“शिवाजी सावंत” हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच “मृत्युंजयकार” सावंत म्हणून ओळखले जातात. ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगांतर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. कर्हाड येथे भरणार्या ७६व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते.
नारायणराव व्यास हे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य होते. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९०२ रोजी कोल्हापूर येथे झाला. ते ख्याल, भजन व ठुमरी गायनासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. मा. नारायणराव व्यास यांचा जन्म संगीत उपासकांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील, काका हे कोल्हापुरात संगीत क्षेत्रात नाव कमावून होते. विख्यात संगीतकार व गायक शंकरराव व्यास हे नारायणरावांचे वडील बंधू होत. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी लाहोर येथे विष्णू दिगंबर पलुसकर यांनी सुरू केलेल्या गंधर्व महाविद्यालयात 'गुरुकुल' पद्धतीत संगीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिथे त्यांचे थोरले बंधूही संगीत शिकत होते. १९२२ मध्ये आपले संगीत शिक्षण संपवून दोन्ही बंधू अहमदाबाद येथे गंधर्व महाविद्यालयाच्या स्थानिक शाखेत संगीत शिकवू लागले. १९३७ मध्ये नारायणराव आपले थोरले बंधू शंकरराव यांच्यासमवेत मुंबईला आले व दादर येथे त्यांनी 'व्यास संगीत विद्यालय' नावाने संगीत शिक्षण संस्था सुरु केली. नारायणरावांच्या थोरल्या बंधूंनी संगीत दिग्दर्शक म्हणून तेव्हाच्या चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. परंतु नारायणरावांनी तो मार्ग चोखाळला नाही. त्यांनी संगीत अध्यापन व गायकी कायम ठेवली. ते आकाशवाणीवरही गायचे. त्यांनी भारतातील अनेक संगीत मैफिली, महोत्सव आपल्या गायनाने गाजवले. कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी भारतात खूप दौरे केले. रसिक श्रोत्यांना त्यांचे गाणे प्रचंड आवडत असे. त्यांच्या काळातील ते एक लोकप्रिय गायक होते. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन एच. एम. व्ही. ने त्यांना १९२९ मध्ये ध्वनिमुद्रणासाठी बोलावले. १९२९ ते १९५५ ह्या काळात त्यांनी ७८ आर.पी.एम. च्या १५० ध्वनिमुद्रिकांमध्ये साधारण प्रत्येकी तीन ते साडे-तीन मिनिटांचा कालावधी असलेली ३०० गाणी गायली. ही गाणी हिंदी भाषा, मराठी व गुजराती भाषांतील होती. नारायणरावांनी त्यांत हिंदुस्तानी रागांवर आधारित व वडील बंधू शंकररावांनी रचलेल्या मराठी बंदिशी आणि भजने गायली. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांचे व एच. एम. व्ही. कंपनीचे नाव सर्वदूर झाले. ठिकठिकाणच्या ध्वनिमुद्रिका वितरकांनी आपल्याकडील सूचीपत्रकांवर नारायणरावांचे फोटो छापले. त्यांना 'तान कप्तान', 'संगीत प्रवीण', 'आधुनिक तानसेन' अशा पदव्या देऊन लोकांनी त्यांचे सत्कार केले. वृद्ध वयातही नारायणराव व्यास संगीत क्षेत्रात कार्यरत राहिले.
त्यांचे १९३४ मध्ये ध्वनिमुद्रित केलेले 'राधे कृष्ण बोल मुख से' हे मिश्र काफी रागातील भजन अतिशय लोकप्रिय झाले. त्यांनी राग मालगुंजी मधील आपले गुरुबंधू विनायकबुवा पटवर्धन यांच्या बरोबर केलेले ध्वनिमुद्रण इतर ध्वनिमुद्रिकांपेक्षा दीर्घ काळाचे आहे.
भारत सरकारने मा.नारायणराव व्यास यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले होते. तसेच मध्य प्रदेश शासनाने त्यांचा तानसेन पुरस्कार देऊन सन्मान केला होता. नारायणराव व्यास यांचे निधन १ एप्रिल १९८४ रोजी झाले. आपल्या समुहा तर्फे नारायणराव व्यास यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नारायणराव व्यास यांची काही लोकप्रिय ध्वनिमुद्रणे
सखी मोरी रुम झूम (राग दुर्गा), नीर भरन कैसे जाऊं (तिलक कामोद), तुम जागो मोहन प्यारे (भैरव), नीर भरन मैं चली जात हूँ (मालकंस), बलम मोरी सुनी हो (मांड), बहुत सही तोरी सांवरिया (भैरवी).
https://www.youtube.com/watch?v=1vJ8hF3UFvw
https://www.youtube.com/watch?v=Y0SZnY-DxxI
https://www.youtube.com/watch?v=K7w_KvGYxio
https://www.youtube.com/watch?v=xa6k64cBQ6I
https://www.youtube.com/watch?v=WAhnX5PMKDY
गोगटे कुटुंब मूळचे बेळगावचे. रावसाहेब गोगटे यांचे वडील त्या काळातील एल.एम.अँड एस. डॉक्टर होते. गंमत म्हणजे बुद्धिवान असणाऱ्या रावसाहेबांच्या वडिलांनी आपली डॉक्टरकी सोडून एक पिठाची गिरणी सुरू केली. हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. आजही ती गिरणी छोट्या स्वरूपात चालू आहे.
तिनं एकता कपूरच्या पहिल्या मराठी मालिकेतून पदार्पण केलं, त्या मालिकेचं नाव होत “माझिया प्रियेला प्रीत कळेना”. त्यानंतर तिने चिन्मय मांडलेकरच्या “तू तिथे मी” ह्या पारिवारिक मालिकेत काम केलं.
लाहोर येथे जन्मलेले बडे गुलाम अली खान फाळणीनंतर तेथेच राहिले. त्यांचा जन्म २ एप्रिल १९०२ रोजी झाला. पहिले काही वर्ष ६ महिने भारत आणि ६ महिने पाकिस्तानात येथे राहत. त्यांनी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना भारताचे नागरिकत्व मिळण्याकरता मदतीची विनंती केली. आणि खासाहेब हिंदुस्थानचे नागरिक झाले. मैफलीत खांसाहेबाना अपेक्षित ठेका तबलजीकडून मिळाला नाही कि फक्त ठुमऱ्या गाऊन वेळ मारून नेत. कै. जी. एन. जोशी एक आठवण जरूर सांगतात एकदा खांसाहेब त्यांच्या घरी आंब्यांच्या दिवसात दुपारी आले होते तेव्हा साहजिकच भोजनास आमरस पुरीचा बेत होता. खासाहेब तब्येतीत जेवले जेवण संपल्यावर आमरस एवढा आवडला कि नंतर त्यांनी चार वाट्या रस प्यायले. आणि नंतर गायचा मूड लागला तेव्हा तंबोरे लावून २-३ आस तब्येतीत गायले. ख्यालगायकी प्रमाणे ठुमरी म्हणण्यात त्यांचा हातखंड होता. मारवा आणि पुरिया सारखे जवळचे स्वर असलेले राग ऐका पाठोपाठ गात नाहीत कारण राग जरी जवळचे असले तरी दोन वेगळे राग वेगळे वातावरण निर्मिती करतात त्यामुळे ऐका पाठोपाठ शक्यतो गाऊ नयेत असे जाणकार सांगतात!! पण खांसाहेबांचे गायकीवरचे प्रभुत्व उच्च दर्जाचे होते!! १९४४ साली मुंबईत प्रथम झालेल्या मैफलीत मारवा आणि पुरिया ऐका पाठोपाठ म्हणून खासाहेबांनी रसिकांची तसेच जाणकारांची वाह व मिळवली होती. मैफलीत त्याकाळी पाच हजार रुपये खासाहेब घ्यायचे. जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गाणे म्हणण्यासाठी जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा खासाहेबांनां गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन मागितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले. जेव्हा ध्वनीमुद्रण सुरु होते तेव्हा त्यांनी ऐक आक्रमक तान घेतली आणि नौशाद म्हणाले यागाण्यात आक्रमक तान नको आहे पण त्यांना काही सुचत नव्हते तेव्हा ते म्हणाले मला केलेले चित्रीकरण दाखवा!! चित्रीकरण बघताना जवळ बसलेल्या उस्ताद निझामुद्दीन खान (तबलजी) यांना म्हणाले ये लौंडीया (अभिनेत्री मधुबाला) तो बहोत खुबसुरत है!! लतादीदी या त्यांच्या ऐक मोठ्या चाहत्या होत्या. बडे गुलाम अली खान यांचे २३ एप्रिल १९६८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बडे गुलाम अली खान यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=Gy75Hipt8IQ
https://www.youtube.com/watch?v=BViraiWfRqU
https://www.youtube.com/watch?v=JXxe9dU9N0U
शम्मी कपूर यांनी स्वत:ला कधी चिरतरुण म्हणवून घेतले नाही; पण जीवनावर उदंड प्रेम करणार्यास या आनंदी कलाकाराकडे ऊर्जेचा अखंड स्रोत होता. त्यांची जीवनाबद्दलची आसक्ती ही आयुष्याचा आनंद घेण्याची होती. त्यांनी आपले आयुष्य मनसोक्त उपभोगले. धसमुसळा,रांगडा प्रणय,नायिकांना थकविणारी भन्नाट नृत्यशैली ही शम्मी कपूर यांची खासियत होती.
विश्राम बेडेकर पटकथेच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळवून लंडनला निघून गेले . वर्षभरात परतल्यावर ‘ प्रभात ‘ स्टुडिओत व्ही. शांताराम यांचे सहाय्यक म्ह्णून राहिले. त्यांनी एक महिन्यात ‘ शेजारी ‘ या चित्रपटाची पटकथा लिहून दिली.
वसंतराव देशपांडे यांचे शिक्षण नागपूर शहरात झाले. त्यांची आई एक शिक्षिका होत्या. व त्या जवळपासच्या देवळांमध्ये ‘भक्तिसंगीत’ म्हणत असत. त्यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी झाला. त्यामुळे संगीताचा वारसा आईच्या उदरातूनच मिळाला होता. शिवाय वयाच्या केवळ सातव्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’ प्रवेश मिळून खर्यात अर्थाने त्यांच्या ‘शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासाला’ सुरुवात झाली. अर्थात त्याला कारणही खूप सुंदर, अकल्पित व प्रेरणादायी होते.
साल १९२७, नागपुरातल्या तेल्लीपूर परिसरात एक ७ वर्षांचा मुलगा आपल्या घराकडे परतत असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने एका इमारतीच्या जिन्याखाली त्याने आडोसा घेतला. त्याच्या सहज गुणगुणण्याने मोहित होऊन त्या इमारतीतील एक वयस्कर सद्गृहस्थ खाली येऊन त्याला आपल्या घरात घेऊन गेले आणि तेच गाणे गायला सांगितले. आता तर त्याच्या आवाजावर ते बेहद खुश झाले. पाऊस ओसरल्यावर त्याला सोबत घेऊन त्याच्या घरी पोहोचले. या मुलाच्या गळ्यात गाणे आहे व मी याला ‘शास्त्रीय संगीत’ शिकवण्यास तयार आहे. तुम्ही याला माझ्याकडे सोपवा, अशी गळ त्यांनी त्या मुलाच्या आईला घातली! आमची आर्थिक कुवत नाही व त्याच्या शिकवणीचे पैसे मी देऊ शकणार नाही, या कारणास्तव त्याच्या आईच्या नकारावर, ‘मी कोणतीही फी घेणार नसून शाळा संपल्यानंतर त्याच्या सोयीने संध्याकाळी शिकवणार आहे,’ असे आश्वा सन त्यांनी दिल्याने आईने होकार देत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. त्या पावसाळी दिवसाने मा. वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्याला ऐतिहासिक कलाटणी मिळाली. वयाच्या केवळ सातव्याच वर्षात ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’मध्ये प्रवेश मिळवून ‘शास्त्रीय संगीत’ हा त्यांचा ’ऐतिहासिक प्रवास’ खर्याी अर्थाने सुरू झाला.
वसंतराव देशपांडे यांनी ‘हिंदी चित्रपट संगीत’ फारसं गायलंच नाही. किंबहुना नन्हे मुन्ने (१९५२), चाचा चौधरी (१९५३) व रंगबिरंगी (१९८३) या तीनच चित्रपटांत त्यांनी गायल्याची नोंद आहे. त्यांची गायकी ही ठुमरी, दादरा, ख्याल, टप्पा व भजन याच प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे. वयाच्या केवळ ८ व्याच वर्षी, त्यांची ‘गायनकला’ जाणून ‘भालजी पेंढारकर’ यांनी ‘कालियामर्दन’ या त्यांच्या चित्रपटात ‘कृष्णाच्या भूमिकेत पदार्पण’ करण्याची संधी दिली होती. मग एक उत्तम गायक, अभिनेता, ‘मराठी नाटक व चित्रपट संगीतकार’ म्हणून ते गाजले. बेगम अख्तर त्यांना आदराने ‘गुरुजी’ संबोधित करत, यातच त्यांची ‘यशस्वी कारकीर्द’ दिसून येते. वयाच्या पन्नाशीपर्यंत ‘गझल व ठुमरी’ या संगीत प्रकारातील ‘एक प्रस्थापित गायक’ ही ओळख मिळवूनही रसिकांसमोर ‘ख्याल गायकीची संधी’ त्यांना मिळाली नव्हती, हे विशेष!
‘ग्वालियर घराण्याचे’ अधिकृत शिक्षण घेत असतानाच ‘किराणा व भेंडीबजार’ या घराण्याच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण चीजा’ वसंतराव देशपांडे यांनी आत्मसात केल्या होत्या. मा.पु.ल. देशपांडे यांचा वसंतरावांवर खास लोभ होता, मा.पु.ल. देशपांडे यांनीच ‘अनेक उस्ताद’ असणार्या. या ‘शागीर्द’ला ‘एकलव्य’ ही उपमा/पदवी बहाल केली होती. मग अर्थातच, ‘परिपूर्ण गायक’ हा दर्जा प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या ‘उस्तादांच्या कृपेने’ त्या प्रत्येकाच्या ‘घराण्याच्या गायकीतील सत्व’ आपल्या गळ्यात उतरवून ‘स्वत:च्या खास अशा गायकीला’ जन्म दिला. ‘पंडित दीनानाथ मंगेशकर’ यांच्या ‘संगीत नाटकांचा’ तो काळ होता. त्यांची ‘स्टाईल’ वसंतरावांना इतकी भावली की, ‘कळतनकळत’ त्यांनी आपल्या गायकीमध्ये ‘दीनानाथांची स्टाईल बहखुबीने आत्मसात केली’, जी प्रकर्षाने व हुबेहूब जाणवत असे, ज्याचा वसंतरावांना ‘सार्थ अभिमान’ होता, हेही विशेषच!
वसंतराव देशपांडे १९३८ साली मॅट्रिक झाले. लाहोरमध्ये रेल्वे खात्यात नोकरीस असणार्याा त्यांच्या मामांनी ‘आपली संगीताची विशेष आवड व भाच्याचा गाता गळा’ या संयुक्त विचारांनी प्रेरित होऊन वसंतरावांना आपल्या सोबत लाहोरला घेऊन आले. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात लाहोर व आजूबाजूच्या परिसरात ‘अफाट भटकंती, उर्दू भाषा शिक्षण व संगीत साधना’ यावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्याच अंतर्गत उस्ताद बडे ‘गुलाम अली खॉं व उस्ताद बरकत अली खॉं’ या बंधूद्वयींची मैफल कधीही चुकवली नाही. ‘ठुमरी व गझल’ या गायनकलेचा सूक्ष्मात जाऊन अभ्यास केला. याच काळात त्यांना ‘असद अली खॉं’ नामे एका फकिराच्या गाण्याने मोहित केले. ते एका जमान्यात ‘पतियाळा घराण्याचे गायक’ असल्याची माहिती मिळताच वसंतरावांनी त्यांचा गंडाच बांधला. मग जवळपास सहा महिने केवळ ‘मारवॉं’ हा एकच राग त्यांच्यापाशी शिकले. १९४२ मध्ये लाहोरहून परतल्यावर मग त्यांनी अर्थार्जनासाठी पुण्यात ‘मिलिटरी अकौंटस’ खात्यात नोकरी व संगीतसाधनेसाठी ‘पंडित सुरेशबाबू माने’ यांचे शिष्यत्व (१९४२-१९५२) पत्करले. मग त्यांना ‘भेंडीबजार घराण्याच्या उस्ताद अमजद अली खान’ यांचे मार्गदर्शन लाभले. याच काळात त्यांनी जवळपास ‘८० मराठी व २ हिंदी’ चित्रपटांसाठी पार्श्व गायन केले.
पुण्यातील वास्तव्यात त्यांना ‘पु.ल. देशपांडे, हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी व बेगम अख्तर’ या दिग्गजांचा सहवास लाभला व शेवटपर्यंत हेच त्यांचं ‘अत्यंत जवळचं व लाडकं मित्रमंडळ’ राहिलं! ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने ‘पंडित वसंतराव देशपांडे व अभिजात संगीत’ यांना सामान्य प्रेक्षकांच्या समोर आणले व याच नाटकाच्या माध्यमातून त्यांना ‘अमाप प्रसिद्धी व रसिकाश्रय’ लाभला. १९६७ साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि ‘नाटक, नाट्यसंगीत व अभिजात संगीत’ रसिकांनी हे नाटक अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. यातील ‘खानसाहेब ही व्यक्तिरेखा’ रसिकांच्या मनात इतकी ‘भरली, ठसली व सामावली’ की त्यांना पु.ल. देशपांडे यांनी बहाल केलेली ‘वसंतखॉं देशपांडे’ ही पदवी ‘खुशीखुशी व आनंदे’ ‘स्वीकारली, रुजवली व संबोधली’, असे उदाहरण एकमेव! या नाटकातील ‘खानसाहेब’ या व्यक्तिरेखेच्या पदांना चाली लावताना ‘पंडित जितेंद्र अभिषेकी’ यांच्या मनात ‘पंडित वसंतराव देशपांडे ही व्यक्ती, त्यांची गायकी व स्टाईल’ होती, हे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही! १९६७ ते १९८१ या १४ वर्षांच्या कालावधीत या नाटकाचे जवळपास ५२७ प्रयोग झाले यावरूनच ‘वसंतरावांच्या गायकीची जादू व रसिकाश्रय’ याची प्रचीती येते. यासोबतच दूरदर्शनसाठी त्यांनी गायलेली ‘अवीट गोडीची भजने व सुगम संगीत’ रसिकांच्या ओठांवर रुळलेले होतेच.
‘अष्टविनायक’ या चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी ‘आजही गणेशोत्सवात’ आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कारण त्या तोडीची अवीट ‘गणेशवंदना’ आजतागायत तयार झालीच नाही, हेच खरं. किंबहुना म्हणूनच ‘नाटक, चित्रपट व संगीत रसिक’ व रसिकोत्तर सामान्यांच्याही हृदयात वसंतरावांचं अढळपद चिरंतर आहे. १९६५ साली त्यांनी नोकरीला रामराम ठोकून आपलं उर्वरित आयष्य ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ सेवेला वाहून टाकलं! १०६७ ते १९७७ हा दहा वर्षांचा अतिशय मोठा कालावधी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने व्यापून टाकल्याने रसिकांना वसंतरावांच्या ‘शास्त्रीय संगीत साधना’ याचा हवा तेवढा लाभ मिळू शकला नाही, ही खंत आजही आहे. परंतु ‘मराठी नाट्यसंगीताची वाटचाल’ सोबतच त्यांच्या या त्यांच्या ‘ऑडिओ सीडी व डीव्हीडी’ बंदिस्त ‘रागदारी मैफली’ रसिकांच्या संग्रही असून त्यांची ‘अभिजात संगीताची’ भूक, मन व कान’ तृप्त करत आहे. १९८३ मध्ये वसंतराव देशपांडे यांना संगीत कला अकादमी पुरस्कार’ प्राप्त झाला. वसंतराव देशपांडे यांचे नातू ‘राहुल देशपांडे’ यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या यशस्वी सादरीकरणानंतर ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक पुनश्चश रंगभूमीवर सादर केले आहे, त्या मुळे पुन्हा संगीत नाटकांना पुनश्चय चांगले दिवस येत आहेत. वसंतराव देशपांडे यांचे ३० जुलै १९८३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ नितीन देशपांडे
वसंतराव देशपांडे यांचे गायन.
https://youtu.be/qI7jSLNBnrs
https://www.youtube.com/watch?v=qI7jSLNBnrs&feature=youtu.be
https://www.youtube.com/watch?v=TcfyGLSYjRw&feature=youtu.be
https://www.youtube.com/watch?v=27T21Vy9zTY
https://www.youtube.com/watch?v=tUcXQ39yD5c&t=818s
गोरी तेरा गांव बड़ा प्यारा', 'सुरमई अखियों में', 'दिल के टुकड़े-टुकड़े करके', 'जानेमन-जानेमन तेरे दो नयन', 'चांद जैसे मुखड़े पे', ‘निसा गमा पनी सारे गा’ या सारखी अप्रतीम गाणी देणारे येसुदास यांचे वडील मल्याळम शास्त्रीय संगीतकार होते. त्यांचा जन्म १० जानेवारी १९४० रोजी झाला. त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडील होते, वयाच्या सात वयाच्या वर्षी कोची स्थानिक स्पर्धा भाग घेतला तेव्हा सुवर्णपदक जिंकले. सुरवातीचे संगीत प्रशिक्षण त्यांनी R.L.V. संगीत Thrippunithura अकादमी येथे केले. मा.येसुदास गाण्याची निवड फारच विचार पूर्वक करीत असतात. सध्याच्या पध्दतीची गाणी त्यांना आवडत नाहीत. १९७० च्या पासून येसूदास हिंदी गाणी गात आहेत. मा.येसूदास यांनी १४ भाषेत जवळजवळ आज पर्यत ४५००० गाणी गायली आहेत. त्यांनी मल्याळम, तामिळ आणि हिंदी मध्ये पण गायली आहेत. ते मल्याळम चित्रपट उद्योगात जास्त प्रसिद्ध आहेत. पहिले हिंदी गाणे गायन सुरु केले तो चित्रपट जय जवान जय किसान होता, पण पहिला प्रदर्शित चित्रपट छोटी छोटीसी बात होता. मा.येसूदास यांनी अमिताभ बच्चन, अमोल पालेकर आणि जितेंद्र यांच्या साठी हिंदी गाणी गायली आहेत. त्यांनी रवींद्र जैन, बाप्पी लाहिरी, खय्याम, राजकमल आणि सलील चौधरी याच्या समावेत अनेक सदाबहार हिंदी चित्रपटातील गाणी गायली आहेत. त्याचा एक मुलगा विजय येसूदास, हा गीतकार आहे. मा.येसूदास यांना गायक म्हणून सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे व तो प्राप्त करणारे ते देशातील एकमेव गायक आहेत. मा.येसुदास हे फक्त गायक नसून दक्षिण भारतीय भाषेत 'वडाक्कुम नाथम', 'मधुचंद्र लेखा' और 'पट्टनाथिल सुंदरन' असे निर्माता म्हणून चित्रपट बनवले आहेत. भारतीय संगीतात मोलाचे योगदान दिल्याने केरळ सरकारने संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम 'स्वाती पुरस्कारम' हा पुरस्कार देऊन येसूदास यांचा गौरव केला आहे. २००२ मध्ये भारत सरकारने 'पद्म भूषण' देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
काही येसूदास यांची गाणी
जब दीप जले आना
तु जो मेरे सूर मे
सुरमई अखीयो से
माना के तुम
गोरी तेरा गाव बडा प्यारा
निसा गमा पनी सारे गा
मराठी गाणी येसूदास यांची
दूर दूर जाऊ या
वेली वेली उमले कळी
तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांचा जन्म १७ जानेवारी १९१७ रोजी झाला. मरुदुर गोपालन रामचंद्रन, ऊर्फ एम.जी. रामचंद्रन किंवा एमजीआर, यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. हे सलग तीन मुदतींसाठी मुख्यमंत्री होते. तरुणपणी एम.जी. रामचंद्रन आणि त्यांचा भाऊ एम.जी. चक्रपाणी हे दोघे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नाटकमंडळ्यांमधून कामे करत असत. याच काळात ते गांधींच्या प्रभावामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले. १९३६ साली सती लीलावती नावाच्या तमिळ चित्रपटात मिळालेल्या एका साहाय्यक भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला. १९४० च्या दशकात त्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पुढील तीन दशके तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा दबदबा राहिला. दाक्षिणात्य लोक अभिनेत्यांच्या मागे आणि अभिनेत्रीच्या मागे मोठय़ा प्रमाणात असतात. एम.जी.आर. यांनी याच पद्धतीने अधिराज्य गाजवले होते.
तमिळ चित्रपटांतील हीरोनंतर राजकारणातील तामिळनाडूचे हीरो झाले. तीच गोष्ट एम.जी.आर. यांची. तामिळी चित्रपटांतील शिवाजी गणेशन आणि एम. जी. आर. यांचा काळ होता. चित्रपटसृष्टी गाजवून एम. जी. आर डी.एम.के पक्षाचे ते सदस्य झाले. त्यावेळी आणि त्यावेळचे डी.एम.के.चे नेते अण्णा दुराई हे असे तामिळनाडूचे त्या काळातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वप्रिय नेते होते. पक्षांतर्गत उतरंडीत झपाट्याने वाटचाल करत ते अल्पावधीतच पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळात गणले जाऊ लागले. अण्णा दुराईंनी १९६७ साली डी.एम.के.च्या हातात म्हणजे एका प्रादेशिक पक्षाच्या हातातून सत्ता मिळवली आणि तामिळनाडूच्या जनतेवर डी. एम. के.ने अधिराज्य गाजवले. अण्णा दुराई असेपर्यंत द्रमुक अखंड होता. १९७२ साली द्रमुक सोडून त्यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम पक्ष स्थापला. चित्रपटांतील नायक म्हणून लाभलेल्या प्रचंड लोकप्रियतेचा वापर करून त्यांना राजकारणासाठीही मोठा जनाधार गोळा करता आला. १९७७ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. भारतात कोणाही चित्रपट-अभिनेत्याने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याची ही पहिलीच घटना होती. १९८७ साली निधन होईपर्यंत ते मुख्यमंत्रिपदावर होते. एम.जी. रामचंद्रन यांना मरणोत्तर भारतरत्नध पुरस्काराने गौरवण्यात आले होते. जयललिता यांनी एम. जी. रामचंद्रन यांचे बोट धरून राजकारणात प्रवेश केला खरा आणि चित्रपटसृष्टीतल्या राज्यसभेत जाणा-या त्या पहिल्या खासदार होत्या. १९८२ ते ८६ या काळात एम. जी. आर. असताना त्यांनीच त्यांना राज्यसभेत पाठवले आणि १९९१ साली थेट मुख्यमंत्रीपदी त्या आल्या.
एम. जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर १९९१ साली जयललिता मुख्यमंत्री झाल्या. एम.जी. रामचंद्रन यांचे २४ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले. एम. जी. आर. यांच्या मृत्यूनंतर जी अंत्ययात्रा निघाली तशी अंत्ययात्रा जगाच्या पाठीवर अजून तरी कुठे निघालेली नाही, असे दाखले त्या काळी दिले जात असत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti