(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सू-अभूतपूर्व लोकलढा

    म्यानमार (वर्मा) मधील असंख्य आबालवृद्धांची ही अजूनही 'शान' आहे.त्यामुळेच तेथील युवक-युवतींच्या टी शर्टवर तिचे छायाच असते, तसेच इतर जीवनोपयोगी वस्तूंवरही तिच्या छायाचित्रांचे दर्शन होते. कारण एकच म्यानमारमधील जुलमी राजवटीविरुद्ध तिने सुरू केलेला संघर्ष. या संघर्षाला तेथील जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला होता. या शांततापूर्ण

    चळवळीबद्दलच तिला १९११ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. त्या महिलेचे नाव आहे आगसान सु की.

    आधुनिक म्यानमारचे संस्थापक असलेले यू आंग सान यांची सू ही मुलगी. तिने तिच्या जन्मापासूनच घरात जणू राजकारणाचे धडे घेतले होते. तिचे वडील यु आंगसान यांचा म्यानमारच्या सत्तासंघर्षात बळी गेला. त्या वेळी सू अवघी दोन वर्षांची होती, त्यामुळे त्यांचा राजकारणाचा वारसा सांभाळण्याची जबाबदारी सू वर अल्पवयातच आली. सू ची आई बर्माची राजदूत म्हणून भारतात आली. त्यामुळे सू चे प्राथमिक शिक्षण दिल्लीतच झाले. तेथेच तिला महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीची माहिती झाली व त्यातूनच तिला प्रेरणा मिळून पुढे म्यानमारमध्ये गेल्यानंतर तिने प्रस्थापित लष्करी राजवटीविरुध्द जनलढा उभारला. तिच्या या लढ्याला युवक-युवतींचा प्रचंड पाठिंबा मिळाला. रोज प्रचंड मोर्चे, सत्याग्रह यामुळे तिने तेथील लष्करी राजवटीला जेरीस आणले. सूचे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्यात आला.आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबारात तीन हजार आंदोलनकर्ते मारले गेले, तरीदेखील सू डगमगली नाही. ती राजकारणात सक्रिय होत गेली. तिच्या आंदोलनाला यशही मिळत गेले. तिचे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारला तेथे निवडणुका घेणे भाग पडले.

    या निवडणुकीत सू च्या पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले. मात्र लष्करी राजवटीने तिच्या हातात सत्ता सुपूर्द न करता निवडणूक रद्द करुन तिला नजरकैदेत ठेवले.

    नजरकैदेत असतानाच तिला शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र नोबेल स्वीकारण्यासाठीही तिला कैदेतून सोडण्यात आले नाही. त्यामुळे तिच्या वतीने पती एरिस मुलाने या नोबेल पुरस्काराचा स्वीकार केला.

  • बंगाली मातीची जादू असलेले सलिल चौधरी

    ‘मधुमती’ची सगळीच गाणी परत परत, ऐकावीत अशी. ‘आजा रे परदेसी’, ‘सुहाना सफर’ आणि ‘दिल तडप तडप के..’ ‘घडी घडी मेरा दिल धडके’, रफी साहेबांचे दर्द-भरे ‘टूटे हुवे ख्वाबों ने’ आणि ‘दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछुवा..’ स्वतःच्या चालीबद्दल काटेकोर असणारा संगीतकार म्हणजे सलील चौधरी.

  • सामाजिक कार्याचा आदर्श

    कोकणातील एका छोट्या खेड्यात जन्म घेतलेल्या एका युवकाने पुण्यात येऊन स्त्री शिक्षणाचे जे महान कार्य केले ते सगळ्यांनाच आदर्शवत ठरावे असेच होते. धोंडे केशव कर्वे हे त्या तरुणाचे नाव. ज्या काळात स्त्री शिक्षण, विधवा विवाह यांसारख्या गोष्टींना समाजातून तीव्र विरोध होता, अशा काळात धोंडो केशव कर्वे यांनी एक व्रत म्हणून समाजसेवेचे हे कार्य आरंभिले. शारीरिक कष्टाची कसलीही तमा न बाळगता त्यांनी हे कार्य केले. ऊन असो, पाऊस असो की कडाक्याची थंडी असो ते कोठेही पायी जात आणि आपल्या कार्यासाठी मदत म्हणून कोणाकडूनही फक्त एक रुपयाची देणगी घेत असत. अर्थात त्याची रीतसर पावती घेऊनच. त्या काळी एक रुपयापेक्षा जास्त देणगी देणारे लोक होते. परंतु अण्णासाहेब कर्वे यांचा देणगी म्हणा एक रुपयाच घेण्याचा आग्रह असे. एकदा ते असेच गोरे नावाच्या सरकारी वकिलाकडे भल्या सकाळीच गेले. त्यांच्यामुळे अर्थातच गोरेसाहेबांची झोप मोडली होती. परंतु तरीही त्यांनी अण्णांचे स्वागत केले. अण्णांनी जेव्हा एक रुपया देणगीचा प्रस्ताव मांडला, तेव्हा ते म्हणाले,''एक रुपया कशाला? मी तुमच्या कार्याला एकरकमीच देणगी देतो. '' त्यावर अण्णासाहेब कर्वे त्यांना नम्रतेने म्हणाले, की ' 'गोरेसाहेब मला माझ्या कार्यात प्रत्येकाचा सहभाग करून घ्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडून अथवा एका कुटुंबाकडून फक्त एकच रुपया देणगी घेण्याचे मी ठरविले आहे. त्यासाठी माझी कितीही पायपीट झाली तरी चालेल मी ती आनंदाने करीन. '' गोरे साहेबांना त्यांच्या या प्रांजळ निवेदनाचे खूप कौतुक वाटले. त्यांनी त्यांना एक रुपयाची देणगी दिली. त्यासरशी अण्णासाहेब दुसऱ्या घरी जायला निघाले. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी अतिशय प्रतिकूल काळात लावलेल्या स्त्री-शिक्षणाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.

  • जर्मन तंत्रज्ञ रुडॉल्फ डिझेल

    पाच वर्षांच्या अखंडित प्रयोगानंतर १८९७ मध्ये संपीडित हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरीत्या तयार केले. हे दणकट इंजिन २५ अश्वशक्तीचे, उभ्या सिलडरचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंत:क्षेपण होणारे, मंदगतीचे पण उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे होते. रुडॉल्फ डिझेल हे १९७८ सालचे ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेम’चे मरणोत्तर मानकरी ठरले होते.

  • ब्रिटीश वैद्यक जेम्स पार्किन्सन

    १८१७ साली ब्रिटीश वैद्यक जेम्स पार्किन्सन यांनी प्रथम या आजाराची स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली ‘पार्किन्सन रोग’ ह्या या आजाराचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किन्सन याच्या नावाने हा आजार ओळखला जातो.

  • व्ही पी बेडेकर अँन्ड सन्सचे अतुल बेडेकर

    व्ही पी बेडेकर अँन्ड सन्सचे डायरेक्टर अतुल बेडेकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९६७ रोजी झाला. अतुल बेडेकर रा. स्व. संघाच्या गिरगाव नगराचे संघचालक होते. तसेच जनता सहकारी बँक पुणेचे संचालकही होते. इतरही अनेक सामाजिक संस्थांमधे मोठ्या प्रमाणात ते सक्रीय सहभागी होते.

  • माजी सरन्यायाधीश पी एन भगवती

    नागरिकांना शिक्षेविरोधात दाद मागण्याचा अधिकार असल्याचा निवाडा उच्च न्यायालयांनी दिला असताना व सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्याच निकालाची अपेक्षा असताना भगवती यांनी नागरिकांच्या या अधिकाराविरोधात निकाल दिला. हा निकाल तेव्हा वादग्रस्त ठरला होता.

  • पर्यावरण अभ्यासक डॉ. विश्वंभर चौधरी

    लवासा विरोधी आंदोलन, पश्चिम घाट संवर्धन, भूसंपादन कायदा, शाश्वत विकास, लोकाधिकाराच्या चळवळी ते अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आंदोलनात तसेच आम आदमी पार्टीच्या स्थापनेत सक्रिय सहभागी राहिलेले आहेत.

  • शिक्षणतज्ज्ञ विष्णू विनायक बोकील उर्फ वि वि. बोकील

    १९४१-४२ च्या सुमारास ‘मंगळागौरीच्या रात्री’ ही बोकीलांची कथा विनायकांच्या वाचनात आली आणि त्यांनी बोकीलांना तत्काळ बोलावून त्या कथेचे संवादलेखन करून घेतले. चित्रपट होता ‘पहिली मंगळागौर’.मुंबईच्या सेंट्रल सिनेमात ६ मार्च १९४३ रोजी हा चित्रपट झळकला.

  • डेलचे संस्थापक अध्यक्ष मायकल डेल

    ४५ व्या वर्षी ते जगातले ४४ वे श्रीमंत व्यक्ती बनले. टेक्सासमधील त्यांचा बंगला हा जगातील १५ वा आलिशान बंगला ठरला.