(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप

    मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी झाला. आपल्या भारूडाने समस्त मराठी रसिकांना वेड लावणा-या विठ्ठल उमप यांनी आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली होती. राज्याच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे.
    विठ्ठल उमप यांचा मूळचा गळा विदर्भाचा असला, तरी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांच्या घराण्याने भेदिकाची परंपरा सुरू ठेवली. विठ्ठल उमप यांचे वडील भेदिकाचे गायक पण उमप यांच्यावर भेदिकापेक्षा आंबेडकरी जलसा आणि सत्यशोधकी तमाशाचा विशेष प्रभाव पडला होता. मुंबईला उदरनिर्वाहासाठी आलेल्या उमप यांनी कामगार वस्तीत मेळ्यातून कामे केली. विठ्ठल उमप हे लोकशाहीर असले तरी त्यांना 'कवाल' म्हणूनच लोक पूर्वी ओळखत. पण नंतर मात्र त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून, एक समर्थ लोककलावंत, अशी आपली ओळख निर्माण केली. लोकरंगभूमी, रंगभूमी, कव्वालीचे व्यासपीठ, काव्य संमेलने, रुपेरी पडदा, दूरचित्रवणीचा छोटा पडदा अशा अनेक माध्यमांमध्ये उमप यांचा सर्वत्र संचार होता.

    'आला कागुद कारभारणीचा' ही लावणी, 'ऐका मंडळी कान देऊनी तुम्हा सांगतो ठेचात कुडी आत्म्याचं भांडण झालं भारी जोरात', 'भूक लागलीया पाठी कशासाठी पोटासाठी', 'माझ्या आईचा गोंधळ', 'आईचा जोगवा', 'आरती श्रीगणेशा जगदीशा', 'वादळ वारा तुफान येऊ द्या', 'ये दादा आवर रे', 'फाटकी नोट मना घेवाची नाय', 'भाता मीठ नही टाक्या' अशा वेगवेगळ्या लोकगीतांच्या गायनाने विठ्ठल उमप यांनी आपला स्वतंत्र ठसा लोकगीताच्या क्षेत्रात उमटविला. 'माझी मैना गावाकडं राह्यली' या गाण्यानं तर अनेकांचे डोळे पाणावले.

    विठ्ठल उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. १९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता. विठ्ठल उमप केवळ लोकगीत गायनापाशी थांबले नाहीत. त्यांनी लोकरंगभूमीसोबतच नागर रंगभूमीवर संचार ठेवला. 'अरे रे संसार', 'अबक दुबक', 'विठो रखुमाय', 'खंडोबाचं लगीन', 'जांभुळाख्यान' या चाकोरीबाहेरच्या नाटकांसोबतच 'हैदोस', 'बुद्धम्‌ शरणम्‌'सारखी नाटके त्यांनी वर्ज्य मानली नाहीत.

    विहीर, टिंग्या, सुंबरान,या चित्रपटांमध्ये व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांनी काम केले होते.लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

    विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश आता त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. विठ्ठल उमप यांचे २६ नोव्हेंबर २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी स्टालिन

    तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीअसलेले स्टालिन यांचं पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी स्टालिन आहे. सोव्हिएत संघ युनियनचे प्रसिद्ध नेते जोसेफ स्टालिन यांच्या नावावरुन एम. के. यांच्या नावामागे स्टालिन लावण्यात आलं. स्टॅलिन हे एम. करुणानिधी आणि त्यांची दुसरी पत्नी दयालू अम्मल यांचे चिरंजीव होत.

  • भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड

    त्याकाळी सुमारे आठ कोटींचं साहित्य स्क्रॅप करण्याऐवजी त्यांनी तेच साहित्य दुसऱ्या कारला असेंबल करण्याचं ठरवलं. त्यांनी ते करुन दाखवलं. हणमंत गायकवाड यांच्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक टाटा प्रशासनाला आली.

  • विनोदी अभिनेता, खलनायक सदाशिव अमरापूरकर

    अमजद खान, अमरीश पुरी यांच्यानंतर चे सर्वात खतरनाक वाटणारे हिंदी - मराठी चित्रपटातील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांना आपल्या वडिलांचा व्यवसाय असतानाही, मात्र शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नाट्य स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता.

    "हॅंडस्‌ अप', हे त्यांचे अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे यांच्या समवेतचे पहिले व्यावसायिक नाटक रंगमंचावर आले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. या नाटकातल्या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. याच नाटकातली त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक आणि निर्माते गोविंद निहलानी यांनी त्यांना "अर्धसत्य' या चित्रपटात ओम पुरी यांच्या समवेत भूमिका दिली होती. या चित्रपटातली त्यांनी केलेली बेरक्या आणि धूर्त, कटकारस्थानी "रामा शेट्टी'ची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या समर्थ अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडले.

    १९९१ मध्ये "सडक' या चित्रपटात त्यांनी तृतीय पंथियाची केलेली भूमिका गाजली होती. याच भूमिकेबद्दल त्यांना "फिल्मफेअर' पुरस्कारही मिळाला होता. रंगभूमीवरच्या नाटकात त्यांना भूमिका करणे विशेष आवडत असले, तरीही चित्रपटाच्या व्यवसायात गर्क झाल्यामुळे, पुढे त्यांना मोजक्याच नाटकात भूमिका करता आल्या. सदाशिव अमरापूरकर म्हणजे दुष्ट खलनायक असा शिक्का त्यांच्यावर बसला. पुराना मंदिर, नासूर, मुद्दत, विरू दादा, जवानी, फरिश्ते, या चित्रपटातल्या त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर त्यांनी हुकूमत या चित्रपटात पहिला खलनायक रंगवला होता. त्यानंतर त्यांनी याच अभिनेत्याबरोबर अनेक चित्रपटात खलनायकाच्या हुकमी भूमिका केल्या.

    विविध प्रकारच्या खलनायकाच्या भूमिका रंगवणाऱ्या अमरापूरकर यांनी स्वत:ला त्याच चौकटीत अडकवून मात्र घेतले नाही. उत्तम चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, असा लौकिकही त्यांनी मिळवला. हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, ओरिया यासह अन्य भाषातल्या ३०० च्या वर चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘अर्धसत्य’, ‘सडक’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी प्राप्त केले होते. अहमदनगरच्या स्नेहालय, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सामाजिक कृतज्ञता निधी, अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यासह अनेक संस्थात ते सक्रिय होते. या संस्थांना त्यांनी आर्थिक मदतही केली होती. सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • महान व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांची पुण्यतिथी

    २६ जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्यदिन. आनंदाचा दिवस. मात्र याच दिवशी भारत एका महान व्यक्तिमत्त्वाला मुकला. महान व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांची पुण्यतिथी आजच्या दिवशीच.

    भारतीय व्यंगचित्रांची ओळख असलेल्या प्रत्येक जण रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना आर.के. लक्ष्मण या नावानेच ओळखतो.

    सुप्रसिद्ध लेखक आर.के. नारायण यांचे लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २४ आक्टोबर १९२१ रोजी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी अनेक नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. 'हार्पर्स', 'पंच', 'ऑन पेपर', 'बॉइज', अॅ्टलांटिक', अमेरिकन मर्क्युरी', 'द मेरी मॅगझिन', स्ट्रॅन्ड मॅगझिन', अशी मासिके त्यांना तिथे पहायला-वाचायला मिळत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यात रस होता. तशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण चित्रे काढू लागले. अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स येथे शिकण्यासाठी मा.लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग आर.केंनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पुढे लक्ष्मण पदवीधर झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठी दिल्लीला गेले. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली. मग काही काळ ब्लिट्झ मध्ये आणि नंतर फ्री प्रेस जर्नल मध्ये लक्ष्मण यांनी काम केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे देखील तेथेच काम करीत असत. मात्र कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही असा फ्री प्रेसच्या मालकांचा दंडक होता. म्हणून त्यांनी 'फ्री प्रेस'ची नोकरी सोडली. त्यांनी १९५० पासून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली. त्यानंतर अर्धशतकभर ते 'टाइम्स ऑफ इंडिया' मध्ये व्यंगचित्रे काढत राहिले. यू सेड इट नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. या व्यंगचित्रकाराने आपल्या मिश्कील, खुमासदार तर कधी बोच-या, उपरोधिक, धारधार टिप्पणीने समाजातील उणिवांवर, दोषांवर भाष्य केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ लोटला, पण त्यांचे व्यंगचित्र या दैनिकात नाही असे एकदाही घडलेले नाही. मा.लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच आताही आहे - चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा पोषाख आहे. लक्ष्मण यांनी असंख्य व्यंगचित्रे काढली आहेत पण त्यांनी कधीही या माध्यमाच्या आडून कोणास दुखावले नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत.
    त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे सर्वसामान्य भारतीय माणूस ‘कॉमन मॅन’ देशभर आणि जगभर पोहोचला आहे. मा.लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की त्याचा एक पूर्णाकृती पुतळाही बनविण्यात आला आहे. पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेच्या मुख्य आवारात लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'चा ९ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्‌स साठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पुस्तके म्हणजे भारतीय समाजमनाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे. त्यांची अनेक पुस्तके आजही हातोहात खपतात. फक्त व्यंगचित्रकार इतकीच त्यांची ओळख नाही. निबंध, प्रवासवर्णने आणि लघुकथा या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांना देशविदेशी पुरस्कार मिळाले आहेत. जर्नालिझम, लिटरेचर अँड क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने १९८४ मध्ये गौरवण्यात आले.
    आर.के. लक्ष्मण यांना पद्मविभुषण, पद्मभुषण, आणि अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार मिळाले. मा.आर.के. लक्ष्मण यांचे निधन २६ जानेवारी २०१५ रोजी झाले. आपल्या समूहाकडून मा.आर.के. लक्ष्मण यांना आदरांजली.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट
    मा.आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके
    आयडल अवर्स आर.के. लक्ष्मण.: दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८
    द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह) अ डोज ऑफ लाफ्टर( विनोदी अर्कचित्रे) दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा, निबंध, प्रवासवर्णने -२००३)फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह) बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४ पुस्तके) द मेसेंजर (कादंबरी -१९९३)अ व्होट ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे) द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)
    मा.आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा ’लक्ष्मणरेषा’ नावाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे.

  • संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी

    हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते.

    मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन केली असे बोलले जाते. जी.एम. दुराणी यांचे ९ सप्टेबर १९८८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जगद्विख्यात व्हायोलिनवादक येहुदी मेनुहीन

    येहुदी मेनुहीन यांनी अल्लारखा, रविशंकर यांच्यासह अनेक ऐतिहासिक मैफीली केल्या होत्या. १९६८ साली इस्ट मिट वेस्ट या अल्बम साठी रविशंकर यांच्यासह येहुदी मेनुहीन यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.

  • महान गायक महेंद्र कपूर

    मनोज कुमार यांच्या "उपकार‘ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन्‌ प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं "मेरे देश की धरती‘... हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९३४ रोजी झाला.

    महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा वाढता कल होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. या मार्गावर खूप संघर्ष करावा लागणार शालेयस्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन घेतले. सेंट जेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. संगीत की शिक्षा उन्होंने पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. 'मदमस्त' या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले.

    गीत, गझल, भजन, कव्वाली सारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, रवी, कल्याणजी-आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अभिनेत्यांना आवाज दिला. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना कमी संधी मिळाली. तरीदेखील एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. बी. आर. चोपड़ा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते गायली. चोप्रा यांची 'धूल का फूल', 'वक्त', 'हमराज', 'धुँध' यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांनी गायन केले. मनोज कुमार यांच्या 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यांसारखे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपरगीते हिट झाली. 'मेरे देश की धरती' या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे. हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. महेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्म फेयर पुरस्कार, सारखे अनेक पुरस्कार मिळाले.

    महेंद्र कपूर यांचे निधन २७ सप्टेंबर २००८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- वेब दुनिया

  • ज्येष्ठ गीतकार वसंत निनावे

    वसंत निनावे यांनी आकाशवाणी साठी अनेक श्रुतिका लिहिल्या. त्या श्रुतिका नीलम प्रभू, बाळ कुरतडकर यांच्या सारख्या दिग्गज रेडिओ कलाकारांनी सादर केल्या होत्या. पुढे याच श्रुतिका ‘आकाशप्रिया’ या नावाने त्या पुस्तक रूपात प्रसिद्ध झाल्या, आणि या पुस्तकाला राज्य शासनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला होता.

  • शामची आई

    संस्कार म्हणजे नक्की काय?

    बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं.

    प्रेम आणि मातृत्वाचा साक्षात्कार घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत व वाणीत होती, अशा मा.साने गुरुजी यांच्या `श्यामची आई' या अवीट गोडीच्या पुस्तकाच्या लिखाणाची सुरुवात ९ फेब्रुवारी १९३३ साली झाली. स्थळ होते, नाशिकचा तुरुंग व समोर श्रोते होते, तुरुंगात विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे कैदी. स्वातंत्र्य चळवळीत सत्याग्रह केल्याच्या `गुन्ह्या'साठी साने गुरुजीही सजा भोगत होते., कैद्यांना रात्री आईच्या गोष्टी सांगतानाच साने गुरुजी त्या आठवणी लिहून काढत राहिले. पाच दिवसांत म्हणजे १३ फेब्रुवारीपर्यंत त्यांनी पुस्तक लिहीले.

    `श्यामची आई' ही साने गुरुजींच्या लहानपणीच्या जीवनाची गोष्ट. पांडुरंग सदाशिव साने नावाचा कोकणातला मुलगा त्याच्या आई-वडिलांसह परिस्थितीशी झुंज देत देत मोठा होतो. वडिलांच्या पडत्या काळात घर सांभाळतानाच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, म्हणून आईची चाललेली धडपड रोजची अनुभवतो. या साऱ्याचे त्याच्या बालमनावर खोलवर परिणाम होत राहतात. तीच स्पंदने `श्यामची आई' मध्ये टिपलेली आहेत. यातला `श्याम' म्हणजे स्वत: साने गुरुजी. स्वत:ला स्वत:पासून दूर करून आत्मकथन करण्याचा विलक्षण वेगळा व कठीण प्रयोग साने गुरुजींनी `श्यामची आई'ची रचना करताना साकारला. तो कमालाचीचा यशस्वीही झाला.

    `श्यामची आई'च्या प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक `रात्र' असे आहे. अशा ४२ रात्रींत श्यामच्या आईचे कथानक पूर्ण होते. `श्यामची आई' वाचताना ज्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या नाहीत, असा माणूस क्वचितच सापडेल. हे कथानक म्हणजे खरे तर गद्य रुपात साने गुरुजींनी रचलेले काव्यच आहे.

    त्यावर आधारित `श्यामची आई' हा मराठी चित्रपट आचार्य अत्रे यांनी १९५३ साली निर्माण केला. तो प्रचंड गाजलाच, शिवाय त्याच वर्षीपासून सुरू झालेला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार याच चित्रपटाला मिळाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शामची आई पुस्तक गुगल प्ले स्टोअर वर
    https://play.google.com/store/apps/details?id=sahityachintan.shyamchiAai