त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथांपैकी अमृतानुभव भावार्थमंजिरी, पासष्टीभावार्थदीपिका, श्रीगुरूचरित्र सारामृत, श्रीगोदा महात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थबोधिनी व मंत्रार्थप्रकाशिका, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीशनिप्रताप, श्रीशंडिल्यभक्तिसूत्र भावदीपिका हे प्रमुख ग्रंथ त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष पटवितात.
सरदार हे गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणीचा संस्कार असणारे समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. सर्व जातीतील त्यांचे मित्र होते. त्यांनी कधीच जात-पात मानली नाही. आपल्या अनेक मित्रांचे , वारल्यांचे आयुष्य मातीमोल झालेले त्यांनी पाहिलेले होते. त्याचा परिणाम त्यांच्यावर खूप झाला आणि समाजवादी प्रेरणा त्यांना तेथूनच झाली.
हरिहरन मुंबईत लहानाचे मोठे झाले. विज्ञान व कायदा या शिक्षण शाखांच्या पदव्या घेतल्या आहेत. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९५५ रोजी झाला.हरिहरन यांनी हिंदी, मल्याळम, कन्नड, मराठी अशा अनेकविध भाषांत गाणी म्हणली आहेत. ते एक उत्तम गझल-गायकही आहेत. ते उत्तम मराठी बोलतात. अलमेलू हे त्यांचे संगीतातले पहिले गुरू होते. संगीतकार रेहमान यांनी हाय रामा(रंगीला), सून री सखी (हमसे है मुकाबला), भारत हमको जानसे प्यारा है (रोजा) या गाण्यांतून शास्त्रीय-उपाशास्त्रीय धाटणीचा गायक अशी मा.हरिहरन यांची प्रतिमा निर्माण केली आणि ‘टेलिफोन धून मे हसने वाली’ (हिंदुस्थानी), यू ही चलाचल (स्वदेस) सारख्या उडत्या चालीच्या गाण्यांनी ती धुऊन काढली. रेहमान-हरिहरन जोडीने दिलेली सर्वात सुंदर गाणी विरहगीत या प्रकारात मोडतात. रोजा जानेमन (रोजा), तू ही रे.. (बॉम्बे), चंदा रे चंदा रे (सपने) हरिहरन यांनी गायलेल्या चित्रपट-गीतांमधील यादें(यादें), झौका हवा का (हम दिल दे चुके सनम), कितनी बातें(लक्ष्य), ही विरहगीते नेहमीच मनात घर करून बसतात. हरिहरन यांनी भारतीय फ्युजन संगीतात मूलभूत काम केले. त्यांचा अल्बम "कलोनियल कझिन्स‘ याची साक्ष देतो. कलोनियल कझिन्स! हा एक गाजलेला अल्बम यातील ‘कृष्णा नीबे..’ ‘ओ हो काय झालं..’ ‘सा नि धा पा..’ अशा गाण्यांनी लेस्ली लुईस आणि हरिहरन या जोडीने भारतीय संगीतात एका वेगळ्याच संगीतप्रकाराची भर घातली. पण, गझल हा त्यांचा खास जिव्हाळ्याचा विषय. "गझल तुम्हाला नेहमीच मध्यममार्गी अनुभव देते. खयाल, ठुमरी, कव्वाली असे केवढे तरी वैविध्य यात आहे. संगीतात तीन दशकांहून आपल्या अधिकच्या कारकिर्दीत त्यांनी नौशादजींपासून जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, इलयाराजा, रहेमान, अजय-अतुल आणि त्यांचा मुलगा अक्षय अशा अनेक संगीतकारांसोबत काम केले. अक्षयने गेल्या वर्षी आलेल्या "कोकणस्थ‘ला संगीत दिले होते. २००४ साली हरिहरन यांनी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हरिहरन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=qlUvCY2rp08
https://www.youtube.com/watch?v=1kEjXAzir3Q
https://www.youtube.com/watch?v=RR1bIAPM3Ro
https://www.youtube.com/watch?v=j6fNKK2GBBk
https://www.youtube.com/watch?v=CJvK0dox0_M
https://www.youtube.com/watch?v=cuMYU4bqZ_A
साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव खोताचे काम करीत असत. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींनी विपुल वांगमय लिहिले आहे. कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यांच्या वांगमयातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे, बोध आहे. त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली. गुरुजींनी आपल्या सर्व लेखक समाज उद्धवासाठी केले त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणी द्वारे प्रकट केले. साने गुरुजी यांची कर्मभूमी खानदेशची. अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर आणि प्रताप विद्यालयात त्यांनी अध्यापन केले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी श्या.मची आईचे लेखन पूर्ण केले. धुळ्यातील कारागृहात असताना त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली गीताई लिहिली. मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. "श्याामची आई‘ च्या एकपात्री प्रयोगांनी तर संस्काराची शिदोरी अधिकच घट्ट केली. गुरुजींनी अमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. प्रांताप्रांतातील हेवादेवाही अद्याप नष्ट झालेला नाही. क्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वताला बांधक ठरणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधूप्रेमाचे वारे वाहावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, हि मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलना मध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. मा.साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज २४ ऑक्टोबर. आज अनेक ख्यातनाम गायकांच्या कौतुकाचा विषय ठरलेली शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्तीचा वाढदिवस.
कौशिकीचा जन्म २४ आक्टोबर १९८० रोजी झाला. पं. अजय चक्रवर्ती यांच्या त्या कन्या.
पतियाळा घराण्याचे गायक पंडित अजय चक्रवर्ती, आई चंदना चक्रवर्ती संगीत शिक्षक, घरातच गाणे, वयाच्या २ र्या वर्षापासून तिने संगीत शिकण्यास सुरूवात केली. ऋतुपर्ण घोष या प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाने ['रेनकोट, चोखेर बाली'] देवू केलेल्या प्रमुख नायिकेच्या ऑफरला नम्रपणे नकार देणार्या कौशिकी चक्रवर्तीच्या शास्त्रीय संगीत सेवेला सलाम केला पाहिजे. क्रवर्ती यांच्यासह प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, पं. भीमसेन जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास जोशी, गायक उपेंद्र भट, आनंद भाटे उपस्थित होते. ‘बिहाग’ रागगायनानंतर त्यांना ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे’ ही ठुमरी गाण्याची फर्माईश झाली. मात्र, पं. अजय चक्रवर्ती यांनी कौशिकी यांना ‘याद पिया की आए’ ही ठुमरी गाण्याचा आग्रह केल्यावर त्यांनी ती नजाकतीने पेश केली.
कौशिकी २००६ मधील त्यांच्या पहिल्या मैफलीच्या आठवणी सांगताना म्हणते, एक दिवस मी घरी असताना दूरध्वनी वाजला. मी तो घेतला. ‘मैं भीमसेन जोशी बोल रहा हूँ. इस साल हमारे यहाँ पूना आना पडेगा’ असा पलीकडून आवाज आला. पंडितजी मला दिसत नसले तरी मी जागेवरच उभी राहिले होते.
कौशिकीसारख्या गायिकांच्या हातात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुरक्षित आहे, अशी खुद्द पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली पावती हे कौशिकीचे यश आहे. आज तिचे नाव तिची या क्षेत्रातील तपस्या तसेच सौंदर्य या दोन्ही मुळे देशविदेशात गाजत आहे.
तिचे पती पार्थ देशीकान हे स्वतः उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या परंपरेतील उदयोन्मुख गायक असून त्यांनीही कौशिकीप्रमाणेच आपले सासरे पं.अजय चक्रवर्ती यांचेच शिष्यत्व पत्करले आहे.
कौशिकीने देशात परदेशात अनेक मैफीली गाजवल्या आहेत. गाणारं सौंदर्यच हे! जे तिचे कार्यक्रम बघतात ते तिचे फॅन होतात. कौशिकीला आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
साने गुरुजी यांचा `श्यामची आई’ हा चित्रपट प्रथम चित्रपटगृहात चौसष्ठ वर्षापुर्वी ६ मार्च १९५२ रोजी दाखवला गेला.
साने गुरूजींच्या अजरामर `श्यामची आई’' पुस्तकावर आधारित त्याच नावाचा व तितकाच अनमोल चित्रपट प्रदर्शित झाल्याला आज ६५ वर्षे झाली. पण या चित्रपटाची गोडी व आकर्षण आजही कायम आहे. 'श्यामची आई'चे दिग्दर्शन व निर्मिती मा.आचार्य अत्रे यांनी केले होते. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची त्यांची ही पहिलीच वेळ होती. पण तरीही त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. प्रत्येकाची आई `श्यामची आई’प्रमाणेच असावी, असे हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकालाच वाटते. दिग्दर्शक मा.आचार्य अत्रे यांचे सृजनशील दिग्दर्शन, तर वनमाला, दामूअण्णा जोशी, माधव वझे, हे सर्वच कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या सामर्थ्यावर श्यामच्या आईच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले. मराठीतील सर्वोत्कृष्ट क्लासिक चित्रपटापैकी एक असणाऱ्या श्यामची आई मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरला. प्रेमळ पण योग्यवेळी कडक असणाऱ्या श्यामच्या आईची भूमिका अभिनेत्री वनमाला यांनी चपखलतेने बजावली की त्यांच्या शिवाय अन्य कोणत्याही अभिनेत्रीचा विचार करत येणार नाही. अवखळ, पण गोंडस आणि आईवर मनस्वी प्रेम करणाऱ्या श्यामची भूमिका माधव वझे यांनी लीलया साकारली. आई-मुलाचे निःस्वार्थी प्रेम, शिकवण, संस्कार, त्याग या सर्व भावना दिग्दर्शक मा. आचार्य अत्रे यांनी सुंदरतेने मांडल्या आहेत. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक मा.वसंत देसाई यांचे छडी लागे छम छम… आणि भरजरी ग पितांबर… ही गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठावर असतात. श्यामची आई हा चित्रपट मराठीतच नव्हे तर अमराठी रसिकांमध्ये इतका लोकप्रिय आहे की, गेल्या वर्षी मदर्स डे ला आंध्र प्रदेशातील आंध्र ज्योती या वर्तमानपत्राने याचे तेलगु व इंग्रजी सबटायटल करून हा चित्रपट आंध्र प्रदेश येथे सर्वत्र झळकावला. तर पंजाब येथील प्रीती लाहिरी या मासिकेच्या संपादिका पूनम सिंघ यांनीही हा चित्रपट भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पंजाबच्या खेडय़ांमध्ये झळकावला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
या चित्रपटाची लिंक
https://www.youtube.com/shared?ci=WZnZCqE5Jg8
उस्ताद अल्लारखा खान यांना तबल्याचा जादूगार अस म्हटल जाते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ रोजी फगवाल जम्मू येथे झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासून अल्ला रक्खा खान यांच तबल्याशी नात दृढ झाल होते. उस्ताद अल्लारखा खान यांनी आपली कारकीर्द १९४० साली मुंबई आकाशवाणी चे स्टाफ़ आर्टिस्ट म्हणून केली.तेव्हा लोकांना तबला हे फक्त संगीतातील वाद्य आहे अशी धारणा होती. ही धारणा अल्ला रक्खा खान यांनी बदलली. १९४५ ते १९४८ हिंदी चित्रपटाला संगीत दिले पण ते बॉलीवूड मध्ये यशस्वी झाले नाहीत. उस्ताद अल्लारखा खान यांनी बड़े ग़ुलाम अली ख़ाँ, उस्ताद अलाउद्दीन ख़ाँ, पंडित वसंत राय व पंडित रविशंकर यांना खूप वेळा तबल्याची साथ केली. उस्ताद अल्लारखा खान यांनी भारत व विदेशात तबल्याला एक स्वतंत्र वाद्य म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. भारत सरकारने १९७७ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.१९८२ साली संगीत नाटक अकादमी अवार्ड त्यांना मिळाले होते. त्यांचे शिष्य त्यांना अब्बाजी म्हणत. उजवा तसेच डावा असे दोन्ही हातांचा उत्तम समन्वय साधत तबलावादन करणे ही मा. अल्ला रक्खा खान यांची विशेषता होती. अल्ला रक्खा खान यांना तीन मुले, झाकीर हुसेन, फझल कुरेशी, तौफिक कुरेशी.
झाकीर हुसेन आणि र्फ्क्युनिस्ट तौफिक कुरेशी लोकांना माहिती आहेत. पण तबलावादक फझल कुरेशी नेहमीच लो-प्रोफाइल राहिले आहेत. मुंबईत क्लासिकल संगीताची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी ते पार पाडत आहे. जेव्हा जेव्हा पंजाब घराण्याची चर्चा होते तेव्हा उस्ताद अल्लारखा खान यांच्या नावाची चर्चा होते. त्यांच्या निधनानंतर तबल्याच एक युग संपले अस म्हणतात. मा. उस्ताद अल्लारखा खान यांचे ३ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जन्म: १९ जानेवारी १८९२
'सुधारक' या पत्राचे संपादक वि. रा. जोशी हे त्यांचे वडील. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९१३), एम्.ए. (१९१६) झाले. पाली भाषेचा विशेष व्यांसग १९२० पासून बदोद्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. प्रथम आठ वर्षे बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक. १९२८ पासून बडोदा सरकारचे दप्तरदार. १९४९ मध्ये निवृत. बडोद्याच्या वास्तव्यात गुजराती भाषेशी त्यांचा उत्तम परिचय झाला.निवृत्तीनंतर पुण्यास आल्यावर मराठी साहित्य परिषदेच्या कार्यात सहभाग.
बडोद्याच्या 'सहविचारिणी सभे' च्या विद्यमाने निघणा-या 'सहविचार' ह्या नियतकालिकाचे ते एक संपादक होते. 'अ मॅन्युअल ऑफ पाली सध्दम्मप्पकासिनि' (संपादन), 'पाली कंकॉर्डन्स' (कोश), 'जातकांतील निवडक गोष्टी... (१९३०)', 'शाक्यमुनि गौतम' (१९३५), 'बुध्दसंप्रदाय व शिकवण' (१९६३) , ही त्यांची ग्रंथनिर्मिती त्यांच्या पालीच्या व्यासंगाची द्योतक आहे; पण याहीपेक्षा चाळीसांवर पुस्तके लिहून त्यांनी मराठी विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्त्वाची होय.
विनोदी लेखनाची प्रेरणा त्यांना कोल्हटकर-गडक-यांच्या कोटित्वयुक्त लेखनातून मिळाली व त्याचा ठसा आपणास त्यांच्या प्रारंभीच्या 'एरंडाचे गु-हाळ... (१९३२)' मधील लेखन व 'चिमणरावांचे च-हाट... (१९३३)', मधील विवाहविषयक लेख यांवर स्पष्ट दिसतो. या मराठी लेखकांबरोबरच मार्क ट्वेन, डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार त्यांच्यावर झाले.
पूर्वीच्या विनोदकरांप्रमाणे त्यांनीही चिमणराव व गुंडयाभाऊ अशी मानसपुत्रांची जोडगोळी जन्मास घातली आणि तिला विविध लोकव्यवहारांतून फिरवून आणले. पण त्यांच्या चित्रणात अतिशयोक्तीपेक्षा स्वभावोक्तीवर आणि समाजसुधारणेच्या मंडनापेक्षा मानवी स्वभावातील साध्यासुध्या विसंगतींच्या दर्शनावर भर राहिला. त्यांची निवेदनशैलीही मर्मभेदक कोटित्वापेक्षा मार्मिक व स्वभाविक संवादानी नटलेली आहे. त्यामुळे त्यांचे लेखन निबंधरूप होण्या ऐवजी त्याला ललित कथेचा घाट प्राप्त झाला व त्यातून मध्यमवर्गीयांचे एक अस्सल व स्वयंपूर्ण विश्व साकार झाले. वर उल्लेखिलेल्या पुस्तकांशिवाय वायफळाचा मळा' (१९३६), आणखी चिमणराव (१९४४), ओसारवाडीचे देव (१९४६), गुंडयाभाऊ (१९४७), रहाटगाडगं (१९५५), हास्यचिंतामणी (१९६१), बोरीबाभळी (१९६२), हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह प्रसिध्द आहेत. 'चिमराव स्टेट गेस्ट' ह्या त्यांच्या एका कथेवरुन काढण्यात आलेला 'सरकारी पाहुण' हा चित्रपट महाराष्ट्रात विलक्षण गाजला होता. चिं.वी.जोशी यांचे निधन २१ नोव्हेंबर १९६३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२२३०१७३३
संदर्भ. ग्लोबल मराठी
अरुण होर्णेकरांनी आजवर ‘दिवा जळू दे सारी रात’सारख्या मेलोड्रामापासून ‘हैदोस’, ‘भोगसम्राट’सारख्या हिट् ॲण्ड हॉट नाटकांपर्यंत.. आणि ‘बेकेट’,‘वेटिंग फॉर गोदो’, ‘गिधाडे’ सारख्या ॲटब्सर्ड, प्रश्नयोगिक, तसंच वास्तववादी नाटकांपासून ते ‘सख्खे शेजारी’सारख्या रेव्ह्यू प्रकारातल्या नाटकांपर्यंत सगळ्या पिंड-प्रकृतीची आणि प्रवृत्तीची नाटकं केली आहेत.
डॉ. श्रीराम अभ्यंकर हे अमेरिकेत राहणारे भारतीय-मराठी प्रज्ञावंत गणिती होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते. अभ्यंकर अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात गणित, संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. त्यांचे बीजभूमिती या विषयात विशेष नैपुण्य होते.
Copyright © 2025 | Marathisrushti