स्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट २००३ साली आलेला ‘स्कूल’ होता जो हिंदीत बनवला गेला होता. हा मुलांचा चित्रपट होता. या आधी त्यांनी गोविंद निहलानी, डॉ. जब्बार पटेल इत्यादी चित्रपट निर्मात्यां बरोबर सहायक दिग्दर्शिका, उप-शीर्षक लेखीका म्हणून काम केले होते.
July 5, 2022
जगात सर्वात आधी एटीएम मशीनचा वापर २७ जून १९६७ ला बार्कलेज बँकेने केला होता. ही पहिली एटीएम मशीन लंडनच्या बार्कलेज बँकेच्या शाखेत लावण्यात आली. भारतात सर्वात पहिली एटीएम मशीन १९८७ मध्ये लावली गेली. हे पहिले एटीएम हाँगकाँग ॲण्ड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ने मुंबईत लावले होते.
June 28, 2022
एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती.
January 5, 2022
अहिल्याताई व रांगणेकर नोव्हेंबर १९६२ ते २९ एप्रिल १९६६ पर्यंत ‘भारत संरक्षण कायद्या’खाली अटकेत होते. या काळात कैदी स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्याताईंनी २१ दिवसांचा उपवास करून त्यांना सवलती मिळवून दिला. एकदा अमेरिकन वकिलातीसमोर निदर्शने करत असता तिथली पाटी त्यांच्या डोळ्यांना लागली. या घटनेमुळे त्यांचे डोळे कायमचे अधू झाले. तशाही स्थितीत पुढे सुमारे २०-२५ वर्षे त्या कुणाचीही सोबत अथवा हातात काठी न घेता मुंबईत फिरत असत. यानंतर अहिल्याताई व मृणाल गोरे या जोडगोळीने महागाई प्रतिकारसमितीची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. महिलांच्या कर्तबगारीचा एक नवा इतिहास घडवला.
April 19, 2022
महानतम गायिका ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव 'अल्लाह वसई होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला.
संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती.
नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ यांना नृत्य व गाणे शिकायला मिळाले. नूरजहाँ यांच्या गाण्यावर प्रभावित होऊन संगीतकार गुलाम हैदर यांनी पंजाबी चित्रपट ‘शीला’ उर्फ ‘पिंड दी कुड़ी’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका दिली. हा चित्रपट पंजाब मध्ये गाजला. त्या काळी पंजाब म्हणजे लाहोर पण होते. १९३० च्या दशकात लाहोर मध्ये अनेक स्टूडियो स्थापन झाले. गायकाची वाढती मागणी लक्षात घेऊन नूरजहाँ यांचा परिवार १९३७ मध्ये परत लाहोरला आला. तेथे डलसुख एल पंचोली यांनी बेबी नूरजहाँ यांचे गाणे बघून ‘गुल-ए-बकवाली’ या चित्रपटात भूमिका दिली.
या नंतर त्यांचा यमला जट, ‘चौधरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी ‘कचियां वे कलियाँ ना तोड़’ व ‘बस बस वे ढोलना की तेरे नाल बोलना’ ही खूप लोकप्रिय झाली.
१९४२ मध्ये नूरजहाँ यांनी आपल्या पुढील बेबी हा शब्द काढला. त्याच वर्षी ‘खानदान’ चित्रपटातून त्यांनी लोकांचे ध्यान वेधून घेतले. याच चित्रपटाचे निर्देशक शौकत हुसैन रिजवी यांच्या बरोबर लग्न केला. १९४३ मध्ये नूरजहाँ मुंबईला आल्या. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांच्या ‘लाल हवेली’, ‘जीनत’, ‘बड़ी माँ’, गाँव की गोरी और मिर्जा साहिबाँ, अनमोल घडी या चित्रपटासाठी नूरजहाँ यांची आठवण काढतात. अनमोल घड़ी चे संगीत नौशाद यांनी दिले होते त्यातील ‘आवाज दे कहाँ है’, ‘जवाँ है मोहब्बत’ और ‘मेरे बचपन के साथी’ ही गाणी आजही लोक आवडीने एैकतात.
नूरजहाँ फाळणी नंतर मुंबईहून लाहोरला आल्या. त्यांचे पती रिजवी यांनी शाहनूर स्टूडियो चालू केला. शाहनूर प्रोडक्शन नी ‘चन्न वे’ ची निर्मिती केली ज्याचे निर्देशन नूरजहाँ यांनी केले होते. त्यातील ‘तेरे मुखड़े पे काला तिल वे’ हे गाणे लोकप्रिय झाले.
नूरजहाँ यांची शेवटचा चित्रपट ‘बाजी’ होता त्यांनी पाकिस्तातात १४ चित्रपट बनवले त्यातील १० उर्दू होते. काही कारणाने त्यांना अभिनय सोडावा लागला पण त्यांनी गाणे चालू ठेवले.
पाकिस्तानात पार्श्वगायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘जान-ए-बहार’ होता. यातील ‘कैसा नसीब लाई’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर में उर्दू, पंजाबी व सिंधी भाषात अनेक गाणी गायली.
त्यांना पाकिस्तान मधील सर्वोच्च सम्मान ‘तमगा-ए-इम्तियाज’ मिळाला होता.
नूरजहाँ यांचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 8, 2017
कादंबरीकार होण्याच्या आधी गुलशन नंदा दिल्लीतील बल्लीमारान भागात एका चश्माच्या दुकानात काम करत होते. गुलशन नंदा यांना एकदा बसने प्रवास करत असताना एकाने लिखाण करण्यास सांगितले व ते यशव्वी कादंबरीकार आणि हिंदी पटकथा झाले. साठच्या दशकात गुलशन नंदा हे लेखक पॉकेट बुक्सच्या पहिल्या पिढीतले तळपणारे तारे होते.
गुलशन नंदा यांच्या कादंबर्यांकनी विक्रीची नवनवीन विक्रम प्रस्थापित करतांनाच बॉलीवुडला कटी पतंग, दाग, अजनबी, नया जमाना, झील के उस पार, शर्मिली, खिलौना, आदींसारखे जवळपास २५ सुपरहिट चित्रपटही दिलेत.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबर्यावर जितके हिंदी चित्रपट निघाले तितके हिंदी चित्रपट इतर कोणत्याही हिंदी लेखकाच्या कादंबऱ्यांवर निघाले नसतील.
गुलशन नंदा यांचे निधन १६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 16, 2018
डॉ.श्रीराम लागू यांचे पूर्ण नाव डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला. नटसम्राट' हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.
त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले. शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता. पुण्यातील पी. डी. ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात कामे करायला सुरुवात केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानियायेथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. एम.बी.बी.एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसायात जम बसत असतानाही केवळ नाटकाच्या ओढीने कलावंत म्हणून केलेले काम डॉक्टरेट मिळविण्याइतके महत्त्वाचे आहे. डॉ.लागूंनी रंगभूमीवर कलावंत म्हणून प्रवास सुरु केला.
पी.डी.ए, रंगायन, थिएटर युनिट, कलावैभव, गोवा हिंदू, रूपवेध, आविष्कार, आय.एन.टी. ह्या मान्यवर नाट्यसंस्थांच्या नाटकातून विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. अभिनयाशिवाय त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. त्यात गुरु महाराज गुरु, गिधाडे, हिमालयाची सावली, गार्बो, उद्ध्वस्त धर्मशाळा, कस्तुरीमृग, एकच प्याला, शतखंड, चाणाक्य विष्णुगुप्त, किरवंत इत्यादी. कांती मडिया या अनुवादित गुजराथी नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. तसेच एक होती राणी आणि अॅन्टीगनी या दोन नाटकांचे नाटककार श्रीराम लागू होते. वसंत कानेटकर आणि वि. वा. शिरवाडकर हे दोघेही नाशिककर नाटककार लागूंना जवळचे. त्या दोघांच्याही नाटकांतल्या आव्हानदायी चरित्रभूमिका त्यांनी समर्थपणे हाताळल्या. गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे यांच्यापासून तो प्र. ल. मयेकर, प्रेमानंद गज्वी आणि श्याम मनोहर यांच्यासारख्या आजकालच्या नाटककारांच्या 'प्रायोगिक' कृतीही त्यांनी उत्साहाने हाताळल्या.
मोहन तोंडवळकर, सुधीर भट आणि मोहन वाघ यांच्यापासून तो गोवा हिंदू असोसिएशन आणि इंडियन नॅशनल थिएटरसारख्या संस्थांतही त्यांनी निष्ठेने काम केले. सत्यदेव दुबे यांच्या प्रागतिक संस्थेसाठी डॉक्टरांनी तेंडुलकरांचे 'गिधाडे' हे खळबळजनक नाटक दिग्दर्शित केले आणि त्यात स्वत: एक मध्यवर्ती भूमिकाही केली.
डॉ.श्रीराम लागूच्या रंगभूमीवरच्या एकाहून एक सरस भूमिका गाजल्या त्यातही नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेने अभिनय कारकिर्दीला हिमालयाची उंची गाठून दिली. पत्नी दीपा श्रीराम यांनी निर्मिती केलेल्या 'झाकोळ' या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’तल्या अभिनयाने इतिहास घडवला. सामना’, सिंहासन’, ‘मुक्ता’ या सारख्या चित्रपटांमुळे डॉ. लागू आणि राजकीय चित्रपट हे समीकरण जुळले. 'पिंजरा'तली भूमिका आव्हानात्मक होती. एकाच चित्रपटात लागूंनी दुहेरी अभिनय केला होता. चित्रपटाच्या सुरुवातीला एका संस्कारक्षम, जीवनातील सर्व मूल्य सांभाळून असणारा शिस्तप्रिय शिक्षक, तर चित्रपटांच्या उत्तरार्धात सर्व संस्कार लयाला गेलेली एक असहाय, केविलवाणी, स्वत:चं सर्व अस्तित्व घालवून बसलेली व्यक्ती. एकाच चित्रपटातली आपली ही दोन रुपं अभिनयाच्या ताकदीवर लागूंनी इतकी अप्रतिम साकारलीत की आजही भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास वर्णन करताना तो ह्या भूमिकेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. निळू फुले आणि श्रीराम लागूंचा ‘सामना’ ही चांगलाच रंगला. आणि लागूंच्या ‘सिंहासन’लाही रसिकांनी दाद दिली. आणि सुगंधी कट्टा, देवकीनंदन गोपाला, चंद्र आहे साक्षीला, आदी यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू झाली.
हिंदीतही श्रीराम लागूंनी अभिनयाच्या उंचीने चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली. मराठीत काम करताना त्यांना हिंदीतही ऑफर आल्या. लागू हिंदीत गेले खरे पण त्यात ठसा उमटू शकेल अशा भूमिका त्यांच्या वाट्याला क्वचितच आल्या. हिंदीत चरित्र अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. 'सौतन' चित्रपटातील वडिलांची भूमिका त्यांच्या कसदार अभिनयामुळे लक्षात रहाते. अनेक मालिकांमधूनही त्यांनी काम केले. व्यावसायिक चित्रपटांच्या या दुनियेत कामाच्या समाधानापेक्षा लोकांना काय आवडते हे जास्त पाहिले जाते. शांतारामबापूंच्या दिग्दर्शनात सुरु झालेला श्रीराम लागूंचा चित्रपट प्रवास एका एखाद्या सुंदर स्वप्नासारखा आहे, श्रीराम लागूंच्या अनेकविध भूमिकांमधले वैविध्य अचंबित करणारे आहे. लागूंनी पु. लं.च्या 'सुंदर मी होणार' मधूनही काम केले. सॉक्रिटिसच्या विचारांवर आधारीत ' सूर्य पाहिलेला माणूस' हे नाटकही वैचारीक वर्तुळात गाजले. शिवाय 'मित्र' मधूनही वेगळे लागू पहायला मिळाले. लागू निरिश्वरवादी म्हणून प्रसिद्ध आहेत. 'देवाला रिटायर करा' या त्यांच्या विधानाने एकेकाळी खळबळ उडवली होती.
विचार स्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्त्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्त्व देणारे मा.श्रीराम लागू अनेक सामाजिक, राजकीय बाबींवर परखड प्रतिक्रिया नोंदवतात. सांस्कृतिक व्यासपीठावर ते चौफेर विषयांवर अभ्यासपूर्ण विधाने करतात. सूक्ष्म निरिक्षण व विश्लेषण क्षमता याचा उत्कृष्ट संयोग त्यांच्या व्यक्तीमत्वात झाला आहे. त्यांच्या एकूण कर्तृत्वाचा सन्मान संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन करण्यात आला. मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. तसेच भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरविले आहे. मराठी रंगभूमी आणि हिंदी मराठी चित्रपटांमधल्या अनेक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारा रंगकर्मी, ‘रूपवेध’ ही नाट्यसंस्था सुरू करून चाकोरीबाहेरची अनेकानेक उत्तम नाटके रंगमंचावर आणणारा दिग्दर्शक, निर्माता, नाटकांबरोबरच साहित्य, संगीत अशा कलांमध्ये गती असणारा रसिक, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन, विचारस्वातंत्र्याची चळवळ अशा समाजोपयोगी चळवळींशी जोडलेला सामाजिक कार्यकर्ता असे डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारे पुस्तक आहे ‘रूपवेध’.
तसेच "लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांनी लिहीलेले स्वताःचे आत्मचरित्र आहे.
'लमाण' म्हणजे मालवाहू कामगार. वि. वा. शिरवाडकरांच्या ज्या 'नटसम्राट' या नाटकातील नटवर्य अप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका डॉ. श्रीराम लागूंनी प्रथम साकार केली त्याच भूमिकेतील त्यांचे वाक्य आहे : ''आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे.''
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
श्रीराम लागू यांचे नटसम्राट नाटक
https://www.youtube.com/watch?v=yTFPT7-v-Ws&feature=youtu.be
श्रीराम लागू यांचा पिंजरा चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=W-WzNiN9Tms
श्रीराम लागू यांचा सामना चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo&t=20s
https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM&t=3662s
श्रीराम लागू यांचा सिंहांसन चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=nQoh1HGlxdY
November 27, 2017
नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांद्वारे रसिकांत लोकप्रिय झालेले फारुख शेख यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी झाला. ७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. समांतर चित्रपट आणि तसेच मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये त्यांचा मुक्त संचार सुरू होता. त्यांिनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. विनोद आणि संवेदनशील विषयांवर त्यां चा हातखंडा होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मेतबद्दुर, गरम हवा इत्यािदी चित्रपट गाजले. `क्लब ६०′ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. `यह जवानी है दिवानी’ या चित्रपटामध्ये त्यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेला सिकंदर मिर्झा प्रेक्षकांना खूपच भावला होता.
सहजसुंदर अभिनय ही त्यांची जमेची बाजू होती. मा.फारुक शेख यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले होते. `चमत्कार’, `जी मंत्रीजी’, `श्रीकांत’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने एक वेगळाच प्रभाव निर्माण झाला होता. झी टिव्हीवरील प्रसिद्ध `जीना इसी का नाम’ या शोचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. या शोमध्ये त्यांनी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलाखतही घेतली होती. सत्यजित रे, मुज्जफर अली, हृषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत फारुक शेख यांनी काम केले होते. शबाना आझमी, दीप्ती नवल अशा अभिनेत्रींसोबत फारूक शेख यांची जोडी अधिक गाजली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळेपणा होता. त्यांची विनोदशैली आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची वृत्ती यासाठी फारुक शेख यांची ओळख होती.
फारुख शेख निव्वळ कलाकार नव्हते, तर माणुसकी जपणारे कलाकार होते. एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, प्रचंड अभ्यासू कलावंत, असे फारुख शेख यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही फारुख शेख सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले होते. फारुख शेख यांचे २७ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 28, 2017
भारतीय संगीताच्या इतिहासात अनिलदा म्हणजेच अनिल विश्वामस या बंगाली संगीतकाराचं नाव ठळकपणे कोरलं गेलंय. त्यांचा जन्म ७ जुलै १९१४ रोजी बंगालमधील बरिसाल येथे झाला.
अनिल विश्वास यांच्या दर्जेदार संगीतानं लाखो श्रोत्यांना तृप्त केलं. अनिल विश्वाास नसते, तर मुकेश आणि तलत महेमूद यांचा हृदयाला भिडणारा आर्त स्वर आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता. हिंदी चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून अनिल विश्वास ओळखले जातात. ते स्वतः उत्तम गायक होते, संगीतकार तर होतेच, पण एक अभिनयाची जाण असलेले उत्तम अभिनेताही होते. तसंच ते तबला अतिशय उत्कृष्ट वाजवत.
अनिल विश्वास यांच्यामध्ये संगीताची गोडी त्यांच्या आईमुळे निर्माण झाली. वयाच्या चवथ्या वर्षांपासून ते गायला लागले. त्यांची आई यामिनीदेवीचा आवाज खूपच सुरेल होता. ती स्वतः संगीतरचनाही करत असे. अनिल विश्वास यांचे वडील कामानिमित्त नेहमी बाहेर असत, त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला संगीत शिकण्याची मोकळीक दिली होती. याच कारणानं घरात नेहमी संगीतमय वातावरण असे. अशा वातावरणात अनिल विश्वास संगीताकडे ओढले जाणार नाहीत तर नवलच! आईनं लावलेला हाच संगीताचा वेलु पुढे बहरणार होता. एखादी रचना एकदा कानावर पडली, की ती जशीच्या तशी त्यांना पुन्हा गाता येत असे. त्यांची ग्रहणक्षमता कमालीची होती. कुठलीही गोष्ट ते क्षणात आत्मसात करत. त्यामुळे आसपासचे लोक अवाक् होत आणि त्यांना ‘श्रुतीधर’ म्हणत.
संगीत शिकताना पुढे आईशिवाय अनिल विश्वास यांना कालीप्रसन्न नट आणि लालमोहन गोस्वामी हे दोन गुरू मिळाले. पुढे त्यांनी महफिलींमध्ये गायला सुरुवात केली. पण गायकापेक्षा त्यांची ओळख संगीतकार म्हणून होत गेली. अनिल विश्वास यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. संगीताची समग्र समज त्यांना होती. बरिसालमध्ये त्यांना संगीताची आवड निर्माण झाली आणि कलकत्यामध्ये ती अधिक परिपक्व होत गेली. बरिसालप्रमाणेच कलकत्यातल्या महफिलींमध्ये अनिल विश्वास नसतील, तर ती महफिल अधुरी वाटे.
अनिल विश्वास यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाएकाचं शिष्यत्व त्यांनी कधीच पत्करलं नाही. एका साच्यात त्यांनी स्वतःला कधी ठेवलं नाही. त्यामुळे अमुक एका घराण्याचा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. ज्या कोणाकडून शिकायला मिळेल, तिथून ते शिकत. अगदी वेश्या, नाचणार्यां च्या कोठ्यावर देखील त्यांची पावलं संगीत ऐकण्यासाठी वळली. संगीतक्षेत्रातल्या संधी त्यांच्यासमोर येत गेल्या आणि ते स्वीकारत गेले. अनिल विश्र्वास कविताही करत. वयाच्या १४ व्या वर्षापासून ते संगीत समारोहात गात असत.
वयाच्या १६ व्या वर्षी त्या वेळचे कलकत्त्यामधले थोर बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडे आश्रय घेतला. पन्नालाल घोष यांचा विवाह अनिल विश्वास यांची बहीण पारोल घोष हिच्यासोबत झाला होता. अनेक दिवस त्यांनी शिकवण्या घेतल्या. तसंच मेगा फोन रेकॉर्ड कंपनीत त्यांनी काम केलं. १९३० मध्ये अनिल विश्वादस कलकत्यातल्या रंगमहल थिएटरबरोबर अभिनेता, गायक सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायला लागले. रंगमहल थिएटर हे कलकत्यामधलं सर्वश्रेष्ठ असं थिएटर होतं. कलकत्यामध्ये एक निहार नावाची वेश्या होती, तिला ते बहीण मानत. ती त्यांना रंगमहल थिएटरमध्ये घेऊन गेली आणि इथून त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. इथूनच त्यांच्यातला गायक, संगीतकार, कवी, अभिनेता बहरत गेला आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला.
संगीतक्षेत्रात लोक त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेऊ लागले. त्याच वेळी ते हिंदूस्थान रेकॉर्डिंग कंपनीबरोबरही जोडले गेले. तिथेच त्यांची कुंदनलाल सहगल आणि सचिन देव बर्मन यांच्याबरोबर भेट झाली. अनिल विश्वास व लता मंगेशकर हे एक समीकरणच होतं. १९४७ नंतर, लता मंगेशकर यांच्या आवाजाने अनिल विश्वास यांच्या संगीतात मुक्त संचार केला. ‘प्रीतम तेरा मेरा प्यार’ (गजरे), ‘याद रखना चाँद तारो’ (अनोखा प्यार), ‘मन में किसी की प्रीत बसले’ (आराम, ‘आए थे धडकन लेकर दिल में’ व ‘इस हंसती गाती दुनिया में’ (लाजवाब), ‘हंसले गाले ओ चाँद मेरे’ व ‘मस्त पवन है चंचल धारा’ (जीत), ‘क ैसे कह दूँ बजरिया के बीच’ (लाडली), ‘मोसे रूठ गयो मेरा सांवरिया,’ व ‘बेईमान तोरे नैनवा (तराना), ‘जा मैं तोसे नाही बोलूं’ (सौतेला भाई) इत्यादींसारखी अनेक हृदयस्पश्री गीतं अनिल विश्र्वास श्रेष्ठत्व ठरविण्यास पुरेशी ठरतात.
भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा अतिशय कुशल प्रयोग त्यांनी चित्रपटसंगीतात केला आणि भारतीय चित्रपटसंगीताला एक दर्जेदार संगीताचा मान मिळवून दिला. त्यांना ऑकेस्ट्राचं जे वेड होतं, त्यामुळेच त्यांनी बॅले संगीतावर उल्लेखनीय काम केलं. त्यांनी उर्दु गजलांचा अनुवाद बंगाली भाषेत केला. तीन दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी संगीताच्या जगात त्यांनी आपला ठसा उमटवला. १९३१ बोलपटांचा जमाना सुरू झाल्यानंतर, चित्रपट संगीताला नवी दिशा देणार्या त्यातही, शास्त्रीय व लोकसंगीताचा सुरेख वापर वेळोवेळी करणार्या अनिल विश्वास यांनी आपल्या यशस्वी संगीत कारकिर्दीत जवळपास ९५ चित्रपटांना उत्तम संगीत दिलं.
मिलन, ज्वारभाटा, लाडली, अरमान, अनोखा प्यार, आरजू, छोटी छोटी बाते, सौतेला भाई या चित्रपटांचं संगीत अजरामर आहे. अनिल विश्वास यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मुकेश, तलत महेमूद, लता मंगेशकर, बेगम अख्तर, मीना कपूर आणि अमीरबाई कर्नाटकीसारख्या एकूण ७६ गायकांनी गाणी गायली. नाट्यसंगीत आणि भक्तीसंगीताचीच त्या वेळी मक्तेदारी होती, अशा वातावरणात ती चौकट भेदून अनिल विश्वास यांनी संगीताला खरं भारतीय व्यक्तित्व दिलं. अखिल भारतीय स्तरावर संगीताला वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. चित्रपटसंगीताच्या क्षेत्रातून निवृत्ती घेउन अनिल विश्वास दिल्ली आकाशवाणीत रुजू झाले. तिथे त्यांनी १९६३ ते १९७५ या कालावधीत काम केलं. १९८६ साली त्यांना संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवलं गेलं. या काळात एक नॅशनल ऑर्केस्ट्रा बनवण्याच्या विचारानं त्यांना झपाटलं होतं. पण थंड सरकारी यंत्रणेकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यानं ती योजना तशीच बारगळली.
दिल्ली आकाशवाणी वर अनिल विश्वास यांनी नरेंद्र शर्मां यांच्या रचना मन्नाडेंच्या आवाजात गाऊन घेतल्या. त्यातली ‘नाच रे मयुरा’ ही शास्त्रीय बंदिश इतकी श्रवणीय आहे की त्या काळी ती खूपच गाजली होती. ते जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातही संगीत सल्लागार म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी संगीताचे वर्गही चालवले. हम लोग’, बैसाखी’, ‘फिर वही तलाश’ सारख्या उत्कृष्ट टीव्ही मालिकांनाही त्यांनी संगीत दिलं.
‘हम लोग’चं शीर्षक गीत आजही सगळ्यांना आठवत असेल, आईए हाथ उठाये हम भी’ या ओळींची रचना केली होती फैज यांनी. या एक ओळीला दिलेलं संगीत आणि त्यामागचा कोरस आजही विसरता येत नाही. तसंच अनिल विश्वास यांनी ‘गजलेर रंग’ हे गजलवर आधारित बंगाली भाषेत एक पुस्तकही लिहिलं.
‘गजल’ या विषयावरचं त्यांचं संशोधन खूपच महत्त्वपूर्ण आहे. अनिल विश्वांस यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना सन्मानित केलंच, पण मध्यप्रदेश सरकारनेही त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं गौरवलं. अनिल विश्वास यांचे ३१ मे २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
June 1, 2018
यशाचा, अपयशाचा, कारकीर्दीचा विचार करणारे अनेक अभिनेते असतात. अभिनयाचा आणि आपल्या व्यक्तिरेखेचा विचार करणारे अभिनेते अभावानेच आढळतात. कमल हासनचा समावेश असाच 'विचारी' अभिनेत्यांमध्ये करावा लागेल. तो प्रत्येक व्यक्तिरेखेचा, कथानकाचा तपशिलात जाऊन विचार करतो आणि भूमिकेची त्यानुसार रचना करतो. कमल हासनच्या या अभिनय वैशिष्ट्याचं दर्शन घडविणारा एक छोटासा चित्रपट महोत्सव दिल्लीत झाला. कमलच्या अभिनय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चित्रपट महोत्सव संचालनालयानं या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. अनेक अभिनेत्यांच्या कारकीर्दीचा असा सुवर्ण महोत्सव होतो, मग कमल हासनच्याच चित्रपटांचा असा वेगळा महोत्सव का? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्याचे उत्तर सात महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ज्या कलावंतांच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली, अशा काही प्रमुख हयात कलावंतांचा या महोत्सवात सन्मान करण्यात आला होता. त्या यादीत कमल हासनचे नाव नव्हते. कमलचे नाव नव्हते, त्याचे कारण बहुधा त्याचे वय पाहता, त्याच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे झाली आहेत, असे मुळात कुणाला वाटलेच नसावे. कमल आता ५५ वर्षांचा आहे. त्याच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षी 'कलातूर कन्नम्मा' या चित्रपटाने झाली. सर्वोत्कृष्ट बाल कमल अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला होता. पुरस्कार आणि व्यावसायिक यश यांची सांगड घातली गेल्याचे भारतात क्वचितच दिसते. परंतु, त्याच्या कारकीर्दीत त्याला स्वतःला आवडणारे, पटणारे चित्रपट आणि लोकांना भावणारे चित्रपट अशा दोन्ही प्रवाहांमध्ये यशस्वीरीत्या वाटचाल केली. सर्वसामान्य प्रेक्षक त्यातला एक स्टाईलबाज, रोमँटिक नायक म्हणून ओळखतो, तर संवेदनशील प्रेक्षकांना त्याची ओळख आहे, एक विचारी अभिनेता म्हणून. स्वतःवर वाजवीपेक्षा जरा जास्तच प्रेम करणारा आणि प्रयोगांच्या आहारी जाणारा अभिनेता म्हणूनही त्याची एक ओळख आहे. केवळ कलाकार म्हणूनच नव्हे तर लेखक, निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही तो कायम वेगवेगळे प्रयोग करत राहिला आणि आपल्याला असे
प्रयोग करता यावेत म्हणून पैशासाठी तो सामान्य व्यावसायिक चित्रपट करीत राहिला. त्यामुळेच कमलच्या एकूण व्यावसायिक कारकीर्दीचे दोन भाग पडले. ‘अपूर्व 'मध्ये प्रौढ स्त्रीच्या प्रेमात पडलेला तरुण किंवा मणिरत्नमच्या 'नायकन'मधली 'गॉडफादर' पद्धतीची व्यक्तिरेखा यामुळे कमल हासन अभिनयाच्या एका वेगळ्या उंचीवर पोचतो, त्याच वेळी 'अप्पूराजा'मधून तो सर्वसामान्य प्रेक्षकांचा ठाव घेतो. हिंदीत कमल इतके यश आणि लोकप्रियता क्वचितच एखाद्या दाक्षिणात्य नायकाला मिळाली असेल. 'एक दुजे के लिये' चालला तेव्हा तो आता हिंदीत मोठी खेळी खेळणार असे वाटले होते. परंतु, 'सागर', 'सदमा', 'एक नई पहेली' असे तुरळक अपवाद वगळता त्याने चित्रपटांची निवड कधी गांभीर्याने केली नाही. हिंदीच्या प्रेक्षकांनीही त्याला गंभीरपणे घेतले नाही.
'राजतिलक'सारखे टुकार चित्रपट करून त्याने हिंदीतले स्थान स्वतःच घालवले. परंतु कारकीर्दीचा असा विचार त्याने तामीळ चित्रपटसृष्टीतही केला. नाही, त्यामुळेच तो संवेदनशील प्रेक्षक आणि पिटातील प्रेक्षक, दोघांनाही आपला वाटत आल आहे. त्याचा एक तोटा असा झाला की, योग्यत असूनही त्याला 'सुपरस्टार पद' मिळू शकले नाही. स्वतःला आवडेल, पटेल आणि रुचेल ते करण्याचं जी 'मस्ती' त्याने अनुभवली, त्याच्यापुढे 'सुपरस्टार पदाला काही अर्थ राहात नाही. व्यक्तिरेखांचे, मेकअपचे, शैलीचे प्रयोग करण्याची आपली हौस त्याने पुरेपूर भागवून घेतली. 'अप्पूराजां'मध्ये त्याने गुडघ्यात पाय दुमडून ठेंगू व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली. 'इंडियन'मध्ये तरुण आणि म्हातारा अशी दुहेरी भूमिका केली. चाची ४२० मध्ये तो चक्क नऊवारी नेसून 'लक्ष्मीबाई' बनला, तर 'दशावतार'मध्ये अकारण दहा बटबटीत व्यक्तिरेखा साकारल्या. त्याने दिग्दर्शित केलेल्या 'हे राम'मध्येही त्याचा फोकस कायम स्वतःवरच होता. त्याच्या अशा 'गिमिक्स'पेक्षा त्याने 'सदमा'मध्ये साकारलेली भावूक, हळवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अधिक आवडते, संवादरहित 'पुष्पक'मधला त्याचा प्रियकर जास्त लोभस ठरतो. त्याचे वेगळेपण तरीही मान्य करावेच लागते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सामान्य प्रतिनिधींसोबत, साध्या कपड्यांमध्ये उपस्थित राहणारे 'स्टार' फार कमी असतील. अशा खऱ्या 'स्टार'पैकी कमल एक आहे!
July 31, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti