(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर

    कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील उगाव या गावी झाला.

    नाशिक जिल्ह्यातील येवला येथील जनता विद्यालयात उगावकर यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेतही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले.

    राम उगावकर हे आदर्श शिक्षक, कवी, शाहीर, गीतकार होते. ते सेवादलातही काम करत असत. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे उगावकर यांना गुरुस्थानी होते. राम उगावकर यांना भाऊसाहेब रानडे, एस. एम. जोशी, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान, कवी कुसुमाग्रज यांचे संस्कार आणि मार्गदर्शन मिळाले. शाहिरीपासून त्यांनी आपल्या कला जीवनाची सुरुवात केली. लोकनाट्य, नाटक, चित्रपट कथा, चित्रपट गीते, पोवाडे, वैचारिक लेख आदी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते.

    ‘जिद्द’, ‘पायगुण’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मोसंबी-नारंगी’, ‘भीमगर्जना’, ‘घरंदाज’ आदी चित्रपटांसाठी तसेच ‘संत गाडगे बाबा’ या मालिकेसाठीही त्यांनी गीत लेखन केले होते. उगावकर यांनी ‘नारदमुनी मुंबईत’, ‘एक मास्तर चंदेरी दुनियेत’ हे एकपात्री कार्यक्रमही सादर केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रतीकार, संत गाडगे महाराज, हॅलो इन्स्पेक्टर, पुरुष पात्र नसलेले आज येणार पाहुणे, मुलांचा हरिजन दिन अशी त्यांची बारा नाटके रंगभूमीवर आली. तर गीतागीत सुगंध (काव्य), अंतराळ स्नेह (काव्य), मस्करी (विनोदी कविता संग्रह), शिवबाची शौर्यगाथा (पोवाडा), भारतीय स्वातंत्र्याचा पोवाडा, लोकमान्य (नाटक) जादूचा मणी, टिल्लू ही बालनाट्ये, परिताईचा मंगू असे काव्य, नाट्य व बालसाहित्य प्रकाशित आहे.

    त्यांनी काव्यमय असे एका सच्चा शिक्षकाचे मनोगत, एक मास्तर चंदेरी दुनियेत या पुस्तकाद्वारे तर दाखवलेच पण त्यावर उत्कृष्ट कविता लिहून त्यांनी स्वत:चेच चरित्र काव्यातून सादर केले.

    उगावकर यांनी लिहिलेली २० नाटके रंगभूमीवर सादर झाली होती. त्यांची तीन हिंदी तर सुमारे ४० मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. काही चित्रपटातूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या.

    राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘दलित मित्र’ या पुरस्कारानेही उगावकर यांना सन्मानित करण्यात आले होते.

    संत गाडगे महाराज यांचे ते उपासक होते. त्यामुळे भगवे कपडे न घालणारे साधू म्हणूनही उगवकारांचा परिचय करून दिला जातो. परम शांतीधाम वृद्धाश्रमाचे ते विश्वस्तही होते.

    राम उगावकर यांचे ५ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • अभिनेते प्रवीण कुमार सोबती

    प्रवीण कुमार सोबती हे ६० आणि ७० च्या दशकातील भारतातील प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक होते. हॅमर आणि डिसक्स थ्रोमध्ये त्यांनी दीर्घकाळ भारताचे प्रतिनिधित्व केले.

  • आरती प्रभू

    एक अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून साहित्याच्या प्रांतातली प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर तथा आरती प्रभू. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई या गावी झाला.आपल्या बहारदार शब्दसंवेदनेतून मराठी मनाला भुरळ घालणार्याल मा.आरती प्रभूंच्या यांच्या वडिलांना अर्थार्जनासाठी कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी स्थलांतर करावं लागलं. सावंतवाडीत प्लेगच्या साथीमुळे त्यांना ताबडतोब तेथून ही स्थलांतर करावं लागलं, आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले, पण त्यांच्या शिक्षणात सतत काहीना काही कारणांनी खंड पडत राहिला, पण १९६० मध्ये ते एस.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण त्याआधीच खानोलकरांनी लेखनाला सुरुवात केली होती. “ब्लार्क” मध्ये त्यांची कथा व कविता प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर सत्यकथेच्या अंकात जाणीव ही कथा प्रसिद्ध झाली; पण सत्यकथांमध्ये “शुन्य श्रुंगारते” या कवितेला प्रसिद्धी मिळाली आणि पुढे तर त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय झाल्या. या सर्व कविता खानोलकरांनी “आरती प्रभू” या टोपण नावाने लिहिल्या. १९५८ सालच्या मराठी साहित्य संमेलनात, त्यांना कविता वाचनाची संधी मिळाली. उदरनिर्वाहासाठी खानोलकरांनी पुन्हा मुंबई गाठली; तिथे आकाशवाणी केंद्रात स्टाफ आर्टिस्ट म्हणून रुजू झाले. त्याच काळात “जागोवा” हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यांची “पाठमोरी” ही कथा सत्यकथेत तर “झाडे नग्न झाली” ही त्यांची कादंबरी रहस्यरंजनच्या दिवाळी अंकात छापून आली. त्यामुळे खानोलकरांच्या लेखनाला अधिक गती मिळाली. खानोलकरांनी सर्व प्रकारच्या वाड्मयात मुशाफीरी केली यामध्ये अनुवाद, स्फुटलेखन, बालवाड्मय, एकांकिकांचा समावेश होतो. “एक शुन्य बाजीराव”, “सगेसोयरे”, “अवध्य”, “अजब न्याय वर्तुळाचा”, “कालाय तस्मै नम:” सारख्या दर्जेदार, रहस्यमय नाटकांनी रंगभूमी तर गाजवली, पण खानोलकरांच नाव सर्वतोमुखी झाले. खानोलकरांनी लिहिलेल्या कादंबर्याय ही अतिशय गाजल्या. त्यातील “चानी” आणि “कोंडुरा” या त्यांच्या दोन कादंबर्यांमवर चित्रपट ही प्रदर्शित झाले. कोंडूरा या त्यांच्या कादंबरीचा विषय अजब होता आणि त्या कादंबरीवर मा. सत्यजित रे यांना पण चित्रपट काढवा असे वाटते. त्याच्या चानी या कादंबरी ही मा.व्ही.शांताराम यांना मोहात टाकते व ते चानी हा चित्रपट काढतात. “दिवेलागणं” आणि “नक्षत्रांचे देणे” हे कविता संग्रह रसिकांना खुप भावले. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः मा.हृदयनाथ मंगेशकर पुढे आले आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ये रे घना', ‘नाही कशी म्हणू तुला’सारखी गीते अमर झाली. सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा या मा.आरती प्रभू नावाच्या माणसाने ‘रात्र काळी घागर काळी’ सारखी कादंबरी लिहिली, ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला त्यांना अंत्र्याकडून शाबासकीही मिळाली. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘एक शून्य बाजीराव’ सारखे त्यांनी नाटक लिहिले आणि रंगायन सारख्या संस्थाने ते रंगभूमीवर आणले. त्यांचे अजब न्याय वर्तुळाचे या नाटकाचे प्रयोग जर्मनी पण झाले. "नक्षत्रांचे देणे" साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला. मा.आरती प्रभू यांचे २६ एप्रिल १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    "नक्षत्रांचे देणे" आरती प्रभू.
    http://www.youtube.com/playlist?list=PLA40EEA6EDB80BFAF

    मा.आरती प्रभू यांच्या कन्या सौ. हेमांगी नेरकर यांच्याशी साधलेल्या संवादातून मा.आरती प्रभू यांचे व्यक्तिमत्त्व प्रहार मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
    http://prahaar.in/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B2/

    काही गाणी आरती प्रभू यांची
    ये रे घना
    लवलव करी पात डोळं
    तू तेंव्हा तशी
    ती येते आणिक जाते
    समईच्या शुभ्र कळ्या
    "तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूल
    मा.आरती प्रभू यांचे प्रकाशित साहित्य.
    गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
    कोंडुरा (कादंबरी, १९६६)
    अजगर (कादंबरी, १९६५)
    रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
    त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
    आपुले मरण
    जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
    दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
    नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
    पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
    पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
    सनई (कथा संग्रह, १९६४)
    राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
    चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
    एक शुन्य बाजिराव (नाटक, १९६६)
    सगेसोयरे (नाटक, १९६७)
    अवध्य (नाटक, १९७२)
    कालाय तस्मै नमः (नाटक १९७२)
    अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)

  • ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड

    डेव्हिड यांनी एकूण एकशे दहा चित्रपटांत भूमिका केल्या. बूटपॉलिश (१९५४), चुपके चुपके (१९७५), सत्यम् शिवम् सुंदरम् (१९७८), गोलमाल (१९७९), बातों बातों में (१९७९), खूबसूरत (१९८०) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या.

  • ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील

    गेली जवळपास पन्नास वर्षे त्या व्रतस्थपणे कविता लिहितायत. या पन्नास वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. ‘दिगंत’ (१९८१), ‘तरीही’(१९८५), ‘दिवसेंदिवस’(१९९२), ‘वाळूच्या पात्रांत मांडलेला खेळ’(२००५) आणि ‘कदाचित अजूनही’(२०१७). या संग्रहांतून प्रामुख्याने आत्मपर कविता आलेली आहे. या कवितेचा केंद्रबिंदू विशेषत्वाने स्त्रीच राहिलेली आहे.

  • आमदार विनायक मेटे

    पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड एकमेव विनायक मेटे याच्या नावावर आहे.

  • अमेरिकन चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक पॉल न्यूमन

    १९६९ साली पॉल लेनर्ड न्यूमन हे २५ लाख डॉलर्स हे एका सिनेमाचे मानधन घेत असत, आणि निर्माते एक एक वर्ष आधी ते देऊन त्यांना आरक्षित करत असत.

  • ज्येष्ठ गायक विनायकराव पटवर्धन

    पटवर्धनबुवांनी पुण्यात ८ मे १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील काही जण उत्कृष्ट गायक तर काही जण उत्तम शिक्षक बनले. त्यांच्या शिष्यांतील काही निवडक मंडळी म्हणजे पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर, पं. एस. बी. देशपांडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. विष्णू घाग व पं. व्ही. डी. घाटे हे होत.

  • मराठी संशोधक व लेखक  अनंत काकबा प्रियोळकर

    अनंत प्रियोळकर यांचे शिक्षण गोवा, धारवाड आणि सांगली येथे झाले.सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात शिकत असताना विख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. पां. दा. गुणे ह्यांच्याशी प्रियोळकरांचा निकटचा संबंध आला. त्यांच्या सहवासामुळे भाषाशास्त्र आणि पाठचिकित्साशास्त्र ह्या विषयांकडे प्रियोळकर ओढले गेले.

  • संगीतकार हंसराज बेहल

    संगीतकार हंसराज बेहल यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१६ रोजी अंबाला येथे झाला. हंसराज बेहल यांच्या घरी कोणत्याही प्रकारचे संगीताला पोषक वातावरण नसताना फक्त संगीताची ओढ होती म्हणून त्यांनी अंबाला इथे आचार्य चिरंजीवलाल यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ संगीत शिकवणे, स्टेज प्रोग्राम करणे, काही गाण्यांचे रेकोर्डिंग करणे यामध्ये काही काळ त्यांनी व्यतीत केला. हा सारा अनुभव गाठीशी घेऊन १९४४ साली ते मुंबईत आले. तिथे त्यांचे एक नातेवाईक चुन्नीलाल बेहल यांनी त्यांची ओळख पृथ्वीराज कपूर यांच्याशी करून दिली. या ओळखीमुळे हंसराज बेहल यांना त्यांचा पहिला स्वतंत्र संगीत दिग्दर्शनासाठी चित्रपट मिळाला. तो होता दिग्दर्शक ए.बी. इराणी यांचा “पुजारी”. या चित्रपटात बेबी मुमताज (म्हणजेच मधुबाला) हिने गायलेले एक गाणे खूप गाजले ते म्हणजे “भगवान मेरे ग्यान का दीपक जला दे”.

    १९४७ साली “दुनिया इक सराय” या चित्रपटात त्यांनी मीनाकुमारी कडून सुध्दा काही गाणी गाऊन घेतली. त्यातले हे एक “सावन बीत गयो, माई री”. मा.हंसराज बेहल यांच्याकडे सुरवातीच्या काळातील काही गाणी जसे “दिल-ए-नौशादको जीने की हसरत हो गई तुमसे” गायल्यानंतर मा.हंसराज बेहल यांनी लता मंगेशकर यांना आपल्या मूळ मोकळ्या आवाजात गायचा सल्ला दिला आणि त्यांच्याकडून मेहनतीने तशी गाणी गाऊन घेतली. बॉलीवूड मध्ये मा.हंसराज बेहल हे “मास्टरजी” या टोपणनावाने प्रसिध्द होते.

    मोहम्मद रफी मास्टरजींकडे गायले तेव्हा त्यांनी रफी साहेबांना मोकळ्या आवाजातच गायला लावले. मास्टरजींनी अनेक नवीन लोकांना संधी दिली. त्यात एक नाव आहे मधुबाला झवेरी. तसेच गीतकार वर्मा मलिक आणि गीतकार नक्श लायल्पुरी यांना सुध्दा मास्टरजींनी पहिली संधी दिली. पण मास्टरजींची सर्वात मोठी फाईंड म्हणजे आशा भोसले. मास्टरजींच्याच “चुनरिया” चित्रपटातील एका कोरस मध्ये गाणाऱ्या आशाजींचा आवाज मास्टरजींनी बरोबर हेरला. आणि आपल्या पुढच्या चित्रपटात मध्ये त्यांना गायची संधी दिली. त्यांचे पहिले गाणे “है मौजमें अपने बेगने, दो चार इधर दो चार उधर”. त्यानंतर आशाजींना आपल्या चित्रपटात गाऊन घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली.

    हंसराज बेहल यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कलेची, संगीताची निस्सीम सेवा केली. आपल्या भावासोबत त्यांनी एन. सी. फिल्म नावाची एक कंपनी बनवून काही चित्रपटांची निर्मिती सुध्दा केली. “लाल परी”, “मस्त कलंदर”, “राजधानी”, “चंगेज खान” यासारखे काही चित्रपट त्यांनी बनवले. संगीताचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. “जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देस है मेरा” या गाण्यासाठी त्यांना सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मा.हंसराज बेहल यांनी हिंदी चित्रपटसंगीताला आपल्या पंजाबी ढंगाच्या संगीताने नुसतेच नटवले नाही तर अनेक संगीतात अलौकिक देणग्या दिल्या. मा.हंसराज बेहल यांचे २० मे १९८४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    हंसराज बहेल यांच्याबद्दल आणखी एक माहिती जाता जाता..........
    आपल्या कामाबद्दल आणि शांत मनमिळाऊ स्वभावाने अगदी लाखात एक असे गणले जाणारे मा.हंसराजजी आणखी एका बाबतीत लाखात एक होते. म्हणजेच त्यांचे हृद्य हे शरीराच्या उजव्या बाजूला होते. सर्वसाधारणपणे माणसाचे हृद्य हे डाव्या बाजूला असते पण उजव्या बाजूला हृद्य असणे हे लाखात एकाचेच असते. अर्थात ही गोष्ट त्यांच्या डॉ. कडून कळलेली आहे. (चेंबुरचे डॉ. रवी साठे).
    संदर्भ.इंटरनेट/ misalpav.com

    हंसराज बहेल यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=1VrSAH4BbIU
    https://www.youtube.com/watch?v=GVYS2Hv-xLg
    https://www.youtube.com/watch?v=uhAObadBSkA