स्टीव्ह बकनर हे वेस्ट इंडीज अनुभवी पंच. स्टीव्ह बकनर यांनी डिकी बर्ड यांचा विक्रम २००२ मध्ये मागे टाकून २००५ मध्ये कसोटीत १०० सामन्यात पंचगिरी करणारे ते पहिले पंच ठरले होते. बकनर यांनी १९९२, १९९६, १९९९, २००३ व २००७ च्या वर्ल्ड कप फाइनल मध्ये अम्पायरिंग केले होते. हे एक रेकॉर्ड आहे.
May 31, 2022
१९५८ साली नर्गिस यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लाजवंती’ या चित्रपटापासून सचिन भौमिक यांनी पटकथा लेखनाला सुरुवात केली. त्यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी झाला.त्यानंतर १९६० साली बलराज साहनी व लीला नायडू यांच्या अभिनयाने गाजलेल्या ‘अनुराधा’ चित्रपटाला त्यावर्षीचा उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने भौमिक कथा-पटकथा लेखक म्हणून प्रस्थापित झाले. ‘आई मिलन की बेला’, ‘जानवर’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘गोलमाल’, ‘हम किसीसे कम नहीं’ यांसारख्या चित्रपटांपासून ते थेट अलीकडच्या ‘क्रिश’, ‘किसना’, ‘कोई मिल गया’ यांसारख्या ७० हून अधिक चित्रपटांचे पटकथा लेखन करणारे सचिन भौमिक यांनी नासिर हुसैन, हृषिकेश मुखर्जी, सुभाष घई, प्रमोद चक्रवर्ती, जे ओमप्रकाश, राकेश रोशन यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले होते. त्यानंतर १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ या शम्मी कपूर-राजश्री अभिनीत चित्रपटासाठी त्यांना पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला होता. भौमिक यांचे अनेक चित्रपट यशस्वी झाले. सचिन भौमिक यांचे १२ एप्रिल २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 3, 2017
१९७४ साली त्यांनी लिहिलेल्या ‘ जेजुरी ‘ या इंग्रजी काव्य संग्रहाला राष्ट्रकूल पारितोषीक मिळाले , आणि अरुण कोलटकर हे नांव थेट जागतीक पातळीवर पोहोचले. अन पुढे ते भारतीय इंग्रजी कवी म्हणून प्रसिद्ध पावले.
November 1, 2019
भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या जेष्ठ कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. भारती आचरेकर यांचे लहानपण पुण्यात गेले. भारती आचरेकर यांना भावना प्रधान भूमिका करून प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा दणदणीत संघर्षमय आणि विनोदी भूमिका करायला आवडते. मणिक वर्मा यांना त्यांनी अनेक कार्यक्रमांतून साथ केली. वयाच्या १० व्या वर्षी जेव्हा हातात तंबोरा धरताही येत नव्हता, तेव्हा पुण्यात तुळशीबागेत मणिक वर्मा यांच्या बरोबर पहिला कार्यक्रम केला. गाण्याचं बाळकडू घरातूनच मिळाले होते, मणिक वर्माच्या मागे बसून तिला साथ करणं, हा अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला. तिच्यामुळे त्यांना गाण्यातला आत्मविश्वास मिळाला. त्यांनी वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन एम.ए. केलं. अर्थात जवळजवळ २०-२२ वर्ष त्यांनी मणिक वर्मा यांच्या बरोबर अनेक ठिकाणी जाऊन कार्यक्रम केले. भारती आचरेकर यांनी पूर्णवेळ गाणं करावं, असं अनेकांचं म्हणणं होतं. एकदा प्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर यांनी त्यांचे गाणं ऐकलं आणि 'दि हिंदू गोवा असोसिएशन'च्या 'धन्य ती गायनी कळा' या नाटकासाठी विचारलं. या नाटकाला पं. भीमसेन जोशी यांचं संगीत होतं, तर नाटकात कृष्णराव चोणकर, रामदास कामत, श्रीपाद नेवरेकर अशी संगीतातली बडीबडी मंडळी काम करत होती. ते भारती आचरेकर यांचे पहिले नाटक.
'धन्य ते गायनी कळा'नंतर लगेच त्याच संस्थेचं 'तुझा तू वाढवी राजा' केलं. त्याच वेळी त्यांचे लग्न आचरेकरांशी ठरलं होतं. त्या भारती वर्माची भारती आचरेकर झाल्या. १९७२ ला दूरदर्शन केंद सुरू झालं आणि त्या अगदी पहिल्या दिवसापासून त्या तिथे रुजू झाल्या. त्या वेळचे दूरदर्शनचे संचालक चांगले होते. त्यांनी संगीत-नाटक अशा कलांमध्ये असलेली रुची बघून ते भारती आचरेकर यांच्यावर त्याच प्रकारचं निमिर्तीचं काम सोपले. श्री.अरुण जोगळेकरांबरोबर भारती आचरेकरांनी ‘गजरा’ कार्यक्रम सादर केला होता. आजही ‘गजरा’ मराठी मध्यमवर्गाच्या चांगलाच स्मरणात आहे. तब्बल आठ वर्षं त्या दूरदर्शन वर नोकरी करत होत्या. त्या मुळे गाणं आणि नाटक तसं बाजूलाच पडलं होतं. नाटक पूर्ण थांबलं होतं. आणि पुन्हा एकदा केवळ संगीतामुळेच त्यांना आणखी एका नाटकाची ऑफर आली. ते नाटक होतं, विजया मेहता दिग्दशित 'हमीदाबाईची कोठी.' आणि या नाटकासाठी दूरदर्शन वरील नोकरी सोडून, त्यांनी हे नाटक केले. 'हमीदाबाईची कोठी'च्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा रंगभूमीवर आल्या. या नाटकाने रंगभूमीवर इतिहास घडविला. त्यानंतर एकातून एक याप्रकारे 'महासागर', 'दुभंग', 'नस्तं झेंगट' अशी नाटकं त्यांनी केली. रंगभूमीवर अशी घोडदौड सुरू असतानाच त्यांचे पती डॉ. विजय आचरेकर यांचे निधन झालं आणि मग चरितार्थासाठी म्हणून नाटकात काम करणं हेच त्यांनी ठरवले. त्या हिंदी मालिका, सिनेमा करत गेल्या. त्या विजया मेहता यांच्याकडे खूप शिकल्या. त्यांनी अंजन श्रीवास्तव यांच्याबरोबर ‘वागले की दुनिया’मध्ये काम केलं होतं. चाळीमध्ये राहणारं, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जोडपं त्यांनी छोटय़ा पडद्यावर साकारलं होतं. गंभीर असो वा विनोदी, सर्वच प्रकारच्या भूमिका त्या लिलया साकारतात. ‘चिडियाघर’ ही विचित्र व हास्यापद व्यक्तिमत्वांच्या कुटुंबाची एक मालिका यात भारती आचरेकर यांनी अप्रतिम काम केले आहे. एक गृहिणी, कलावंत, अशी भारती आचरेकर यांची ओळख आहे. खरं तर भारतीताईंच्या घरात परंपरागत कला नांदत आहे. त्यांच्या आई माणिक वर्मा, गेल्या पिढीतील संगीत क्षेत्रातील मापदंड होत्या. कलावंतांचं घर म्हटलं की, बराचसा लहरीपणा असतो. मात्र भारती आचरेकरांमध्ये तो गुण आढळत नाही. त्यांचं सारं जीवन कसं नियोजनबद्ध आखीव, रेखीव. त्यामुळेच त्या सदैव नाटक-मालिका-चित्रपट-जाहिरातींतून वारंवार दिसत नाहीत.भारती आचरेकर यांचा जेव्हा आपण कलावंत म्हणून विचार करतो, त्यावेळी त्यांच्या अप्रतिम अभिनयाचं सक्षम दर्शन घडतं. सारं काही सहजच.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 14, 2017
निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार बाळासाहेबांना भेटायला गेले. त्यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देत असल्याचं बाळासाहेबांना सांगितलं. बाळासाहेब म्हणाले, मग शिवसेना उमेदवारी देणार नाही. मध्येच शरद पवार म्हणाले, ‘पण भाजपाचं काय?’ बाळासाहेब म्हणाले, ‘कमळाबाईची चिंता नको करू, कमळाबाईला कसं पटवायचं ते मला माहिती आहे,’ असा शब्द बाळासाहेबांनी दिला. सुप्रिया सुळे बिनविरोध निवडून आल्या.
June 30, 2022
लाहोर येथे जन्मलेले बडे गुलाम अली खान फाळणीनंतर तेथेच राहिले. त्यांचा जन्म २ एप्रिल १९०२ रोजी झाला. पहिले काही वर्ष ६ महिने भारत आणि ६ महिने पाकिस्तानात येथे राहत. त्यांनी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना भारताचे नागरिकत्व मिळण्याकरता मदतीची विनंती केली. आणि खासाहेब हिंदुस्थानचे नागरिक झाले. मैफलीत खांसाहेबाना अपेक्षित ठेका तबलजीकडून मिळाला नाही कि फक्त ठुमऱ्या गाऊन वेळ मारून नेत. कै जी एनन जोशी ऐक आठवण जरूर सांगतात एकदा खांसाहेब त्यांच्या घरी आंब्यांच्या दिवसात दुपारी आले होते तेव्हा साहजिकच भोजनास आमरस पुरीचा बेत होता. खासाहेब तब्येतीत जेवले जेवण संपल्यावर आमरस एवढा आवडला कि नंतर त्यांनी चार वाट्या रस प्यायले. आणि नंतर गायचा मूड लागला तेव्हा तंबोरे लावून २-३ आस तब्येतीत गायले.
ख्यालगायकी प्रमाणे ठुमरी म्हणण्यात त्यांचा हातखंड होता. मारवा आणि पुरिया सारखे जवळचे स्वर असलेले राग ऐका पाठोपाठ गात नाहीत कारण राग जरी जवळचे असले तरी दोन वेगळे राग वेगळे वातावरण निर्मिती करतात त्यामुळे ऐका पाठोपाठ शक्यतो गाऊ नयेत असे जाणकार सांगतात!! पण खांसाहेबांचे गायकीवरचे प्रभुत्व उच्च दर्जाचे होते!! १९४४ साली मुंबईत प्रथम झालेल्या मैफलीत मारवा आणि पुरिया ऐका पाठोपाठ म्हणून खासाहेबांनी रसिकांची तसेच जाणकारांची वाह व मिळवली होती. मैफलीत त्याकाळी पाच हजार रुपये खासाहेब घ्यायचे. जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गाणे म्हणण्यासाठी जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा खासाहेबांनां गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन मागितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले. जेव्हा ध्वनीमुद्रण सुरु होते तेव्हा त्यांनी ऐक आक्रमक तान घेतली आणि नौशाद म्हणाले यागाण्यात आक्रमक तान नको आहे पण त्यांना काही सुचत नव्हते तेव्हा ते म्हणाले मला केलेले चित्रीकरण दाखवा!! चित्रीकरण बघताना जवळ बसलेल्या उस्ताद निझामुद्दीन खान (तबलजी) यांना म्हणाले ये लौंडीया (अभिनेत्री मधुबाला) तो बहोत खुबसुरत है!!
लतादीदी या त्यांच्या ऐक मोठ्या चाहत्या होत्या. बडे गुलाम अली खान यांचे २५ एप्रिल १९६८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बडे गुलाम अली खान यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=Gy75Hipt8IQ
https://www.youtube.com/watch?v=BViraiWfRqU
https://www.youtube.com/watch?v=JXxe9dU9N0U
April 25, 2017
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे थोरले चिरंजीव. ते युवासेनेचे प्रमुख या नात्याने युवक संघटना सांभाळत आहेत. राज ठाकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आदित्य यांना युवकांची संघटना करण्यासाठी पुढे आणण्यात आले.
June 13, 2021
प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या झंझावाती व नैसर्गिक खेळाने विरूध्द गोलंदाजाला चकित करणार्या, रांगणेकरांना त्यांच्या तमाम भारतीय चाहत्यांकडून, व मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांजकडून क्रिकेटचा बाजीराव ही मानाची उपाधी मिळाली होती.
October 11, 2021
आपली विदेशी खेळणी, कपडे त्यांनी विदेशी कपड्यांच्या होळीत टाकून दिले. वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १९३० साली त्यांनी आपल्या सवंगड्यांची वानरसेना स्थापन करून नेत्यांचे संदेश पोचवण्याचे काम केले. ब्रिटिशां विरुद्ध मिरवणुका काढल्या, घोषणा दिल्या, या सर्व गोष्टीबरोबर शिक्षणही चालूच ठेवले.
October 31, 2021
आज १ नोव्हेंबर.. आज संगीतकार,संयोजक ,वादक ''अरुण पौडवाल यांची पुण्यतिथी
प्रो.बी आर.देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी एस.डी.बर्मन ,कल्याणजी आनंदजी ,लक्ष्मीकांत प्यारेलाल ,बाप्पिलाहिरी ,आर.डी.बर्मन यांच्याकडे अॅकॉर्डीयन वादन केले. संगीत संयोजन करताकरता अरुण पौडवाल यांनी १९७१मधे संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफीत केली.''ओटीत घातली मुलगी विहीणबाई ''गदिमांनी केलेली हि विहीण पारंपारिक होती पण नवेपण घेऊन आली होती.''हरीनाम मुखी रंगते''हे गोड भक्तीगीत तसेच ''रुपेरी वाळूत माडांच्या बनात'',''येऊ कशी प्रिया''हि गीते आधुनिक वाद्यवृंद आणि सुंदर चाली यामुळे तरुणाईत विशेष लोकप्रिय झाली.
ससा तो कसा हे बालगीत,सूर सनईत नादावला सारखे गंभीर प्रकृतीचे गीत,गंधित धुंदीत होऊनी सजणा सारखे उडत्या चालीचे गाणे त्यांनी दिले. तसेच आपली पत्नी अनुराधा पौडवाल यांना ''डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली ''हे गझल सदृश गीत आणि ''रसिका मी कैसे गाऊ गीत''हि दादरा तालातील गीते अरुण पौडवाल यांनी दिली.
एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी-हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर-जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली. या जोडीने मराठी चित्रपट संगीताचा चेहरा-मोहरा बदलवुन टाकला, मराठी भावगीत पाश्चात्य वाद्यांनी, कुशल वाद्यवृंदाच्या ताफ्यात सजविले, अनेक चित्रपटांना उत्तम संगीत दिले.
मराठी चित्रपटसृष्टीत अनिल-अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडगोळीने यानंतरही अनेक अप्रतिम गाणी दिली. शब्द-सुरांवर जबरदस्त हुकुमत असलेल्या या संगीतकार जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत. निर्माते शरद व सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटातील अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वच गीतांनी गोल्डन व सिल्व्हर ज्युबिली साजरी केली आहे. संगीतात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या या संगीतकारांच्या गीतांची जादू आजही आहे.
मा.अरुण पौडवाल यांचे १ नोव्हेंबर १९९१ रोजी निधन झाले.
भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाटय़गीत अशा सगळ्या सर्व दालनांत मुशाफिरी करणाऱ्या या संगीतकार जोडीतील अरुण पौडवाल यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 1, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti