(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अभिनेते अजय वढावकर

    आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अजय वढावकर यांनी मालीकाच्या बरोबर येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, इंग्लिश बाबू देसी मेम या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार' प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला.

    मुंबईतील दादर भागात लहानाचे मोठे झालेल्या वढावकर यांचा अंतकाळ हलाखीचा होता. मधुमेहामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांना पाय गमावावा लागला. त्यानंतरही त्यांनी जिद्दीने "झी टीव्ही'वरील ‘पवित्र रिश्ता' मालिकेत काम सुरू केले. 'झी' टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' ही त्यांची शेवटची मालिका होती.

    अजय वढावकर यांचे २७ फेब्रुवारी २०१५ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • ज्योतिषी शरद उपाध्ये

    त्यांचे ज्योतिषविषयक ‘राशीचक्र’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्र व राशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात.

  • तत्त्वांशी बांधिलकी 

    १९७५ च्या अखेरीस त्याने शिक्षणाला रामराम ठोकला व तो त्या संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झाला. आमच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे त्यानंतर अनेक वर्षे आमची भेट झाली नाही, पण आज त्यानेच तो योग जुळवून आणला होता.

  • भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल

    दाऊदपासून ते हाफिज सईदपर्यंत भारताचे सर्व शत्रू डोभालांना प्रचंड घाबरतात. डोभालांनी NSA पदाची सूत्रे हाती घेताच ISI ने दाऊद आणि हाफिज सईदची सुरक्षा तिपटीने वाढवली असं म्हणतात.

  • पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम

    अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन सोळाव्या वर्षीच प्रीतमसिंहांशी विवाह झाला, पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते. साहिरबद्दल लिहिताना अमृता प्रीतम एके ठिकाणी म्हणतात- "साहिर आणि माझ्यात नि:शब्दतेचं एक अनोखं नातं होतं. त्यात शारीरिक ओढीचा अंश नव्हता. मला ‘आखरी खत’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यावर एका प्रेस रिपोर्टरनं मी लिहीत असतानाचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे तो फोटो काढून निघून गेल्यावर मी त्या कागदाकडे पाहिलं, तर त्यावर ‘साहिर.. साहिर.. साहिर’ हा एकच शब्द मी अनेकदा लिहिला होता. माझ्या त्या वेडेपणाचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी तो फोटो प्रसिद्ध झाला. पण तो कागद कोरा असल्यासारखा भासत होता.

    साहिर आणि माझ्यातलं नातं तेव्हाही नि:शब्दच होतं. आणि अखेपर्यंत ते तसंच नि:शब्द राहिलं. अमृता प्रीतम रात्रीच्या निरव शांततेत आपलं लेखन करायच्या, कुठलाही गोंगाट - आवाज नसताना त्यांची लेखणी प्रसवत असे. अमृता रात्रीतून तासंतास लेखन करत राहायच्या. अमृता प्रीतम यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. आपलं आयुष्य आपल्या विचारांनुसार जगणार्या अमृता कर्तव्यसन्मुख राहिल्या, त्या मुक्त होत्या. मा.अमृता प्रीतम यांचे ३१ आक्टोबर २००५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी

    मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. 'मि. इंडिया' या सिनेमात मा.अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे मा.अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मा.मदन पुरी यांचे धाकटे भाऊ. अमरीश यांना हिंदी चित्रपटांमध्ये नायक बनायचं होतं म्हणून त्यांनी पंजाब सोडून मुंबई गाठली. मोठ्या भावाने सरळ सांगितलं की मी अजिबात मदत करणार नाही, जे काही या क्षेत्रात करायचं ते स्वतःच्या जोरावर करायचं.

    नायक बनण्याच्या अमरीश यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. मग त्यांनी पृथ्वी थिएटर्समधल्या नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली. तिथे मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं. अगदी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी अमरीश यांची नाटकं बघायला आवर्जून येत. मग हळूहळू अमरीश यांनी आपला मोर्चा परत एकदा हिंदी चित्रपटांकडे वळवला. सुरुवातीलाच चांगल्या दिग्दर्शकांचे चित्रपट अमरीश यांना मिळू लागले आणि हळूहळू त्यांनी आपले पाय हिंदी चित्रपटात घट्ट रोवायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीबद्दल नव्याने लिहायची काहीच आवश्यकता नाही. भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेले मा. अमरिश पुरी यांनी हिंदी सिनेमासृष्टीवर अनेक वर्षे राज्य केले. मा.अमरिश पुरी यांना बॉलिवूड सिनेमांमध्ये हीरो बनायचे होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. ते हीरो नाही मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. अमरिश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक नकारात्मक भूमिका साकारल्या.

    पाश्चिमात्य प्रेक्षकांमध्येही अमरिश पुरी लोकप्रिय अभिनेते आहेत. स्टीवन स्पिलबर्ग यांच्याबरोबरील 'इंडियाना जोन्स' या हॉलिवूड सिनेमातील मोला रामची भूमिका आणि 'टेंपल ऑफ डूम' या सिनेमातील भूमिकेसाठी प्रेक्षक त्यांना कधीही विसरु शकत नाही. त्यांची खलनायकाची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये एवढी परिणामकारक बनली होती की त्यांच्या मुलाचे मित्र जेव्हा घरी येत तेव्हा अमरीश यांच्यासमोर नुसतं जायलाही घाबरत असत. खऱ्या आयुष्यात मात्र अमरीश अतिशय साधे, मन मिळावू, मृदू स्वभावाचे, आपल्या कुटुंबात रमणारे असे होते. आपल्या वडिलांविषयी राजीव पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''पापा तारुण्याच्या काळात हीरो होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचे थोरले बंधू मदन पुरी सिनेसृष्टीत कार्यरत होते. निर्मात्यांनी त्यांना सांगितले, की त्यांचा चेहरा हीरोसारखा नाहीये. त्यामुळे ते खूप निराश झाले होते. मा.अमरिश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • अभिनेत्री अनुष्का शर्मा

    अनुष्का शर्माचा जन्म बेंगलोर मध्ये झाला, पण तिचे आई वडील गढवालचे आहेत. वडील कर्नल अजय कुमार शर्मा हे एक आर्मी ऑफीसर आहेत. त्यांचा जन्म १ मे १९८८ रोजी झाला. अनुष्का शर्माचे शिक्षण आर्मी विद्यालय व माउन्ट कारमेल कॉलेज, बेंगलोर येथे झाले. अनुष्का शर्माचा सध्या बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रीमध्ये समावेश झाला आहे. आपल्या विविध भूमिकांमधील चांगल्या अभिनयाने तिने बॉलिवूडमध्ये आपलं हे स्थान निर्माण केलं आहे. अनुष्काने आजवर अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. बॉ़लिवूडच्या 'किंग खान'सोबत 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटाद्वारे अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिची 'तानी'ची भूमिका सर्वांनाच आठवत असेल. याच यशराज बॅनरच्या चित्रपटाने तिला स्टारडम मिळवून दिलं. 'बॅन्ड बाजा बारात' या सिनेमात यशराज बॅनरने पुन्हा एकदा अनुष्काला संधी दिली. तिच्या अभिनय आणि तिला मिळालेली लोकप्रियतेमुळे यासाठी ती पात्र होती. या सिनेमातील रणवीर सिंह सोबतची 'श्रुती कक्कर'ची भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा 'जब तक हे जान' सिनेमात मुख्य भूमिकेत होते. या रोमॅन्टिक सिनेमात अनुष्का डॉक्युमेंट्रि फिल्ममेकर 'अकिरा राय'च्या भूमिकेत दिसली होती.

    यश चोप्रा यांचा दिग्दर्शित केलेला हा शेवटचा चित्रपट ठरला. नंतर ती राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' सिनेमात अनुष्का मि. परफेक्टमिस्ट अमिर खानसोबत दिसली. कमाईचे उच्चांक गाठलेल्या या सिमेमात अनुष्का पत्रकार 'जग्गू'च्या भूमिकेत दिसली. चित्रपटतील तिचा छोट्या हेअरकट मधील लूक लोकांनी चांगलाच पंसत केला.NH 10 मधील 'मिरा'च्या भूमिकेतून अनुष्का शर्मानं आपला एक वेगळा बेंचमार्क सेट केला. NH 10 या सिनेमातूनही अनुष्का पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना इम्प्रेस करण्यात यशस्वी झाली. तिच्या करिअरमधला सर्वात उत्कृष्ट अभिनय तिने या सिनेमात केला. सध्या माध्यगमांमध्येा सर्वांत जास्त0 चर्चित जोडी म्हतणजे विराट कोहली आणि अनुष्का् शर्मा होय.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रसिद्ध नाट्य-सिनेअभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे

    प्रसिद्ध नाट्य-सिनेअभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे (वय ४४) यांचे आज २२ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने भरत नाट्य मंदिराच्या रंगमंचावरच आकस्मिक निधन झाले.

    एकबोटे यांचा नाट्यत्रिविधा हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी भरत नाट्य मंदिरात सुरू होता. रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाचे शेवटचे नृत्य सादर करण्यासाठी एकबोटे रंगमंचावर आल्या. भैरवी रागावर आधारित बंदिशीवर त्यांनी नृत्य करण्यास सुरूवात केली. त्यांच्या बहरदार नृत्याला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत होती. त्यांनी नृत्य सादर केले आणि कार्यक्रमाच्या शेवटी तोल जाऊन त्या रंगमंचावरच कोसळल्या. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

    एकबोटे यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

    अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून घराघरामध्ये पोहचल्या होत्या.

    सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘गणपती बाप्पा माोरया’ या मालिकेत रावणाच्या आईची भूमिकेत दिसत होत्या. मा.अश्विनी एकबोटे यांनी बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी चित्रपटात देखील काम केले होते.

    त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ रोजी झाला. त्यांच्या पश्चात पती प्रमोद आणि मुलगा शुभंकर आहे.

    अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

    -- संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

  • आचार्य विनोबा भावे यांचा

    सत्य आणि अहिंसा या दोन चिरंतन तत्त्वांच्या अंमलबजावणीने ‘सर्वोदय’ होईल ही महात्मा गांधीजींची कृतिशील जीवननिष्ठा विनोबांच्या जीवनाचे शक्तिशाली अधिष्ठान होते.

  • ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील

    महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे अनेक भक्तीगीते व भावगीतांचे ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील यांचं आगरी-कोळी बोलीभाषेतील साहित्य अतुलनीय आहे. आद्यदेवी एकवीरा आईवर रचलेल्या गाण्यांचा संग्रह अगणित आहे. २००१ साली त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.