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर ‘बेलोन डिओर’ पुरस्काराचा मान मिळवला. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १२ सामन्यांत १६ गोल नोंदवले. आपल्या समुहाकडून रोनाल्डोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. रोनाल्डोचे संकेतस्थळ www.cristianoronaldo.com
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 5, 2019
नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. मा.नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. सुरवातीला जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. त्याच दरम्यान "हमीदाबाईची कोठी' या नाटकामध्ये भूमिका केली व मोठे यश मिळाले. अगदी सुरवातीला "दमन', "गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे. मा.नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्तीी ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे आणि सलाम बॉम्बे या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळायला सुरुवात झाली मा.नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. अंधायुद्ध, परिंदा, अंगार, तिरंगा, क्रांतिवीर, वजूद, अब-तक-छप्पन, अटॅक ऑफ २६११, गुलाम-ए-मुस्तफा, टॅक्सी नं. ९२११, यशवंत, युगपुरुष, खामोशी, अपहरण, वेलकम, हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. मा.नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील. प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.१९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अपहरण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. बंगाल फिल्म पत्रकारिता संघातर्फे बेस्ट ऍक्टर पुरस्कार अबतक छप्पन या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली. या क्षणी त्यांच्या चेहर्यातवर येणारे चढउतार नैसर्गिकच. मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्यायवर येणारा संताप सहजरीत्या त्यांच्या अभिनयातून आपणास पहावयास मिळते. ही व यासारखी अनेक चित्रपटांतून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले. हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिडीकिंग म्हणवणारे दिलीपकुमार, अभिनय सम्राट राजकुमार आणि यँग्री यंग मॅन अभिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी, या महान नायकांच्या अभिनयक्षमतेला नानांची अभिनयक्षमताच टक्कर देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ‘खामोशी’ चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका अगदी वेगळीच. जिवंत अभिनय आपणास त्यांच्या चित्रपटातून पहावयास मिळतात. टेलिव्हीजन कार्टून मालिका ‘जंगल बुक’ याकरिता स्वतःचा आवाज दिला. यशवंत, आंच, वजूद या चित्रपटातून त्यांनी गाणी ही गायली. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे प्रेरणादायी कार्य सांगणारा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट नक्की बघावा. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा 'नटसम्राट' शिरवाडकर यांचे 'नटसम्राट' या चित्रपटात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर यांनी ती भूमिका अतुच्य कळसावर नेऊन ठेवली. मा.नानांनी देऊळ चित्रपटात पण सुंदर भूमिका केली आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मा.नाना यांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे. पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार. मा.नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये मा. मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 1, 2017
त्यांच्या दिग्दर्शनाखाली अरुण सरनाईक, सूर्यकांत मांडरे, गणपत पाटील, राजशेखर, अभिनेत्री पद्मा चव्हाण, उमा, कामीनी भाटिया, संध्या रायकर, नीला गांधी, शांता तांबे, पद्मीनी बिडकर या कलावंतानी नाट्य कलेचे धडे घेतले होते.
July 4, 2022
अर्ल स्टॅन्ले गार्डनर या कादंबरीकाराने एक निष्णात फौजदारी वकील म्हणून रंगवलेले हे पात्र. गार्डनरने इतर विविध प्रकारचे लेखन केलेले असले, विशेषत: त्याने उत्तम प्रवासवर्णने लिली असली, तरी मुख्यत: ओळखला जातात ते पेरी मेसन मालिकेतील कादंबऱ्यांसाठीच.
July 19, 2022
बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट ठरलेली आई निरूपा रॉय यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ रोजी झाला. बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते. निरूपा रॉय यांचे शिक्षण जेमतेम ४ थी पर्यंत झाले होते आणि वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे कमल रॉय यांच्यासोबत लग्न झाले. प्रसिध्द अभिनेत्री शामासोबत त्यांची चांगली मैत्री होती, ज्यांच्यामुळे निरूपा यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याची संधी मिळाली. निरूपा रॉय यांनी फिल्मी करिअरची सुरवात १९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुणसुंदरी' या गुजराती सिनेमामधून केली. 'हमारी मंजिल' या सिनेमामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
१९५१ मध्ये त्यांचा 'हर हर महादेव' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या यशानंतर त्या प्रेक्षकामध्ये देवीच्या रुपात प्रसिध्द झाल्या. याचदरम्यान त्यांनी 'वीर भीमसेन' सिनेमामध्ये द्रोपदीची भूमिका साकारली होती. १९५३ मध्ये रिलीज झालेला 'दो बीघा जमीन' हा निरुपा रॉय यांचा आवडता सिनेमा आहे. विमल रॉयच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात त्यांनी एका शेतकर-याच्या पत्नीची भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयचा आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.निरुपा रॉय यांनी १९४० आणि १९५० च्या दशकात अनेक धार्मिक सिनेमे केले. देवीची भूमिका केल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना अधिक पसंत केलं.
निरूपा यांनी हिंदी सिनेमांमध्ये जास्तीत जास्त आईच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. 'दीवार' सिनेमामधील 'मेरे पास माँ है' हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे. निरुपा यांना त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मा.निरूपा रॉय यांचे निधन १३ आक्टोबर २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 9, 2017
रंगनाथ पठारे हे कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. वैचारिक, समीक्षा आणि अनुवाद असे प्रकारही त्यांनी हाताळले. मात्र, ते रमले कथा-कादंबरीत.
June 1, 2021
प्रख्यात अभिनेत्री शकिला यांचा जन्म १ जानेवारी १९३५ रोजी झाला. सीआयडी, आरपार, रेशमी रुमाल, श्रीमान सत्यवादी अशा एकाहून एक सरस कृष्णधवल हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या प्रख्यात अभिनेत्री शकिला यांचे “बाबूजी धीरे चलना’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे व त्यांच्या भूमिकाही चित्रपट रसिकांच्या मर्मबंधातली ठेव होती. गुरुदत्त यांच्या आरपार व सीआयडी या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. शक्ती सामंता यांच्या चायना टाऊन या चित्रपटात शम्मी कपूर यांच्या सोबत शकिला यांनी भूमिका केली होती.
पोस्ट बॉक्स ९९९ या चित्रपटातील शकिला यांची अदाकारी लाजवाब होती. त्यांनी १९६३ साली चित्रपट संन्यास घेतला होता. शकिला या जॉनी बार्बर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या होत्या. लग्नानंतर त्या आपल्या पतीबरोबर लंडन येथे गेल्या. जॉनी बार्बर यांचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. शकिला यांना मीनाझ नावाची एक मुलगी होती. मीनाझचे १९९१ साली निधन झाले होते. मनोजकुमार, राज कपूर, देव आनंद, सुनील दत्त या अभिनेत्यांबरोबरही शकिला यांनी विविध चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. शकिला यांचे २१ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.
शकिला यांचे चित्रपट.
दुनिया (१९४९), दास्तान (१९५०), अरमान (१९५३), मदमस्त (१९५३), शहनशाह (१९५३), आगोश (१९५३), आरपार, दान, हल्लागुल्ला, गुलबहार, खुशबू, लैला, लाल परी, अलिबाबा ४० चोर, नूरमहल (१९५४), मस्त कलंदर, रत्नमंजरी (१९५५), सीआयडी, कारवाँ, हातीमताई, झाँसी की रानी, मलिका, पैसा ही पैसा, रुपकुमारी (१९५६), बेगुनाह, नागपद्मिनी, परिस्तान, आग्रा रोड (१९५७), अल हिलाल, चौबीस घंटे, पोस्ट बॉक्स नं. ९९९ (१९५८), फोर्टी डेज, गेस्ट हाऊस, काली टोपी लाल रुमाल, स्कूल मास्टर (१९५९).
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 1, 2019
२००७ साली निखिल वागळे हे नेटवर्क १८ च्या IBN लोकमत या चॅनलचे संपादक झाले. २००७ ते २०१४ पर्यंत निखिल वागळे यांनी चॅनेल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक वादग्रस्त मुद्द्यांना हात घातला. या दरम्यान त्यांचा ‘आजचा सवाल’ हा डिबेट शो त्यांच्या आक्रमक पणामुळे चांगलाच चर्चेत राहिला पण त्यांची ही आक्रमकता कधी कधी उद्धट रूप धारण करते असा आरोप सुद्धा त्यांच्यावर होत राहिला.
April 23, 2022
दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक, जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते, भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते अशी त्यांची ओळख होती.
June 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti