(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला

    बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म ४ मे १६४९ रोजी झांशीजवळ ककर-कचनय गावामध्ये झाला.

    छत्रसाल राजाने बुंदेलखंडला शक्तिशाली राज्य बनवले होते. छतरपूर नगर छत्रसालनेच वसवले होते. त्यांची राजधानी महोबा होती. ते धार्मिक स्वभावाचे होते. छत्रसाल यांना बुंदेलखंडचे शिवाजी म्हणून ओळखले जायचे. छत्रसाल यांच्या वडिलांचे नाव होते बुंदेला वीर चंपतराय. त्यांनी १७ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ओरछा प्रदेशाला मुघल साम्राज्यातून स्वतंत्र करण्याचा प्रण केला होता. यासाठी त्यांनी विद्रोचा झेंडा हाती घेतला होता. परंतु चंपतराय यांना स्वकीयांविरुद्धच अनेकदा युद्ध करावे लागले. कारण स्वकीयांपैकी काही जण हे मुघलांची हुजरेगिरी करून त्यांचे बंड थोपवण्याचे प्रयत्न करत होते. ३० वर्षे संघर्षानंतर स्वकीयांपैकीच काहींनी कट करून १६६१ मध्ये चंपतराय यांचा वध केला आणि मुंडके कापून औरंगजेबाकडे पाठवले. या संघर्षाच्या काळात बालक छत्रसालही आपल्या वडिलांसोबत जागोजागी भटकत राहिले. आणि त्यांच्याकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेत राहिले.

    आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची भावना छत्रसाल यांच्यात वाढीस लागली होती. यासाठी त्यांच्याकडे काही साधन नसल्याने ते सुसंधीची प्रतीक्षा करत होते. दरम्यानच्या काळात छत्रसाल मुघल सैन्यात भरती झाले. आणि सैन्यासह दख्खनच्या मोहिमेवर आले. तेथे मिर्झा राजे जयसिंग यांच्यासह सैन्यासह पुरंदरच्या वेढ्यात, आपला भाऊ अंगद तथा काका जामशहा यांच्या सोबत होते. त्या वेढ्याच्या वेळी शौर्य गाजवल्याने त्यांना पुरस्कृतही करण्यात आले. परंतु, छत्रसालच्या हृदयात आपल्या वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घेण्याची जिद्द पेटलेली होती. शिवाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या संघर्षामुळे ते प्रभावित झाले. मुघल सल्तनतीला आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात जागी झाली.

    एका दिवशी शिकारीच्या बहाण्याने छत्रसाल मुघलांच्या कंपूतून बाहेर पळून गेले. त्यांनी भीमा नदी पार करून आपल्या पत्नीसह शिवाजी महाराजंची पुण्यात भेट घेतली. इतिहासकारांच्या मते, छत्रपती शिवाजी व छत्रसाल भेट, शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेनंतर 1667 मध्ये झाली. छत्रसाल काही काळ शिवाजी महाराजांकडे पुण्यात राहिले. तेथे त्यांनी महाराजांकडून युद्धनीती, कूटनीती आणि शासननीतीचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी या शिक्षणाचा आपल्या मुलखात बुंदेलखंडात मोठ्या खुबीने उपयोग केला.

    महाराजा छत्रसालची इच्छा होती की, दक्षिणेत राहून मुघलांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्याच्या कामी यावे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी होते. त्यांनी स्वराज्याच्या प्रयत्नाला फक्त दक्षिणेपर्यंत सीमित ठेवायचे नव्हते. म्हणून त्यांनी छत्रसालला सल्ला दिला की, तुम्ही बुंदेलखंडात परता आणि मुघलांविरुद्ध स्वातंत्र्याचा शंखनाद करा.

    छत्रपती शिवाजी महाराजांचा सल्ला प्राणपणाने मानून छत्रसाल बुंदेलखंडात परतले. तेथे त्यांनी फक्त ५ घोडदळातील सैनिक आणि २५ तलवारबाज यांच्यासह संघर्षाला सुरुवात केली. जवळ होती फक्त छत्रपतींनी चेतवलेले स्वराज्याचे स्फुलिंग. लवकरच ती संधी आली जेव्हा औरंगजेबाने आपल्या सैन्याला ओरछातील मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला. या वेळी रयतेच्या दृष्टीने छत्रसालच एकमेव आशेची किरण होते. म्हणून सर्व जण छत्रसाल यांच्या नेतृत्वा संघटित झाले. यानंतर एकेक जहागीरदार अन् सरदार छत्रसाल यांना जोडत गेले अन् सर्वांनी मुघलांचा सशस्त्र प्रतिकार केला.

    छत्रसाल बुंदेला यांचे निधन २० डिसेंबर १७३१ रोजी झाले.

  • ओ पी आणि योगायोग

    असंख्य गाण्यांना आपल्या सृजनशीलतेनं प्रकाशमान करणारा हा संगीतकार म्हणजे ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर !

  • हिंदी चित्रपट सृष्टीतील हास्याचा बादशहा जॉनी वॉकर

    हिंदी चित्रपट सृष्टीत हास्य अभिनेता म्हणून स्थान मिळविणारा पहिला अभिनेता म्हणून बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ़ जॉनी वॉकर यांचे नाव व व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२० रोजी झाला. सदाबहार व्यक्तिमत्व असणार्याब या कलाकाराने विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत अढळ पद संपादन केले आहे. जॉनी वॉकर यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत गेलं.

    जॉनी वॉकर यांनी सुरुवातीच्या काळात बेस्ट मध्ये बस कंडक्टर म्हणून काम केले होते. बसमध्ये प्रवाशांबरोबर मजामस्ती करुन त्यांचे मनोरंजन करत होते. हे पाहून बलराज साहनी प्रभावित झाले होते. बलराज साहनी यांनी त्यांची भेट गुरु दत्त यांच्याशी करुन दिली. १९५० साली आलेल्या ’ आखरी पैगाम” द्वारे ते' रसिकांच्या पुढे आले.त्याच वर्षी नवकेतनचा ’बाजी’ झळकला.आणि जॉनी वॉकरयांनी मागे वळून पाहिले नाही.

    बाजीमधील त्यांच्या दारुड्याच्या अभिनयामुळे खूष होऊन गुरुदत्त यांनी त्यांना "जॉनी वॉकर" हे जगप्रसिद्ध व्हिस्कीच्या ब्रँडचे नाव दिले आणि बद्रुद्दीन जमालुद्दीन काझीचा 'जॉनी वॉकर' झाला. बिमल रॉय सारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाच्या ’मधुमती’त जॉनी वॉकर यांनी दारूड्याची भूमिका एवढी अप्रतिम केली की समीक्षकांनी त्यांना त्या वर्षाचा सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार बहाल केला गेला.जॉनी वॉकर यांनी आयुष्यात कधी दारूला स्पर्श ही केला नाही पण दारूड्याचे बेअरींग एवढे झकास सांभाळले की बिमलदा म्हणाले 'हा माणूस दारूला स्पर्श देखील करीत नाही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही.

    देव आनंद यांच्या सोबत 'सीआयडी'त तर त्यांनी कमाल केली होती.. 'ऐ दिल है मुश्कील जीना यहां जरा हठ के जरा बच के ये है बॉंम्बे मेरी जान’ हे गाणं तर त्या वर्षीच बिनाका टॉपचं गाणं ठरलं! वॉकर यांची विनोदातील लोकप्रियता एवढी होती की ’जॉनी वॉकर’नावाचा एक सिनेमा पन्नासच्या दशकात आला होता यात त्याने मुख्य भूमिका केली होती. श्रीमंत मेहुणा पाहिजे या मराठी सिनेमात देखील त्यांनी भूमिका केली होती. जवळपास प्रत्येक सिनेमात वॉकर यांच्यावर गाणं चित्रित केलेले असायचं. आपल्या ३५ वर्ष्याच्या करीयर मध्ये जॉनी वॉकर यांनी ३२५ चित्रपटात काम केले.

    मिस्टर कार्टून एम.ए., खोटा पैसा, मिस्टर जॉन, नया पैसा, रिक्षावाला आदी चित्रपटात जॉनी वॉकर यांनी नायक म्हणून काम केले होते. जॉनी वॉकर यांनी काळाची पावले ओळखून सत्तरच्या दशकात निवृत्ती पत्करली पण हृषिकेश मुखर्जी यांच्या आग्रहावरून 'आनंद' गुलज़ार यांच्या आग्रहावरून 'चाची ४२०' या चित्रपटात काम केले होते. जॉनी वॉकर यांचे २९ जुलै २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • नाटककार, अभिनेते बाळ कोल्हटकर

    महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू.

  • मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते भालचंद्र पेंढारकर

    भालचंद्र पेंढारकर यांचे संगीतातील गुरू रामकृष्णबुवा वझे. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी हैद्राबाद (दक्षिण) येथे झाला. भालचंद्र पेंढारकर यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२ साली सत्तेचे गुलाम या नाटकात भूमिका करून केले.

    नाट्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, अभिनेते, गायक, संगीतकार अशा कितीतरी भूमिका मा. भालचंद्र पेंढारकर यांनी गाजवल्या होत्या. भालचंद्र पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ नाटय़संस्थेतर्फे अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. विद्याधर गोखले लिखित ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही नाटके विशेष गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’मधील पेंढारकर यांनी साकारलेली ‘दिगू’ ही व्यक्तिरेखा अजरामर झाली. याच नाटकातील ‘आई तुझी आठवण येते’ हे गाणेही खूप गाजले.

    पेंढारकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आदी अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि दिलेल्या वेळेतच नाटय़प्रयोग सुरू करणारे निर्माते म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबई मराठी साहित्य संघात सादर झालेल्या ३०० नाटकांचे ध्वनिमुद्रण पेंढारकर यांनी करून ठेवले आहे.

    भालचंद्र पेंढारकर यांनी संपूर्ण आयुष्य ललित कलादर्श या संस्थेसाठी वाहिले. या संस्थेची शतकोत्तर यशस्वी वाटचाल सुरू आहे ती केवळ पेंढारकर यांच्यामुळेच. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले. ५०च्या शतकात मरगळ आलेल्या मराठी संगीत नाटकांना पुनरुज्जीवित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘स्वामिनी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘जयजय गौरीशंकर’, ‘आनंदी गोपाळ’, ‘बावनखणी’ अशी एकापेक्षा एक दर्जेदार नाट्यकृती त्यांनी रंगभूमीवर आणली. ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाने तर हजारो प्रयोगांचा विक्रम घडविला.

    नाटक नुसते आणले नाहीत तर ती गाजवून दाखवली. भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली. १ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली.

    भालचंद्र पेंढारकर यांचे निधन ११ ऑगस्ट २०१५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेली काही गीते
    https://www.youtube.com/watch?v=PQwQQzUI4hw
    आई तुझी आठवण येते
    घनश्याम मुरली
    जय जय कुंजविहारी
    जय जय रमारमण श्रीरंग
    तू जपून टाक पाऊल जरा
    नयन तुझे जादुगार
    मदनाची मंजिरी साजिरी
    सप्तचसूर झंकारित बोले

  • मराठी रंगभूमीवरील फार्सचा राजा बबन प्रभू

    फार्स किंवा प्रहसन या प्रकाराला मराठी रंगभूमीवर रुजवलं आणि गाजवलं नाहीतर प्रतिष्ठा मिळवून दिली ती अभिनेता-नाटककार बबन प्रभू यांनी. त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, घोळात घोळ’ यासारखे अनेक फार्स लिहिले. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते.

  • गुणी मेहनती – धनश्री काडगावकर

    आजचं नवं नाव… धनश्री काडगावकर. केवळ अभिनयातच नव्हे तर फोटोशूटही तितक्याच मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करण्यात तिची कामाशी समर्पित वृत्ती दिसून येते..

    बघताच क्षणी फ्रेश लूक वाटावा, कोणतेही भाव लीलया व्यक्त करणारा बोलका चेहरा असावा आणि जिच्या चेहऱयावर कोणताही प्रयोग केला तर तो हमखास यशस्वी ठरेल इतका फोटोजेनिक असावा अशा चेहऱयाची मॉडेल फोटोग्राफरसाठी पर्वणीच ठरते. धनश्री काडगावकर हे याचे उत्तम उदाहरण. धनश्रीचा चेहरा बोलका आहे, कोणतेही दडपण झुगारून तो व्यक्त होतो आणि म्हणूनच धनश्रीचे फोटो उत्तम येतात, हे मी ठामपणे सांगू शकेन. धनश्री काडगावकर हे अल्पावधीतच नावारूपाला आलेलं मराठी इंडस्ट्रीतलं खणखणीत नाव.

    शूटसाठी कॉस्च्यूम, मेकअप, हेअर काय असेल आणि फोटोचे रेफरन्स धनश्रीला आधीच माहीत होते. त्यामुळे शूटच्या वेळी काही तासांतच धनश्री तयार झाली. पारंपरिक वेशभूषा, त्यावर मराठमोळा साजशृंगार, कलाकुसरीने सजलेले दागिने आणि धनश्रीचा मोहक चेहरा हे सारं मी कॅमेराबद्ध करत होतो. शूटची गरज असलेले फोटो मी आधी टिपले. नंतर त्याच कॉस्च्यूममध्ये फुल लेंग्थ, हेडशॉटस् असे काही फोटो घेतले, तर नंतर ड्रमॅटिक लाइटिंग करून काही फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी धनश्रीचा लोभस चेहरा मला टिपता आला. हे ठरलेलं शूट संपवायला आम्हाला साधारणपणे तीन – साडेतीन तास गेले. आमचं पॅकअप होणार तितक्यात मी धनश्रीला पारंपरिक वेषभूषेतल्या शूटपेक्षा निराळं शूट करण्याची कल्पना बोलून दाखवली.

    धनश्रीचा चेहरा मॉडर्न लूकमध्ये अधिक चांगला दिसेल असं मला सारखं वाटत होत. धनश्री खरं तर थकली होती. पुढे मेकओव्हर करावा लागणार होता. मेकअप, हेअर हे सारं पुन्हा वेगळ्या धाटणीचं करावं लागणार होतं. तशी त्या शूटची गरज होती. आधीच्या शूटच्या थकव्यामुळे तिचा चेहरा या शूटसाठी तयार नव्हता. आपण पुन्हा नंतर कधीतरी शूट करू असं ती एक-दोनदा बोललीही. मात्र तिच्याही डोक्यात विचारांची चलबिचल सुरू असल्याचं मला लक्षात आलं. म्हणून मी सेटवरच्या लाईट्स, कॅमेरा न काढता ते तसंच ठेवायला सांगितलं. धनश्रीचा विचार काही क्षणांतच बदलला आणि आम्ही ब्रेक घेऊन पुढच्या शूटच्या तयारीसाठी लागलो.

    या नव्या मेकओव्हरची गरज वेगळी होती. धनश्रीचा लूक मॉडर्न होता. आधी धनश्री पारंपरिक वेशभूषेत…साडीत होती, तर आता ती लॉन्ग गाऊनमधे, ग्लॅमरस लूकमधून समोर येणार होती. मेकअप, हेअर अगदी वेगळंच होतं. या सगळ्याला न्याय देता यावा अशी लाइटिंगची, फोटोशूटची माझ्यावर जबाबदारी होती. धनश्री तासाभरात मेकअपरूममधून बाहेर आली अन् तिचं रूपडं पाहण्याजोगंच होतं. धनश्रीचा पेहराव, हेअर आणि मेकअप यातून ती मराठमोळी प्रियांका चोप्रा वाटावी अशीच समोर आली होती. इतका तिचा चेहरा प्रियांका चोप्राशी मिळता जुळता वाटत होता.

    आम्ही शूटला सुरुवात केली. धनश्रीच्या चेहऱयावर स्मितहास्य होतं. जणू काही हे पहिलंच शूट असावं. आधीच्या शूटचा थकवा नाही, चेहऱयावर दमलेले भाव नाहीत, किंबहुना त्याचा मागमूसही नाही. हसऱया चेहऱयाची धनश्री इथे मला टिपता आली, तर नंतर मादक चेहरा, स्वाभिमानी, गंभीर चेहऱयाची असे वेगळे हावभाव असलेली धनश्री मला टिपता आली. चेहऱयावर वेगळे भाव काही सेकंदांचा वेळ न दडवता धनश्रीला व्यक्त करता येत होते. धनश्री इथेच वेगळी आहे. कॅमेरा फ्रेंडली आणि फोटोजेनिकही.

    प्रत्येक शूटचं लाइटिंग वेगळं होतं. तशी त्याची गरजही होती. एका फोटोशूटच्या वेळी नेमके किती लाईट्स लागतात? तर कितीही! म्हणजे अगदी एका लाईटपासून सात ते आठ. फोटोशूट करताना चेहऱयावर टाकण्यासाठी सगळ्यात आधी प्रकाशाचा स्रोत म्हणजेच लाईट ठरतो. मॉडेल मेकअप करत असताना मिळालेल्या वेळेत बाहेर स्टुडिओत या सगळ्याची तयारी करणं सोपं जातं. म्हणजे मॉडेलला विनाकारण यासाठी थांबावं लागत नाही. फोटोग्राफरसोबत उत्तम सहायक टीम असेल तर त्याची व्यवस्था लावणं हे स्टुडिओत सहज शक्य होतं. आम्ही धनश्रीचं हे मॉडर्न लूकमधलं शूट आयत्यावेळी ठरवलं होतं, परंतु शूटची कल्पना डोक्यात इतकी भिनली होती आणि तगडी सहायक टीम असल्याने हे शूट काही तासांतच आम्हाला संपवता आलं.

    धनश्रीचा चेहरा नेमका कशात जास्त चांगला दिसतो? पारंपरिक वेशभूषेत की मॉडर्न लूकमध्ये याचं उत्तर आजही देणं तसं कठीण आहे. धनश्रीचा चेहरा दोन्हीला समान न्याय देणारा आहे. फोटो कितीही वेळा जरी पाहिले तरी एकदा वाटतं पारंपरिक वेशभूषेत धनश्री अधिक खुलते. मात्र मग मॉडर्न लूक पाहिला की, इथे ती अधिक भावते. जेव्हा जेव्हा या फोटोंचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा हे चक्र असंच सुरू होतं आणि नेमकं उत्तर देणं कठीण जातं. धनश्रीचा चेहरा बोलका आहेच. मात्र तिचा स्वभाव परिस्थितीला जुळवून घेणारा, मदतशीर आणि म्हणूनच धनश्रीसोबत फोटोशूट करणं हा नेहमीच अविस्मरणीय अनुभव ठरतो.

    धनेश पाटील
    dhanuimages@gmail.com

  • भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव

    जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारताकरिता पहिले ऐतिहासिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला.

    महत्त्वाचे म्हणजे खाशाबाच्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे आपली वैयक्तिक पदकांची पाटी कोरी होती. कुस्तीतही पाच दशकांनंतर दुसरे पदक आले. फिनलंड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाईल बॅंटमवेट कुस्ती गटात कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या मल्लांना चितपट करून कराडजवळील गोळेश्वर गावातील खाशाबांनी ऑलिम्पिक कांस्यपदक पटकावण्याची किमया २३ जुलै १९५२ रोजी घडवली. कुस्तीची पंढरी कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत असतानाच खाशाबांनी १९४८ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सहावे स्थान पटकावले होते.

    या ऑलिम्पि-कसाठी त्यांनी बोटीतून कंटाळवाणा प्रवास केला होता. ऑलिम्पिक पदकाचा निर्धार त्यांनी तेथेच केला होता. सलग चार वर्षे घाम गाळल्यानंतर त्यांची सुरुवातीला कुस्तीतील राजकरणामुळे निवडही झाली नव्हती. पंजाबच्या मल्लांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडली तेव्हा खाशाबांनाही न्याय मिळाला. एक एक रुपया गोळा करून खाशाबांनी दुसरी ऑलिम्पिक वारी केली होती. कोल्हापूरच्या मराठा बॅंकेने त्यावेळी ३००० रुपयांचे कर्ज दिले नसते तर खाशाबांचा हेलसिंकीला जाण्याचा मार्ग बंद झाला असता. ही अडथळ्यांची शर्यत जिंकत हेलसिंकीत पोहोचलेल्या खाशाबांना ज्या दिवशी पदकाची लढत होती त्याच दिवशी प्रशिक्षकांनी खाशाबांना विश्रांती घेण्यास सांगून ते हेलिसिंकी शहरात फिरायला गेले होते. योगायोगाने खाशाबा स्पर्धेसाठी पोहोचले आणि त्यांनी पदकाची बाजी मारली.

    पदकानंतर सहा वर्षे ते बेकार होते. अखेर महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी कशीबशी नोकरी मिळाली. तेथेही त्याच्या क्रीडाकौशल्याचा उपयोग कमीच करून घेण्यात आला. त्यांचे जन्मगाव गोळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑलिम्पिकच्या वर्तुळांसोबत प्रेरक स्तंभ उभा केला आहे. खाशाबा जाधव यांचे निधन १४ ऑगस्ट १९८४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / प्रा. संजय दुधाणे

    खाशाबा जाधव यांच्यावर प्रा. संजय दुधाणे यांनी केलेली कविता
    पंचरंगी ही वर्तुळे, सांगती आलिम्पिक गाथा।
    मैत्री, मानवतेद्वारे क्रीडावीर रचति पदक कथा ।।1।।
    जिंकुनी पहिलं मानाचं पदक, वाहिलं भारतभू चरणी।
    खाशाबा आद्य ऑलिम्पिकवीर, जन्मती कराड भुवनी ।।2।।
    रोवूनिया झेंडा मराठी मल्लविद्येचा, हेलसिंकी रणांगणी।
    कॅनडा, जर्मनी मल्ल चित, ऐतिहासिक 23 जुलै 1952 दिनी ।।3।।
    पहिला भारतीय, एकमेव मराठी वीर, कीर्ती दिगंतर।
    ऑलिम्पिकवीरा नमन, प्रेरणेची मशाल उजळती अंबर ।।4।।

  • भारताचे भूतपूर्व सरसेनापती जनरल के एस थिमय्या

    इंग्लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर १९२६ साली हैदराबाद पायदळ रेजिमेंट (सध्याची कुमाउँनी) मध्ये राजादिष्ट अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

  • हिम्मते मर्दा….

    ‘धंदा म्हटला म्हणजे तो बुडणारच! धंदा म्हणजे अळवावरचे पाणी! ज्याला नेकरी मिळत नाही तो धंद्यात पडतो!’ उद्योग व्यवसायाविषयी मराठी समाजात अशी विचित्र मनोवृत्ती असल्याचे मला आढळून आले आहे. इतर जमातीत उद्योग व्यवसाय असलेल्या कुटुंबात मुलगी देणे प्रतिष्ठेचे समजले जाते. आपल्याकडे मात्र अशा कुटुंबात मुलगी देण्याआधी शंभर वेळा विचार करण्यात येतो. अजुन तरी या मनोवृत्तीत विषेश फरक झाल्याचे निदान मला तरी आढळून आले नाही.

    मराठी माणूस हा नेहमी धंद्यात ‘पडतो’. तो कधी आपणहून धंद्यात येत नाही. जो माणुस धंद्यात ‘पडतो’ त्याचा धंदा पण शेवटी पडतोच’. पण जो माणूस आपणहून, स्वखुषीने, आत्मप्रेरणेने, जिद्धीने किंवा इर्षेने, आवडीने धंद्यात येतो त्याचा धंदा कधीच बुडत नाही तर तो तरतो, फोफावतो, मोठा होतो असे मी पाहीले आहे. मग या साठी त्याचे वय, शिक्षण, क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स, फॅमिली बॅकग्राऊंड, आर्थिक परिस्थिती, स्त्री का पुरुष, जात-पात-धर्म, तो मराठी मिडियम मधून शिकला का इंग्लीश मिडियम मधून शिकला या सगळ्या गोष्टी गौण, दुय्यम किंवा कमी महत्वाच्या म्हणजेच सबस्टँडर्ड ठरतात. याचे उत्तम उदाहरण आहे पुण्याचे एक उद्योजक सदाशीव रामा बोराटे उर्फ अण्णा.

    अठरा विश्वे दारीद्रय असलेल्या एका गरीब शेतकरी कुटुंबांत जन्मलेल्या एखाद्या खेडुत मुलाने लहानपणापासुनच कारखानदार, इंडस्ट्रियालीस्ट किंवा उद्योजक होण्याची स्वप्ने बघणे हा शुध्ध वेडेपणाच! त्यांतुन उत्तम नोकरी मिळविण्यासाठी लागणारी दणदणीत क्वॉलिफिकेशन्स हाताशी असताना चालुन आलेली चांगली नोकरी नाकारुन नोकरिचा दरवाजा स्वतःसाठी कायमचा बंद करण्याचे धाडस दाखवणे हा अजुन एक मुर्खपणा! त्यांतही स्वतःला कांही इन्कम नसताना हायस्कुल टीचर असलेल्या आपल्या बायकोला पण नोकरी सोडायला लावुन तिच्या येणार्याय नीयमीत उत्पन्नावर गदा आणणे हा तर मुर्खपणाचा कळसच! पण अशी मुर्ख किंवा वेडी माणसेच काहीतरी भरीव कामगिरी करुन दाखवत असतात. म्हणुनच ऍपलच्या स्टीव्ह जॉब्ज सारखे लोक ‘स्टे हंग्री, स्टे फूलीश’ ( Stay Hungry, Stay Foolish ) ‘ ऊपाशी रहा, मुर्ख बना’ असा उपदेश करत असतात ते उगीच नाही. सुप्रसिद्ध पार्श्व गायिका श्रीमती आशा भोसले एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की घरची गरिबी आणि पोटातील भुकेची आग यामुळेच त्या श्रेष्ठ गायिका बनल्या. अशी पोटातील भुकेची आग व गरिबिचे चटके त्यांना बसले नसते तर त्या आत्तासारख्या श्रेष्ठ गायिका कधीच झाल्या नसत्या. आण्णा सुद्धा याच कॅटेगरीतले आहेत.

    कारखानदार होण्याचे स्वप्न जरी अण्णांनी उराशी तरी बाळगले असले तरी करखनदार व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे हे कुठे माहित होते? अण्णासारखा ग्रामीण भागातून आलेला, बिना इस्त्रीचे साधे कपडे व चपला घालणारा, भाड्याच्या सायकलवर फिरणारा, किरकोळ शरिरयष्टी व अत्यंत सामान्य पर्सनॅलिटी असलेला, ज्याला धड इंग्रजीसुद्धा बोलता येत नाही असा, ज्याच्या खिशात गावाला जाण्यासाठी लागणार्यास एस.टी. भाड्याचे पैसे सुद्धा नसतात अशी दरिद्री अवस्था असलेला मराठी माणूस कारखानदार कसा होऊ शकेल असेच सर्वांना वाटायचे.

    पण जे मोठी स्पप्न बघायचे धाडस दाखवत असतात व त्या दिशेने प्रयत्न करत असतात त्यांची स्वप्ने नेहमीच खरी ठरतात. आज अण्णांचे एक नाही, दोन नाही तर चक्क पाच कारखाने आहेत. त्यातील दोन पुण्याला, दोन सातारला व एक चाकणला आहे. प्लॅस्टिक मोल्डिंगच्या क्षेत्रात त्यांच्या कंपनीचे मोठे नाव झाले आहेत. टाटा मोटर्स, फोक्स वॅगन, जनरल मोटर्ससाख्या मोठ्या कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत. 90 कोटीच्या वर टर्वओव्हर आहे. 200 माणसे काम करीत आहेत. त्यांना चार मुले-तीन मुली व एक मुलगा आहे. त्यातील दोन मुली व मुलगा क्वालिफाईड इंजिनिअर तर एक मुलगी एम.बी.ए. आहे. बि.कॉम. झालेला त्यांचा पुतण्या ‘उत्तम’ हा उत्तम इंजिनिअर झाला आहे. प्लॅस्टिकला लागणारे मोल्ड बनवण्यात त्याने प्राविण्य मिळवले आहे. जर इंजिनिअर व्हायचे असेल तर त्यासाठी इंजिनिअरींगची क्वालिफिकेशन्स असलीच पाहीजेत असे नाही. जर आवड असेल तर कोणालाही उत्तम इंजिनिअर बनता येते याचे ‘उत्तम’ हे उत्तम उदाहरण आहे. ज्यांची भाड्याने जागा घेण्याची ऐपत नव्हती व भाड्याच्या सायकलवरून फिरायची पाळी होती त्याच अण्णांचे आज बंगले आहेत, गाड्या आहेत. थाटात फॅरीन टुर्स करत आहेत. नोकरीत हे कधीच जमले नसते असे त्यांचे म्हणणे आहे.

    अर्थात अण्णांचा हा प्रवास काही साधा, सरळ व सुखाचा झालेला नाही. पार्टनरने ऐन वेळेला दगा देणे, लोकांनी फसवणे किंवा टोप्या घालणे, अंडर एस्टिमेट करणे, थोड्याश्या मोबदल्यात त्यांच्या फॅक्टरीवर कबजा करण्याचा प्रयत्न करणे, बिझनेच्या मोठ्या मोठ्या थापा मारून त्यांना फुकटात राबवून घेणे, वेगळे घर घ्यायला पैसे नाहीत म्हणुन फॅक्टरीतच संसार थाटणे, केवळ तीन भांड्यांपासून संसाराला सुरवात करणे, हेवे दावे, लोकांच्या पोटात दुखणे अशा अनेक संकटांना तोंड द्यायची पाळी त्यांच्यावर आली. पण ते डगमगले नाहीत. याचवेळी त्यांना काही चांगली माणसे पण भेटली. असे असुनही आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटु दिली नाही. आपल्या गावी पण त्यांनी कारखाना काढला होता. त्याला महाराष्ट्र सरकारचे पारितोषीक पण मिळाले होते. पण विजेच्या समस्येमूळे त्यांना हा कारखाना बंद करावा लागला.

    जास्तीत जास्त मराठी तरुणांनी उद्योग व्यवसायात यावे, कारखानदार व्हावे, लघु उद्योजक व्हावे, विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांनी या क्षेत्रात पुढे यावे, ग्रामीण भागात कारखाने काढावेत या साठी अण्णांचे तळमळीने प्रयत्न चालू असतात. यासाठी त्यांची विनामुल्य मार्गदर्शन देण्याची तयारी असते. त्यांचे म्हणणे आहे की लघु उद्योग हा मोठ्या उद्योगाचा पाठीचा कणा आहे. त्यांच्या पासून प्रोत्साहन घेऊन त्यांच्या गावाजवळील गावातील काही तरुणांनी कारखाने काढले आहेत. त्यांच्या जीवन चरित्रावर आधरलेले माझे ‘हिम्मते मर्दा’ हे पुस्तक इ-साहित्य प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले असून ते विनामुल्य उपलब्ध आहे. यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

    ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी joshiulhas5@gmail.com या इ-मेल आयडीवर संपर्क साधावा. अण्णांशी संपर्क साधायचा असल्यास borate.sr@elite-group.co.in या इ-मेल आयडीवर संपर्क साधावा ही नम्र विनंती आहे.

    -- उल्हास हरी जोशी, मोः-9226846631