(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रसिद्ध कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी

    जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम यांच्या बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा.... आणि... यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर 'लता मंगेशकरांनी' घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन'च' घेणारा...साहिर लुधियानवी हे आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे.

    साहिर लुधियानवी यांचे अब्दुल हयी हे मूळ नांव. ‘लुधियाना येथील एका मुस्लिम गुज्जर जमीनदार घराण्यात त्यांचा ८ मार्च १९२१ रोजी जन्म झाला. त्यांची मातृभाषा पंजाबी; त्यांनी ' साहिर लुधियानवी/ या टोपणनावाने उर्दू व हिंदी भाषांत गीतलेखन केले. त्यांचे वडील फाझल मुहम्मद हे इंग्रज राज्यकर्त्यांशी पूर्ण निष्ठा बाळगून होते; त्यांचा स्वभाव विलासी व स्वछंदी होता. साहिरांची आई सरदार बेगम ही त्यांची अकरावी पत्नी. ती अत्यंत स्वाभिमानी होती. आपल्या पतीची जीवनशैली तिला मान्य नव्हती.

    पतिपत्नीमधील ताणतणाव अखेर विकोपाला जाऊन त्यांनी परस्परांपासून फारकत घेतली. त्या वेळी बाल्यावस्थेत असलेल्या साहिरांचा ताबा न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिला. ह्या घटनांचा व तणावपूर्ण कौटुंबिक वातावरणाचा साहिरांच्या मनावर खोल विपरीत परिणाम झाला आणि तो आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकून राहिला. आर्थिक विवंचना, सततचे भय व दु:ख अशा वातावरणात साहिरांची जडणघडण झाली. खरे तर अत्यंत चांगल्या परिस्थितीत जन्माला आलेल्या साहिरच्या नशीबात ही गरीबी वडिलांमुळे आली. आणि याची आठवण ठेवून साहिर यांनी स्वतःच्या आईला कधीही अंतर दिले नाही.

    साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग साहिर मुंबईला आले आणि हिंदी चित्रपटांसाठी गीते लिहू लागले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शेकडो गीते त्यांनी लिहिली. त्यांपैकी प्यासा (१९५७), नया दौर (१९५७), धूल का फूल (१९५९), बरसात की रात (१९६०), फिर सुबह होगी, वक्त, ताजमहाल, हम दोनो(१९६१), गुमराह (१९६३), चित्रलेखा (१९६४), कभी कभी (१९७६) इ. चित्रपटांतील त्यांची गीते रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. ताजमहाल चित्रपटातील ‘जो वादा किया’ या गीतासाठी १९६४ मध्ये आणि कभी कभी चित्रपटातील ‘कभी कभी मेरे दिल में’ या गीतासाठी १९७७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून दोन वेळा ‘फिल्मफेअर’चे पुरस्कार मिळाले.

    गायक व संगीतकार यांच्या बरोबरीनेच चित्रपटगीतकारांनाही सन्मान, प्रतिष्ठा व स्वामित्वशुल्क मिळावे, यासाठी साहिर यांनी अविरत लढा दिला व गीतकारांना चित्रपटव्यवसायात प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये 'अमृता प्रीतम' हे नांव सर्वात वर! अमृता प्रीतम 'साहिरने ओढलेल्या' सिगारेट्सची थोटके पेटवून स्वतः ओढायची. साहिरच्या मृत्यूनंतर तिचे असे म्हणणे होते की 'आता ती ओढत असलेल्या सिगारेटचा धूर ज्या जगात साहिर पोचला आहे तिथे पोचत असणार'!

    गुलजार हे साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. भारत सरकारने साहिर यांना पद्मश्री देऊन सन्मान केला. याशिवाय ‘सोव्हिएट लँड-नेहरु पुरस्कार’ व ‘महाराष्ट्र उर्दू अकादेमी पुरस्कार’ देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. मा.साहिर यांचे निधन २५ ऑक्टोबर १९८० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 15, 2017


  • ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर

    ‘प्रिये पाहा’ ही कारेकर यांची प्रकाशित झालेली पहिली ध्वनिमुद्रिका. ‘एचएमव्ही’ कंपनीने ती काढली होती. पुढे प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाटय़पदे, भजने, शास्त्रीय गायन आदींच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही पं. कारेकर यांच्या दहा हजारांहून अधिक मैफली व कार्यक्रम आजवर झाले आहेत.

      July 4, 2022


  • माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर

    हरू स्टेडियममध्ये मार्च १९७१मध्ये झालेल्या राजस्थानविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी २५० धावांची खेळी केली होती. ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर १९७१-७२च्या मोसमात ५१.६०च्या सरासरीने ५१६ धावा, १९७२-७३च्या मोसमात ५६.४५च्या सरासरीने ६२१ धावा केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना १९७४मध्ये विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली.

      June 9, 2022


  • मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते डॉ. दाजी भाटवडेकर

    डॉ. दाजी भाटवडेकर यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणार्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल परिणाम झाला. ते कीर्तनकार बुबांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची हुबेहूब नक्कल करीत असत. भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली. दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संगीत रंगभूमीकडे वळवला. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृ त नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही. मुंबईच्या ब्राह्मण सभेत त्यांनी १९५० ते १९८० या काळात दर वर्षाला एक नवे संस्कृत नाटक रंगभूमीवर आणले. कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी ’अभिज्ञान शाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली. संस्कृत नाटकांनाही पुढे प्रेक्षक मिळेनासे झाले. मात्र, ही नाटके सादर करताना काय काय अनुभव आणि अडचणी आल्या यावर दाजींनी लिहिलेला प्रबंध मुंबई विद्यापीठाने स्वीकारून त्यांनी डॉक्टरेट दिली. दाजींच्या संस्कृत रंगभूमीवरील योगदानाबद्दल भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी त्यांच्या एका ग्रंथातील परिशिष्टात खास उल्लेख केला आहे. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. मा.दाजी भाटवडेकर यांचे २६ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- विकीपीडीया

      January 3, 2017


  • डॉ.नरेंद्र दाभोळकर

    आज १ नोव्हेंबर.. आज मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची जयंती.
    डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला.
    एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले होते. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८३ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुस्तक. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची पार्श्वभूमी या पुस्तकातील सर्व लेखांना आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनचा विचार, प्रसार, अंगीकार करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सूत्र या पुस्तकातील सर्व लेखांच्या मुळाशी आहे. या पुस्तकात धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा केलेली आहे. पुस्तकात छत्तीस लेख आहेत. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता. भारत सरकारने दाभोळकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार दिला. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने २०१३ सालापासून समाजहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे निधन २० ऑगस्ट २०१३ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 1, 2016


  • उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी

    सुरुवातीस राजिंदरसिंग बेदी यांनी पंजाबीत लेखन केले; पण नंतर ते उर्दूतून लिहू लागले. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. त्यांच्या पंजाबीतील कथांचे हड्डीआँ ते फुल्ल (१९४२) व घर विच बजार विच (१९४४) हे दोन संग्रह होत. आपल्या कथालेखनाची सुरुवात त्यांनी प्रख्यात रशियन लेखक चेकॉव्ह याच्या लेखनाने प्रभावित होऊन केली होती. चेकॉव्हशिवाय त्यांनी टॉलस्टॉय, ब्रेट हार्ट, डी.एच्‌.लॉरेन्स आणि मोपासा यांच्या साहित्याचेही वाचन केले. ‘भोला’ ही कथा १९३६ मध्ये लिहून त्यांनी आपल्या उर्दू कथालेखनाची सुरुवात केली आणि दाना-व-दाम हा आपला पहिला कथासंग्रह १९३९ मध्ये प्रकाशित केला. या संग्रहामुळे त्यांना खूपच प्रसिध्दी मिळाली. या कथासंग्रहात अपार सहानुभूती आणि प्रखर वास्तवता यांचा प्रत्यय प्रकर्षाने येतो.

    बेदी हे आपल्या कथांतून जीवनातील दुःखमय पैलूचे दर्शन घडवत असतानाही त्यातील सुखमय पैलूंचेही विस्मरण त्यांना होत नाही, हे त्यांच्या कथेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने त्यांचे गर्म कोट हे आत्मवृत्त विशेष लक्षणीय म्हणावे लागेल. त्यांच्या कथालेखनाचे आणखी काही विशेष म्हणजे त्यांच्या कथातील सुरुवातीच्या काही वाक्यातच ते सबंध कथेच्या आशयाचे सार सूचकतेने गोठवत असत. कथांशिवाय बेदींनी काही नाटके व एकाकिंकाही लिहिल्या आहेत आणि त्याचे अनुक्रमे बेजान चीजे (१९४३) व सात खेल (१९४६) हे संग्रह प्रकाशित झाले आहेत. एक चादर मैली सी (१९६२) ही त्यांची लघुकांदबरी असून तिला १९६४ चा साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला. पंजाबमधील एका गावाच्या पार्श्वभूमीवर ती लिहिली असून तीत ‘राणू’ च्या वैवाहिक जीवनाचे उत्कृष्ठ चित्रण आहे. खूशवंतसिंग यांनी तिचा इंग्रजीत (आय टेक धिस वूमन - १९६७) अनुवादही केला आहे.

    ‘मिथुन’या कथेतही अशाच प्रकारचे सुंदर शैलीत वर्णन आहे. बेंदीनी ‘सिर्फ एक सिगरेट’ ह्या आणखी एका रमणीय कथेमध्ये पिढयांच्या तफावतीबाबत सुंदर चित्रण केले आहे. दाना-ष-दाम (१९३९) , गिऱ्हान (१९४२) , कोख जली (१९४९) अपने दुख मुझे दे दो (१९६५) , हाथ हमारे कलम हुए (१९७४) हे त्यांचे उल्लेखनीय उर्दू कथासंग्रह होत. मिर्झा गालिब (१९५४), देवदास (१९५६), मधुमती (१९५८), अनुराधा (१९६०) सत्यकाम (१९६९), मेरे सनम इ. गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या असून एक आघाडीचे पटकथा लेखक म्हणून त्यांनी मोठाच लौकिक संपादन केला. एक चादर मैली सी (१९७१), फागुन (१९७२) आणि आँखो देखी (१९७७) हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत. दस्तक(१९७२) ह्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांची कथा, पटकथा, दिग्दर्शन व निर्मितीही त्यांचीच असून ह्या चित्रपटास तीन राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. १९७५ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मा.राजिंदरसिंग बेदी यांचे निधन १९८४ मध्ये झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. marathivishwakosh

      September 1, 2017


  • ज्येष्ठ मराठी नाट्यनिर्माते सुधीर भट

    सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी १ जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम केला होता. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली.

      April 16, 2019


  • अभिनेता पराग बडेकर

    आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पं शरद जांभेकर यांना मिळाली होती.

      June 25, 2022


  • गंधर्वभूषण जयराम शिलेदार

    चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली.

    चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेल्या संगीत नाटकांना, बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दिनानाथ यांच्यामुळे सोन्याचे दिवस दिसले. संगीत रंगभूमीने मराठी भूमीतल्या संगीत रसिकांना झपाटून टाकले. पण बोलपटांच्या युगाने संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. महाराष्ट्रातल्या बहुतांश संगीत नाटक संस्था हळूहळू बंद पडल्या. राम जोशी या चित्रपटाने लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या जयराम शिलेदार जयमाला शिलेदार यांच्याशी विवाह केला. या दोघांनी मराठी संगीत रंगभूमीवर आपल्याच कर्तृत्वाने नवे युग सुरू केले. जयराम यांना चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली होती तरी, त्यांचा जीव मात्र संगीत रंगभूमीवरच घुटमळत होता.

    जयमाला यांची साथ मिळताच त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ वळवली आणि संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात, संगीत रंगभूमीला वाचवायसाठी पुढचे आयुष्य संगीत रंगभूमीसाठीच समर्पित केले. संगीत रंगभूमीलाही ओहोटी लागली, तेव्हा जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी "संगीत मराठी रंगभूमी' ही संस्था स्थापन करून, संगीत नाटकांची परंपरा पुनरूज्जीवित तर केलीच, पण पुन्हा संगीत रंगभूमीच्या वैभवी परंपरेचे दर्शनही संगीत रसिकांना घडवले. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली.

    नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. तेव्हा विदर्भ, मराठवाड्यातून आणि कर्नाटकातूनही संगीत नाट्य रसिक आवर्जून ही सारी नाटके पहायसाठी त्या शहरात मुक्काम ठोकून असत. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली. मा.जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन जयमाला शिलेदार यांनी केली. २०१२ मध्ये जयराम शिलेदार यांचे आत्मचरित्र, "फोटो बायोग्रॉफी‘मधून लोकांसमोर आले.

    जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 6, 2017


  • ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल

    मधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत मामा म्हणत असत. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात मुंबईत शाळेपासून झाली. नाटय़शिक्षणाचे प्राथमिक धडे त्यांनी तिथेच गिरवले.

      July 24, 2021