(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई

    दिलीप सरदेसाई यांची ओळख विदेशी भूमीवर द्विशतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज
    अशी होती. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४० रोजी मडगाव गोवा येथे झाला. १९५६ मध्ये मुंबईमध्ये येईपर्यंत दिलीप सरदेसाई यांची क्रिकेट कारकीर्द सुरु झालेली नव्हती. त्यावेळी गोवा राज्यात मध्ये तसे क्रिकेट कमीच होते. लहानपणी ते टेबल टेनिस खेळात असत. ते शाळेच्या अनेक स्पर्धेत टेबल टेनिस खेळले. परंतु मुंबईला आल्यानंतर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तिथे ठरवले की आपण क्रिकेट खेळायचे.

    त्यांना खरे क्रिकेटसाठी खरे प्रोत्साहन दिले ते भारतीय संघाकडून नाव कमावलेल्या त्यांच्या चुलत भावाच्या म्हणजे सोपान सरदेसाई याला मिळालेल्या यशामुळे. दिलीप सरदेसाई खऱ्या अर्थाने सुदैवी होते कारण मुंबईचे भूतपूर्व रणजी खेळाडू एम. एस. नाईक दिलीप सरदेसाई यांच्या खेळावर खूप खूश होते. त्यांनी दिलीप सरदेसाई यांना मार्गदर्शन द्यायला सुरवात केली.

    एम. एस. नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप सरदेसाई विविध प्रकारचे फटके मारण्याची तयारी करत होते त्याचप्रमाणे आपल्या फलंदाजीवरचे लक्ष विचलित न होण्याची देखील काळजी घेत होते. म्हणून त्यांनी जास्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले नाही. तर फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रित केले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी कडून खेळण्यास सुरवात केली. १९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ' हिट विकेट ' करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.

    दिलीप सरदेसाई यांनी विदेशी मैदानावर म्हणजे १८ ते २३ फेब्रुवारी १९७१ साली किंग्स्टन मैदानावर वेस्टइंडिनजवरुद्ध पहिल्या इनिंग २१२ धावा केल्या. आणि त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केला तो म्हणजे परदेशी भूमीवर पहिले द्विशतक केले.अर्थात तो सामना अनिर्णित राहिला. ह्याच दौऱ्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ११२ धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाने पहिल्या वेळी वेस्ट इंडिजच्या संघाला हरवले. ह्या दौऱ्यामधील पहिला , तिसरा आणि पाचवा सामना अनिर्णित राहिले.

    ह्या दौऱ्यामधील चौथ्या सामन्यांमध्ये त्यांनी १५० धावा केल्या, ते होल्डरकडून बाद झाले होते . ही कसोटी मालिका भारतीय संघाने १-० ने जिंकली. ह्या दौऱ्यामध्ये दिलीप सरदेसाई यांनी ऐकून ६४२ धावा केल्या. ह्या दौऱ्यामध्ये सुनील गावस्कर यांनी ७७४ धावा केल्या तर सर गारफिल्ड सोबर्स यांनी ५९७ धावा केल्या होत्या. दिलीप सरदेसाई यांनी मुंबई मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२ ते १५ मार्च १९६५ मध्ये नाबाद २०० धावा केल्या. डावखुरे दिलीप सरदेसाई गोलंदाज पण होते परंतु त्यांचे लक्ष फलंदाजीकडे असल्यामुळे ते गोलंदाजीमध्ये जास्त प्रभाव पाडू शकले नाही.

    दिलीप सरदेसाई ज्या जमान्यामध्ये आतंरराष्ट्रीय सामने कमी होत असत. खेळाडू जास्त फर्स्ट क्लास सामने खेळत असत. जेव्हा त्यांनी भारतीय संघाने पहिला वहिला इंग्लंडच्या ओव्हल मैदानावरचा सामना जिंकला तो क्षण दिलीप सरदेसाई यांना महत्वाचा वाटला होता. त्या ओव्हलच्या मैदानावर महत्वाच्या कसोटी सामन्यांमध्ये दिलीप सरदेसाई यांनी ५४ आणि ४० अत्यंत मोलाच्या धावा केल्या. भारताला त्या विजयासाठी या धावांची खूप मदत झाली. पहिल्या इनिंग मध्ये सरदेसाई यांच्या ५४ तर सर्वात जास्त फारुख इंजिनिअर यांनी ५९ धावा काढल्या होत्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये सरदेसाई यांनी ४० धावा काढल्या होत्या. तर अजित वाडेकर यांनी ४५ धावा काढल्या होत्या.

    दिल्ली इथे २० ते २५ डिसेंबर १९७२ रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात दिलीप सरदेसाई खेळले. सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की , ' दिलीप सरदेसाई यांनी जलद गोलंदाजीवर कसे खेळावे हे दाखवून दिले.' दिलीप सरदेसाई यांना चेंडूवर नजर बसण्यासाठी जरा वेळ दिला की क्षेत्ररक्षकांची दमछाक होत असे, गोलंदाजांचा धीर सुटत असे. ते दमून जात. दिलीप सरदेसाई यांचे कटचे फटके, ग्लान्सचे फटके , ड्राईव्हचे फटके आणि हूकचे फटके मारत असत त्याचप्रमाणे खेळताना अनेक फटके त्यांच्या भात्यात असत.

    ३० सामन्यांमध्ये २००१ धावा केल्या त्यावेळी त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २१२, त्यामध्ये त्यांनी ५ शतके आणि ९ अर्धशतके केली. त्यातली दोन द्विशतके होती. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १७९ सामन्यांमध्ये १०, २३० धावा केल्या त्यामध्ये त्यांची २५ शतके आणि ५६ अर्धशतके होती.

    विजय मर्चंट यांनी दिलीप सरदेसाई यांना'द रेनासांस मॅन ऑफ इंडिया' म्हणून गौरवले. महत्त्वाचे असे की ज्या काळात आंतरराष्ट्रीय सामने मोठ्या प्रमाणावर खेळले जात नसत. त्या काळात त्यांनी ही कामगिरी केली आहे. डावखूरा फलंदाज असलेले सरदेसाई एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. १९७२मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांची आणखी एक खासीयत अशी की आपल्य एकूण कारकिर्दीत त्यांनी केवळ दोनच षटकार ठोकले.

    १९६२ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यातली सरदेसाई यांची एक आठवण सांगितली जाते. वेस्ट इंडिजकडे त्यावेळी एकापेक्षा एक वेगवान मारा करणारे गोलंदाज होते. भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यात एक उसळता चेंडू बसला होता. त्यामुळे त्यांना डाव अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. त्यांच्यानंतर फलंदाजीला येण्यासाठी फलंदाज तयार नव्हते. त्यावेळी सरदेसाई यांनी पुढाकार घेतला आणि ते खेळायला उतरले.

    दिलीप सरदेसाई यांनी बडोद्यात राहणारी आपली गर्लफ्रेंड नंदिनी पंत यांच्याशी लग्न केले. असे म्हणतात दिलीप सरदेसाई हे नंदिनी पंत यांना दररोज एक पत्र लिहीत असत. त्या एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ होत्या. नंदिनी पुढे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही झाल्या. नंदिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांना एकमेकांना सुमारे १०० पत्रं लिहीली.दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव राजदीप सरदेसाई हे देशातील नामवंत पत्रकार आहेत.

    दिलीप सरदेसाई यांची पत्नी नंदिनी सरदेसाई या सेंट सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबईत समाजशास्त्र विभागाच्या मुख्य होत्या. दिलीप सरदेसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलीप सरदेसाई मेमोरियल लेक्चर मुंबईत आयोजित केलं जातं. दिलीप यांच्या पत्नी आणि समाजशास्त्रज्ञ नंदिनी आणि मुलगा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यातर्फे या व्याख्यानाचं आयोजन केलं जातं. दिलीप सरदेसाई यांचे २ जुलै २००७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.

    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • गायिका माणिक वर्मा

    माणिक वर्मा यांनी वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १९३९ साली दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चार भावगीते गायली आणि दोन ध्वनिमुद्रिकामध्ये गाऊन ह्या क्षेत्रात त्या आल्या. अर्थात चित्रपटगीतांच्या बाबतीतही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. प्रभात कंपनीच्या हिंदी ‘ गोकुल ‘ या चित्रपटात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत त्यांनी प्रथम गायले. परंतु त्यांनी जास्त गाणी हिंदीपेक्षा मराठी चित्रपटांसाठी गायली. माणिक वर्मा यांनी असंख्य भावगीते , भक्तिगीते , चित्रगीते गायली आणि ती सर्व गाणी आजही आपल्या संस्कृतिक जीवनाचा भाग बनून राहिली आहेत.

  • लोकप्रिय कॉमेडी स्टार ल्युसिल बॉल

    गेल्या शतकातली अमेरिकेची अत्यंत लोकप्रिय कॉमेडी स्टार ल्युसिल बॉलचा जन्म ६ ऑगस्ट १९११ रोजी न्यूयॉर्क येथे झाला.

    सुरुवातीची काही वर्षं रंगभूमीवर धडपड केल्यानंतर ल्युसिल बॉलला रोमन स्कॅन्डल्स, ब्लड मनी, किड मिलियन्स असे चित्रपट मिळाले. १९४० सालच्या ‘टू मेनी गर्ल्स’मध्ये ती डेझी आर्नेझबरोबर चमकली आणि त्यांनी लग्नही केलं. ऑक्टोबर १९५१ पासून पुढची सहा वर्षं त्यांची ‘आय लव्ह ल्युसी’ ही टेलिव्हिजन सीरियल दणक्यात चालली आणि ल्युसी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

    तिच्यातल्या कॉमेडीच्या लाजवाब टायमिंगने लोकांवर भुरळ पडली. पुढे तिने डेझी आर्नेझशी घटस्फोट झाल्यावरही दी ल्युसी शो (१९६२-६८) आणि हिअर इज ल्युसी (१९६८-७४) या मालिका केल्या आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावरच राहिली. तिला एकदा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. १३ वेळा प्राइमटाइम एमी पुरस्कारांचं नामांकन तिला मिळालं होतं आणि चार वेळा तो पुरस्कार मिळाला होता.

    तिने प्रतिष्ठेचा क्रिस्टल पुरस्कारही मिळवला होता. ल्युसिल बॉलचे २६ एप्रिल १९८९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • संगीतकार झुबीन मेहता

    १९५८ मध्ये व्हीएन्नामध्ये पहिल्यांदा ‘ म्युझिक कंडक्ट ‘ केले. त्याच वर्षी ते लिव्हरपूल येथील रॉयल लिव्हरपूल फिलॅर्मोनिकचे असिस्टंट कंडक्टर झाले. आणि इथूनच थंयच्या मोठ्या कारकिर्दीला सुरवात झाली.

  • दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर

    दूरदर्शनच्या सरकारी काळया-पांढऱ्या पडद्यावर १९७० च्या दशकात चैतन्य फुंकले ते कमलेश्वर आणि तबस्सुम या द्वयीने.. कमलेश्वर यांनी दूरदर्शनला सामाजिक-वैचारिक परिमाण दिले, तर तबस्सुम यांनी पसत मनोरंजनाचे परिमाण.

  • हास्य अभिनेता नूर मोहम्मद चार्ली

    स्टूडियो सिस्टम जेव्हा बंद होऊ लागली तेव्हा नूर मोहम्मद चार्ली हे ४० च्या दशकात पृथ्वीराज कपूर व दुर्गा खोटे यांच्या सारखे फ्री लान्सीग करू लागले होते एवढी त्यांना मागणी होती. एक काळ असा होता की नूर मोहम्मद चार्ली यांच्या नावावर चित्रपट चालत असे.

  • प्रख्यात मराठी लेखिका मीना देशपांडे

    साहित्य सागरातील कोहिनूर हिरा साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांची कन्या मीना देशपांडे.

  • लेखक आणि दिग्दर्शक सय्यद अली रझा

    आन, अंदाज, मदर इंडिया, रेश्मा और शेरा, राजा जानी आणि दस नंबरी यासारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या. १९६८ मध्ये त्यांना सरस्वतीचंद्र सर्वोत्कृष्ट संवाद लेखक म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७५ मध्ये त्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

  • सुप्रसिद्ध लेखक, निर्माता अजेय झणकर

    दोहपर्व’ कादंबरीवर ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवूड चित्रपट तयार झाला. मराठी लेखकाच्या साहित्यकृतीवर बेतलेला हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ठरला. ‘बटरफ्लाइज ऑफ बिल बेकर’ या रहस्यप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन झणकर यांची कन्या सानिया झणकर यांनी केले होते. चित्रपटाची कथा झणकर यांची होती. हॉलिवूडमधील मॅनहटन महोत्सवात हा चित्रपट उल्लेखनीय ठरला होता.

  • कृषी कर्मयोगी दादासाहेब बोडके

    सोलापुर जिल्ह्यातील अनगर गावातील दादासाहेब बोडके हे एक कर्तबगार शेतकरी आहेत. अल्पशिक्षित असले तरी शेतीच्या विद्यापीठात पीएच.डी शोभतील असे दादांचे कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्या शेतीत असंख्य प्रयोग केले. अनेक पिकांची लागवड केली. शेडनेट, पॉलीहाऊस आदी तंत्रे आत्मसात केली.