त्यांनी आतापर्यंत १ लाख ४९ हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. सर जे.जे. रुग्णालयात ते नेत्र चिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. स्वत:च्या मुत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही दिवसातून १२ ते १४ तास रुग्णालयात काम करत होते.
आर्या आंबेकरची आजी वर्षां आंबेकर सुद्धा एक शास्त्रीय गायिका आहेत. तिचा जन्म १६ जून १९९४ रोजी झाला. पार्ले टिळक विद्यालयात संगीत शिक्षिका, आकाशवाणी गायिका, काही ऑडिओ कॅसेटच्या संगीतकार अशी त्यांची ओळख. आर्याचे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर आहेत ते उत्तम तबला वादक सुद्धा आहेत. आर्याची आई श्रुती आंबेकर यांनी जयपूर घराण्याचे खास शिक्षण प्रख्यात गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे अनेक वर्ष घेतले आहे. त्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयात संगीत विभागात लेक्चरर होत्या. त्या एम.ए. म्युझिक सुवर्णपदक, संगीत अलंकार देशात पहिली, बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, नेट उत्तीर्ण आहे. संगीत नाटकातही त्यांनी काम केले आहे. त्यांनी आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले.
आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली. तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी अल्बम्स मध्ये तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात आर्या सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली, आणि सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली. आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महाअंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती. सारेगमप या कार्यकमात तारसप्तकातला ‘नी’ फक्त एकमेव तिला मिळाला होता.
आर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली. ‘पंचरत्न’, ‘गर्जती सह्याद्रीचे कडे’, ‘जय हरी विठ्ठल’, ‘मराठी अभिमानगीत’, ‘आठवा स्वर’, ‘मला म्हनत्यात आर्या आंबेकर’, ‘गीत तुझे गाता गाता’, ‘खाऊचा गाव’, ‘माझ्या मातीचे गायन’, ‘दिवा लागू दे रे देवा’ हे आर्याच्या आवाजातील अल्बम संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. ‘आनंदवन आले घरी’ हा थोर समाजसेवक बाबा आमटेंचं कार्य वर्णन करणारा अल्बमही खूप चर्चेत राहिला.‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचं शीर्षक गीतही आर्यानेच गायलं आहे. आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
आनंद मोडक, नरेंद्र भिडे या संगीतकारांकडे कॅसेट्स, चित्रपट, माहितीपट, नाटक इत्यादीसाठी ती गायली आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची व तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे तर, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते. आर्याला माणिक वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी आर्या आंबेकर अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. ती सध्या काय करते या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीचा रोल तिने केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सज्जाद हुसेन यांना बालपणापासून संगीताची आवड होती. त्यांचा जन्म १५ जून १९१७ रोजी झाला.त्यांनी लहान वयातच सतार, व्हायोलीन, वीणा, बासरी, पियानो सारख्या वाद्ये शिकून घेतली. मेंडोलीन हे त्यांचे अतिशय आवडते वाद्य होते. सज्जाद हुसेन हे चित्रपटसंगीताचे बेताज बादशाह होते.
सज्जाद हुसेन यांच्या रचलेल्या चाली ऐकायला खूप सोप्या असत. पण त्यांची नक्कल करायचा जेव्हा प्रयत्न होई तेव्हा त्या संगीतकाराला त्या सोप्या चालीमागची अवघड वाट दिसायची आणि त्यांची तारांबळ उडत असे. त्यातच सज्जाद हुसेन यांना गाण्याची एक ही मात्रा कमी जास्त झालेली चालत नसे. तशी झाल्याबद्दल त्यांनी प्रसंगी लताबाई तर कधी नूरजहाँ यांना सुध्दा सुनावले होते. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांना अतिशय कमी चित्रपटांचे संगीत द्यायचे काम मिळाले.
सज्जाद हुसेन यांनी आपल्या संगीतात मेंडोलीनचा सढळ वापर केलेला आढळून येतो. १९६३ च्या “रुस्तम सोहराब” या चित्रपटानंतर त्यांना अनेक वर्षे वाट पहावी लागली. त्या काळात त्यांनी आपल्या बाणेदार स्वभावानुसार कुणाकडे काम मागण्याऐवजी आपल्या मेंडोलीनवर अनेक प्रयोग करणे पसंत केले.
सज्जाद हुसेन यांनी आपल्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत फक्त १७ चित्रपट केले.
सज्जाद हुसेन यांचे २१ जुलै १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=TtkHzdEgIyM
प्रसिद्ध लेखक, नाटककार, पत्रकार, अनिल बर्वे यांचा जन्म १७ जुलै १९४८ रोजी पुणे येथे झाला. अगदी २२ वर्षी त्यांनी म रा नाट्यस्पर्धेसाठी दोन नाटके सादर केली. त्यात “कोलंबस वाट चुकला” या नाटकास सोविएत (Soviet Land) नेहरू पुरस्कार मिळाला. साप्ताहिक माणूस मध्ये ७०च्या दशकात “रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता” ही नक्षलवादी चळवळीचा आढावा घेणारी त्यांची लेखमाला गाजली. त्यांनी फुलवा नावाचे एक फिल्मी मासिक काही दिवस काढले पण त्यांचा मूळ पिंड डाव्या विचारसरणीचा असल्याने त्यानंतर “रणांगण” सारखे राजकीय साप्ताहिक त्यांनी काही दिवस चालवले पण जाहिरतिअभावी ते बंद पडले.
पुढे नक्षलवादी पत्रके छापल्याच्या आरोपात ते दीड वर्षे तुरुंगात होते. तुरुंगाच्या वास्तव्यात त्यांनी “थांकयु मी. ग्लाड” ही कादंबरी लिहिली. ती इमर्जन्सीच्या काळात ‘सा. माणूस’ मध्ये छापून आली व अतिशय गाजली. पुढे त्या कादंबरीवर त्यांनी प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदा या संस्थेसाठी नाटक लिहिले. तेही लोकप्रिय झाले. त्यानंतर “हमिदाबीची कोठी” हे वेश्यावस्तीतील जीवनाचे यथार्थ दर्शन देणारे नाटक विजया मेहता यांनी अशोक सराफ, नाना पाटेकर आदि दिग्गज कलाकारांना घेऊन रंगमंचावर आणले. त्याला समिक्षकान्नी उचलून धरले.
त्यानंतर त्यांनी लिहिलेली निपुत्रीकांच्या समस्येवर‘पुत्रकामेष्टी’ (प्र.भु. डॉ प्रभाकर पणशीकर), राजकीय नेत्यांवर आधारित ‘आकाश पेलताना’ (प्र.भु. डॉ श्रीराम लागू), आणि मर्सी किलिंग वर आधारित ‘मी मालक या देहाचा” (प्र.भु. विक्रम गोखले) आदि रंगमंचावर आली. आपल्या लिखाणात अगदी वेगवेगळे विषय अभ्यास करून हाताळणे ही त्यांची खासियत होती. ‘डोंगर म्हातारा झाला’ (आदिवासी जीवन) ‘११ कोटी गालन पाणी’ (चासनाला खाणीची दुर्घटना)‘होरपळ’ (अभयारण्ये) ‘स्टडफॉर्म’, ‘फाशिगेट’ अशा विविध विषयांचा वेध घेणाऱ्या त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या.
त्यांना महाराष्ट्र शासनाचे साहित्याचे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या लेखनाचे अनेक भाषांमध्ये रुपांतर झाले. त्यावर हिंदी मराठी सिनेमेही आले. अनिल बर्वे यांचे ६ डिसेंबर १९८४ ला निधन झाले. फुलवा खामकर व राही बर्वे ही त्यांची मुलं आज आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ.चंद्रकात बर्वे
क्रिकेट जगतात एक वेळ अशी होती की या व्हेरी व्हेरी स्पेशल फलंदाजाला ऑस्ट्रेलिया संघ घाबरत होता. लक्ष्मणने आपल्या करिअरमध्ये सर्वात अधिक धावा ऑस्ट्रेलियाविरूद्ध २,४३४ इतक्या धावा काढल्या आहेत. त्याने कसोटीत कंगारू विरूद्ध ६ शतके तर १२ अर्धशतके ठोकले आहेत.
जस्टीन केवळ परदेशातच नव्हे तर भारतात देखील खूप प्रसिद्ध आहे. अगदी लहान वयातच जस्टीनने इतकी प्रसिद्धी मिळविली की बॉलिवूड स्टार्ससुद्धा त्याच्यासमोर फिके पडले. फोर्ब्स मासिकाच्या म्हणण्यानुसार, जस्टीन चार वेळा जगातील १० सर्वात शक्तिशाली सेलिब्रिटींमध्ये यादीत सामिल झाला आहे. जस्टीन बीबरच्या संगीत अल्बमने १० दशलक्षाहून अधिक संगीत रेकॉर्ड विकल्या आहेत.
आगा ह्यांच्या विनोदी भूमिकांची वेगळी पद्धत म्हणा स्टाईल होती ती म्हणजे ‘ लेट ऍक्शन ‘ . एखादे वाक्य कानावर पडल्यावर ते हो म्हणत आणि लगेच चेहरा धक्का बसल्यासारखा करत , किंवा धक्का बसल्याचा अभिनय करत. त्यालाच ‘ लेट ऍक्शन ‘ म्हणतात. त्याची सुरवात त्यानेच केली असे म्हटले जाते. पुढे अनेक विनोदी नटांनी ही पद्धत उचलली असेही म्हटले जाते.
कुसुमताईंचे नाव मराठी रंगभूमीवरच्या एका महत्त्वाच्या कलाकृतीशी जोडलेले आहे आणि ती कलाकृती म्हणजे लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतीचित्रे’ या आत्मकथनावरील एकपात्री प्रयोग. कुसुमताईंचे चुलत बंधू सीताकांत हेगडे यांनीच मूळ पुस्तकावरून रंगावृत्ती तयार केली होती आणि या एकपात्री कार्यक्रमाचे दिग्दर्शन नाटककार विजय तेंडुलकर यांनी केले होते. त्यामुळेच नंतर ‘सखाराम बाइंडर’साठी तेंडुलकरांनी कुसुमताईंचे नाव दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लक्ष्मीच्या भूमिकेसाठी सुचवले. मध्यमवर्गिय जाणिवांना आणि दिवाणखान्याच्या चौकटीतल्या नाटकाला धक्का देणाऱ्या ‘सखाराम बाईंडर’मधील लक्ष्मी कुसुमताईंनी अफलातून रंगवली आणि मराठी नाट्य इतिहासात स्वतःचे स्थान निर्माण केले.
आज १८ ऑक्टोबर
आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीचा वाढदिवस.
जन्म:- १८ ऑक्टोबर १९७७
त्यांनी आपले शिक्षण जीजीभोय या पारशी मनुष्य सेवाभावी संस्था मधून केले.आणि नंतर चे पूर्ण शिक्षण सिडनाहम कॉलेज, चर्चगेट वाणिज्य या विषयातून पूर्ण केले. वयाच्या नव्या वर्षी, स्वप्नील जोशी यांनी रामानंद सागर यांच्या काल्पनिक कार्यक्रम उत्तर रामायण यात तरुण कुश भूमिका साकारली तिथून त्यांनी त्यांची अभिनय कारकीर्द सुरू केली. २००८ सालातील मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटमाध्यमात पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली. 'टार्गेट' नावाच्या सिनेमातही त्याने काम केले आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई' नंतर मुक्ता बर्वे बरोबर एका लग्नाची दुसरी गोष्टनावाच्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत त्याने 'घन:श्याम' उर्फ 'घना'ची भूमिका बजावली. दरम्यान 'मुक्ता बर्वे' बरोबर त्याची जोडी सर्वच प्रेक्षकांना आवडली. 'दुनियादारी' चित्रपटात त्याने सुंदर भूमिका केलेली आहे व 'जिंदगी, जिंदगी' नावाचे गीत देखील गायले आहे. ‘कॉमेडी सर्कस’मधून त्याने सगळ्यांना हसवले. मात्र कधी अभिनय, कधी निवेदन; तर कधी परीक्षक या सगळ्या रूपात कायम राहिली ती त्याची “चॉकलेट बॉय’ची प्रतिमा. अनेक हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे. हारे काच की चुडियाँ, कॉमेडी सर्कस – १ आणि २ यासारख्या हिंदी मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
रति अग्निहोत्रीने अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून तिचा"एक दुजे के लिए'हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अभिनेत्री रति अग्निहोत्रीचा जन्म १० डिसेंबर १९६० रोजी मुंबई मध्ये झाला. रतीने बॉलिवूडमध्ये या चित्रपटाने पाऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटाने रतीला रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे तिला ३ वर्षात ३२ तेलगु चित्रपटात काम करायाची संधी मिळाली.
रतीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केलीय. लग्नानंतर रतीने एक मोठ्ठा ब्रेक घेतला. यानंतर तब्बल सोळा वर्षांनी ‘कुछ खट्टी, कुछ मीठी’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. या चित्रपटात तिने काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका साकारली होती.
अलीकडच्या काळात ‘शादी के साइड इफेक्ट्स’,‘सिंह इज ब्लिंग’ यासारख्या सिनेमात रती अलीकडे दिसली होती. रतीला तनूज नावाचा एक मुलगा आहे. ‘लव्ह यू सोनीयों’ या चित्रपटातून तनूजने बॉलिवूड मध्ये प्रवेश केला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti