(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चिरतरुण, चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले

    आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला मागे पाडेल, एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात आहे. ८४ व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा...’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे.

    आशाताई अघोषित भारतरत्न’च आहेत, हे कोणताही संगीतरसिक नाकारणार नाही. लतादीदींसोबत कुण्याही गायिकेची तुलना होऊच शकत नाही, हे एकवेळ मान्य केले तरी,लतादीदींच्या तुलनेत आशा भोसलेंचे गानकर्तृत्व कुठेही मागे नाही. उलट आशा भोसले यांच्या सुरांना जी ‘शार्प धार’ आहे, जे माधुर्य आहे, शब्दफेकीची अनोखी नजाकत आहे, ते अन्य कोणत्याही गायिकेकडे नाही. गाण्यांची जेवढी व्हेरायटी; मग ते शास्त्रीय गीत असो, गज़ल असो, मादकगीत असो, भक्तिगीत-भावगीत असो, पॉपगीत-कॅबरेगीत असो,लावणी-ठुमरी असो वा कव्वाली असो; सादरीकरणाची खास शैलीतील विलक्षण हातोटी आशा भोसलेंनी जोपासली आहे, जी अन्य कुठल्याही गायिकेच्या वाट्याला आली नाही, याची पावती तर दस्तुरखुद्द लतादीदीही देतात! स्वतंत्र छाप आशाताईंनी संगीतविश्वाीच्या सुरील्या दुनियेत उमटवली, तेही लतादीदींसह शमशाद बेगम, गीता दत्त, नूरजहॉं, सुरैया यांसारख्या पट्टीच्या गायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असताना! सर्वांत मोठी गोष्ट अशी की, आशा भोसले यांना वैवाहिक जीवनात, चित्रपटसृष्टीत जो संघर्ष करावा लागला, तेवढा अन्य कुठल्याही गायिकेला नाही! तब्बल सहा दशके रसिकमनावर गारूड घालणार्याज व आज वय वर्षे ८४ असतानाही तोच मधुर स्वर आशाताईंकडे आजही कायम आहे. मात्र, ‘मेलोडी क्वीन’ आशाताई यांचा सहा दशकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण, खडतर असाच राहिलेला आहे. प्रारंभी अतिशय वाईट दिवस त्यांनी आयुष्यात अनुभवलेले आहेत. वयाने जवळपास दुप्पट असलेल्या ज्या व्यक्तीवर नितांत प्रेम केले व लतादीदींसह घरातील सर्वांचाच कडाडून विरोध असताना त्यांचा रोष पत्करून आयुष्याचा जोडीदार म्हणून घरातून पळून जाऊन ज्याची मोठ्या विश्वारसाने निवड केली, त्याच्याचकडून म्हणजे गणपतराव भोसले यांच्याकडून विश्वाूसाला तडा गेल्यानंतर जिव्हाळ्याचे सर्वच लोक गमावल्याचे जे दिवस आशाताईंनी अनुभवले व त्यानंतरही त्या न डगमगता कुणाच्याही सहकार्याविना केवळ आपल्या गानकौशल्याच्या बळावर ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि प्रचंड यशस्वी झाल्या, त्याला खरोखरच तोड नाही! ‘संघर्षाचं प्रतीक’ म्हणूनही आशाताईंकडे पाहिल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण ती वस्तुस्थिती आहे. त्यांच्या जागी अन्य दुसरी कुठलीही महिला राहिली असती, तर कदाचित कधीच आत्महत्या करून मोकळी झाली असती. कारण, पदरात दोन मुले टाकून व गर्भात एक बाळ सोडून गणपतराव भोसले व त्यांचे बंधू आशाताईंच्या जिवावर उठले होते.अतिशय घाणेरडी वागणूक मिळाल्याने आशाताईंनी ६० साली गणपतराव भोसले यांच्याशी घटस्फोट घेतला होता, हा सत्य परंतु कटु असा खाजगी इतिहास आहे. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याच स्वीय सचिवासोबत लग्न केले म्हणून संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या कर्त्याकरवित्या लतादीदी यांचीही साथ-जिव्हाळा त्या गमावून बसल्या होत्या. गणपतराव हे लतादीदींचे स्वीय सचिव होते.लग्नाच्या वेळी आशाताईंचं वय १६ तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. अशा कठीण दिवसांत आशाताईंनी कारकीर्द घडवायला प्रारंभ केला तेव्हा त्यांना अनेक खडतर, कटु अनुभवांचा सामना करावा लागला. कुणी गाणे गाण्याची संधी देत नसत, अन्य गायिकेने नकार दिलेली गाणी त्यांच्या वाट्याला येत असत, अल्प मानधनावर त्यांना टुकार गाणी गावी लागत असत. बी ग्रेड, सी ग्रेड नायिकांवर चित्रित असलेली गाणी त्यांना गावी लागत असत. हे सर्व आशाताईंच्या वाटेला प्रारंभी येत गेलं व आशाताईंनीही नशिबाचे भोग समजून ते स्वीकारलं. स्वीकारण त्यांना भागच होतं, परिस्थितीच तशी होती! मात्र त्यांनी, मिळालेल्या या प्रत्येक संधीचं सोन्यात रूपांतर केलं, असं की ‘देखनेवाले देखतेईच रह्य गये!’ प्रत्येक गाणं तन-मन ओतून असं काही तडाखेबाज गायलं की बस्सं़! आशाताईंच्या वाईट दिवसांमध्ये गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर या फिल्म इंडस्ट्रीतील टॉपच्या गायिका होत्या. पुढे पंचमदांची साथ मिळाल्यानंतर आशाताईंनी एकापेक्षा एक अशा गाण्यांची ज्या गोडव्याने बरसात केली, त्याने ‘चिंब’ झालेले रसिकमन कधीच ‘कोरडे’ होत नाही. लावणी, भावगीतं-भक्तिगीतं, गज़ल, पॉप, उडत्या चालीतली गाणी, लोकगीतं, कव्वाली, रवींद्र संगीत आदी सर्वांमध्ये आशाताईंनी अमिट मुद्रा उमटवली.

    १९४३ साली ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियॉं’ या चित्रपटात ‘सावन आया...’हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है...’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं.

    ५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहाबसोबतचं ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्‌ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’,मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ,पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणार्या’ ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीनबॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’,‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप मोठी गाणी आशाताईंची आहेत. मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगडिणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडके उपाख्य बाबुजींसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’,भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’...

    'राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला.

    आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.

    आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ - इंटरनेट

      September 8, 2016


  • हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ विनोदी अभिनेते केश्टो मुखर्जी

    हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट विनोद वीरांमध्ये केश्टो मुखर्जी यांचे नाव येते. बहुतेक चित्रपटांमध्ये केश्टो मुखर्जी यांनी मद्यपीची भूमिका साकारली होती, परंतु आपल्या जीवनात त्यांना कसलेही व्यसन नव्हते.

      April 27, 2024


  • ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल

    श्याम बेनेगल यांनी चित्रपट सृष्टीत भरीव योगदान दिले आहे. आजही अशाप्रकारचे योगदान देण्यामध्ये सक्रिय आहेत. त्यांनीच स्मिता पाटील यांची ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘मंडी’ चित्रपटासाठी निवड केली होती.

      December 14, 2021


  • नाट्यनिर्माते संतोष कोचरेकर

    संतोष, कसेही कर आणि एक गाढव घेऊन ये’… वडिल नाना कोचरेकर (नारायण धर्माजी कोचरेकर) यांनी फर्मान सोडले. संतोष कोचरेकर यांनी आजुबाजूला खूप शोधाशोध केली आणि कसेबसे एका माणसाकडून गाढव भाड्याने मिळवले. नानांनी त्या गाढवाला बाशिंग बांधले, मुंडावळ्या बांधल्या. सोबत वाजंत्री घेतली. माइक संतोष यांच्या हातात होता. ‘आज रात्रौ थिएटरमध्ये बघायला या, गाढवाचं लग्न. आहेराचा दर ३ रुपये, २ रुपये’. मालवणमधील लोक टकामका पाहू लागले. युक्ती सफल झाली आणि संध्याकाळी नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला.

      April 5, 2022


  • एमबीए पदवीधर असणारी पहिली महिला सरपंच – छवी राजावत

    मुंबईमधील मल्टीनॅशनल कंपनीत तगड्या पगाराची नोकरी सोडून राज्यस्थानच्या टोंक जिल्यातील सोढा पंचायतीची सरपंच छवी राजावत यांनी पूर्ण पंचायतीला आदर्श पंचायतमध्ये परिवर्तीत केले आहे. गावाच्या विकासासाठी त्या सरकारी पैशांवर निर्भर न रहाता, खाजगी क्षेत्रातून गुंतवणूकीची व्यवस्था करीत आहे. सोढा मध्ये पाणी, वीज, रस्त्यांच्या सुविधांचा अभाव या हद्दपार झालेल्या गोष्टी आहेत आता इथला ऐरणीचा विषय म्हणजे गावात बँक, एटीम, सौर उर्जा, सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची सोय या व्यतिरिक्त जनावरांच्या चाऱ्यासाठी एखाद्या जागेची सोय. दिल्लीतील कॉलेज मधून आलेल्या मुलींशी गावातील स्त्रिया व मुली, मासिक पाळी व प्रसूती या मोकळेपणाने न बोलता येणाऱ्या विषयांवर चर्चा करू लागल्या.

      September 26, 2017


  • ईमेलचे जनक रे टॉमिल्सन

    अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन बोस्टनमधील एका रिसर्च कंपनीत काम करत असताना, रे टॉमिल्सन यांनी १९७१ मध्ये पहिला ईमेल पाठवला आणि ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९४१ रोजी झाला. रे टॉमिल्सन यांनी ही कामगिरी केली, तेव्हा इंटरनेटची सुरुवादेखील झाली नव्हती. मात्र जगात ही क्रांती घडायला पुढची २० वर्षं जावी लागली. टॉमिल्सन यांनी @ या साईनचा वापर केला होता जो आजपर्यंत वापरला जातो. टॉमिल्सन यांनी १९६० सालीच SNDMSG या प्रोग्रामद्वारे एकाच कॉम्प्युटरमध्ये एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवण्याचं तंत्र विकसित केलं होतं. यात मेल कम्पोज करून, त्यावर पत्ता लिहून ते दुसऱ्या युजरला पाठवण्याची व्यवस्था होती.

    थोर प्रतिभावंत व ‘कल्ट फिगर’ असूनही निगर्वी आणि मनमिळावू स्वभावामुळे रेमण्ड माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात प्रिय व आदरणीय होते. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी टॉमलिन्सन यांना गौरविण्यात आले होते. सन २०१२ मध्ये ‘इंटरनेट हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांना सन्मानपूर्वक स्थान देण्यात आले. प्रत्येकाचा ई-मेल अॅड्रेस लिहिण्याची ठराविक पद्धत जगन्मान्य झाली आहे. त्यात सुरुवातीस युजरनेम व नंतर त्याचा पत्ता अशी रचना असते. या दोन्हींच्या मध्ये @ हे चिन्ह सर्वप्रथम वापरण्याचे श्रेयही टॉमलिन्सन यांच्याकडेच जाते. रे टॉमिल्सन यांचं ५ मार्च २०१६ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 5, 2019


  • जीवटराम भगवानदास तथा आचार्य कृपलानी

    आचार्य कृपलानी यांनी १९६३ मध्ये पहिल्यांदा जवाहरलाल नेहरु सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा पहिला अविश्वास प्रस्ताव ठरला होता. हा प्रस्ताव ३४७ मतांनी फेटाळण्यात आला आणि नेहरु सरकारवर याचे परिणामदेखील झाले नव्हते. मात्र, पहिला प्रस्ताव म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली.

      March 19, 2022


  • सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी

    सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी झाला. 'सुधारक' या पत्राचे संपादक वि. रा. जोशी हे त्यांचे वडील. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९१३), एम्.ए. (१९१६) झाले. पाली भाषेचा विशेष व्यांसग. १९२० पासून बदोद्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. प्रथम आठ वर्षे बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक. १९२८ पासून बडोदा सरकारचे दप्तरदार. १९४९ मध्ये निवृत. बडोद्याच्या वास्तव्यात गुजराती भाषेशी त्यांचा उत्तम परिचय झाला.निवृत्तीनंतर पुण्यास आल्यावर मराठी साहित्य परिषदेच्या कार्यात सहभाग.

    बडोद्याच्या 'सहविचारिणी सभे' च्या विद्यमाने निघणा-या 'सहविचार' ह्या नियतकालिकाचे ते एक संपादक होते. 'अ मॅन्युअल ऑफ पाली सध्दम्मप्पकासिनि' (संपादन), 'पाली कंकॉर्डन्स' (कोश), 'जातकांतील निवडक गोष्टी... (१९३०)', 'शाक्यमुनि गौतम' (१९३५), 'बुध्दसंप्रदाय व शिकवण' (१९६३) , ही त्यांची ग्रंथनिर्मिती त्यांच्या पालीच्या व्यासंगाची द्योतक आहे; पण याहीपेक्षा चाळीसांवर पुस्तके लिहून त्यांनी मराठी विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्त्वाची होय.

    विनोदी लेखनाची प्रेरणा त्यांना कोल्हटकर-गडक-यांच्या कोटित्वयुक्त लेखनातून मिळाली व त्याचा ठसा आपणास त्यांच्या प्रारंभीच्या 'एरंडाचे गु-हाळ... (१९३२)' मधील लेखन व 'चिमणरावांचे च-हाट... (१९३३)', मधील विवाहविषयक लेख यांवर स्पष्ट दिसतो. या मराठी लेखकांबरोबरच मार्क ट्वेन, डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार त्यांच्यावर झाले.

    पूर्वीच्या विनोदकरांप्रमाणे त्यांनीही चिमणराव व गुंडयाभाऊ अशी मानसपुत्रांची जोडगोळी जन्मास घातली आणि तिला विविध लोकव्यवहारांतून फिरवून आणले. पण त्यांच्या चित्रणात अतिशयोक्तीपेक्षा स्वभावोक्तीवर आणि समाजसुधारणेच्या मंडनापेक्षा मानवी स्वभावातील साध्यासुध्या विसंगतींच्या दर्शनावर भर राहिला. त्यांची निवेदनशैलीही मर्मभेदक कोटित्वापेक्षा मार्मिक व स्वभाविक संवादानी नटलेली आहे.

    त्यामुळे त्यांचे लेखन निबंधरूप होण्या ऐवजी त्याला ललित कथेचा घाट प्राप्त झाला व त्यातून मध्यमवर्गीयांचे एक अस्सल व स्वयंपूर्ण विश्व साकार झाले. वर उल्लेखिलेल्या पुस्तकांशिवाय वायफळाचा मळा' (१९३६), आणखी चिमणराव (१९४४), ओसारवाडीचे देव (१९४६), गुंडयाभाऊ (१९४७), रहाटगाडगं (१९५५), हास्यचिंतामणी (१९६१), बोरीबाभळी (१९६२), हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह प्रसिध्द आहेत. 'चिमराव स्टेट गेस्ट' ह्या त्यांच्या एका कथेवरुन काढण्यात आलेला 'सरकारी पाहुण' हा चित्रपट महाराष्ट्रात विलक्षण गाजला होता. चिं.वी.जोशी यांचे निधन २१ नोव्हेंबर १९६३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२२३०१७३३
    संदर्भ. ग्लोबल मराठी

      January 19, 2019


  • १ फेब्रुवारी १८८३ ला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित

    ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस' कडून प्रकाशित केला जाणारा हा इंग्रजी भाषेतील शब्दकोश आहे. १८५७ साली इंग्लंडमध्ये 'फायलॉजिकल सोसायटी'च्या काही अर्ध्वयूंना तेव्हा उपलब्ध असलेले सारेच शब्दकोश अपुरे आहेत, असे वाटू लागले आणि त्यातून 'ऑक्सफर्ड' या सुप्रतिष्ठित शब्दकोशाचा जन्म झाला.

    १८८४ मध्ये 'A New English Dictionary on Historical Principles' या नावाने पहिल्यांदा हा शब्दकोश प्रकाशित झाला. १८९५ मध्ये सर्वप्रथम अनौपचारिकरीत्या 'The Oxford English Dictionary' हे नाव वापरण्यात आले. १९३३ पासून मात्र या नावानेच हा शब्दकोश प्रकाशित होत आहे.

    या शब्दकोशाच्या आजपावोतो असंख्य आवृत्या निघाल्या आहेत. प्रारंभी केवळ इंग्रजी शब्दांचे इंग्रजीतच अर्थ देणारा हा शब्दकोश जग बदलत गेले तसे निरनिराळ्या भाषांतूनही अर्थ समजावून देऊ लागला, त्यात विविध भाषांमधील शब्दही अंतर्भूत होऊ लागले आणि आता तर रोजचा एक शब्द निवडण्यापासून वर्षभरातील एका शब्दाचीही निवड होऊ लावली आहे.

    ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दकोश विभागाचा 'शब्द' ब्रिटिश इंग्रजीकरिता अंतिम मानला जातो. याला कारणही तसेच आहे. 'फिलॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन' या भाषाशास्त्राच्या संस्थेतील सभासदांनी १८५७ मध्ये तत्पूर्वीचे शब्दकोश अपूर्ण आणि सदोष असल्याने शब्दांचे पुनःपरीक्षण करून नवा शब्दकोश तयार करण्याचे ठरवले. प्रत्यक्ष कृती फार मंदगतीने होत गेली. अखेर १८७९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशी करार होऊन न्यू इंग्लिश डिक्शनरीच्या कामास सुरुवात झाली. हा प्रकल्प किती काळ चालेल, किती निधी त्यात गुंतवावा लागेल, वगैरे कसलीच कल्पना कोणालाही आली नाही. पण जेम्स मरे, हेन्री ब्रॅडले, डब्ल्यू. ए. क्रेग, सी.टी. ऑनियन्स, यांसारख्या निष्णात शब्दकोश रचनाकारांनी पुढील सुमारे चाळीस वर्षे जीव ओतून अथक परिश्रम केले आणि इंग्रजी शब्दकोश इतिहासात मैलाचा दगड ठरलेली ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रसिध्द झाली. यासाठी शब्द संकलन कसे केले, अर्थ कसे लावले गेले, मुद्रण कसे झाले, याबद्दलची माहिती रोचक आहे. जिज्ञासूंनी सायमन विन्चास्टर यांच्या 'The Meaning of Everything : The Story of Oxford English Dictionary हा ग्रंथ अवश्य पाहावा.

    १९२८ साली प्रकाशित 'बारा' खंडांच्या शब्दकोशामध्ये १९३३ साली पुरवणी खंडाची जोड मिळाली. शब्दकोश अद्ययावत करण्याच्या दृष्टीने, त्यामध्ये विसाव्या शतकातील शब्दांची भर घालण्याकरिता चार खंडातील पुरवणी १९७२ ते १९८६ पर्यंत प्रकाशित केली गेली. याच दरम्यान १९८४ साली न्यू ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रकल्प सुरू झाला. याच सुमारास कम्प्युटर तंत्रज्ञानाचा विकास झाला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने या माध्यमाचे साधर्म्य ओळखून शब्दकोशाच्या मुद्रित आवृत्तीबरोबरच इलेक्ट्रॉनिक आवृत्ती प्रकाशित करण्यास सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक आवृत्तीमध्ये साठवणीला भरपूर वाव असल्याने नवे शब्द सहज समाविष्ट करण्यात येऊ लागले. हा शब्दकोश सी. डी. रूपात मिळू लागला. अनेक नवे शब्द भाषेत येत असताना त्यांचा शब्दकोशात अंतर्भाव करण्याबाबत काही निकष कटाक्षाने पाळले जातात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस जगातील भाषाविषयक सर्वात मोठा आणि व्यापक कार्यक्रम राबवते.

    नवे शब्द शोधण्याकरता ऑक्सफर्ड इंग्लिश कॉर्प्स (शब्दांची गंगाजळी) आणि ऑक्सफर्ड रीडिंग प्रोग्राम ही मुख्य संसाधने आहेत. अनेक मान्यवान योगादानकर्ते आपण जे वाचले त्यातील नवे शब्द व त्यांचे अर्थ यांचा पद्धतशीर पाठपुरावा करतात. रीडिंग प्रोग्राममध्ये या प्रत्येक प्रकारच्या लिखाणाचा (गाण्यांच्या ओळीपासून शास्त्रीय शोधनिबंधांपर्यंत) संग्रह केला जातो. गंगाजळीत हे दस्तऐवज आणि त्यांचे स्त्रोत यांची नोंदणी होते. असे नवे शब्द मिळाले की तो शब्द किती ठिकाणी, कोणत्या संदर्भात, कोणत्या अर्थाने, या अर्थाला काही विविध छत आहेत काय, किती काळ वापरला जात आहे, याचा आढावा तज्ज्ञांच्या संघाद्वारे घेतला जातो. अपशब्द वर्ज्य नसतात. पण ते वापरू नयेत, असा इशारा दिलेला असतो.

    याखेरीज शब्दकोश कोणाकरता आहे, पृष्ठ संख्यांची मर्यादा, व्याख्या देतानाची शब्द मर्यादा, अशा तांत्रिक, वित्तीय मुद्द्यांचा देखील विचार केला जातो. एखादे वेळी एखाद्या शब्दाला जर अनेक वर्षांचा इतिहास नसतो, पण तो समर्पक असला तरी त्याचा अंतर्भाव करण्याचा विचार केला जातो. कम्प्युटरवरील गेममधले एखादे पात्र मेले आणि पुन्हा जिवंत झाले, तर त्याचे वर्णन respwan या क्रियापदाने केले जाते, आणि कायमचे मेले तर permdeath असे वर्णन केले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्या शब्दांचा विचार करताना इंग्रजी भाषेतील शब्दांचा विचार होत नाही, अन्य भाषेतील शब्द विचारार्थ घेतले जातात. बंड, धरणे (असे संपाचे प्रकार) याच रूपात इंग्रजी भाषेत प्रवेशले. कधीकधी स्पेलिंगच्या फरकाने वेगळे अर्थ सुचवले जातात. Pundit म्हणजे तज्ज्ञ आणि pandit म्हणजे पदवी.

    नव्या शब्दांचे अर्थ देणे, हे देखील आव्हानात्मक काम आहे. यासाठी व्यापक सामान्यज्ञान असणारी तज्ज्ञ मंडळी, संदर्भग्रंथ, माहितीचे अन्य स्त्रोत, विषय तज्ज्ञ, इतर समानार्थी शब्द यांचा आधार घेतला जातो. उद्या अण्णू गोट्या होणे हा वाक्प्रचार मराठी शब्दकोशात समाविष्ट करायचा झाला तर त्या तज्ज्ञाला अंतू बर्वा माहिती हवा. शब्दकोशशास्त्र जसे शब्दकोशांचे स्वरूप बदलेल तसे विकासात होत गेले आणि शब्दकोश जसे बदलत गेले तसे शब्दकोशशास्त्र बदलत गेले. आज शब्द म्हणजे निव्वळ अक्षरांचे समूह राहिलेले नाहीत. कधीतरी आकडे वापरून संकल्पना सादर केली जाते, जसे २६/११ कधी आकडा आणि अक्षर एकत्र नांदतात, २द सारखे शब्द यात मोडतात. कधी A1 असा त्यांचा क्रम असतो. आता तर संकल्पना इमॉटीकॉनद्वारे दर्शवली जाते. अशा सर्वांचा क्रम काय असावा, हेही इंग्रजी शब्दकोशात रूढ होत आहे.

    अविनाश पंडित.
    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 1, 2019


  • मीनाकुमारी

    मीनाकुमारी एक शायरां (उर्दू कवयित्री) सुध्दा होत्या हे खूप जणांना माहित नसेल.

    त्यांचे काव्यातलं नाव (तखल्लुस) होतं नाझ. उर्दू शायरीसाठी वरदान ठरणारी दुःखाची देणगी त्यांना व्यक्तिगत जीवनातही भरपूर लाभली होती, असं म्हणतात.
    हे दोन शेर मा.मीनाकुमारी यांचे

    आगाज तो होता है, अंजाम नहीं होता
    जब मेरी कहानीमें, वो नाम नहीं होता.....
    हंस हंस के जवॉं दिलके हम क्यों न चुने टुकडे
    हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता....

    ती म्हणते, माझी प्रेमाची कहाणी सांगायला (अथवा लिहायला) मी सुरुवात (आगाज) तर करते; पण ते नाव वगळून माझी कहाणी पुढे जाऊच शकत नाही; व तिचा शेवटही (अंजाम) होऊ शकत नाही.
    पण तरीही ते नाव ती कवितेत गुंफत नाही. ते नाव तिला अव्यक्तच ठेवावंसं वाटतं. कारण, प्रेमातील वफादारीला( विश्वास) बाधा येऊ नये. एकवेळ कहाणी ‘अधूरी’ राहिली तरी चालेल !

    दुस-या शेरात तिनं म्हटलंय्,
    -----हृदयाचे झालेले तुकडेही हसत हसत गोळा करायला काय हरकत आहे? प्रत्येकाच्याच नशिबात, प्रेमासाठी प्रतिप्रेमाचं बक्षीस (ईनाम) मिळणं लिहिलेलं नसतं !....

    हाही ख-या प्रीतीचा आणकी एक गुण ! जे मिळेल ते स्वीकारायचं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिच्याकडून आपल्याला प्रेम मिळालंच पाहिजे, असा हट्ट का असावा? ते दान मिळणार नाही हेही स्वीकारायचं. असं निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे...

    प्रेमाची अपेक्षा करता येईल असं एकच ठिकाण आहे; तिथं आपलं प्रेम रुजू होईल व त्याला प्रेमाच्या रूपाने उत्तरही मिळेल; ते ठिकाण म्हणजे...ईश्वर !!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      August 18, 2017