नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते, त्या विश्राम बेडेकरांचे हे वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु करताना देखील अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला. तरीही त्यांनी दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट यशस्वी झाले आहेत. चित्रपट तंत्राच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि आल्याआल्याच त्यांच्या हातून 'रणांगण' सारख्या उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती झाली. रणांगण नंतर त्यांनी केलेली अनेक नाटय रुपांतरे रंगभूमीवर आली. मात्र 'वाजे पाऊल आपुले' आणि 'टिळक आणि आगरकर' या रंगभूमीवर गाजलेल्या त्यांच्या अजोड कलाकृती. चरितार्थासाठी नाटक आणि चित्रपट हे क्षेत्र निवडले अणि तेथेही ते पटकथा लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरले. माझं बाळ, वासुदेव बळवंत, चूल आणि मूल या श्रेष्ठ पटकथा त्यांनी दिल्या. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ही त्यांची एक सर्वोत्तम कथा.
अर्थगर्भ आणि अजोड कलाकृती देऊन विश्राम बेडेकरांनी एक आदर्श उभा केला आहे. मराठी रंगभूमीवरील विख्यात नट चिंतामणराव कोल्हटकर व श्रेष्ठ गायक नट मास्टर दीनानाथ हयांनी सुरू केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ ह्या संस्थेच्या कृष्णार्जुन युद्ध ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपटव्यवसायात आले. तत्पूर्वी मास्टर दीनानाथांच्या ‘बलवत संगीत नाटक मंडळी’साठी ब्रह्मकुमारी हे नाटक त्यांनी लिहिले होते. ह्या नाटकातील ‘मी लोपले मधुमीलनात या’ हे पद अत्यंत लोकप्रिय ठरले. बलवंत पिक्चर्स ही संस्था बंद झाल्यानंतर, १९३५ साली बेडेकरांनी कृष्णार्जुन युध्दाचे आणखी एक सहदिग्दर्शक वा. ना. भट ह्यांच्या सहकार्याने ‘भट-बेडेकर प्रॉडक्शन्स’ ही चित्रसंस्था स्थापन केली. राम गणेश गडकरी आणि चि.वि. जोशी ह्यांच्या अनुक्रमे ‘ठकीचे लग्न ‘आणि ‘ सत्याचे प्रयोग’ ह्या विनोदी कथांवर त्यांनी बोलपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी बोलपट होत. त्यानंतर लक्ष्मीचे खेळ हा आणखी एक विनोदी बोलपट त्यांनी निर्माण केला. प्रभातच्या शेजारी ह्या गाजलेल्या चित्रपटाची पटकथा व संवादत्यांनीच लिहिले होते. तसेच रामशास्त्री बोलपटाचे निम्म्यापेक्षा अधिक भागाचे दिग्दर्शन व लेखनही त्यांनी केले.
१९४२ साली ‘न्यू हसं पिक्चर्स’ चा पहिला पाळणा हा तुफान विनोदी बोलपट त्यांनी दिग्दर्शित केला. ह्या चित्रपटाच्या कथा संवादांचेही लेखन केले. राजकमलच्या अमर भूपाळीची (१९५१) कथाही त्यांचीच. फिल्म डिव्हिजनसाठी लोकमान्य टिळक व विनोबा भावे ह्यांच्यावरील अनुबोधपटही त्यांनी तयार केले. चित्रपटमाध्यमाची अत्यंत मार्मिक जाण त्यांनी लिहिलेल्या नेमक्या, नीटस संवादातून जाणवते. १९५१ नंतर बेडेकर चित्रपटव्यवसायात फारसे वावरले नाहीत. १९५१ ते १९८१ह्या तीन दशकांत त्यांनी फक्त दिग्दर्शन केले आणि तेही अवघ्या सहा चित्रपटांचे. त्यात वासुदेव बळवंत आणि रुस्तुम सोहराब यांचा समावेश होतो. याच काळात त्यांनी प्रसिद्ध क्रांतिकारक भगतसिंग ह्यांच्यावरील चित्रपटाचे व ‘प्रभात’ साठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील चित्रपटाचे बरेचसे काम केले पण ते प्रयत्न अपूर्ण राहिले. ह्या काळात ते पुन्हा नाट्यलेखनाकडे वळले. त्यांनी नरो वा कुंजरो वा (१९६१),वाजे पाऊले आपुले (१९६७) टिळक आणि आगरकर(१९८०) ही नाटके लिहिली. तथापि रणांगण (१९३९) ह्या कांदबरीमुळे बेडेकरांची वाङ्मयीन कीर्ती अनेक अर्थानी मराठीत अपूर्व ठरली.
१९३८ साली बेडेकरांना सिनेमॅटोग्राफीच्या अभ्यासार्थ इंग्लंडला जाण्यासाठी एक निमसरकारी शिष्यवृत्ती मिळाली. तिथे त्यांनी फावल्या वेळात हस्ताक्षरतज्ञ म्हणून डिप्लोमा मिळवला. भारतात परत येताना बोटीवर काही निर्वासित जर्मन-ज्यू मंडळींचे जीवन त्यांना फार जवळून बघायला मिळाले. त्या अनुभवातून रणांगण या कादंबरीचा जन्म झाला. चक्रधर नावाचा एक मराठी तरुण आणि ज्यूद्वेष्ट्या नाझी हुकुमशाहीखाली जिचे जीवन अंतर्बाह्य उद्ध्वस्त झाले अशी एक जर्मन ज्यू तरुणी हॅर्टा ह्यांच्या असफल प्रेमाची ही कहाणी आहे. जेनोआहून निघालेल्या एका इटालियन बोटीवर त्या दोघांची भेट होते आणि दहा दिवसांच्या सागरी प्रवासात ती दोघे उत्कटपणे परस्परंच्या जवळ येतात. चक्रधर आधी एका प्रेमप्रकरणात फसलेला असतो, तर हॅर्टा आपला पराक्रम सोडून परागंदा होण्यापूर्वीच आपल्या जर्मन ख्रिश्चन प्रियकराला मुकलेली असते. चक्रधराला पाहून तिला अपल्या प्रियकराची आठवण येते आणि चक्रधरही तिच्या प्रेमाने भारावून जाऊन तिच्याशी विवाह करावयास तयार होतो. तथापि हॅर्टापाशी जर्मन पासपोर्ट असल्यामुळे तिला चक्रधराबरोबर मुंबईस उतरता येत नाही.
बोट चक्रधराला सोडून निघून जाते आणि विफल प्रेमाचा दुसरा आघात असह्य झालेली हॅर्टा हाँगकाँगपर्यंत गेल्यावर समुद्रात उडी मारून आत्महत्या करते. ह्या कांदबरीचा विषय, तीत असलेली विरोधवादाची पार्श्वभूमी, तिच्यातील सूक्ष्म, अभिजात कलात्मकता, तीतून व्यक्त झालेला संवेदनस्वभाव, तिची अनेकसंदर्भसूचकता हे सारेच मराठी कांदबरीत अपूर्व होते. मराठीतील मोजक्या, उत्कृष्ट कादंबऱ्यात बेडेकरांच्या रणांगणाची गणना केली जाते. १९८६ साली मा.विश्राम बेडेकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होते. मा.विश्राम बेडेकर यांचे निधन ३० ऑक्टोबर १९९८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज १२ सप्टेंबर... हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व यांची पुण्यतिथी
सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी झाला.
‘नर करनी करे तो नर का नारायण हो जाए’ या म्हणीचे प्रतीक म्हणजे ‘सवाई गंधर्व’. रामभाऊंचा आवाज लहानपणी गोड व हलका होता. त्यांना व घरातील मंडळींना गाण्याची आवड होती. वडील स्वत: तबल्याची साथही करत असत. घरातील आर्थिक सुबत्ता व सर्वांना असलेली गाण्याची आवड या अनुकूल परिस्थितीमुळे लहानपणी रामभाऊंना कुंदगोळ येथे बळवंतराव कोल्हटकर यांच्याकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली. त्यांना त्यात सुमारे पंच्याहत्तर ध्रुवपदे व पंचवीस तराणे मिळाले. रामभाऊंचे वडील मुळचे कुळकर्णी. त्यामुळे मुलाने जहागीरदारांकडील वहिवाटदारी व पाटीलकी पुढे सांभाळावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु रामभाऊंचा जीव गाण्यात अडकला होता. लहानपणी जरी त्यांचा आवाज गोड व हलका होता, तरी ते वयात आल्यावर त्यांचा आवाज फुटला व तो बोजड झाला. त्यावर उपाय म्हणजे, चांगल्या गुरूंकडून तालीम मिळणे हाच होता.
त्या सुमारास म. अब्दुल करीमखाँसाहेब मिरज येथे येऊन स्थायिक झाले. खाँसाहेबांचे गाणे सुरेल व भावनाप्रधान. रामभाऊंना खाँसाहेबांकडे शिकण्याची ओढ निर्माण झाली. तेव्हा मोठ्या प्रयत्नांती वडिलांचे मन वळवून रामभाऊ अब्दुल करीमखाँसाहेबांकडे गाणे शिकण्यास गेले. आवाज फुटल्यामुळे व बोजड झाल्यामुळे खाँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊंनी त्यांचा स्वत:चा आवाज मोठ्या कष्टाने ताब्यात आणला. खाँसाहेबांकडे सुमारे सात-आठ वर्षे तालीम घेतल्यानंतर बीनच्या अंगाने कसे गावे याचे तंत्र रामभाऊंना अवगत झाले व त्यातून त्यांनी स्वत:ची विशेष आक्रमक गायकी बनवली. पुढे, सुमारे १९०८ पासून, त्यांनी संगीत नाटकांमध्ये कामे केली. त्यांना ‘नाट्यकला संगीत प्रवर्तक मंडळी’ या संस्थेतर्फे होणाऱ्या ‘सौभद्र’ नाटकातील सुभद्रेची भूमिका मिळाली. त्यांच्या सभ्य, सौम्य, प्रतिष्ठित व सुंदर व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची सुभद्रेची भूमिका लोकप्रिय होऊ लागली. मुख्य म्हणजे त्यांचा गाण्याचा ढंगही वेगळा व प्रेक्षकांवर छाप पाडणारा असायचा. एके दिवशी अमरावतीला ‘सौभद्र’चा प्रयोग चालू असताना त्या प्रयोगाला हजर असलेले पुढारी व वऱ्हाडचे अनभिषिक्त राजे दादासाहेब खापर्डे यांनी रामभाऊंच्या भूमिकेवर व गाण्यावर खुश होऊन ‘हे तर सवाई गंधर्व’ असे उत्स्फूर्तपणे उद्गार काढले! तेव्हापासून लोक रामभाऊ कुंदगोळकरांना ‘सवाई गंधर्व’ या नावाने ओळखू लागले.
सवाई गंधर्वांनी १९०८ ते १९३१ पर्यंत संगीत नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘विनोद’ या नाटकातील त्यांचे वामनरावाचे काम; तसेच, ‘मिराबाई’ नाटकातील दयानंदाची भूमिका व ‘सुखसाधना भजना गणा’ हे पद खूप गाजले. त्यांनी नाट्यजीवनाला १९३१ नंतर पूर्णविराम दिला. त्यानंतर ते फक्त खासगी बैठकीत गात असत. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरच मराठी रंगभूमी क्षेत्रामधे त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. बालगंधर्व (उर्फ नारायण राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांना देखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले.
त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणार्याह आणि अधिकच उजळविणार्या. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या त्यांचे शिष्य यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगुबाई हंगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी ह्यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरविण्यास सुरवात केली.
सवाई गंधर्व यांचे १२ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया / thinkmaharashtra
मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला.
१९३४ मध्ये सागर फिल्म कंपनीच्या शहर का जादू या चित्रपटात नायक म्हणून पहिले काम केले. मोतीलाल यांचे गाजलेले चित्रपट 'शादी', आई-'परदेसी', ,'अरमान', 'ससुराल', 'मूर्ति', 'देवदास', जागते रहो व अछूत कन्या. मोतीलाल यांचे जागते रहो मधील गाणे 'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे त्या काळी खूपच गाजले होते. मोतीलाल यांचे १७ जून १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे
https://www.youtube.com/watch?v=GQZaG5SZRYk
https://www.youtube.com/watch?v=y5JcBpFMkKw
जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे.
करसन घावरी हे फास्ट बॉलर असून ते लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग ही करत असत. करसन घावरी आपल्या करीयर मध्ये ३९ कसोटी व १९ वनडे खेळले. १९७४ ते १९८१ पर्यत आपल्या क्रिकेट करियर मध्ये दोन वेळा १९७५ व १९७९ वर्ल्ड कप पण खेळले.
आज ८ आक्टोबर
आज ‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या मा.राजकुमार यांची जयंती
जन्म: ८ आक्टोबर १९२६
विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी मा.राजकुमार यांची ओळख होती. यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्यांनी रहेमान यांना उद्देशून केलेला संवाद त्या काळात प्रचंड गाजला तो संवाद होता, ‘चिनॉय शेठ शिशे के घर में रहनेवाले लोग दुसरों के उपर पत्थर नही फेंका करते.. यह चाकू कोई बच्चे के खेलने की चीज नही, हाथ कट जाएगा तो खून निकल आयेगा..’ या संवादाला रसिकांच्या प्रचंड टाळय़ा पडल्या व या यशानंतर राजकुमार यांनी अभिनयापेक्षा संवादफेकीवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केले. कधी त्यात तो प्रभावीदेखील ठरला. उदा. कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’मध्ये ते मीनाकुमारीला म्हणतात, ‘यह पाँव जमीं पे मत रख देना, मैले हो जायेंगे..’ तर कधी ते व्यक्तिरेखेबाहेर येऊन राजकुमारढंगात संवाद बोलू लागले. मर्यादा, चंबल की कसम, बुलंदी, दिल का हीरा, कर्मयोगी अशा चित्रपटांत तसा प्रत्यय येतो. पण ‘एका विशिष्ट लयीतील संवाद’ अशी त्यांची ओळख व ताकददेखील झाल्याने दिग्दर्शक त्यांना स्वातंत्र्य देतात असे जाणवू लागले. आणि याच गुणावर ‘फिदा’ असणारा असा त्यांचा स्वत:चा एक मोठा चाहतावर्गही निर्माण झाला. त्यांच्या संवादावर मनसोक्त टाळय़ा मारू लागला. मेहबूब खान यांचा ‘मदर इंडिया,’ श्रीधरचा ‘दिल एक मंदिर,’ चेतन आनंदचा ‘हीर रांझा’ या चित्रपटांत राजकुमार यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळाला.
‘जेमिनी पिक्चर्सच्या ‘पैगाम’ नंतर मुक्ता आर्ट्सच्या सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ मध्ये तो तब्बल एकतीस वर्षांनी दिलीपकुमारसमोर उभा ठाकले. तेव्हा ही तोच आत्मविश्वास होता. तो कुठेही कमी पडला नव्हता. कारकिर्दीच्या सुरुवातीला दिलीप-देव-राज या त्रिमूर्तीच्या वाटचालीतही या जानीने उभे राहण्यात यश मिळवले व नंतर मनोजकुमार सुनील दत्त-धर्मेद्र-जीतेंद्र-राजेश खन्ना यांच्यासमोरही ते वाटचाल करू शकला. अर्थात, त्याचे वळण, त्याचा रस्ता पूर्णपणे वेगळा होता. राजकुमार हे वेगळे रसायन आहे हे त्यात त्यांनी सतत सिद्ध केले, राजकुमार हा राजकुमारसारखा जगला मा. राजकुमार यांचे ३ जुलै १९९६ यांचे निधन झाले. आपल्या समुहाकडून मा. राजकुमार यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट/लोकसत्ता
ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी धुळे येथे झाला. .
तवडील आणि गायकनट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर चंद्रकांत कामत यांनी बालनट म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नाटक कंपनीच्या दौऱ्यांमध्येच त्यांनी तबलावादकांकडून तबल्याचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली.
१९५५ मध्ये आकाशवाणीमध्ये त्यांनी परीक्षा दिली आणि १९५६ पासून ते १९९१ अशी तब्बल पस्तीस वर्षे त्यांनी आकाशवाणीत तबलावादक म्हणून काम केले. आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केलेच; पण त्याचप्रमाणे कला जगतात मानाच्या असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये त्यांनी १९५४ पासून साथसंगत करण्यास सुरूवात केली आणि प्रदीर्घ काळ ती सुरू होती.
शास्त्रीय गायनापासून ते नृत्यापर्यंतच्या आणि संगीत नाटकांपासून ते अभंगवाणीतील ‘इंद्रायणी काठी’ सारख्या रचनेपर्यंतच्या अनेकविध कलाप्रकारांना समर्थपणे साथ देणारे ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा तबल्यावरील त्यांच्या विलक्षण हुकमतीमुळे कामत यांचा उल्लेख ‘अनुभवसिद्ध लययात्री’ असा करण्यात येत असे.
सवाई गंधर्व संगीत महोत्सव, सुधीर फडके यांचे ‘गीतरामायण’, गजानन वाटवे, बबनराव नावडीकर यांची भावगीते, सुलोचना चव्हाण यांची लावणी, बेगम अख्तर-गिरीजादेवी यांची ठुमरी अशा विविध कार्यक्रमांमध्ये चंद्रकांत कामत यांची संगत विशेष रंगत आणीत असे. प्रत्येक कार्यक्रमाचा बाज आणि शैली लीलया पेलून ते तो कार्यक्रम जिवंत करीत. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले. भारतातील अनेक मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी मा.कामत यांना मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘स्व. वसुंधरा पंडित पुरस्कार’ तर मिळाले, व पुणे महापालिकेकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला.
चंद्रकांत कामत यांचे दोन्ही चिरंजीव भरत कामत आणि सुभाष कामत हे तबलावादनाचा वारसा सांभाळतात.
चंद्रकांत कामत यांचे निधन २८ जून २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ रोजी झाला.
अनंत दामले यांनी १९३० ते १९९० अशी जवळ-जवळ सहा दशके मराठी संगीत रंगभूमी आपल्या गायकीने व अभिनयाने ९२ नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका करीत समर्थपणे गाजविली. आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या काळात अनंत दामले यांनी अनेक भूमिका वठविल्या, परंतु त्यांचा मुख्य लौकिक झाला तो नारदाच्या भूमिकेमुळे.
'नारद म्हणजे दामलेबुवा आणि दामलेबुवा म्हणजे नारद' असं समीकरणच होऊन बसलं. रंगभूमीवर ३००० पेक्षा ज्यास्तवेळा नारदाची भूमिका साकारण्याचा उच्चांक अनंत दामले यांनी केलेला होता. १९३९ साली न.चि.केळकर अनंत दामले यांचे 'कृष्णार्जुन युद्ध' या नाटकाचा प्रयोग पहायला आले होते. त्यांना मनापासून असे वाटले की अनंत बापू पेंढारकरांसारखाच बोलतो व गातो. बापू पेंढारकर हे अनंत दामले यांचे गुरू होते.
१९४० ला ऑपेरा हाऊसला 'सत्तेचे गुलाम' या नाटकाचा प्रयोग एका संस्थेच्या मदतीसाठी धर्मार्थ प्रयोग म्हणून लावला होता.अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते. या प्रयोगाच्या वेळी अ.ह.गद्रे यानी स्वा.सावरकरांच्या हस्ते अनंत दामले यांना "नूतन पेंढारकर"ही पदवी देऊ केली आणि सावरकर अनंत दामले यांच्या कानात हळूच म्हणालेही, "पदवी मिळविणे सोपे असते पण टिकविणे कठीण असते बर!". पुण्यातील 'भारत गायन समाज' हे अनंत दामले यांचे श्रद्धास्थान होते.
अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली. अनंत दामले यांचे ९ ऑक्टोबर १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. संत्र्याची बाग, मनमोर, शिरवा, छळ, जमिनीवरची माणसं, अंधारवाट, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
पंडितजी संस्कृत भाषेचे पदवीधर होते ते काही काळ आकाशवाणीवर होते. जेव्हा अनेक संगीतकार , वादक यांच्याशी त्यांचा परिचय झाला तेव्हा त्यांनी अनके ठिकाणी आकाशवाणीवर आणि अनके ठिकाणी कार्यक्रम केले. पुढे त्यांना भारत सरकारने आझम हुसेन खान शिष्यवृती दिली.
Copyright © 2025 | Marathisrushti