विजय कुवळेकर यांनी ‘सातच्या आत घरात’सारख्या काही चित्रपटांचं लेखन केलं आहे. तसेच ‘सरकारनामा’ या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं होतं. तसंच, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका मालिकेत त्यांनी सावरकरांची भूमिकाही केली होती.
‘किंगडम ऑफ ड्रीम्स’ या थिएटरच्या एका नाटकात त्याला मुख्य भूमिका मिळाली आणि तिचं त्याच्या पहिल्या व्यावसाईक कामाची सुरुवात होती. नॉट इन फोकस, बिनकामाचे संवाद, ड्रीम्स ऑफ तालीम आणि अमर फोटो स्टुडीओ ही त्याने केलेली नाटके.
मराठीतून उच्च शास्त्रीय विषय शिकवण्याची त्यांना मोठी तळमळ होती. त्यांना कालाजंत्रीकार म्हणून ओळखत असत. मोडक यांनी रसायनशास्त्राबरोबरच पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणिशास्त्र अशा शास्त्रीय विषयांवरील पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली.
२७ जुलै १९७३ साली 'अभिमान' चित्रपट प्रदर्शीत झाला त्याला २७ जुलै २०१७ रोजी ४४ वर्षे झाली.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'अभिमान'. सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिंदू, असरानी यांसारख्या कलाकारांनीही उल्लेखनीय व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.
दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील लक्षणीय चित्रपटांमध्ये अनेक सिनेरसिकांनी 'अभिमान' या चित्रपटालाही पसंती दिली होती. 'अभिमान' चित्रपटाच्या लोकप्रियतेचे आणखी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत. एस. डी. बर्मन यांच्या संगीताने परिपूर्ण अशा या चित्रपटातील गाण्यांनाही सिने व संगीत रसिकांनी फार पसंत केले होते.
चित्रपटाचे कथानकच मुळात संगीतावर आधारलेले असल्यामुळे आजही 'अभिमान'ची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेली ही सुमधुर गीते लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार या नामवंत आणि पट्टीच्या गायकांनी गायली होती.
'तेरे मेरे मिलन की ये रैना', 'पिया बिना' या गाण्यांसह चित्रपटातील इतर सर्वच गीते आणि अमिताभ व जया यांच्या जोडीने साकारलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. 'अभिमान' मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री जया बच्चन यांना 'फिल्मफेअर'तर्फे 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अभिमान चित्रपटाची गाणी
https://www.dailymotion.com/video/x3gknt8
१९२६ साला पासून या स्टॅन लॉरेल व हार्डी जोडीनी खरी धमाल सुरू केली. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता.
तनुजा यांचा जन्म एका चित्रपटसृष्टीशी निगडीत कुटुंबात झाला. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी झाला. बालपणी तनुजा यांना आई आणि आजीचे इतके प्रेम मिळाले, की ५० च्या दशकात त्यांना टॉम बॉय पुरस्कार मिळाला. त्या पार्टीमध्ये ग्लॅमरस ड्रेस परिधान करायच्या, खुलेआम सिगारेट आणि दारू पित होत्या. त्या काळातील ट्रॅडिशन अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या तनुजा बिनधास्त आयुष्य जगत. त्याचा परिणाम अनेकदा त्याच्या सिनेमांवरसुध्दा दिसत होता. तनुजा यांना आजही ‘बहारें फिर आएंगी’, ‘ज्वेल थीफ’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘अनुभव’ या सिनेमांसाठी ओळखले जाते. हिंदीव्यतिरिक्त त्यांनी मराठी, बंगाली आणि गुजराती सिनेमांमध्येही आपले टॅलेंट दाखवले आहे. समर्थ कुटुंबात जन्मलेल्या तनुजा यांचे पती दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर होते. तर आई शोभना समर्थ या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तनुजाच्या बालपणी त्यांचे आईवडील विभक्त झाले होते. तनुजा यांना त्यांची आई शोभना यांनी सिनेसृष्टीत लाँच केले होते. तनुजा यांच्या पहिल्या सिनेमाची निर्मिती शोभना समर्थ यांनी केली होती. तनुजा यांनी १९५० मध्ये 'हमारी बेटी' या सिनेमाद्वारे बालकलाकाराच्या रुपात फिल्मी करिअरला सुरुवात केली. मुख्य अभिनेत्री म्हणून १९६० मध्ये रिलीज झालेला 'छबीली' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. मात्र १९६१ मध्ये रिलीज झालेल्या 'हमारी याद आएगी' या सिनेमाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली.
स्वतःला यशस्वी अभिनेत्री म्हणून सिद्ध केल्यानंतर सुद्धा तनुजा यांची तुलना नेहमी बहीण नूतनसोबत होत राहिली. करिअरच्या काही वर्षांत वहिनी आणि सहायक अभिनेत्रींच्या भूमिका केल्यामुळे तनुजा यांचे फिल्मी करिअर हवे तसे यशस्वी होऊ शकले नाही. तनुजा आणि शोमू मुखर्जी (दिग्दर्शक-निर्माते) यांची पहिली भेट ‘एक बार मुस्कुरा दो’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. एका वर्षांच्या डेटिंगनंतर १९७३ मध्ये दोघांनी लग्न केले. मुख्य अभिनेत्री म्हणून यश न मिळाल्याने तनुजा यांनी पुढे सेकंड लीड भूमिका करण्यास सुरुवात केली. राज कपूर यांच्या 'प्रेम रोग'मध्ये त्या अशाच भूमिकेत होत्या. बलराज साहनी यांचा मुलगा परीक्षित साहनीच्या पहिल्या 'पवित्र पापी' सिनेमात तनुजा यांनी अविस्मरणीय अभिनय केला. त्यानंतर त्या, भाभी, मावशी आणि आई भूमिका साकारू लागल्या. त्यांनी काही मालिकांमध्येसुध्दा काम केले. 'एन ऑगस्ट रेक्विम' नावाच्या इंग्रजी सिनेमातसुध्दा तनुजा झळकल्या होत्या. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'मध्ये त्या दिसल्या होत्या. या सिनेमात काजोलचा पती आणि तनुजा यांचा जावई अजय देवगण मुख्य भूमिकेत होता.
तनुजा यांनी छबीली, बहारें फिर आएंगी, ज्वेल थीफ, हाथी मेरे साथी, मेरे जीवन साथी, अमीर-गरीब, याराना, सोनी महिवाल, 'आज और कल', ‘बहारे फिर भी आएगी’, ‘दो चोर’, ‘दो दूनी चार’, ‘घराना’, ‘हाथी मेरे साथी’, ‘ज्वेल थीफ’, ‘जीयो और जीने दो’ आणि ‘प्रेमरोग’सारखे हिट सिनेमे केले आहेत. त्यांना दोन उत्कष्ट सहायक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१४ मध्ये त्यांना फिल्मफेअर कडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया
रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे. बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत १८ लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे. ‘मंगलाष्टकां’च्या नव्हे तर ‘राष्ट्रगीता’च्या सुरावटीवर व तालावर आपले शुभमंगल आटोपणारा हा अफलातून कार्यकर्ता.
मोठमोठ्या गवयांकडून रियाज घेतल्यामुळे पं. वालावलकर हार्मोनियम वादनात एवढे पारंगत झाले की श्रोत्यांना त्यांच्या हार्मोनियम वादनाची भुरळ पडायची. बेळगावच्या एका कार्यक्रमात त्यांनी कुमार गंधर्वांना ऐनवेळी साथ केली होती. तो कार्यक्रम एवढा रंगला की कार्यक्रम संपल्यावर खुद्द कुमारजींनी पं. वालावलकरांना ‘असे षड्ज-पंचम मला कुणी दिले नाहीत’ अशी पावती दिली होती.
भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे स्पेशल फायनान्सियल अँबेसेडर म्हणून अमेरिकेला पाठवले. पुढे त्यांना स्वतंत्र भारताचे तिसरे वित्तमंत्री म्ह्णून पद मिळाले ते त्यांनी जुलै १९५६ पर्यंत सांभाळले. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
रॉयल अॅकॅडमी ऑप ड्रॅमॅटिक आर्ट मधून रॉजर मूर यांनी अभिनयाचे रितसर शिक्षण घेतले होते. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. ब्रिटीश अभिनेते रॉजर मूर यांनी १९५४ साली आपल्या चित्रपट कारकिर्दीस सुरूवात केली. त्याआधी काही जाहिरांतीसाठी मॉडेलिंगचे काम केले. बॉण्डपटातील भूमिकेमुळे त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला होता.
रॉजर मूर यांनी सात वेळा जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारली होती. रॉजर मूर यांनी ‘दि स्पाय हू लव्ह मी’ आणि ‘लिव अॅण्ड लेट डाय’ या सुपरहिट बॉण्ड सिनेमांमध्ये काम केले होते. ते बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारे तिसरे अभिनेते आहेत. त्यांनी १९७३ पासून १९८५ पर्यंत जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारली होती. रॉजर यांनी जेम्स बॉँड चित्रपटाव्यतिरिक्त गुप्तहेर या संकल्पनेवर आधारित असलेल्या प्रसिद्धी टीव्ही सिरीज ‘दि सेंट’ यामध्येही काम केले.
या सिरीजमधील त्यांचा ‘सायमन टेंपलर’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यांनी अनेक चित्रपट व टिव्हीवरही भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत तसेच युनिसेफसाठी सदिच्छा दूत म्हणूनही १९९१ साली त्यांची निवड झाली होती.रॉजर मूर यांचे २३ मे २०१७ रोजी निधन झाले.
रॉजर मूर यांनी जेम्स बॉन्ड म्हणून भूमीका केलेले चित्रपट.
लिव्ह अॅ ण्ड लेट डाय, द मॅन वुईथ द गोल्डन गन, द स्पाय व्हू लव्हड मी, मूनरेकर, फॉर यूवर आईज ओन्ली, आक्टोपसी, अ व्ह्यू टु किल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti