पं रामाश्रेय झा यांनी लिहिलेल्या पाच खंड असलेल्या लेखांचा संग्रह अभिनव गीतांजली संगीत हे भारतीय संगीतातील एक महत्वाचे मानले जाते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. यात रागांचे सखोल विश्लेषण केले आहे.
जितेंद्र अभिषेकी यांनी पं रामाश्रेय झा यांच्या अनेक रचना गाऊन रसिकांसमोर आणल्या होत्या. १९६८ मध्ये, ते अलाहाबाद विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते आणि १९८० पर्यंत संगीत विभाग प्रमुख झाले होते. त्याचे सुप्रसिद्ध शिष्य गणांमध्ये कमला बोस, शुभा मुदगल, गीता बॅनर्जी अशी नावे आहेत.
२००५ मध्ये पं रामाश्रेय झा यांना संगीत नाटक अकादमी, पुरस्कार मिळाला होता मा.पं रामाश्रेय झा यांचे १ जानेवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
आसाम-ईशान्येचा अशांत परिसर, वहीतल्या नोंदी, करुणेचा कलाम, अलकनंदा, हाकुमी, तांदळा, वर्तमान, कोहम्, एकशे अकरावी दुरुस्ती, राजधर्म, सारी माझीच माणसे, मन्वंतर समूहाकडून स्वतःकडे, सडेतोड, सेंटर पेज तारांगण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
विजय हजारे यांची कसोटी कारकीर्द काहीशी उशिरा म्हणजे ३१व्या वर्षी सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या वाटयाला ३० कसोटी सामनेच आले. तरीही त्यांनी छाप पाडली.
पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे.
नाना फडणवीस यांची नऊ लग्ने झाली होती. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले होते या स्त्रीचे नाव यशोदाबाई. नानांच्या नऊ बायकांपैकी सात त्यांच्या हयातीत वारल्या. नाना फडणवीस यांचे १३ मार्च १८०० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भारतीय गरीब शेतकऱ्याच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. भारतासारख्या कृषिप्रधान देशात कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी ‘एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ ची स्थापना केली होती.
इंदूरच्या रामूभैय्या दाते यांचा दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. रामूभैय्या म्हणजे अरुण दाते यांचे वडील. अरुण दाते यांचा जन्म ४ मे १९३५ रोजी झाला. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले. घरात असताना दिवसभर गाणे कानावर पडत असल्याने कान तयार आणि संगीताची उत्तम जाण. असे गुण असलेला आपला मुलगा गायक व्हावा हे रामूभैय्यांचे स्वप्न अरुणने पुढे प्रत्यक्षात आणले. मा.अरुण दाते टेक्सटाइल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत रहात असताना ते पु.ल.देशपांडे यांना भेटत असत. पुलंनीच अरुण दाते हे उत्तम गात असल्याचे पाहून रामूभैय्या दातेंना तसे सांगितले. संगीतातले दर्दी, कलावंतांबद्दल असीम जिव्हाळा, आणि त्यांच्या कलेबद्दल अतीव आदर असलेले रामूभैय्या दाते हे ऐकून प्रसन्न झाले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीच्या पराक्षेत अरुण दाते नापास झाल्याचे समजल्यावर ते म्हणाले "टेक्स्टाइल इंजिनिअर होणारे अनेक जण आहेत, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते ते सांग". घरूनच असे प्रोत्साहन असल्याने, अरुण दाते यशस्वी टेक्सटाइल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायक झाले यात आश्चर्य नाही.
१९५५ पासून अरुण दाते आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाझशीत म्हणजे १९८४ मध्ये अरुण दाते यांनी स्वत:ला पूर्णपणे भावगीताला वाहून घेतले. १९६२ मध्ये ’शुक्रतारा मंदवारा’ ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली आणि अरुण दाते यांना त्यानंतर जराही उसंत मिळाली नाही. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक सतत तीन वर्षे त्यांच्या पाठीस लागले होते."मी हिंदी मुलखातला,माझे मराठी उच्चार धड नाहीत, मी, हेच काय पण कोणतेही मराठी गीत म्हणू शकणार नाही" असे म्हणणार्याु अरुण दाते यांनी शेवटी हे भावगीत म्हटले. इ.स.२०१०पर्यंत अरुण दाते यांचे ’शुक्रतारा’ या नावाने होणार्याा मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. आणि हे सर्व कार्यक्रम हाउसफुल्ल होत आले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बम आजही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत झळाळी प्राप्त करून दिली असे म्हटले जाते. मा.अरुण दाते यांनी लता मंगेशकर,आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. आपल्या शुक्रतारा या नावाने ते करीत असलेल्या कार्यक्रमांत ते फक्त मुळात स्वत: गायलेली गीतेच सादर करतात.आणि श्रोत्यांना तीच तीच गाणी परत परत ऐकायला आवडतात. या बाबतीत ते गजाननराव वाटव्यांचे शिष्य आहेत.अरुण दाते यांनी "शतदा प्रेम करावे" या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अरुण दाते यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=uB8jKp6Ixkg
https://www.youtube.com/watch?v=W8baLzpGMtA
क्षणभर उघड नयन देवा — तुझा नि माझा एक पणा — निघाले आज तिकडच्या घरी — झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या जेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच.
मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांचा जन्म १४ एप्रिल १९२७ रोजी झाला.
काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कँप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते.
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती.
मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तसेच अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरुन गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. मराठी साहित्यिकांनी विनोदी वाङ्मयात ज्या अजरामर कथा लिहिल्या त्यात द. मा. मिरासदार यांची ‘माझ्या बापाची पेंड’ आणि ‘भुताचा जन्म’ यांचा समावेश व्हायला हरकत नाही. 'मिरासदारी' या पुस्तकातली 'भुताचा जन्म' ही कथा प्रसिद्ध आहे. ही लोकप्रिय कथा या वर्षी बारावीच्या अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात आहे. द.मा.मिरासदार यांच्या 'भुताचा जन्म' या कथेवर बनलेली शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये होणाऱ्या फेस्टिवलमध्येही दाखवली गेली.
द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत.
मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. त्याचप्रमाणे त्यांनी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे.
द. मा. मिरासदार हे नेहमीच त्यांच्या मार्मिक आणि शैलीदार विनोदांसाठी प्रसिद्ध राहिले आहेत. महाराष्ट्रातील विविध गाव आणि तिथे राहणारी माणस आपल्याला नेहमी मिरासदारांच्या कथेतून भेटत राहतात. 'चकाट्या' मध्ये ही अशाच काही गावात आणि शहरात राहणाऱ्या अवली माणसाच्या आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात फक़्त शाब्दिक विनोद न करता प्रासंगिक विनोद लेखनातून वठवणे आणि साध्या लिखाणातून वाचकाला गुंतवून ठेवणे यातच लेखकाचे यश मानता येईल . 'शिवाजीचे हस्ताक्षर' ही कथा तर अप्रतिम.
द. मा. मिरासदार यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, पुलोत्सव जीवनगौरव' पुरस्कार मिळाला होता.
मराठी सिने-नाट्य कलाकार रवींद्र मंकणी हे द. मा. मिरासदार यांचे जावई.
द. मा. मिरासदार यांचे २ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कथा कथन - द. मा. मिरासदार यांच्या आवाजात..
https://www.youtube.com/watch?v=4yy-dYVTrow
https://www.youtube.com/watch?v=_NCs6yL1chE
https://www.youtube.com/watch?v=I0DUFPBj33k
एक संवेदनशील दिग्दर्शक आणि सिनेनिर्माता म्हणून चैतन्य ताम्हाणे ओळखला जातो. त्यांनी मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून साहित्यामध्ये पदवी घेतली. त्यांची आई ह्या रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि वडील पर्यावरण विषयातील सल्लागार आहेत.
उत्त्तर प्रदेशातील गाझीपुर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२७ रोजी झाला. डॉ. राही मासूम रझा महाविद्यालयीन शिक्षण अलीगढ विद्यापीठात झाले. १९६४ साली त्यांना पी.एच.डी. मिळाली. नंतर काही काळ ते अलीगढ विद्यापीठात शिकवत होते. १९६८ साली ते मुंबईला आले. आपल्या साहित्य कृती बरोबरच ते हिंदी सिनेमाला जोडले गेले. डॉ. राही मासूम रझा यांनी अनेक चित्रपटांचे तसेच अनेक मालिकांचे संवादही लिहिले. दूरदर्शन साठी १०० हून अधिक धारावाहिक त्यांनी लिहिल्या त्यातील 'महाभारत' और 'नीम का पेड़' या अविस्मरणीय होत्या. "महाभारत" या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे संवाद लेखक म्हणूनही डॉ.राही मासूम रजा यांनी काम केले. "महाभारत" बनवायच्या आधी डॉ. राही मासूम रझा यांनी बी.आर.च्या बॅनरखाली संवादलेखक म्हणून पूर्वीही काम केलं होतं. बी आर चोप्रा यांनी "महाभारत"ची कल्पना जेव्हा डॉ. राही मासूम रझा यांना सांगितली. आश्चर्य म्हणजे डॉ. राही मासूम रझा केवळ चोवीस तासातच, ‘समय अथवा काळालाच आपण महाभारताचा सूत्रधार केला तर?’ अशी एक भन्नाट व अभिनव कल्पना घेऊन चोप्रांकडे आले, इतकंच नव्हे तर त्यांनी महाभारताच्या अगदी पहिल्या भागाचं सूत्रधाराचं निवेदनही लिहून बरोबर आणलं होतं. मा.चोप्रांना डॉक्टरांची कल्पना विलक्षण आवडली आणि त्या दिवशी प्रथम चोप्रांना समजलं की, डॉ.राही मासूम रझा हे नुसतेच पटकथालेखक नसून संस्कृत व हिंदी विषयाचे गाढे विद्वान आहेत. चोप्रांनी त्या क्षणापासून डॉक्टरांना महाभारताचे कथालेखक म्हणून आपल्या टीममध्ये सन्मानाने सामावून घेतलं. मा.राही आपल्या एकूण यांनी ३०० चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या तसेच कविताही लिहिल्या आहेत. निमका पेड या कादंबरीतून त्यांनी स्वातंत्र्य पूर्व भारत व आताचा भारत याचे वर्णन केले आहे. आधा गाव, उसकी बुंद वगैरे त्यांचे चित्रपट गाजले. "तिलिस्म -ए -होशरुबा" हा त्यांचा कथा संग्रह आहे. आधा गाँव, नीम का पेड़, कटरा बी आर्ज़ू, टोपी शुक्ला, ओस की बूंद और सीन अशी ७५ प्रसिद्ध पुस्तके आहेत. १९७९ मध्ये 'मैं तुलसी तेरे आँगन की' या चित्रपटासाठी फिल्म फेयरचा सर्वश्रेष्ठ संवाद पुरस्कार डॉ. राही मासूम रझा यांना मिळाला होता. भारत सरकारने ’पद्मश्री’ , पद्म भूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांचे चिरंजीव नदीम खान हे सिनेमेटोग्राफर आहेत. डॉ.राही मासूम रजा यांचे निधन १५ मार्च १९९२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
डॉ. राही मासूम रझा यांची रामजन्म भूमी वरील कविता
"लेकिन मेरा लावारिस दिल”
मस्जिद तो अल्लाह की ठहरी
मंदिर राम का निकला
लेकिन मेरा लावारिस दिल
अब जिस की जंबील में कोई ख्वाब
कोई ताबीर नहीं है
मुस्तकबिल की रोशन रोशन
एक भी तस्वीर नहीं है
बोल ए इंसान, ये दिल, ये मेरा दिल
ये लावारिस, ये शर्मिन्दा शर्मिन्दा दिल
आख़िर किसके नाम का निकला
मस्जिद तो अल्लाह की ठहरी
मंदिर राम का निकला
बंदा किसके काम का निकला
ये मेरा दिल है
या मेरे ख़्वाबों का मकतल
चारों तरफ बस खून और आँसू, चीखें, शोले
घायल गुड़िया
खुली हुई मुर्दा आँखों से कुछ दरवाजे
खून में लिथड़े कमसिन कुरते
जगह जगह से मसकी साड़ी
शर्मिन्दा नंगी शलवारें
दीवारों से चिपकी बिंदी
सहमी चूड़ी
दरवाजों की ओट में आवेजों की कबरें
ए अल्लाह, ए रहीम, करीम, ये मेरी अमानत
ए श्रीराम, रघुपति राघव, ए मेरे मर्यादा पुरुषोत्तम
ये आपकी दौलत आप सम्हालें
मैं बेबस हूँ
आग और खून के इस दलदल में
मेरी तो आवाज़ के पाँव धँसे जाते हैं।
Copyright © 2025 | Marathisrushti