मुख्यमंत्री झाल्यानंतर अंतुले यांची कारकीर्द अवघ्या १८ महिन्यांची असली तरी, त्यांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले आणि ते घेतानासुद्धा गरीब माणसाला समोर ठेवले.
"महान" या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ एस.डी. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९०६ रोजी झाला. एस.डी. बर्मन सर्वार्थाने दादाच होते. खरं म्हणजे त्रिपुराच्या राजघराण्यात वाढलेल्या सचिनदाना संगीताची गोडी लागावी आणि त्या अंकुराचा .वटवृक्ष व्हावा हा एक अद्भुत चमत्कार होता पण तो घडला! आकाशात बसलेल्या गंधर्वमंडळींना कदाचित त्या राजपुत्राच्या प्रतिभेची कल्पना असावी, म्हणूनच राजघराण्याच्या विरोधात जाऊन गाणे शिकण्याचे धाडस त्यांनी दाखवले. १९३० च्या दशकात त्यांनी रेडिओ आणि बंगाली संगीतात भरपूर मुसाफ़िरी केली आणि १९४४ मध्ये अशोक कुमारांच्या काही चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी मुंबई गाठली. पुढील काही वर्षात त्यांना यश मिळालेही पण हळव्या मनाच्या बर्मन दादांना मुंबईची स्पर्धा रुचली नाही आणि ते .कलकत्त्याला परत जाण्यासाठी अगदी रेल्वेमध्ये बसलेही होते पण तसे होणे नव्हते, त्याना मनधरणी करून परत नेण्यात आले आणि पुढचा इतिहास आहे!
देव आनंदच्या नवकेतन बॅनर साठी सचिनदांनी पहिल्यांदा 'अफसर' ला संगीत दिले आणि पुढची चोवीस वर्षे नवकेतनचा चित्रपट आणि बर्मनदांचे संगीत हे समीकरण बनले. बाजी, जाल, टॅक्सी ड्रायवर, मुनिमजी, पेयिंग गेस्ट, सोलवा साल, काला बाजार, बात एक रात की, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, प्रेम पुजारी.. पन्नास आणि साठच्या दशकामधले हे सुमधुर संगीत असलेले चित्रपट, एका पेक्षा एक सुंदर सांगीतिक अनुभव आहेत! सचिनदांचे संगीत काळाच्या चौकटीत कधीच बसणारे नव्हते. जितका त्यांची शास्त्रीय संगीतावर आणि बंगाली लोकसंगीतावर पकड होती, तितकेच त्यांचे वेस्टर्न वरती प्रेम होते, त्यांचे संगीत प्रवाही होते म्हणून आजही ते आउटडेटेड वाटत नाही. त्यांच्या संगीतामध्ये मूड्स दडलेले असतात, एकाच चित्रपटात ते विविध .जॉनर वेगवेगळ्या मूड्स मध्ये वेगवेगळ्या गायकांकडून गाउन घेत, त्यामुळे त्यांचे संगीत कधीच एकसुरी झाले नाही.
हरहुन्नरी किशोर कुमारला त्यानी देवचा आवाज बनवला. किशोर कुमारला आराधना मधून त्यांनीच शिखरावर नेऊन बसवले पण ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनवरचा देव आणि त्याला किशोरचा आवाज - अतुलनीय! पेईंग गेस्ट मधले खट्याळ 'छोड दो आंचल' असो किंवा तीन देवीया मधले चार्मिंग 'ख्वाब हो या कोई हकिकत', देवचा नायिकेभोवती पिंगा घालणारा नायक किशोरने अचूक टीपला!
मोहम्मद रफी हा देवाने केवळ स्वतः गाता येत नसावे म्हणून आपल्यासाठी पाठवलेला देवदूत होता. सचिनदानी जर देवच्या हॅपी गो लकी इमेज साठी किशोरला वापरले असेल तर 'अपसेट' देव साठी रफी साहेबांइतका तरल आवाज स्वाभाविक होता. गाईड मधले अजरामर गायकीचा नमुना असलेले 'दिन ढल जाए' असो की आशा भोसले सोबतचे 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना' असो, रफी साहेबानी त्यांच्या गळ्यातली नशीली तार देव साठीच राखून ठेवली होती! हिंदी सिनेसंगीतामधली काही अजरामर डुयेट्स 'दिल पुकारे आरे आरे', 'तेरे मेरे सपने' असो किंवा बेधुन्द 'खोया खोया चांद' असो पडद्यावरचा देव आणि दैवी आवाजात गाणारे रफी - आजही 'सिनॉनिमस' आहेत. हेमंतकुमारांना हिंदीत आणण्याचे श्रेयही सचिनदांना जाते - देव साठी!
सोलवा साल मधले 'हैं अपना दिल तो आवारा' आणि ती हारमॉनिका किंवा 'बात एक रात की' मधले हॉँटिंग 'ना तुम हमे जानो', हेमंतदाच्या खर्जातल्या आवाजाला बर्मदानी देवआनंद साठी अचूक वापरले. जरी रफी आणि किशोर देव आनंदसाठी ठरलेले आवाज होते तरी सचिनदानी गाण्याला भाव देणारे गायकच नेहमी वापरले. 'टॅक्सी ड्रायवर' मधले तलत मेहमूदच्या तरल गळ्यातले 'जाए तो जाए कहाँ' दुसर्या कुणी इतक्या उत्कटतेने कदाचितच गायले असते. सचिनदा आणि देव आनंद यांची गाणी म्हणजे वेगवेगळ्या इमोशन्सचा रंगीबेरंगी कॅनव्हास आहे. बाजी साठी साहिर लुधियानवि ने एक सुंदर गजल लीहली होती - सचिनदानी तिला क्लब सॉँग बनवले, पण काय बनवले .. 'तद्बीर से बिगडी हुई तक्दीर बना ले, अपने पे भरोसा है तो यह दाव लगा ले' . पदार्पणापासून अखेरपर्यंत आघाडीवर राहिलेले एस.डी.बर्मन एकमेव संगीतकार असावेत. किशोरकुमार यांना सर्वप्रथम पार्श्वीगायनाची संधी दादा बर्मन यांनीच दिली. ते किशोरदांना आपला दुसरा पुत्र मानत. किशोरदा व महमद रफी या अत्युच्च शिखरावरील पार्श्वंगायकांना जवळजवळ समान संख्येत गीते देणारेही ते एकमेव संगीतकार होत. देव आनंद हे त्याचे ठळक उदाहरण होय. ‘मिली’ चित्रपटातील ‘बडी सुनी सुनी है’ हे सचिनदा रुग्णालयात असताना ध्वनिमुद्रित झालेले गीत किशोरदांच्या काही सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक आहे. सचिनदांनी १४ हिंदी आणि १३ बंगाली चित्रपटांसाठी पार्श्वागायन केले. एस.डी. बर्मन यांचे ३१ ऑक्टोबर १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / Ganesh Shelke
एस.डी.यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=q21zbX-NHy0
वसुंधरा पौडवाल यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं ते नाटय निकेतनच्या ” भटाला दिली ओसरी ” या नाटकात. मो. ग. रांगणेकर या नाटकाचे लेखक, निर्माते व दिग्दर्शक. त्यांनीच वसुंधराबाईना रंगभूमीवरील अमिनयाचे पहिले धडे दिले, त्या त्यांना म्हणूनच गुरुस्थानी मानत असत. नाटय निकेतनमध्ये त्यांचा चांगलाच जम बसला. मुख्य म्हणजे त्यांच्या अंगच्या अभिनयाचा उत्तम विकास झाला.
धीरूभाई हिराचंद अंबानींचा जन्म २८ डिसेंबर १९३३ रोजी झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका रिफायनरीत मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले.
यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते.
मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले.
१९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी अमदावाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरूवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरूवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चधू लागले. १९७५ साली जागतिक बँकेने 'विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प' म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली.
१९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायत पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी १९७७ ते १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली.
१९८१ साली मुकेश अंबानी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर १९८३ साली अनिल अंबानी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.
१९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरूष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला. १९७७ मध्ये साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जावून २००७ साली अंबानी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर होती. धीरूभाई यांनी बिझनेस सुरु केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती.
तसेच त्यांच्या कुठलाही बॅंक बॅलेन्स नव्हता. एकदा धिरुभाईंना एका मुलाखतीत ‘तुमच्या यशाचे रहस्य काय आहे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असुन त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडमधील दहा वर्षांच्या नोकरीत सेल्समन म्हणुन जो अनुभव मिळाला त्याला दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजाऊन सांगणे.
थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणुस, तो सुध्धा ग्रामीण भागातुन आलेला व कमी शीकलेला, काय चमत्कार करु शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवुन देऊन भारताच्या कार्पोरेट सेक्टरमधे आपले नांव सुवर्णाअक्षरांनी लिहुन ठेवले आहे. धीरूभाई अंबानी यांचे निधन ६ जुलै २००२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बाबूजींच्या आयुष्याकडे पाहताना काही गोष्टी विलक्षण वाटतात. यशाने ते कधीही हुरळून गेले नाहीत आणि अपयशाने कधीही खचून गेले नाहीत. सत्ता असो किंवा नसो त्याची त्यांना कधीही फिकीर वाटली नाही. सत्तेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ दर्जाचे लोकमतचे व्यासपीठ हातात असताना सत्तेची पत्रास काय, असे ते म्हणायचे.
‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी घेतलेल्या शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, विवेक, लालन सारंग यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. त्यांची अनेकांशी मैत्री होती. चित्रपट क्षेत्राबाबतच्या गप्पांमध्ये ते रंग भरत, जुने किस्से सांगत.
अवधूत गुप्ते यांची वेगळी अशी ओळख मराठी माणसाला करून द्यायची आवश्यकता नाही. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला. जय जय महाराष्ट्र माझा आणि बाई बाई मनमोराचा या दोन गाण्यांच्या नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले. त्यांची दाद द्यायची पद्धत, कौतुक करायची पद्धत काही वेगळीच होती. अंगावर काटा आला, मित्रा तोडलंस! जिंकलंस!, टांगा पलटी घोडे फरार या शब्दांत दिलेली दाद स्पर्धकांचाही हुरूप वाढवत असे. विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? असा थेट प्रश्नद विचारत ते दिग्दर्शकाच्याही खुर्चीवर विराजमान झाला.
खुपते तिथे गुप्तेमुळे अवधूत गुप्तें मुलाखतकार ही झाले. मराठीतील आघाडीचे संगीतकार-गायक-निर्माते-दिग्दर्शक असा नावलौकिक असलेल्या अवधूत गुप्ते यांनी मराठी व हिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. त्यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही केले आहे. सागरिका म्युझिक कंपनीच्या पाऊस या अल्बमामार्फत गायक व संगीतकार म्हणून त्यांचे पदार्पण झाले. त्यानंतर वैशाली सामंत ह्यांच्या सोबत त्यांनी बनवलेला ऐका दाजीबा हा इंडिपॉप अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला. ‘बाई बाई मनमोराचा पिसारा.....’, ‘जय जय महाराष्ट्र माझा...’, ‘पोरी जरा ';हळू हळू चाल...’ आणि ‘ढिपाडी ढिपांग’ या गाण्यांना तर रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
खुपते तिथे गुप्ते या वरची मुलाखत अवधूत गुप्ते यांची http://sahityasuchi.erasik.com/articles/Avadhut_Gupte
अवधूत गुप्ते यांची वेबसाइट www.avadhootgupte.com
काशिनाथ बोडस यांच्या घरातच गायनाची समृद्ध परंपरा होती. ग्वाल्हेर घराण्याचे जेष्ठ गायक काशिनाथ बोडस यांचा जन्म ४ डिसेंबर १९३५ रोजी झाला. तात्या उर्फ पं. काशिनाथ शंकर बोडस हे ग्वाल्हेर घराण्याचे गायन होते. काशीनाथ बोडस यांचे वडील पं. शंकर श्रीपाद बोडस व काका लक्ष्मणराव बोडस हे विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते. काशीनाथ बोडस हे सुरूवातीस तबल्या कडे आकर्षित झाले, पण नंतर त्यांनी गायन शिकण्यास आपल्या वडिलांकडून सुरवात केली. त्यांची गायन करण्याची शैली आपल्या वडिलांसारखेच होते. त्यांचे ख्याल, ताराना आणि भजन यावर प्रभुत्व होते. वीणा सहस्रबुद्धे या त्यांच्या भगीनी.
वीणा सहस्रबुद्धे यांनी काशिनाथ बोडस यांना गुरू मानून त्यांनी गाणे शिकायला सुरुवात केली होती. पं. कुमार गंधर्व यांच्या गायन शैलीवर काशीनाथ बोडस यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या शिष्यात रंजणी रामचंद्रन, रचना बोडस, सुषमा वाजपेयी आणि मनु श्रीवास्तव यांचा समावेश आहे. काशिनाथ बोडस यांचे २० जुलै १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
कोणाकडे काशिनाथ बोडस यांची अधिक माहिती असल्यास सांगावी.
त्यांच्या दिग्दर्शनाखाली अरुण सरनाईक, सूर्यकांत मांडरे, गणपत पाटील, राजशेखर, अभिनेत्री पद्मा चव्हाण, उमा, कामीनी भाटिया, संध्या रायकर, नीला गांधी, शांता तांबे, पद्मीनी बिडकर या कलावंतानी नाट्य कलेचे धडे घेतले होते.
‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. शकील बदायूँनी यांचे वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक होते.
शकील ज्या अलीगढ विद्यापीठात गेले, तेथे अहसन मारहरवीसारखे प्राध्यापक शिकवायला आणि मजाजसारखे सहाध्यायी होते. शायरीचे काही धडे त्यांनी प्रथम काकांकडे, नंतर जिगर मुरादाबादींकडे गिरविले. काळाप्रमाणे राग बदलावा, हे शकील यांना चांगलेच समजत होते. कॉलेजमध्ये असतानाच ते कविसंमेलनात गाजत होते. रुबाबदार शकीलजींना गळाही तितकाच गोड लाभला होता. एका कविसंमेलनात दस्तूरखुद्द नौशाद उपस्थित होते. त्यांनी मुंबईचे निमंत्रण दिले आणि ‘झुले मे पवन के आई बहार’ असेच झाले.
शकील अहमद यांचे नाव चित्रपटाद्वारे ‘शकील बदायूँनी’ म्हणून झगमगू लागले. ‘दर्द’ हा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यांनी लिहिलेले ‘अफसाना लिख रही हूँ’ गाणार्याम उमादेवी ऊर्फ टुणटुणचाही पहिलाच चित्रपट होता. शकील बदायूँनी यांची जोडी संगीतकार हेमंत कुमार यांच्या बरोबर चित्रपट सृष्टीत जास्ती जमली.
शकील बदायूँनी यांनी हेमंत कुमार यांच्या सोबत बेकरार कर के हमें यूं न जाइये.., कहीं दीप जले कहीं दिल.. जरा नजरों से कह दो जी.. निशाना चूक ना जाये, भंवरा बड़ा नादान है बगियन का मेहमान है, ना जाओ सइयां छुड़ा के बहियां, जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आये.. अशी अप्रतींम गाणी दिली.
निर्माता-निर्देशक ए.आर.कारदार यांच्या चित्रपटात शकील बदायूँनी यांनी गाणी लिहिली होती. १९४७ मधील चित्रपट दर्द मधील गाणी शकील बदायूँनी यांनी लिहिली होती की जी सुपरहिट झाली होती. त्या नंतर या दोघांनी दुलारी, दिल्लगी, दास्तान, जादू, दीवाना, दिले नादान, दिल दिया दर्द लिया अशा चित्रपटासाठी एकत्र काम केले. शकील बदायूँनी यांनी गुरुदत्त, महबूब खान, के आसिफ, राज खोसला, नितिन बोस यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती.
दिलीप कुमार यांच्या मेला, बाबुल, दीदार, आन, अमर, उड़न खटोला, कोहिनूर, मुग़ले आज़म, गंगा जमुना, लीडर, दिल दिया दर्द लिया, राम और श्याम, संघर्ष व आदमी या चित्रपटांची गाणी शकील बदायूँनी यांची होती.
शकील यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे १९६१ ते ६३ सलग तीन वर्षे फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला होता. १९६० मध्ये चौदहवी का चांद या चित्रपटातील चौदहवीं का चांद हो या आफताब हो..१९६१ मध्ये 'घराना' या चित्रपटातील हुस्न वाले तेरा जवाब नहीं, व १९६२ मध्ये 'बीस साल बाद' या चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल या गांण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. शकील बदायूँनीयांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शकील बदायूँनी यांनी लिहलेली काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=PImNG74M0H8
https://www.youtube.com/watch?v=IQsJt6-8S7w
Copyright © 2025 | Marathisrushti