(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुधीर फडके उर्फ बाबुजी

    कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता.

      July 29, 2021


  • महानतम गायिका ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ

    महानतम गायिका ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव 'अल्लाह वसई होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला.

    संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती.

    नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ यांना नृत्य व गाणे शिकायला मिळाले. नूरजहाँ यांच्या गाण्यावर प्रभावित होऊन संगीतकार गुलाम हैदर यांनी पंजाबी चित्रपट ‘शीला’ उर्फ ‘पिंड दी कुड़ी’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका दिली. हा चित्रपट पंजाब मध्ये गाजला. त्या काळी पंजाब म्हणजे लाहोर पण होते. १९३० च्या दशकात लाहोर मध्ये अनेक स्टूडियो स्थापन झाले. गायकाची वाढती मागणी लक्षात घेऊन नूरजहाँ यांचा परिवार १९३७ मध्ये परत लाहोरला आला. तेथे डलसुख एल पंचोली यांनी बेबी नूरजहाँ यांचे गाणे बघून ‘गुल-ए-बकवाली’ या चित्रपटात भूमिका दिली.

    या नंतर त्यांचा यमला जट, ‘चौधरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी ‘कचियां वे कलियाँ ना तोड़’ व ‘बस बस वे ढोलना की तेरे नाल बोलना’ ही खूप लोकप्रिय झाली.

    १९४२ मध्ये नूरजहाँ यांनी आपल्या पुढील बेबी हा शब्द काढला. त्याच वर्षी ‘खानदान’ चित्रपटातून त्यांनी लोकांचे ध्यान वेधून घेतले. याच चित्रपटाचे निर्देशक शौकत हुसैन रिजवी यांच्या बरोबर लग्न केला. १९४३ मध्ये नूरजहाँ मुंबईला आल्या. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांच्या ‘लाल हवेली’, ‘जीनत’, ‘बड़ी माँ’, गाँव की गोरी और मिर्जा साहिबाँ, अनमोल घडी या चित्रपटासाठी नूरजहाँ यांची आठवण काढतात. अनमोल घड़ी चे संगीत नौशाद यांनी दिले होते त्यातील ‘आवाज दे कहाँ है’, ‘जवाँ है मोहब्बत’ और ‘मेरे बचपन के साथी’ ही गाणी आजही लोक आवडीने एैकतात.

    नूरजहाँ फाळणी नंतर मुंबईहून लाहोरला आल्या. त्यांचे पती रिजवी यांनी शाहनूर स्टूडियो चालू केला. शाहनूर प्रोडक्शन नी ‘चन्न वे’ ची निर्मिती केली ज्याचे निर्देशन नूरजहाँ यांनी केले होते. त्यातील ‘तेरे मुखड़े पे काला तिल वे’ हे गाणे लोकप्रिय झाले.

    नूरजहाँ यांची शेवटचा चित्रपट ‘बाजी’ होता त्यांनी पाकिस्तातात १४ चित्रपट बनवले त्यातील १० उर्दू होते. काही कारणाने त्यांना अभिनय सोडावा लागला पण त्यांनी गाणे चालू ठेवले.

    पाकिस्तानात पार्श्वगायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘जान-ए-बहार’ होता. यातील ‘कैसा नसीब लाई’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर में उर्दू, पंजाबी व सिंधी भाषात अनेक गाणी गायली.

    त्यांना पाकिस्तान मधील सर्वोच्च सम्मान ‘तमगा-ए-इम्तियाज’ मिळाला होता.

    नूरजहाँ यांचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 8, 2017


  • मल्टीस्टारर चित्रपटांचे निर्माते गुलशन राय

    मल्टीस्टारर चित्रपटांचे निर्माते गुलशन राय यांचा जन्म २ मार्च १९२४ रोजी झाला.

    गुलशन राय यांचे नाव बॉलीवूडमध्ये एक चित्रपट निर्माते म्हणून स्मरणात ठेवले जाते ज्यांनी त्यांनी निर्मिती केलेल्या मल्टीस्टारर चित्रपटांमधून प्रेक्षकांमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली. गुलशन राय यांनी वितरक म्हणून करिअरची सुरुवात केली. गुलशन राय यांनी त्यांच्या त्रिमूर्ती फिल्म्स बॅनर खाली १९७० मध्ये आलेल्या जॉनी मेरा नाम या चित्रपटातून निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

    'जॉनी मेरा नाम' मध्ये देवानंद, हेमा मालिनी, प्राण, प्रेमनाथ, आय एस जोहर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९७३ मध्ये गुलशन राय यांनी पुन्हा एकदा देवानंद आणि हेमा मालिनी यांच्या जोडीने जोशिलाची निर्मिती केली. यश चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट तिकीट खिडकीवर विशेष कामगिरी दाखवू शकला नाही.

    १९७५ साली प्रदर्शित झालेला 'दीवार' हा चित्रपट गुलशन राय यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गणला जातो.
    यश चोप्रा दिग्दर्शित 'दीवार' या चित्रपटातून दोन्ही भावांमधील द्वैत उत्तम प्रकारे मांडण्यात आले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा होता. हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला, त्याचप्रमाणे निरुपा रॉयलाही आईच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्धी मिळाली.

    १९७७ मध्ये गुलशन राय यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना घेऊन 'ड्रीमगर्ल'ची निर्मिती केली होती. 'ड्रीमगर्ल'ही तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'त्रिशूल' चित्रपटाद्वारे गुलशन राय यांनी अनेक मल्टीस्टारना एकत्र आणले. या चित्रपटात संजीव कुमार, वहिदा रहमान, अमिताभ बच्चन, शशी कपूर, हेमा मालिनी, राखी, पूनम ढिल्लन, सचिन, प्रेम चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

    यश चोप्रा दिग्दर्शित 'त्रिशूल'मध्ये गुलशन राय यांनी पिता-पुत्रांमधील संघर्ष रुपेरी पडद्यावर आणला. 'त्रिशूल' तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९८२ साली प्रदर्शित झालेला 'विधाता' हा चित्रपट गुलशन राय यांच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपटांमध्ये गणला जातो. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटाने पुन्हा एकदा सुपरस्टार्सची फौज उभी केली. 'विधाता'मध्ये दिलीप कुमार, संजीव कुमार, शम्मी कपूर, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरी, सुरेश ओबेरॉय आणि अमरीश पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
    १९८५ मध्ये गुलशन राय यांनी 'युद्ध'ची निर्मिती केली होती. त्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांचा मुलगा राजीव राय यांच्याकडे सोपवली. 'युद्ध'ला तिकीट खिडकीवर सरासरी यश मिळाले.१९८९ मध्ये गुलशन राय यांनी आणखी एक मल्टीस्टारर चित्रपट 'त्रिदेव' तयार केला. राजीव राय दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी, अमरीश पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.

    यानंतर गुलशन राय यांनी मोहरा आणि गुप्ता सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. गुलशन राय यांचे ११ ऑक्टोबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      April 27, 2024


  • दिलखुलास – प्रवीण दवणे

    प्रवीण दवणे… वक्ते, साहित्यिक, मराठीचे अध्यापक आणि एक मनमोकळं व्यक्तिमत्त्व. जे त्याच्या छायाचित्रातून जाणवत राहते…

    पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण, अनेक कवितासंग्रह, नाटकांचं लिखाण, तब्बल सवाशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठीची गीतरचना, अडीचशेहून अधिक कॅसेटस्साठी दोन हजांहून अधिक भावगीतं आणि भक्तिगीतांचं लिखाण, सतत दौऱयावर राहून दर्दी प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱया कार्यक्रमांचा सूत्रधार आणि सुमारे चार दशकं मराठीचे खमके अध्यापक म्हणून ओळख मिळवलेले आणि कुसुमाग्रजांची एक वेगळीच जवळीक लाभलेला तसंच त्यांच्या नवनवीन कविता खुद्द ज्यांनी त्यांना वाचून दाखवल्या तो भाग्यवान साहित्यिक म्हणजे प्रवीण दवणे.

    ते साहित्य क्षेत्रात येण्यासाठीचा टर्निंग पॉइंट ठरला तो त्यांच्या शाळेत साजरा केला गेलेला शिक्षक दिन. डोंबिवलीतील स. वा. जोशी हायस्कूलला अकरावीला असताना त्यांनी शिक्षक दिनानिमित्त दहावीच्या वर्गासाठी मराठीचा तास घेतला होता. त्यांच्या शिकवणीचं विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भरभरून कौतुक केलं आणि इथेच त्यांना त्यांच्यात लपलेल्या सुप्त गुणांची वेगळी अशी ओळख झाली. त्यांनी मराठीचा ध्यासच घेतला आणि पुढे साहित्याचा वसाच जपण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं.

    बघता बघता त्यांच्या लिखाणाला गती आली आणि वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ‘मंथन’ ही पहिली कादंबरी लिहिली. या कादंबरीच्या लिखाणानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ‘दिलखुलास’, ‘परीसस्पर्श’, ‘प्रकाशाची अक्षरे’, ‘रे जीवना!’, ‘सावर रे’, ‘शब्दमल्हार’, ‘सूर्यपूजक कुसुमाग्रज’ अशा पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण त्यांनी केलं. आर्ताचे लेणे, आनंदाचे निमित्त, भूमीचे मार्दव, दत्ताची पालखी, एक कोरी सांज असे अनेक कवितासंग्रह त्यांचे आजवर प्रसिद्ध झाले आहेत तर आई परत येते, प्रिय पप्पा अशा अनेक नाटकांसाठीचं लिखाणदेखील त्यांनी केलं आहे. सावर रे, दिलखुलास, लेखनाची आनंदयात्रा, वय वादळ विजांचं हे त्यांचे कार्यक्रम आजही दर्दी रसिकांची गर्दी खेचतंय.
    मराठी साहित्यात आपला वेगळा असा ठसा उमटवलेल्या प्रवीणजींचं एक वेगळं पोर्ट्रेट मला टिपण्याची संधी मिळाली. त्यासंबंधित त्यांच्याशी बोलून मी ठरल्याप्रमाणे त्यांच्या घरी गेलो.

    घरात शिरताचक्षणी लगेचच लक्ष वेधून घेत ते त्यांच्या यशाचा आलेख सांगणाऱया कित्येक ट्रॉफीजची केलेली आरासवजा मांडणी. शेकडो पारितोषिकांनी नटलेली ही मांडणी प्रवीणजींच्या यशाचा आलेख स्पष्ट सांगतात. अनेक सिनेमांची छायाचित्रं असलेली, नामांकित संस्थांची नावं असलेली, अनेक नामांकित आणि मानाच्या अशा पुरस्कारांनी सजलेल्या या ट्रॉफीज नुसत्या पुनः पुन्हा बघत राहाव्या अशाच. याच ट्रॉफीजच्या पुढय़ात प्रवीणजींना उभं राहण्याची मी विनंती केली आणि यशाच्या या खुल्या शिदोरीसोबत त्यांचे काही मुद्दाम ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी टिपले. कृष्णधवल छायाचित्रांनी त्यांचा हा इतिहास आणखीनच जिवंत वाटत होता. हे फोटो टिपत असतानाच माझ्या मनात एक प्रश्न डोकावत होता. प्रवीणजी त्यांचं लिखाण कुठे बरं करत असतील या प्रश्नाचं उत्तर थेट त्यांनीच मला दिलं. त्यांनी मला त्यांच्या लिखाणाच्या खोलीत नेलं.

    या खोलीत त्यांचं एक लिखाणाचं टेबल होतं. मागून मंद प्रकाश डोकावत होता, तर टेबल ज्या भिंतीला लागून ठेवलं होतं त्यावर एक बोर्ड होता. या बोर्डावर प्रवीणजींना ऊर्जा देणाऱया देवदेवतांची छायाचित्रं होती. टेबलाच्या एका बाजूला अनेक कागदं तर खिडकीवर एका कोपऱयात लिखाणाचं साहित्य आणि इतर बाबी विखुरलेल्या होत्या. हे सारं चित्र प्रवीणजींसोबत कॅमेऱयात कैद करण्यासाठी मी प्रवीणजींना त्यांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि त्यांनीही लगेचच हातात लेखणी घेऊन नेमकं ते कसं लिखाण करतात त्याची एक झलकच मला दाखवली.

    गेली अनेक दशकं सतत आपल्या लिखाणातून आपला वेगळा असा आदर्श नव्या पिढीसमोर घालून दिलेल्या साहित्यिकाचं असं पोर्ट्रेट टिपायला मिळणं हे माझ्यासाठी सोन्याहून पिवळंच असं होतं.

    प्रवीणजींचा हा फोटो माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा होता. हा फोटो नैसर्गिक कसा वाटेल याकडे माझा कल होता आणि म्हणूनच ड्रमॅटिक लाइटिंग न करता नैसर्गिक प्रकाशात हा फोटो कसा टिपता येईल यासाठी मी झटत होतो. हा फोटो टिपताना त्यांच्या मागून खिडकीतून येणारा मंद प्रकाश आणि खोलीत असलेला प्रकाश यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मागून येणाऱया प्रकाशाचा छायाचित्रणाला त्रास होत होता.

    खिडकी बंद केली तर प्रकाशाचा स्रोत अडवला जाईल आणि फोटो नैसर्गिक येणार नाही. आणि खिडकी उघडी ठेवली तर त्यातून येणाऱया प्रकाशाचा ग्लेअर छायाचित्रात येईल अशी परिस्थिती होती. अगदी क्षणार्धात यावर तोडगा काढून या फोटोसाठी फ्लॅश म्हणजेच अनैसर्गिक लाइट वापरण्याचं मी ठरवलं. फ्लॅश लाइटची तीव्रता बाहेरून येणाऱया प्रकाशाशी मिळतीजुळती ठेवून प्रकाशयोजना केली आणि हा नैसर्गिक वाटेल असा फोटो टिपण्यात मला यश आलं. दिलखुलास साहित्यिकाचा दिलखुलास अंदाज या दिवशी मी कॅमेराबद्ध केला.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com

      March 16, 2019


  • बॉलीवुड चे दिग्गज गिटार वादक गोरख शर्मा

    बॉलीवुड चे दिग्गज गिटार वादक गोरख शर्मा यांचा जन्म २८ डिसेंबर १९४६ रोजी झाला. गोरख रामप्रसाद शर्मा हे संगीतकार प्यारेलाल यांचे धाकटे बंधू होते. गोरख शर्मा यांनी आपल्या वयाच्या १२ व्या वर्षापासून मेन्डोलिन वाजवण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात ते हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात मेन्डोलिन वाजवत असत.

    वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी संगीतकार रवी यांच्या चौदवीका चांद या गाण्याला मेन्डोलिन वाजविले होते. जागतिक कीर्तीचे गोरख शर्मा यांनी अनेक अविस्मरणीय गाण्यांना गिटार वादन केले ते 'लक्ष्मीकांत-प्यारेलाल' यांचे मुख्य सहाय्यक होते. त्यांनी आपल्या १९६० ते २००२ मधील करीयर मध्ये १००० हून अधीक गाण्यांना गिटार वादन केले व ५०० हून अधीक चित्रपटात गिटार व इतर तार वाद्य वाजवली होती.

    'कर्ज़' या चित्रपटातील 'एक हसीना थी, एक दीवाना था' च्या गाण्याचा गिटार गोरख शर्मा यांचा होता. आशिकी या चित्रपटातील गिटारचा पिस पण गोरख शर्मा यांचाच होता. गोरख शर्मा यांचे २७ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 27, 2019


  • मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे

    मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९४८ रोजी गडहिंग्लज येथे झाला.आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. आशा काळे यांचे वडील रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले. शाळाही त्यामुळे वेगवेगळ्या झाल्या. लहानपणापासून त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हतीच. नृत्याची विशेष आवड असल्याने बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे (भरतनाटय़म्, कथ्थक) धडे घेतले. आठ-दहा वर्षांच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत.

    आईचे मामा अभिनेते प्रकाश इनामदार यांचे वडील आप्पासाहेब इनामदार हे यांच्या ‘कलासंघ’ संस्थेतही त्यांनी काम केले. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही. शांताराम, बाबुराव पेंढारकर यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकात निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते. त्यांच्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय होता. पेंढारकर त्यांच्या घरी आले आणि आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल का? असे विचारले. आशा भोसले यांनी गायलेल्या ‘गुलाबी ऑंखे है तेरी’ या ठुमरीवर नृत्य करायचे होते. आई-वडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून आशा काळे यांनी काम केले. स्वत: बाबुराव पेंढारकर, बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार नाटकात होते.

    त्यावेळी त्या १४ वर्षांच्या होत्या. त्या नाटकाचे पुढे १५ ते २० प्रयोग केले. त्यांची नृत्य आणि अभिनय कला बाबुराव पेंढारकर यांनी पाहिली आणि ‘नाटय़ मंदिर’ संस्थेच्या ‘सीमेवरून परत जा’ या नाटकातील भूमिकेसाठी विचारणा केली. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत. याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते. पुढे बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक त्यांनी केले आणि या नाटकाने त्यांना ‘ताई’ अशी ओळख मिळाली.

    आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली. यात प्रामुख्याने ‘कलावैभव’, ‘अभिजात’, ‘नाटय़संपदा’, ‘सुयोग’ आदींचा समावेश आहे. ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय हे’, ‘घर श्रीमंतांचे’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘लहानपण देगा देवा’, ‘वर्षांव’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘महाराणी पद्मिनी’ आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके. ‘दुर्वाची जुडी’ चे ८४५, ‘गुंतता हृदय हे’ चे ८७५ प्रयोग त्यांनी केले. रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला. भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘गनिमी कावा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘कैवारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सासुरवाशीण’, ‘थोरली जाऊ’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कुलस्वमिनी अंबाबाई’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’, ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. राज्य शासनाच्या व्ही. शांताराम, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत.

    ‘महाराणी पद्मिनी’ नाटकाच्या वेळचा एक किस्सा सांगताना त्या म्हणतात, दारव्हेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला. त्यावर ‘शांतारामचा ससा आषाढात मेला, हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली’ हे वाक्य लिहिलेले होते. खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीच संबंध नव्हता. पण दारव्हेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य पाठ केले. दुसऱ्या दिवशी त्यांना वाक्य पाठ केल्याचे सांगितले. तर हसून आणि लटक्या रागाने ते म्हणाले, अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिले नव्हते.

    तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते. ‘शांताराम’ मधील ‘श’चा उच्चार शहामृगाच्या ‘श’चा, ‘आषाढातल्या’ ‘ष’चा उच्चार पोटफोडय़ा ‘ष’चा. श, स, ष यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते. आणि तुम्हाला सांगते त्या नाटकातील माझ्या ‘अश्रु पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते’ या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची. दारव्हेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले. या सगळ्याचे मूळ कुठे तरी माझ्या लहानपणातही रुजले गेले. संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवेलागणीच्या वेळेस घरातील लहान मुलांनी रामरक्षा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती. ते स्तोत्रपठण मी तोंडातल्या तोंडात, पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठय़ाने म्हण, स्पष्ट उच्चार कर असे सांगायची. आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला.

    नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणतात, बाबुराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते. चित्रपट आणि नाटकांधील सोशीक, सहनशील मुलगी, सून, आई अशा भूमिका हीच त्यांची ओळख झाली. या पठडीतून बाहेर पडावेसे वाटले नाही का? यावर त्या म्हणाल्या, हो तसा प्रयत्न केला. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट आणि ‘गहिरे रंग’, ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकातील भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या होत्या. सोशीक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांनी मला स्वीकारले. माझे कौतुक झाले. या भूमिकाही गाजल्या. वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या ‘चेहऱ्या’मुळे सोशीक, सहनशील, सोज्वळ, सुसंस्कृत आणि कौटुंबिक प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटय़ाला आल्या. अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. जे घडायचे ते घडले. पण या सर्व भूमिका मी अक्षरश: जगले. त्या जिवंत केल्या.

    त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही ‘आपली’ वाटते. आई, ताई, मुलगी, सून असावी तर ‘आशा काळे’सारखी असे प्रेक्षकांना वाटायचे. माझ्या अभिनयाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पुढे फोटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे चिरंजीव माधव नाईक यांच्याबरोबर आशा काळे यांचा विवाह झाला. माधव नाईक हे लघुपट निर्माते-दिग्दर्शक आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. आशा काळे या सामाजिक कार्य आवडीने करत असतात. त्या अनेक वृद्धाश्रम, मूकबधिर, मतिमंद मुलांच्या शाळा येथे जातात. कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना भेटतात. आशा काळे ‘भारती विद्यापीठा’च्या संचालक मंडळावर आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    माहेरची माणसे चित्रपट.
    https://www.youtube.com/watch?v=VqdxHNHxRDA
    संसार चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=pbKOK2XH-R8

      November 23, 2018


  • कविवर्य प्रा.शंकर वैद्य

    वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांना कवितेची गोडी लागली. यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी ओतूर पुणे येथे झाला. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते काव्यविश्वात रमले. 'आला क्षण गेला क्षण' हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. तर 'कालस्वर' हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल २७ वर्षांनी त्यांचा 'दर्शन' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.

    शंकर वैद्य यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे नव्या लेखक, कवींबरोबरच विद्यार्थ्यांचा गोतावळा नेहमीच त्यांच्याभोवती असायचा. केवळ कवी म्हणूनच नव्हे तर उत्तम समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही ते सर्वपरिचित होते. शंकर वैद्य यांना तल्लख स्मरणशक्तीचे वरदान लाभले होते. त्यांचे सूत्रसंचालन हा साहित्य रसिकांसाठी अवर्णनीय अनुभव असायचा. भूतकाळातील काव्य लेखनाचे अनेक किस्से ते साहित्य रसिकांपुढे जसेच्या तसे उभे करायचे. ‘आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह.

    २७ वर्षानंतर ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह त्यांनी प्रसिध्द केला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. अनेक वर्षे त्यांनी महाविद्यालयांमधून प्राध्यापकीही केली. शंकर वैद्य यांनी काव्य विश्वात स्वत:चा अमीट ठसा उमटवला होता. शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हदयांमुधुनी अरुणोदया झाला..., स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई या त्यांच्या कविता आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. कविता, कथांबरोबरच त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतेही लिहिली होती.

    "गोष्ट धमाल नाम्याची‘, "चिमणराव गुंड्याभाऊ‘ या चित्रपटांतील गीते त्यांच्या लेखणीतून उतरली होती. कवी, गीतकार, सूत्रसंचालक, उत्तम वक्ता, समीक्षक, ललित लेखक असे ते बहुपेढी व्यक्तिमत्त्व होते. मा.शंकर वैद्य यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, कोकण मराठी साहित्य पुरस्कार, वाग्विलासिनी दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार, पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी सॅन होजे येथील पहिल्या विश्वर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. मा.शंकर वैद्य यांचे २३ सप्टेंबर २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      October 3, 2017


  • हिंदी चित्रपटसृष्टीचे जंपिंग जॅक जितेंद्र

    जितेंद्र हे बॉलीवुडचे केवळ एक लोकप्रिय नायक अथवा अभिनेते नाहीत तर त्याचबरोबर अनेक दूरदर्शन मालिका आणि चित्रपट यांचे ते निर्माते आहेत. बालाजी टेलेफिल्म्स, बालाजी मोशन पिक्चर्स या उद्योगांचे ते अध्यक्ष आहेत.

      April 7, 2017


  • संयुक्त राष्ट्र संघाचे माजी महासचिव कोफी अन्नान

    १९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी जागतिक आरोग्य संघटनेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरू केले. तिथे ते ३ वर्षे कार्यरत होते. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या आदीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले होते. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बनणारे आफ्रिकन वंशाचे ते पहिले नागरिक होते. १९९७ आणि २००६ मध्ये सलग दोन वेळा त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिवपद भूषवले होते. महासचिव असताना २०१५ पर्यंत जगातील गरिबी दूर करण्याचे उद्दिष्टही त्यांनी समोर ठेवले होते. युद्ध काळात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच युद्धात होरपळलेल्या जनतेचे पुनर्वसन करण्याचे काम त्यांनी केले होते.

      April 8, 2022


  • माझी माणसं – अंश्याबाई आज्जी

    तिच्या ‘ धाडसी ‘धडपडीच्या कथेचे तुकडे माझ्या आई कडून ऐकले . ते विसंगत तुकडे जोडण्याचा मी प्रयत्न केलाय . मला ती अजिबात आठवत नाही , मला आठवतोय तो तिचा खरखरीत मायाळू हात , हलकेच पाठीवरून फिरणारा !

      December 27, 2017