भावुक डोळे, साधारण सौंदर्य व ओठांखाली असलेला तीळ, ठेंगणी मुर्ती असं व्यक्तीमत्व असलेल्या व आपल्या उत्साहाने भारलेल्या मा.बेबी नंदा यांनी अनेक दशकं चित्रपट सृष्टी गाजवली. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. बेबी नंदा या मराठी चित्रपट सृष्टीतले एकेकाळचे आघाडीचे दिग्दर्शक निर्माते असलेल्या मास्टर विनायक यांच्या कन्या. मा.बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. मास्टर विनायक यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यासाठी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम सुरू केले. १९५० सालाच्या आसपास आलेल्या ‘जग्गु’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. बालपण संपल्यानंतर त्यांनी बहिणीच्या वगैरे भूमिका केल्या. त्यांचा या पर्वातला त्यांचा पहिला चित्रपट होता ‘तुफान और दिया’. यात बहिण भावाच्या नात्याची एक विलक्षण कथा व्ही शांताराम यांनी मांडली होती. यातल्या बहिणीच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष बेबी नंदा यांच्याकडे गेले. त्या पाठोपाठ १९५७ साली आलेल्या ‘भाभी’ या चित्रपटामधली त्यांची भूमिकाही विशेष गाजली. या भूमिकेसाठी त्यांना पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. ‘काला बाजार’ या देवआनंद यांच्या चित्रपटातली त्यांची भूमिकाही अशीच गाजली होती. त्या पाठोपाठ आलेल्या ‘धूल का फुल’ या चित्रपटातही त्यांनी एक लहान भूमिका केली होती. नायिका म्हणून बेबी नंदा यांचा पहिला चित्रपट होता तो एल व्ही प्रसाद यांचा ‘छोटी बहन’. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून लगेच प्रस्थापित केले. त्याच वर्षी ‘हम दोनो’ या चित्रपटात त्यांनी देव आनंद यांच्या पत्नीची भूमिका केली. ‘अल्ला तेरो नाम..’ या गाण्याच्या वेळचा तिचा अभिनय आजही अनेकांना आठवत असेल. १९६० साली आलेल्या ‘आचल’ या चित्रपटासाठी बेबी नंदा यांना पहिल्यांदाच फिल्मफेअरचा सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे नामांकन मिळाले होते. बेबी नंदा यांनी अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले असले तरी शशी कपूर बरोबरची त्यांची जोडी विशेष गाजली. ‘चार दिवारी’ व ‘मेंहदी लगी मेरे हाथ’ या त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफीसवर चांगलेच यश मिळाले. त्य़ांच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी स्विकारलेले नसले तरी १९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’ या चित्रपटाने या जोडीला मोठं यश मिळवून दिलं. बेबी नंदा यांची काश्मिरी वेषातली छबी अनेक रसिकांच्या मनात घर करुन गेली. या सिनेमातली सगळी गाणी गाजली असली तरी ‘ये समा..’ या गाण्यातला त्य़ांचा अभिनय विशेष गाजला. याच वर्षी आलेल्या ‘गुमनाम’ या चित्रपटातला बेबी नंदा यांचा अभिनयही विशेष गाजला. ‘इत्तेफाक’ या कोणतेही गाणे नसलेल्या चित्रपटातली राजेश खन्ना बरोबरची त्यांची भूमिकाही चांगलीच गाजली. मनोज कुमार यांचा ‘शोर’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून ‘छलिया’, ‘नया नशा’ अशा काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. या चित्रपटांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी नायिका म्हणून काम करणे थांबवले. ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटात पद्ममिनी कोल्हापुरे च्या आईच्या भूमिकेत त्यांनी चरित्रभूमिकांद्वारे पुनरागमन केले. ‘मजदूर’ व ‘प्रेमरोग’ या चित्रपटातल्या भूमिकांनंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. १९९२ साली दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याशी नंदा यांचा साखरपुडा झाला. मात्र, त्यानंतर मनमोहन देसाई यांचे अपघाती निधन झाले. नंदा आयुष्यभर अविवाहितच राहिल्या. नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गणेश वासुदेव मावळणकर मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले.
फिरोजशा मेहता यांच्यानंतर राष्ट्रीय स्थान प्राप्त करणारे दुसरे नेते म्हणजे स. का. पाटील. भारतीय महापौरपदाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणारे ते एकमेव महापौर अशी इतिहासात नोंद आहे.
१९६४ मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला.
कुमार सोहोनी यांचे पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे ‘अग्निपंख’. यात डॉक्टर लागू, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, अरुण नलावडे अशी मातबर नट मंडळी होती. ‘अग्निपंख’ हे नाटक गाजले. त्यानंतर कुमार सोहनी यांनी ‘रातराणी’, ‘लग्नाची बेडी’, ‘वासूची सासू’, ‘देखणी बायको दुसर्याची’, ‘देहभान’, ‘शेवटचे घरटे माझे’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘तुजविण’ यासारख्या नाटकांचेही त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केले. पण सोहनी यांना कालांतराने चित्रपट माध्यमात काम करण्याची इच्छा निर्माण झाली व ते चित्रपट क्षेत्रात आले.
मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नीे मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते.
गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. मा.गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.
गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला होता व दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसर्याा चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार होते. मिर्झा गालिब यांचे निधन १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मिर्झा गालिब यांच्या काव्यातल्या सुप्रसिद्ध पंक्ती
काबां किस नूर से जाओगे गालिब, शर्म तुमको मगर नहीं आती
दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या आखि़र इस दर्द की दवा क्या है
नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
ये नथी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और
शोले चित्रपटात अमजद खान यांनी साकारलेला गब्बर हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपैकी एक आहे. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० रोजी झाला.
‘शोले’ मधील गब्बरची भूमिका करून 'अमजद खान' यांच्या एंट्री ने सिनेप्रेक्षकांना अक्षरश: अचंबित करून सोडले. 'शोले' या सुपर डूपर हिट सिनेमातील निर्दयी, सहृदयतेचा लवलेशही नसणारा, कल्पनातित क्रूर , रांगडा डाकू त्याने पडद्यावर असा जिवंत केला कि तो पहिल्याच सिनेमानंतर खलनायकांच्या श्रेणीत अत्यंत वरच्या क्रमांकावर जाऊन बसला. प्राण जसा शम्मी कपूर च्या प्रत्येक सिनेमात खलनायक म्हणून दिसला, तसाच अमजद खान, अमिताभ चा 'प्राण' बनला.
‘शतरंज के खिलाडी’ या प्रेमचंद यांच्या लघुकथेवर सत्यजित राय यांनी त्याच नावाने एक चित्रपट बनवला. त्यातील कंपनी सरकारचे पत्र भिरकावून देत लखनवी अस्मिता आणि स्वतःच्या शायरीच्या बढाया मारणारा वाजिद अली (अमजद खान) आपल्याला अजूनही आठवतो.
अमजद खान यांच्या गब्बरने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक पार केले होते. ब्रिटानियाच्या ग्लुकोज बिस्किटांसाठी वापरण्यात आलेला तो व्यक्तिरेखेवर आधारलेला अमजद खान पहिला ब्रँड ठरला होता. आपल्या करिअर मध्ये त्यांनी 'शोले', 'परवरिश', 'मुकद्दर का सिकंदर', 'लावारिस', 'हीरालाल-पन्नालाल', 'सीतापुर की गीता', 'हिम्मतवाला' आणि 'कालिया'सारखे हिट सिनेमे दिले. जवळपास १३० सिनेमांत कारण करणा-या अमजद खान यांचे अनेक डायलॉग्स आजही आठवणीत आहेत. अमजद खान यांचे २७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पी. सी. सरकार ज्युनियर हे उच्चविद्याभूषित आहेत. त्यांनी मानसशास्त्र, विज्ञान या विषयांत पदव्या मिळवल्या आहेत. एवढंच नव्हे, पीएच.डी. केली आहे.
‘कुलवधू’ या गाजलेल्या मालिकेतून सुप्रिया पाठारे यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या मालिकेत त्या खलनायिकेच्या रुपात दिसल्या होत्या त्यानंतर जागो मोहन प्यारे या मालिकेतही त्यांची मुख्य भूमिका होती.
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली म्हणजे १२५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी मागील दहा वर्षांपासून पांडुरंगजींवर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti