(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नाटककार, अभिनेते बाळ कोल्हटकर

    महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू.

  • जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल

    मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला. १९३४ मध्ये सागर फिल्म कंपनीच्या शहर का जादू या चित्रपटात नायक म्हणून पहिले काम केले. मोतीलाल यांचे गाजलेले चित्रपट 'शादी', आई-'परदेसी', ,'अरमान', 'ससुराल', 'मूर्ति', 'देवदास', जागते रहो व अछूत कन्या. मोतीलाल यांचे जागते रहो मधील गाणे 'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे त्या काळी खूपच गाजले होते. मोतीलाल यांचे १७ जून १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे
    https://www.youtube.com/watch?v=GQZaG5SZRYk
    https://www.youtube.com/watch?v=y5JcBpFMkKw

  • भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि अभिनेते सलिल अंकोला

    सलील अंकोला यांनी एक क्रिकेटर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. क्रिकेटच्या इनिगनंतर ते अभिनयाकडे वळले.आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सलील अंकोला यांनी सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण केलं होतं. दुर्दैव असं की अंकोला यांच्यासाठी हा सामना कसोटी कारकिर्दीतील पहिला आणि अखेरचा सामना ठरला.

  • बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर

    २००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे.

  • सुपरस्टार राजेश खन्ना

    त्यांचा पहिला चित्रपट १९६६ मध्ये आला त्याचे नाव होते ‘ आखरी खत ‘ लागोपाठ १९६९ ते १९७१ पर्यंत १५ चित्रपट सुपरहिट होणे ही आत्तापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत अशक्य गोष्ट होती ती त्यांनी शक्य केली.

  • शिक्षणतज्ज्ञ स्नेहलता दसनूरकर

    स्नेहलता दसनूरकर या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. अवंतिका, आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच, अजून यौवनात मी, अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, स्वामिनी, स्वामीनी, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले होते. अवंतिका’ मालिका आणि ‘शापित’ चित्रपटाची कथा-पटकथा स्नेहलता दसनूरकर यांनी लिहिली होती.

  • बॉलिवूडचा विनोदी अभिनेता जगदीप

    जगदीप यांना भेटलो तेव्हा आम्ही तिघे होतो , त्यांच्याबरोबर जावेद जाफरी होता , स्वाक्षरी घेतल्यावर आमचा फोटो जावेद जाफरी ने काढला. परंतु जावेदच्या स्वाक्षरी घेतली नाही कारण , जगदीप समोर असताना माझ्या डोळ्यासमोर ‘ सुरमा भोपाली ‘ होता.

  • सुप्रसिध्द संतूरवादक पं. उल्हास बापट

    अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते.

    त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि पंडित उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले. पुरसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले. दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. गायन शिकताना पंडित उल्हास बापट यांना, संतूर या वाद्यात गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. संतूरची 'क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत होती.

    संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती पण पं उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. संतूरवर 'मींड' काढण्याचीही त्यांची खास पद्धत असे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करत असत. प.उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपत असत. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या 'संतूरच्या भावविश्वात' या CD द्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी 'बंदिश' म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला. आर.डी बर्मन यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केले होते. पंचमदाचे लाडके संतुर वादक होते. पंचमदांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात उल्हास बापट यांच्या संतूरचे सूर गुंजले. तसेच पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी मराठी गीतांना संतूर सुरांनी सजवलं होते. इजाजत मधील मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधील मी रात टाकली, शिवाय तळव्यावर मेंदीचा अशा कितीतरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पं.उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन,चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली होती.

    पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत. पं.उल्हास बापट यांनी त्यांच्या "सहज स्वरांतून मनातलं" हे आत्म चरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवर ही उत्तम प्रभुत्व आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपट सृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी होत्या. त्या त्यांनी ,मिश्किलपणे आणि रंगतदार करून पुस्तकात सादर केल्या आहेत.

    दि. ४ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    पं.उल्हास बापट यांचे संतूर वादन
    https://www.youtube.com/watch?v=HdIsFM9hwiE
    http://gaana.com/artist/pt-ulhas-bapat-1

  • माझी माणसं – तात्या सोमण

    आपल्या आयुष्यात कोण याव हे बहुदा नियतीच्या हाती असाव . ते आपल्या हाती जरी असते तरी आपण , जी माणसे नियतीने आपल्या पदरात टाकलीत त्या पेक्षा उत्तम आपल्याला निवडता आली असती का नाही कोणास ठाऊक ?

  • हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा

    १९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.