मुंबई हल्ल्यानंतर रॉय यांनी भारतावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या अनेक दहशतवाद्यांकडून अत्यंत महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. पुन्हा असा हल्ला होणार नाही, यासाठी त्यांनी स्वत:च एक अॅक्शन प्लॅन तयार केला होता. त्यामुळे ते खूपच आत्मविश्वासाने म्हणत होते की, मी मुंबईत असेपर्यंत आता कुणी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही.
यत शिक्षण शाळेत ते मुख्याध्यपक होते. त्यांचा त्यावेळच्या अनेक साहित्यकांशी मैत्री होती.
ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार आणि टॉम अॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी झाला.
जीन डेच यांचे संपूर्ण नाव युजीन मेरील डेच असं होतं. त्यांनी सुरुवातीला त्यांनी नॉर्थ अमेरिकन एव्हीएशन कंपनीमध्ये ड्राफ्टमन म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांनी लष्करासाठी काम केलं आणि नंतर त्यांनी वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेतलं. १९४४ साली आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे त्यांनी हे क्षेत्र सोडलं आणि ते पुन्हा कमर्शियल आर्टकडे वळले. तिथून त्यांच्या अॅचनिमेशन क्षेत्रातील प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
१९५८ साली जीन डेच यांना त्यांच्या सिडनीज फॅमेली ट्री या चित्रपटासाठी अकॅडमी पुरस्कारांचे (ऑस्कर्स) नामांकन मिळालं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९६० साली त्यांना मुनरो या त्यांच्या अॅ निमेशन चित्रपटासाठी सर्वोत्तम अॅननिमेशनपट म्हणून नामांकन मिळालं. त्यानंतर १९६४ साली हियर्स नूडनीक आणि हाऊ टू अवॉइड फ्रेण्डशीप या दोन चित्रपटांसाठी जीन यांना सर्वोत्तम अॅयनिमेशनपट कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. जीन डेच यांनी ट्विटीयथ सेंच्यूरी फॉक्स या कंपनीसाठी टेरीटून्सचे दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांनी तेथे सिडनी द एलिफंट, गॅस्टॉन ली क्रेऑन, क्लिट कॉब्लर आणि टेरीबल थॉम्पसन सारखी कार्टून कॅरेक्टर स्वत: निर्माण केली.
१९६० च्या दशकात जीन यांनी रेम्ब्रँट फिल्म्सबरोबर काम करताना पोपॉय कॉर्टून सिरीजची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मेट्रो-गोल्डवॅन-मायरसोबत काम करताना टॉम अॅकण्ड जेरीचे अनेक लहान लहान कार्यक्रमांची निर्मिती केली होती. जीन डेच हे किग्स फिचर्सच्या ‘क्रेझी कॅट’ या टीव्हीवरील कार्यक्रमाचे सहनिर्माते होते. तर त्यांनी लहान मुलांसाठी ‘द ब्लफर्स’ या अगदी नव्या सिरीजची निर्मिती केली होती. जीन डेच यांचे निधन १६ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
अनंतफंदीस “फंदी” नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले
कानिटकर यांनी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन, व्हिएतनाम युद्ध, चीन.. या विषयांवरील ग्रंथांचे लेखन केले आणि त्यांचे हे सर्व लेखन मराठी वाचकांनी उचलून धरले.
त्यांची आई शांता आपटे यांची कडक शिस्त, व बाबुराव आपट्यांची करडी नजर या वातावरणात नयना आपटे लहानाच्या मोठ्या झाल्या.त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९५० रोजी झाला.लहानपणापासून अंगभूत कलागुणांना खतपाणी घालत त्यांची निगराणी करत, परिस्थितीशी जुळवून घेत नयना आपटे एक कलाकारी व्यक्तिमत्त्व घेऊन लोकांसमोर आल्या आणि रसिकमान्य झाल्या. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी आईकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. 'आयुष्यात कुठलाही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही,' हे तत्त्व आयुष्यभर अमलात आणलेल्या शांताताईंनी ते छोट्या नयनाच्याही मनात उतरवलं. शिक्षणाबरोबर गाण्याचा रियाज आणि शरीरसौष्ठव जपण्यासाठी पोहणे, बॅडमिंटन, नृत्य इ. क्षेत्रांत त्याना आवड होती. बॅडमिंटन कोर्ट, स्विमिंग पूल अशा सर्व सुखसोयींनी सज्ज असंच घर होतं. त्यामुळे बाहेरच्या जगाशी, वातावरणाशी नयनाचा फारसा संबंधच येत नसे. त्यामुळे मित्र-मैत्रिणीही नव्हत्या.
नयना आपटे यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी मराठी नाटकातून कामं केली. पाचव्या वर्षी 'पुण्यप्रभाव' या नाटकात युवराजचं काम केलं. वयाच्या सातव्या वर्षांपासून सलग पाच वर्षं रोहिणी भाटे यांच्याकडे नयना कथकही शिकत असे. त्याच सुमारास सरस्वती बोडसांच्या 'झाशीची राणी' या चित्रपटात झाशीच्या राणीचा छोटा मुलगा दामोदर याचं काम तिने केलं. १९५८ साली 'रणजित स्टुडिओ'चे मालक नानूभाई मिस्त्री यांच्या 'चंडीपूजा' या हिंदी चित्रपटातली काम केले. निरुपा रॉय यांच्या या पहिल्या चित्रपटात छोट्या निरुपा रॉयचं काम मा.नयना आपटे यांनी केले होते. २४ फेब्रुवारी १९६४ ला मा.शांता आपट्यांचं दु:खद निधन झालं. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून शांताताईंच्या पाथिर्वाला अग्नी नयनानेच दिला. वय वर्ष होतं फक्त चौदा. अठरा वर्षं पूर्ण होईपर्यंत तिच्या मालकीचं काहीच होणार नव्हतं. त्यामुळे राहता बंगला, खूप मोठी मालमत्ता याची मालकीण असूनही बंगल्याला सील ठोकण्यात आलं. त्याही स्थितीत एस्.एस्.सी.ला ८४ टक्क्यांनी उत्तीर्ण होण्याची उत्कृष्ट कामगिरी तिने केली होती. आई गेल्यावर ती काही महिने पुण्याला जाऊन राहिली. पण स्वत:च्या पायांवर उभं राहाण्याची जिद्द, अभिनय, महाविद्यालयीन शिक्षण, शास्त्रीय संगीताच्या जोरावर त्या पुन्हा मुंबईत परत आल्या. अशातच १९६५ मध्ये दत्ता धर्माधिकारींच्या 'दैवे लागला चिंतामणी'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६७ साली 'अंमलदार' या मराठी नाटकात राजा गोसावींबरोबर नायिका रंगवल्यावर नयना आपटेंची पुढे १५ वर्षं राजा गोसावींबरोबर जोडी जमली. साठ विनोदी नाटकांतून या जोडीने कामं केली. या नाट्यप्रवासात त्यांना चित्तरंजन कोल्हटकर, शशिकांत निकते, अरविंद देशपांडे, दाजी भाटवडेकर, दामू केंकरे यांच्याकडून गद्य नाटकातील भूमिकांमधले बारकावे अभ्यासता आले. मा.नयना आपटे यांनी आजवर ६५ मराठी नाटकांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. गुजराथी नाटकांमधूनही त्यांच्या भूमिका खूप गाजल्या आहेत. 'मिली', 'चुपके चुपके' या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत. सहा गुजराथी चित्रपट, दूरदर्शनवरील हिंदी-मराठी मिळून १६ मालिका त्यांच्या नावांवर आहेत. एवढी कामगिरी बजावूनसुद्धा त्या कधीच थकल्या नाही. महाराष्ट्राची शान ठरलेल्या संगीत रंगभूमीसाठी कोणी नुसता आवाज दिला तरी मी माझी सर्व कामे बाजूला ठेवून तिच्या सेवेला हजर राहीन, असं म्हणणा-या नयना आपटेंचा उत्साह आजही केल्यानंतरही तितकाच अदम्य आहे. तरुणांनाही लाजवणारा आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
डॉ. हेडगेवार हे मैट्रिक पास झाल्या नंतर १९१० साली ते चिकित्सा शिक्षण घेण्या साठी कोलकात्ताला गेले. त्यांचा जन्म १ एप्रिल १८८९ रोजी झाला. तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी - व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते.
बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकतामध्ये घेतले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात नागपुरात परतल्यावर काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला व अनेक वेळा कारावास भोगला. १९२० ते १९३१ या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी होते. या सर्व काळात मा.डॉ. हेडगेवार यांनी हिंदू समाज जवळून पाहिला, अनुभवला. हिंदू समाजाला एवढी प्राचीन परंपरा, प्रदीर्घ इतिहास व सांस्कृतिक वारसा असताना हा देश गुलाम का झाला, या प्रश्र्नाने डॉक्टरांना अंतर्मुख केले. या देशातील हिंदू समाज परस्परांतील, जाती-जातींतील भेदांनी दुभंगला आहे.
राष्ट्रीय हितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले जाते आहे. या दुर्गुणांमुळेच देश गुलाम झाला. देशात इतर अनेक विचार प्रवाह असूनही त्यामध्ये राष्ट्र म्हणून विचार करणारी एकही यंत्रणा नाही. या भूमिकेतूनच डॉक्टरांनी १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी (२७ सप्टेंबर, १९२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना स्थापन केली. इथे हिंदूंचे संघटन करताना हिंदू स्वयंसेवक संघ न म्हणता राष्ट्रीय हा शब्द वापरला. कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही डॉक्टरांची ठाम धारणा होती. याच राष्ट्रीय समाजाला संघटित करून राष्ट्राला परम वैभवाला न्यायचे हे संघटनेचे ध्येय ठरवून त्यांनी वाटचालीला आरंभ केला. स्थापनेच्या क्षणापासून डॉक्टरांचे संघटना बांधणी, विस्तार, मुनष्यबळ नियोजन, संघटनेची रचना, विचारधारा, एकूण कार्यपद्धती - या सर्व गोष्टींबाबतचे चिंतन व प्रत्यक्ष कार्य चालूच होते. दरम्यान १९२९ मध्ये डॉ. हेडगेवार यांची औपचारिकरीत्या ‘सरसंघचालक’ (राष्ट्रीय प्रमुख किंवा प्रमुख संघटक) या पदावर नियुक्ती झाल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घोषित केले. डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्त्वज्ञान व वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती दिली. त्या पायावरच रा. स्व. संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे.
क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे (स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार), पं. दीनदयाळ उपाध्याय आदी नेते, कार्यकर्ते भारताला प्राप्त झाले. १९२५ ते १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न करत होते. सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना,दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्र्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती.
भगवा ध्वज, गुरू, गुरूदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य व व्यक्तीला गौण स्थान, सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैंनदिन शाखा (बाल-तरुण-थोरांनी रोज संध्याकाळी खेळण्यासाठी, देशभक्तिपर गाणी म्हणण्यासाठी एकत्र जमणे), सभासद नोंदणी-अध्यक्ष-सचिव-संचालक मंडळ या प्रचलित पद्धतींना फाटा आदी वैशिष्ट्ये असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व.संघामध्ये रुजवली. डॉ. हेडगेवार यांचे २१ जून १९४० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. ‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले. त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषणबरोबरचा चंपाकली, देव आनंदबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संजीव कुमार यांच्यासमवेत त्यांनी जी भूमिका केली होती, त्यात त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८ मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता. यशस्वी कारकिर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री आणि बंगाल सरकार कडून बंगबिभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मा.सुचित्रा सेन यांचे निधन १७ जानेवारी २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्ये ही कळत-नकळतपणे उतरला. सर्वप्रथम एक कलाकार म्हणून, एक व्यंगचित्रकार म्हणून, त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले होते. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत होते. पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्यां ना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आले होते. महाराष्ट्रात निर्माण झालेले, मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काही नाव सुचतय का संघटने साठी?” बाळासाहेब बोलले.. ”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…” “मि सांगतो नाव….....शिवसेना.........यानंतर बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली.
वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे, दौऱ्यांमुळे १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्यार अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला. हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्याद धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्याण राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले होते. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेना प्रमुखांमुळेच. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
‘उमराव जान’मधली ‘जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें’ किंवा ‘बाजार’मधले ‘फिर छिडी रात, बात फुलों की’ किंवा ‘डॅडी’मधले अनुपम खेरवर चित्रित झालेले ‘आईना, मुझसे मेरी पहली सी सुरत दे दे’ ही त्यांची गाणी हीट झाली..
Copyright © 2025 | Marathisrushti