तबस्सुम या जरी अभिनेत्री म्हणून आपण ओळखत असलो तरी त्या दूरदर्शन वरून १९७२ ते १९९३ सादर झालेल्या फूल खिले हैं गुलशन गुलशन या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचल्या.
जयंतराव टिळक हे स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन इंडियन नॅशनल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार झाले होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी अध्यक्ष होते.
"देवकी पंडित"....मराठी संगीत जगतातलं, सध्याचं एक आदरणीय नाव.....सारेगमप मधला त्यांचा "पण" नेहमीच अचूक असयचा.....एखाद्या गाण्याबद्दलचं त्यांचा अभ्यास अगदी वाखडण्याजोगा असतो.त्यांचा जन्म ६ मार्च १९६५ रोजी झाला.
आभळमाया, वादळवाट, अवघाची संसार....आणि अश्या अनेक सीरियल्स ची टाइटल गाणी देवकीजींच्या आवाजात अगदी सुरेल आणि सुमधुर वाटतात. ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी व्यासपीठावर गाणे गाऊन श्रोत्यांच्या ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित. सुरांच्या काटेकोरपणाबद्दलचा त्यांचा आग्रह, परखडपणा हे त्यांचे वैशिष्टय़ असूनही सामान्य रसिकांच्या मनात स्थान मिळविणारे हे नाव. शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजवत असतानाच हिंदी-मराठी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करणाऱ्या, मालिकांच्या शीर्षकगीते करणाऱ्या देवकी पंडित यांनी सुरुवातीला आपली आई उषा पंडित यांच्याकडे गाणे शिकल्यानंतर त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे काही काळ संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर किशोरी आमोणकर, व जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिकायची संधी त्यांना मिळाली. गुरूंकडून सतत शिकत रहावे या वृत्तीने त्या पुढेहा बबनराव हळदणकर, डॉ अरुण द्रविड यांची मार्गदर्शन घेत राहिल्या. पंडित वसंतराव कुलकर्णीकडे शिकत असताना ते पूर्वीच्या गायकांची उदाहरणे द्यायचे. पूर्वी गायक कसे १२-१२ तास रियाज करत असत हे सांगायचे. एकदा ते दोन महिन्यांकरता बाहेरगावी जात असताना रियाज व्यवस्थित चालू ठेवण्यास सांगून गेले. तेव्हा देवकी पंडित यांनी ते ते इतके मनावर घेतले, की भरपूर रियाज करायचा एवढा एकच विचार मनात ठेवून त्या गात राहिल्या. दोन महिने सतत गायल्यामुळे त्यांचा आवाज बंदच झाला. त्यानंतर त्या जवळजवळ तीन वर्षे गाऊच शकल्या नाहीत. त्या दोन-तीन वर्षांच्या काळात देवकी पंडित तंबोरा लावून बसायच्या आणि गाता येत नसल्याने केवळ सूर ऐकत राहायच्या. त्या काळात त्यांनी सगळ्यांची खूप गाणी ऐकली. तंबोरा योग्य रीतीने कसा लावला पाहिजे, खर्ज, पंचम कसा लावायचा या गोष्टी पुन्हा पुन्हा करून त्यांनी आत्मसात केले. याच काळात देवकी पंडित हार्मोनियम व तबला शिकल्या. गेल्या तीन दशकांपासून देवकी पंडित संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपांत, वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्यांची स्वरप्रतिभा रसिकांसमोर येत आहे. तानसेन, मल्हार, सवाई गंधर्व यांसारख्या प्रख्यात संगीत महोत्सवांमधून त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजल्या. तसेच ‘अस्तित्व’, ‘कभी हां कभी ना’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वॉटर’, ‘साज’ अशा हिंदी चित्रपटांसाठी केलेल्या पाश्र्वगायनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला. ‘सावली’, ‘अर्धागी’ अशा मराठी चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले. ‘आभाळमाया’, ‘हसरतें’, ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांमधून देवकी पंडित या घराघरांत पोहचल्या. ‘रिअॅलिटी शो’च्या परीक्षक म्हणून काम करताना देवकी पंडित यांच्या मधील सुरांच्या अचूकतेबाबत आग्रही असणारी गायिका सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
देवकी पंडित यांनी गायलेली काही गाणी
जाळीमधी झोंबतोया गारवा
तुम्ही जाऊ नका हो रामा
वादळे उठतात किनारे
सप्तसुरांनो लयशब्दांनो जगेन
सूर्यनारायणा नित् नेमाने उगवा
माझी उदास गीते तू ऐकतोस
https://www.youtube.com/shared?ci=e-aIoBrIpJY
https://www.youtube.com/shared?ci=JB8x9xCvQmc
https://www.youtube.com/shared?ci=0xW4b9zNlc4
भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृत नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही.
कबीर बेदी,फिल्म इंडस्ट्रीतील हे असं नाव आहे,जो आपलं आयुष्य नेहमी आपल्या अंदाजात जगत आला आहे. त्यांचा जन्म १६ जानेवारी, १९४६ रोजी लाहोर(पाकिस्तान)मध्ये झाला.या व्यक्तीने कधीही सामाजिक आदर्शांना महत्त्व दिले नाही किंवा व्यवहारिक नैतिकेवरही विश्वास ठेवला नाही.मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणारे कबीर बेदी आपल्या काळातील सुंदर स्त्रियांना आकर्षित करण्यात नेहमीच यशस्वी राहिले.करिअरमध्ये ते आपल्या समवयीन अभिनेत्यांपेक्षा नेहमी वेगळे ठरले.कबीर बेदींनी केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर परदेशातही काम करुन नाव आणि प्रसिद्धी मिळवली.भारतात परतल्यानंतर ते हिप्पी लाइफ स्टाइल आणि अनेक स्त्रियांसह असलेल्या संबंधांमुळे नेहमीच चर्चेत राहिले.
गेल्या वर्षी आपल्या ७०व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे १५ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने २९ वर्षांनी लहान गर्लफ्रेंड परवीन दोसांजसोबत लग्न केले होते. खास गोष्ट म्हणजे,त्यांची चौथी पत्नी परवीन(वय 42 वर्षे)त्यांची मुलगी पूजा बेदी(वय 46 वर्षे)पेक्षा चार वर्षांनी लहान आहे. परवीन ही ब्रिटीश वंशाची अॅक्ट्रेस आणि मॉडेल आहे.गेल्या दहा वर्षांपासून ती कबीर बेदींसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती.
कबीर बेदी हे सत्तरच्या दशकात ‘कच्चे धागे’ चित्रपटानंतर हिंदीत आपली मागणी कमी होत चालल्याचे लक्षात येताच, हॉलीवूडला गेले व ‘सांदोकन’ या विदेशी चित्रपटातून भूमिका साकारत तेथे आपला जम बसवला. त्यांना त्याच्या हँडसम व्यक्तिमत्त्वाचा भरपूर फायदा झाला; पण त्या काळात कबीर बेदी विदेशात गेले म्हणजे नेमके काय करतात याची इकडे काहीही कल्पना येत नव्हती. काही प्रतिष्ठित इंग्रजी मासिक वगळता कबिर बेदी यांचा शोध घेणे फारसे कोणाला गरजेचे वाटले नाही. चार लग्न,तीन घटस्फोट,तीन मुले आणि दोन नातवांचे आजोबा असलेले कबीर बेदी मनाने आजही तरुणच आहेत.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.२ मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१२ मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, सध्या अयोध्येतील राम मूर्ती बनविण्याचे काम राम सुतार करत आहेत. अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे.
पुणे येथे १८८० साली एका पारशी नाटक मंडळीचे ऑपेराच्या धर्तीवरील एक नाटक त्यांच्या पाहण्यात आले. तसे नाटक मराठीत करून दाखविण्याची इच्छा त्यांस होऊन त्यांनी कालिदासाच्या अमिज्ञानशाकुंतर या नाटकाचे भाषांतर केले. त्यामध्ये स्वतःची पदेही घातली आणि उत्तम नटसंच मिळवून ते १८८० साली रंगभूमीवर आणले.
कच्च प्रदेशातील एका गुजराती व्यापाऱ्याने मुंबईत स्थलांतर केले. त्यांचा जन्म २ मार्च १९३३ रोजी झाला.किराणा मालाचे त्यांचे छोटे दुकान होते. कल्याणजी आनंदजी ही ह्या व्यापार्याची मुले होती. मुंबईतील गिरगाव भागांत फुकट अन्नाच्या बदल्यांत एक संगीत शिक्षकाने ह्यांना संगीताचे धडे दिले. ह्या मुलांचे आजोबा गुजराती लोकसंगीताचा अभ्यास असलेले गायक असल्याने कदाचित ह्यांच्या रक्तांत संगीत आधीपासून होते.
मा.कल्याणजी आनंदजी या नावाने ख्यात असलेल्या या दोन भावांच्या जोडीने अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्याजवळ असलेल्या संगीतकौशल्याने अशी काही जादू केली की, त्या काळातील सर्व संगीतकारही भारावून गेले. Claviolin हे वाद्य वाजवत कल्याणजीनी आपले संगीत क्षेत्रांतील स्थान प्राप्त केले. नागीन चित्रपटातील ती नागीनची धून तुम्हा-आम्हा सर्वांनाच कायम स्मरणात तर राहणारी आहेच, पण त्या धूनने संपूर्ण चित्रपटसृष्टीलाही त्या वेळी आकृष्ट केले होते. कल्याणजी यांनी हार्मोनियममध्ये अशी काही जादूची कांडी बसविली की, हार्मोनियममधून बिनेचा आवाज बाहेर पडला आणि सर्वच संगीतकार अवाक् झाले. ते वर्ष होते १९५४, त्या काळी एस. डी. बर्मन, हेमंत कुमार, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन, हुस्नलाल भगतराम, रवि अशा दिग्गज संगीतकारांची चलती होती. पण, या दोन्ही भावांचे हे कौशल्य पाहून चित्रपटसृष्टी आकृष्ट झाली नसती तरच नवल. पण, त्यासाठी त्यांना पाच वर्षे वाट पाहावी लागली आणि १९५९ साली त्यांना पहिला चित्रपट ‘चंद्रगुप्त’ मिळाला. त्यातील ‘चाहे पास हो, चाहे दूर हो, मेरे सपनोंकी तुम तकदीर हो...’ हे गाणे त्या वेळी एवढे गाजले की, मग कल्याणजी आनंदजी या जोडीला मागे वळून पाहण्याची गरजच भासली नाही. पोस्ट बॉक्स नं. ९९९, सट्टा बाजार, छलिया, मदारीमधील गाणीही सुपरहिट ठरली. नंतर हिमालय की गोद मे आणि जब जब फूल खिलेमधील संगीताने तर प्रेक्षक वेडावून गेले. सर्व चित्रपट हिट ठरले. या जोडीने दिलेल्या सुमारे २५० चित्रपटांपैकी १७ चित्रपटांना सुवर्णमहोत्सव आणि तब्बल ३९ चित्रपटांना रौप्यमहोत्सवांची सोनेरी किनार लाभली. नंतर तर ते त्याकाळच्या सर्वच नामवंत निर्माता-दिग्दर्शकांचे आवडते संगीतकार बनले. प्रकाश मेहरा यांनी आपल्या बहुतेक म्हणजे ९ चित्रपटांत या जोडीला संधी दिली. मनोज कुमार यांनी उपकार आणि पूरब और पश्चिआमसाठी या जोडीची निवड केली. फिरोज खान यांनी अपराध, धर्मात्मा, कुर्बानी आणि जांबाजसाठी कल्याणजी आनंदजी जोडीला काम दिले. मनमोहन देसाई, सुल्तान अहमद, राजीव राय, गुलशन राय, सुभाष घई यांनीही कल्याणजी आनंदजी जोडीचीच निवड केली. सरस्वतीचंद्र या चित्रपटातील अत्यंत सुमधुर संगीतासाठी त्यांना १९६८ सालीच पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. १९७४ साली कोरा कागज चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार या जोडीने पटकावला. मुकद्दर का सिकंदरसाठी पहिला पॉलिडोरचा प्लॅटिनम डिस्क अवार्ड त्यांना प्रदान करण्यात आला. भारत सरकारने त्यांच्या या कामगिरीची दखल घेत दोन्ही भावांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. अशा अनेक पुरस्कारांची मांदियाळी कल्याणजी आनंदजी या जोडीभोवती फिरत राहिली. पण, या पुरस्कारांनी किंवा मिळत जाणार्या यशांनी दोन्ही बंधू हुरळून गेले नाहीत. अतिशय मृदु स्वभावामुळे आणि सर्वांचा सन्मान राखणारी ही जोडी असल्यामुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव आजही अतिशय सन्मानाने घेतले जाते. या दोन्ही भावांचे वैशिष्ट्य म्हणजे कल्याणजी हे शास्त्रीय संगीताची बाजू सांभाळीत, तर आनंदजी हे आधुनिक संगीताची जोड देत. त्यामुळे कोणतेही गीत असो, त्याच्या चाली एवढ्या सुमधुर होत्या की, प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतले. या जोडीने दीड हजारावर गाण्यांना चाली आणि संगीत दिले. मा.कल्याणजी यांचे निधन होऊन आज अनेक वर्षे लोटली. पण, मा.आनंदजी हे संगीतव्रत अजूनही जोपासून आहेत. कल्याणजींनंतर संगीताचा डोलारा आनंदजी यांनी सांभाळला आणि आजही ते नवोदितांना संगीतविषयक मार्गदर्शन करीत असतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कल्याणजी व आनंदजींची काही गाजलेली गाणी
जिस पथ पे चला
वादा करले सजाना
दिल तो दिल है
जा रे जा ओ हरजाई
मेरे अँगने में
एक तारा बोले
ओ साथी रे
अपनी तो जैसे तैसे
दम दम डिगा डिगा
फूल तुम्हे भेज है खत में
जीवन से भरी तेरी आँखे
पल पल दिलके पास
नीले नीले अंबर पर
चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी झाला.
अंतराळवीर बनण्याआधी नील आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि त्या वेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता. ते एअरोस्पेस इंजिनीअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापकदेखील होते.
नौसेनेतील नोकरीनंतर आर्मस्ट्राँग यांनी पुरूडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झाले. तेथे टेस्ट पायलट म्हणून त्यांनी ९०० पेक्षा जास्त वेळा उड्डाण केले. आर्मस्ट्राँग यांनी जेमिनी मोहिमेदरम्यानही अंतराळ प्रवास केलेला होता. त्यांचे वडील स्टीफन हे ओहायो येथे सरकारी अंकेक्षक होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय ओहायोच्या अनेक भागांमध्ये भ्रमण करीत होते.
नील यांच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांची किमान २० ठिकाणी बदली झाली होती. याच काळात नील यांना हवाई उड्डाणाचे वेड लागले. आर्मस्ट्राँग यांनी आपल्या १६ व्या वाढदिवशीच स्टुडण्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळविले होते आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वत: विमान उडविले होते. त्या वेळी त्यांच्याजवळ विमान उडविण्याचा परवानाही नव्हता.नंतर नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेत नील आर्मस्ट्राँग १९७१ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी सिनसिनाटी विद्यापीठात अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले.
२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. अपोलो ११ नावाच्या यानातून आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले, तेव्हा ते ३८ वर्षाचे होते. बझ अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या सहका-यांसोबत चार लाख किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत नील आर्मस्ट्राँग यांनी केला. या तीन दिवसांत काय होणार याच्या उत्सुकतेने तमाम पृथ्वीवासीयांच्या हृदयाचे ठोके चुकत होते.
१९६१ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी याच दशकात अमेरिका माणसाला चंद्रावर उतरवून सुखरूप परत आणेल, असे आश्वासन दिले होते. रशियाबरोबर सुरू असलेल्या शीतयुद्धात त्यामुळे अमेरिकेचा हा मोठा विजय ठरला.
नील यांच्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी त्यांचा सहकारी अल्ड्रिनही चंद्रावर उतरला. नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर सुमारे २ तास ३२ मिनिटांचा काळ व्यतित केला होता. चंद्रावर अमेरिकी झेंडा फडकावून, काही दगड सोबत घेऊन आणि शास्त्रीय प्रयोगांची सुरुवात करून हे दोघे अंतराळवीर यानात परतले होते. परतल्यानंतर रेडिओद्वारे नील आर्मस्ट्राँग यांनी म्हटलेले ‘हे एका माणसाचे छोटेसे पाऊल आहे. पण अखिल मानवजातीसाठी खूप मोठी झेप आहे,’ हे वाक्य अजरामर झाले आहे.
चांद्रमोहीम आणि अंतराळवीर असे वलय असूनही नंतर ते अत्यंत साधेपणानेच आयुष्य जगले.
नील आर्मस्ट्राँग यांचे २५ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
रविकिरण मंडळातील एक तेजस्वी किरण समजला जाणारा हा तरुण कवी, पुढे त्यांच्या जीवनग्रंथाचं अवघं एकच पान उलगडलं गेलं. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला.अवघ्या चोवीस वर्षांचं आयुष्य म्हणजे जाणत्या वयातली केवळ सात ते आठ वर्षच लाभली. पण एवढय़ा अल्पकाळात कवी मा.दत्तांनी जो वारसा मागे ठेवला तो चार पिढय़ांपर्यंत झिरपला. विपुल लेखन केलेल्या, आपल्या नातवंड-पतवंडांच्या सहवासात रमलेल्या किती कवी-लेखकांच्या वाटय़ाला हे भाग्य आलं असावं? काव्यप्रतिभेचा दुर्मीळ वारसा जपणारी चार पिढय़ांची परंपरा लाभलेलं घराणंही दुर्मीळच म्हणायला हवं. कवी मा. दत्त, त्यांचे मा विठ्ठलराव घाटे, त्यांच्या कन्या डॉ. अनुराधा पोतदार आणि त्यांची मुलं.. डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि यशोधरा पोतदार-साठे. कवी दत्त यांचे शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता १८९७ व १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि.द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत.
दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे १३ मार्च १८९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti