(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शास्त्रीय उपशास्त्रीय गायक शौनक अभिषेकी

    भारतातील सर्व संगीत महोत्सवासह भारताबाहेर यूरोप, अमेरिका, इग्लंड, ऑस्ट्रेलिया, द दक्षिण अफ्रीका, रशिया, चीन आदी देशांमध्ये आपली कला सादर करुन रसिकांची वाहवाही मिळवली आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचे फ्युजन करण्याचे अनेक प्रयोग इतर भार परदेशी कलाकारांच्या साथीने ‘Vibgyor’,’ताल यात्रा’, ‘साउंड ऑफ इंडिया ‘माईल्स फ्रॉम इंडिया’ अशा कार्यक्रमातून सादर करून त्यांनी संगीत क्षेत्रातील ही वेगळी वाट सुद्धा समर्थपणे हाती आहे जी रसिकांच्या पसंतीस उतरली आहे.

      April 28, 2022


  • संगीतकार वसंत देसाई

    उत्तम गळा , दमदार आवाज , बळकट कमावलेले शरीर आणि जबरदस्त आलापी आणि गुरुकडे केलेला रियाज ह्यामुळे त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक तयार झाली. त्यांनतर ते ठिकठिकाणी गाण्याच्या मैफली करू लागले . त्यामुळे त्यांना इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीतर्फे गाण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा त्यांनीच संगीत देऊन स्वतःच्याच आवाजात गाणी गायली.

      June 23, 2021


  • जेष्ठ गायीका मा.सुधा मल्होत्रा

    जेष्ठ गायीका मा.सुधा मल्होत्रा

    जेष्ठ गायीका सुधा मल्होत्रा यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३६ रोजी झाला. लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या प्रभावाच्या काळात सुद्धा सुधा मल्होत्रा यांनी स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. सुधा मल्होत्रा यांनी अनेक हिंदी चित्रपट गीते गायली.

    तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर कुमार यांच्या बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), व मराठीत तर त्यांनी अमराठी असुन ठसा उमटवला. शुक्रतारा मंद वारा (मा.अरुण दाते यांच्या बरोबर) आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर ती गाणी अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.

    विसरशील खास मला” हे मालकंस रागातील नितांत सुंदर गीत. त्यावेळेस यशवंत देव आकाशवाणीवर संगीतकार म्हणून नोकरीला होते. दोन कार्यक्रमांमधील जागा भरून काढण्यासाठी त्यांना एक गाणे हवे होते. “विसरशील खास मला” हे गीत त्यांनी सुधा मल्होत्रा यांच्याकडून म्हणून घेतले. हे गीत अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झाले. त्यावेळेस कामात खूप व्यस्थ असलेल्या आशा भोसले यांना हे गीत खूप भावले.

    त्यानंतर काही वर्षांनी आशा भोसले यांच्या विनंतीवरून यशवंत देव यांनी हे गीत पुन्हा एकदा आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड केले. शुक्रतारा मंदवारा हे गाणे जवळ जवळ १०० चे वर मा.सुधा मल्होत्रा शुक्रतारा मंदवारा या कार्यक्रमाच्या निमिताने मा.अरुण दाते यांच्या बरोबर गायल्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=b3buW-o0ylo

      November 30, 2018


  • पांडुरंग शास्त्री आठवले

    दादा एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय’ परिवाराची स्थापना केली. श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला.

      October 30, 2010


  • ख्यातनाम मराठी कोशकार चिंतामणी गणेश कर्वे

    ‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’ असे ग्रंथ रचले. ज्ञानवंत, विचारवंत, व चिकित्सक अशा चिंतामणी गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीचे प्रचंड काम केले. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पाहिले जाते.

      December 16, 2021


  • कृष्णधवल सिनेमा काळातील अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टूनटून

    टूनटून यांचे खरे नाव उमा देवी खत्री होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९२३ रोजी झाला. १९४०-४५ चा काळ होता, रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी थापा पडल्या. डोअर बेल न वाजवता दारावर कोण सलग थापा मारतंय हे बघण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर कोणीच नव्हते, ते दार बंद करणार इतक्यात बाजूला लपलेली एक १२- १३ वर्षांची धिटूकली समोर आली. तिने त्यांच्या पायाला मिठीच मारली ! ते तिच्याशी बोलण्याआधी तिने भोकाड पसरले, ते तिला घरात घेऊन आले. तिची विचारपूस केली तेंव्हा ती बोलती झाली. ती म्हणाली, "मला तुम्ही गायनाची संधी दिली नाही तर मी इथल्याच समुद्रात जीव देईन !" गावात असताना रेडीओवर गाणी ऐकून ऐकून तिने एकलव्यी बाण्याने रियाझ केलेला, इतकीच काय ती तिची गायनाची तयारी पण तिचा आवाज मधुर असल्याने तिचा स्वतःवर विश्वास होता अन तिच्या डोक्यात सतत नौशादजींचे वेड असे.

    या शिदोरीवर तिने घर सोडून वयाच्या १३ व्या वर्षी थेट मुंबई गाठली होती. नौशाददेखील युपीच्या लखनौचेच असल्यामुळे त्यांना तिची काळजीही वाटत होती. नौशादजीनी तिच्या अशा या पार्श्वभूमीमुळे काही दिवस काम दिले नाही अन एके दिवशी तिची ऑडीशन घेतली आणि ते अचंबित झाले ! या मुलीचे नाव उमा देवी होय ....गाण्याचे वेड डोक्यात घेऊन आलेल्या उमादेवीच्या आयुष्यात पुढे अनेक चढउतार येऊन ती एक हसण्याजोगी बाब होणार आहे याचा तिला तिळमात्र अंदाज नव्हता. त्या दिवशी नौशादजींनी तिला ऐकले अन तिला पार्श्वगायनासाठी तत्काळ निवडले. तिची वर्णी इतरत्र लागू नये म्हणून नौशादजींनी ए. आर. कारदार यांना गळ घातली, नौशाद म्हणजे त्या काळाचे सर्वात मोठे संगीतकार असल्याने त्यांचा शब्व्द डावलणे अशक्य होते. तत्काळ उमादेवीची निवड शैलीदार सोनेरी आवाजाची गायिका म्हणून ए. आर.कारदार प्रॉडक्शन हाऊससाठी झाली, तिच्याशी करार केला गेला, तिचे मासिक वेतन ५०० रुपये ठरवले गेले. पण एक अट होती तिने ३ वर्षे दुसरया प्रॉडक्शन हाऊससाठी गायचे नाही.

    त्यांना गाण्यासाठी लगेच सिनेमे मिळाले दर्द, दिल्लगी, चांदनी रात, नाटक पैकी 'दर्द' मधील शकील बदायुनी यांनी लिहिलेलं' अफसाना लिख रही हुं' ने तिला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले सुरैयाबरोबरचे 'बेताब है दिले दर्द' ने तिला आणखी प्रसिद्धी मिळाली. दर्द नंतर मेहबूब खानच्या 'अनोखी अदा' मधलं 'काहे जिया डोले' आणि 'दिल को लगाके हमने कुछ भी न हमने पाया. 'हे गाणंही हिट झालं. पण उमादेवी मात्र करारात बांधल्या गेल्या असल्यामुळे इतर संधींना मुकत गेल्या अन त्यांना हळूहळू गायकीसाठी इतर प्रॉडक्शन हाऊसची दारे जवळजवळ बंद झाली अन तिचे करारबद्ध प्रॉडक्शन हाऊसच शेवटी बंद पडले. अन उमा देवी गायिकेच्या भूमिकेतून स्ट्रगलरच्या फेऱ्यात अडकली. त्या कामासाठी फिरू लागल्या. त्या गव्हाळ वर्णाच्या, थोडीशी जाड अंगाची, किंचित बसक्या चणीची होत्या, दिसायला लाखात एक वगैरे अशी काही नव्हत्या पण ती अगदी जेमतेम सौंदर्यवती होती अशी बाब होती. गायकीत नाव झाले तरी हरकत नाही पण अपयशाचा शिक्का घेऊन गावाकडे तिला परत जायचे नव्हते. त्यामुळे गाण्यातील संधींनी तोंड फिरवल्यामुळे तिने अभिनयासाठी प्रयत्न सुरु केले, एखादा रोल मिळतो का यासाठी ती वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसचे उंबरठे झिझावू लागल्या. त्याचा गायकीचा प्रवास थांबला, नायिका होण्याचे स्वप्न भंगले अन ती बॉलीवूडची पहिली महिला कॉमेडीयन म्हणून नावारूपाला आली.

    १९५० मध्ये नौशाद यांचीच निर्मिती असलेला बाबुल हा सिनेमा सेट वर आला. या सिनेमातील नर्गिसच्या मैत्रिणीच्या - मुन्शीजीच्या मुलीच्या विनोदी भूमिकेसाठी तिला विचारणा झाली प्रेक्षकांनी या सिनेमातील उमादेवीच्या पात्रावरही प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला, या पात्राचं नाव होतं टूनटून! हे नाव पुढे उमादेवीला आयुष्यभर चिकटले. त्यांची गायिका ही मूळ ओळख या सिनेमाने पुसून काढली अन टूनटून हे नाव जन्मास आले. जॉनी वॉकर, मेहमूद, धुमाळ, आगा, मुक्री, केष्टो मुखर्जी, भगवानदादा अशा अनेक कॉमेडीयन्स सोबत त्यांनी सिनेमे केले पण कधी कुणाशी नाव जोडू दिले नाही. टूनटून यांचा समाजावर इतका प्रभाव पडला की टूनटून या शब्दाचा अर्थच जाडी मुलगी असा होऊन गेला. टूनटूनने केलेल्या गुरुदत्तच्या आर-पार, मिस्टर और मिसेस फिफ्टी फाईव मधील आणि आबरू, एक राज, प्यासा, शराफत, दिल और मोहब्बत मधील भूमिका विशेष गाजल्या. १९५० ते १९६०च्या दशकातील ५० सिनेमात त्यांनी काम केलं. मा. उमादेवी उर्फ टूनटून यांचे २४ नोव्हेंबर २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. समीर गायकवाड / इंटरनेट

    उमादेवी उर्फ टूनटून यांनी गायलेली काही गाणी
    मेरी प्यारी पतंग
    अफसाना लिख रही हुं
    दिलवाले

      January 1, 2018


  • भारताचे माजी यष्टिरक्षक नरेन ताम्हाने

    नरेन ताम्हाणे यांनी आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात १ जानेवारी १९५५ रोजी पाकिस्तानविरुद्ध केली होती. नरेन ताम्हाणे हे आपला शेवटचा कसोटी सामना ३० डिसेंबर १९६० रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळले होता.

      March 19, 2022


  • पार्श्वगायक मुकेश

    मुकेश यांनी खऱ्या अर्थाने पार्श्वगायनाला सुरुवात केली ती १९४५ पासून ‘पहली नजर’ या चित्रपटातील ‘दिल जलता है..’ ह्या गाण्यापासून.

      August 27, 2021


  • किराणा घराण्याचे गायक पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर

    किराणा घराण्याचे गायक पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर जन्म २ जानेवारी १९३७ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील " दिवेआगर येथे झाला.
    अच्युत अभ्यंकर यांनी आकाशवाणी येथे अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच पं. अभ्यंकर यांनी देश–विदेशांत असंख्य मैफिली सादर केल्या. आपले गुरु पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन पं. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले. १९९२ ते १९९५ सालापर्यंत मुंबई विद्यापीठात हिंदुस्थानी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पं अभ्यंकर यांना सुरमणी, गायनाचार्य, संगीत ऋषी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ठाणे महापालिकेतर्फे २००६ साली ‘ठाणे गौरव पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

    पं अभ्यंकर यांच्या तालमीत ठाण्यातील अनेक नावाजलेले गायक आणि गायिका गायकीचे धडे घेतले. डॉ वरदा गोडबोले, लीला शेलार, विभावरी बांधवकर, मधुवंती दांडेकर, प्रणव पटवर्धन हे यापैकी काही. पं राम मराठे यांच्यासह अच्युत केशव अभ्यंकर यांनी संगीत मंदारमाला या नाटकाच्या काही प्रयोगांमध्ये विशेष भूमिका बजावली होती. पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर यांचे ९ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मराठी सृष्टी/इंटरनेट

      January 2, 2019


  • पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मे पुं रेगे

    मे.पुं रेगे हे व्यवसायाने 'तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. त्यांची महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्टय़े होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्वविाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो. भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल असते. त्यांनी महाराष्ट्राला कुठलाही नवीन विचार दिला नाही, विचार कसा करावा याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही; पण त्यांनी गंभीर लेखनासोबत ‘विश्वकोश’, ‘नवभारत’ यांचे प्रत्यक्ष काम करून आपल्या चिंतनशील प्रकृतीला क्रियाशीलतेचीही जोड द्यायची असते, या विसाव्या शतकातील ज्ञानपरंपरेचा वारसा सक्षमपणे चालवला.

    मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पश्चिमी तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास हा त्यांचा पश्चिमी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांना याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांनी काही काळ ‘नवभारत’ आणि ‘क्वेस्ट’ या मासिकांचेही संपादन केले. ‘नवभारत’मध्ये त्यांनी संपादकीय, लेख, पुस्तक परीक्षणे अशा विविध स्वरूपांचे लेखन केले. त्याचबरोबर तत्त्वज्ञानावरील पाठय़पुस्तकांचेही लेखन केले.

    ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’, ‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’, ‘स्वातंत्र्य आणि न्याय’, ‘िहदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत, तर ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात नावानुसार पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास आहे. रेगे यांचे ‘मर्मभेद’ हे संपादित पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. मे.पुं रेगे यांचे २८ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 24, 2018