सोनी टीव्हीवर गाजलेल्या ‘परवरिश’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वात गौतमी काम केले होते. सातत्याने हिंदीत काम करीत राहिल्याने आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये रस नाही, असा बहुधा लोकांचा समज झाला असावा. मला खरोखरच मराठी चित्रपटात काम करायचे आहे, असे गौतमीने एका मुलाखतीत सांगितले होते.
पी. सावळाराम यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला.पी.सावळाराम यांचे खरे नाव- निवृत्ती रावजी पाटील. वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्रावरून त्यांना प्रेमाने दिलेले ते नाव! सावळारामांनी ते आयुष्यभर स्वीकारले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तेव्हा त्या कॉलेजात माधव ज्यूलिअन शिकवत असत. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी
‘सौंदर्य नसते रंगात।
सौंदर्य असते अंतरंगात।
उघडुनि पाही।’
या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली.
ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा- म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती.
त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत. ‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते बृहन्महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत. ‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात. सावळारामांनी जवळजवळ सातशे ते आठशे गाणी लिहिली. मा.पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले. ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. १९६४ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. मा.पी. सावळाराम यांचे २१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अनंत काणेकर यांचा ‘ चांदरात ‘ हा काव्यसंग्रह खूप गाजला. अनंत काणेकर यांनी १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ माणूस ‘ या चित्रपटाचे संवाद लेखन केले परंतु त्याच वर्षी तो चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला ‘ आदमी ‘ ह्या नावाने याही चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले.
लावणीपासून बालगीत आणि गण-गवळणींपासून देशभक्ती, भक्तिगीतांपर्यंत गीतलेखनाचे सर्वांत जास्त प्रकार वापरून गेली पाच दशके मराठी गीतरसिकांना मोहित करणारे असामान्य प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर तथा मराठी चित्रसृष्टीचे ‘नाना’ यांचा जन्म हळदी, ता. करवीर येथे सामान्य कुटुंबात झाला. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील इंग्रजी राजवटीत १५ रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचे बाळकडू घरीच मिळाले. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्याने बारा बलुतेदारांची लोकप्रिय गीते ऐकल्याने ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतांतून अजरामर केले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी १९४८ साली मध्ये गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. ‘काशीला श्रावण बाळ निघाला…’, ‘आज मरूनीया जीव झाला मोकळा…’, ‘जग ही पैशाची किमया…’, ‘नको नको बनू आंधळा…’, ‘आमुचा जीवन प्याला….’, ‘जागा हो माणसा…’, ‘दिला मृगानं हुंदका…’ अशा असंख्य कविता त्यांनी रचल्या. त्यांच्या कवितांना इतका बहर होता की, ते दिवसाला १० ते ११ कविता लिहू लागले होते. १९५६ मध्ये आकाशवाणीवर खेबुडकर यांचे पहिलेच गीत ऐकून नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातील पहिले गीत लिहिण्याची संधी दिली. सांगली येथे सन १९६० साली ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटासाठी लावणी लिहिण्याची संधी दिली. आयुष्यातील पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारून अस्सल कोल्हापुरी नजराणाच खेबुडकर यांच्या लेखणीतून प्रकट झाला. ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ या पहिल्याच लावणीच्या ठसक्याने मराठी गीतरसिकांना वेड लावले.
‘सामना’, ‘पिंजरा’, ‘साधी माणसं’ अशा सुमारे साडेतीनशे चित्रपटांसाठी जगदीश खेबुडकर यांनी तब्बल अडीच हजारांवर गाणी लिहिली. यांत ‘तुम्हावर केली मर्जी मी बहाल’, ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’ अशा एकाहून एक सरस लावण्यांबरोबर ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, ‘मला हे दत्तगुरू दिसले’ यांसारखी भक्तिगीते, तर ‘राजा ललकारी अशी दे’, ‘ही कशानं धुंदी आली’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘बाई बाई… मनमोराचा’, ‘आकाशी झेप घेरे पाखरा’ अशा सर्वांगसुंदर गाण्यांचा समावेश आहे. अष्टविनायक चित्रपटातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ ह्या त्यांच्या गाण्यामुळे सगळ्यांना ५ ते ७ मिनिटात त्यांनी अष्टविनायकाचे दर्शन घडवले. आजवर कोणत्याही मराठी गीतकाराने खेबुडकर यांच्याइतके काव्यप्रकार वापरले नाहीत. गण-गवळण, लावणी, भारुड, गोंधळ, सवाल-जवाब, बालगीत, प्रेमगीत, स्फूर्तिगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, मुक्तछंद, अभंग अशा मराठीत यच्चयावत काव्यप्रकारांत खेबुडकरांनी आपल्या शब्दसामर्थ्याने असामान्य गीते लिहिली. व्ही. शांताराम, पेंढारकर, दादा कोंडके, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके अशा दिग्गजांबरोबर जगदीश खेबुडकर यांनी जसे काम केले तसेच डॉ. अशोक पत्की, ‘पानिपत’कार विश्वाास पाटील, गायक रवींद्र साठे, संगीतकार अजय-अतुल यांनाही अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन केले.
कमल हसन यांच्या ‘हे राम’ चित्रपटासाठी खेबुडकर यांनी गीतेही लिहिली होती. "शब्दरुप आले मुक्याला भावनांना, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, मला हे दत्तगुरू दिसले, कुण्या गावाचं आलं पाखरू, बुगडी माझी सांडली गं, विठ्ठल नामाची शाळा भरली, मोरया मोरया' अशा ३५० मराठी चित्रपटांसाठी तब्बल २७५० लोकप्रिय गीते लिहिणाऱ्या मा.जगदीश खेबूडकर यांनी अगदी बालगीत ते प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, देशभक्तिपर गीते, गणगौळण, गौरीगीते, वासुदेव गीत, माकडवाला, कोळीगीते, सवाल-जवाब, एकतारी भजन, डोंबाऱ्याचे गीत, कुडबुडा जोशी गीत, वारकरी भजनापर्यंत असा एकही गीताचा प्रकार शिल्लक न ठेवता विपुल अशी रसिकमान्य गाणी त्यांनी लिहिली होती. पंचवीस वर्षापूर्वी स्वत:ची नाट्यसंस्था निर्माण करुन "गावरान मेवा, जिवाची मुंबई, रंगा डायव्हर, राम दर्शन' या कलाकृतींचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केली होती. मा.जगदीश खेबूडकर यांना राज्य शासनाचे अकरा, ‘रसरंग फाळके’, चित्रपट महामंडळाचे दोन, ‘गदिमा जीवनगौरव’, ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’, ‘कोल्हापूरभूषण’, ‘मृत्युंजय’, ‘सुरसिंगार संसद’, पुणे फेस्टिव्हल, ‘छत्रपती शाहू पुरस्कार’, ‘करवीरभूषण’, ‘साहित्य पुरस्कार’, ‘मार्मिक गौरवचिन्ह’, ‘लावणीरत्न’, ‘नटराज’, केंद्र शासन, ‘कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार’, ‘यशवंतराव चव्हाण साहित्यगौरव’ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. मा.जगदीश खेबूडकर यांचे ३ मे २०११रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जगदीश खेबूडकरांची गाजलेली गाणी
https://www.youtube.com/watch?v=sX9AfQIpVNg
https://www.youtube.com/watch?v=29utf9DFxos
https://www.youtube.com/watch?v=VaxNJBINpwY
https://www.youtube.com/watch?v=zyNZ3JEve3I
https://www.youtube.com/watch?v=mYvSHjO9LXA
https://www.youtube.com/watch?v=STqNETx8Yr4
https://www.youtube.com/watch?v=KCvcsblHncI
बॉलीवूड मधील जेष्ठ अभिनेते दादामुनी उर्फ अशोक कुमार यांचा जन्म. १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला.
१९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैया, या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणाऱ्या या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हिरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.
दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे.
शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती.
सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले.
अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे.
अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ रोजी निधन झाले.
https://www.youtube.com/watch?v=FvXTWi2YED8
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने भर घालणाऱ्या सूरश्री केसरबाई केरकर या गोव्याच्या भूमीकन्या. त्यांचा जन्म १३ जुलै १८९२ रोजी झाला. उस्ताद अब्दुल करीम खाँ, प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. १९२१ मध्ये त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खाँ यांचे शिष्यत्व पत्करले. त्या राजे - सरदार मंडळींसाठी नियमितपणे मैफिली करत असत. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली. नोबेल पुरस्कारविजेते कवी रवींद्रनाथ टागोर हे केसरबाईंच्या गायनाचे विलक्षण चाहते होते असे सांगितले जाते.
कोलकाता येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने १९४८ साली केसरबाईंना 'सूरश्री अशी पदवी बहाल केली. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला. रवींद्रनाथ टागोरांनी 'सूरश्री' किताब बहाल केला. रवींद्रनाथांनी दिलेले गौरवपत्र चांदीच्या चौकटीत घालून केसरबाईंनी शेवटपर्यंत जतन करून ठेवले. संगीत नाटक अकादमीने १९५३ साली 'प्रमुख आचार्या' ही सनद त्यांना बहाल केली. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सूरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह आयोजित केला जातो, तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला दरवर्षी त्यांच्या नावे संगीत शिष्यवृत्तीही दिली जाते.
गोव्यातील कवी, नाटककार आणि आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केसरबाईंचे ’एका सूरश्रीची कथा’ नावाचे चरित्र लिहिले आहे. केसरबाई केरकर यांचे १६ सप्टेंबर १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
.तिला सुरय्या , नूरजहाँची गाणी आवडायची आणि ती गाणी ती चांगली म्हण्याची.
मराठी चित्रपट सृष्टीत 'तांबड्या माती'तील साधा माणूस भालजी पेंढारकर यांचा जन्म २ मे १८९९ रोजी झाला.
भालजी पेंढारकर कोल्हापूरच्याच गुरुवर्य विभूते यांच्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकले. भालजी हुशार पण अभ्यासात लक्ष नसे. नाटकांचे वेड होतंच. मेळेही लिहित. परिणामी मॅट्रिक नापास झाले. आई रागावल्यावर हेही भडकून पुण्याला गेले. घरोघर सकाळी ‘केसरी’ टाकायचे. वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यात दाखल झाले. पंजाब व आसपासचा भाग भटकून पाहिला. ते सोडून पुढे पुण्याच्याच ‘लक्ष्मी’ व ‘अपोलो’ या सिनेमागृहात मॅनेजर म्हणून काम केले.
बोलपट सुरू होण्याआधीचा तो काळ, त्या काळात नाटकांची चलती होती. भालजींना लिहिण्याचं वेड. त्यांनी ‘राष्ट्रसंसार’, ‘क्रांती’, ‘अजिंक्यतारा’, ‘आसुरी लालसा’, ‘कायदेभंग’ अशी राष्ट्रप्रेमाने भारलेली नाटके लिहिली. नाटके लिहिण्याचा हा अनुभव त्यांना लवकरच उपयोगी पडला. १९३२ साली ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचप्रमाणे कथा-पटकथा-संवाद-गीते अशी सारी जबाबदारी भालजींवर सोपविण्यात आली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. ‘श्यामसुंदर’ची याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यं होती. भारतातला तो पहिला ‘बाल चित्रपट’. शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.
शाहू मोडक यांचा हा पहिला चित्रपट आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. त्यानंतर भालजींनी कोल्हापूर सिनेटोन (आकाशवाणी, कालियामर्दन), श्याम सिनेटोन (पार्थकुमार), सरस्वती सिनेटोन (सावित्री, राजा गोपीचंद), शालिनी सिनेटोन (कान्होपात्रा), अरुण पिक्चर्स (नेताजी पालकर, गोरखनाथ) फेमस अरुण (सूनबाई) या चित्रसंस्थांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन व कथा-पटकथा-संवाद व गीते ही सारी जबाबदारी सांभाळली. १९४५च्या सुमारास भालजींनी छत्रपतींच्या मालकीचा ‘कोल्हापूर सिनेटोन’ हा स्टुडिओ विकत घेऊन त्याचे ‘जयप्रभा स्टुडिओ’ (जयसिंग व प्रभाकर यांच्या नावावरून) असे नामकरण केले.
भालजींचा हा स्टुडिओ एखाद्या आश्रमासारखा होता. सगळीकडे स्वच्छता, टापटीप व प्रसन्न वातावरण होते. पण शिस्त मात्र कडक होती. स्टुडिओच्या आवारात कागदाचा कपटा व सिगारेटचं पाकीट, सिगरेट-विडीचे उरलेले तुकडे काहीच दिसत नसत. त्याकरिता ठिकठिकाणी पेट्या होत्या. त्यातच कचरा टाकला पाहिजे, असा नियम होता. स्टुडिओत सुमारे साडेतीनशे माणसे नोकरीला असूनही कुठेही गडबड गोंधळ नसे. भालजींना सारे ‘बाबा’ म्हणत. ते स्टुडिओत असो वा नसो त्यांचा दराराच एवढा होता की लोक उगाचच इकडे तिकडे चकाट्या पिटताना कधी दिसत नसत. स्टुडिओत ठिकठिकाणी नियम व सूचनांचे फलक लावलेले होते. काही ठिकाणी तर सुविचारांचेही फलक दिसत. चित्रपटाच्या वेळी काम नसले तरी सर्वांना स्टुडिओत यावेच लागे.
सकाळी साडेदहा वाजता सर्वांना स्टुडिओत यावे लागे. कामाची सुरुवात चौकात भगव्या ध्वजासमोर प्रार्थनेने व्हायची. बाबा स्वत: प्रार्थनेला सुरुवात करीत. त्यांच्या मागून सारेजण म्हणत. कधीकधी बाबांचे सहायक जयशंकर दानवे प्रार्थना म्हणत.
सकाळची प्रार्थना
‘कृषिवलांची वीरवरांची देवांची जननी पतिव्रतांची सद्धर्माची महत् जन्मभूमी’
अशी होती तर संध्याकाळी परत प्रार्थनेनंतर काम थांबे.
संध्याकाळी ‘मारूनि मेले अमर जाहले स्वतंत्रतेसाठी प्रणाम त्यांना तुला दंडवत माते कोटी कोटी’ या प्रार्थनेने दिवस संपे.
भालजींच्या प्रत्येक चित्रपटाची सुरुवात ‘बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या महाराष्ट्रगीताने होत असे. बाबांचा पोषाख म्हणजे अत्यंत साधा पांढरा सफेद बिनकॉलरचा सदरा, पांढरी हाफपॅन्ट व कोल्हापूरी चपला. विशेष प्रसंगी ते भगवी टोपी घालत.
चित्रपटासाठीसुद्धा नाटकातल्यासारखी नटांची खच्चून तालीम करून घेणारे भालजी हे बहुतेक शेवटचे दिग्दर्शक म्हणावे लागतील. तालीम हॉलमधले भालजी म्हणजे एक प्रकारे शिक्षकच असायचे. बोलावं कसं, चालावं कसं, उभं रहावं कसं याबरोबरच एखाद्या भूमिकेतील हालचाल कशी असायला पाहिजे हे सारं ते करून दाखवत व करून घेत. अभिनय उत्तम व्हावा यावर त्यांचा कटाक्ष असे. चुकल्यावर भल्याभल्यांना ते छडी मारत. पण त्यांचं मारणं प्रेमाचं असे. कलाकारांच्या अभिनयाच्या आवाका आजमावून त्याप्रमाणे ते समजावून सांगत. वेळ प्रसंगी थोडी मोकळीकही देत.
भालजींचे बहुतेक चित्रपट ऐतिहासिक होते. शिवाजीचं किंवा संभाजींचं काम करणार्या अभिनेत्याला ते सांगत- ‘हा छत्रपतींचा पोषाख अंगावर असताना तू कुणालाही, अगदी मलासुद्धा वाकून नमस्कार करायचा नाहीस. तुला कोणी नमस्कार केला तर फक्त गळ्यातल्या माळेला हात लावून ‘जगदंब जगदंब’ एवढंच म्हणायचं. आता तू छत्रपती आहेस!’ बाबांची शिवभक्ती आणि निष्ठा एवढी जाज्वल्य होती की चित्रपटातला छत्रपतींचा पोषाखही त्यांना वंदनीय वाटायचा. त्याक्षणी ते शिवमय असायचे.
भालजींच्या चित्रपटात संगीताला फारसं महत्त्व कधीच नसे. भालजी स्वत: गीतलेखक. संगीताची त्यांना उत्तम जाण. पूर्वी नाटकात अभिनयाबरोबर गाणीही त्यांनी म्हटली होती. काही दिवस अल्लादियाखांची शागिर्दीही केलेली. तिथे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले असे असतांनासुद्धा भालजींच्या चित्रपटात संगीताला महत्त्व नव्हतं. याचं कारण भालजींचा चित्रपट निर्मितीमागचा हेतू अगदी स्पष्ट होता.
स्वातंत्र्यपूर्वी काढलेल्या चित्रपटांच्या निर्मितीचा उद्देश म्हणजे पारतंत्र्यात असलेल्या मातृभूमीतील जनतेची अस्मिता जागृत करून मरगळलेल्या महाराष्ट्राला परकीय सत्तेविरूद्ध झुंजण्याची स्फूर्ती देणं तर स्वातंत्र्यानंतरही स्वराज्य मिळाले तरी सुराज्य करण्यासाठी बळकट मनगट आणि उरात अभंग आवेश असणारी नवी पिढी निर्माण व्हावी या हेतूने त्यांनी चित्रपटनिर्मिती सुरूच ठेवली.
याविशिष्ट हेतूने चित्रपट काढण्याचा प्रक्रियेतूनच भालजींचं खास वैशिष्ठ्य असलेल्या ‘खटकेबाज संवादा’चा जन्म झाला. त्यांच्या अनेक चित्रपटातील खटकेबाज संवाद त्यांच्या चमकदार लेखणीची चुणूक दाखवतात. त्यांचे संवाद तालासुरात असतात. त्यांना वजन असतं. चित्रपटातील कित्येक प्रसंगांना तर भालजींच्या संवादामुळे रंगत आली आहे, उठाव आला आहे. प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे धारदार संवाद हे त्यांच्या चित्रपटांचं प्रमुख आकर्षण असायचं. समाजातील दुबळेपणा, लाचारी पराधीनता, लाळघोटेपणा, स्वकीयांचा घात, फंदफितुरी या अशा कित्येक दुर्गुणांवर आपल्या कडक संवादातून फटकार्यादसारखे कोरडे त्यांनी ओढले आहेत. याबरोबरच सुविचारांची पखरणही त्यांच्या संवादात असे. चित्रपट मग तो ऐतिहासिक असो, ग्रामीण असो वा सामाजिक असो... भालजींनी त्यांच्या संवादातून काही ना काही संदेश प्रेक्षकांना दिलाच आहे!
बाबांची शिष्यपरंपरा फार मोठी आहे. शाहू मोडकला तर त्यांनी ‘श्यामसुंदर’मधून बालनट म्हणून आणले. त्याचप्रमाणे मा. विठ्ठल, ललिता पवार, चंद्रकांत, सूर्यकांत, जयशंकर दानवे, सुलोचना, राजकपूर ही बाबांचीच शिष्यमंडळी. बाबांच्या तालमीत अभिनयाबरोबरच शिस्त व स्वाभिमानाचीही दीक्षा मिळत असे. कारण बाबांच्या स्वभावाचा तो मानबिंदू होता. गांधी वधोत्तर झालेल्या जाळपोळीच्या वणव्यात बाबांचा जयप्रभा स्टुडिओ लोकांच्या रागामुळे आगीत जळून खाक झाला. कारण काय? तर गांधींचा मारेकरी हिंदुमहासभेचा कार्यकर्ता आणि बाबा हे हिंदूमहासभेचे कट्टर अनुयायी. बाबा त्यावेळी पन्हाळ्याला होते. जयप्रभा स्टुडिओ जळाल्याचं दु:ख भालजींना वेगळ्याच कारणासाठी झालं. एकतर साडेतीनशे कामगारांवर बेकारीची कुर्हायड कोसळली आणि दुसरं म्हणजे भालजीचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज.
महाराजांवर भारताबाहेरच्या विशेषत: पोर्तुगीत फ्रेंच व इटालियन इतिहास संशोधकांनी जे काही लिहिलंय त्यांची इत्यंभूत माहिती राजाराम कॉलेजचे प्राचार्य, इतिहासाचे प्राध्यापक व अभ्यासक व भालजींचे मित्र डॉ. बाळकृष्ण यांनी परिश्रमपूर्वक व गोळा केली होती. त्यावर संशोध करून प्रबंध लिहिला होता. भालजी तो प्रसिद्धही करणार होते. तो प्रबंध त्या आगीत जळून भस्मसात झाला. या गोष्टींचे भालजींना अतोनात दु:ख झालं.
जळितात नष्ट झालेला ‘मीठभाकर’ त्यांनी पुन्हा नव्याने काढला. त्यानंतर शिलंगणाचे सोने (१९४९), मी दारू सोडली (१९५०), शिवा रामोशी (१९५१), छत्रपती शिवाजी (१९५२), मायबहिणी (१९५२), माझी जमीन (१९५३), महाराणी येसूबाई (१९५४), येरे माझ्या मागल्या (१९५५), पावनखिंड (१९५६), नायकिणीचा सज्जा (१९५७), आकाशगंगा (१९६५), तांबडी माती (१९६९), गनिमी कावा (१९८१), शाबास सूनबाई (१९८६) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करून दिग्दर्शनही केले. १९८६ साली ‘शाबास सूनबाई’ हा चित्रपट करताना त्यांचं वय ८६ होतं. दृष्टी जवळजवळ अधू होती. परंतु कलाकारांचे संवाद ऐकून ते दिग्दर्शन करीत. त्या वयातही ते सेटवर सतत उभे राहात. चित्रपटसृष्टीत आयुष्य घालवून बाबा सन्मान वा सत्कार स्वीकारण्यापासून दूर राहिले. उतारवयात मात्र त्यांच्यावर अनेक पुरस्कारांची खैरात झाली.
चतुरंग प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार, कोल्हापूरचा हुकुमतपनाह पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. पण भालजी पडले विरक्त कर्मयोगी. त्यांनी या सर्व पुरस्कारांची रोख रक्कम त्या त्या संस्थेला किंवा गरजू व योग्य व्यक्तीला देऊन टाकली. भालजी ही व्यक्ती मान-सन्मानाच्या पलिकडची होती. १९९२ साली त्यांना चित्रपटातील व्यक्तीला देण्यात येणारा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. पण वयोवृद्ध भालजींकरिता हा नियम बाजूला ठेवून राष्ट्रपतींच्या प्रतिनिधीने कोल्हापूरात येऊन हा पुरस्कार दिला.
संस्कार, ध्येय, समाजप्रबोधन यापासून आजची चित्रपटसृष्टी फार दूर गेली आहे. मात्र आपल्या चित्रपटातून समाजाच्या अन्त:करणात देव, देश आणि धर्म याची ज्योत सदैव तेवत ठेवणारे भालजी पेंढारकर बदलत्या काळाच्या ओघात निश्चि तच वंदनीय आहेत! मा.भालजी पेंढारकरांचे २६ नोव्हेंबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ - मधू पोतदार
अजित लक्ष्मण वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी मुबंईत झाला. मध्यमवर्गीय कुटूंबात असते तसे वातावरण त्यांच्या घरचे वातावरण होते. दादरला शिवाजी पार्कजवळ ते रहात असत. अजित वाडेकर यांचा स्वभाव लहानपणी थोडा अबोल आणि गंभीर होता. ते सदोदित वाचनात गर्क असायचे . जेम्स हॅडली चेस त्यांचा आवडता लेखक होता . त्यांना क्रिकेटमध्ये फारशी गोडी नव्हती . त्यांचे गणित चांगले होते , त्यांना इंजिनीअरिंगला जायचे होते. एस. एस. सी . ची परिक्षा ते उत्तमपणे ७९ टक्क्यांनी पास झाले होते. उत्तम गुण कां म्हणतो मी , कारण त्यावेळी गुणांची खिरापत वाटत नव्हते. त्यांचे शिक्षण दादरच्या बॉईज हायस्कूलमध्ये झाले. एस. एस. सी . नंतर त्यांनी एल्फीस्टन महाविद्यालयात शास्त्र विभागात प्रवेश घेतला , आणि इथेच अजित वाडेकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा प्रारंभ अचानक झाला. एक आंतर महाविद्यालयीन सामना होता त्यावेळी एक खेळाडू कमी पडला अजित वाडेकर त्यावेळी पहिल्या वर्गात शिकत होते. त्यांना खेळायचा आग्रह केला आणि ते तो सामना खेळले परंतु खेळण्यापेक्षा जो काही अडीच-तीन रुपयाचा अलाउन्सवर त्यांचा डोळा होता. त्यावेळी अडीच ते तीन रुपये उपहारासाठी देण्यात येत .
दुसऱ्या वर्षी अजित वाडेकर यांनी कॉलेज बदलले आणि घराजवळ असलेल्या रुईया कॉलेजमध्ये जाऊ लागले , पुढे त्यांची कॉलेजच्या संघात आणि विद्यापीठाच्या संघात निवड झाली. विशेष महत्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी पहिल्याच आंतर विद्यापीठ सामन्यात दिल्ली विद्यापीठाविरुद्ध ३२३ धावा केल्या. हा त्यांचा विक्रमच होता पुढें हा विक्रम १९७० साली सुनिल गावस्कर यांनी मोडला. हा विक्रम केला त्याच वर्षी अजित वाडेकर यांनी शिवाजी पार्क जिमखान्यात आपले नाव नोंदवले आणि ते रणजी ट्रॉफी सामन्यात ते मुबई संघाकडून मद्रास संघाविरुद्ध खेळले .त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला १९५८-५९ साली सुरवात केली. त्यांची कसोटी सामन्यासाठी निवड होत नव्हती. माधव मंत्री आणि निवड समितीने त्यांना संधी द्यायचे ठरवले तेव्हा अजित वाडेकर यांनी त्या संधीचा भरपूर फायदा घेतला. पतौडीच्या जागी ते कप्तान झाले कारण अनेक वर्षे ते मुबईकडून कप्तानी करत होते. त्यावेळी भारतीय संघात सुनील गावस्कर , गुंडाप्पा विश्वनाथ , फारूख इंजिनीअर , सलीम दुराणी आणि जोडीला गोलनंदाजीतले ' त्रिदेव ' म्हणजे बिशनसिंग बेदी , प्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर हे होते आणि जोडीला वेंकट राघवन हें होते. १९७१-७२ चे वेस्ट इंडीज आणि इंग्लंड विरुद्ध आपण सिरीज पहिल्यांदा जिंकली. त्याचे शिल्पकार अजित वाडेकर आणि संपूर्ण संघ होता.
अजित वाडेकर खऱ्या अर्थाने पहिले ' कॅप्टन कूल ' म्हणावे लागतील आपण आता धोनीला कॅप्टन कूल म्हणतो ते खरे नाही . पाहिले कॅप्टन कूल अजित वाडेकरच . अत्यंत अभ्यासू वृत्ती आणि अचूक निर्णयक्षमता त्यांनी दाखवली ती वेस्ट इंडिजच्या पहिल्या सामन्यात. पावसामुळे पहिला दिवस फुकट गेला होता . त्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. सामना चार दिवसाचा झाला होता. भारतीय संघाने १५८.४ षटकात ३८७ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजने ९३.५ षटकात २१७ धावा केल्या . म्हणजे १७० धावांचा लीड होता. तेव्हा अजित वाडेकर यांच्या लक्षात आले की सामना जर पाच दिवसाचा असेल तर फॉलोऑन साठी २०० धावा कमी लागतात . इथे तर १७० धावा होत्या परंतु चार दिवसाच्या सामन्यात नियमाप्रमाणे १५० धावा कमी असल्या तर फॉलोऑन देता येतो . हे त्यांच्या लक्षात आले . सर गॅरी सोबर्सला ' फॉलोऑन ' सांगण्यासाठी अजित वाडेकरांनी सुनील गावसकरांना सांगितले . सुनील गावसकर सांगतात मी त्यांच्या ड्रेसिंग रूममधला दरवाजा नॉक केला , आतमध्ये हसण्याचे आवाज येत होते जरा वेळाने दार उघडले आणि सुनील गावस्करानी सोबर्सला सांगितले तुम्हाला फॉलोऑन दिलेला आहे , कुणालाही हा नियम माहीत नव्हता . सगळीकडे शांतता पसरली. सुनील गावस्कर म्हणाले मी तांबडतोब निरोप देऊन तिथून सटकलो. त्यावेळी ' हे गॅरी , यू हॅव टू फॉलोऑन ' हे वाक्य फेमस झाले होते. तो सामना अनिर्णयीत सुटला . पुढला दुसरा सामना ओव्हलवर होता इथे मात्र वेस्ट इंडिजचा संघ सावधपणे खेळू लागला आणि इथेच घोळ झाला . वेस्ट इंडिजचा संघ २१४ धावात कोसळला. पुढील तीनही सामने अनिर्णयीत झाले आणि भारताने १-० ने ती मालिका जिंकली. इंग्लंडच्या विजयाबद्दल तर सर्वाना माहीत आहे तो ऐतिहासिक विजय ठरला . भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने . परंतु १९७४ साली सपाटून मार खावा लागला. शेवटी क्रिकेट हा ' वर्तमानकाळातील ' खेळ आहे . पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. तिथे सगळ्या फॅक्टस , निर्णय स्वीकारावे लागतात. अजित वाडेकर यांनी ३७ कसोटी सामन्यात २,११३ धावा केल्या त्यात त्यांचे एक शतक आणि १४ अर्धशतके होती , तर त्यांचे सर्वोच धावसंख्या हॊती १४३ . तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २३७ सामन्यात १५, ३८० धावा केल्या त्यात ३६ शतके आणि ८४ अर्धशतके होती, त्यात त्यांचे सर्वीच धावसंख्या होती ३२३ . त्यांनी कसोटी सामन्यात ४६ झेल पडले तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २७१ झेल पकडले . अजित वाडेकर अत्यंत चपळतेने क्षेत्ररक्षण करत . त्यांनी असे काही अप्रतिम झेल पकडले आहेत की त्यावेळी सामना भारताच्या बाजूला झुकला आहे. त्यांनी फक्त २ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत . त्यात त्यांची सर्वीच धावसंख्या होती नाबाद ६७. अजित वाडेकर १९९० साली भारतीय संघाचे मॅनेजर होते. त्याचप्रमाणे ते मुंबईमधील बँकेत मोठ्या हुद्यावर काम करत होते. '
अजित वाडेकर यांना भारत सरकारने ' अर्जुन अवॉर्ड ' आणि ' पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्याचप्रमणे सी. के. नायडू लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला .
15 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले.
सतीश चाफेकर
बुलो सी रानी यांचे पूर्ण नाव बुलो चंदीराम रामचंदानी. बुलो. सी. रानी यांच्या नावाची हकीगतही रंजक आहे. त्यांचा जन्म ६ मे १९२० रोजी हैद्राबाद पाकिस्तान येथे झाला.सिंधी समाजात जन्माला आलेल्या बुलो चंदी रमानी यांनी आडनावाचं इंग्रजी आद्याक्षर ‘सी’ वेगळं काढलं व ‘रमानी’चं ‘रानी’ करून टाकलं. त्यामुळं अनेकांना हा पुरुष संगीतकार की स्त्री संगीतकार असा प्रश्न पडे. मा.बुलो सी रानी यांचे वडीलही संगीतकार होते. ४० ते ६० च्या दशकात त्यांनी संगीत दिले. बुलो सी रानी यांनी १९३९ रणजीत मोविटोन पासून आपली सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांना असीस्टट म्हणून मदत करायला सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांच्या तानसेन, चांदनी, सुखदुख या चित्रपटाना असीस्टट म्हणून काम केले. त्या काळी बुलो. सी. रानी अमीरबाई कर्नाटकी यांच्या आवाजाने इतके प्रभावित होते की आपल्या पुढील चित्रपटांसाठी इतर कोठल्या गायिकेचा विचार करण्यासाठी तयार नव्हते. त्यांच्या १९४४ साली आलेल्या ‘कारवाँ’ चित्रपटातील धिम्या लयीतील ‘सूनी पडी है प्यार की दुनिया तेरे बगैर जली हुई है दिल में तमन्ना, तेरे बगैर’ या गाण्यातील अमीरबाईचा एकेक स्वर मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. तसेच १९४५ सालच्या ‘चांद चकोरी’ मध्ये तर त्यांनी सर्वच्या सर्व गाणी अमीरबाईच्या आवाजात स्वरबद्ध केली होती. बुलो सी रानी यांचे २४ मे १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti