दिलीप सरदेसाई यांची ओळख विदेशी भूमीवर द्विशतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज
अशी होती. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४० रोजी मडगाव गोवा येथे झाला. १९५६ मध्ये मुंबईमध्ये येईपर्यंत दिलीप सरदेसाई यांची क्रिकेट कारकीर्द सुरु झालेली नव्हती. त्यावेळी गोवा राज्यात मध्ये तसे क्रिकेट कमीच होते. लहानपणी ते टेबल टेनिस खेळात असत. ते शाळेच्या अनेक स्पर्धेत टेबल टेनिस खेळले. परंतु मुंबईला आल्यानंतर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तिथे ठरवले की आपण क्रिकेट खेळायचे.
त्यांना खरे क्रिकेटसाठी खरे प्रोत्साहन दिले ते भारतीय संघाकडून नाव कमावलेल्या त्यांच्या चुलत भावाच्या म्हणजे सोपान सरदेसाई याला मिळालेल्या यशामुळे. दिलीप सरदेसाई खऱ्या अर्थाने सुदैवी होते कारण मुंबईचे भूतपूर्व रणजी खेळाडू एम. एस. नाईक दिलीप सरदेसाई यांच्या खेळावर खूप खूश होते. त्यांनी दिलीप सरदेसाई यांना मार्गदर्शन द्यायला सुरवात केली.
एम. एस. नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप सरदेसाई विविध प्रकारचे फटके मारण्याची तयारी करत होते त्याचप्रमाणे आपल्या फलंदाजीवरचे लक्ष विचलित न होण्याची देखील काळजी घेत होते. म्हणून त्यांनी जास्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले नाही. तर फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रित केले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी कडून खेळण्यास सुरवात केली. १९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ' हिट विकेट ' करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.
दिलीप सरदेसाई यांनी विदेशी मैदानावर म्हणजे १८ ते २३ फेब्रुवारी १९७१ साली किंग्स्टन मैदानावर वेस्टइंडिनजवरुद्ध पहिल्या इनिंग २१२ धावा केल्या. आणि त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केला तो म्हणजे परदेशी भूमीवर पहिले द्विशतक केले.अर्थात तो सामना अनिर्णित राहिला. ह्याच दौऱ्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ११२ धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाने पहिल्या वेळी वेस्ट इंडिजच्या संघाला हरवले. ह्या दौऱ्यामधील पहिला , तिसरा आणि पाचवा सामना अनिर्णित राहिले.
ह्या दौऱ्यामधील चौथ्या सामन्यांमध्ये त्यांनी १५० धावा केल्या, ते होल्डरकडून बाद झाले होते . ही कसोटी मालिका भारतीय संघाने १-० ने जिंकली. ह्या दौऱ्यामध्ये दिलीप सरदेसाई यांनी ऐकून ६४२ धावा केल्या. ह्या दौऱ्यामध्ये सुनील गावस्कर यांनी ७७४ धावा केल्या तर सर गारफिल्ड सोबर्स यांनी ५९७ धावा केल्या होत्या. दिलीप सरदेसाई यांनी मुंबई मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२ ते १५ मार्च १९६५ मध्ये नाबाद २०० धावा केल्या. डावखुरे दिलीप सरदेसाई गोलंदाज पण होते परंतु त्यांचे लक्ष फलंदाजीकडे असल्यामुळे ते गोलंदाजीमध्ये जास्त प्रभाव पाडू शकले नाही.
दिलीप सरदेसाई ज्या जमान्यामध्ये आतंरराष्ट्रीय सामने कमी होत असत. खेळाडू जास्त फर्स्ट क्लास सामने खेळत असत. जेव्हा त्यांनी भारतीय संघाने पहिला वहिला इंग्लंडच्या ओव्हल मैदानावरचा सामना जिंकला तो क्षण दिलीप सरदेसाई यांना महत्वाचा वाटला होता. त्या ओव्हलच्या मैदानावर महत्वाच्या कसोटी सामन्यांमध्ये दिलीप सरदेसाई यांनी ५४ आणि ४० अत्यंत मोलाच्या धावा केल्या. भारताला त्या विजयासाठी या धावांची खूप मदत झाली. पहिल्या इनिंग मध्ये सरदेसाई यांच्या ५४ तर सर्वात जास्त फारुख इंजिनिअर यांनी ५९ धावा काढल्या होत्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये सरदेसाई यांनी ४० धावा काढल्या होत्या. तर अजित वाडेकर यांनी ४५ धावा काढल्या होत्या.
दिल्ली इथे २० ते २५ डिसेंबर १९७२ रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात दिलीप सरदेसाई खेळले. सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की , ' दिलीप सरदेसाई यांनी जलद गोलंदाजीवर कसे खेळावे हे दाखवून दिले.' दिलीप सरदेसाई यांना चेंडूवर नजर बसण्यासाठी जरा वेळ दिला की क्षेत्ररक्षकांची दमछाक होत असे, गोलंदाजांचा धीर सुटत असे. ते दमून जात. दिलीप सरदेसाई यांचे कटचे फटके, ग्लान्सचे फटके , ड्राईव्हचे फटके आणि हूकचे फटके मारत असत त्याचप्रमाणे खेळताना अनेक फटके त्यांच्या भात्यात असत.
३० सामन्यांमध्ये २००१ धावा केल्या त्यावेळी त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २१२, त्यामध्ये त्यांनी ५ शतके आणि ९ अर्धशतके केली. त्यातली दोन द्विशतके होती. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १७९ सामन्यांमध्ये १०, २३० धावा केल्या त्यामध्ये त्यांची २५ शतके आणि ५६ अर्धशतके होती.
विजय मर्चंट यांनी दिलीप सरदेसाई यांना'द रेनासांस मॅन ऑफ इंडिया' म्हणून गौरवले. महत्त्वाचे असे की ज्या काळात आंतरराष्ट्रीय सामने मोठ्या प्रमाणावर खेळले जात नसत. त्या काळात त्यांनी ही कामगिरी केली आहे. डावखूरा फलंदाज असलेले सरदेसाई एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. १९७२मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांची आणखी एक खासीयत अशी की आपल्य एकूण कारकिर्दीत त्यांनी केवळ दोनच षटकार ठोकले.
१९६२ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यातली सरदेसाई यांची एक आठवण सांगितली जाते. वेस्ट इंडिजकडे त्यावेळी एकापेक्षा एक वेगवान मारा करणारे गोलंदाज होते. भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यात एक उसळता चेंडू बसला होता. त्यामुळे त्यांना डाव अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. त्यांच्यानंतर फलंदाजीला येण्यासाठी फलंदाज तयार नव्हते. त्यावेळी सरदेसाई यांनी पुढाकार घेतला आणि ते खेळायला उतरले.
दिलीप सरदेसाई यांनी बडोद्यात राहणारी आपली गर्लफ्रेंड नंदिनी पंत यांच्याशी लग्न केले. असे म्हणतात दिलीप सरदेसाई हे नंदिनी पंत यांना दररोज एक पत्र लिहीत असत. त्या एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ होत्या. नंदिनी पुढे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही झाल्या. नंदिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांना एकमेकांना सुमारे १०० पत्रं लिहीली.दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव राजदीप सरदेसाई हे देशातील नामवंत पत्रकार आहेत.
दिलीप सरदेसाई यांची पत्नी नंदिनी सरदेसाई या सेंट सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबईत समाजशास्त्र विभागाच्या मुख्य होत्या. दिलीप सरदेसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलीप सरदेसाई मेमोरियल लेक्चर मुंबईत आयोजित केलं जातं. दिलीप यांच्या पत्नी आणि समाजशास्त्रज्ञ नंदिनी आणि मुलगा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यातर्फे या व्याख्यानाचं आयोजन केलं जातं. दिलीप सरदेसाई यांचे २ जुलै २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 8, 2021
अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन बोस्टनमधील एका रिसर्च कंपनीत काम करत असताना, रे टॉमिल्सन यांनी १९७१ मध्ये पहिला ईमेल पाठवला आणि ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९४१ रोजी झाला. रे टॉमिल्सन यांनी ही कामगिरी केली, तेव्हा इंटरनेटची सुरुवादेखील झाली नव्हती. मात्र जगात ही क्रांती घडायला पुढची २० वर्षं जावी लागली. टॉमिल्सन यांनी @ या साईनचा वापर केला होता जो आजपर्यंत वापरला जातो. टॉमिल्सन यांनी १९६० सालीच SNDMSG या प्रोग्रामद्वारे एकाच कॉम्प्युटरमध्ये एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवण्याचं तंत्र विकसित केलं होतं. यात मेल कम्पोज करून, त्यावर पत्ता लिहून ते दुसऱ्या युजरला पाठवण्याची व्यवस्था होती.
थोर प्रतिभावंत व ‘कल्ट फिगर’ असूनही निगर्वी आणि मनमिळावू स्वभावामुळे रेमण्ड माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात प्रिय व आदरणीय होते. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी टॉमलिन्सन यांना गौरविण्यात आले होते. सन २०१२ मध्ये ‘इंटरनेट हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांना सन्मानपूर्वक स्थान देण्यात आले. प्रत्येकाचा ई-मेल अॅड्रेस लिहिण्याची ठराविक पद्धत जगन्मान्य झाली आहे. त्यात सुरुवातीस युजरनेम व नंतर त्याचा पत्ता अशी रचना असते. या दोन्हींच्या मध्ये @ हे चिन्ह सर्वप्रथम वापरण्याचे श्रेयही टॉमलिन्सन यांच्याकडेच जाते. रे टॉमिल्सन यांचं ५ मार्च २०१६ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 5, 2019
भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९३२ रोजी बगदादमध्ये झाला. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. नादिरा या दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होत्या. त्यांच्या आग्रहामुळे नादिरा या मुंबईत वयाच्या १९ व्या वर्षी दाखल झाल्या आणि आवारासाठी नर्गिस यांनी आन चित्रपटावर वर पाणी सोडल्यानंतर मेहबूब खान यांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात एका फरहान इझिकेल या फिल्मी क्षेत्रात अगदी नवख्या असलेल्या बगदादी ज्यू मुलीची निवड केली व तिलाच ‘नादिरा’ या नावाने स्टार बनविण्याचा निर्धार केला.
‘आन’मधील एका राजपूत राजकन्येच्या तिच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे त्यांना सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘श्री ४२०’ मधील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भूमिकेने नादिरा यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. नादिरा यांच्या वेगळ्या, पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळेपण उठून दिसे.
२००० साली प्रदíशत झालेला ‘जोश’ हा नादिरा यांचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी नादिराच्या नशिबी एकटेपणा आला. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाइझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती. हिंदी चित्रपटसृष्टीत नादिरा ह्या स्वत:कडे रोल्सराइस असलेली पहिली अभिनेत्री. मा.नादिरा यांचे ९ फेब्रुवारी २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 5, 2017
पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता.
September 25, 2020
आदेश श्रीवास्तव हे अभिनेता बनण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीत आले होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९६४ रोजी झाला."अंगारे‘ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. नंतर तब्बल दशकभर त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत काम केले. सन १९९३ मध्ये 'कन्यादान' या चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर १०० हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यात 'चलते चलते', 'बाबुल', 'बागबान', 'कभी खुशी कभी गम', 'राजनिती' या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत लक्षवेधी ठरले. त्यांनी 'सना' या लघुपटाचे दिग्दर्शनही केले.
आदेश यांना २०११ मध्ये कॅन्सर झाला होता. मात्र, त्यावर त्यांनी मात केली. आजारपणानंतर पुन्हा संगीतक्षेत्रात कार्यरत होत त्यांनी 'वेलकम बॅक' या सिनेमाला संगीत दिले. हा त्यांचा संगीत दिग्दर्शक म्हणून अखेरचा सिनेमा ठरला. आदेश श्रीवास्तव यांचे निधन ५ सप्टेंबर २०१५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 4, 2017
आज ११ नोव्हेंबर..आज हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याचे प्रवर्तक अब्दुल करीम खाँ यांची जयंती.
अब्दुल करीम खाँ यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला.
अब्दुल करीम खाँ यांचे वडील काले खान हे गुलाम अलींचे नातू होत. अब्दुल करीम खाँ साहेबांनी आपले काका अब्दुल्ला खान व वडील काले खान यांचेकडे सांगीतिक शिक्षण घेतले. त्यांचे दुसरे काका नन्हे खान यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. गायनाबरोबरच त्यांनी सारंगी, सतार, वीणा व तबलावादनात नैपुण्य प्राप्त केले. अब्दुल करीम खाँ साहेबांना म्हैसूर राज दरबारात गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांची गाठ कर्नाटकी संगीतातील अनेक सुप्रसिद्ध गायक प्रभृतींशी पडली. त्यांच्या गायनाचा प्रभाव अब्दुल करीम खाँ साहेबांच्या गायकीवरही पडला. त्यांनी कर्नाटकी संगीताचा कसून अभ्यास केला. कर्नाटकी संगीतातील अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीतही दिसून येत असत. ते फक्त उत्तर भारतातच नव्हे तर दक्षिण भारतातही आपल्या गाण्यासाठी लोकप्रिय होते. दक्षिण भारतात त्यांना अनेक ठिकाणांहून गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी खास बोलाविले जाई. त्यांनी दाक्षिणात्य कवी त्यागराजयांच्या कृतीही ध्वनिमुद्रित केल्या आहेत.. अनेकदा लोक तिथे त्यांच्या गळ्यात मोठमोठे हार घालून त्यांचे स्वागत करण्याबरोबर त्यांची मिरवणूकही काढत असत. खाँ साहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र अतिशय साधे होते. म्हैसूर राज दरबारी ते नित्य नियमाने हजेरी लावत असत. त्यांना तिथे 'संगीत रत्न' उपाधी देऊन गौरविण्यात आले. म्हैसूरच्या वाटेवर ते धारवाडला आपल्या भावाकडे मुक्काम करत असत. तिथेच त्यांनी आपले ख्यातनाम शिष्य सवाई गंधर्व यांना गाणे शिकविले. इ.स. १९०० मध्ये आठ महिने त्यांनी सूरश्री केसरबाई केरकर यांनाही गाणे शिकविले. पुढे केसरबाईंनी गायन क्षेत्रात खूप नाव कमावले. १९१३ मध्ये अब्दुल करीम खाँ साहेबांनी पुणे येथे आर्य संगीत विद्यालयाची स्थापना केली. येथे ते भविष्यातील गायक तयार करू लागले. अब्दुल करीम खाँ साहेबांना वाद्यांविषयीही कमालीचा जिव्हाळा होता. ते वाद्ये दुरुस्त करण्यात पटाईत होते. त्यांच्याजवळ वाद्ये दुरुस्तीसाठी लागणारी सामग्री सदैव असे. मिरज येथील नामवंत सतार व तानपुरा बनविणारे कारागीर देखील त्यांचा सल्ला शिरोधार्थ मानत व अनेकदा त्यांचे मार्गदर्शन घेत असत. आर्य संगीत विद्यालयाची दुसरी शाखा १९१७ मध्ये मुंबई येथे सुरू झाली. परंतु ती दोन - तीन वर्षांपलीकडे जास्त टिकली नाही. नंतर ते मिरज येथे स्थायिक झाले.
अब्दुल करीम खाँ साहेबांच्या शिष्यांत सवाई गंधर्व, सुरेशबाबू माने, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, दशरथबुवा मुळे, रोशन आरा बेगम, हिराबाई बडोदेकर इत्यादी प्रतिभावंत गायकांचा समावेश होतो.
त्यांच्या 'जमुना के तीर', 'गोपाला करुणा क्यूं नही आवे', 'पिया के मिलन की आस', 'नैना रसीले', 'पिया बीन नही आवत चैन' यांसारख्या अजरामर ध्वनिमुद्रणांनी आजही ते रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. दर वर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑगस्ट महिन्यात मिरज येथे मोठा संगीत महोत्सव साजरा होतो. भारतातील नामी कलावंत तेव्हा येऊन आपली कला सादर करतात व उस्तादांच्या प्रती आपला आदर व्यक्त करतात. *मा.अब्दुल करीम खाँ * यांचे २७ ऑक्टोबर १९३७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 11, 2016
१९९० साली सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या मराठी चित्रपटा द्वारे पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहे. त्यांचा जन्म १४ मे १९६५ रोजी झाला.
मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहे. त्यांचा पहिला बॉलिवुड चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. जिद्दी असे या बॉलिवुड चित्रपटाचे नाव आहे.
आपली माणसे, चिमणी पाखरे, विधिलिखित, लालबाग परळ, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यांचा हा चित्रपट फारच गाजला होता.
रूस्तम, क्रिश ३, मुंबई कटींग, आजान, जंग, बादशाह, रॉक, अनुराधा, बबल गम, तीस मार खॉं असे अनेक तगडे बॉलिवुड चित्रपटदेखील त्यांनी केले आहेत.
त्यांची सिंघम या सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गोठया नावाची भूमिका विशेष गाजली होती.कौन होईल मराठी करोडपती हा छोटया पडदयावरील त्यांचा कार्यक्रमाचे अॅकंरींग त्यांनी केले होते.सचिन खेडेकर यांना बॉलिवुड ,मराठी चित्रपट आणि छोटया पडदयावर देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच ऐकण्यास मिळाले आहे. सैलाब या टीव्ही शोसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच ऐतिहासिक भूमिकेसाठीदेखील त्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 15, 2017
१९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.
January 21, 2022
१७ फेब्रुवारी १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.
December 18, 2021
पद्मा तळवलकर या माहेरच्या पद्मा सहस्रबुद्धे. पद्मा तळवलकर या जयपूर-अत्रौली घराण्याच्या लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आहेत. पद्मा तळवलकर यांचे आजोबा काणेबुवा हे कीर्तनकार होते. त्यामुळे घरात गाणे होते. गाणे शिकण्यासाठी पद्मा तळवलकरांना घरातून आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला
March 1, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti