नोबेल पुरस्कार हा जागतिक पातळीवरचा एक सर्वोच्च सन्मान आहे. हा सन्मान दरवर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता अशा विविध क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. गणित विषयासाठी मात्र हा नोबेल पुरस्कार नाही.
ललिता फडके या पूर्वाश्रमीच्या त्या ललिता देऊळगावकर. ललितापंचमीच्या दिवशीचा त्यांचा जन्म. वडील कापडाचे व्यापारी. त्यांचे दोन काका उत्तम गाणारे होते आणि आजीचाही आवाज गोड, त्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने ललिता गाणं शिकल्या. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, हा त्या काळातल्या सर्वसाधारण मंडळींचा दृष्टिकोन. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा ‘हिला तुम्ही सिनेमात का पाठवत नाही ?’ असा प्रश्न केला. देऊळकर खरं तर या गोष्टीला राजी नव्हते. मात्र त्यांनी अखेर ती तयारी दर्शविली. ललिताबाईंनी गायनाचे धडे दत्तोबा तायडे आणि पुरुषोत्तम वालावलकर यांच्याकडे गिरवले. शास्त्रीय संगीतही त्या उत्तम गायच्या.
चट्टोपाध्याय यांच्याच ओळखीने ललिताबाईंना ‘बॉम्बे टॉकीज’या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळाला. ‘बॉम्बे टॉकीज’ची आघाडीची नायिका देविकाराणी सोबत ‘दुर्गा’ मध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली. याच संस्थेच्या ‘अंगूठी’मध्ये त्या दोन गाणीही गायल्या. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’ मध्ये होत्या.
१९४० च्या दशकाच्या अखेरीस खर्या अर्थानं पार्श्वगायनाचं युग आलं. याच काळात सी. रामचंद्र यांनी ललिताबाईंच्या आवाजाचा कल्पकतेनं वापर करुन घेतला. त्यांचं संगीत असलेल्या “साजन” मधलं ‘हमको तुम्हारा ही आसरा’ हे ललिताबाईंनी मोहम्मद रफीसोबत गायलेलं गाणं चांगलंच गाजलं. पण कहर केला तो सी. रामचंद्र यांच्याच “नदिया के पार” मधल्या ‘मोरे राजा हो… ले चल नदिया के पार’ या ललिता आणि रफी यांच्या युगुलगीतानं ! बडे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनीही ‘शहीद’ साठी ललिताबाईंकडून दोन गाणी गाऊन घेतली. त्यातलं ‘कदम उठाकर रुक नहीं सकता’ हे समरगीत आजही आठवणीत असणार.
याच काळात मराठीतले उगवते संगीतकार मा.सुधीर फडके यांच्यासाठीही त्या गायल्या आणि पुढे त्यांच्याशी विवाहबध्द झाल्या. २९ मे १९४९ रोजी झालेल्या त्या विवाह सोहळ्यात खुद्द मोहम्मद रफीनं मंगलाष्टकं म्हटली होती, हाही एक दुर्लभ योग ! मराठीतही त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. जशास तसे, मायबहिणी, उमज पडेल तर, वंशाचा दिवा, जन्माची गाठ, माझं घर माझी माणसं, रानपाखरं, चिमण्यांची शाळा, प्रतापगड इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं.
आशा भोसले यांना सर्वप्रथम ललिताबाईंना पारखलं होते. त्यांनीच बाबूजींकडे आशाबाईंचे नाव सुचवले होते.
पुणे आकाशवाणीवर सर्वप्रथम सादर झालेल्या ‘गीतरामायण’ मधली गीतरामायणातील कौसल्येची सर्व गाणी ललिताबाईंनी गायली आहेत. सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि राजकीय पैलूही होते. त्यातील सर्व टप्प्यांवर बाबूजींना खंबीर साथ मिळाली ती ललिताबाईंची, म्हणूनच ‘गदिमा प्रतिष्ठान’तर्फे काही वर्षांपूर्वी ललिताबाईंना लाभलेला ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा मान राखणाराच ठरला. ‘ललिताने घराकडे पूर्णपणे लक्ष दिल्यामुळेच मी एवढे यश मिळवू शकलो’, असं अभिमानानं सुधीर फडके सांगत.ललीता फडके यांचे निधन २५ मे २०१० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट /मराठी सृष्टी.कॉम
ललीता फडके यांची काही गाणी :
मोठं मोठं डोळं तुझं (जशास तसे)
रंगू बाजारला जाते हो, जाऊद्या (वंशाचा दिवा)
पाव्हणं एवढं ऐका (वंशाचा दिवा)
नखानखांवर रंग भरा (मायाबाजार)
मी तर प्रेम दिवाणी (सुवासिनी)
लंगडा गं बाई लंगडा नंदाचा कान्हा लंगडा (सौभाग्य)
मिटून घेतले नेत्र तरी (उमज पडेल तर)
तिन्ही सांज होता तुझी याद येते (चिमण्यांची शाळा)
मी आज पाहिला बाई (चिमण्यांची शाळा)
रंगूबाई, गंगूबाई हात जरा चालू द्या (चिमण्यांची शाळा)
अळीमिळी गोम चिळी (माय बहिणी)
उगा का काळीज माझे उले पाहूनि वेलीवरची फुले (गीत रामायण)
सावळा गं रामचंद (गीत रामायण)
नको रे जाऊ रामराया (गीत रामायण)
भारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. ‘दीवार’ सिनेमामधील ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे.
रंगभूमी असो किंवा समांतर सिनेमा, टीव्ही, बॉलिवूड, हॉलिवूडचा पडदा; भूमिका दहा मिनिटांची असो किंवा नायकाची; ती अजरामर करण्याची ताकद ओम पुरी यांच्याकडे होती. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाना मधील अंबाला येथे झाला. चेहरा देखणा नव्हता, पण दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज, या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला होता. विशेष म्हणजे, या झंझावाती प्रवासाची सुरुवात १९७६ मध्ये एका मराठी सिनेमापासून - 'घाशीराम कोतवाल'पासून झाली होती. या सिनेमात घाशीरामची मध्यवर्ती भूमिका साकारल्यानंतर, अगदी गेल्या वर्षीपर्यंत त्यांची घोडदौड सुरू होती.
पंजाबमधील पटियाला येथून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले होते. नंतर १९७६ मध्ये त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एका स्टुडिओमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी 'मजमा' या खासगी नाट्यमंडळाची स्थापना केली. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या आक्रोश चित्रपटातून पुरी यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.
'घाशीराम कोतवाल' या मराठी चित्रपटातील घाशीराम, 'आक्रोश'मधील लहान्या भिकू, 'अर्धसत्य'मधील अनंत वेलणकर, 'घायल'मधील एसीपी जॉय डिसोझा, 'नरसिंह'मधील सूरज नारायण सिंह बापजी, 'माचिस'मधील सनातन, 'चाची ४२०'मधील बनवारीलाल, 'हेराफेरी'मधील खडकसिंग, 'रंग दे बसंती'मधील अमानुल्ला खान, 'दबंग'मधील पोलीस इन्स्पेक्टर या सगळ्या बहुरंगी-बहुढंगी, नायकी-खलनायकी-विनोदी भूमिका अत्यंत ताकदीनं साकारणारे ओम पुरी यांनी 'आरोहण' आणि 'अर्धसत्य'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल १९९० मध्ये त्यांना पद्मश्रीनंही सन्मानित करण्यात आलं होते. फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. ब्रिटिश सिनेसृष्टीतील कसदार कामगिरीबद्दल त्यांना मानद 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' ही पदवीही प्रदान करण्यात आली होती. ब्रिटिश विनोदी चित्रपट 'ईस्ट इज ईस्ट'मधील भूमिकेसाठी त्यांना बाफ्टा पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. रिचर्ड अॅटनबरो यांच्या गांधीमध्ये ओम पुरी हे पाहुणे कलाकार होते. सन ऑफ फॅनेटिक, सिटी ऑफ जॉय, वुल्फ या सिनेमांमधील त्यांच्या भूमिकांचंही प्रचंड कौतुक झालं होते.
ओम पुरी यांच्या विनोदी अभिनेत्याचं दर्शन घडलं होतं ते, काक्काजी कहीं आणि मिस्टर योगी या टीव्ही मालिकांमधून. त्यानंतर गोविंद निहलानी यांच्या 'तमस'मधील भूमिकेनं त्यांना दिग्गजांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. दूरदर्शनवरील 'भारत एक खोज' या कार्यक्रमातील त्यांचा आवाज आजही अनेकांच्या कानात तसाच कायम आहे. 'द जंगल बुक' या चित्रपटातील 'बघीरा'ला ओम पुरी यांनीच आवाज दिला होता. ओम पुरी यांचे निधन ६ जानेवारी २०१७ झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला.
प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ३ मार्च १९६८ रोजी झाला.
भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.
केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर प्रचंड प्रेम असलेल्या महादेवन यांनी बालपणीच ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या "राम का गुनगान गाईयेगा' या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली. संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या "मोरया मोरया' या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत.
१९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पण पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोनशेच्यावर चित्रपटात गीत गायन करणाऱ्या शंकर महादेवन यांना केरळ, तमिळनाडू, आंध्र सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाबद्दल चार फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचा आशा भोसले जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान केला आहे. शंकर महादेवन हे नवी मुंबई महानगर पालिकेचे स्वच्छता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून अभियानात सहभागी झाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू, राजर्षी शाहू, चौथे शाहू अशा नावाने प्रसिद्ध होते. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केलं. बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली.
आसाम-ईशान्येचा अशांत परिसर, वहीतल्या नोंदी, करुणेचा कलाम, अलकनंदा, हाकुमी, तांदळा, वर्तमान, कोहम्, एकशे अकरावी दुरुस्ती, राजधर्म, सारी माझीच माणसे, मन्वंतर समूहाकडून स्वतःकडे, सडेतोड, सेंटर पेज तारांगण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
सारिका यांचे पूर्ण नाव सारिका ठाकूर. अभिनेत्री सारिका यांचा जन्म ५ डिसेंबर १९६० रोजी झाला. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.
अभिनेत्री सारिका ने गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका या जोडीच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताने चार चाँद लावले. यातील गीत गाता चल ओ साथी, शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम आदी गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. सारिका यांना दोन वेळा नॅशनल अवार्ड पण मिळाले आहेत.
३५ वर्षां पुर्वी फ़िल्मफ़ेअर मासिकात एक आर्टिकल आले होते” Those who speaks with their eyes” या आर्टिकल मधे तिच्या डोळ्यांचे वर्णन ” एका छोट्या मांजरी सारखे दिसतात असे केले होते आणि बिंदुचे डोळे एखाद्या बोक्या सारखे दिसतात असे केले होते. सारिका यांनी अनेक वर्षांपूर्वी पारध या मराठी चित्रपटात देखील काम केले होते. आता अनेक वर्षांनंतर त्या मराठी चित्रपटांमध्ये परत काम केले आहे. रिस्पेक्ट या चित्रपटात सारिका यांची महत्त्वाची भूमिका आहे.
लग्नाशिवाय एकत्र राहून कमल हसन व सारिका यांनी १९८० च्या दशकात सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यांना श्रुती व अक्षरा या दोन मुली असून अक्षराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र २००४ साली ते दोघेही वेगळे झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti