दिग्दर्शक म्हणून करीयर करायचं हे विक्रम फडणीस यांनी आधीपासूनच ठरवलं होतं, मात्र त्यांच्या करीयरची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून झाली.
अमेरिका, ब्रिटन आणि जगभरातील एकूण १३० देशांमध्ये स्टीव्हला ‘क्रोकोडाइल हंटर’ म्हणून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख मिळाली. ‘द क्रोकोडाइल हंटर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या काळात ५० कोटी लोकांपर्यंत स्टीव्ह आणि त्याच्या कुटुंबाचे कार्य पोहचले.
१९६४ मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला.
आपण नेहमी ऐकतो ती गाणी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, ते नयन बोलले, पाहुनी पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला ही सर्व रमेश अणावकर यांनी लिहली आहेत.
सुरेल व अवीट गाणी देणारे रमेश अणावकर ह्यांची गाणी लताजी, आशाजी, अशा अनेक गायक, गायकानी गायली, व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचली. आपण लहान पणापासून ऐकत असलेले हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग चेडवा दिसता कसा खंडाळ्याचो घाट हे गाणेही रमेशजीचे आहे.
रमेश अणावकर यांनी मालवणी भाषेतही अनेक गाणी लिहली आहेत. रमेश अणावकर यांचे ३० जानेवारी २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
रमेश अणावकर यांनी लिहिलेली काही गाणी
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
असा मी काय गुन्हा केला
आले मनात माझ्या
केशवा माधवा तुझ्या
गुपित मनिचे राया
ते गीत कोकिळे गा
ते नयन बोलले काहितरी
दिनरात तुला मी किती
नकळत सारे घडले
नाम घेता तुझे गोविंद
निरोप तुज देता ऊर्मिला मी
पत्र तुझे ते येतां अवचित
प्रभाती सूर नभी रंगती
बोले स्वर बासरिचा
मज सांग सखे तू सांग
मस्त ही हवा नभी
मी एकला वेड्यापरी
मी मनात हसता प्रीत
मुकुंदा रुसू नको इतुका
मृदुल करांनी छेडित तारा
रविकिरणांची झारी घेउनी
रंग तुझा सावळा दे मला
लाजली सीता स्वयंवराला
लाजवी मला हे नाव गडे
वार्यामवरती घेत लकेरी
सजणा तू सांग कधी
दिना पाठक पूर्वाश्रमीच्या नी गांधी. त्यांचा जन्म ४ मार्च १९२२ रोजी झाला.त्या महिला अॅक्टीवेटीस्ट देखील होत्या आणि 'भारतीय महिला नॅशनल फेडरेशन' अध्यक्ष राहिल्या होत्या. हिंदी आणि गुजराती चित्रपटात दिना पाठक यांनी सहा दशकांत १२० चित्रपटांत अभिनय केला. त्यांचे मीरा गुजराथी हे नाट्य भवाई लोकनाट्य शैली मध्ये अनेक वर्षे यशस्वीपणे चालू होते. रुपेरी पडद्यावरील मायाळू आई व खत्याळ सासूच्या भूमिका प्रसिद्ध होत्या. त्यांच्या गोल माल आणि खूबसुरत मधील संस्मरणीय भूमिका प्रसिध्द आहे. त्यांनी कोशिश, उमराव जान, मिर्च मसाला आणि मोहन जोशी हाजीर हो चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या. रत्ना व सुप्रिया पाठक या त्यांच्या कन्या व नसुद्दिन शहा व पंकज कपूर हे जावई. मा.दिना पाठक यांचे ११ ऑक्टोबर २००२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गोमंतक भूमीचे जग प्रसिद्ध चित्रकार.त्यांचा जन्म १८ एप्रिल १९१० रोजी झाला.विश्वनाथ नागेशकर, हे कोल्हापूरचे चित्रकार. त्यांच्या चित्रांमधून भारतीय आणि पाश्चीमात्य चित्र परंपरेचा सुरेख संगम दिसत असे. विश्वनाथ नागेशकर यांचे फोंडा, गोवा नजीकच्या नागेशी या निसर्गरम्य व श्री नागेशाचे वरदहस्त लाभलेल्या गावात बालपण गेले. त्यांनी कोल्हापूरचे कलाप्रेमी छत्रपती मा.शाहू महाराजांच्या मदतीने मुंबईच्या प्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला. तेथे डिप्लोमा घेतल्यानंतर १९३५ साली उच्चशिक्षणासाठी ते जर्मनीला गेले. पॅरिसच्या एकोल नॅशनल स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. जर्मनीतील म्युनिच आर्ट स्कूलमध्ये २ वर्षाचा चित्रकलेचा कोर्स पूर्ण केला. शिक्षण पूर्ण करताना सन्माननीय अलेक्झांडर वॉन, हॅम्बोल्टची स्कॉलरशीप मिळवली. त्यानंतर बर्लिन अकादमीच्या भव्य आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. सतत कलासाधनेत मग्न असा भारतीय हुशार व प्रामाणिक विद्यार्थी म्हणून ओळख. प्रो. स्टुब यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. जर्मन कलाजगतात चांगली ओळख निर्माण झाली. प्रो. स्टुब आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात त्यांची चित्रे पाठवत. म्यूरल्स हा खास आवडीचा विषय त्यामुळे युरोपात बदलत गेलेल्या शिल्पकलेचाही अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धात स्वतःचे घर, स्टुडिओ, पेटिंग्ज बेचिराख होताना पाहिले. नाझींच्या त्रासातून लंडनला जावे लागले. एडना नावाच्या जर्मनीशी त्यांनी विवाह केला. एकना यांनी मा.विश्वनाथ नागेशकर यांना आणि त्यांच्या चित्रकलेला आयुष्यभर जपले. या दोघांच्या जीवनप्रवासाची, कलाप्रवासाची ही कहाणी आहे. आपल्या कुंचल्याच्या सामर्थ्याने निर्माण केलेल्या चित्रकृतींमुळे नागेशकरांनी परदेशात अभूतपूर्व यश व किर्ती मिळवली. भारत सोडून जर्मनीत स्थायिक होणारे नागेशकर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताच्या कलाक्षेत्रातील खरे धाडसी चित्रकार. लंडनचा निरोप घेतल्यावर संपूर्ण युरोपचा प्रवास, म्युझियम, कलादालन पटात राहिले. १९५५ नंतर पुन्हा जर्मनीला स्थायिक. एडना व त्यानंतर विश्वनाथ नागेशकरांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व उपलब्ध चित्रे व त्यांच्या वापरातील वस्तू कोल्हापूरला मा.जयसिंग नागेशकर यांच्याकडे पाठवल्या. त्यांनी पुढाकार घेवून या पुस्तकाची लेखनाची जबाबदारी माधवीताई देसाई व प्रकाशनाची जबाबदारी मुक्ता पब्लिशिंग हाऊसवर सोपविली. तसेच मुंबई, पुणे, गोवा, सांगली येथे चित्र प्रदर्शने भरविली. अशा प्रकारे देशी व परदेशी चित्रकलेतील विविध प्रकारांचे ज्ञान आत्मसात करुन आपल्या कलेच्या सामर्थ्यावर तेथेच स्थायिक झालेल्या दुसऱ्या महायुद्धात सर्वस्व गमाहूनही त्याचा परिणाम आपल्या चित्रकृतींवर न होवू देता आपल्या असंख्य कलाकृतींनी जागतिक कीर्ती संपादन केली. मा.विश्वनाथ नागेशकर यांचे १८ मार्च २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपल्या मातृभूमीशी परिवाराशी जीवनभर नाते जपणाऱ्या या जगविख्यात चित्रकाराचे जीवन, कार्य, कर्तृत्व यावर विश्वरंग नावाचे पुस्तक आहे. पुस्तकात त्यांची १६ रंगीत चित्रे दिली आहेत.
http://www.discountpandit.com/products/Rohtak/books/Vishwarang-Paperback-Marathi-price-in-
india-NzUxNzI=.html
विश्वनाथ नागेशकर यांची वेबसाईट.
http://www.nageshkarart.com/
तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.
मॉडेलिंगपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने टार्झनमध्ये मुख्य भूमिका साकारली. 1996 ते 1997 मध्ये बीच ऑन एयर झालेल्या टार्झन सीरीजच्या 22 एपिसोडमध्ये ज्यो ने प्रेक्षकांवर छाप सोडली. ज्यो ने टार्झनसह अमेरिकन साइबॉर्ग स्टील वॉरिअर, स्टील फ्रंटियर, वॉरहेड आणि टीव्ही मालिका वेवॉच आणि कोनान द ॲडव्हेंचरमध्ये काम केले होते. 2018मध्ये आलेल्या समर ऑफ 67मध्ये तो झळकला होता. ज्यो ने ग्वेनसोबत लग्न केले होते. दोघेही ब्रेंटवुडमध्ये आपल्या दोन मुलींसोबत रहात होते.
वेलणकरांनी विविधरंगी व लांब-रुंद पक्क्या रंगांच्या लुगड्यांचे उत्पादन सुरू केले. या लुगड्यांसाठी त्यांनी `पातळ’ हा शब्द रूढ केला. या उत्पादनाकरिता आवश्यक असलेली भांडवली रक्कम उभी करणे वेलणकरांच्या आवाक्यात नव्हते. त्यांनी ताणा तयार करण्यासाठी एक नवा मोठा लाकडी रूळ (बीम) शोधून काढला व त्यावर साध्या चात्यांच्या चौकटीवरून विशिष्ट प्रकारे ताणाभराई केली. यामुळे ताणाभराई (वॉर्पिंग) यंत्राची आवश्यकता उरली नाही. कांजी देण्याच्या साइझिंग यंत्राची गरज टाळण्यासाठी वेलणकरांनी दुहेरी सुताचा वापर केला. त्यामुळेच वेलणकरांना १९१२ मध्ये पुणे येथे तीन यंत्रमाग वापरून लहान कारखाना स्थापण्यात यश आले.
सुहास शिरवळकर उर्फ सुशि हे एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होते. यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४८ रोजी पुणे येथे झाला. सुहास शिरवळकर यांचे वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षणही पुण्यातच झाले. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या दुनियादारी या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही.
वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ' दुनियादारी ' या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांचे लेखन शैली प्रसन्न, खेळकर होती. छोट्या छोट्या सुटसुटीत वाक्यरचना, बोली भाषेचा भरपूर वापर आणि संवादात्मक शैलीमुळं त्याचं लेखन कधीही कंटाळवाणं होत नसे. पण समीक्षक आपल्याला महत्त्व देत नाहीत, इतिहासात आपला उल्लेख हेटाळणीने केला जातो, असं त्यांना वाटत राहायचं. १९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यथा लिहिल्या.
१९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु 'लोकांना आवडेल ते' अश्या मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंग्रहाच्या रूपात प्रकशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथा देखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या 'देवकी' या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर दुनियादारी ' या कादंबरी वर चित्रपट आला व त्याला तुफान लोकप्रियता लाभली. सुहास शिरवळकर यांचे ११ जुलै, २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti