(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रिकेटपटू संदीप पाटील

    मला आठवतंय एक चॅनेल ला वर्ल्ड कप साठी मी होतो, माझ्या नंतर त्यांचा कार्यक्रम असे, सगळे लाइव्ह असे, एक दिवशी संदीप पाटील सर येताना एक पिशवी घेऊन आले, त्यात त्यांचे काही T Shirts, टाय, कॅप आणि ब्रायन लारा याने सही केलेली बॅट माझ्यासाठी घेऊन आले, त्या वस्तूवर मी मग त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.

  • विनोदी बॉलिवूड कलाकार मोहम्मद उमर अली मुक्री

    मुक्री यांच्या वडिलांची उरण येथे मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्री यांना शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९२२ रोजी झाला. एका मुलाखतीत मुक्री यांनी सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस आली. बापाने चांगला मार दिला, पण मुक्री काही सुधारला नाही. वडिलांसमोर अभ्यासाचे नाटक करायचे आणी त्यांच्या माघारी चित्रपट बघायचे हा नेम त्याने काही चुकविला नाही.' वयाच्या दहाव्या वर्षी मुक्रीने घरातून एकदा पलायनच केले. बाप से बेटा सवाई हे अब्बाजींना कळून येताच त्यांनी मुक्रीची रवानगी आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला केली.

    शाळेच्या कोंडवा़ड्यापेक्षा बाहेरचे मुक्त जग मुक्रीला अधिक प्रिय होते. मुंबईत आल्यानंतर तर त्याला मोकळे रानच मिळाले. नाना हिकमती लढवून तो सिनेमे बघायचा. त्या विश्वात रंगून जायचा. याच मंतरलेल्या अवस्थेत मुक्रीला सिनेमात काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. बोरीबंदरच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीचा सहाध्यायी होता दिलीपकुमार. पुढे दोघेही सिनेमाक्षेत्रात स्थिरावले. दिलीपकुमारची प्रतिमा `लार्जर दॅन लाईफ' असलेल्या नायकाची झाली व मुक्री विनोदी नटाच्याच पायरीवर घुटमळला. पण दिलीपकुमार आपल्या या शाळुसोबत्याला कधीही विसरला नाही. दोघांच्या जिव्हाळ्यामध्ये कीर्ती, पैसा असे लौकिक अडथळेही कधी आले नाहीत. आपल्या अखेरच्या दिवसांतही मुक्री दिलीपकुमारच्या या मनमोकळेपणाचा आदराने उल्लेख करीत असे.

    कुठेतरी मुक्रीची आठवण प्रसिद्ध झाली आहे. चौथी इयत्तेत शिकणारे मुक्री नावाचे कार्टे सरोज मुव्हिटोनच्या मालकापुढे जाऊन उभे राहिले. मला चित्रपटात काम करायला द्या म्हणून त्याच्या खनपटी बसले. त्याकाळी चित्रपटात गाणार्या कलावंतांची परंपरा होती. स्टुडिओच्या म्युझिक रुममध्ये नसीर व झेबुन्निसा या त्यावेळच्या कलावंतांसमोर मुक्रीने अत्यंत भसाड्या आवाजात शिरी फरहाद चित्रपटातले गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणताना मुक्रीने असे काही विनोदी हावभाव केले की म्युझिक रुममधील सर्व मंडळी हसून लोटपोट झाली. खरं म्हणजे मुक्रीला गाणे बजावणे यापैकी काही म्हणजे काही येत नव्हते. पण कॅमेर्यासमोर उभी राहायची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तो चक्क खोटे बोलून सरोज मुव्हिटोनच्या म्युझिक रुममध्ये गायला उभा राहिला होता. पण खोट्याचेही खरे झाले. मुक्रीला विनोदी नट म्हणून महिना ७५ रुपये पगारावर सरोज मुव्हिटोनमध्ये नोकरी मिळाली.

    अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीने दिलीपकुमारबरोबर अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्या गाजविल्या. किमान शिक्षण पूर्ण करुन मुक्रीने पुन्हा चंदेरी दुनियेत पाय ठेवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीने एक वळण घेतलेले होते.` नादान' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. फुल चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या मुक्रीला देविकाराणीने हेरले. ठेंगण्याठुसक्या, भरगच्च गालांमधून हसतानाही दांत न दाखविण्याची किमया साधणार्या मुक्रीला देविकाराणीने `प्रतिमा' चित्रपटातील मालकिणीच्या विनोदी नोकराची भूमिका करण्यासाठी पाचारण केले. या चित्रपटातील दिलीपकुमार-मुक्री यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांत कायम राहिली. कोहिनूर, आन, अमर, अनोखा प्यार, राम और श्याम या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत मुक्रीने आपल्या विनोदी आविष्काराने अक्षरश: धमाल उडवून दिली. याचवेळी स्टंटपटांचाही बराच बोलबाला होता.

    स्टंटपट हे तसे दुय्यम दर्जाचेच समजले जात. पण तिथेही मुक्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखविली. दणकट पहेलवान शेख मुख्तार याच्या जोडीने मंगू दादा, दिल्ली का दादा, उस्ताद पेद्रो, कैदी नं. ९११ अशा चित्रपटांमधून मुक्रीने बहार आणली. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसले. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. शिवाय तो जमानाही कथिलाचा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या लिजंड्सबरोबर काम करताना मुक्री कधीही दुय्यम कलाकार वाटला नाही. देव आनंदबरोबर असली नकली, काला पानी, राज कपूरबरोबर चोरी चोरी असे काही चित्रपट त्याने केले. त्याकाळचे लोकप्रिय नायक सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार यांच्या संगतीतही मुक्री पडद्यावर रमला.

    विनोदी भूमिका हे त्याचे पंचप्राण होते. तो त्यात जगला, त्याच प्रतिमेत मुक्रीचा श्वासही विरघळला. गोल्डन एरानंतर अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या बदलांशी ज्यांनी जुळवून घेतले नाही, असे अनेक कलावंत नंतर मोडीत निघाले. पण या परिवर्तनात मुक्री लव्हाळ्याच्या स्थितप्रज्ञतेने टिकला.

    सुपरस्टार पदाची वस्त्रे राजेश खन्नाने खाली उतरविल्यानंतर आपला तमाम प्रेक्षकगण अमिताभच्या मनस्वी, प्रसंगी विखारी व्यक्तिरेखांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागले. अमिताभच्या प्रतिमेला खुलविण्यासाठी मुक्रीनेही यथाशक्ती प्रयत्न केले. `बॉम्बे टू गोवा'पासून ते थेट `शराबी'पर्यंत अमिताभ व मुक्री यांच्यामधील विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजे आहेत. `तय्यब अली प्यार का दुश्मन' हे गाणे फक्त त्याच्यासाठीच जन्माला आले होते. मुक्रीने तब्बल सव्वाशे चित्रपटांतून विविधढंगी भूमिका केल्या.

    चित्रपट कारकीर्दीच्या प्रारंभी तो सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरला. जीवनाच्या अखेरीस मस्तान चित्रपटाचे दिग्दर्शन करुन हे वर्तुळ पूर्ण करण्याची तयारी मुक्रीने केलेली होती, पण त्याच्या निधनामुळे या वर्तुळालाच छेद गेली आहे. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला.

    त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. मा.मुक्री यांचे ४ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ समीर परांजपे

  • अत्यंत कुशल व ताकदीची अभिनेत्री जया भादुरी बच्चन

    शर्मिला टागोर, मुमताज आणि हेमा मालिनी सारख्या ताकदीच्या नायिका पडदा गाजवत असताना जया भादुरी या नावाने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ रोजी जबलपुर, मध्य प्रदेश येथे झाला. सत्तरच्या शतकात सर्वसामान्य, नाकासमोर चालणा-या मुलीला ग्लॅमरच्या जगात पाय रोवणे कठीण होते. पण, जया भादुरी यांचा साधेपणा, निरागसता प्रेक्षकांना एवढा भावला की बस्स.. आपल्या शेजारी रहाणा-या मुलीबद्दल जशी आत्मियता असते तशीच त्यांना प्रेक्षकांकडून मिळाली.

    जया भादुरी यांना सर्वप्रथम बंगाली निर्माते सत्यजीत रे यांनी 'महानगर' या चित्रपटात संधी दिली.
    ऋषिकेश मुखर्जी यांनी 'सुमन' मध्ये त्यांचा अभिनय पाहिला आणि आपल्या 'गुड्डी' या चित्रपटासाठी शालेय विद्यार्थिनीची भूमिका दिली. 'गुड्डी' चित्रपटही गाजला आणि जया भादुरी यांना लागलीच राजश्री प्रोडक्शनचा की फिल्म ‘उपहार' या‍ चित्रपटाची नायिका बनण्याची संधी मिळाली. पारंपारीक पेहराव, सामान्य वागण्याने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अत्यंत कुशलतेने आपल्या इमेजमध्ये बदल केला आणि पिया का घर, अनामिका, परिचय, कोरा कागज, अभिमान, मिली, कोशिश सारखे उत्तम चित्रपट केले. ताकदीची अभिनेत्री म्हणून ओळख झाल्यावर त्यांच्यासमवेत काम करताना भलेभले कलाकरही घाबरत असत. अमिताभ बच्चन आणि संजीवकुमार यांच्याबरोबर त्यांनी अधिक काम केले. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट पुण्याचा फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीट्यूटमध्ये झाली. त्यानंतर ते गुड्डीच्या सेटवर भेटले. बंगाली संस्कृतीनुसार ३ जून १९७३ मध्ये दोघांचा विवाह पार पडला होता. अमिताभ आणि जया बच्चन या जोडीचे 'चुपके चुपके', 'अभिमान,' 'सिलसिला' आणि 'जंजीर', 'एक नजर' 'कभी खूशी कभी गम' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. लग्नानंतर त्या संसारात रमून गेल्या. आज बच्चन परिवार जगातील ग्लॅमरस, प्रसिद्ध आणि श्रीमंत परिवार आहे. त्यांचे कुटूंब सुपरस्टार असले तरी त्यामागे जया भादुरी बच्चन यांचे मोठे योगदान आहे, हे सर्वज्ञात आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    जया भादुरी यांची गाणी व चित्रपट
    https://youtu.be/neCQg_V765U
    https://youtu.be/kkTj4kyfhN8
    https://youtu.be/YBhs0DBcDYs

  • समाजसेविका अनुताई वाघ

    अनुताई ह्या स्वातंत्र्यानंतर ‘ सुराज्य ‘ निर्माण करण्याच्या ध्येयामुळे प्रेरित होऊन त्यांनी हुजूरपागा शाळेमधील नोकरी सोडली आणि कस्तुरबा ट्रस्टच्या आयोजित केलेल्या मुंबईमधील शिक्षक शिबीरात गेल्या तेथे त्यांची ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली .

  • ज्येष्ठ अभिनेत्री मीनाकुमारी

    परिणिता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बिवी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट. ‘परिणिता’ या चित्रपटापासून तिला भारतीय नारीच्या भावुक भूमिकाच मिळत गेल्या. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मा. मीना कुमारी ह्या पहिली अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

  • रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रँग्लर परांजपे

    रँग्लर परांजपे हे केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय. त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण ‘ट्रायपॉस’ परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रँग्लर असे म्हणतात.

  • लेखिका आणि स्तंभलेखक शोभा डे

    मूळच्या शोभा राजाध्यक्ष. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील डिस्ट्रिक्ट जज होते. शोभा डे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली. तरूण वयात मॉडेल म्हणून मोठे नाव कमावल्यानंतर त्यांनी १९७० मध्ये पत्रकारिता सुरु केली. त्यांचे पती दिलीप डे.

    पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते.

    स्टारडस्ट, सोसायटी आणि सेलेब्रिटी या संपन्न वाचकांवर्गाच्या मासिकांचे संपादन त्यांनी केले. उद्योग मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने लिहीले. १९८० पासून त्या विविध भारतीय नियतकालिकांतून सातत्याने स्तंभलेखनही करीत आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पाउस - द ट्रूथ अबाऊट मॅरेज आणि सुपरस्टार इंडिया- फ्रॉम इनक्रेडिबल टू अनस्टॉपेबल या पुस्तकांचा समावेश आहे. डे यांच्या कादंब-या वाचकप्रिय असल्या तरी समीक्षकांनी कधीच त्यांना नावाजले नाही.

    शोभा डे यांनी 'दोन वेळा' लग्न केलंय आणि गेली अनेक वर्षं त्या आपले दुसरे पती दिलीप डे यांच्यासोबत सुखाने नांदताहेत. त्यांच्या म्हणजे डे कुटुंबातल्या सहा मुलांत शोभा डे व किलाचंद यांची दोन मुलं, डे यांना त्यांच्या आधीच्या विवाहसंबंधातनं झालेली दोन मुलं आणि शोभा डे व दिलीप डे यांना त्यांच्या या दुस-या विवाहातनं झालेल्या दोन मुली असा सहा मुलांचा हा परिवार आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जागतिक कीर्तीचे पियानोवादक व्ही.बलसारा

    संगीतावर हुकूमत गाजविणारा कुशल कलाकार, प्रतिभासंपन्न संगीतकार व जागतिक कीर्तीचे पियानोवादक व्हिताज बलसारा उर्फ व्ही.बलसारा यांचा जन्म २२ जुन १९२२ रोजी झाला.

    व्हिताज अर्देशर बलसारा उर्फ व्ही. बलसारा हे पारशी असून सुद्धा व्ही.बलसारा यांनी एकेकाळी आपला हार्मोनियम, ऑर्गन व पियानोच्या अप्रतिम साथीने अवघ्या हिंदी फिल्मी संगीतावर हुकूमत गाजवली.

    ‘‘भारतीय संगीताचं बाळकडू त्यांना आईकडून मिळालं. तीच पहिली गुरू. संगीताची गोडी त्यांना बालपणापासूनच होती. घरी पियानो नव्हता. गोव्याच्या शिक्षकांनी त्यांना पियानो व व्हायोलिनचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं. गायनाचे प्राथमिक धडे त्यांनी फ्रामरोज श्रॉफ व पुढे बडोदा संस्थानचे उस्ताद बच्चूमियाँ यांच्याकडे गिरवले. १९३८ साल होतं. जुहूर राजा यांच्या ‘बादल’ चित्रपटासाठी बरेलीचे खानसाहेब मुश्ताक हुसैन संगीत दिग्दर्शक होते. ध्वनिमुद्रणाच्या वेळी त्यांचा नेहमीचा साजिंदा आला नाही, तेव्हा आयत्या वेळी व्ही. बलसारा पियानो वाजवण्यास बोलवले. तेव्हा वय होतं फक्त १६ वर्ष. व्ही. बलसारा यांच्या वादनशैलीवर खुश होऊन खानसाहेबांनी तिथल्या तिथे माझी दुय्यम सहायक म्हणून नेमणूक केली.’’ व्ही. बलसारा यांनी ‘जिना सिखो’मध्ये पं. हनुमान प्रसादबरोबर, जुहूर राजासाठी ‘मझाक’मध्ये, ‘दोस्त’मध्ये सज्जाद हुसैनबरोबर, ‘रंगमहल’मध्ये मा.दत्ता कोरगावकर यांचा सहायक म्हणून काम केलं. त्यावेळी अॅ रेंजरचं नाव चित्रपटाच्या श्रेयनामावलीत येत नसे. मास्टर गुलाम यांनी व्ही. बलसारा यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळलं. दत्ता कोरगावकर व मदन मोहननी सख्ख्या भावाचं प्रेम दिलं.

    शंकर-जयकिशननी तर अगदी ‘बरसात’पासून ते ते मुंबई सोडेपर्यंत एकही गाणं मी ऑर्गन अथवा हार्मोनियमवर असल्याशिवाय ध्वनिमुद्रित केलं नाही. पूर्वी प्रत्येक संगीतकाराची स्वत:ची वैशिष्टय़पूर्ण शैली होती. गाण्याच्या चालीवरून संगीतकार ओळखू येत असे. यामध्ये वादक कलाकारांचा सिंहाचा वाटा होता, हे विसरून चालणार नाही.’’

    व्ही. बलसारा यांनी ‘‘‘आऽ इन्तजार हैं तेरा’ (बडी माँ), ‘चकोरी का चंदा से प्यार’ (दामन), ‘कोई प्रेम का दे के संदेसा’ (दोस्त), ‘कैसे कोई जिए’ (बादबान), ‘तारा री यारा री’ (दास्तान), ‘लो प्यार की हो गई जीत’ (जादू), याशिवाय शंकर-जयकिशन यांची ‘आवारा’, ‘बरसात’, ‘बादल’, ‘दाग’, ‘आंस’, ‘आह’, ‘पतिता’, ‘बादशहा’, ‘श्री ४२०’, ‘काली घटा’, ‘चोरी चोरी’ अशा अनेक चित्रपटांतील वाजवलेली गाणी अजून लोकांच्या लक्षात आहेत.’’ मा.व्ही.बलसारा हे पियानो, हार्मोनियमशिवाय व्हायोलिन, मेंडोलिनही वाजवत असत. त्या वादनामध्ये सतत ते निरनिगळे प्रयोग करीत असत. ते हार्मोनियमवर पाश्चिमात्य संगीत वाजव असत, त्यावेळी हार्मोनियमचा सूर अॅ कॉर्डियनसारखा येत असे. उदा. ‘ऐ मेरे दिल कही’ (दाग), ‘याद किया दिलने’ (पतिता) हे गाणं, पियानोवर जेव्हा ते वाजवत असत त्याला भारतीय संगीताची जोड देऊन तेव्हा पियानोवर सरोद, जलतरंग अथवा संतूरसारखा आवाज आणत असत. त्यांनी काउंटर मेलडी वाजवण्याची एक वेगळी शैली निर्माण केली ती सिनेशौकिनांना आवडली.’

    १९५३ साली व्ही.बलसारा यांनी ‘‘स्वीट पिक्चर्स निर्मित जगदीश पंतच्या ‘मदमस्त’ चित्रपटात स्वतंत्ररीत्या संगीत दिग्दर्शन केले. त्यातील मा.लता मंगेशकर यांच्या ‘सुनाए हाल दिल का हमारा’ गाण्यात व्हायोलिन्सचा मारा कटाक्षाने टाळण्यात आला आहे. मा.व्ही.बलसारा यांना ‘‘आयझ्ॉक डेव्हिड (स्पॅनिश मेंडोलिन), रामसिंग (सॅक्सोफोन), रामनारायण (सारंगी), अब्दुल करीम लाला (ढोलक व ढोलकी), कर्नाड, नार्वेकर (व्हायोलिन) यांसारखे अनेक कलाकारांनी साथ दिली. व्ही.बलसारा यांचे निधन २४ मार्च २००५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / अरुण पुराणिक

  • गीतकार व संगीत दिग्दर्शक प्रेम धवन

    प्रेम धवन यांचे वडील ब्रिटीश सरकारच्या नोकरी मधे जेल सुपरिंटेंडेंट होते. पुढे मोठेपणी त्यांनी ला॑होरच्या कॉलेजमधे प्रवेश घेतला जिथे त्यांचे वर्गमित्र होते साहीर लुधीयानवी. त्यांचा जन्म १३ जून १९२३ रोजी झाला. साहीर यांच्या बरोबरीने प्रेम धवन यांनीही वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेतला. अनेक देशभक्तीपर कविता त्या दोघांनी लिहील्या. ते दोघेही बरोबरीने कम्युनिस्ट पार्टीमधे सामील झाले. पुढे मुंबईला आल्यावर त्यांनी "ईप्टा" मधे प्रवेश केला. ईथे त्यांनी वेगवेगळी नाटके, गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून कम्युनिस्ट चळवळीला हातभार लावला. काही काळ ते पं. रवीशंकर यांच्याकडे शास्त्रीय संगीतही शिकले. याचाच फायदा त्यांना पुढे "शहीद" आणि ईतर काही चित्रपटांना संगीत देताना झाला. पं. रवीशंकर यांचे मोठे बंधू उदय शंकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचेही धडे घेतले. देशभक्तीपर गाणी लिहीताना प्रेम धवन यांच्या प्रतिभेस विशेष बहर येई. "छोडो कलकी बातें, कल की बात पुरानी" हे हम हिंदूस्थानी या चित्रपटातील गीत त्याचे आणखी एक उदाहरण. ऐ मेरे प्यारे वतन हे गाणे प्रेम धवन यांचेच साल १९६५ - निर्माता केवल कश्यप यांचे नाव पुढे करून मनोज कुमारने चित्रपट निर्मीती मधे उतरायचे ठरवले.

    मनोज कुमारला या देशातल्या लोकांची मानसिकता अचुक पणे माहीती होती. त्यामुळे त्याने सरळ देशभक्तीपर चित्रपट बनवण्याचे योजले. कथा निवडली शहीद भगतसिंग यांची. रामप्रसाद बिस्मील यांच्या काही मुळ रचना त्याने चित्रपटात वापरायच्या ठरवल्या. बाकी गाण्यांचा प्रश्न होता. गीतकार पी.एल.संतोषी (राजकुमार संतोषी यांचे वडील) हे मनोजकुमारचे खास मित्र. त्यांनीच मनोज कुमारला प्रेम धवन यांचे नाव सुचवले. चित्रपट प्रदर्शित झाला. मोहम्मद रफी यांच्या आवाजातले रामप्रसाद बिस्मील यांचे "सरफरोशी की तमन्ना" लोकप्रिय झालेच. पण त्याहून लोकप्रिय झाले - "ऐ वतन, ऐ वतन, हमको तेरी कसम" आणि क्लायमॅक्सला असलेले "मेरा रंग दे बसंती चोला". या चित्रपटाचे संगीतही प्रेम धवन यांचेच होते. दस लाख या चित्रपटातले "गरीबोंकी सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा". या गीताचे गीतकारही प्रेम धवन हेच होते.

    किशोर कुमार यांनी गायलेले पहिले गाणे - "मरनेंकी दुवाएं क्युं मांगू, जिने की तमन्ना कौन करे" हे प्रेम धवन यांनीच लिहीलं होतं. पण एवढे सगळे गुण असूनही, दर्जेदार काव्य रचूनही त्यांचे समकालीन शैलेंद्र, साहीर आणि हसरत जयपूरी यांच्याप्रमाणे स्वत:ची वेगळी ओळख बनवण्यात ते अपयशी ठरले. संगीतकारांमधे खेमचंद प्रकाश (यांनी त्यांना पहीली संधी दिली), अनिल विश्वास, सलील चौधरी, चित्रगुप्त आणि रवी यांच्याशी त्यांचे विशेष जमायचे. त्यातही सर्वात जास्त (लोकप्रिय) गीते त्यांनी रवी यांच्या संगीतामधे दिली. काव्याबरोबरच नृत्याचीही त्यांना विशेष आवड होती. काही चित्रपटगीतांचे नृत्यदिग्दर्शन त्यांनी केले. त्यात विशेष उल्लेख म्हणून नया दौर चित्रपटातील "उडें जब जब जुल्फे तेरी" चा उल्लेख करावा लागेल. या व्यतीरिक्त दो बिघा जमिन, धूल का फूल, गुंज उठी शहनाई, वक्त या आणि अशाच काही चित्रपटांचे सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले. गीतकार म्हणून कारकिर्द चालू असताना काही चित्रपटांना संगीतसुध्दा दिले. मनोजकुमार यांचा शहीद, रात के अंधेरे मे, पवित्र पापी अश्या काही मोजक्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन मा.प्रेम धवन यांनी केले होते.

    प्रेम धवन यांचे निधन ७ मे २००१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जगाच्या इतिहासातलं मोठं वादग्रस्त व्यक्तिमत्त्व विन्स्टन चर्चिल

    बीबीसीने २००२ मध्ये घेतलेल्या ‘१०० सर्वश्रेष्ठ ब्रिटन्स’ या जनमत चाचणीत चर्चिल यांनाच पहिल्या क्रमांकाची मते मिळाले. सर्वेक्षणानुसार चर्चिल यांनी साहित्यिक शेक्सपीअर, समाजशास्त्रज्ज्ञ चार्ल्स डार्विन आणि अभियंते ब्रुनेल यांना मागे टाकलं होते.