अमजद खान, अमरीश पुरी यांच्यानंतर चे सर्वात खतरनाक वाटणारे हिंदी - मराठी चित्रपटातील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांना आपल्या वडिलांचा व्यवसाय असतानाही, मात्र शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नाट्य स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता. "हॅंडस् अप', हे त्यांचे अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे यांच्या समवेतचे पहिले व्यावसायिक नाटक रंगमंचावर आले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. या नाटकातल्या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. याच नाटकातली त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक आणि निर्माते गोविंद निहलानी यांनी त्यांना "अर्धसत्य' या चित्रपटात ओम पुरी यांच्या समवेत भूमिका दिली होती. या चित्रपटातली त्यांनी केलेली बेरक्या आणि धूर्त, कटकारस्थानी "रामा शेट्टी'ची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या समर्थ अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडले.
१९९१ मध्ये "सडक' या चित्रपटात त्यांनी तृतीय पंथियाची केलेली भूमिका गाजली होती. याच भूमिकेबद्दल त्यांना "फिल्मफेअर' पुरस्कारही मिळाला होता. रंगभूमीवरच्या नाटकात त्यांना भूमिका करणे विशेष आवडत असले, तरीही चित्रपटाच्या व्यवसायात गर्क झाल्यामुळे, पुढे त्यांना मोजक्याच नाटकात भूमिका करता आल्या. सदाशिव अमरापूरकर म्हणजे दुष्ट खलनायक असा शिक्का त्यांच्यावर बसला. पुराना मंदिर, नासूर, मुद्दत, विरू दादा, जवानी, फरिश्ते, या चित्रपटातल्या त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर त्यांनी हुकूमत या चित्रपटात पहिला खलनायक रंगवला होता. त्यानंतर त्यांनी याच अभिनेत्याबरोबर अनेक चित्रपटात खलनायकाच्या हुकमी भूमिका केल्या. विविध प्रकारच्या खलनायकाच्या भूमिका रंगवणाऱ्या अमरापूरकर यांनी स्वत:ला त्याच चौकटीत अडकवून मात्र घेतले नाही. उत्तम चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, असा लौकिकही त्यांनी मिळवला.
हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, ओरिया यासह अन्य भाषातल्या ३०० च्या वर चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘अर्धसत्य’, ‘सडक’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी प्राप्त केले होते. अहमदनगरच्या स्नेहालय, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सामाजिक कृतज्ञता निधी, अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यासह अनेक संस्थात ते सक्रिय होते. या संस्थांना त्यांनी आर्थिक मदतही केली होती. मा.सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 9, 2017
करसन घावरी हे फास्ट बॉलर असून ते लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग ही करत असत. करसन घावरी आपल्या करीयर मध्ये ३९ कसोटी व १९ वनडे खेळले. १९७४ ते १९८१ पर्यत आपल्या क्रिकेट करियर मध्ये दोन वेळा १९७५ व १९७९ वर्ल्ड कप पण खेळले.
February 28, 2022
मनोरमा वागळे यांनी अभिनय शिकावा, संगीत विषयात प्राविण्य मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातून अनेक दर्जेदार नाटकांमधून त्यांनी अनेक भूमिका केल्या. त्यासोबतच गोवा हिंदू असोसिएशन मुळे मास्टर दत्ताराम यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. गोविंदराव अग्नी, बी.आर देवधर, पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांसारख्या दिग्गज मंडळींकडून संगीत आणि गायनाचं शिक्षण त्यांनी घेतलं, तर ज्येष्ठ पार्श्वगायक आर.एन. पराडकरांकडून सुगम आणि नाट्यसंगीताचं प्रशिक्षण घेतलं. खास गंधर्व गायकीचे नाट्यसंगीत हे त्यांना गोविंदराव वेर्लेकर यांनी शिकवलं.
गोवा हिंदू असोसिएशनच्या महिला शाखेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि खडाष्टक या नाटकातील तडाखेबाज रागिणीच्या भूमिकेसाठी सुमती तेलंग यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला. पुढे मनोहर वागळेंशी विवाहबद्ध झाल्यानंतर सुमती तेलंगच्या मनोरमा वागळे झाल्या. खरंतर लग्नानंतरच्या चित्रपटात त्यांनी ज्या काही भूमिका रंगवल्या त्यामुळेच त्या नावारुपास येऊ लागल्या.चित्रपटातल्या अनेक खाष्ट, कजाग, खलनायिका आणि सहकलाकारांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांना त्यांचा अभिनय आवडू लागला कारण त्यामध्ये कजाग आणि विनोदी ढंगाचं मिश्रण होतं. याचा अनुभव आपल्यापैकी अनेक जणांनी राजा ने वाजवला बाजा या चित्रपटातनं घेतला असेल. सुरुवातीला खाष्ट सासू पण चित्रपटात काही प्रसंगात जेव्हा शत्रूंकडून गोची होते तेव्हाचा तो प्रसंग पाहून हसू आल्याशिवाय राहवत नाही. अनेक विनोदी आणि गंभीरपूर्ण नाटकांतून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
बबन प्रभूंचे फार्सिकल नाटक दिनूच्या सासूबाई राधाबाई मधली त्यांची सासूबाई ही भूमिका अविस्मरणीय ठरली. १९८५ ते १९९५ पर्यंत या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत राहिले. सर्व कलाकार बदलले पण सासूबाई मात्र कायम राहिल्या. मनोरमाबाई वागळेंच्या विनोदी चित्रपटांमध्ये गंमत-जंमत, आम्ही दोघे राजा राणी, गडबड घोटाळा, घरजावई या चित्रपटांचा तर स्त्री प्रधान चित्रपटांसाठी उंबरठा आणि आत्मविश्वास यांमधील त्यांच्या भूमिका लक्षात राहतात.
हिंदी चित्रपटांमध्ये लाईफलाईन, आगे की सोच, सिकंदर यांचा समावेश होतो. यासोबतच अनेक जाहिराती, दूरदर्शन, मालिका, नाटकं यामधून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाची लक्षात राहण्यासारखी चुणूक दाखवून दिली आहे. मा.मनोरमा वागळे यांचे २७ ऑगस्ट २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- सागर मालाडकर / marathisrushti.com
August 27, 2017
मेंडीसच्या बॉलिंगने मोठ्या फलंदाजांना देखील हैराण केलं होतं. वीरेंद्र सेहवागने मात्र मेंडीसच्या बॉलिंगवर फटकेबाजी करत पहिल्यांदा त्याची दहशत संपवली होती.
March 11, 2022
फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार कुमार मंगलम बिर्ला २०१७ साली भारतातले आठवे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. नोव्हेंबर २०२० नुसार दानशूरांच्या यादीत कुमार मंगलम बिर्ला चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी एका वर्षात २७६ कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत.
June 14, 2022
कर्वे यांच्या साहाय्याने तयार केलेला सुलभ विश्वकोश (१९४९–५१) सहा भागांत प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (२ खंड, १९४२, १९४७) आणि शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) ही याच द्वयीने निर्माण केलेली कोशसंपदा होय. दाते यांनी रा. त्र्यं. देशमुख ह्यांच्या सहकार्याने, १८१० ते १९१७ ह्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यांतील लेखांची, तसेच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकारनामांची सूची महाराष्ट्रीय वाङ्मयसूची (१९१९) ह्या नावाने तयार केली. शंकर गणेश दाते ह्यांनी तयार केलेल्या प्रसिद्ध ग्रंथसूचीच्या पूर्वी तशा दिशेने झालेला एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून ही सूची महत्वाची.
April 18, 2022
आशुतोष राणा यांचे खरे नाव आशुतोष नीखरा आहे. त्यांचा जन्म १० नोव्हेंबर १९६४ रोजी गाजरवाडा येथे झाला. त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. १९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला.
दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. आशुतोष राणा यांचे लग्न अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याबरोबर झाले आहे. आशुतोष राणा हे मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही झळकले. स्वाभिमान, फर्ज, कभी कभी, वारिस या मालिकांमध्ये त्यांचे दर्शन घडले. रिअँलिटी शोच्या सूत्रसंचालनाची धुराही आशुतोष राणा यांनी सांभाळली होती. बॉलिवूडबरोबरच आशुतोषने दाक्षिणात्य सिनेमातही अभिनय केला आहे. उर्दू, इंग्रजी आणि तेलगु भाषेचे त्यांना ज्ञान आहे.
येडा या मराठी चित्रपटात आशुतोष राणा यांनी काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 16, 2017
ज्येष्ठ गोमंतकीय कलासमीक्षक, चित्रकार, नाटककार व साहित्यिक गोपालकृष्ण भोबे यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२० गोव्यातील बार्देश तालुक्यातील नेरूल येथे झाला.
February 17, 2024
बिल लॉरी हे भक्कम आणि अतिशय चिवट फलंदाज होते. रॉबर्ट ‘बॉबी’ सिम्पसन आणि बिल लॉरी या सलामीच्या जोडीने एक काळ गाजवला. लॉरी नंतर कर्णधार झाले.
February 11, 2022
सृदृढ देहयष्टी, स्टायलिश अंदाज, बारीक पण तीक्ष्ण डोळे, अॅग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज, गरजणारा आवाज आणि पावरफुल स्क्रिन प्रेझेंस या जोरावर या खलनायकाने अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारलाही रुपेरी पडद्यावर तगडी टक्कर दिली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४८ रोजी सिक्किममध्ये झाला.अग्निपथचा कांचा चीना, मेरे अपनेमधला सडकछाप संजू, धुंदमधला अपंग तरीही क्रूर पती, हममधला बख्तावर, क्रांतीवीरचा चतुर सिंग चीता किंवा मग कातिया…या खलनायकाचे निर्दयी आणि बेदरकार हावभाव आणि डोळ्यातला अंगार समोरच्याचा थरकाप उडवणारा..हा तो व्हिलन आहे ज्याच्या हुकुमशाहीत ‘हर गलती की सजा मौत है’…
डॅंनींचा पडद्यावरचा खतरनाक असला तरीही त्यांच्यामध्ये एक सोफॅस्टिकेशन आणि डिग्निटी आहे. त्यांच्या कमांडिंग पर्सनॅलिटीमुळे त्यांच्या भूमिका नेहमीच लार्जर दॅन लाइफ वाटल्या.
डॅनी डेन्ग्झोपा यांना घोडेस्वारीची आवड होती. त्यांचं कुटुंब घोडे पालनाच्या व्यवसायात असल्यामुळे त्यांची घोडेस्वारीची आवड जोपासली गेली. डॅनी यांना खरंतर भारतीय सैन्यदलात सहभागी व्हायचं होतं. पश्चिम बंगालमधून बेस्ट कॅडेट म्हणून निवड होऊन त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही सहभाग घेतला होता. पण त्यावेळी चीनसोबतच्या युद्धाच्या काळात अनेक जवान शहिद झाले. हे पाहून डॅनी यांची आई घाबरुन गेली. अखेर आईच्या सांगण्यावरुन डॅनींनी सैन्यात जाण्याचा निर्णय बदलला आणि पुण्यातल्या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. सिक्किमसारख्या प्रदेशातून पुण्यातल्या एफटीआयआयमध्ये आलेल्या डॅनींसाठी हा काळ उदासीचा होता. गुरखा, चायनीज, नेपाळी किंवा चिंकी अशा अनेक कुचकट कमेंट्सना त्यांना सामोर जावं लागलं. कॅम्पसमध्ये अनेकदा त्यांची खिल्ली उडवली जायची. अशा वातावरणात टिकून राहाणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. डॅनी डेन्ग्झोपा यांचे मूळ नाव त्शेरींग फिन्सो डेंग्झाँप्पा या नावाने त्यांना पुकारणं अनेकांना जमत नसे. त्यावरुन त्यांची चेष्टाही होऊ लागली. तेव्हा एफटीआयआयमध्ये त्यांचे जिच्याशी मैत्रीचे बंध जुळले त्या जया बच्चन यांनी डॅनींना नाव बदलण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बदललेलं नावच पुढे त्यांची ओळख बनून राहिलं. डॅनींना सहजासहजी काम मिळू शकत नव्हतं. त्याकाळी बनत असलेल्या फॅमिली ड्रामांमध्ये डॅनी फिट होत नव्हते. ‘ना तू वडिलांसारखा दिसतोस, ना भावासारखा. त्यामुळे केवळ नोकराचे रोल मिळतील’ असंही त्यांना ऐकवलं गेलं. बोलणारे खूप काही बोलायचे पण डॅनींना स्वत:वर आणि स्वत:च्या मेहनतीवर विश्वास होता. त्यामुळे कठीण परिस्थितीमध्येही ते टिकून राहिले. डॅनींना हिरोच्या रोलमध्ये रस नव्हता कारण हिरोला नाच गाणं तर करावंच लागे. त्यामुळे डॅनी अँटी हिरो भूमिकांकडे वळले. मेहनतीशिवाय लक मिळणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे एफटीआयआयमध्ये असताना डॅनी यांनी हिंदी भाषेवरही प्रभुत्व मिळवलं.
१९७० मध्ये काही सिनेमात त्यांनी छोट्या भूमिका केल्या. पण ‘लहू दे दो रंग’नंतर खऱ्या अर्थाने त्यांना मोठ्या भूमिका मिळू लागल्या. डॅनी यांनी बी आर इशरांच्या ‘जरूरत’ या बी ग्रेड सिनेमातून सुरुवात केली. त्यानंतर गुलजार यांच्या ‘मेरे अपने’मधून डॅनी यांना मेजर ब्रेक मिळाला. ही फिल्म करण्याचं आणखी एक कारण म्हणजे अभिनेत्री मीनाकुमारी. मीनाकुमारी या डॅनी यांची फेवरेट नायिका होती. ‘तू तो मेरा असली बच्चा है, तेरी नाक बिलकूल मेरे जैसी है’..मीनाकुमारी यांचे हे आपुलकीचे शब्द डॅनींना खूप धीर देणारे होते. मेरे अपनेनंतरची डॅनी यांच्या करिअरमधली आणखी एक महत्त्वाची फिल्म ठरली धुंद. फिल्ममधला निष्ठूर आणि निर्दयी नवरा डॅनींनी खुबीने साकारला.
‘चोर मचाए शोर’, ‘खोटे सिक्के’, ‘काला सोना’ अशा सिनेमात त्यांनी यादगार भूमिका साकारल्या. खलनायकाच्या भूमिकेत ‘अंदर बाहर’, ‘आंधी तूफान’, ‘भगवान दादा’, ‘अग्निपथ’, ‘हम’, ‘घातक’, ‘क्रांतीवीर’ अशा अनेक सिनेमांमध्ये डॅनींनी अमिताभ, धमेंद्र ते सनी देओलपर्यंतच्या नायकांना शह दिला.
‘अग्निपथ’मधला कांचा चीना किंवा ‘घातक’मधला कातिया यांच्या क्रूरपणा आणि निर्दयतेने प्रेक्षकांचा थरकाप उडवला. हिरोइतकाच भाव खाऊन गेला डॅनींना साकारलेला व्हिलन.
याच दरम्यान रमेश सिप्पी ‘शोले’ बनवत होते. ‘शोले’च्या गब्बरसाठी सिप्पींची पहिली पसंती डॅनींना होती. पण त्यावेळी डॅनी फिरोज खान यांची धर्मात्मा फिल्म करत होते. धर्मात्मासाठी आधीच तारखा दिल्यामुळे डॅनींना शोले करणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे गब्बरची भूमिका अमजद खान यांच्या वाट्याला आली. गब्बरच्या भूमिकेबद्दल विचारताना डॅनी सांगतात की,
“मी फिरोज खान यांना आधी शब्द दिला होता. मी होकार दिला असता तर इंडस्ट्रीला अमजद खान यांच्या रुपात एक आयकॉनिक खलनायक मिळाला नसता. त्यामुळे शोलेच्या यशात माझाही वाटा आहे. त्यानंतर अमजद यांनी त्यांचं मानधन वाढवलं आणि मी सुद्धा. त्यानंतर कॅरॅक्टर आर्टिस्टचं मानधनही वाढू लागलं”. जया बच्चन डॅनींची एफटीआयआयमध्ये वर्गमैत्रिण होती. बच्चन्ससोबत त्यांचे खूप चांगले संबंध होते. पण तरीही डॅनींनी तब्बल १८ वर्षे अमिताभसोबत काम करणं टाळलं. त्याच कारण म्हणजे अमिताभ यांच्यासारख्या बड्या अभिनेत्यासमोर आपली भूमिका झाकोळली जाईल असं डॅनींना वाटलं होतं. पण जेव्हा मुकुल आनंद यांनी अग्निपथची कथा ऐकवली तेव्हा डॅनींना असा विश्वास वाटला की विजय दीनानाथ चौहानसमोर कांचा चीना दुर्लक्षित राहाणार नाही आणि झालंही अगदी तसंच..डॅनींचा कांचा चीना आजही एक अजरामर व्हिलन आहे.
‘अग्निपथ’च्या सेटवरचा एक किस्सा असाही आहे की शूटिंगसाठी सारं युनिट मॉरिशसला रवाना झालं. सकाळी साडे आठ वाजता मेकअप करुन सारे कलाकार तयार झाले. पण अजून डॅनींना स्क्रिप्ट मिळाली नव्हती. मनात थोडा नव्हर्सनेस असल्यामुळे डॅनी अक्षरश: आपल्या असिस्टंटवर वैतागले. पाचच मिनिटात अमिताभ सुद्धा सेटवर पोहोचले. त्यांनी डॅनीचा चढलेला आवाज ऐकला होता. त्यामुळे अमिताभ डॅनीकडे गेले आणि म्हणाले की, मलाही आत्ताच स्क्रिप्ट मिळाली. आपण एकत्र रिहर्सल करुया. आणि इथून मैत्रीचं एक नवं पर्व सुरु झालं. त्यानंतर अमिताभसोबत डॅनींनी हम, खुदा गवाहमध्ये एकत्र काम केलं. सनम बेवफा आणि खुदा गवाह या सिनेमात डॅनींनी हिंदी भाषेवर घेतलेली मेहनती उपयोगी पडली. या दोन्ही फिल्मसाठी डॅनींना सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डॅनी यांनी केवळ निगेटीव्ह भूमिकाच केल्या असं नाही तर सकारात्मक आणि विनोदी भूमिकाही तितक्याच सहजतेने साकारल्या. हिंदी सोबतच अनेक नेपाळी, तेलगू आणि तमिळ भाषेतही डॅनींनी काम केलं. अनेक फिल्मसाठी त्यांना फिल्मफेअरचे नॉमिनेश मिळाले. अभिनयासोबतच डॅनी उत्तम लिहितात. त्यांनी फिर वही रात आणि राम या दोन सिनेमांचं दिग्दर्शनही केलं.
डॅनींचं फिमेल फॅन फॉलोईंग जबरदस्त होतं. इतकंच नाही तर काही मेल फॅन्सही त्यांना रक्ताने पत्र लिहायचे आणि त्यांना गुरु मानल्याचं सांगायचे. दरम्यानच्या काळात डॅनी यांच्या आयुष्यात आली परवीन बाबी. परवीन आणि डॅनी चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्याकाळी ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर परवीन कबीर बेदींच्या प्रेमात पडली आणि हे नातं तुटलं. ब्रेकअपनंतरही परवीन त्यांच्या घरी येत राहिली. पण त्यावेळी डॅनींची नवी गर्लफ्रेण्ड असलेल्या किमला हे रुचलं नाही. काही दिवसांतच परवीन स्किझोफेनियाची रुग्ण असल्याचंही समोर आलं. त्यावेळी डॅनी यांचं सिक्किमची प्रिन्सेस गावा डॅन्ग्झोपासोबत लग्न झालं होतं. तर परवीनच्या आयुष्यात महेश भट आले होते. पण दिवसेंदिवस परवीनचा आजार बळावत राहिला. एकेकाळी सतत ग्लॅमरच्या वलयात राहिलेल्या परवीनने एकाकीपणे जगाचा निरोप घेतला. परवीनच्या अंत्यविधीवेळी उपस्थिती असणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये डॅनी होते. डॅनी यांना मनमोहन देसाईंनीही अनेकदा सिनेमासाठी विचारलं होतं. पण दरवेळी डॅनी नकार देत राहिले. डॅनींना देसाईंबद्दल आदर होता पण तरीही एकदा त्यांनी स्पष्टपणे देसाईंना सांगितलं की तुमचे सिनेमे इंडस्ट्रीला आणखी २० वर्षे मागे नेतात. तुम्ही एक हिट सिनेमा देता आणि मग बाकी सारे तुम्हाला फॉलो करतात. ते ऐकून देसाईंनीही त्यांना अगदी ठेवणीतलं ऐकवलं. पण डॅनी स्पष्टवक्ता होते. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी भारंभार सिनेमे अजिबात केले नाही. पण जे सिनेमे केले त्यातून आपले फॅन्स नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली. डॅनींनी नेहमी स्वत:च्या अटींवर काम केलं. डॅनी उत्तम अभिनेताच नाही तर उत्तम पेंटर आणि गायकही आहेत. ते उत्तम बासरी वाजवतात. डॅनींनी लतादीदी, आशाताई, रफी, किशोर कुमार अशा अनेक दिग्गज गायक – गायिकांसोबत गाणी गायली आहेत. काही नेपाळी सिनेमांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केलं आहे.
काळ मागे सरत राहिला पण डॅनी यांची जादू ओसरली नाही. बदलत्या काळातही नव्या पिढीसोबत डॅनी काम करत राहिले. पुकार, अशोका, १६ डिसेंबर, चायना गेट, लक, रोबोट, जय हो, मेरी कोम, बँग बँग अशा अलीकडच्या काळातल्या सिनेमातही डॅनी यांनी आपली छाप सोडली आहे.
डॅनींनी काही इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्येही काम केलं. २००३ साली भारत सरकारने डॅनींना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. डॅनी आजही मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून ब्रेक घेत ते पर्वतरांगांमधल्या शांततेत रमतात. घरातल्या बागेत त्यांचा अधिकाधिक वेळ जातो. साठी उलटल्यानंतरही फिटनेसच्या बाबतीत आजच्या यंग स्टार्सनाही डॅनी मागे टाकतात. केवळ हिंदी सिनेमातला खलनायक इतकीच डॅनी यांची ओळख मर्यादित राहात नाही. डॅनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 25, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti