(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ वृत्तनिवेदक – सूत्रसंचालक प्रदीप भिडे

    गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज व प्रसन्न मुद्रा असलेले, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक. 

  • राम गणेश गडकरींचा समृद्ध वारसा – जुई गडकरी

    आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी.
    मराठी साहित्य आणि नाटय़सृष्टीत मोलाचं योगदान केलेल्या राम गणेश गडकरींची ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटकं, तर ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह आजही रसिकांवर गारुड घालत आहे. याच गडकरींचा मराठी धागा पुढे कायम राखत आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी.

    जुईचा चेहरा फोटोजेनिक आहे. जुईचे फोटोशूट करण्याचा योग अनेकदा आला. फोटोशूटपूर्वी आणि शूटदरम्यान जुईशी तिच्या अभिनयातल्या अनुभवांबद्दल आम्ही बोलतो. जुई अभिनय क्षेत्रात कशी आली याविषयी तिच्याशी गप्पा मारत असताना ती भरभरून बोलते. अनेक गोड – कटू अनुभव ती सांगते. सहायक दिग्दर्शकाच्या भूमिकेतून तिने या इंडस्ट्रीत प्रवेश केला खरा. मात्र पुढे तिने अभिनयात यावं यासाठी तिच्या सहकाऱयांनी आणि विशेषतः तिच्या आईने तिला प्रोत्साहन दिले. जुई या क्षेत्रात येण्यापूर्वी तिला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राज्याध्यक्ष यांचं. गौतमजींनी योग्य वेळी आणि योग्य लोकांशी ओळख करून दिल्याने जुईचा प्रवास पुढे सुखकर झाल्याचं ती सांगते. ‘बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’ या एकापाठोपाठ एक मालिकांतून जुईचा चेहरा दिसू लागला, तर पुढे ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील ‘कल्याणी’ हे पात्र महाराष्ट्रभर चांगलंच गाजलं. कलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ या मालिकेतूनही जुईने रसिक मनावर मोहिनी घातली.

    राम गणेश गडकरींचा इतिहास आणि जुईच्या त्याकाळी सुरू असलेल्या मालिका हे लक्षात घेऊन आम्ही जुईचं पारंपरिक वेशभूषेत फोटोशूट करायचं ठरवलं. यासाठी लाल रंगाची साडी आम्ही निवडली होती. पारंपरिक वेशभूषा, कपाळावर सजलेली चंद्रकोर टिकली, नाकात पिटुकली नथ, अंबाडय़ावर लगडलेला गजरा, दागिन्यांचा देखणा साज असा मराठमोळा शृंगार केलेल्या जुईचं मोहक रूप मी कॅमेराबद्ध करत होतो.

    पोर्ट्रेट टिपताना त्या व्यक्तीची चांगली बाजू, डोळ्यातली चमक आणि चेहऱयावरचे भाव हे प्रत्येक वेळी महत्त्वाचं असतं. अनेकदा ही आपली बाजू कलाकारांना माहीत असते, तर काही वेळा व्यक्तीचा चेहरा बघताच क्षणी छायाचित्रकाराला त्या व्यक्तीच्या प्रिफरेबल साईडचा अंदाज येतो. जुईच्याही बाबतीत जुईची एक बाजू फोटोसाठी जास्त चांगली आहे. जुईचे फोटो टिपत असताना जुईच्या स्मितहास्यामुळे तिच्या गालावर हलकीशी खळी पडत असल्याचं मला ध्यानात आलं, तर तिच्या डोळ्यांजवळही दोन नैसर्गिक रेषा असल्याचं मला लक्षात आलं. हीच बाब हेरून जुईचा प्राधान्य असलेल्या बाजूने फोटो टिपायचे मी ठरवलं. जुईचे मोहक स्मितहास्य यावेळी मला कॅमेराबद्ध करता आलं.

    जुईचे अनेकदा पारंपरिक वेशभूषेत छायाचित्र टिपल्यानंतर साधारण वर्षभराने तिचं एका मॉडर्न लूकमध्ये फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. तिचा हा लुक कुठे अनैसर्गिक वाटणार नाही ना, तसंच तिची प्रतिमा यातून वेगळी निर्माण नाही ना होणार याची काळजी आम्ही घेतली. पहिल्या शूटसाठी हिरव्या रंगाचा वन पीस तिने परिधान केला. या कॉस्च्यूमची गरज असलेली वेशभूषा आणि मेकअप आम्ही करून घेतला.

    जुईला काही वेगळे कॉस्च्यूम दाखवले, त्यावरचा लूक सांगितला. काही फोटोंचे रेफरन्स दाखवले. जुईला शूट करायची इच्छा होती, परंतु तिची मानसिक तयारी नव्हती हे तिच्या देहबोलीतून समजत होतं. शूटला ती तयार होती, सांगेल तशी पोजेस देत होती, परंतु चेहऱयावर चिंतेचे भाव होते. जुईला यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही काही काळ शूट थांबवलं. कॅमेरा बाजूला ठेवून तिच्याशी बोलून, गप्पा मारून तिला थोडं फ्री करून आम्ही पुन्हा फोटोशूटला सुरुवात केली. नंतर आमच्या समोर आली ती बिनधास्त वावरणारी, मॉडर्न लूकमधली, नेहमीच्या चेहऱयापेक्षा वेगळी, ग्लॅमरस जुई. तिचे वेगवेगळ्या कॉस्च्यूममध्ये नंतर आम्ही शूट केलं. जुई हळूहळू अधिक खुलत गेली आणि मला तिचे हवे तसे फोटो मिळत गेले. जुईचे नंतर काही काळ्या रंगाच्या वन पीसमध्ये आम्ही फोटोशूट केले. या फोटोत ती अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस वाटत होती.

    चौकटीत राहून आपला पिढीजात मराठी बाणा जपणारी जुई पारंपरिक वेशभूषेत सुंदर दिसतेच, परंतु आजच्या युगात स्वच्छंद वावरणारी मॉडर्न जुईदेखील कॅमेऱयात तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू शकते हे तिने सिद्ध केलंय. कलाकाराला त्याच्या चेहऱयावर रंग घेऊन वावरताना त्याच्या वैयक्तिक मतापेक्षा त्या रंगांना न्याय देण्यासाठी नेहमी धडपड करावी लागते. ही धडपड अनुभव आणि अभ्यासाच्याच जोरावर करता येऊ शकते हे जुईशी बोलताना, शूट करताना जाणवतं.

    धनेश पाटील

  • भाजप’चे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे

    कुशाभाऊ ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे ४ थे अध्यक्ष तसंच या पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी १९९८ ते २००० या कालावधीत पक्षाचे अध्यक्षपद भूषविले. कुशाभाऊ ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी १९४२ पासून निगडित होते.

  • जेष्ठ संगीतकार वसंत देसाई

    वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या रम्य ही स्वर्गाहून लंका या गाण्याचा इतिहास
    चित्रपट : स्वयंवर झाले सीतेचे (१९६४)
    संगीतकार : वसंत देसाई
    पार्श्वरगायक : पं. भीमसेन जोशी
    गीत : ग. दि. माडगूळकर

    संगीतकार सुधीर फडके यांनी गीत रामायणातील सर्वच्या सर्व ५६ गीतांना अतिशय समर्पक चाली लावल्या होत्या. व त्यांनी गीत रामायणाचे असंख्य कार्यक्रम केले, पुण्यातील त्यांचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने बघणारा एक तरुण विद्यार्थी- अरुण पाटणकर! अरुण हा संगीतप्रेमी तर होताच, पण त्याचा "रामायणा'चा चांगला अभ्यासही होता. एका कार्यक्रमाच्या वेळी त्याने सुधीर फडके यांची भेट घेतली. म्हणाला, "गीत रामायणात अनेकांच्या तोंडी गाणी आहेत आणि ती योग्यही आहेत, पण संगीताविषयी प्रेम असणारा व संगीताचा जाणकार "रावण', याच्या तोंडी एखादे गीत का नाही?' यावर बाबूजी (सुधीर फडके) चतुराईने म्हणाले, "अहो, मी फक्त गीतांना स्वरबद्ध केलंय आणि ती गातोय एवढंच! हा प्रश्नय तुम्ही गीत रामायण लिहिणाऱ्या ग. दि. माडगूळकरांना विचारा.

    लवकरच तोही योग आला. गीत रामायणाच्या २५० व्या कार्यक्रमाला ग. दि. माडगूळकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्या ठिकाणी हजर असलेल्या अरुणने पुन्हा तोच प्रश्नम गदिमांना विचारला. ते काही बोलले नाहीत. कदाचित भोवती असलेल्या चाहत्यांच्या गराड्यामुळे त्यांनी उत्तर दिले नसेल!

    मात्र अरुणच्या त्या प्रश्ना ने गदिमांना नक्कीच विचार करायला लावलं होतं. कारण त्याच सुमारास होमी वाडिया या हिंदीतील प्रसिद्ध निर्मात्याने "स्वयंवर झाले सीतेचे' नावाचा चित्रपट काढायचं ठरवून त्याची कथा- पटकथा- संवाद व गीतांची जबाबदारी ग. दि. माडगूळकरांवर सोपवली. त्यांनी या चित्रपटात रावणाला गाणे गायला लावले. रावण हा दुष्ट खरा, पण तो कलाशौकिन होता. यासाठी चित्रपटाच्या सुरवातीला रावण वीणा घेऊन एक शास्त्रोक्त गाणे गात असल्याचे त्यांनी दाखवले होते.

    पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील हिंडोल बहार रागातील "रम्य ही स्वर्गाहून लंका' हे गाणे ऐकताना श्रोते तल्लीन होत. या गाण्यातील "या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का?' अशा उन्मत्त सवालातून रावणाचा गर्विष्ठ स्वभाव दिसून येतो, तर त्यातील ताना- मुरक्याा व आलापींमुळे त्याची संगीताची जाण लक्षात येते. या गाण्याचे ध्वनिमुद्रण "बॉम्बे लॅब'मध्ये झाले होते. संगीतकार मा.वसंत देसाई यांनी ध्वनिमुद्रणानंतर पंडितजींची गाण्याची मैफल ठेवली होती. त्या दिवशी टेकमध्ये गाणे ओके व अतिशय छान झाल्यामुळे पंडितजींची तबियत खूष होती आणि मग त्या खुशीतच त्यांनी आपल्या रसिक चाहत्यांसाठी एक तासभर झकास मैफल रंगवली!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ मधू पोतदार

  • ज्येष्ठ अभिनेते, नाटय़निर्माते शफी इनामदार

    शफी इनामदार यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन यावर आपल्या चतुरस्र् अभिनयाचा ठसा उमटविला. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला.त्यांनी विजेता पासून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली आणि अर्ध सत्य हा त्यांचा शेवटचा चित्रपट. ये जो है जिंदगी या दूरदर्शन मालिकेत पण त्यांनी प्रभाव दाखवला. मा.भक्ती बर्वे ह्या शफी इनामदार यांच्या पत्नी. त्यांचे काही यशस्वी चित्रपट कुदरत का कानून, जुर्म,सदा सुहागन, प्रेम ८६. शफी इनामदार यांचे १३ मार्च १९९६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर

    शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.

  • जॉर्ज हॅरिसन

    ब्रिटीश संगीतकार, गिटारवादक, गायक, गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४३ रोजी झाला.

    बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून मा.जॉर्ज हॅरिसन यांनीआंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. पुढे हॅरिसन भारतीय आध्यात्मवादाकडे झुकले आणि अन्य बीटल्सना त्याचप्रमाणे पाश्चिमात्य श्रोत्यांना त्याचा परिचय करून दिला बीटल्स हा बँड फुटल्यानंतर हॅरिसन यांनी सोलो आर्टिस्ट या नात्याने काम केले. पुढे ट्रॅव्हलिंग विल्बरीज बँडचे संस्थापक सदस्यही झाले. रोलिंग स्टोनमासिकाने प्रसिद्ध केलेल्या १०० महान गिटारिस्टच्या यादीत हॅरिसन यांना ११ वे स्थान दिले.

    बीटल्सची बहुतांश गीते लेनन आणि मॅकार्टनी यांनी लिहीली असली तरी प्रत्येक अल्बममध्ये एखाद दुसरे गाणे हॅरिसन यांनीही लिहीलेले असायचे. १९६०च्या दशकाच्या मध्यावर हॅरिसन यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व स्वीकारले. हरेकृष्ण चळवळ आणि सतारीचे संगीत पाश्चिमात्य जगात पसरवण्यात त्यांनी मदत केली. पंडित रविशंकर यांच्यासोबत त्यांनी चॅरिटी कॉन्सर्ट फॉर बांगलादेश हा पहिला मोठा मदतीसाठीचा कार्यक्रम (चॅरिटी शो) त्यांनी १९७१ मध्ये सादर केला.

    हॅरिसन यांनी दोन वेळा विवाह केला. ऑलिव्हिया त्रिनीदाद अरायस या दुस-या पत्नीपासून त्यांना एक मुलगाही झाला. आय, मी, माईन हे हॅरिसन यांचे आत्मचरित्र १९८० मध्ये प्रसिद्ध झाले. आत्मचरित्र प्रसिद्ध करणारे बीटल्सपैकी ते एकमेव होते. जॉर्ज हॅरिसन यांचे निधन २९ नोव्हेंबर २००१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ विकिपीडीया

  • ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले

    धूमकेतू म्हटलं की, आपल्याला लगेच आठवतो तो ‘हॅले’ चा धूमकेतू. या धूमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नावावरून दिलं गेलं. १६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला.

  • भावगीत गायक दत्ता वाळवेकर उर्फ मास्टर दत्ता

    दत्ता वाळवेकर हे फक्त मराठी भावगीत गायक आणि संगीतकार नव्हते तर उत्तम समीक्षक, शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, सुलेखनकार, छायाचित्रकार सुध्दा होते.

    त्यांचा जन्म ३० मार्च १९२८ रोजी बेळगाव येथे झाला. १९४८ च्या सुमारास मास्टर दत्ता या नावाने ते मेळयामध्ये काम करीत. बापूराव माने यांच्या बरोबर त्यांनी ’’युध्दाच्या सावल्या’’, ’’लग्नाची बेडी’’ अशा नाटकातून भूमिका केल्या. याच काळात त्यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व, सीताकांत लाड अशा मोठ्‌या व्यक्तींचा सहवास लाभला.

    रविकिरण मंडळाच्या सदस्यांनी त्या काळात कविता गाण्यास सुरूवात केली होती. जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, गजानन वाटवे यांनी काव्यगायनास आरंभ केला. मास्टर दत्ता यांनी याच काळात भावगीत गायन सुरू केले. गजानन वाटवे यांना गुरू मानून त्यांनी विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम सादर केले. आकाशवाणीच्या पुणे, मुंबई केंद्रावर त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले.

    दत्ता वाळवेकर यांनी गायलेल्या गीतांची पहिली ध्वनिमुद्रिका ‘रिगल’ कंपनीने १९४९ मध्ये काढलेली होती. अत्यंत शुध्द शब्दोच्चार आणि गोड आवाज ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. गीताचा अर्थ श्रोत्यांपर्यंत नेण्यासाठी ते भावपूर्ण उच्चार करीत. त्यांच्या अर्थवाही गाण्यामुळे श्रोते प्रभावित होत. करमणुकीचे कोणतेही साधन नसल्यामुळे जाहीर कार्यक्रम हेच लोकांना आवडत असत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा वेळी मा.वाटवे, मा.नावडीकर आणि मा.दत्ता वाळवेकर या त्रिकुटाने राज्यातील अनेक गावात आपल्या गाण्याने लोकांना मोहित केले.

    नव्या पिढीमधील गायकांना दत्ता वाळवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन होत असे. त्यांनी ’’पुष्पविण कल्पतरू’’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले. ते श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केले. खत्री भाषेच्या अभ्यासावर त्यांनी लिहिलेले ’’क्षात्र बोली’’ हे पुस्तकही गाजले. १९७६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना खत्री भाषेवरील संशोधनासाठी पी. एच. डी. प्रदान केली.

    पुणे साहित्य संमेलनात तसेच कराड नाट्‌य संमेलनात त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पुण्यात २००८ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात जीवनभर संगीत क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या मोलाच्या कामगिरीबद्‌दल विषेश गौरव करण्यात आला.

    दत्ता वाळवेकर यांचे १६ मार्च २०१० रोजी निधन झाले.

    दत्ता वाळवेकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली दुर्मिळ गीते, त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमांची दृक्‌-श्राव्य मुद्रणे, वेगवेगळ्या वाहिन्यांवर झालेल्या त्यांच्या मैफली, विविध ठिकाणी झालेल्या मुलाखती हे http://www.dattawalvekar.com या संकेतस्थळावर आपण बघू शकता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    दत्ता वाळवेकर यांची गाजलेली काही गाणी.
    सांग पोरी सांग, हे काय गडे, गोपाल गोपाल नाचलो नानापरी गोपाल, माइया स्वप्नात आला सखा, काय झालं विचारू नका, जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे, का ठेविल्या इथे खुणा, आठविती मज पुन्हा पुन्हा, स्वप्नातल्या मिठीचे रोमांच अजुनी गात्री

    https://youtu.be/4wePRfs_uqU

    https://youtu.be/u4Jp5nUbQQc

    https://youtu.be/QPAT236XS5k

  • आंतरराष्ट्रीय पंच बिली बावडन

    किस्सा असा आहे की बिली बावडनला झालेला तो आजार म्हणजे rheumatoid arthritis म्हणजेच संधिवात. बिलीला संधिवाताने ग्रासले अणि त्याला स्नायूंच्या हालचाली करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे त्याला इतक्या तरुण वयात क्रिकेट सोडावे लागले. पुढे बिली अंपायर झाला अणि तिथे सुद्धा त्याला संधिवाताचा त्रास होऊ लागला. त्याला पटकन हात वरती करता येत नाहीत, एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले की त्याला परत हालचाल करणे कठीण जाते. अंग दुखू नये म्हणून त्याला थोड्या थोड्यावेळाने स्ट्रेचिंग करण्याचे डॉक्टरांचे निर्देश आहेत. आता बिली परत त्याचे काम सोडू शकत नव्हता. यावेळेस त्याने लढायचे ठरवले आणि त्याने त्याच्या अंपायरिंग मध्ये कराव्या लागणाऱ्या हालचालींमध्ये काही कल्पक बदल केले.