भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा.प्रतिभा पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव येथे झाला. प्रतिभा पाटील यांचे वडिल सरकारी वकिल होते. एम.ए करत असतानाच त्यांची पावले राजकारणाकडे पडली. त्याला कारण ठरले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रतिभाताई उपस्थित होत्या. महिलांनी राजकारणात यायला हवे. राजकारण स्वच्छ रहाण्यासाठी महिलांची उपस्थिती गरजेची आहे, अशा आशयाचे भाषण तेव्हा चव्हाणांनी केले होते. ते ऐकून प्रभावित झालेल्या प्रतिभाताई राजकारणात उतरल्या.
पण राजकारणा उतरायचे तर काही लक्ष्य समोर हवे, असे नव्हते. योगायोगाने त्यांच्या तोपर्यंतच्या कामाची पावती आणि धडाडी पाहून त्यांन जळगाव मतदारसंघातून आमदारकीचे तिकिट मिळाले. आश्चर्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्या आमदार झाल्या. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे पंचवीस. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषवली. आमदार असतानाच त्या वकील झाल्या. याच काळात त्यांचा विवाह झाला देवीसिंह शेखावत यांच्याशी. जळगावनंतर प्रतिभाताईंनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या.
विधानसभेत प्रतिभाताईंनी अनेक पदांवर संधी मिळाली. त्यांचे त्यांनी सोने केले. १९६७ ते १९७७ या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर १९७८ ते १९८० या कालावधीत शरद पवार पुलोदचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले.
कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन १९८० मध्ये प्रतिभाताईंना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. पण पक्षानेही त्यांच्या योग्यतेचा विचार करून राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली.
तेथे त्यांची ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेऊन उपसभापती म्हणून निवड झाली. १९८६ ते ८८ या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत १९९१ साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या.
प्रतिभाताई २००७ ते २०१२ या काळात राष्ट्रपती राहिल्या. राष्ट्रपतिपदाची कर्तव्ये पार पाडतानाच त्यांनी वायुसेनेच्या सुखोई, टी-10 या रणगाड्यावर स्वार होऊन, सुदर्शन शक्ती सैन्य अभ्यास दौ-यात सहभागी होऊन महिला शक्तीची प्रचिती आणून दिली होती. राष्ट्रपती असताना प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती भवनातील ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाविषयी रोशनी प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
१९२८ च्या सुमारास भास्करबुवा बखले यांनी त्यांना महाराष्ट्रात आणले. त्यानंतरची दहा वर्षे ते गंधर्व नाटक मंडळीत होते. बालगंधर्वाचा सुरेल आवाज आणि तिरखवाँची भावनाकूल अशी सुसंवादी साथ यांमुळे नाटकातील पदे रंगून जात.
अनुपम खेर यांचे वडील सरकारी क्लार्क होते. मा.खेर यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथील D.A.V प्रशालेत झाले. त्यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी झाला.नंतर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून केले. कलेची आवड असल्यामुळे नाटक व रंगमंचाची आवड त्यांना होती. अभिनयात करियर करण्याच्या हेतूने ते मुंबईला आले. हॉलीवूड, बॉलीवूड दोन्ही आघाडय़ांवर कार्यरत राहून निर्माता, दिग्दर्शक, शिक्षक आणि अगदी लेखकाच्या भूमिकेतूनही वावरणाऱ्या अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरवात १९८२ साली “आगमन” या चित्रपटाने झाली. पण १९८४ सालचा महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ या चित्रपटाने मा.अनुपम खेर यांचे नाव झाले. ‘सारांश’मध्ये बी. व्ही. प्रधान या शाळेच्या निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांची भूमिका करायची होती. या भूमिकेसाठी निर्मात्यांना कोणी तरी प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकार हवा होता. त्या वेळी या भूमिकेच्या मानाने तरुण असलेल्या अनुपम खेर यांनी ही भूमिका आपण उत्तम वठवू शकू, असा विश्वास दिला होता. अनेक घडामोडींनंतर अखेर ही भूमिका त्यांच्या पदरी पडली आणि त्यांची कारकीर्द सुरू झाली. बॉलीवूडमध्ये ‘हम आपके है कौन’, ‘डॅडी’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सारख्या व्यावसायिक चित्रपटांपासून ते ‘वेनस्डे’, ‘स्पेशल २६’, ‘खोसला का घोसला’, ‘मैने गांधी को नही मारा’सारख्या वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या आहेत. बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमधलीही त्यांची वाट जुनीच आहे. ज्या वेळी ओम पुरी, नसीरुद्दीन शहा यांच्यासारखे मोजकेच कलाकार हॉलीवूडमध्ये काम करत होते त्याच वेळी अनुपम खेर यांनी तिथली वाट धरत ‘बेंड इट लाईक बेकहॅम’, अँग लीचा ‘लस्ट, कॉशन’ आणि वूडी अॅडलनचा ‘यू विल मीट अ टॉल डार्क स्ट्रेंजर’ अशा हॉलीवूडपटांमधून काम केलं होतं. अकॅडमी अॅशवॉर्ड विजेता ठरलेला रॉबर्ट डी निरो यांचा ‘सिल्वर लाइनिंग्ज प्लेबुक’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेला हॉलीवूडपट आहे. त्याशिवाय, हॉलीवूड अभिनेता गेरार्ड बटलर बरोबर ‘द हेडहंटर कॉलिंग’ या मार्क विल्यम दिग्दर्शित हॉलीवूडपटातही त्यांनी काम केलं असून हे दोन्ही चित्रपटाही त्यांनी काम केले आहे. अनुपम खेर यांनी ५०० हून अधिक चित्रपटात व १०० हून अधिक नाटकात काम केले आहे. पाचशेव्या चित्रपटाचं नाव ‘द बिग सिक’ असं असून मायकेल शोवॉल्टर दिग्दर्शित या चित्रपटात ऑस्कर विजेता अभिनेता हॉली हंटर, झो काझन आणि रे रोमानो हे हॉलीवूड कलाकार काम केले आहे. मा.अनुपम खेर यांना ५ वेळा बेस्ट कॉमिक रोल साठी फिल्मफेयर चा अवार्ड मिळालेला आहे. चित्रपट विजय साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला आहे. एक अभिनेता असण्यासोबत ते भारतीय सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन नेशनल स्कूल ऑफ ड्रामा इंडिया चे अध्यक्ष पण राहिले आहेत. हिंदी सिनेमा आणि कला क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने २००४ मध्ये त्यांना पदमश्री व वर्ष २०१६ मधेच पद्मभूषण देवून सन्मानित केले आहे. त्यांचे संपूर्ण परिवार अभिनय क्षेत्रात आहे. त्यांची पत्नी एक उत्कृष्ट अभिनेत्री व चंदिगढ येथून संसद सदस्य आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा हिंदी सिनेमात अभिनेता आहे.
अनुपम खेर भारतीय फिल्म सेंसर बोर्ड चे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. ते भारतीय नेशनल स्कूल ऑफ ड्रामा चे अध्यक्ष सुद्धा होते. १९७८ मध्ये याचे ते विद्यार्थी सुद्धा होते. २००७ मध्ये अनुपम खेर यांचे प्रिय मीटर सतीश यांच्या सोबत मिळून करोल बाग फिल्म प्रोडक्शन कंपनी स्थापन केली. या प्रोडक्शन खाली तेरे संग हि पहिली फिल्म होती. २०११ मध्ये मल्याळम अभिनेता मोहनलाल आणि अभिनेत्री जयाप्रदा सोबत मल्याळम भाषी रोमांटिक ड्रामा प्राणायाम चित्रपट सुरु केला होता. त्यांनी मराठीतही अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. याशिवाय पंजाबी, कश्मीरी, मल्याळम भाषांच्या विविध अंगाने अभिनय केला आहे. २००९ मध्ये कार्ल फ्रेड्रिंकसन यांच्यासाठी उडी मधील अनिमेशन मधील बांगलादेश निर्मिती वरील ड्रामा फिल्मसाठी करारबद्ध केले गेले आहे. २०१६ मध्ये ABP न्यूज वरील भारताच्या इतिहासाची ओळख सांगणाऱ्या डॉक्युमेंटरीचे सूत्र संचालन केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला. डॉ.कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. डॉ.कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी झाली असे आज अभिमानाने सांगितले जाते. वडील शांताराम यांच्या नोकरीच्या निमित्ताने कोटणीस कुटुंबीय नंतर सोलापुरात स्थायिक झाले, मात्र त्या कुटुंबाचे वेंगुर्ल्याशी असलेले ऋणानुबंध मात्र कधीच तुटले नाहीत. वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर रोडलगतच असलेले“कोटणीस हाऊस” हे डॉ.कोटणीस यांचे मूळ घर. हे घर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात “काँग्रेस हाऊस”म्हणून ओळखले जाई. त्या काळात महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे अनेक प्रमुख नेते या “कोटणीस हाऊस”मध्ये मुक्कामाला येत असत. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे काका काही वर्षे वेंगुर्ले नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते.
डॉ.कोटणीस यांच्या पत्नी डॉ.को-चिंग-लान यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ल्याशी ऋणानुबंध उत्तमरित्या जपले होते. वेंगुर्ले आणि एकूणच परिसरातील सार्वजनिक आरोग्याची दैनावस्था पाहून त्या सद्-गतीत होत. ही दैनावस्था दूर करण्यासाठी आपण काही तरी केले तरच आपल्या पतीच्या ऋणातून आपला देश(चीन) काही प्रमाणात मुक्त होईल असे त्यांना वाटे. डॉ.कोटणीस या महान माणसाच्या सेवाभावी वृत्तीचे गोडवे आजही चीनमध्ये गायले जातात.
१९३६ मध्ये त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. दुसर्याय महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना या महायुद्धात जपानने चीनवर केलेल्या हल्ल्यात चीनच्या जखमी सैनिकांचे खूप हाल झाले. चीन सरकारच्या विनंतीवरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनच्या मदतीसाठी पाच डॉक्टरांचे मदत पथक पाठविले होते. या मदत पथकाचे प्रमुख होते डॉ. द्वारकानाथ कोटणीस. डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली.वैद्यकीय क्षेत्रातले त्यांच्या हाताचे कौशल्य मात्र चीनच्या भूमीवर जखमी झालेल्या प्रचंड चीनी सैनिकांच्या शुश्रुषेसाठी उपयोगी पडले. कित्येक सैनिकांना औषधपाणी केले, कित्येकांच्या वेदना दूर केल्या तर अनेकांना मृत्यूच्या दाढेतून त्यांनी आपल्या शल्य कौशल्याने ओढून आणले. हे सर्व करीत असताना सैनिकांना वाचविण्याची पराकाष्ठा, अतिश्रम, दूषित हवामान, खाण्यापिण्याची आबाळ आणि वेळ काळ न पाळल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. परंतु त्याही अवस्थेत स्वतःकडे लक्ष न देता आपले कर्तव्य पार पाडण्यात कोटणीस गुंतलेले होते. कोटणीसांनी तेथील चिनी नर्सिंग प्रशिक्षिका को चिंग लान यांच्याशी विवाह केला. चीनच्या हेबेई प्रांतात कुटाँग खेडे आहे. तेथे डॉ. कोटणीस यांच्या स्मृतीरूपात जुने हॉस्पिटल जतन केले आहे. त्यांची खोली जतन केली आहे. या खेड्यात प्रवेश केल्यानंतर चौकातच डॉ. कोटणीसांचा अर्धपुतळा आहे. त्यांच्या कृतज्ञतेसाठी चीनमध्ये आजही त्यांचे भव्य स्मारक उभे आहे. डॉ. कोटणीस यांनी देश जाती, धर्म याबंधनाच्या पलीकडे जात मानवतेची खऱ्या अर्थानं पूजा केली असं म्हणनं काही वावगे ठरणार नाही. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी १९४६ साली “डॉ.कोटनीस की अमर कहाणी” हा हिंदी चित्रपट तयार करून डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या चीनमधील मानवतावादी कार्याचा साऱ्या भारतवासियांना परिचय करून दिला. हा चित्रपट जगभर गाजला. डॉ. कोटणीसांचा जीवनप्रवास ‘काळी आई’ हा माहितीपट पण अतिशय सुंदर आहे. चिनी भाषेत डॉ. कोटणीसांना काळी आई असे संबोधले जाते. त्यावरूनच माहितीपटाला नाव दिलेले आहे.
देवदूत' ही डॉ. संजीव शहा यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावरील चरित्रपर कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत डॉ. कोटणीस यांनी अनंत हालअपेष्टा सोसून तेथील रुग्णांसाठी जे अथक परिश्रम केले, ती कहाणी तशी सर्वश्रुत आहे. या कादंबरीत बरेच तपशील वाचावयास मिळतात. त्याचप्रमाणे डॉ. कोटणीस यांच्या बालपणापासूनचे स्वभावाचे पैलूही कळतात. लेखकाने परिश्रमपूर्वक आवश्यक ती माहिती गोळा केली आहे. कॅंटन, चांगशा, हॅंको, वूहान असा या वैद्यकीय पथकाचा खडतर प्रवास. अपुर्याण साधनांनिशी, युद्धाच्या छायेत रुग्णांवर उपचार, ठिकठिकाणी स्वागत, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी हे सारे डोळ्यांपुढे साकार होत जाते. कोमिटांग सरकार आणि कम्युनिस्ट यांच्यातील दुराव्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींचेही चित्रणही येथे येते. औषधाच्या अॅम्प्यूलमध्ये डिस्टिल वॉटर भरण्याचा काळाबाजारही होत होता. भारतीय डॉक्टर आठव्या पलटणीत काम करत होते. ती कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रभावाखाली होती. पुढे माओ, चौ एन लाय यांच्याशी डॉक्टरांच्या गाठीभेटी झाल्या. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले. सामान्य चिनी जनता मोठया जिद्दीने, जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यलढयात उतरलेली पाहून डॉक्टरांच्या मनात भारतीय स्वातंत्र्य लढयासाठी आपल्या या निरीक्षणांचा, अनुभवाचा कसा फायदा करून देता येईल, असे विचार येत. ते तेथील नेत्यांशी चर्चा करीत. दुर्दैवाने डॉक्टरांचा चीनमध्येच मृत्यू झाला.
४ नोव्हेंबर १९३९ ला डॉ. कोटणीस, डॉ. अतल, डॉ. बसू हे येनानकडून सिआन मार्गे च्यू तेह यांच्या आठव्या पलटणीच्या सरसेनापतींच्या प्रमुख ठाण्याकडे निघाले. ते २१ डिसेंबर १९३९ ला मुक्कामाला पोचले. वाटेत बर्फाच्छादित डोंगर, अवघड वळणे या प्रवासाचे वर्णन वाचण्यासारखे आहे. किती प्रतिकूल परिस्थितीत, मानवतावादी दृष्टिकोनातून भारतीय डॉक्टर रुग्णसेवा करीत होते, ते वाचून मन थक्क होते. नवखा देश, नवखी माणसे, हवामान प्रतिकूल, मृत्यूची सदैव छाया, सुरवातीला भाषेची अडचण या सगळ्या परिस्थितीत गनिमी काव्याने जखमी सैनिकांवर उपचार करणे, शस्त्रक्रया करणे हे केवढे मोठे आव्हान होते! डॉ. कोटणीस दुसरे बेथ्यून झाले. त्यांना काळी ई हा प्रेमाचा किताब मिळाला. को चिंग लान ही ध्येयवादी, प्रेमळ, समविचारी पत्नी मिळाली. पण तिला छोटया इंग व्हा या आपल्या मुलाला सोडून जगाचा निरोप घ्यावा लागला. डॉ. कोटणीस यांचा ध्येयवेडा, शिस्तप्रिय पण प्रेमळ स्वभाव, समर्पण वृत्ती विविध प्रसंगांतून मनावर ठसते. हे यश लेखकाचे आहे. पुस्तकात छान छायाचित्रेही आहेत. त्यातून हा इतिहास मनात जागा होण्यास मदत होते. सरळ साध्या शैलीतील ही कादंबरी वाचनीय आहे. मा.डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे ९ डिसेंबर १९४२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मुलांचे एक वेगळे विश्व असते, त्यांची वेगळी कल्पनासृष्टी असते, त्यांची मानसिकताही वेगळेच रंग प्रकट करणारी असते हे काही माहीतच नव्हते. या वेगळेपणाची भूक भागेल असे प्रौढ नाटकापेक्षा सर्वस्वी वेगळे असलेले नाटक मराठी रंगभूमीवर नव्हतेच.
ते गायक-अभिनेता कुंदनलाल सहगल यांचे मोठे प्रशंसक होते आणि त्यांच्याप्रमाणेच गायक अभिनेता बनण्याचे त्यांचे स्वप्न होते.
१९२४, नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’ तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यात.
त्यांचा जन्म १४ मे १९१२ रोजी भंडारदरा येथे झाला. त्यांना चित्रकलेचे थोडे अंग होते, हे लक्षात आल्यानंतर काही काळाने त्यांची रवानगी पेंटिंग खात्यात करण्यात आली. स्टुडिओतील इतर कामांबरोबरच आपल्याकडील सर्व माणसांना अभिनय, नाच, गाणे असे सर्व काही आले पाहिजे, असा फाळके यांचा आग्रह असे.
लहानपणापासून अंगपिंडाने गुटगुटीत असलेल्या व स्टुडिओत कराव्या लागणाऱ्या रोजच्या सक्तीच्या व्यायामामुळे वसंत शिंदे यांच्या तब्येतीने चांगलेच बाळसे धरले होते. उंचीने काहीसे बुटके असलेला, उपजत मिश्कील स्वभावाची देणगी लाभलेला हा कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. १९२५ मध्ये फाळके यांनी निर्माण केलेल्या ‘चतुर्थीचा चंद्र’ या मूकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली. ती उत्तम वठली. त्यानंतर ‘सीतावनवास’, ‘राम-रावण युद्ध’ या मूकपटांतील वानर, ‘संत जनाबाई’मध्ये लहानगा विठ्ठल, ‘भक्त प्रल्हाद’मध्ये राक्षसपुत्र, ‘बोलकी तपेली’मध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या. अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलखीत मुद्रा ते उमटवू लागले.
हिंदुस्थान फिल्म कंपनीतील पाच वर्षांच्या नोकरीच्या काळात शिंदे जवळजवळ सगळ्या खात्यांमधील कामे शिकून आले. या काळात त्यांनी फाळकेंच्या दिग्दर्शनाखाली १९ मूकपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. फाळकेंकडे नोकरी करताना शिंदे यांना पहिला पगार मिळाला होता दरमहा ५ रुपये! पाच वर्षांनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. त्या वेळी शिंदे यांचा पगार होता दरमहा १८ रुपये. पगाराचे हे आकडे आता कोणी ऐकले, तर त्याला निश्चितच भोवळ येईल. पण त्या काळच्या स्वस्ताईच्या जमान्यात एवढे पैसेही पुरेसे होते. हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून, म्हणजे १९२३ पासून दादासाहेब फाळके या कंपनीचे पगारी नोकर होते. मुंबईतील कोहिनूर मिलचे मालक वामनराव श्रीधर आपटे हे या फिल्म कंपनीचे मालक होते. त्यांचे व फाळक्यांचे अनेकदा मतभेद होत. त्याचमुळे फाळके दोनदा नोकरीचा राजीनामा देऊन मग पुन्हा फिल्म कंपनीत परत आले होते. मात्र तिसर्यांदा फाळकेंनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा तिथे कधीही फिरकले नाहीत. ते गेल्यानंतर हिंदुस्थान फिल्म कंपनीतून जे अनेक लोक बाहेर पडले, त्यात वसंत शिंदेही होते. ते वर्ष अदमासे १९२८-२९ असे असावे.
सिनेमा कंपनीतील कामाला व तेथील कमी पगाराला कंटाळलेल्या वसंत शिंदे यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न आ वासून उभा होता. पोट भरण्यासाठी हातपाय तर हलवायला हवे होते. नियतीने त्यांना या वळणावर नेऊन सोडले पुण्याच्या बालमोहन नाटक कंपनीत. लहान मुलांसाठी नाटके करणे, हा या कंपनीचा प्रमुख उद्योग. बालमोहनचे मालक होते दामूअण्णा जोशी. वसंत शिंदे ज्या वेळी या कंपनीत गेले, तेव्हा तिचीदेखील ती सुरुवातच होती. संस्थेने तोवर एकही नाटक बसवलेले नव्हते. सगळी जमवाजमव सुरू होती. त्या दोन महिन्यांच्या काळात वसंत शिंदे यांच्या वाटय़ाला फक्त साफसफाईच्या कामांपलीकडे कोणतीच भूमिका आली नाही. त्यामुळे ते अखेर वैतागून पुन्हा नाशिकला परतले. ११ ऑगस्ट १९२९ रोजी स्थापन झालेल्या अरुणोदय नाटक मंडळीमध्ये वसंत शिंदे यांच्या अभिनय कारकिर्दीचा पुढचा पडाव होता. या नाटय़मंडळीत त्यांनी चार वर्षे काढली. त्या कालावधीत गिरणीवाला (काटखाँ), प्राणप्रतिष्ठा (खान), साक्षात्कार (पशुपती), महारवाडा (गुलखाँ), बुवाबाजी (वीरभद्रप्पा), सैरंध्री, कॉलेजकुमारी (कोंडिबा न्हावी), विठोबाची चोरी (दरोडेखोर), आय. सी. एस. (दगडय़ा), राजकुंवर (मराठा गडी), कारकून (कारकून), कॅप्टन (आचारी), सासुरवास (घरगडी) अशा १४ नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केले. या नाटकांचे दौरे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाले. त्यामुळे एक नाटय़कलाकार म्हणूनही वसंत शिंदे यांना मान्यता मिळू लागली. त्या वेळी नाटकमंडळ्यांचे संसारही अल्पजीवीच असायचे.
अरुणोदय नाटक मंडळी बंद पडल्यानंतर वसंत शिंदे यांची पावले वळली ती नवजीवन संगीत मंडळीमध्ये. मोराचा नाच, व्याही-विहीण, भांगेची तार, पापी ईश्वर, राधाकृष्ण, कृष्णार्जुन युद्ध, मृच्छकटिक, पुण्यप्रभाव या नाटकांमधून काम करत असताना वसंत शिंदे यांच्या विनोदी अभिनयाच्या कळांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळू लागली.नाटक-चित्रपटाचा व्यवसाय एकूण अस्थिरच. नवजीवन संगीत मंडळीतील अवतारकार्य आटोपल्यानंतर उपजीविकेसाठी वसंत शिंदे यांनी कोल्हापूर येथील रघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या ‘आनंद व्यंगपट’ या कार्टून फिल्ममध्ये पडदे रंगवायचीही नोकरी केली. आयुष्यात असे अनेक चढउतार येत होते. विवाहानंतर सांसारिक जबाबदाऱयांतही वाढ झाली होती. १९४१च्या सुमारास वसंत शिंदे राजाराम संगीत मंडळीत प्रवेश करते झाले.
राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकाचे प्रयोग ही कंपनी करत असे. ‘भावबंधन’मधील कामण्णा यांची भूमिका दिनकर ढेरे यांनी इतकी लोकप्रिय केली होती की त्यांना पुढे ‘कामण्णा’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. दिनकर ढेरेंनंतर वसंत शिंदे यांनी कामण्णा यांची भूमिका मुळाबरहुकूम करून गाजवली. राजाराम नाटक मंडळीत चिंतामणराव कोल्हटकर हे विविध नाटकांचे दिग्दर्शन करत असत. वसंत शिंदे हे त्यांना गुरुस्थानी मानू लागले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘प्रेमसंन्यास’मधील गोकुळ, ‘राजसंन्यास’मधील जिवाजी कलमदाने अशा काही भूमिका केल्या. राजाराम संगीत मंडळीनंतर ‘ललित कला कुंज’च्या नाटकांत काही काळ कामे केल्यानंतर वसंत शिंदे यांनी आपला मोहरा पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळवला. बोलपटांची एव्हाना चलती सुरू झालेली होती.
वसंत शिंदे यांचा पहिला बोलपट म्हणजे राजा पंडित दिग्दर्शित ‘मायाबाजार’. १९३९ मध्ये झळकलेल्या या चित्रपटात त्यांनी एक किरकोळ भूमिका साकारली होती. १९४६मध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘सासुरवास’मध्ये सुभान्याच्या भूमिकेत वसंत शिंदे यांनी विविध रंग भरले. त्यानंतर वसंत शिंदे यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. १९२४ ते १९२९ या काळात त्यांनी १९ मूकपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर १९३९ पासून ते १९९६पर्यंत १९०हून अधिक मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. त्याशिवाय सात हिंदी चित्रपटांतही कामे केली. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले, तरी तो प्रत्यक्ष चित्रपटगृहांत प्रदर्शित होईपर्यंत काही खात्री नसते. अशाच अप्रदर्शित राहिलेल्या नऊ चित्रपटांतही वसंत शिंदे यांच्या भूमिका होत्या. पण त्या बघण्याचे भाग्य प्रेक्षकांना काही लाभले नाही.
वसंत शिंदे यांची दुसरी ठळक ओळख म्हणजे ते अस्सल लोकनाटय़ कलावंत होते. राहूने गिळली चंद्रकोर, मी नांदायची न्हाय अशा सुमारे ५७ लोकनाटय़ांतून वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या होत्या. विनोद, कारुण्य असे अनेक पदर या भूमिकांना होते. माधवराव जोशी, आचार्य अत्रे, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, व्यंकटेश माडगूळकर आदी सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकांमध्ये वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या. त्यांनी १०५ नाटकांमध्ये विविध भूमिका करताना महाराष्ट्र जवळजवळ चार ते पाच वेळा पालथा घातला होता. मराठी चित्रपटांमध्ये घरगडय़ाची पेटंट भूमिका फक्त माझ्यासाठीच राखून ठेवलेली आहे, असे वसंत शिंदे गमतीने म्हणायचे. पण त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांच्यातील खेळियाने किती नानाविध भूमिका केल्या होत्या, हे सहज लक्षात येईल. विनोदी कलाकाराचा छाप असला तरी गंभीर भूमिकेतही वसंत शिंदे तेवढेच रंगून जात. सुमारे ७५ वर्षे मूकपट, नाटके, बोलपट यांच्यात वसंत शिंदे यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली.
वसंत शिंदे यांच्या वर ‘विनोदवृक्ष’ हे मा.मधू पोतदार यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. ‘विनोदवृक्ष’ या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिताना मा.शरद तळवलकर यांनी म्हटले होते, ‘वसंत म्हणजे ऋतूंतला श्रेष्ठ ऋतू! सृष्टीचे वातावरण त्या वेळी प्रसन्न असतं. तेच नाव घेऊन वसंतराव शिंदे जन्माला आले. त्या ऋतूचं कार्य चालवण्याची जबाबदारी वसंतरावांवर येऊन पडली असं म्हणायला हरकत नाही.’
वसंत शिंदे यांचे ४ जुलै १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / समीर परांजपे
‘विनोदवृक्ष’ या पुस्तकाची लिंक
http://erasik.com/productdetails/PROD150300028501
जगातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले गेलेले नोबेल पारितोषिक स्विडीश शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाते. आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म १३ ऑक्टोबर १८३३ रोजी स्टॉकहोम येथे झाला. त्यांचा मृत्यू १० डिसेंबर १८८६ रोजी झाला.
आल्फ्रेड नोबेल यांनी सैन्याच्या कामासाठी डायनामाईटचा शोध लावला. युद्धाबरोबरच खाणी, रस्ते तयार करण्याच्या कामातही त्याचा वापर होऊ लागला.
नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वत शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले.यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आफ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधूचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामाइटचा शोध लावला.
डायनामाइटच्या शोधामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले. यातून नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वत: इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्या कारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्विडीश क्रोनरचा निधी देऊन ट्रस्ट स्थापन केला व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देण्याचे सुरू केले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.
नोबेल यांना विज्ञानाबरोबरच साहित्य, कला, शांतिकार्य या क्षेत्राचीही आवड होती. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा योग्य बहुमान व्हावा असे त्यांना वाटे. त्यामुळेच त्यांनी मृत्यूपत्र लिहतांना नोबेल पारीतोषिकाची व्यवस्था केली. त्यांनी आपल्या उत्पादनाच्या ९४ टक्के रक्कम या विविध पुरस्कारांसाठी राखून ठेवली.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९०१ पासुन हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. शांतिकार्य, साहित्य, पदार्थविज्ञन, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र व अर्थशास्त्र ह्या विषयात संशोधन करणार्यांना नोबेल पुरस्कार दिले जातात.
-- मराठीसृष्टी टिम
महकवी कालिदास यांचे वाङमय प्रसिद्ध असले, तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याबद्दल एक लोककथेनुसार अशी आख्यायिका आहे की, विद्योत्तमा नावाच्या एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्वानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन, त्याला जिंकवून तिचा विवाह लावून दिला जातो. कालांतराने हे जेव्हा तिला कळते तेव्हा ती व्यक्तीचा अपमान करते. ती म्हणते, ‘अस्ति कश्चित् वाग्विशेषः? आपल्या वाणीमध्ये काही विशेषत: आहे?’ राजकन्या रागात त्या व्यक्तीला हाकलून देते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक वहिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
Copyright © 2025 | Marathisrushti