(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन

    बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालनचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला. बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.

    विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला.

    समाजशास्त्रमध्ये मास्टर डिग्री मध्ये करण्यापूर्वी तिने जवळपास ९० जाहिरातीत काम केले होते. समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर विद्याला मोहन लाल यांच्या मल्याळम सिनेमात ब्रेक मिळाला. परंतु मोहन लाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरस्टार सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले. त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले.

    'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले.'परिणीती'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली. परिणीतासाठी विद्याला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

    साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते. प्रथम सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. ४० स्क्रिन टेस्ट, १७ मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता. विद्या बालनने ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेत्री व  शशि कपूर यांची पत्नी जेनिफर केंडल

    जेनिफर यांचे वडील गोफरे केंडल जेष्ठ रंगकर्मी होते. ते आपली पत्नी व दोन्ही मुलीच्या सोबत कोलकाता येथे शेक्सपियरन ग्रुप चालवत असत. जेनिफर यांची बहीण फ्री केंडल यांनी ‘शेक्सपीयर वाला’ या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलं की, शशी आणि जेनिफर यांची पहिली ओळख एका कनफ्यूजनमुळे झाली होती.

  • श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत

    मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणार्याच या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला. त्यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी झाला.‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ अशी हाक देऊन पृथ्वीला ‘सुरलोक साम्य’ प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणार्याक कवी केशवसुत. कवी केशवसुत म्हणजे मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी!

    इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.
    गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.

    करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून
    प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.

    किंवा

    आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
    श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते,
    प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
    कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे,
    डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.

    अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.

    त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला.
    ‘वर्डस्वर्थचा प्रभाव असणार्यात केशवसुतांनी ‘भृंग’, ‘पुष्पाप्रत’, ‘फुलपाखरू’ अशा निसर्गकविता लिहिल्या. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ या कवितांतून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार ओजस्वीपणे मांडले. ‘झुपुर्झा’ ही त्यांची गूढ अनुभूती व नावीन्पूर्ण अभिव्यक्तीची कविता. ‘म्हातारी’ या त्यांच्या गूढगुंजनात्मक कविता.

    केशवसुत यांचे निधन ७ नोव्हेंबर १९०५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • स्वातंत्र्यसेनानी केशवराव मारुतराव जेधे

    बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेत ते सहभागी होते. केशवराव व शंकरराव मोरे हे १९३० नंतर देशाच्या राजकीय चळवळीच्या मुख्य प्रवाहात आले. लोकमान्य टिळकांनंतर पुण्यातून जेधे यांनीच कॉंग्रेसला संजीवनी दिली.

  • इतिहास संशोधक डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर

    पिसुर्लेकरांनी या अभिलेखागाराखालील दप्तरखाना सुधारला; त्यातील कागदपत्रे खंडवार लावली आणि त्यासंबंधी सूची व दोन मार्गदर्शिका प्रसिध्द केल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पणजी येथे इतिहास संशोधनकेंद्र स्थापन केले. त्याचे संचालकपद पिसुर्लेकरांकडे होते. गोमांतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असणारे डॉ. पिसुर्लेकर पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेली सर्व ऐतिहासिक कागदपत्रे भारतीय पुराभिलेखागारात आणण्यासाठी आयुष्यभर झटले. पोर्तुगीज दफ्तरातील साडेचारशे वर्षातील सर्व कागदपत्रे अभ्यासून त्यांनी ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ हा अप्रतिम साधनग्रंथ लिहिला.

  • अभिनेते आणि विनोदवीर जगदीप (सूरमा भोपाली )

    सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. त्यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला. जगदीप अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन बी.आर. चोपरा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बाल कलाकार म्हणुन त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानतंर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिकेस सुरूवात केली. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची मजबूत छाप सोडली. 'शोले' सिनेमातील त्यांच्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्या सिनेमामुळे त्यांना सूरमा भोपाली म्हणून ओळखण्यात आले. हे नाव इतके प्रसिद्ध झाले की, त्यांनी या नावाने एका सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले. आपल्या हाव भावाने दर्शकांना हसविणा-या जगदीश यांच्या भूमिकेचा अंदाज खूप वेगळाच होता. जगदीप यांनी मच्छर इन पुराना मंदीर, अंदाज अपना अपना, फिर वही रात, कुरबानी, शहनशाह यांसारख्या सिनेमांत काम केले आहे. जगदीप यांनी हिंदी सिनेमात अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या एकमात्र चित्रपटाचे नाव सुरमा भोपाली होते. अभिनेता जावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. त्यांचा दुसरा पुत्र नावेद जाफरी आहे. नावेद व जावेद जाफरी यांनी टी.वी. वर प्रसिद्ध नृत्य मालिका बुगी वुगी निर्माण केली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • दिग्दर्शक जब्बार पटेल

    २०१९ मध्ये लिओनेल मेसी सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ठरला आहे. २०१९ मध्ये कमाई मध्ये अर्जेंटीनाचा फुटबॉलर लियोनेल मेस्सी प्रथमच पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने गेल्या वर्षभरात तब्बल ८८१.७२ कोटी (१२.७ कोटी डॉलर) एवढी कमाई केली.

  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी

    १९५३ साली त्यांची सिनेटर म्हणून निवड झाली. १९६१ मधील अध्यक्षीय निवडणुकींत ते रिचर्ड निक्सन यांच्या विरुद्ध उभे ठाकले व निवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत त्यांनी खंबीर भूमिका घेऊन रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रे मागे घ्यायला भाग पाडले. १९६३मध्ये केनेडी प्रशासनाने रशिया व ब्रिटन यांच्याशी मर्यादित अण्वस्त्र चाचणीबंदी करार केला. अवकाश मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिले अंतराळ-उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही केनेडी प्रशासनाच्या कार्यकाळात आखला गेला. अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी केनेडी प्रशासनाने विधेयक मंजूर करून घेतले.

  • बॉलिवुड मधील लोकप्रिय हास्य कलाकार जॉनी लिव्हर

    जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉनराव प्रकाशराव जनुमाला. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा यांच्या सोबत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे.

    पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्नच करीत. फीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या.

    १८व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. काम मिळाले ते स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले.

    एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनी यांनी तर्हेतर्हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनी यांना गेट्टुगेदरमध्ये संधी दिली.

    रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीनी सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले.
    कार्यक्रमांचे पैसे बऱ्यापैकी मिळू लागले म्हणून सात वर्षांनी जॉनीने नोकरी सोडली. त्यांच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. नंतर ते कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरले.

    जॉनी यांची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे. त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अॅधक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. जॉनी लिव्हर यांनी आतापर्यंत ३५० सिनेमांमध्ये काम केले आहे.
    जॉनी लिव्हर स्टँडिंग कॉमेडी सुद्धा करतात.

    जॉनी लिव्हर यांनी बेस्ट कॉमेडिअन श्रेणीमध्ये १३ फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट

  • ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम

    एक शून्य शून्य या मालिकेने त्यांना ओळख दिली. मराठी नाटक, मालिका, काही चित्रपट असा प्रवास सुरु असताना १९९८ मध्ये सीआयडी या मालिकेसाठी बोलावणे आले. ‘एक शून्य शून्य’ पासून ते बी. पी. सिंह यांच्याकडं काम करीत त्यांची टीव्हीवरची नव्वद टक्के कारकीर्द बी. पी. सिंहांच्यासोबत घडलीय. पाच मराठी सिरियल्स त्यांनी दिग्दर्शित केल्या. त्या सगळ्या सिरियल्स मध्ये शिवाजी साटम यांनी काम केले आहे. अगदी ‘आहट’पासून ते ‘सीआयडी’पर्यंत.