(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी

    सितारादेवी यांची गेल्या सहा दशकांहून अधिक काळ प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अशी ख्याती राहिली होती. सितारा देवींनी देशविदेशांमध्ये कथ्थक नेले. लोकप्रिय केले आणि कथ्थकला रसिकांच्या मनात कायमसाठी एक उन्नत स्थान त्यांनी मिळवून दिले.

      May 10, 2019


  • क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ३

    अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

      June 1, 2019


  • गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस

    संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. त्यांचा जन्म २ जुलै १८८० रोजी झाला. संगीताची आवड बालपणापासूनच त्यांना होती. १८९५ मध्ये किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश करून अवघ्या पंधराव्या वर्षी गणपतरावांनी आपली रंगभूमीवरील कारकीर्द सुरू केली. संगीत नाटकातून भूमिका करताना त्यांनी संगीत सौभद्रमध्ये कृष्ण, संगीत शारदा मध्ये कांचनभट,मूकनायकात विक्रांत तर संगीत मानापमानात लक्ष्मीधर इत्यादींच्या भूमिका केल्या. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी सोडल्यानंतर गोविदराव टेंबे व बालगंधर्व ह्यांच्याबरोबर गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या. त्यांच्या या उत्कृष्ट भूमिकांमुळे त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले. रंगभूमीवरील आणि रंगभूमीमागील आपल्या जीवन पटाचे दर्शन गणपतराव बोडसांनी माझी भूमिका या आपल्या आत्मचरित्रातून घडविले आहे. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रकाशित झाले. मा. गणपतराव बोडस यांचे २३ डिसेंबर १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 7, 2017


  • सई परांजपे

    रँग्लर परांजपे यांची नात तर शकुंतला परांजपे यांची कन्या असलेल्या सई परांजपें यांना साहित्याचा आणि लेखनाचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचा जन्म १९ मार्च १९३८ रोजी झाला.त्या शाळेत शिकत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. मुलांचा मेवा हे त्यांचे पुस्तक १९४४ साली त्यांच्या वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांचं बरचसं लेखन हे लहान मुलांसाठी लिहिलेलं आहे. त्यांची बालनाट्येही अतिशय गाजली. अनेक बालनाट्यांना पुरस्कारही लाभले. लहान मुलांच्या मनाच्या पातळीवर येऊन त्यातील बाल्य हेरून त्या बाल्याचे सहज रूप रंगभूमीवर उभे करून आणि त्यात बालप्रेक्षकांना गुंगवून ठेवणे हे काम दिसतं तेवढं सोपं नाही त्यासाठी सिद्धहस्त लेखक आणि जातिवंत कलावंत असण्याची नितांत आवश्यकता आहे आणि ही भूमिका आयुष्यभर मा.सई परांजपे यांनी उत्कृष्टपणे साकार केली. त्यांच्या काही बालनाट्याची नावं जरी वाचली तरी आपले बाल्य आपल्या डोळ्यापुढे उभे राहते. शेपटीचा शाप, जादूचा शंख, झाली काय गंमत, पत्तेनगरी, भटक्यांचे भविष्य, हरवलेल्या खेळण्यांचे राज्य, जास्वंदी, माझा खेळ मांडू दे ही त्यांची काही गाजलेली बालनाट्य. याबरोबरच चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांना चांगलेच यश मिळाले. जादू का शंख आणि सिकंदर हे दोन बालचित्रपट चांगलेच गाजले. तर बालचित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी दिग्दर्शित केलेले चष्मेबद्दूर, स्पर्श आणि कथा हे चित्रपटही त्यांचा प्रभाव दाखवून गेले. याही चित्रपटात त्यांनी सहजतेतून सौंदर्य साधले होते आणि त्यामुळे एक कलात्मक चित्रपट म्हणून ते प्रेक्षकांना आवडून गेले. हिंदी सिनेसृष्टीतील एक क्लासिक सिनेमा म्हणजे 'चष्मे बद्दूर'. सई परांजपे यांचं दिग्दर्शन, फारूख शेख, दीप्ती नवल यांचा सहज सुंदर अभिनय, यामुळे हा सिनेमा सिनेरसिकांच्या 'ऑल टाईम फेव्हरेट कलेक्शन'मध्ये आजही गणला जातो. त्यांच्या स्पर्श या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार लाभले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सई परांजपे यांचे चित्रपट, कथा
    https://youtu.be/nLos9zq0FhQ

    चष्मेबहादुर

    https://youtu.be/BsHd1EGA46A

    साझ
    https://youtu.be/zc9rozVQQ4I

      March 21, 2017


  • लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे

    अनुराग कश्यप दिग्दर्शित हिंदी चित्रपट शैतान मध्ये पिंट्याची हंडी फुटली हे गाणे,संजय लीला भंसाली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे .

      July 5, 2022


  • सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी

    मुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून सध्या त्यांची एकूण संपत्ती २२.७ अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी भुलेश्वर चाळमधील छोट्याशा खोलीत आपला बिझनेस सुरु केला होता. मुकेश व अनिल यांचे बालपण देखील याच खोलीत गेले. आज मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये राहात असले तरी त्यांना भुलेश्वर चाळीतील घराचा विसर पडलेला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये मुकेश अंबानी यांनी भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील फ्लॅटचा खास उल्लेखही केला होता.मुकेश अंबानींकडे तीन खासगी विमाने आहेत. त्यात ३३० कोटींचे एअरबस ३१९ कॉपरेरेट जेट, ४०१ कोटी रुपयांचे बोइंग बिजनेस जेट-२ आणि ९९ कोटी रुपयांचे मिनी जेट फॉल्कन ९०० ईएक्सचा समावेश आहे.

      April 19, 2022


  • थोरले बाजीराव पेशवे

    एकदाही पराभूत न झालेले जगाच्या इतिहासातील हे एकमेव सेनापती आहेत.

      August 18, 2021


  • संगीतकार दत्ताराम

    हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 'संगीतकार दत्ताराम' हे नाव एके काळी खूपच गाजले होते. दत्ताराम हे डिचोली तालुक्यातील. त्यांचे मुळ नाव दत्ताराम शिरोडकर, मुळगावी त्यांच्या वडिलांचे किराणा दुकान होते. पुढे आई ९ वर्षाच्या दत्तारामला घेऊन सांवतवाडीला गेली, तिथे शाळेत घालताना शेजारच्या मुलाने त्यांचे नाव 'दत्ताराम वाडकर' सांगितले आणि तेच नाव कायमचे लागले. शिक्षणात त्यांचे फार लक्ष नव्हते. त्यामुळे आई त्यांना घेऊन मुंबईत गेली. तिथे तबला शिकले, ढोलक शिकले, त्यातूनच पुढे पृथ्वी थिएटर हुस्नलाल - भगतराम, संगीतकार शंकर आदीशी त्यांचा संबंध आला. राजकपूर तेव्हा 'आग' चित्रपटाद्वारे निर्माते झाले, पण 'आग' आपटला. पुढे 'बरसात' जोरदार चालला. दत्ताराम त्यावेळच्या दर्दभ-या गाण्यात ढोलकचा ठेका धरायचे. 'चोरी चोरी' चित्रपटात 'ये रात भिगी भिगी' या गाण्यात ढोलकचा अप्रतिम ठेका दत्ताराम यांनी दिला आणि तोच हिंदी चित्रपटसृष्टीत 'दत्ताराम ठेका' म्हणून गाजू लागला. त्यातूनच पुढे राजकपूरने दत्ताराम यांना 'अब दिल्ली दूर नही' या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनाची संधी दिली. या चित्रपटातील ''चुन चुन करती आयी चिडिया, मोरभी आया चूहाभी आया, बंदरभी आया'' हे गाणे हिट झाले.

    दत्ताराम यांचा सुवर्णकाळ म्हणजे 'परवरिश' चित्रपटातील एकापेक्षा एक हिट गाणी होय. यमन रागातील चाल दत्ताराम यांनी बांधली आणि हसरत जयपुरीने त्याचे शब्द लिहिले. "ऑसू भरी है ये जीवन की राहें, कोई उनसे कहदे, हमे भूल जायें " या गाण्याने लोकप्रितेचा कळस गाठला. राज कपूर भलताच खुश झाला. राजकपूर हा ग्रेट शोमन होता. तसाच संगीताचा जाणकार होता. १९५९ साली 'कैदी ने ९११' मधील लताच्या आवाजातील ''मिठी मिठी बातोंसे बचना जरा'' हे गाणेही खूप लोकप्रिय झाले. ''आसू भरी है ये जीवन की राहे'' हे मुकेश यांचे गीत आजही रसिकांच्या लक्षात आहे. ही गीते संगीतबध्द करणारा माणूस होता मा.'दत्ताराम'. १९५० नंतरची ही गाणी आहेत, पण त्यामध्ये आधी चाल बांधण्यात आली आणि हसरत जयपुरींनी त्या चालीवर शब्द गुंफले. दत्ताराम त्यावेळी संगीतकार जय-किशन आणि राजकपूर यांच्याएवढेच लोकप्रिय होते. ढोलक या लोकवाद्याचा वापर प्रतिष्ठित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खुबीने केला. असे हे दत्ताराम काळ बदलल्यानंतर अज्ञातवासात गेले. १५ - १६ चित्रपटांना दत्ताराम यांनी संगीत दिले. तो जमाना वेगळा होता. आजच्या लाखाच्या, कोटीच्या आकडयांत मानधन कधी मिळाले नाही, 'परवरिश' साठी जेमतेम पाच हजाराचे मानधन मिळाले होते असे दत्ताराम सांगत. पुढे जमाना बदलला, शंकर-जयकिशन यांना साथ देत दत्ताराम यांनी मुबंईत बरीच वर्षे काढली. मा.दत्ताराम यांचे ८ जून २००७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / शरद कारखानीस

      June 9, 2017


  • मराठीतील ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक

    मूळचे अकोल्याचे असणाऱ्या आनंद मोडक यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला. तेथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट धरली. बा. सी. मर्ढेकरांच्या बदकांचे गुपित या काव्याला मा.मोडक यांनी संगीत दिले आणि तेथून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. हे काव्य रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर मोडक यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. पीडीएच्या `घाशिराम कोतवाल’मधूनही त्यांनी आपली चुणूक दाखवली होती. सतिश आळेकरांच्या `महानिर्वाण’ या नाटकाने त्यांना संगीतकार बनवले. नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नंतर पुढे चित्रपट असा त्यांचा संगीतप्रवास बहरत गेला. हे सर्व करत असताना त्यांनी महाराष्ट्र बँकेत नोकरीही केली.

    सतत विविध प्रयोग करत राहणे हे आनंद मोडक यांच्या संगीताचे वैशिष्टय़ होते. तालवाद्याची साथ न घेता केलेली खानोलकरांची गाणी हा त्यातीलच एक प्रयोग. आनंद मोडक यांच्यावर कुमार गंधर्वांच्या गायकीचा प्रभाव होता, व ते मान्यही करत अस. मोडक हे अखेरच्या श्वासापर्यंत संगीत क्षेत्राशी संलग्न होते. आनंद मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत आपल्या संगीताने ठसा उमटविला होता. मोडक यांचे साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीच बन, प्रीतरंग, अख्यान तुकोबाचे हे संगीत कार्यक्रमही लोकप्रिय झाले होते. ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीताने वेगळ्याच उंचीवर नेले होते. ‘२२ जून १८९७’, ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘चाकोरी’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘सरकारनामा’, ‘पाश’, ‘फकिरा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘आरंभ’, ‘धूसर’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटातील संगीतही रसिकांकडून तसेच समीक्षकांकडून अतिशय वाखाणले गेले. ‘एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘युगा युगांचे नाते आपुले’, ‘श्रावणाच ऊन मला झेपेना’, ‘हे जीवन सुंदर आहे’, ‘तू तलम अग्नीची पात’, ‘वळणवाटातल्या मातीत हिरवे गंध’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात दरवळत आहेत. आपल्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी १० नाटके, ३६ चित्रपट, तसेच ७ हिंदी, व ८ मराठी मालिकांना संगीत दिले होते. त्यांच्या नावावर चित्रपट संगीतासाठीचे सर्वाधिक राज्य पुरस्कारांची नोंद आहे. `यशवंतराव चव्हाण’ हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. आनंद मोडक यांचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 23, 2017


  • शिक्षणतज्ज्ञ स्नेहलता दसनूरकर

    स्नेहलता दसनूरकर या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. अवंतिका, आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच, अजून यौवनात मी, अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, स्वामिनी, स्वामीनी, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले होते. अवंतिका’ मालिका आणि ‘शापित’ चित्रपटाची कथा-पटकथा स्नेहलता दसनूरकर यांनी लिहिली होती.

      March 9, 2022