(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नानासाहेब धर्माधिकारी

    समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली व आजही हे कार्य निष्काम त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरीत्या करत आहेत .

      March 1, 2024


  • सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांत खोत

    मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्‍यावरील फरकॅप गायब झाली होती.

      December 17, 2021


  • सुप्रसिद्ध लेखक वि.द.घाटे

    घाटे यांच्या साहित्यात कविता , व्यक्तिचित्रे , ललित निबंध , नाट्यप्रवेश , नाटके , क्रमिक पुस्तके, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके अशा विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. त्यांचे पांढरे केस हिरवी मने , काही म्हातारे व एक म्हातारी ह्यातील व्यक्तिचित्रे अप्रतिम आहेत.

      August 12, 2021


  • ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत

    सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. ‘लाखाची गोष्ट’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती.

      January 12, 2022


  • पंडित सी.आर.व्यास

    सुरूवातीला सी.आर.व्यास यांनी महाराष्ट्रातील बासरी गावातील पंडीत गोविंदराव भातांबेकर यांच्याकडे धडे घेतले. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला. पुढे पंडीत सी. आर. व्यास मुंबईमध्ये स्थायिक झाले पण त्यांनी ग्वालियर घराण्यातील राजारामबुवा पराडकर यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू ठेवले. आग्रा घराण्याच्या पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सांगितिक कौशल्य अधिक बहरले. अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. ‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे. संगीताच्या दुनियेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल १९८७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९२ साली पद्मभुषण पुरस्कार आणि १९९९ साली तानसेन पुरस्कार मिळाले.

    सी.आर.व्यास यांचे १० जानेवारी २००२ रोजी त्यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      January 11, 2017


  • ज्येष्ठ संपादक पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे

    उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.

      May 31, 2022


  • मराठी अभिनेते सुनील अभ्यंकर

    नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या सुनील अभ्यंकर यांना नाटकात भूमिका करणेच अधिक आव्हानात्मक वाटते. अभिनयाचा खरा कस हा रंगमंचावरच लागतो असे त्यांचे मत आहे. त्यांच्या वाट्याला आता पर्यंत विनोदी अंगाने जाणाऱ्या भूमीकाच आल्या असल्यातरी त्यांना गंभीर भूमीका करणेही आवडते. एका गंभीर भूमिकेच्या प्रतीक्षेत ते आहेत. तसेच खलनायकी ढंगाची भूमिका करणेही त्यांना आवडते. मात्र अद्याप त्यांना तशी संधी मिळालेली नाही.

      June 17, 2022


  • रसिकांना मंत्रमुग्ध करत थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी

    आपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी यांची आज पुण्यतिथी

    जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच उत्तम हार्मोनियम वाजवण्याची सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असोत जयवंत कुलकर्णी यांच्या “हिल पोरी हिला” किंवा “ही चाल तुरू तुरू” या दोन गाण्यांना हमखास “वन्स मोअर” मिळत असे. विशेष म्हणजे “सावध हरिणी सावध” या गाण्याला देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि संगीतविश्वात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कारण या गाण्याला उडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा अनुभवायला मिळाला आणि मराठी चित्रपट व भावगीतांसाठी हा प्रयोग तसा नविनच होता. खरं पाहिलं तर जयवंत कुलकर्णी यांनी त्यांचा सांगितीक कारकीर्दीत जी कोणती चित्रपट गीत गायली त्या बहुतांश गाण्यां मध्ये “गावरानबाज” पहायला मिळत असे. पण विशिष्ठ कोणत्याही एकाच ढंगातील गायन प्रकारात व अडकता जयवंतजींनी “अष्टविनायका तुझा महिमा कसा”, “अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी, नाम त्याचे श्रीहरि नाम त्याचे श्रीहरि”, “ विठुमाऊली तु माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठठ्लाची ” आणि “राम कुष्ण नारायण हरि, केशवा मुरारी पांडुरंगा” यासारखी अध्यात्मिक गीत आणि अभंग तल्लीन होऊन गायले! तसंच “अजिंक्य भारत अजिंक्य जनता” , “मंगल देशा पवित्र देशा” या दोन्ही गीतील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रगट झाला नसता तर नवलच !

    “शाब्बास बिरबल शाब्बास बिरबल” हे मराठी संगीत संगभूमीवर गाजलेले नाटक आणि त्यातील “विश्वानाथ सूत्रधार तूच श्याम सुंदरा ” ही नांदी आजही ऐकल्यावर ताजी वाटावी अशीच आहे, या नांदीला जयवंत कुलकर्णींसह पंडित-राम मराठे आणि रामदास कामत या गायकाने स्वरबध्द केले होते. या नांदीमुळे जयवंत कुलकर्णी यांच्या गायकीच्या शिरपेचात नाट्यपद गाण्याचा तुरा देखील रोवला गेला. मराठी चित्रपटांतील द्वंद्व गीतांमध्ये काही गायक-गायिकांच्या जोड्या गाजल्या, त्यापैकी जयवंत कुलकर्णीं सोबत उषा मंगेशकर ही गायनातील जोडी स्वरांच्या तालावर अक्षरश: ठेका धरायला लावत. या दोन्ही गायकांनी एकत्रित गायलेली सोंगाड्या चित्रपटातील “काय गं सखु”, आणि “माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी” तर “सख्या साजणा” मधील “चल चल जाऊ शिणुमाला”, किंवा गारंबीचा बापू चित्रपटातील “चांदणं टिपूर हलतो वारा” तसंच “लागे ना, लागे ना रे थांग तुझ्या ह्रदयाचा ” आजही आपल्या ओठांवर रुंजी घालताहेत. यासह नवरा माझा ब्रम्हचारी मधील “आई तुझं लेकरु येडं गच कोकरु”, पडछाया चित्रपटातील “नाच लाडके नाच, जगापासुनी दूर राहुया नको जनांचा त्रास”, तर “अनोळखी”तलं “ जीवन गगन मी पाखरू ” आणि “अंधाराची खंत तू कशाला करिसी रे”, “नाते जुळले मनाचे मनाशी” या भावगीतातून मानवी मनाचा वेध त्यांच्या स्वरातनं अगदी प्रभावीपणे उमटला. “आमचा राजू का रुसला” , “माझ्या मामाची रंगीत गाडी हो,तिला खिल्लारी बैलांची जोडी हो” , “ गाव असा नि माणसं अशी, नातीगोती जडतंत कशी” अशी मिश्कील स्वरुपाची व बालगीते रसिकांनी उचलून धरली. “आयलय तूफ़ान बंदराला” या चित्रपटासाठी, लता मंगेशकर यांच्यासोबत, “आयलय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव आज ” , हे क्वचित प्रसंगी ऐकायला मिळणारे अगदी वेगळ्या प्रकारचे कोळीगीत गायले होते.जयवंत कुलकर्णीं यांनी गायलेली प्रत्येक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. यामध्ये भावगीतं, भक्तीगीतं व असंख्य चित्रपटगीतांचा देखील समावेश आहे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले. अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान जयवंत कुलकर्णींचा आहे. “ज्योतिबाचा नवस” आणि “एकटा जीव सदाशिव” या चित्रपटातील गाण्यासाठी जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये गौरवण्यात आले होते.

    मा.जयवंत कुलकर्णी यांचे ३१ ऑगस्ट २००५ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून मा.जयवंत कुलकर्णी यांना आदरांजली.

    --संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. सागर मालाडकर/ मराठी सृष्टी

      August 31, 2016


  • पटकथाकार, लेखक अण्णासाहेब देऊळगावकर

    विजय कोंडके यांच्या ‘माहेरच्या साडी’ने तर अनेक बाबतीत विक्रम केला होता. अण्णांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या पटकथा-संवादांनी संपूर्ण महाराष्ट्राला रडवले. या चित्रपटाच्या हृदयस्पर्शी संवादांनी घराघरातल्या स्त्रियांच्याच नव्हे, तर पुरुषांच्याही काळजाला हात घातला होता.

      June 3, 2022


  • संजय खान

    संजय खान हे फिरोज खान आणि अकबर खान यांचे बंधू. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९४१ रोजी झाला. संजय खान यांनी साठ च्या दशकात अभिनयाला सुरुवात केली.१९६४ साली दोस्ती या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलीवुडच्या दुनियेत पाऊल ठेवले. साठ व सत्तर च्या दशकात त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.'दस लाख','एक फूल दो माली','इंतकाम','उपासना','मेला','नागिन'' सोना चांदी','काला धंधा गोरे लोग'हे त्यांचे निवडक गाजलेले सिनेमे. अभिनयाबरोबरच संजय खान यांनी दिग्दर्शक,निर्माती आणि पटकथा लेखकाच्या रुपातही आपली ओळख निर्माण केली.'महा काव्य महाभारत 1','जय हनुमान','द सॉर्ड ऑफ टीपू सुलतान' या मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

    द सॉर्ड ऑफ टीपू सुलतान'ही मालिका त्यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरली. संजय खान यांचे लग्न जरीन खान यांच्यासोबत झाले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 3, 2018