(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर

    ‘मराठी साहित्यात जोपर्यंत ललित नियतकालिकं चालू राहतील तोपर्यंत अनंत अंतरकरांचं नाव कायम टिकून राहील’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कै. अनंत अंतरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात काढले होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९११ रोजी जमखिंडी येथे झाला. ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ ही अनंत अंतरकरांनी सुरू केलेली ललित नियतकालिके केवळ दर्जेदार साहित्याच्याच जोरावर आज ७० वर्षे झाली तरी वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत, हे अंतरकरांच्या वाङ्मयीन द्रष्टेपणाचेच द्योतक म्हणावे लागेल.

    साहित्याचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. बा. ल. अंतरकर हे कोकणातले एक प्रसिद्ध शिक्षक होते. ते संस्कृत पंडित होते, त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. ‘सरूप शाकुंतल’, ‘मेघदूतच्छाया’ आणि (उमर खय्यामकृत) ‘रुबाया’ हे त्यांचे मराठी अनुवादग्रंथ त्या काळात गाजले होते. अशा व्यासंगी आणि साहित्यिक वडिलांच्या सहवासात अनंत अंतरकरांची साहित्यरुची जोपासली गेली. त्या काळची ‘यशवंत’, ‘रत्नाकर’, ‘मनोरंजन’ यांसारखी साहित्यसंपन्न मासिके त्यांच्या वाचनात होती. अभिजात संस्कृत साहित्यकृतींबरोबरच गडकरी, ह. ना. आपटे, चिं. वि. जोशी, कोल्हटकर, कवी यशवंत, बालकवी यांची साहित्यसंपदाही त्यांनी अभ्यासली होती. वडिलांकडे विद्वज्जनांची ये-जा असल्यामुळे मराठी व इंग्रजी पुस्तकांवर साहित्यचर्चा झडत. त्या कानावर पडून इंग्रजी साहित्याचाही अंतरकरांचा अभ्यास सुरू झाला.

    शाळेत असताना अंतरकरांनी ‘विद्याविनोद’ नावाचे एक हस्तलिखित मासिक हौसेने काढले होते. ते पाहून त्यांचे शिक्षक फाटक यांनी ‘हा मुलगा मोठेपणी उत्तम संपादक होईल’ असे भाकीत केले होते.
    शिक्षणासाठी अंतरकर मुंबईत दाखल झाले. इथे त्यांना अभिनय, नाट्यदिग्दर्शन यांचा छंद जडला, पण साहित्याचे प्रेम प्रबळ ठरले. अंतरकरांनी पत्रकारिता सुरू केली. भिन्न भिन्न प्रकारच्या कथा, कविता, समीक्षापर पुस्तके, नाटके, विडंबन काव्य, विनोद आदींच्या वाचनाने आणि परिशीलनाने त्यांचा साहित्यिक पिंड घडत गेला. शेक्सपिअर, मार्लो, बर्नार्ड शॉ, ओ. हेन्री, चेकॉव्ह, टॉलस्टॉय, अॅुगाथा ख्रिस्ती प्रभृती अभिजात साहित्यकारांपासून पी. जी. वुडहाऊस, सॉमरसेट मॉम, ऑर्थर कॉनन डॉयल या लोकप्रिय लेखकांच्या साहित्याचे त्यांनी वाचन केले. मराठीतल्या तत्कालीन नियतकालिकांबरोबरच ‘स्ट्रँड’, ‘व्हरायटी’, ‘अॅागासी’ यांसारख्या अभिरुचिसंपन्न पाश्चाॉत्त्य नियतकालिकेदेखील त्यांच्या नियमित वाचनात होती. जोडीला मराठी नाटके आणि हिंदी व इंग्रजी चित्रपट पाहण्याची त्यांना आवड होती. त्यांचे साहित्य-कलाविषयक शिक्षण अनौपचारिकपणे बरेच पुढे गेले. यातूनच त्यांचे अभिजात संपादकीय व्यक्तिमत्त्व घडत गेले. याच काळात त्यांनी विपुल लेखनही केले.

    सतरा-अठराव्या वर्षापासूनच त्यांच्या छंदोबद्ध कविता प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. 1930 ते 38 या काळात निरनिराळ्या दैनिकांत व साप्ताहिकांत अंतरकरांनी लेखन, वार्तांकन व संपादन केले. त्यांच्या कविता आणि गद्यलेखन ‘संजीवनी’, ‘विहार’, ‘विविधवृत्त’, ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रभात’, ‘चित्रा’, ‘आशा’, ‘धनुर्धारी’, आदी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. वेगवेगळ्या चौदा टोपणनावांनी ते हे लेखन करीत असत. याखेरीज ‘आकाशवाणी’साठी ते दर आठवड्याला एक श्रुतिकाही लिहीत असत. ‘चोरटे हल्ले’ आणि ‘गाळीव रत्ने’ ही प्रसिद्ध झालेली अंतरकरांची पुस्तके अभिजात विनोदाचा उत्कृष्ट नमुना म्हणून गाजली.

    १९३८ साली, वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ‘सत्यकथा’ या तेव्हा अगदी गंभीर स्वरूपात प्रसिद्ध होत असलेल्या मासिकाचे ते कार्यकारी संपादक बनले आणि पुढे गाजलेल्या अनेक लेखकांचे उत्तम साहित्य त्यात साक्षेपाने प्रसिद्ध करून त्यांनी त्या मासिकाला आघाडीचे ललित साहित्यिक मासिक बनवले. १९४२ ते ४५ या काळात त्यांनी ‘वसंत’ या मासिकाचे संपादन समर्थपणे केले.
    साहित्यक्षेत्रातील पूर्ण एक तपाच्या तपश्च्र्येनंतर अनंत अंतरकरांना ओढ लागली होती ती स्वत:च्या मालकीचे एक सर्वांगसुंदर आणि अभिरुचिसंपन्न मासिक काढण्याची. आपले हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम करून, प्रसंगी अर्धपोटी राहून थोडीशी पुंजी जमा केली आणि १९४६ मध्ये ‘हंस’ हे स्वत:चे मासिक सुरू केले. ‘हंस’च्या पाठोपाठ अंतरकरांनी १९५० साली विनोदप्रधान ‘मोहिनी’ची स्थापना केली आणि नंतर चार वर्षांनी १९५४ मध्ये सर्वार्थाने नवलपूर्ण अशा ‘नवल’ या मासिकाचा आरंभ केला. याच काळात या मासिकांची कचेरी त्यांनी दुबईहून पुण्याला हलवली.
    ‘हंस’च्या द्वारे कलात्मक कथावाङ्मयाला प्रोत्साहन देऊन त्यांनी यशस्वीरीत्या त्याचे पोषण व संवर्धन केले. नव्याने रूढ होत असलेल्या लघुकथेला अधिक प्रतिष्ठा प्राप्त करून देऊन त्यांनी एक नवेच ‘हंसयुग’ मराठी वाङ्मयात प्रस्थापित केले. कोणत्याही विशिष्ट संप्रदायाचा पगडा बसू न देता स्वच्छंद कथेच्या स्वायत्त अस्तित्वाला मान्यता देणारे ‘हंस’ हे एकमेव मासिक ठरले. गेल्या काही पिढ्यांतल्या श्रेष्ठसाहित्यिकांची सुरुवात ‘हंस’ व ‘मोहिनी’ या मासिकांमधून झाली आहे.

    ‘हंस’मध्ये कथांबरोबरच श्री. म. माटे, श्री. के. क्षीरसागर, वसंत शांताराम देसाई यांचे वैचारिक व समीक्षात्मक साहित्यदेखील नियमितपणे प्रसिद्ध झाले. विनोदी लेख, कथा, व्यंगचित्रे, नाटक-चित्रपटादी कलांचा आस्वाद यांच्यासाठी ‘मोहिनी’ हे एक दर्जेदार व्यासपीठ त्यांनी निर्माण केले. मुखपृष्ठावरील हास्यचित्र हे मोहिनीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य बनले. विनोदलेखनाच्या विकासात ‘मोहिनी’ने केलेल्या योगदानाची महती सुप्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगितली होती. ‘नवल’मुळे रहस्यमय, भयकारी, विस्मयकारी, विज्ञानाधिष्ठित, आदी आगळ्या आणि उपेक्षित साहित्यप्रकारांना उचित आणि मानाचे प्रतिष्ठान मराठीत प्रथमच प्राप्त झाले. भारतीय साहित्यकोषात तज्ज्ञ अभ्यासकांनी विज्ञानकथेचे अस्तित्व मराठीत टिकवून धरण्याचे श्रेय केवळ ‘नवल’ला दिलेले आहे. रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप यांनी या मासिकासाठी लिहिलेल्या कथांमध्ये वैचित्र्याबरोबरच साहित्यगुणही होते. वेगळ्या प्रकारचे लेखन करणार्याठ तरुण लेखकांची पिढी ‘नवल’मधून उभी राहिली. मराठी वाङ्मयाच्या विकासाला अंतरकरांच्या अभिजात आणि उदारमनस्क संपादकीय दूरदृष्टीने नेमकी दिशा दिली. त्यांच्या तीनही मासिकांचे आपापले वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप इतके विलोभनीय आणि सौंदर्यसंपन्न होते, की समकालीन नियतकालिकांनी त्यांचे अनुकरण केले. त्यांच्या मासिकांच्या धर्तीची बरीच मासिके पुढे सुरू झाली. केवळ ‘नव’संप्रदायात संकुचितपणाने अडकून न बसणार्याम लघुकथा, गूढकथा, फँटसी, रहस्यकथा, भयकथा यांसारख्या अनेक नवीन कथाविधांचा विकास मराठीत होऊ शकला तो अंतरकरांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळेच.

    कथेच्या स्वायत्त स्वरूपाचे अंतरकरांनी हिरिरीने रक्षण केले. त्यामुळे जी.ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, द. पां. खांबेटे, वसुंधरा पटवर्धन यांच्यासारख्या अनेक असामान्य लेखकांच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष मराठी साहित्याला संपन्न करते झाले. नवनवीन कथालेखक व कथेबाबतचे नवनवे प्रयोग पुढे आणण्याबाबत अंतरकर नेहमी प्रयत्नशील असत. लेखकांमधील प्रतिभेचा स्फुल्लिंग नेमका हेरणे, तो फुलवणे, लेखकाशी त्याचे लेखन अधिक प्रत्ययकारी कसे होऊ शकेल याबाबत विचारविनिमय करणे, त्याला आणखी कोणत्या प्रकारचे लेखन शक्य होईल याबाबत मार्गदर्शन करणे, प्रसंगी एखाद्याचे लिखाण पूर्णपणे पुन्हा लिहिणे, कथास्पर्धा घेणे, अशा नानाविध प्रकारे नव्या लेखकांची पिढी निर्माण करण्याचे कार्य अंतरकरांनी निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक सातत्याने केले. नव्या लेखकांना उपयुक्त ठरेल असा वाङ्मयविचारही त्यांनी आपल्या मासिकांतून- विशेषत: ‘हंस’मधून- विपुल प्रमाणात दिला.

    लेखकांप्रमाणेच वाचकांनाही घडवण्याचे कार्य अंतरकरांना महत्त्वाचे वाटे. वाचकांची साहित्यविषयक दृष्टी अधिक विशाल व जाणती करण्याच्या उद्देशाने अंतरकरांनी एक महत्त्वाचा उपक्रम चालवला, तो म्हणजे श्रेष्ठ अशा परकीय साहित्यकृतींचा मूल्यमापनासहित परिचय. अनेक भारतीय आणि परकीय भाषांतील अभिजात साहित्याचे सरस अनुवादही अंतरकरांनी आपल्या मासिकांतून प्रसिद्ध केले. अनुवादित कथांची स्पर्धा ते आयोजित करीत असत. दर्जेदार जागतिक वाङ्मयाच्या संदर्भात मराठी साहित्याचा विचार होण्यासाठी आणि त्याचा वेगळ्या दिशेने विकास होण्यासाठी या उपक्रमांचा निश्चिततच हातभार लागला. ‘हंस’-‘मोहिनी’मधील हास्यचित्रांचा दर्जा तत्कालीन इतर मराठी नियतकालिकांमधील हास्यचित्रांच्या तुलनेत फार वरचा होता. अंतरकरांनी अनेक विदेशी मासिकांमधल्या चित्रांची उदाहरणे दाखवून, चर्चा करून हास्यचित्रकारांचे मन:पूर्वक प्रबोधन केले. विदेशी हास्यचित्रांबद्दलचे आस्वादपर लेखही त्यांनी आवर्जून प्रसिद्ध केले. त्यामुळे कमीत कमी व मार्मिक शब्दांचा आधार घेणारी, रेखासुंदर, सुबुद्ध हास्यचित्रे साकार होऊ लागली. सजावट हा अंतरकरांच्या मासिकांचा मानबिंदू होता. मुळातच तल्लख असलेल्या दृश्य सौंदर्यदृष्टीमुळे चित्रकारांच्या कलेला न्याय देणारे उत्तम ले-आऊट्स आणि तंत्राचा अधिकाधिक उपयोग करून साधलेले परिपूर्ण मुद्रण त्यांच्या मासिकांना अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवीत असे.

    स्वत: सर्जनशील लेखक आणि उत्तम चित्रकार असलेले अंतरकर हे मराठीमधील एक दुर्मिळ, निष्ठावंत संपादक. मराठीत सर्वाधिक पुस्तके ज्यांना अर्पण केली गेली आहेत असे एकमेव संपादक.
    अभिरुचिसंपन्न कलात्मकता हा जीवनोद्देश असलेली अंतरकरांची मासिके जाहिरातींचा आधार बाणेदारपणे नाकारूनही, कोणतेही सरकारी अनुदान वा सवलत न घेता, केवळ रसिक वाचकांमधील लोकप्रियतेच्या जोरावर यशस्वी झाली. मराठी वाचकांची कथाभिरुची संपन्न करणार्याक हया द्रष्ट्या संपादकाचे ४ ऑक्टोबर १९६६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. अरुणा अंतरकर, हेमलता अंतरकर

      October 9, 2017


  • प्रतिभावंत गीतकार वर्मा मलिक

    बरकत राय मलिक उर्फ वर्मा मलिक यांचा जन्म १३ एप्रिल १९२५ रोजी फरीदाबाद पाकिस्तानचा येथे झाला.

    खूप लहान वयात त्यांनी कविता लिहण्यास सुरवात केली, फाळणीनंतर ते दिल्लीत स्थाईक झाले.

    संगीत निर्देशक हंसराज बहल यांचे भाऊ वर्मा मलिक यांचे मित्र होते त्याच्या मुळे ते मुंबईला आले. पंजाबी चित्रपटापासून वर्मा मलिक यांनी सुरवात केली. बहल यांनी वर्मा को पंजाबी चित्रपट 'लच्छी' ची गाणी लिहण्यास दिले. मा.वर्मा पंजाबी चित्रपटाचे हिट गीतकार झाले. याच वेळी त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव बदलण्यास सांगीतले बरकत राय मलिक हे वर्मा मलिक नावाने ओळखू लागले.

    वर्मा मलिक यांनी चाळीस पंजाबी चित्रपटासाठी गाणी लिहिली, तीन चित्रपटासाठी संवाद लिहिले व तीन चित्रपटासाठी निर्देशन केले. हिन्दी चित्रपट 'दिल और मोहब्बत' साठी 'आंखों की तलाशी दे दे मेरे दिल की हो गयी चोरी' हे गाणे लोकप्रिय झाले. पण ते प्रसिद्ध झाले नाहीत.

    मनोज कुमार वर्मा मलिक यांना ओळखत होते. त्यांनी आपल्या चित्रपटासाठी रात अकेली, साए दो हुस्न भी हो व इश्क भी हो तो फिर, इकतारा बोले तुन तुन, ही गाणी वर्मा मलिक यांच्या कडून लिहून घेतली. मनोज कुमार यांनी इकतारा बोले तुन तुन, 'यादगार' चित्रपटासाठी वापरले, ते गाणे गाजल्यामुळे मा.वर्मा हे प्रसिद्धीच्या झोकात आले. रेखा यांचा पहिला चित्रपट 'सावन भादों' मधील वर्मा यांनी लिहिलेले 'कान में झुमका चाल में ठुमका कमर पे चोटी लटके हो गया दिल का पुर्जा पुर्जा लगे पचासी झटके' हे गाणे अजून लोकांच्या ओठावर आहे.

    या नंतर 'पहचान', 'बेईमान', 'अनहोनी', 'धर्मा', 'कसौटी', 'विक्टोरिया न. २०३', 'नागिन', 'चोरी मेरा काम', 'रोटी कपड़ा और मकान', 'संतान', 'एक से बढ़कर एक', अश्या अनेक चित्रपटासाठी मा.वर्मा यांनी गाणी लिहिली. 'पहचान' चित्रपटातील गाणे सबसे बड़ा नादान वही है व 'बेइमान' चित्रपटासाठी जय बोलो बेइमान की जय बोलो या साठी त्यांना दोन वेळा फ़िल्मफेयर पुरस्कार मिळाला. 'सावन भादो' साठी ओमी यांनी वर्मा मलिक यांना गाणी लिहिण्यास सांगीतली. 'सावन भादों' ची गाणी हिट झाली. वारीस या चित्रपटातले 'मेरे प्यार की उमर हो इतनी सनम ' किंवा 'नागिन' यातील 'तेरे इश्क का मुझपें हुआँ ये असर है ' हि गाणी तर 'बेईमान' या चित्रपटातले, 'ये राखी बंधन है ऐसा', 'जैसे चंदा और किरण का, जैसे बद्री और पवन का, जैसे धरती और गगन का...' हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है एक मेमसाब है साथ में साब भी है मेमसाब सुंदर सुंदर है साब भी खूबसूरत है नेपाळी गुरख्याच्या भूमिकेतील प्राण यांच्या वर चित्रित झालेलं हे गीत चित्रपटाचं विषेश आकर्षण आहे. नेपाळी व्यक्ती हिंदी गीत गात असल्यानं 'स' अक्षराच्या जागी 'श'च्या उच्चाराची तसेच 'बोलना' क्रियापदावर कसरत करण्याची वर्मा मलिक यांनी कल्पकता केली होती.

    आजही हिंदी भाषीकाच्या लग्नाच्या वरातीत 'आज मेरे यार की शादी है' व बिदाईला 'बाबुल की दुआएं लेती जा' ही गाणी ही गाणी वाजवली किंवा गायली जातात. ही दोन्ही गाणी वर्मा मलिक यांची.

    वर्मा मलिक यांचे १५ मार्च २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://youtu.be/HIuYg2XBZMY

      March 18, 2017


  • मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री व वृत्तनिवेदिका, निर्मात्या आणि दिग्दर्शक स्मिता तळवलकर

    स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला.स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती. तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते.

    १९८३ साली त्यांनी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवले. तेव्हापासून त्यांनी आपल्या सुरेख अभिनयाने मराठी रसिकांवर मोहिनी घातली होती. अनेक मराठी चित्रपटांतील दर्जेदार अभिनयासाठी त्या रसिकांना परिचित होत्या. त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला होता. निव्वळ अभिनयातच नव्हे तर चित्रपट आणि टीव्हीच्या अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्या व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. १९८६ मध्ये त्यांनी "गडबड घोटाळा' व "तू सौभाग्यवती हो' या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाय रोवले. त्यांनी "अस्मिता चित्र' या निर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक चित्रपट व मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन केले.

    "कळत नकळत' व "तू तिथे मी' या चित्रपटांमधील अभिनयाने त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. "अस्मिता चित्र'चा "चौकट राजा' या चित्रपटामुळे १९९१ चे वर्ष स्मिता तळवलकर यांच्यासाठी खास ठरले. हा चित्रपट गतिमंद मुलाच्या आयुष्यावर बेतलेला होता. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख भूमिकेत होते. त्यामध्ये स्मिता तळवलकर यांनी "मीनल' म्हणजे या मुलाच्या बालपणापासूनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. संजय सूरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर सूरकर-तळवलकर जोडीने "तू तिथे मी', "सातच्या आत घरात', 'आनंदाचे झाड' असे यशस्वी चित्रपट दिले. "सवत माझी लाडकी' हा स्मिता तळवलकर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट होता. "अस्मिता चित्र' या बॅनरखाली त्यांनी सहा चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. पेशवाई, अवंतिका, सुवासिनी, उंच माझा झोका, अशा त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत.

    स्मिता तळवलकर यांनी चित्रपट शिक्षणासाठी "अस्मिता चित्र अकादमी' स्थापन केली होती. या अकादमीच्या पुणे, मुंबई आणि ठाणे येथे शाखा असून या अकादमीतून अनेक कलावंत घडले आहेत. कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. 'स्मिताची गोष्ट 'हे पुस्तक त्यांचे अनेक वर्षांचे मित्र योगेश्वर गंधे यांनी लिहिले आहे. पहिल्या २६ पानात चरित्र /आठवणी आहेत तर पुढील ४५ पानांत त्यांच्या कथा आणि लेख आहेत.

    स्मिता तळवलकर यांचे निधन ६ ऑगस्ट २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 5, 2017


  • ज्येष्ठ गायक मन्ना डे

    मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्या गीतांची संख्या इतर कोणाही अमराठी गायकाच्या तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत ” अ आ आई म म मका, धुंद आज डोळे”. त्याचबरोबर “घन घन माला नभी ” ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते.”घरकुल” चित्रपटातील “हाउस ऑफ बांबू”हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते.

      October 24, 2021


  • रशियन-अमेरिकन लेखिका आणि तत्त्वज्ञ आयन रँड

    आयन रँड यांची सर्वात जास्त गाजलेली ‘ॲ‍टलास श्रग्ड’ ही कादंबरी १९५७ मध्ये प्रकाशित झाली. ॲ‍टलास हे स्वतःच्या खांद्यावर पृथ्वी तोलून धरणारे ग्राीक पुराणकथेतील पात्र. या कादंबरीत जग तोलून धरणाऱ्या आदर्शवत मानवांची अशीच कल्पना केली आहे. त्यांनी एखाद्या क्षणी जर ही जबाबदारी नाकारली आणि खांद्यावरील ओझे झटकले तर काय.. मात्र हे आदर्श पूर्णपणे वस्तुनिष्ठतावादाला धरून आहेत. हे काही पारंपरिक नैतिक कसोटीवरचे सामाजिक धार्मिक आदर्श नव्हेत! स्वार्थ, आत्मकेंद्रित असणे म्हणजे पाप नाही हे यात ठासून सांगितले आहे.

      March 10, 2022


  • घुंगरु, अभिनय, कॅमेरा- कल्पिता राणे-सावंत

    सशक्त अभिनेत्री, अभ्यासू भरतनाटय़म नृत्यांगना ते व्हिएतनाम येथे पार पडलेल्या ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड 2017’ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेमध्ये टॉप 50मध्ये बाजी मारणारी प्रतिभावान स्पर्धक तर याच स्पर्धेमध्ये ‘मिसेस टॅलेंटेड’ हा बहुमान पटकावणारी सन्मानमूर्ती म्हणजे कल्पिता राणे-सावंत. अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग अशा तिहेरी कलांवर अधिराज्य गाजवणारी हुशार कलावती म्हणून कल्पिताची ओळख जगाला आहे. मध्यमवर्गीय घरात जन्मलेली आणि घरी कोणतीही कलेची पार्श्वभूमी नसताना, या क्षेत्रात कोणताही गॉडफादर नसताना कल्पिताने मिळवलेलं हे यश नेहमीच कौतुकास पात्र ठरलं आहे. मात्र तिचा हा प्रवास तितकाच खडतर आणि धैर्याचा होता, हे तिच्याशी बोलताना नेहमीच जाणवतं.

    कल्पिता एक उत्तम नृत्यांगना आणि कलासक्त अभिनेत्री तर आहेच, शिवाय ती बोलक्या चेहऱयाची मॉडेलदेखील आहे, हेच हेरून तिचे ‘फोटोंच्या गोष्टी’ या सदरासाठी फोटोशूट करायचं असं मी ठरवलं. सुरुवातीला भरतनाटय़म नृत्यप्रकारात आपला वेगळा ठसा उमटविलेल्या या नृत्यांगनेचा तिच्या नृत्यमुद्रा टिपण्याबाबत तिच्याशी मी बोललो. त्यानुसार तिचं कॉस्च्युम, मेकअप, हेअर हे करण्यात आलं. विजू माने प्रॉडक्शनच्या ‘स्टुडिओ 108’मध्ये तिचं हे फोटोशूट आयोजित करण्यात आलं होतं. भरतनाटय़म हा नृत्यप्रकार आणि म्हणूनच त्यातील भाव, मुद्रा, नृत्य करतानाची ऊर्जा हे सारं काही लाइव्ह शोच्या वेळी नीट टिपता येईल हे माहीत असूनही हे फोटोशूट करण्याचं मी ठरवलं. त्याचं कारण म्हणजे अनेकदा लाइव्ह शोमध्ये छायाचित्रकाराला हवी ती लायटिंग करता येतंच असं नाही. शिवाय यावेळी कलाकार त्याच्या कलेत गुंतलेला असल्याने त्याच्या मुद्रा या कॅमेऱयाच्या अँगलमध्ये नीट बंदिस्त करता येतात असं नाही. शिवाय कलाकाराच्या चेहऱयावर आलेला घाम, थकवा यामुळे ते फोटो फ्रेश वाटतातच असं नाही. या लाइव्ह शोच्या वेळी टिपता येतात ते कॅण्डीड फोटोज. मात्र मला ठरवलेले, पोज केलेले फोटो टिपायचे होते.

    सुरुवातीला फ्लॅट लायटिंग (मॉडेलच्या उजव्या आणि डाव्या बाजूला समान तीव्रतेचा प्रकाश टाकून केलं जाणारं छायाचित्रण) करून काही फोटो मी टिपले. यानंतर कल्पिताच्या विविध भावमुद्रा त्याच कल्पकतेने टिपण्यासाठी मी ड्रमॅटिक लायटिंग केली. ही लायटिंग करत असताना कधी प्रकाशाचा एक स्रोत तर कधी प्रकाशाचे दोन स्रोत वापरून तिच्या विविध नृत्यछटा, भावमुद्रा मी कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो. कल्पिताची प्रचंड ऊर्जा, तिचा भरतनाटय़मचा अभ्यास आणि याच्या जोडीला तिच्यात लपलेली सशक्त अभिनेत्री आणि मॉडेल या साऱयाचा उपयोग मला फोटोशूटसाठी झाला. साधारणपणे दोन अडीच तास हे शूट चाललं.

    कल्पिताने गेली अनेक वर्षे नृत्यक्षेत्रात आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे. अभिनय आणि मॉडेलिंग या क्षेत्रातही तिचं नाव अदबीने घेतलं जातं. इयत्ता तिसरीत असताना कल्पिताला अभिनयाची गोडी लागली. पृथ्वी थिएटरमधून अभिनयाचे प्राथमिक धडे तिने गिरवले. इथे तिची ओळख प्रेमा साखरदांडे यांच्याशी झाली आणि त्यांनी तिला सुलभाताई देशपांडे यांच्या ‘आविष्कार’ चंद्रशाळेत जाण्यासाठी सांगितलं. याच चंद्रशाळेत कल्पितावर अभिनयाचे संस्कार झाले. पुढे या संस्थेतर्फे ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटिकेतून काम करण्याची संधी तिला मिळाली. पुढे तिची निवड ‘झाशीच्या राणी’ या मालिकेसाठी करण्यात आली. या मालिकेत तिने झाशीच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तर यानंतर ‘हुंकार’, ‘मांगल्याचे लेणे’, ‘शंभूराजे’, ‘हे माझे नव्हे’ अशा अनेक व्यावसायिक नाटकांत आपल्या अभिनयाने रसिक मन जिंकलं.

    भारतीय विद्या भवनमधील गुरू विद्या राव यांच्याकडे भरतनाटय़मच कल्पिताने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. तर सीसीआरटी स्कॉलरशिप मिळाल्याने पुढे गुरू तेजस्विनी लेले आणि गुरू दीपक मुझुमदार यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवण्याची संधी तिला मिळाली. भरतनाटय़म विशारद आणि दहावीची परीक्षा असं दोन्ही एकाच वेळी उत्तीर्ण होत पुढे नालंदा डान्स रिसोर्स सेंटर तिने नृत्याचं पुढील शिक्षण घेतलं. तर सध्या ती डॉ. अलका लाजमी यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवत आहे. आपल्याकडे असलेल्या नृत्य अभ्यासाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने कल्पिताने कल्पांगण सांस्कृतिक केंद्राची स्थापना 2001 साली केली आणि यंदा ही संस्था 18व्या वर्षात पदार्पण करत आहे हे विशेष. या संस्थेत आजवर 700 विद्यार्थ्यांनी विविध कलांचे धडे घेतले असून सध्या 90 विद्यार्थी इथे शिकत आहेत.

    अभिनय आणि नृत्य या दोहोंची सांगड घालत असतानाच कल्पिताला मॉडेलिंग क्षेत्रानं खुणावलं. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या कल्पिताच्या घरी अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग यापैकी कसलीच पार्श्वभूमी नाही. एकत्रित कुटुंब पद्धतीचं तिचं माहेर. वडील एका कंपनीत नोकरीत रुजू तर आई गृहिणी. तिच्या लहानपणी अभिनय आणि नृत्य याला घरातून विरोध झालाही, परंतु कल्पिताच्या जिद्दीपुढे तो फार टिकला नाही. तर लग्नानंतर मॉडेलिंग क्षेत्रात उतरण्यास उलट तिच्या नवऱयाने प्रोत्साहन दिल्याचे ती सांगते. ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड 2017’ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत सहभागी झालेली कल्पिता 600 स्पर्धकांतून सर्वोत्कृष्ट 150 तर शेवटी टॉप 50च्या यादीत झळकली. व्हिएतनामला पार पडलेल्या विश्वविजेती या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱया कल्पिताला यावेळी ‘मिसेस टॅलेंटेड’ हा किताब देऊन गौरवण्यात आले. घरच्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे यश मिळवता आल्याचं ती सांगते. अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग या तिघांवर एकत्रित स्वार होणाऱया कल्पिताने आपला आदर्श नव्या पिढीसमोर घालून दिला आहे.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com

      February 9, 2019


  • गायक वसंतराव देशपांडे

    वसंतराव देशपांडे म्हटले की अनेक नाट्यगीते , ठुमरी आणि शास्त्रीय संगीतातील अनेक प्रकार आठवतात. याबरोबर आठवते ते त्यांचे ‘ कट्यार काळजात घुसली ‘ हे नाटक आणि त्यांनी केलेली खासाहेबांची अविस्मरणिय भूमिका.

      August 8, 2021


  • ख्यातनाम गझल गायक गुलाम अली

    गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४० रोजी झाला. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व होते. गुलाम अली यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांचे वडील त्यांना पहाटे पाच वाजता उठवायचे. नाही उठले तर काठीने मारून उठवायचे. का, तर बडे गुलाम अली खाँचे नाव खराब होऊ नये. तेव्हा ते पाच वर्षांचे होते.

    बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी बडे गुलाम अली खाँ त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या वडलांच्या असंख्य बिनत्यांची आबरू ठेवण्यासाठी गुलाम अली यांना ‘काहीतरी गा’ असे म्हणाले. त्यांनी धीर करून ‘सैयाँ बोलो तनिक मोसे रहियो न जाए’ ही ठुमरी गायली. गाणं संपताच बडे गुलाम यांनी पंधरा वर्षांच्या छोट्या गुलामला मिठी मारली आणि त्यांना आपला गंडा बांधला. तथापि, बडे गुलाम खरोखरीच अतिशय व्यग्र असल्याने त्यांचे तीन बंधू बरकत अली खाँ, मुबारक अली खाँ आणि अमानत अली खाँ यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले.

    १९६० साली गुलाम अली यांनी लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्यांना गझल गायक म्हणून भारत, पाकिस्तान व जगात अमाप लोकप्रियता मिळाली. गुलाम अलीजी एक मेहबूब गजल गायक आहेत. पाकिस्तानातील गजलचे बादशहा मेहदी हसन यांच्या नंतरच्या पुढच्या पिढीचे आणि समर्थ गजल गायक आहेत. त्यांच्या ‘चुपके चुपके’ने तीन दशकांपूर्वी लावलेले वेड अद्याप ओसरायला तयार नाही. हिंदुस्थानी ठुमरी गायकीची शैली गजलच्या फॉर्मसाठी यशस्वीपणे वापरणाऱ्या गुलाम अली यांनी शेकडो गजला गायल्या आहेत. त्यातील एक निवडणे हे इतर गजलांवर अन्याय केल्याशिवाय शक्य नाही.

    गुलाम अली व आशा भोसले यांचा मिराज ए गझल हा अल्बम फारच सुंदर आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=j3_CkTWf5HE

      December 5, 2017


  • बॉलिवूड अभिनेता अभिजित चव्हाण

    अभिजीत चव्हाण यांनी रंपाट,गोजिरी,सायकल आणि बऱ्याच मराठी सिनेमात लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. अगली, रॉकी हँडसम आदी हिंदी सिनेमात सुद्धा त्यांनी उत्तम काम केले आहे. तसेच पु.ल. देशपांडे ह्यांच्यावर आलेल्या “भाई” ह्या बायोपिक मध्ये आचार्य अत्रे ह्यांची भूमिका अभिजीत सरांनी केली आहे.

      April 11, 2022


  • मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

    एकाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फार आश्चर्य वाटते. पण जेव्हा एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असेल तर इंडस्ट्रीसह, प्रेक्षक व मिडीयाची देखील तारांबळ उडते. या दोन व्यक्ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर तारका सोनाली कुलकर्णी. या दोघींची ओळख सांगण्यासाठी प्रेक्षकांनी देखील छोटी सोनाली-मोठी सोनाली, सीनिअर सोनाली-ज्युनिअर सोनाली, अप्सरावाली सोनाली-दिल चाहतावाली सोनाली अशी वेगवेगळी नावेदेखील त्यांना दिली आहे.

    गंमत म्हणजे, मिडीया व प्रेक्षकांची तारांबळ उडू नये म्हणून या दोन सोनालींनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्येच बदल केला आहे. सीनिअर सोनालीने इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये आय लिहिते तर ज्युनिअर सोनाली डबल ई लिहीते. आज ज्युनिअर सोनालीचा वाढदिवस. तिचा जन्म १८ मे १९८८ रोजी खडकी पुणे येथे झाला. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले आहे.

    तिच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालय येथे झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय येथे झाले आहे. तिने फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. तसेच पुणे येथील इंदिरा स्कुल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारिते मधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

    सोनाली कुलकर्णीने कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कार चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ती मुळची पुण्याची आहे. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील 'अप्सरा आली' ह्या लावणीवरील नृत्यासाठी साठी ओळखली जाते. ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा, आणि झपाटलेला २ अशा चित्रपटामध्ये काम केले. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता , ज्याच्यासाठी तिला झी गौरव पुरस्कार च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले.

    स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतून हिंदी चित्रपटांकडे गेलेल्या काही मोजक्याच अभिनेत्रींना यश मिळाले आहे. यात सोनाली कुलकर्णीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. तिने ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला, ज्यात तिने रितेश देशमुख च्या पत्नी, ममता हीची भूमिका केली होती. तसेच अजय देवगण याच्या सिंघम २ ह्या चित्रपटात देखील सोनाली ने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. सोनाली कुलकर्णीचे 'सोशल मीडिया'वर फॅन सुद्धा जबरदस्त आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 20, 2017