(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपूरी

    फिराक गोरखपूरी हे जात्याच अती बुद्धीमान होते. त्यांच्या घरी काही पंडितांचा राबता असल्याने ती बीजे त्यांच्या मनात पुर्वीपासूनच पेरली गेलेली होती. आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी वर्डस्वर्थ, टेनीसन, तुलसी, कबीर, मीरा यांच्या साहित्याचा प्रगाढ अभ्यास केला. स्वामी रामतीर्थ यांचे वेदान्तावरील, विवेकानंदांची अनेक भाषणे यांचा अभ्यास केला.

      April 27, 2024


  • उद्योग जगातला संत रतन टाटा

    उद्योग जगातला संत रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. टाटा.. भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढय़ांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती! टाटांनी केलेली संपत्ती निर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम.

    सालंकृत, तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत, तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच ‘टाटायन’!

    रतन टाटा यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या सहा वर्षांचे वय असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला. चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्टा होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले.

    आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले.

    आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती.

    रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्यांा वरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली, मा.रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती.

    कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते.

    १९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव.

    याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. रतन टाटा यांनी टाटा समूहात सहसा न घडणारी अशी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे पारसी धर्मात न जन्मलेल्या अशा काही गुणी लोकांना त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये अत्युच्च पदांवर आणले. आधीचे मूळगावकर, केरकर, पेंडसे असे काही सन्मान्य अपवाद जरूर होते; पण रतन टाटांनी ते अधिक विस्तारले. जे. आर. डी. टाटांच्या अति सज्जनपणाचा फायदा घेत वर्षांनुवष्रे कंपनी ही आपली जहागिरी बनवून आपल्याच सग्यासोयऱ्यांबरोबर मनमानी करणारे, कितीही वय वाढले तरी निवृत्त न होणारे टाटा समूहातील मठाधिपती त्यांनी घरी पाठवले. निवृत्तीचे वय ७५ वर्ष निश्चित केले. यात टिस्कोचे रूसी मोदी, टाटा केमिकल्सचे दरबारी सेठ असे सामथ्र्यवान दिग्गज होते. रतन टाटांनी जवळजवळ सर्वच टाटा कंपन्यांतून नवे रक्त आणले आणि लंगडणाऱ्या कंपन्या भरभराटीने धावू लागल्या.

    रतन टाटांनी आपणच केलेला नियम काटेकोरपणे पाळला. आपल्या हयातीतच आपला वारस व्यवस्थित रीतीने निवडला आणि स्वत:ही ७५ व्या वर्षी निवृत्त झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये जाणेही बंद केले. हे करत असतांना मा.रतन टाटा यांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 28, 2018


  • अभिनेत्री वैजयंती माला बाली

    एक अभिनेत्री, शास्त्रीय नृत्यांगना, कर्नाटकी गायिका, नृत्य प्रशिक्षक व राजकारणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वैजयंती माला यांनी वयाच्या १३ व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. एम डी रमन व वसु़ंधरादेवी हे त्यांचे आईवडिल. पापाकुट्टी (अर्थ लहान मुलगी) या नावाने ती ओळखली जात असे.

    वैजयंती माला यांची आई तमिळ चित्रपटांतील एकेकाळची एक आघाडीची नायिका होती. ७ वर्षांची असल्यापासुन मा.वैजयंती माला यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात ती पारंगत झाली.

    त्यांचे कौटुंबिक परिचित दिग्दर्शक एम डी रमन वझकई या तमिळ चित्रपटासाठी एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्या दरम्यान वैजयंतीमालाला त्यांनी नृत्य करतांना पाहिले व ते प्रभावित झाले. मात्र वैजयंतीमाला यांना त्यांच्या चित्रपटात संधी देण्यापुर्वी त्यांना तिच्या आजीचे, यदुगिरी देवी यांचे मन वळवावे लागले होते. कारण तिच्या शिक्षण व नृत्यावर याचा परिणाम होईल असे आजीचे मत होते.

    वयाच्या सोहाव्या वर्षी अभिनय केलेला वैजयंतीमाला यांचा हा पहिलाच चित्रपट आर्थिकद्रुष्ट्या यशस्वी ठरल्याने याच चित्रपटाचा तेलगु मधे जीवितम या शीर्षकाने रिमेक करण्यात आला. नायिकेच्या भुमिकेसाठी पुन्हा वैजयंतीमालाची यांचीच निवड करण्यात आली. हा चित्रपट देखील यशस्वी झाला. १९५१ मध्ये आलेल्या 'बहार' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

    १९५४ मध्ये रिलीज झालेला नागिन हा सिनेमा त्यांच्या करिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. 'देवदास' हा सिनेमा वैजयंती माला यांच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. विमल राय दिग्दर्शित या सिनेमात वैजयंती माला यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९५८ मध्ये पडद्यावर झळकलेल्या 'साधना' या सिनेमातील भूमिकेसाठी वैजयंती माला यांना त्यांच्या करिअरमधील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

    देवदास, नया दौर, मधुमती, गंगा जमुना, लीडर, आम्रपाली, गंवार, लीडर, सुरज, संगम, पैगाम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी त्यांना ओळखले जाते. त्या गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगणा आहेत. एकामागून एक हिट सिनेमे देणा-या वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये आपल्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसह काम केले आहे.

    दिलीप कुमार, राजकपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, सुनील दत्त या अभिनेत्यांसोबत ऑन स्क्रिन त्यांची जोडी चांगली जमली होती. ‘संगम‘चे चित्रीकरण चालू असतांना एकदा वैजयंतीमालाचा वाढदिवस आला॰ राजने एक मोठा केक आणून त्यावर एकच मोठी मेणबत्ती लावली॰ सर्वांच्या प्रश्नार्थक नजरांना राजने हा वैजयंतीमालाचा RK मधील पहिलाच वाढदिवस आहे; तिचे येथे आणखी भरपूर वाढदिवस होवोत, मग मेणबत्यांची संख्या वाढत जाईल, असे सांगितले.

    १९६८ मध्ये वैजयंती माला यांनी डॉ. चमनलाल बाली यांच्यासह लग्न केले. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणे बंद केले. १९६९ मध्ये रिलीज झालेला 'प्रिन्स' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये हिंदीसह तेलगू, तामिळ आणि बांग्ला या भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला.

    वैजयंती माला यांना संगीत नाटक अॅकाडमी व पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ४८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे अध्यक्षपद भुषविले तर लोकसभा सदस्य म्हणुन त्यांनी काही काळ काम पाहिले. सन २००७ मधे बॉंडींग नावाने तिचे आत्मचरित्र प्रकाशित झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-दिव्य मराठी

      August 13, 2017


  • ‘जनकवी’ पी. सावळाराम

    ‘जनकवी’ पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम हे वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्रावरून त्यांना प्रेमाने दिलेले हे नाव! सावळारामांनी ते आयुष्यभर स्वीकारले.

      July 4, 2017


  • ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर

    ‘प्रिये पाहा’ ही कारेकर यांची प्रकाशित झालेली पहिली ध्वनिमुद्रिका. ‘एचएमव्ही’ कंपनीने ती काढली होती. पुढे प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाटय़पदे, भजने, शास्त्रीय गायन आदींच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही पं. कारेकर यांच्या दहा हजारांहून अधिक मैफली व कार्यक्रम आजवर झाले आहेत.

      July 4, 2022


  • ‘बॉण्ड गर्ल’ अभिनेत्री डीन ऑगर

    पॅरिस येथे जन्म झालेल्या डीन ऑगर यांनी १९६० साली मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर जीन कॉकट्यु दिग्दर्शित ‘टेस्टमेंट ऑफ ऑरफ्युअस’ या फ्रेंच चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

      December 18, 2021


  • मराठी अभिनेत्री, लेखिका प्रिया तेंडुलकर

    प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून देऊन त्या नाट्यसृष्टीमध्ये शिरल्या. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.

    प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्मेनदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

    नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.

    प्रिया तेंडुलकरांनी यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला . त्यांचे १९ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 19, 2017


  • संगीतकार नौशाद

    हिंदी चित्रपट संगीतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रभावी वापर करणाऱ्या संगीतकार नौशाद, यांनी लहान वयात वाद्याचे दुकानात नोकरी करताना वादनात हुकमत मिळवली तेव्हा दुकानाच्या मालकांनी - गुरबत अलींनी तिथली एक उत्तम हार्मोनियम त्या मुलाला भेट दिली. हाच मुलगा पुढे ‘संगीतकार नौशाद अली’ म्हणून नावारूपाला आला!

    त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर सहज दृष्टिक्षेप टाकला तर दिसून येईल की, त्यांचे जवळपास प्रत्येक गाणे कोणत्या ना कोणत्या रागावर आधारित आहे. उदाहरणादाखल आपण ‘बैजू बावरा’मधली गाणी बघू. ‘मोहे भूल गये सावरिया..’ या गीतातील आर्त भाव आणि विरहवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग भैरव वापरला. तर ‘तू गंगा की मौज मैं..’ला त्यांनी राग भैरवीची डूब दिली. ‘ओ दुनिया के रखवाले..’साठी त्यांनी भारदस्त अशा राग दरबारी कानडाचा वापर केला, तर ‘मन तडपत हरी दर्शन को आज..’मधली व्याकुळता व्यक्त करण्यासाठी राग मालकंसचे सूर वापरले. ‘दूर कोई गाये..’ हे लोकगीताचा बाज असलेले गीत त्यांनी राग देसमध्ये बांधले. ‘आज गावत मन मेरो झूम के..’ या तानसेन आणि बैजू यांच्या जुगलबंदीसाठी, देसी या गोड रागाचा वापर त्यांनी केला. ‘घनन घनन घन..’साठी राग मेघ, तर ‘बचपन की मुहब्बत को..’साठी त्यांनी राग मांड वापरला. ‘झूले में पवन की आयी बहार..’ या युगुलगीतावर त्यांनी राग बसंत पिलू या जोडरागाचा साज चढविला.

    ‘बैजू बावरा’चं संगीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. १९५२ मध्ये नुकतीच ‘बिनाका गीतमाला’ सुरू झाली होती. ३ डिसेंबर १९५२ रोजी सादर झालेल्या ‘बिनाका’ कार्यक्रमात पहिलं वाजलेलं गीत होतं- ‘बैजू बावरा’मधील ‘तू गंगा की मौज मैं जमुना का धारा..’!

    ‘बैजू बावरा’नंतर १९६० मध्ये मोठय़ा थाटामाटात प्रदर्शित झालेल्या के. असिफच्या ‘मुघल-ए-आझम’चं संगीतही प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्यातील ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे..’ या ठुमरीसाठी त्यांनी राग ‘गारा’चा वापर केला. या गाण्याच्या म्युझिक पीसमध्ये केवळ एकच सतार वाजत नाही, तर अनेक सतारी झंकारतात. आणि लताबाईंच्या आवाजाबद्दल काय बोलावं! ‘कंकरिया मोहे मारी गगरिया फोर डाली..’नंतरची छोटीशी तान त्या इतकी सुरेख घेतात, की पुन:पुन्हा ती ऐकत राहावी. ‘ये दिल की लगी कम क्या होगी..’ हे ‘मुघल-ए-आझम’मधील आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गाणं! जयजयवंती रागातील या गाण्याचा प्रत्येक अंतरा वेगळ्या चालीत आहे. ‘बेकस पे करम कीजिए..’मधली आर्तता त्यांनी राग केदारच्या सुरांतून साकारलीय, तर ‘खुदा मेहेरबाँ हो तुम्हारा..’साठी यमन! नौशादजींनी संगीतबद्ध केलेल्या ‘मधुबन में राधिका नाचे..’ या ‘कोहिनूर’मधील राजदरबारातल्या गीतासाठी त्यांनी राग हमीर या जोशपूर्ण रागाचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया’ या चित्रपटातलं ‘सावन आये या न आये..’ हे युगुलगीत त्यांनी राग वृंदावनी सारंगमध्ये बांधलं, तर ‘कोई सागर दिल को..’ या गाण्यातली उद्विग्नता व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग कलावतीचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया..’साठी सदाबहार अशा यमनची सुरावट त्यांनी वापरली.

    मारवा हा खरं तर हुरहूर लावणाऱ्या कातरवेळेचा राग. पण ‘साज और आवाज’मधील ‘पायलिया बावरी..’ हे सुंदर नृत्यगीत मारव्यामध्ये त्यांनी छान खुलवलंय. याच चित्रपटातलं ‘साज हो तुम आवाज हूँ..’ हे रफीसाहेबांनी गायलेलं आणखी एक सुंदर गीत पियानोच्या सुरात सुरू होतं. त्रितालात बांधलेलं हे गाणं राग पटदीपमध्ये आहे. पण ‘प्रेम तराना रंग पे आया..’ या दुसऱ्या अंतऱ्यात सुरावट बदलते, आणि ती मधुवंती-काफीच्या अंगाने पुढे जात पुन्हा पटदीपमध्ये येते. चित्रपटाचे शीर्षकच ‘साज और आवाज’ असल्याने यातल्या गाण्यांत नौशादसाहेबांनी जवळजवळ सर्व वाद्यांचा बहारदार वापर केलेला आहे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘रतन’, ‘अंदाज’, ‘दीदार’, ‘उडन खटोला’, ‘गंगा जमुना’, ‘कोहिनूर’, ‘मेरे मेहबूब’, ‘साज और आवाज’, ‘बैजू बावरा’, ‘मदर इंडिया’ आणि ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटांतली सगळीच्या सगळी गाणी हिट् झाली. उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद आमीर खाँ आणि पं. डी. व्ही. पलुस्कर या शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज गायकांकडून चित्रपटांसाठी गाऊन घेण्याची किमया नौशादजींनी ‘बैजू बावरा’ आणि ‘मुघल-ए-आझम’मध्ये करून दाखविली. नौशादजींनी चित्रपट संगीतकारास प्रतिष्ठा मिळवून दिली. ते उत्कृष्ट पियानिस्ट होते. पाश्चात्य स्वरांचंही त्यांना उत्तम ज्ञान होतं. ते वापरत असलेल्या प्रत्येक वाद्याची त्यांना सखोल माहिती होती. कोणत्या म्युझिक पीससाठी कोणतं वाद्य उचित ठरेल, हे त्यांना अचूक समजे. १९४९ मध्ये पडद्यावर आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातील नायक दिलीपकुमार ‘तू कहे अगर जीवनभर..’, ‘हम आज कहीं दिल खो बैठे..’, ‘झूम झूम के नाचों आज..’ आणि ‘टूटे ना दिल टूटे ना..’ ही चारही गाणी पियानोवर बसून म्हणतो.

    जन्म : २५ डिसेंबर १९१९
    मृत्यू : ५ मे २००६

    -- अनिल सांबरे

      December 25, 2020


  • बोल्ड अभिनेत्री रेहाना सुलतान

    बोल्ड अभिनेत्री रेहाना सुलतान यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५० रोजी अलाहाबाद येथे झाला. बॉलीवूडमध्ये बहाई समाजाचे अगदी मोजके कलावंत आहेत, त्यातली एक रेहाना सुलतान यांचा जन्म एका सुखवस्तू कुटुंबात झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर रेहाना सुलतान यांनी पुण्यातले एफटीआय मध्ये प्रवेश घेतला. रेहाना सुलतान या पहली नटी होत्या की ज्या FTII हून पास झाल्या व ज्यांना लगेचच चित्रपटात लीड रोल मिळाला होता. तिथे शिकत असतानाच त्यांना ब्रेक मिळाला १९६७ मधल्या विश्वनाथ अयंगारच्या ‘शादी की पहली सालगिरह’ या चित्रपटात बोल्ड सीन मुळे त्या गाजल्या. यावेळी त्यांचे वय फक्त सतरा वर्षाचे होते. १९७० च्या पूर्वार्धात राजिंदरसिंह बेदींना त्यांच्या बोल्ड कथेवर सिनेमा बनवायचा होता आणि त्यांची सहनायिका रेहाना यांच्या रुपात सापडली. याच सुमारास बी.आर.इशारांनी तिला ‘चेतना’त घेतले होते.

    'मैंने इतने नंगे मर्द देखे हैं कि मुझे अब कपड़े पहनने वाले मर्दों से नफरत होने लगी है'
    'चेतना' चित्रपटातील या डायलॉगमुळे रेहाना सुलतान चर्चेचा विषय ठरल्या होत्या. या सीनमध्ये रेहाना लाल साडीमध्ये बेडवर झोपलेली दाखविण्यात आलेली आहे. हातात व्हिस्कीची बॉटल आहे आणि लाजत ती ग्राहकांना आपल्याकडे येण्यास खुणावत आहे. त्यावेळी चेतना चित्रपटाचे पोस्टरही त्याच्या बोल्डनेसमुळे फार प्रसिद्ध झाले होते.

    इशारांनी फक्त अठ्ठावीस दिवसात याचे शुटींग पूर्ण केले. यातलं मुकेशचं ‘मै तो हर मोड पर तुझको दुंगा सदा…’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. हे दोन्ही चित्रपट पडले. पण रेहाना सुलतान यांना या दोन चित्रपटांमुळे तसेच रोल ऑफर होऊ लागले.

    १९७२ मध्ये आलेल्या एन.एन.सिप्पी यांच्या ‘हारजीत’ या चित्रपटात रेहाना यांच्या बरोबर हिरो अनिल धवन होता. हा सणकून आपटला. १९७३ मध्ये रेहाना वेद राहीच्या ‘प्रेमपर्वत’मध्ये झळकल्या. ‘ये दिल और उनकी निगाहोंके साये’ हे अप्रतिम गोड गाणं यात होतं. हा ही चित्रपट फ्लॉप ठरला. त्यामुळे रेहाना यांना काम मिळणं बंद झाले. पंजाबी चित्रपटातही त्यांनी काम करून पाहिलं; पण तिथेही तिच मागणी होती, तिनं कपडे उतरवण्याची ! १९८४ मधे आपल्यापेक्षा सोळा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या, आपल्याला ब्रेक देणाऱ्या बी.आर.इशारांशी रेहाना विवाहबद्ध झाल्या. त्यांचा संसार टिकला. मात्र इंडस्ट्रीत तिला टिकता आलं नाही. नाही म्हणायला याच वर्षी विजय आनंदच्या शबाना आझमी अभिनित ‘हम रहे ना रहे’ने त्यांना पुन्हा एकदा मोठी संधी मिळाली पण त्यालाही अपयशाचे तोंड पाहावे लागले. बघता बघता रेहाना यांचे करिअर संपुष्टात आले. तर बी.आर.इशारांनी जवळपास पस्तीस चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही ब्लॉकबस्टर हिट त्यांच्या वाट्याला आली नाही. २०१२ मध्ये बी.आर.इशारा यांचे निधन झाले आणि रेहाना यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवला. पतीच्या निधनानंतर मात्र त्या कोलमडून गेल्या. गाठीला जवळ पैसाअडका नाही, उपजीविकेचे साधन नाही. सुधीर मिश्रा यांनी त्याच्या ‘इन्कार’मध्ये रेहाना यांना घेतलं. गंमत म्हणजे हाही चित्रपट सेक्सुअल हरासमेंटवर आधारित होता पण हाही चित्रपट फ्लॉप ठरला. रेहाना सुलतान यांना 'दस्तक' या चित्रपटा साठी बेस्ट एक्ट्रेस कैटेगरी मध्ये नेशनल अवॉर्ड मिळाला होता. सध्या रेहाना यांना सिने एंड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) तर्फे प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत केली जातेय.

    रेहाना यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘त्यावेळी ती केवळ टाईप्ड अॅक्ट्रेस बनली होती. दर्शकांना ती केवळ सेक्स सिम्बॉल म्हणूनच पसंत होती. निर्मात्यांना फक्त बाथटब आणि पावसात भिजण्याच्या भूमिका ऑफर केल्याने तिला संताप होत असे’. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या एका चांगल्या अभिनेत्रीचे हे हाल कशामुळे झाले ? पडद्यावर सतत वेश्या साकारल्यामुळे ! लोकांची तिच्याविषयी नेहमीच इच्छा राहिली की तिने नेहमीच चद्दरबदली चित्रपटात कपडे उतरवत राहावेत. इतर नायिका साकारतात तशा सामान्य भूमिका तिने साकारून पहिल्या पण लोकांना त्या रुचल्या नाहीत. भरीस भर तिचा नवराही अशाच विस्कटलेल्या नात्यांवर चित्रपट करत राहिला. त्यामुळे दोन्ही अंगाने या अभिनेत्रीचे नुकसान होत गेले. आता तिचे वय झालेले आहे, या वयात तिला न्यूड पाहावं अशी कोणाची इच्छा असणार नाही. आता कमबॅकच्या प्रतिक्षेत असलेल्या रेहानाला वाटते की, या भूमिका तिने साकारल्या नसत्या तर तिचे करिअर नीट उभे राहिले असते आणि कदाचित तिनेही नाव कमावले असते. रेहाना असेही सांगते की, ‘तिचे नाव रेहाना सुल्ताना होते पण तिच्या Sultana मधील अखेरचा ‘A’ तिने सेन्सॉरला दान करून टाकला जो तिच्या जीवावर उठला. त्यामुळे ती सुलताना न राहता रेहाना सुलतान होऊन राहिली.’ वरवर हा विनोद वाटतो पण यात कारुण्याची झाक आहे जी एका व्यक्तीच्या कारकिर्दीची माती करून गेली. रेहाना सुलतान यांचे इतर चित्रपट 'हार-जीत', 'प्रेम पर्वत' , 'किस्सा कुर्सी का'.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / समीर गायकवाड

    'चेतना' चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=NLnLa-BKojE
    https://www.youtube.com/watch?v=_-Wd1Dg1vvY

      November 19, 2018


  • आक्रमक फलंदाज फारुख इंजिनिअर

    मद्रासमधल्या त्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामीला आला होता आणी सलामीच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ, दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नाबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५.

      February 25, 2022