(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस

    २००३ साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी झाल्या. कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती होत्या.

  • मराठी चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक अनंत माने

    अनंत माने हे पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. अवघ्या ६० हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या ‘सांगते ऐका’ या तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला.

  • सामाजिक कार्यकर्ते व राजनीतिज्ञ विश्वनाथ प्रताप सिंग

    भारताचे सातवे पंतप्रधान सामाजिक कार्यकर्ते व राजनीतिज्ञ विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म २५ जून १९३१ रोजी झाला. भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून असली तरी त्यांचे वडील राजे बहादूर रामगोपाल हे अलाहाबाद जिल्ह्यातील एका लहान संस्थानचे अधिपती विश्वनाथ प्रताप सिंग होते. वयाच्यापाचव्या वर्षी मंडाच्या संस्थानाधिपतींनी (ते सिंग यांचे चुलते होते) त्यांना दत्तक घेतले आणि योग्य ते शिक्षण दिले. त्यांचे दत्तकपिता १९४१ मध्ये वारले आणि व्ही. पी. सिंग मंडाचे अकराव्या वर्षीच राजे झाले.

    संस्थान विलीन होईपर्यंत ते महाराजा होते. त्यांनी उच्चशिक्षण पुणे व अलाहाबाद विद्यापीठांत घेऊन बी.ए., बी.एस्‌सी. व एल्एल्.बी. पदव्या संपादन केल्या. विद्यार्थिदशेत ते वाराणसीतील उदयप्रताप महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते . त्यांचा विवाह सीताकुमारी या शाही घराण्यातील युवतीशी झाला . त्यांना दोन अपत्ये आहेत. विनोबा भावेंच्या भूदान आंदोलनात त्यांनी सहभाग घेऊन आपल्या अखत्यारीतील पसाना हा ग्रामीण परिसर भूदान चळवळीस दान केला.त्यानंतर ते सक्रिय राजकारणाकडे वळले. ते १९६० मध्ये काँग्रेस पक्षात प्रविष्ट झाले. सुरुवातीस त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील उपचिटणीस, चिटणीस अशी पदे देण्यात आली. पुढे ते काँग्रेसतर्फे विधिमंडळावर निवडून आले. तसेच ते अलाहाबाद विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सभासद होते.

    त्यांच्याकडे १९७०-७१ मध्ये काँग्रेसचे प्रतोदपद देण्यात आले. पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात ते उपवाणिज्य मंत्री, नंतर त्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. या दरम्यानत्यांची राज्येसभेवर नियुक्ती करण्यात आली . त्यानंतर त्यांची लोकसभेवर निवड झाली. मध्यंतरी त्यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून श्रीमती इंदिरा गांधींनी निवड केली. त्यांनी काही काळ उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले (१९८४). त्यांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर निवड झाली आणि पुन्हा ते लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ(१९८४–८६) आणि संरक्षण ही खाती कार्यक्षम रीत्या सांभाळली. तथापि पंतप्रधानांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर ‘तुमचे शासन अत्यंत भ्रष्टाचारी आहे’, असा आरोप केला. परिणामतः त्यांना काँग्रे स पक्षातून बाहेर पडण्याचा आदेश देण्यात आला.

    त्यांनी जनमोर्चा या नवीन पक्षाची स्थापना केली. पुढे त्याचे विसर्जन जनता दलात करुन ते जनता दलातील एक प्रभावी नेते झाले. त्यानंतर समाजवादी जनता दल असे संयुक्त पक्षाचे नामकरण करण्यात आले (१९८८–९०). या पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस यश मिळविले; पण स्वबळावर शासन स्थापण्याइतपत त्यांच्याकडे संख्याबळ नव्हते. म्हणून भा. ज. प. व कम्युनिस्ट पक्ष यांच्या सहकार्याने नॅशनल फ्रंट (राष्ट्री य आघाडी) स्थापण्यात आली. तिचे निमंत्रक व्ही. पी. सिंग होते. या आघाडीने त्यांना नेतृत्व दिले आणि व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले . त्यांनी अनेक सामाजिक सुधारणांच्या योजना मांडल्या. त्यांपैकी मंडल आयोगाने १९८० मध्ये इतर मागासवर्गीय समाजासाठी आरक्षण सुचविलेल्या २७ टक्क्यांचा समावेश होता. याविषयी काही नेत्यांनी व्ही. पी. सिंग यांची बाजू घेतली; पण काँग्रेससह अनेक पक्षांनी या विधेयकाला संसदेत विरोध केला.

    उत्तर भारतात विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश येथे अनेक विद्यार्थी नाराज झाले. शिवाय भा. ज. प. अध्यक्ष अडवानी यांना रथयात्रेच्या निमित्ताने अटक करण्यात आली होती. त्यामुळे भा. ज. प.ने व्ही. पी. सिंगांचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी व्ही. पी. सिंग यांचे सरकार गडगडले आणि त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. अखेर मंडल आयोगाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अन्वयार्थ आणि निर्णय यांकरिता प्रविष्ट झाले. सर्वोच्च न्यायालयाने १६ नोंव्हेंबर १९९२ रोजी व्ही. पी. सिंग यांचा या संदर्भातील सुधारणा ठराव काही फेरबदलांसह संमत केला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली; तथापि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकारणातून अलिप्त राहिले. मंझिलसे जादा सफर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्घ आहे विश्वनाथ प्रताप सिंग यांचे २७ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

  • मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते डॉ. दाजी भाटवडेकर

    डॉ. दाजी भाटवडेकर यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणार्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल परिणाम झाला. ते कीर्तनकार बुबांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची हुबेहूब नक्कल करीत असत. भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली. दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संगीत रंगभूमीकडे वळवला. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृ त नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही. मुंबईच्या ब्राह्मण सभेत त्यांनी १९५० ते १९८० या काळात दर वर्षाला एक नवे संस्कृत नाटक रंगभूमीवर आणले. कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी ’अभिज्ञान शाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली. संस्कृत नाटकांनाही पुढे प्रेक्षक मिळेनासे झाले. मात्र, ही नाटके सादर करताना काय काय अनुभव आणि अडचणी आल्या यावर दाजींनी लिहिलेला प्रबंध मुंबई विद्यापीठाने स्वीकारून त्यांनी डॉक्टरेट दिली. दाजींच्या संस्कृत रंगभूमीवरील योगदानाबद्दल भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी त्यांच्या एका ग्रंथातील परिशिष्टात खास उल्लेख केला आहे. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. मा.दाजी भाटवडेकर यांचे २६ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- विकीपीडीया

  • धर्मवीर आनंद दिघे

    बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे आनंद दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि सत्तरच्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नव्हते.

  • अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड विल्सन रेगन

    राजकारणात प्रवेश करण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होते.

  • कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी

    १९६५ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती. त्यांना २००७ मध्ये कर्नाटक रत्न पुरस्काराने तर २०१५ मध्ये पदमभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सिद्धगंगा मठाची सिद्धगंगा एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था कर्नाटकात सुमारे १२५ शैक्षणिक संस्था चालविते. कर्नाटकातील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती शिवकुमार स्वामींचे भक्त आहेत.

  • कूचिपूडि, भरतनाट्यम् नर्तकी मल्लिका साराभाई

    मल्लिका साराभाई या नर्तकी मृणालिनी साराभाई व वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची कन्या. समांतर सिनेमा पासून आपल्या करीयरची त्यांनी सुरवात केली. त्यांचा जन्म ९ मे १९५४ रोजी झाला.

    मल्लिका साराभाई यांनी पीटर ब्रुक यांचे नाटक महाभारत मध्ये द्रोपदी ची भूमिका केली होती. याच नाटकावर नंतर चित्रपट बनवला गेला होता. मल्लिका साराभाई यांनी भारतात व परदेशात अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. मल्लिका साराभाई यांनी हर्ष मन्दर यांच्या पुस्तकावर आधारित अनसुनी या नाटकाची पटकथा लिहिली आहे. मल्लिका साराभाई या दर्पणा अकादमी ऑफ आर्टस् (अहमदाबाद) च्या निदेशक आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शापित गंधर्व’ मानले गेलेल्या गुरुदत्त

    हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शापित गंधर्व’ मानले गेलेल्या गुरुदत्त यांचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी झाला. गुरुदत्तचा सिनेमा हा अनेकांच्या आवडीचा विषय. लोकांनी त्याला शोमन, डिरेक्टर ऑफ मिलेनिअम अशा काही पदव्या दिल्या नाहीत. पण हिंदी सिनेमाच्या संवेदनशील रसिकांचा तो जिव्हाळ्याचा विषय. मग तो त्यांचा सिनेमा असो वा त्याचं वैयक्तिक आयुष्य. सिनेमा या माध्यमावरील पकड, संगीताची जाण आणि नव्या प्रवाहात सामावून जाण्याची सहजता यामुळेच मा.गुरुदत्त कालातीत ठरले.

    त्यांचे बालपणीचे नाव वसंत कुमार शिवशंकर पदुकोण होते. वसंत कुमार शिवशंकर पदुकोण यांच्यावर बंगाली संस्कृतीचा इतकी मोठी छाप होती, की त्यांनी बालपणीचे नाव बदलून गुरुदत्त ठेवले.

    गुरुदत्त हे सिनेसृष्टीत १९४४ पासून १९६४ पर्यंत सक्रिय होते. यादरम्यान त्यांनी अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले. त्यामधील काहींमध्ये त्यांनी अभिनयसुध्दा केला. एका सर्वेनुसार, त्यांना सिनेसृष्टीच्या १० वर्षांच्या इतिहासात उत्कृष्ट दिग्दर्शकसुध्दा मानले गेले आहे. टाइम मासिकानुसार त्यांनी दिग्दर्शित केलेला 'प्यासा' सिनेमा जगातील १०० उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. असे म्हटले जाते, की गुरुदत्त कधीच संतुष्ट नव्हते. कितीही चांगला सिनेमा तयार झाला किंवा ते प्रसिध्द झाले तरी आणखी जास्त असायला हवी अशी इच्छा असायची. क्रिएटीव्हीची त्यांची तहान कधीच कमी झाली नाही.

    गुरुदत्त यांच्या आयुष्यातील अनेक क्षण आहेत, ज्याविषयी अनेकजण अज्ञात आहेत. गुरुदत्त यांचे सर्वात पहिले गीता यांच्यावर प्रेम झाले, दोघांचे लग्नदेखील झाले. त्यानंतर त्यांना वहीदा रहमान आवडायला लागल्या. दोघींवर एकाचवेळी प्रेम करण्याच्या प्रयत्नात दोघीही त्यांच्यापासून दूर होत गेल्या. गीता यांच्यासोबत लग्न केल्यानंतर गुरुदत्त यांचे सिनेमे हिट होऊ लागले होते. मात्र गीता यांच्या करिअरचा आलेख घसरला होता. यादरम्यान गुरुदत्त यांच्या आयुष्यात वहीदा रहमान आल्या. वहीदा यांना स्टार करण्याची जबाबदारी गुरुदत्त यांनी घेतली. अभिनेत्री होता होता कधी वहीदा आणि गुरुदत्त यांना एकमेकांवर प्रेम झाले हे त्यांनासुध्दा माहित नाही. दोघांनी कधीच हे नाते स्वीकारले नाही. मात्र त्यांच्या या नात्याने गीता नाराज झाल्या होत्या. गुरुदत्त यांना ना गीता यांना सोडण्याची इच्छा होती ना वहीदाला. कदाचित या सर्वातून सुटका करण्यासाठी त्यांनी आत्महत्या केली.

    खरं तर देव आनंदच्या आणि त्याच्या मैत्रीबाबत लोकांना माहिती आहे. दोघांनी बोलताना एकमेकांना शब्द दिला होता. गुरुदत्त म्हणाले, की जर ते निर्माते झाले तर देवानंद यांना हीरो म्हणून घेतील. देवानंद यांनी सांगितले होते, की जर ते निर्माता झाले तर सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांच्याकडूनच करून घेतील. देवानंद यांनी आपला शब्द पाळला. निर्माता बनताच 'बाजी' सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांच्याकडे दिले. मात्र गुरुदत्त यांनी आपला शब्द अर्धवट पाळला. गुरुदत्त यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या 'सीआयडी' सिनेमात देवानंद हीरो होते, मात्र सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांनी सहायक दिग्दर्शक राज खोसला यांच्याकडून करून घेतले. नंतर गुरुदत्त यांनी 'जाल' सिनेमात देवानंद यांना डायरेक्ट केले होते. पण बलराज साहनीशी त्याच्या मैत्रीचा उल्लेख फार कमी ऐकायला मिळतो.

    बलराज साहनी आणि गुरुदत्त यांची दोस्ती एवढी होती की त्याच्या पहिल्या सिनेमाची कथाही बलराज साहनीने लिहिली होती. नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या ' गुरुदत्त : अ लाइफ इन सिनेमा ' या पुस्तकात, गुरुदत्तचं एक माणूस म्हणून असलेलं वागणं आणि त्याचे चित्रपट याचा विचार त्यात केला आहे. केवळ सिनेमाचे पोस्टर्स रंगवणारे त्याचे काका एवढीच काय ती गुरुदत्तची सिनेमाशी ओळख होती. पण जणू काय त्याच्या रक्तातच सिनेमा होता , अशी कामगिरी त्यानं करून दाखवली. अगदी पहिल्या सिनेमापासून त्याचं सिनेतंत्र काही और आहे , हे लक्षात आलं. प्रवाहाविरोधात जाताना लोकांना काय आवडतं , याचा विचार करणाऱ्या गुरुदत्तची ओळख या पुस्तकाच्या निमित्ताने होते. गुरुदत्त यांचे १० ऑक्टोबर १९६४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकी पिडीया

  • गीतकार पी. एल. संतोषी

    पी.एल. संतोषी फक्त गीतकार नव्हते तर ते दिग्दर्शकही होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. उत्कृष्ट लेखकही होते. म्युझिकल कॉमेडी हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला केला. तसेच 'अनोखे बोल' हा गीतप्रकार 'टिका लई कली दई' (चित्रपट - शिनशिनाके बुबला बु) यासारख्या गाण्यातून रूढ केला. 'कोई किसीका दिवाना ना बने' (सरगम), 'महफिल में जल उठी शमा' (निराला), 'तुम क्या जानो तुम्हारी याद में' (शिनशिनाके बुबला बु) यांसारखी तरल भावकाव्यं त्यांच्या लेखणीतून झरली होती.

    पी.एल.संतोषी हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम गीतकार होते. मग ते पटकथाकार बनले. मग दिग्दर्शक. यानंतर त्यांना चित्रपट निर्माता होण्याची दुर्बुद्धी झाली आणि त्यापायी ते कफल्लक बनले. या माणसाने दोन्ही हातांनी पैसा कमावला व दहा हातांनी तो उधळला. नटीच्या प्रेमात पडले व तिच्यावर सारी संपत्ती ओवाळून टाकली. जवळ मोटारीन्चा ताफा असलेला माणूस बसच्या रांगेत उभा राहिलेला जगाने पाहिला. हिंदी सिनेमाचे जग कसे मोहमयी असते याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे संतोषी यांचे आयुष्य.

    संतोषी यांनी १९५२ मध्ये 'शिनशिनाकी बबला बु' या नावाचा चित्रपट निर्माण केला. त्याचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते व गीतकार तेच होते. संगीतकार होते त्यांचे खास मित्र-सी. रामचंद्र. हा चित्रपट म्हणजे त्यांच्या काव्यप्रतिभेचा एक उत्तम नमुना होता. या सिनेमात एकीकडे त्यांनी 'अरे बाबा, ये हसी बाबा, ये खुशी बाबा, खा बाबा, पी बाबा, ' अशी निरर्थक गाणी लिहिली आणि दुसरीकडे मनाची व्याकुळता अतिशय आर्तपणे व्यक्त करणारे उत्कट गीतही लिहिली.

    रेहाना नावाची नटी, संगीतकार, सी.रामचंद्र आणि पी. एल. संतोषी या त्रिकुटाने चित्रपटसृष्टीत एकेकाळी धमाल उडवून दिली होती. 'शहनाई', 'खिडकी', सरगम' हे या त्रिकुटाचे चित्रपट हाऊसफुल्लचा ठरले होते. पी. एल. संतोषीच्या 'हम पंछी एक डालके' या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. पी.एल.संतोषींबरोबर सी. रामचंद्र यांचे टयुनिंग बराच काळ जमले होते. अनेक वेळा त्यांच्या संगीतातील बरीच गाणी पी.एल.संतोषी आणि राजेंद्र कृष्ण या दोनच गीतकारापैकी एकाची तरी आढळतात.

    पी.एल.संतोषी यांचे निधन ७ सप्टेंबर १९७८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. श्री.पद्माकर पाठक