(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डग्लस माँच

    बॅटमॅन, कॉनन दी बारबॅरिअन आणि जेम्स बाँडसारख्या लोकप्रिय व्यक्तिरेखा कॉमिक्सच्या माध्यमातुन प्रसिध्द करणारे डग्लस माँच यांचा जन्म. २३ फेब्रुवारी १९४८ रोजी शिकागो येथे झाला.

    डग्लस माँच हे प्रामुख्याने ओळखले जातात, ते त्यांनी लिहिलेल्या ‘बॅटमॅन’च्या कथांबद्दल!
    ‘बॅटमॅन’ व्यतिरिक्त, मून नाइट हा सुपरहिरो, ब्लॅक मास्क हा सुपरव्हिलन, डेथलॉकसारखा सायबॉर्ग, इलेक्ट्रिक वॉरिअर हा रोबॉट, सिक्स फ्रॉम सीरिअस हे विश्वातल्या आकाशगंगांमधले एजंट्स आणि मास्टर ऑफ कुंग फू अशा त्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत व्यक्तिरेखांची दुनिया डीसी कॉमिक्स आणि मार्व्हल कॉमिक्समधून बच्चेकंपनीचं वर्षांनुवर्षं मनोरंजन करत राहिली. त्यांनी ‘प्लॅनेट ऑफ दी एप्स’च्या कथाही लिहिल्या. डग्लस माँच यांना इंकपॉट अॅवॉर्ड, इगल अॅवॉर्ड, हॅक्स्टर अॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 29, 2024


  • सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर

    दिनयार कॉन्ट्रॅक्टर हे सशक्त अभिनेते म्हणून परिचित होते. दिनयार यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. व्यावसायिक रंगभूमीपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.

      June 11, 2021


  • बंगाली आणि हिंदी गायक, अभिनेते संगीतकार पंकज मलीक

    पंकज मलीक ह्यांनी सुरुवातीच्या बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. हे रवीन्द्र संगीतात विशारद होते. रवीन्द्र संगीताला शान्तिनिकेतन मधून लोकांच्या पर्यत पोहचवण्याचे श्रेय पंकज मलिक यांनाच जाते.

      May 10, 2019


  • जेष्ठ संगीतकार रोशन

    रोशनलाल नागरनाथ उर्फ रोशन यांनी लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून संपूर्ण भारत दौरा केला होता. त्यांचा जन्म १४ जुलै १९१७ रोजी पाकिस्तानातील गुजरानवाला येथे झाला. पुढे उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर काढले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने पळ काढला. त्यानंतर लखनौच्या मॉरिस संगीत महाविद्यालयातून संगीतात एम. ए. केले आणि दिल्ली रेडिओ स्टेशनवर पियानोवादक म्हणून नोकरी सुरू केली. बडोदा रेडिओस्टेशन वर नोकरी करत असताना प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि गीतकार केदार शर्मा यांचे लक्ष रोशनकडे गेले आणि त्यांच्या कंपनीमध्ये रोशन संगीतकार स्नेहल भाटकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागले. १९४९ मध्ये "नेकी और बदी" चित्रपटाच्या वेळी रोशनच्या काही चाली आवडल्याने त्यांनी स्नेहल भाटकरांना तीन चार महिने रजा देऊन त्या चित्रपटाचे काम रोशनला दिले. चित्रपट आणि गाणी सपशेल अयशस्वी झाली. रोशन यांच्या १९४९ ते १९६७ अश्या आपल्या कारकीर्दीत आपल्या पहिल्या १९४९ ते १९६० काळात अभिजात, शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी दिली. मात्र हे चित्रपट आणि गाणी गाजली नाहीत. या काळात आलेले मल्हार, अनहोनी, नौबहार, रागरंग, आगोश, बराती, रंगीन रातें, मधु, अजी बस शुक्रिया, अश्या चित्रपटातली गाणी ऐकली तर हे प्रकर्षाने लक्षात येते. आणि १९६० ते १९६७ काळात म्हणजेच दुसऱ्या भागावर मुख्यतः मुसलमानी संगीताचे वर्चस्व राहिले आहे. बरसात की रात, ताजमहल, बाबर, नूरजहाँ, बेदाग, वगैरे चित्रपटातली गाणी ऐकली तर हे लक्षात येईल. अर्थात आरती, ममता, भीगी रात असे मुसलमानी संगीत नसलेलेही चित्रपट या काळात आले. नवीन कवींना संधी देणारा संगीतकार अशी रोशन यांची प्रतिमा होती. नुसतेच नवीन नाही तर जुन्या काळातले "हम भोर के दिये है बुझतेही जा रहे है" असे अस्ताला चाललेल्या पिढीचे तनवीर नकवी, डी. एन. मधोक, खुमार बारा बंकवी, नक्षब यांच्यासारखे, त्या काळातले शैलेंद्र, मजरूह, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण यांच्यासारखे प्रस्थापित, इंदीवर, आनंद बक्षी, नक्ष ल्यालपुरी यांच्यासारखे संघर्ष करणारे आणि पुढे प्रस्थापित झालेले, सत्येंद्र, कैफ इर्फानी, उद्धवकुमार, वीर मोहंमद पुरी, शिवकुमार, राहिल गोरखपुरी असंख्य होतकरू गीतकार तसेच गीतकार नसूनही हौस म्हणून एखादे गाणे लिहिणारी संगीतकार उषा खन्ना यांच्यासारखे सर्व प्रकारचे गीतकार या काळात रोशनच्या संगीतात दिसतात. इंदीवर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते" मी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्थिर झालो तो संगीतकार रोशनमुळे. रोशन आम्हाला तुमचे गीत हे रवींद्रनाथांच्या कवितेसारखे झाले पाहिले असे सांगत असे, एका एका गाण्याचे दहा दहा अंतरे लिहून घेऊन त्यातले सर्वोत्तम तीन अंतरे निवडत असे. "त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे कवी आणि कवितांमधील विविधता. जरी संगीतकार रोशनचे नाव घेतल्यावर साहिर लुधियानवी आणि मजरूह सुलतानपुरी या दोनच गीतकारांची नावी प्रामुख्याने समोर येत असली तरी ५३ चित्रपटांसाठी रोशन यांनी ५२ गीतकारांबरोबर काम केले. रोशन यांचे १६ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / मनोगत.

      July 17, 2017


  • हिंदी पार्श्वगायिका हेमलता

    हेमलता हे नाव ऐकले की ७० व ८० च्या दशकातील गाणी आठवतात. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातल्याच एक हेमलता. त्याचे लग्नाआधीचे नाव विवाह लता भट होते. त्यांनी अभिनेता योगेश बाली यांच्याशी विवाह केला होता. त्यांनी संगीताचे आणि गझल चे शिक्षण उस्ताद रईस खान यांच्याकडे घेतले होते. वय १४ व्या वर्षी हेमलता यांना खय्याम याच्या कडून गाण्याची संधी मिळाली.

    चित्रपट, मैफिल, टेलिव्हिजन आणि संगीत त्याच्या गायन भिन्न प्रकारांमध्ये अल्बम गीते त्यांनी गायली. ३८ प्रादेशिक भाषांमध्ये सुमारे ५००० गाणी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गायली आहेत. मा.हेमलता यांना १९७७ ते १९८१ च्या दरम्यान पाच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता त्यांनी जवळपास सगळी गाणी फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावीत. त्यांची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली उदा.जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 16, 2017


  • बीना रॉय

    बीना रॉय या मूळ लखनौच्या होत्या व त्यांनी १९५१ मध्ये ‘काली घटा’ या चित्रपटातील भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. बीना रॉय यांचा जन्म ४ जुन १९३८ रोजी झाला. त्यावेळी किशोर साहू हे त्यांचे सहकलाकार होते. त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

    बीना रॉय यांचा विवाह चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे मेहुणे प्रेमनाथ यांच्याशी झाला व त्या कपूर घराण्याचा भाग बनल्या. बीना रॉय व प्रेमनाथ यांनी काही चित्रपटात एकत्र काम केले होते, त्यात औरत चा समावेश होता विवाहानंतर या दोघांनी पी.एन.फिल्मस ही कंपनी काढली होती.

    शगुफा हा त्यांच्या या कंपनीचा पहिला चित्रपट होता. समुंदर व वतन हे आणखी दोन चित्रपट त्यांनी काढले पण ते चालले नाहीत. बीना राय यांनी प्रदीपकुमार समवेत केलेले चित्रपट गाजले होते. अनारकली, ताज महल, घुंगट हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले होते. बीना रॉय यांचे ६ डिसेंबर २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 9, 2019


  • मेट्रो मॅन’ ई श्रीधरन

    रेल्वे स्थापत्यशास्त्रातील आपली कारकिर्द पन्नास वर्षाहून अधीक काळ गाजवून डॉक्टर ईलत्तुवलपीळ श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदा वरून निवृत्ती पत्करली तेव्हा त्यांचं वय होतं अवघं ७९ वर्ष ६ महिने आणि २० दिवस. ‘मेट्रो मॅन’ म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्रीधरन यांच्या निवृत्तीची दखल जगभरातल्या प्रसारमाध्यमांना घ्यावी लागली इतके या आधुनिक विश्वकर्म्याचं कर्तृत्त्व मोठं आहे.

      June 25, 2021


  • सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांत खोत

    मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्‍यावरील फरकॅप गायब झाली होती.

      December 17, 2021


  • मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी

    आज १४ ऑक्टोबर. भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांची जयंती. त्यांचा जन्म१४ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला.

    निखिल बॅनर्जी यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरु केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरु म्हणजे मैहर चे अलाउद्दीन खान. अल्ला उद्दीन खान साहेबांनी निखील बॅनर्जी यांची गुणवत्ता पाहून अतिशय कठीण अशा प्रकारे त्यांच्याकडून रियाज करून घेतला. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याहून पलीकडील सांगीतिक ज्ञान निखील बॅनर्जी यांना त्यांच्याकडून मिळाले. यामुळे निखीलजींनी आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली. अल्लौद्दिन खान यांच्यानंतर निखील बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले. मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिलजींनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदी चे कार्यक्रम केले. तसेच आकाशवाणी वर सुध्धा ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांनी अनेक पहिला परदेश दौरे केले. ध्वनिमुद्रनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. निखिलजींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी वादन शैली निर्माण केली. त्यांच्या शैलीत गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसतो. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. परंतु त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळते. सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते. त्यांचा भर पारंपारिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इ. राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते. भारत सरकाने निखिल बॅनर्जी यांना १९६८ साली पद्मश्री पुरस्कार व १९८६ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. १९७४ साली निखिल बॅनर्जी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. मा.निखिल बॅनर्जी हे सर्वकालीन सर्वोत्तम सतार वादकांमधील एक म्हणून गणले जातात. मा.निखिल बॅनर्जी यांचे २७ जानेवारी १९८६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. मराठी विकिपीडिया

      October 14, 2016


  • ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे

    मामा पेंडसे यांचा जन्म २८ ऑगस्ट १९०६ रोजी सांगली येथे झाला.

    मामा पेंडसे हे गाजलेले नट होते. ‘पंडितराज जगन्नाथ’,‘वहिनी’,‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. मामा पेंडसे यांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. मामांचा दुधाचा व्यवसाय होता. केवळ नाटकातून मिळणा-या बिदागीवर संसार चालवणे शक्य नसल्यामुळे एखादा जोडधंदा असणे त्याकाळी गरजेचे होते. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी त्यांनी स्नेहसंमेलनांतल्या नाटकांत केलेली कामे थोरामोठ्यांच्या लक्षात आली होती.

    वास्तविक नट होण्याच्या इच्छेने त्यांनी नाटक मंडळीत प्रवेश केला नव्हता. घरची गरिबी, वडिलांना मासिक साडेबारा रुपये पेन्शन. घरी परिवार मोठा. संसारास काही मदत करावी या हेतूने ते पेंटरच्या हाताखालचा गडी या नात्याने वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर संगीत मंडळीत काम करण्यास सुरुवात केली. त्यांना लहानपणापासून पेंटिंगची फार आवड. नाटकांतील पडदे रंगवणा-या शंकरराव गायकवाडांकडून पेंटिंगचे धडे घ्यावे व नंतर स्वतंत्र पेंटिंगचा व्यवसाय सुरू करावा या उद्देश्यने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. मामांनी नाटकांचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली. ते करताकरता मामांना नाटकांत काम करायची संधी मिळाली.

    १९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्र्यायहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. पुढे ’समर्थ नाटक मंडळी’, 'महाराष्ट्र नाटक मंडळी’, ललितकलादर्श अशा नामांकित नाटक कंपन्यात मामांना कामे मिळू लागली. लोकांनी मामांना नटवर्य ही उपाधी दिली. विष्णुदास भावे सुवर्णपदक, मराठी नाट्य परिषदेचे सुवर्णपदक महाराष्ट्र सरकारने रोख ९५ हजार रुपयांचा पुरस्कार आणि मानपत्र दिले. मुंबईत साहित्य संघात मामांचा भव्य नागरी सत्कार झाला होता. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. १९७२ साली ठाणे शहरात झालेल्या ५३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद मामा पेंडसे यांनी भूषविले होते. मामा पेंडसे यांचे ‘केशराचे शेत’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर हे मामा पेंडसे यांचे जावई.

    मामा पेंडसे यांचे १२ जानेवारी १९९१ रोजी निधन झाले.

    मामा पेंडसे यांची भूमिका असलेली नाटके.

    आंधळ्यांची शाळा, खडाष्टक, दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नालथ, संन्यस्त खड्ग.

      January 12, 2022