(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लेखक, कवी, नाटककार, राम गणेश गडकरी

    ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा।
    प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।

    असे अप्रतिम काव्य लिहिणारे गोविंदाग्रज. त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी झाला. मुलासकट माणुसकीला, सिंधुसकट संसाराला, सद्गुणासकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला या सुधाकराच्या निर्वाणीच्या निराशेतला अखेरचा प्रणाम, अशी नादमधुर भाषा लिहिणारे नाटककार मा.राम गणेश गडकरी! बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे गडकरी! मा.राम गणेश गडकरी म्हणजे मराठी नाटय़- साहित्य क्षेत्रातला चमत्कारच आहे.
    गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

    महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविताा व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत.त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. राम गणेश गडकरी या नावाने नाटके लिहिणार्याि, गोविंदाग्रज नावाने काव्यलेखन करणार्याा या प्रतिभावंत साहित्यकाराने 'बाळकराम' या नावाने विनोदी लेखनही केले, सुरुवातीला 'मनोरंजन' नावाच्या मासिकात ' रिकामपणची कामगिरी' सारखे विनोदी लेखन ते करू लागले होते. तेंव्हा ते 'नाटक्या', 'सावाई नाटक्या' या टोपण नावांनी लेखन करत असत.'संपूर्ण बाळकराम' या पुस्तकात त्यांचे विनोदी लेखन संकलित केले गेले आहे. 'एकच प्याला', 'भावबंधन' या नाटकांमधील बळीराम व धुंडीराज यांच्यामार्फत त्यानी विनोद प्रकट केला आहे. गंभीर आशय आणि वैचारिक विवेचनाला विनोदाची झालर लावण्याची हातोटी त्यांना साधली होती. त्यांच 'ठकीच लग्न'ही खूप गाजल. आपल्या विनोदात गडकर्यांकनी अतिशयोक्ती तसेच वक्रोक्तीचाही वापर केला आहे. मा.गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. मा.राम गणेश गडकरी यांचे २३ जानेवारी १९१९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 23, 2017


  • शब्दास्वरांचे जादुगार पं. गोविंदराव पटवर्धन

    आज २१ सप्टेंबर
    शब्दास्वरांचे जादुगार महान हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२३ रोजी झाला.

    गोविंदराव पटवर्धन बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार! हार्मोनियमवर ज्या सफाईने त्यांची बोटं फिरत, त्यात ते स्वरालयीची जी कामगत करत ते केवळ दैवी म्हणावं लागेल.

    जन्मताच सूर,ताल व लय यांची निसर्गदत्त देणगी लाभलेले गोविंदराव यांनी आपल्या मुंजीत हार्मोनियम वाजवून आपल्या सुप्त गुणाची चुणूक दाखवली होती. आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी संगीत वेणुनाद या नाटकाच्या प्रयोगाला ऑर्गन ची साथ केली होती.

    विशेष हार्मोनिअमच्या साडेतीन सप्तकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या गोविंदराव यांनी वादनाचं कोणतंही तांत्रिक शिक्षण घेतलेलं नव्हतं, ते स्वतः उत्तम तबला वादकही होते. त्यामुळे लय, ताल यावर त्यांचे प्रभुत्व होते.

    १९४० साली मुंबईला आल्यावर पं गोविंदराव साहित्य संघाच्या संगीत नाटकांना ऑर्गनची साथ करू लागले. त्या वेळी देवधर स्कूल ऑफ म्युझिक व मनहर बर्वे यांच्या विद्यालयात पं. कुमार गंधर्व व पं.राम मराठे यांची ओळख झाली, तेव्हा पासून अखेर पर्यत पं गोविंदराव यांनी त्यांना साथ केली. कोणत्या स्वरासाठी कोणतं बोट वापरायचं, असं विचारलं तर ते म्हणायचे - मी फक्त वाजवतो. बाकीचं काही मला माहीत नाही. त्यातून मला आनंद मिळतो असं ते सांगायचे.

    पेटीवादन हे दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे प्रत्येक स्वर सुटासुटा वाजवणं आणि दुसरा म्हणजे जोडून वाजवणं. गोविंदराव या दोन्ही पध्दतींनी वाजवायचे. हार्मोनियम व ऑर्गन वादनातला सफाईदारपणा हे त्यांच्या वादनाचं वैशिष्टय होतं. अतिशय जलद आणि सफाईदार पलटे ते वाजवत असत. त्यांची दुसरी खासियत म्हणजे ते पद वाजवताना त्यातले शब्द ऐकू आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. ते आपल्या शिष्यांना शिकवतानाही ते त्याच पध्दतीने शिकवायचे.

    गोविंदराव पटवर्धन यांना पेटीवर्धन पण म्हणत असत. त्यांना गोविंदराव असे म्हणलेले रुचत नसे, ते नम्रतेने म्हणत गोविंदराव म्हणायच्या योग्यतेचे एकच पं गोविंदराव टेंबे मला नुसतेच गोविंदा म्हणा, खरेतर आपल्या गुहाघरवासीयांनी गोंद्या म्हणून हाक मारलेले त्यांना आवडायचे. अनेक संगीत कार्यक्रमांमधून, संगीत नाटकांतून त्यांनी साथसंगत केली. आलापी, तान वाजवण्यातली सफाई होती. आयुष्यभर रामभाऊ मराठे, कुमार, वसंतराव, छोटा गंधर्व यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ करून करून वादनातलं हे गायकी अंग गोविंदरावांनी आत्मसात केलं होते, व स्वत:त अक्षरश: मुरवलं होते.

    गोविंदराव पटवर्धन यांच्या एकसष्ठी सत्कारात पु.ल नी त्यांच्या बरोबर हार्मोनियम वादन केले होते, तेव्हा पु.ल मार्मीकतेने म्हणाले होते, पोटात व पोटरीत गोळा येतो हे माहिती होते पण बोटातही गोळा येतो हे आज प्रथम समजले.

    पं. गोविंदराव पटवर्धन यांचे पट्टशिष्य म्हणून डॉ.विद्याधर ओक यांना ओळखले जाते. त्याच्या इतर शिष्यांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, मकरंद कुडले, विघ्नेश्र्वर जोशी, अशी नावे घेता येतील. आदित्य ओक तर लहानपणापासून गोविंदराव पटवर्धन यांचे हार्मोनियम वादन ऐकत आला आहे. तो पण त्यांचाच शिष्य.

    पं. गोविंदराव पटवर्धन यांचे ३० जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.

    गोविंदराव पटवर्धन एक हार्मोनियम बरोबरच उत्कृष्ट ऑर्गनवादक होते. त्यांच्यासंबधी काही प्रसंग

    एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वाँधा कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविँदरावांना म्हणाले, "अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब" गंधर्वाँची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

    पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत. असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोविंदराव होते साधारण दहाचं नाटक पण साडेनवाच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला सहाजीकच नाटक रद्द झालं त्यावर कोणीतरी म्हणालं गोविंदराव "तुमचा ऑर्गनवादनाचा कार्यक्रम देवळात होऊ दे" ते गोविंदरावानी मान्य केलं आणि हा त्यांचा कार्यक्रम तब्बल पहाटे साडेतीन वाजेपर्यँत रंगला.

    पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त पु.ल.देशपांडे यांनी केलेले भाषण.
    http://www.marathisrushti.com/mvideos/speeches-by-pu-la-deshpande-about-pt-govindrao-patwardhan/

    पं. गोविंदराव पटवर्धन यां चे व्हिडीओ
    www.youtube.com/watch?v=0JWkKjxNGNc
    www.youtube.com/watch?v=5qXM9L3bjBA
    www.youtube.com/watch?v=_c-JWigeh3I
    https://www.youtube.com/watch?v=JM1jtZJRLxE
    https://www.youtube.com/watch?v=eYjUcsXukMY
    https://www.youtube.com/watch?v=m8KcijSZvEY

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      October 8, 2017


  • प्रसिध्द प्राच्य विद्यापंडीत मॅक्सम्युल्लर

    ’एन्शन्ट संस्कृत लिटरेचर’, ’लेक्चर्स ऑन दी सायन्स ऑफ लॅग्वेज’, ’इंन्ट्रोडक्शन टू सायन्स ऑफ रिलिजन’, ’बायोग्राफिज ऑफ वर्डस’, ’सिक्स सिस्टिम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ हे त्यांनी लिहिलेले काही प्रमुख ग्रंथ होत.

      October 28, 2021


  • ज्येष्ठ संगीतकार खय्याम

    मोहंमद जहूर खय्याम हाश्मी... त्यांना सारे जग प्रख्यात संगीतकार खय्याम या नावाने ओळखते.त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी जालंधरनजीकच्या राहों शहरात झाला.खय्यामम यांना संगीतकार बनायचे नसून अभिनेता बनायचे होते. ते दहा वर्षांचे असतानाच आपले गावातील घर सोडून दिल्लीयत राहणार्या काकांच्याेकडे आले. तेथेच राहून त्यांपनी आपल्या करिअर घडवण्याघची स्वयप्नेा बघितली. मुंबईत आल्याेनंतर त्यां च्याा करिअरला खर्याक अर्थाने सुरु झाली. मुंबईला आल्यावर ‘यह है जिंदगी’ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. १९४७ मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतरच्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी ‘शर्माजी’ या टोपणनावाने चार चित्रपटांना संगीतही दिले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या मा. खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान चांगले बसवले. त्यांनी चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नाहसच्या वर हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी कविता क्षेत्रात समकालीन आणि दिग्दज मंडळींसोबत काम केले आहे. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग, वालीसाहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर सुधियानवी यांचा विलक्षणीय प्रभाव जाणवतो. एकाहून एक श्रेष्ठ अश्या गीतकारांबरोबर खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. त्यामध्ये मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जां निसार अख्तर, शहरयार, गुलजार, नक्श लायलपुरी, हसन कमाल आदींचा समावेश आहे. हे गीतकार व खय्याम यांनी एकत्रितरीत्या केलेल्या कामाला प्रचंड यशही लाभले व लोकप्रियताही मिळाली. मा.खय्याम हे गेली ७० वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मा.खय्यायम यांनी ७० आणि ८०च्या दशकातील अतिशय श्रवणीय संगीत दिले. त्यांनी 'त्रिशूल', 'थोडी सी बेवफाई', 'बाझार', 'कभी कभी', 'उमराव जान', आणि 'नूरी'सारख्या सिनेमांना संगीत दिले. वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताचे वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगीतकार खय्याम. व्यावसायिक यशासाठी झगडत असलेल्या मा.ख्ययाम यांच्या 'फिर सुबह होगी' या चित्रपटाची गाणी ऐकल्यावर राज कपूर यांनी 'खय्यामसाहब अब आपकी सुबह हो गयी' असे प्रेमाने म्हटले होते.प्यारका दर्द ही मीठा मिठा, कभी कभी मेरे दिल मे’ और दिल चीज क्या है या गाण्यांनी तरुण आणि वृद्ध लोकानाही वेड लावले होते. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. चार दशकाहून आपल्या आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांना मोहून मा. खय्याम टाकले होते. ’कभी कभी’, ‘बाजार’, ‘त्रिशूल’, ‘ नुरी’ ,‘आखरी खत’ अशा अनेक चित्रपटाना त्यांचा परीस स्पर्श लाभला होता. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २००७ साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तरप्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार व भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन मा.खय्यायम यांचा गौरव केला आहे. मा.खय्याम यांना उमराव जान व कभी कभी या चित्रपटासाठी तीन फिल्मफेयर पुरस्कार मिळाली होती. मा. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या पण गायिका होत्या. मा.जगजीत कौर यांनी नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी मा.खय्याम यांनी गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाला १२ कोटी रुपये देणगी दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तांत्रिक साहाय्य करणार्यांाना आर्थिक मदत केली जाणार आहे. या ट्रस्टमध्ये काही मान्यवरांना ट्रस्टीच्या रूपात जोडले जाईल. खय्याम यांच्या या दानशूरपणाचं कौतुक करू तेवढे कमी आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 20, 2017


  • टेनिस कोर्टच्या राण्या – विल्यम्स भगिनी

    गुंडांच्या वसाहतीत त्यांचे घर. घराच्या जवळ अतिशय प्राथमिक अवस्थेतील टेनिस कोर्ट आणि त्यावर सराव करणाऱ्या दोन लेकी आणि बाप. अचानक गोळीबार सुरू व्हायचा. या तिघांना लपायलाही जागा नसायची. अनेकदा तिघेही कोर्टवरच लोळण घेऊन आपला बचाव करायचे. गोळीबार, गरिबी, प्राथमिक सुविधांचा अभाव असे सर्व विरोधीच वातावरण आणि त्या सर्वांवर मात करणाऱ्या विल्यम्स भगिनी, त्यांचे वडील रिचर्ड यांनी अमेरिकेच्याच काय; पण महिला टेनिसविश्‍वात नवा अध्याय लिहिला. झोपडीवजा घर ते काही मिलियन डॉलरमधील कमाई असा त्यांचा प्रवास आजही सर्वांना अचंबित करून सोडणारा आहे. जगभरातील महिला टेनिसपटूंमध्ये नवा आत्मविश्‍वास निर्माण करणारा आहे.

    रिचर्ड विल्मस कृष्णवर्णीय. प्रगत अमेरिकेत सर्व प्रकारची अवहेलना सहन करून जगणारा. प्रसंगी चोऱ्या करणारा आणि जगणारा. त्याची ओरेन्सशी ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर. दोघेही गरिबीचे चटके सोसत मोठे झालेले. ओरेन्स तर तीन मुलांची आई. नवऱ्यापासून विभक्त झालेली. रिचर्ड दूरचित्रवाणी वाहिन्यांवर टेनिस बघतो. तेथील बक्षिसांची रक्कम पाहून अवाक्‌ होतो. ओरेन्सला म्हणतो, आपल्याला आणखी दोन अपत्ये हवी आहेत. मी, दोघांना विश्‍वविजेते घडवेन. मी उत्तम प्लॅनर आहे... त्याने बाजारात जाऊन टेनिसची काही जुनी पुस्तकेही विकत घेतली. दोघांनीही टेनिसचा अभ्यास सुरू केला.

    व्हीनसचा जन्म 17 जून 1980 चा. पुढील वर्षी सेरेनाचा. वयाच्या चौथ्या वर्षापासून रिचर्डने या दोघींच्या हाती रॅकेट सोपविली. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला त्यांचे तीन खोल्यांचे झोपडीवजा घर. सारा परिसर गुंडगिरीने व्यापलेला. गोळीबार, हाणामाऱ्या, खून असे प्रकार नित्याचे. गुन्हेगारीच्या या चिखलात विल्यम्स नेटाने दोन कमळे फुलवित होता. कृष्णवर्णीय आणि गोरे अशा संघर्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि गरिबी हटविण्यासाठी. तासन्‌ तास सराव सुरू असायचा. प्रशिक्षक नव्हता. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील सामने, काही सामन्यांच्या कॅसेट, मिळेल ती रॅकेट, अनवाणी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती अशा आयुधांवर जग जिंकण्याचा हा प्रवास सुरू झाला.

    वयाच्या साडेचार वर्षापासून दोघींनी स्पर्धात्मक टेनिस खेळायला सुरवात केली. पुढील पाच वर्षांत दोघींनी अमेरिकेतील ज्युनिअर गटाच्या सर्व स्पर्धा जिंकल्या. दोघींचे वडीलच प्रशिक्षक. त्यांनी दोघींना अतिशय आक्रमक घडविले. फक्त "जिंका‘ हाच कानमंत्र दोघींना दिला. दोघीही उंचीने ताडमाड होत्या. व्हीनस तर वयाच्या अकराव्या वर्षीच सहा फूट उंचीची झाली होती. तिची उंचीच तिला प्रतिस्पर्धांवर मात करण्यासाठी मोठी मदत करीत होती. दोघींचा सर्व्हिसचा भन्नाट वेग पाहूनच दोघी टेनिसमधील आश्‍चर्य आहेत, असा गवगवा अमेरिकेत झाला होता आणि घडलेही तसेच. दोघीही आपला आक्रमक खेळ, वेगवान सर्व्हिस, दीर्घ व्हॉलीज करण्याची क्षमता यांवर जागतिक विजेत्या झाल्या. टेनिसच्या सम्राज्ञी झाल्या. ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या पहिल्या दोघी बहिणी म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली. पैसा आणि प्रसिद्धीने पायाशी लोळण घेतली. दोघीही अनेक सामन्यांतून आमने-सामने आल्या. एकमेकींविरोधात खेळतानाही त्यांनी आपल्यातील जिगर कायम ठेवली.

    सेरेना म्हणते, ""व्हीनस माझी आदर्श आहे. तिची प्रगती मला सतत प्रोत्साहित करते. तिचा पराभव मला चुकांमधून खूप काही शिकवून देतो. मी तिचा हात धरूनच मोठी झाले. माझे वडील आणि ती माझे पहिले गुरू आहेत.‘‘

    व्हीनस एका मुलाखतीत म्हणते, ""आमच्या प्रसिद्धीनंतर आमच्या वागणुकीत फरक पडला नव्हता; पण माध्यमातून उलटसुलट बातम्या येतात. आम्ही त्याला फारशी किंमत देत नाही. माझ्या कुटुंबाला माहीत आहे, की आम्ही कशा आहोत. अशा अफवा नंतर वाहूनही जातात आणि आता तसेच होते आहे.‘‘
    टेनिसशिवाय इंटेरिअर डिझाइनरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्हीनसने स्वतःची कंपनी उघडली आहे. त्याशिवाय तिने अभिनयाचा शौक अनेक मालिकांमधून पूर्ण करून घेतला आहे. ती म्हणते, ""मी टेनिसस्टार झाले नसते तर मोठी अभिनेत्री झाले असते. नाटक माझ्या अंगातच आहे.‘‘
    सेरेना विल्यम्स अधिक धार्मिक आहे. त्या संदर्भातील वाचन हा तिचा आवडीचा विषय आहे.

    -- दीपक गायकवाड

      March 12, 2017


  • गायिका धोंडूताई कुलकर्णी

    धोंडुताई यांनी सुरवातीला जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लदिया ख़ाँ साहेब यांचे भाचे नथ्थन ख़ाँ यांच्याकडे तीन वर्ष शिकल्या. त्यानंतर याच घराण्याची तालीम त्यांनी आयुष्यभर घेतली.

      August 5, 2021


  • संगीतकार स्नेहल भाटकर

    एच. एम . व्ही. कंपनीने त्यांना हार्मोनियम वादक म्हणून ४० रुपये पगारावर नोकरीला ठेवले. ही नोकरी त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी मिळाली.

      August 3, 2021


  • सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी

    आज ३० सप्टेंबर. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांची जयंती

    हृषिकेश मुखर्जी... भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी झाला.

    दिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांचे शिष्य आणि 'आनंद', 'अभिमान', 'गोलमाल', 'बावर्ची', 'खुबसुरत' अशा उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून आणि चंदेरी दुनियेतल्या झगमगाटात प्रदीर्घ काळ राहूनही साधेपणा जपणारे प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हिंसाचार किंवा लैंगिकतेला त्यांनी आपल्या चित्रपटांत कधीही स्थान दिले नाही. किंबहुना या गोष्टींना पूर्ण फाटा देऊन साध्या बाबींतूनही जीवनसूत्र सांगता येते, हेच त्यांनी त्यांच्या कलाकृतींतून दाखवून दिले आहे.

    हृषिकेश मुखर्जी यानी १९५९ मध्ये राज कपूरला घेऊन तयार केलेला 'अनाडी' आणि त्यातील गाणी खूप गाजल्याचे आपल्याला माहीत आहेच. अनाडीच्या यशाने प्रेरित होऊन हृषिदांनी राज कपूर यालाच केन्द्रस्थानी ठेवून 'आनंद' ची जुळवाजुळव सुरू केली होती. इतकेच नव्हे तर अनाडीच्या वेळेसच आनंदसमवेत गाजलेले 'बाबू मोशाय' हे सहाय्यक पात्राचे नावही नक्की झाले होते...त्याला कारण म्हणजे राजकपूर हृषिकेश मुखर्जी याना सेटवर नेहमी 'बाबू मोशाय' याच नावाने हाक मारीत असे. पण पुढे 'आराधना' नंतर राजेश खन्ना युग आल्यावर आणि त्याच्या अभिनयाची धाटणी त्यावेळी सर्वानाच 'आल्वेज हॅपी काईंड फेलो' अशी वाटू लागल्यावर हृषिदांनी राजेश खन्ना यांना घेऊन 'आनंद' केला.

    दिग्दर्शक ही हृषदांची अर्धीच ओळख ठरेल. संकलक, लेखक, पटकथा लेखक, संगीतातले जाणकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे करडया शिस्तीचा परंतु, अतिशय सहृदय माणूस, हे हृषदांच्या व्यक्तिमत्त्वातले कंगोरे होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचे हृषदा भागीदार आणि साक्षीदारही आहेत. बिमल रॉय यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक, गुलजार यांच्यासारखा मनस्वी कवी- लेखक, सलील चौधरी, सचिन देव बर्मन व पंचमदा ऊर्फ राहुल देव बर्मन, हेमंत कुमार, असे गायक संगीतकार, अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर, अमिताभ बच्चन, उत्पल दत्त, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमोल पालेकर, शत्रुघ्न सिन्हा, रेखा, जया बच्चन अशा नव्या-जुन्या अनेक श्रेष्ठ कलावंतांबरोबर त्यांनी काम केले आहे. जया-अमिताभ ही जोडी काय किंवा रेखा, धर्मेंद्र, अमोल पालेकर, असरानी असे कलाकार काय, या कलाकारांच्या यशात हृषदांचा निश्चितच मोलाचा वाटा आहे.

    हृषिकेश मुकर्जी यांचे २७ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले. हृषिकेश मुकर्जी यांना आदरांजली.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      September 30, 2016


  • दत्त्या

    काही माणसं किती विलक्षण, चमत्कारिक  असतात ना? ती लक्षात राहतात ती त्यांच्या गुणांमुळे नाही तर त्यांच्या चमत्कारिक वागण्यामुळेचं. मात्र ही जगाच्या दृष्टीने निरोपायागी, मुर्ख असतात. ‘दत्त्या’ हा अशांचपैकी एक. 

      September 28, 2018


  • शंकर जयकिशन या संगीतकारातील जोडीतील जयकिशन

    जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. हा सुरांचा जादुगार! दुसरा शब्द नाही. जयकिशन लहानपणापासूनच ते हार्मोनियमवर गाणी वाजवत. सुप्रसिद्ध गुजराती दिग्दर्शक चंद्रवदन भट्ट यांच्याकडे संधीसाठी चकरा मारत असतानाच त्यांची गाठ शंकर (शंकरसिंह रघुवंशी) या आणखी एका होतकरू संगीतकाराशी पडली. शंकरही संधीच्या शोधात फिरत होते. जयकिशन त्या काळी पृथ्वी थिएटरसाठीसुद्धा काम करत. त्यामुळे पृथ्वीराज कपूर यांच्याशी ओळख झाली.

    शंकर यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्या ला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते. दुसर्यात चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या.

    शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला. त्याचे नाव राज कपुर. पृथ्वी थिएटर ची निर्मिती "बरसात" या चित्रपटासाठी राज कपूर हे संगीतकार म्हणून नवीन जोडीच्या शोधात होते त्यांनी शंकर आणि जयकिशन यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. आणि १९४८ साली प्रदर्शित झालेल्या "बरसात" ची गाणी सुपरहिट झाली आणि इथून पुढे शैलेंद्र, हसरत जयपुरी, लता मंगेशकर, मुकेश आणि शंकर - जयकिशन यांनी भारतीय संगीत क्षेत्रात एक इतिहास घडवला. हे दोघेही काही काळ त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल- भगतराम यांच्या हाताखाली सहायक म्हणून काम करत होते.

    शंकर - जयकिशन या जोडीने जवळजवळ १७० हून जास्त चित्रपटांना संगीतसाज चढवला. ज्यामध्ये विशेष संगीतामुळे गाजलेले बादल, सीमा, बसंत बहार, चोरी - चोरी, कठपुतली, यहुदी, अनाडी, छोटी बहन, दिल अपना और प्रीत पराई, जिस देश मे गंगा बहती है, जंगली, प्रोफेसर, दिल अपना और प्रीत पराई, हमराही, राजकुमार, आम्रपाली, सुरज, तिसरी कसम, मेरा नाम जोकर, असली नकली इत्यादी चित्रपटाचा समावेश होतो. त्यांना चोरी - चोरी , अनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सुरज, ब्रम्हचारी, मेरा नाम जोकर, पहचान, आणि बेईमान या चित्रपटासाठी एकूण नऊ वेळा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफ़ेअर पुरस्कार मिळाला आहे.

    शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो व मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो. 'शंकर-जयकिशन' यांनी गोपनीयता म्हणून कुठल्याही गीताची चाल वैयक्तिक कुणी बांधली ते कुणालाही सांगायचे नाही असा एक अलिखित नियम पाळला होता. मात्र संगम चित्रपटातील एक गीत "ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज न होना!" हे बिनाका गीतमाला या नभोवाणीवरील एका कार्यक्रमामध्ये खूप दिवस प्रथम क्रमांकावर वाजू लागले आणि जयकिशन यांनी हे गीत मी रचले असे सांगून तो नियम मोडला.

    मो. रफी आणि राज कपूर यांनी त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण केला. गोरापान चेहरा, गोबरे गाल व कपाळावर रुळणाऱ्या रेशमी काळ्याभोर बटा - एखाद्या हिरोला लाभावे असे व्यक्तिमत्व. पण टेबलवरील हार्मोनियमवर बोटे फिरू लागली की, त्यातून स्वर्गीय गोडीचे सुर पाझरू लागत. संगीतकार जयकिशन यांचे हेच तर वैशिष्ट्य होते. 'शंकर-जयकिशन' या संगीतकार जोडीतील संगीतकार ... संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंतरही १६ वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

    जयकिशन १२ सप्टेंबर १९७१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      November 7, 2017