(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे

    आज १३ सप्टेंबर....किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका मा. डॉ. प्रभा अत्रे यांचा वाढदिवस
    प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून प्रभा अत्रे यांचे नाव घेतले जाते. त्या पं सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत. प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारतातील विविध भागांतील कार्यक्रमात साथ करत असत. संगीत शिकत असतानाच प्रभाताईंनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे.
    भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करतात. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत. प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला. तरुण वयात प्रभाताईंनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत.
    भारतातील व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. मा.डॉ. प्रभा अत्रे यांनी मराठी व इंग्लिश भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील पहिले पुस्तक 'स्वरमयी' असून त्यात संगीतावर आधारित निबंध व लेख आहेत. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वरमयी प्रमाणेच त्यांच्या 'सुस्वराली' या दुसर्याय पुस्तकालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मध्य प्रदेश शासनाने दोन्ही पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या स्वरांगिणी व स्वररंजनी या मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या ५०० शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना आहेत. (त्यांसोबत ध्वनिमुद्रिका संचाचा समावेश असतो.) त्यांचे पाचवे पुस्तक, 'अंतःस्वर' हा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. ह्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे.
    प्रभाताईंची इंग्रजी भाषेतील 'एनलायटनिंग द लिसनर' व 'अलाँग द पाथ ऑफ म्युझिक' ही ध्वनिमुद्रिकांच्या संचासह विक्रीस पुस्तके वैश्विक श्रोतृवृंदाला उपलब्ध आहेत. प्रभाताईंनी भारतात व परदेशांत संगीत विषयावर अनेक सप्रात्यक्षिक व्याख्याने दिली असून संगीतावर आधारित विषयांवर विविध संशोधनपर लेख सादर केले आहेत. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार, , १९९० साली व पद्मभूषण पुरस्कार २००२ साली मा.प्रभा अत्रे यांना दिला आहे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकिपीडिया

      September 13, 2016


  • सुप्रसिद्ध संगीतकार व व्हायोलिन वादक प्रभाकर जोग

    एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणाऱ्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले.

      October 31, 2021


  • अभिनेते मिलिंद गवळी

    शूर आम्ही सरदार, हे खेळ नशिबाचे, आधार, वैभव लक्ष्मी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच चंचल, वक्त से पहेले, हो सकता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये मिलिंद गवळी झळकले आहेत. मिलिंद आणि अलका कुबल यांनी तर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

      June 17, 2022


  • महान पार्श्वगायक मुकेश

    १९४८ साली आलेल्या ‘आग’मध्ये राज कपूर यांच्यासाठी मा.मुकेश यांनी पार्श्वगायन केले. येथूनच मग राज कपूर-मा.मुकेश हे समीकरण जुळले आणि उदयास आली अवीट गोडीची श्रवणीय गाणी! आग, आवारा, श्री ४२०, बरसात, परवरिश, अनाडी, संगम ते मेरा नाम जोकर असे मा.मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनील नटलेले ‘आरके’ कॅम्पमधले चित्रपट म्हणजे कानसेनांना मेजवानीच ठरली.

      July 22, 2017


  • बॉलीवूड अभिनेत्री दिव्या भारती

    दिव्या भारती हे चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न होतं असं म्हटलं तर अतिशोयक्ती वाटू नये. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला.कारण वयाच्या अवघ्य़ा १९ वर्षीच तिनं सर्वांची मनं जिंकली होती. विश्वात्मा हा हिंदीतला तिचा पहिला सिनेमा. राजीव राय यांनी तिला या चित्रपटातून हिंदीत ब्रेक दिला. यातलं “सात समंदर पार तेरे ” या दिव्यावर चित्रित केलेल्या गाण्यानं तर धमालच केली होती. त्यानंतर शोला और शबनमनं तिच्या विजयात आणखी भर घातली. दिव्या आणि गोविंदा जोडी झाली होती. तर शाहरुख खान ऋषी कपूरबरोबरच दिवानानं तर तीनं सर्व अभिनेत्रींना मागं टाकलं. शाहरुख खान बरोबरच्या या चित्रपटानं तिला यश तर दिलच पण त्यावेळी ती सर्वात मोठी स्टारही झाली होती. दिवानानंतर दिव्याचं मानधन २५ लाखांवर गेलं होतं असं सांगितलं जातं. म्हणजे त्यावेळी टॉपवर असलेल्या श्रीदेवी, माधुरी यांच्यापेक्षा जास्त मानधन ती घेऊ लागली. त्यातच दिवानाची गाणी आणि चित्रपटानं सगळ्यांच्या ह्रदयाचा गेमच केला होता. कॉलेजमधली तरुणाई तर “ऐसी दिवानगी देखी नही कही..” या शाहरुख आणि दिव्याच्या गाण्यावर फिदा झाली होती..शाहरुख आणि दिव्या हीच चर्चा त्यावेळी होत होती. दिवाना रिलीज झाला ते वर्ष होतं १९९२ त्यावर्षी सगळीकडं दिव्याचा बोलबाला होता..दिव्यानं हिंदीत जवळपास १३-१४ चित्रपट केले. त्यातले काही सुपर डुपर हिट झाले तर काही जेमतेम चालले..पण तीनं त्यावेळच्या सर्व प्रस्थापित अभिनेत्रांनी धक्का दिला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर दिव्यानं तेलुगु चित्रपटातून आपलं करिअर सुरु केलं होतं. तेलुगुतले प्रसिद्ध निर्माता डी रामानायडू यांनी मुलगा व्यंकटेश याच्याबरोबरच्या “बोब्बीली राजा ” या चित्रपटातून हिरोईन म्हणून दिव्याला पुढं आणलं. दिव्याचा अभिनेत्री म्हणून पहिलाच सिनेमा हिट झाला आणि बघता बघता तिनं तेलुगु चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केलं. त्यावेळी तेलुगुतली यशस्वी अभिनेत्री विजयाशांती हिच्या नंबर एकच्या स्थानाला तिनं आव्हान दिलं होतं. त्यानंतर तिचा प्रवास हिंदीत झाला.. पण बोब्बीला राजा च्या अगोदर दिव्यालाही मोठ्या दिव्यातून जावं लागलंय. तिचा चित्रपटसृष्टीतला प्रवेशच खूप त्रासदायक झालाय. वयाच्या अवघ्या १४ वर्षी तीला चित्रपटासाठी विचारण्यात येत होतं. त्यावेळची सुपरस्टार श्रीदेवी हिच्या चेह-याशी थोडीफार मिळती जुळती असल्यामुळे तिला मागणी होत होती. नंदू तोराणीनं तिला गुनाहों का देवता साठी विचारलं होतं. त्यानंतर गोविंदाचा भाऊ किर्तीकुमार यानं दिव्याला घेऊन राधा का संगम करण्याचं ठरवलं…पण काही दिवसाच्या शुटींगनंतर दिव्याला तो सिनेमा सोडावा लागला. त्यानंतर सुभाष घई यांनी दिव्याला सौदागरमध्ये अमिर खानबरोबर घेतलं होते. पण तिथंही माशी शिंकली आणि सुरवातीचं काही शुट झाल्यानंतर दिव्याला काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तिला शेखर कपूर, शबनम कपूर, यांनीही विचारणा केली होती..पण तिचा कोणताच चित्रपट सुरु होत नव्हता. मुंबईत आपली डाळ शिजत नाही असं समजल्यानंतर तीनं हैदराबाद गाठलं. तोपर्यंत तिला शाळा अर्धवटच सोडावी लागली होती. त्यामुळे पुन्हा शाळेत जाणं शक्य नव्हतं. त्याचवेळी तिला डी. रामानायडूंचा बोब्बीली राजा मिळाला आणि तिचं नशिब बदललं. बोब्बीली राजा नंतर तिला विश्वात्मा मिळाला आणि त्यानंतर दिव्या भारती हिंदीत पुन्हा झोकात आणि धडाकेबाज यश मिळवत आली.. साजीद नाडीयादवालाशी तीनं लग्न केलं होतं. पण त्यातही काही वाद होते असं म्हणतात. त्यावेळच्या लाखो ह्रदयाची धडकन होती दिव्या भारती. अभिनेत्री म्हणून हिट ठरलेली दिव्या तिचा जिवनाचा प्रवास सुरु करण्याअगोदरच सर्वांना सोडून गेली. दिव्या भारती यांचे ५ एप्रिल १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    दिव्या भारतीची गाणी

      February 27, 2017


  • हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंत

    ‘कटीपतंग’, ‘अमरप्रेम’, ‘आराधना’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी आपल्या कारकीर्दीत ४३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात ३७ हिंदी , ६ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांचे डेहराडून येथे प्रारंभीचे शिक्षण झाले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली व नंतर हिंदी चित्रपटात अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले. दापोली येथे त्यांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली. १९४८ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले व साहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. राज कपूर अभिनित सुनहरे दिनचे ते साहाय्यक दिग्दर्शक होते.

    तसेच त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उदा., फणी मजुमदार दिग्दर्शित बादबान व धोबी डॉक्टर. बहुहा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला कथाचित्रपट होय. त्यानंतर त्यांनी इन्स्पेक्टर, शेरु, डिटेक्टिव्ह व हिलस्टेशन हे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांच्या यशानंतर त्यांनी ‘शक्ती फिल्म्स’ ही स्वतःची चित्रपटनिर्मिती संस्था १९५७ मध्ये स्थापन केली. या संस्थेच्या निशाणाखाली त्यांनी हावडा ब्रिज हा पहिला चित्रपट निर्माण केला. त्याने लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला व त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले.

    त्यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय व मनोरंजक चित्रपटांमध्ये हावडा ब्रिज, चायना टाऊन, काश्मीर की कली, ॲन इव्हनिंग इन पॅरिस, आराधना, कटी पतंग, अमर प्रेम इ. उल्लेखनीय आहेत. एकच चित्रपट दोन भाषांत (हिंदी व बंगाली) निर्माण करण्याचा प्रयोग प्रथमतः करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी अमानुष हा चित्रपट हिंदी व बंगाली या दोन्ही भाषांत १९७४ मध्ये निर्माण केला. भारत व बांगला देश यांच्या संयुक्त विद्यमाने, सहनिर्मिती असलेला पहिला चित्रपट सामंतांनी १९८४ मध्ये बनवला. १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सामंतांनी प्रामुख्याने शम्मी कपूरला नायक घेऊन चित्रपट दिग्दर्शित केले. नंतरच्या काळात राजेश खन्ना यांना नायक म्हणून घेऊन त्यांनी चित्रपट काढले. त्यांपैकी आराधना, कटी पतंग व अमर प्रेम हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले.

    राजेश खन्नाला सुपरस्टार पदावर पोहोचवण्यात या चित्रपटांचा मोलाचा वाटा होता. आराधना ह्या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. शर्मिला टागोर यांनी ‘अॅ्न इव्हनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात बिकिनी घातली आणि प्रचंड खळबळ उडवून दिली. चित्रपटाची नायिका ही पॅरिससारख्या ठिकाणी स्वत:च्या जीवावर युरोपभर प्रवास करत असल्याने तिचे अत्याधुनिक असणे अटळ होते. साहजिकच ही बिकिनी अत्यंत वेलस्क्रिप्टेड होती आणि मा.शक्ती सामंत या दिग्दर्शकाने ती अत्यंत योग्य रितीने शूट केली होती. ‘अमर प्रेम’ मधील ‘चिंगारी कोई भडके...’ या गाण्याचे शुटिंग कोलकता येथील हावडा ब्रिजखाली असलेल्या पाण्यामध्ये एका जहाजात करायचे, अशी योजना ठरली परंतु दिग्दर्शक मा.शक्ती सामंत यांना राजेश खन्नाच्या लोकप्रियतेची जाणीव होती. लोकांची हावडा ब्रीजवर एवढी गर्दी जमेल की, तो ब्रीज तुटेल अशी भीती त्यांना वाटली त्यामुळे त्यांनी एका स्टुडिओमध्ये हावडा ब्रीजचा सेट उभारुन शुटिंग करण्याचे ठरवले.

    काश्मीर की कलीपासून सामंत रंगीत चित्रपटनिर्मितीकडे वळले. त्यांच्या अन्य उल्लेखनीय चित्रपटांत जाने-अन्जाने, मेहबूबा, आनंद आश्रम, अनुरोध, बरसात की एक रात व अलग अलग इत्यादींचा समावेश होतो. अतिरंजित भावुक कथानक, श्रवणमधुर संगीत, लोकप्रिय कलावंतांचा प्रभावी हृदयस्पर्शी अभिनय ही त्यांच्या गाजलेल्या यशस्वी चित्रपटांची बलस्थाने होत. सामंतांच्या पत्नी व त्यांचे बंधू त्यांच्या काही चित्रपटांचे निर्माते होते. त्यांचा मुलगा अशीम सामंत याने दिग्दर्शित केलेले काही चित्रपट त्यांनी निर्माण केले. १९८५ मध्ये त्यांच्या शक्ती फिल्म्स संस्थेने ‘आराधना साऊंड सर्व्हिस’ ही ध्वनिसेवा सुरु केली. मुंबईच्या बॉलिवुड व पाश्चात्त्य हॉलिवुडमध्ये तयार झालेल्या काही चित्रपटांना या यंत्रणेने ध्वनिसेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या हावडा ब्रिज, आराधना आणि बरसात की एक रात या अभिजात चित्रपटांचे प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे ॲनिमेशन फिल्ममध्ये रुपांतर करण्यात आले.

    सामंत यांना आराधना, अनुराग व अमानुष ह्या चित्रपटांसाठी ‘फिल्मफेअर’ चे सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार मिळाले. तसेच त्यांना ‘झी’ वाहिनीतर्फे ‘झी जीवनगौरव पुरस्कार’ एकूण चित्रपट कारकीर्दीसाठी देण्यात आला. त्यांचे काही चित्रपट बर्लिन, ताश्कंद, मॉस्को, कैरो, बैरुत इ. ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून दाखवले गेले. भारतीय चित्रपट-निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट-प्रमाण मंडळाचे अध्यक्ष तसेच कोलकात्याच्या ‘सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ चे अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली. शक्ती सामंत यांचे ९ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 15, 2018


  • मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट

    सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी १ जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. त्यांचा जन्म १३ जून १९५१ रोजी झाला. ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम केला होता. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरुची मावशी अशा एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. नाटकांच्या तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारे निर्माते म्हणून सुधीर भट नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे सुरुवातीला मोरुची मावशी हे नाटक प्रचंड गाजले.

    ‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकांना सुध्दा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मराठी नाटक सातासमुद्रापार युरोप, अमेरिकेत नेण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या नाटकांना परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला. काही काळ नाटय़निर्माता संघाचे ते अध्यक्षही होते. अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचेही प्रदीर्घ काळ ते सदस्य राहिले. नाटय़व्यवसायाच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी शासनदरबारी मांडण्यात आणि त्यांची सोडवणूक करून घेण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.

    जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन, नाटकांचे परदेश दौरे, नवे विषय हाताळणे आणि नाट्यप्रयोगांचे विक्रम ही त्यांची वैशिष्ट्ये होती. नटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. "मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले. मात्र, "गांधी विरुद्ध गांधी‘ या नाटकाने व्यवसायात त्यांना खोट दिली. पण ते कधीच मागे हटले नाहीत. विजय चव्हाण, सुनील बर्वे, प्रशांत दामले यांची कारकीर्दही त्यांनी उभी केली.
    मराठी रंगभूमीचा शो मॅन म्हणूनही त्यांना ओळखले जात असे. सुधीर भट यांचे निधन १४ नोव्हेंबर २०१३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 21, 2017


  • पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु देवदत्त दाभोलकर

    शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत.

      December 17, 2021


  • बंगाली भारतीय चित्रपट निर्माते आणि कथा लेखक ऋत्विक घटक

    मैलाचा दगड ठरणारे अनेक चित्रपट ऋत्विक घटक यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२५ रोजी ढाका येथे झाला. ऋत्विक घटक यांचे वडील सुरेशचन्द्र घटक जिल्हा दंडाधिकारी आणि एक कवी आणि नाटककार होते. वडिलांच्या लिहिण्याचा प्रभाव त्यांच्या वर झालेला असावा. त्यांची आई इंदू बाला देवी, त्यांची बहिण प्रतिती आणि मोठा भाऊ मनीष घटक त्याच्या वेळ मूलगामी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता. असा हा परिवार १९४७ साली बंगालच्या विभाजना नंतर भारतात कलकत्ता यथे आला. १९४८ साली घटक यांनी पहिल नाटक गडद तलाव लिहिले. १९५१ साली ते भारतीय पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) मध्ये झाले. त्यांचे शेवटचे नाटक १९७० सालचे ज्वाला. घटक चित्रपटात निर्मल घोष यांच्या सोबत सामील झाले,सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते साल होते १९५०. घटक यांचे पहिले व्यावसायिक प्रकाशन अजांत्रिक. यावरच काल्पनिक चित्रपट तयार केला. कथा लेखक म्हणून घटक यांना व्यावसायिक यश मधुमती (१९५८) या चित्रपटाने दिले. हा हिंदी चित्रपट होता याचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले होते. या चित्रपटाच्या कथेला अरजित फिल्म फ़ेअर सर्वोत्तम कथा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ह्रित्विक घटक यांनी पूर्ण लांबीचे आठ चित्रपट तयार केलेले आहेत यातील सर्वोत्तम चित्रपट म्हणजे मेघ ढाका तारा (१९६०),कोमल गांधार (१९६१),आणि शुब्रनरेका (१९६२).

    ऋत्विक घटक हे सत्यजीत रे आणि मृणाल सेन यांचे समकालीन. ऋत्विक घटक प्रामुख्याने चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. तरी त्यांनी अनेक कथा आणि नाटक लिहिली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आठ पूर्ण लांबीचे वैशिष्ट पूर्ण चित्रपट आणि काही लघुपट,माहितीपट निर्माण केले. तसेच अनेक लघुकथा, नाटक आणि कविता लिहिल्या. ५० पेक्षा जास्त चित्रपटांवर लेख आणि निबंध लिहिले. ते फक्त चित्रपट दिग्दर्शक नव्हते तर त्यांच्या चित्रपटातली दृष आणि समालोचन विव्दातापूर्ण अभ्यास आणि शोधातून आलेल होत. त्यांना दोन देशातील विभाजनातून आलेला बंगाल मान्य नव्हता हीच धीम त्यांच्या जवळ जवळ सर्वच चित्रपटात अप्रत्यक्षपणे दिसत असे. चित्रपट बनवणे हि त्यांच्या साठी कला नव्हती,तर लोकांची दुखे आणि दुखांवर त्यांचा राग व्यक्त करण्याचे साधन होते. त्यांना १९७० साली भारत सरकारने पद्मश्री या किताबाने सन्मानित केले. ऋत्विक घटक काही काळ एफ टी आय आय चे संचालक होते.

    एफ टी आय आय मध्ये शिकवत असताना त्यांच्या कडून मणी कौल,जॉन अब्राहम ,कुमार सानी आणि असे अनेक विद्यार्थी घडले. सत्यजित रे यांना जगभरातील प्रेक्षक लाभले,पण या बाबतीत घटक हे भाग्यवान नव्हते. ते जिवंत असताना त्यांच्या चित्रपटांना न प्रेक्षक लाभले ना त्यांची समीक्षा झाली. परंतु त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे चित्रपट भारतात आणि परदेशात फिल्म मेकींकच्या विद्यार्थीना आभ्यासासाठी ठेवले जातात. सत्यजित रे वास्तववादी सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत,परंतु रे यांच्या पथेर पांचाली या सिनेमाच्या तीन वर्षे आधी घटक यांनी नागरिक नावाचा वास्तविक सिनेमा तयार करून ठेवला होता. तो त्यांच्या मृत्यू नंतर प्रकाशित झाला. या नंतरच घटक यांचा प्रभाव भरत बाहेर पडू लागला. घटक यांचे अपूर्ण राहिलेले आणि प्रदर्शित होऊ न शकलेले अनेक चित्रपट आजही आहेत. हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट संकलित करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (एनएफएआय) गेल्या काही दिवसांपासून होत आहे.

    या प्रयत्नांना आता यश येत असून, पश्चि म बंगाल सरकारने घटक यांचे "काटो अजनारे' (1959), "बनगार बगो दर्शन' (1964) आणि "रंजर गुलाम' (1968) हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त केले आहेत.

    घटक यांच्या अपुरे राहिलेल्या किंवा प्रदर्शित होऊ न शकलेल्या बहुतांश चित्रपटांच्या चित्रफितींचे संकलन आता चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध असणार आहेत. यात घटक यांचे 1959 ते 1971 या कालावधीतील चित्रपटांचा समावेश आहे, घटक यांच्या "तिताश एकती नदिर नाम' (1973) या चित्रपटाची माहिती पुस्तिका, तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री जयललिता यांच्या "शहजादी मुमताज' (1977) आणि बाबजीराव राणे दिग्दर्शित "संत तुकाराम' (1932) या चित्रपटांची छायाचित्रे, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा प्रदर्शित होऊ न शकलेला "जमानत' हा चित्रपट आणि ज्योतिप्रसाद आगरवाल यांनी दिग्दर्शित केलेला पहिला आसामी चित्रपट "जोयमती' (1935)ची छायाचित्रे आणि प्रेसक्लि पिंग उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शने यात घटक यांचे सिनेमे दाखवले जाऊ लागले आहेत. यानंतर त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाच्या मध्ये गणले जाऊ लगले. ऋत्विक घटक यांचे ६ फेब्रुवारी १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/शंशाक बोरसे

      February 6, 2019


  • चित्रपट निर्माते गुलशन कुमार

    लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. त्यांचा जन्म ५ मे १९५१ रोजी झाला. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला. ते २३ वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली. त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.

    गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रिज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते. गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला.

    देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते. ७० च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी बिझनेसमध्ये गणले जाऊ लागले. ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले. बॉलिवूडमध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले.

    फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार यांनी त्यांच्या कमाईचा एक हिस्सा सामाजिक कामासाठी देण्यास सुरुवात केली. वैष्णोदेवीचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भंडारा सुरु केला होता. आजही तो भंडारा अविरत सुरु आहे. या भंडाऱ्याच्या माध्यमातून भक्तांना मोफत भोजन दिले जाते गुलशन कुमार यांनी वैष्णोदेवीची अनेक गाणी गायली आहेत. गुलशन कुमार यांचे १२ ऑगस्ट १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      August 12, 2017