सुप्रसिद्ध निवेदक, लेखक सुधीर गाडगीळ यांची खासियत म्हणजे नवनव्या चवी शोधणं, मनापासून खाणं आणि खाण्यावर बोलणं. त्यांचं ‘मानाचं पान’ हे पुस्तक म्हणजे आपल्या आवडत्या सेलेब्रिटींबरोबर मांडलेली पंगतच जणू. कलयांकित व्यक्ती काय खातात, त्यांच्या खाण्याच्या आकडीनिकडी याबाबत आपल्याला उत्सुकता असतेच. सुधीर गाडगीळ यांनी या विषयाला धरून घेतलेल्या खुसखुशीत मुलाखती लेख स्करूपात या पुस्तकात आहेत. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यावरील या पुस्तकातील लेख काळी गोल टिकली. त्यावर भांगापर्यंत रेखाटलेली काळ्या कुंकवाची उभी रेघ. नाकात लकाकणारी चमकी. डार्क ब्ल्यू किंवा मरून रंगाची सिल्क साडी. काठ ठळकपणे उठून दिसणारे, हाती तंबोरा – मैफलीपूर्वीची डोळे मिटलेली ध्यानस्थ स्तब्धता.आकाशवाणी धारवाड’ केंद्रावरचा फोटो वाटावा अशी आरती अंकलीकर – टिकेकरची प्रतिमा.रियाजाचं गांभीर्य सोडलं तर एरवी अवखळ, खटय़ाळ, खिदळणारी, जरा वरच्या स्वरात, अनुनासिक नादात खदखदणारी, चैतन्यदायी आरती.`अहो, तुमचं घर सापडायला फार वेळ लागला. ताडदेव डेपोपासून दोन चौक चालत यावं लागलं,’ असं फोटोग्राफरनं कुरकुरता क्षणीच `तुमचा वॉक चांगला झाला ना? गुड! तब्येतीला उत्तम!’ असा सट्टदिशी चौकार मारणारी आरती.
भरपूर खादाडणं, भटकणं, चेष्टामस्करी करणं आवडतं. मी सोशल प्राणी आहे, असं म्हणता म्हणता हळूच जीभ चावत, खालच्या पट्टीत म्हणून सोसलं तेवढंच गाते, असा `पी.जे.’ मारत कन्येची, स्वानंदीची टाळीही घेते. `माझ्या माहेरी लहानपणी घरात भाज्या कमी असायच्या. कर्नाटकाचा तो दुष्काळीच भाग. तीळ, कारळं, दाण्याच्या सुक्या चटण्या आणि पोळी. खूप आग्रह खाण्याचा. कुठलाही रोग झाला तरी `खाणं’ हेच औषध मानत. माझे काका तापातही शिस्तीत जेवायचे. एक ताप असला तरी `काही तरी खा’ असंच म्हणत. `आई अस्सल कानडी. बॉर्डरवरची असली तरी माझं बालपण मुख्यत्वे माटुंग्यातलं. आसपास सगळी अंबा भुवन, आनंद भुवन, नायक, मद्रास कॅफे ही किंग्ज सर्कलची टिपिकल उडपी हॉटेल. तिथे महिन्यातून एकदा इडली, डोसा खायचा म्हणजे ग्रेट ट्रीट. हॉटेल संस्कृती एवढी बोकाळली नव्हती; पण खाण्यात रस असायचा. वडील कुणाकुणाच्या गाण्याच्या मैफलींना घेऊन जायचे, तेदेखील `बटाटे वडा देईन’ हे आमीष दाखवून!’ `खवय्या सो गवय्या’ हे माझं आवडीचं तत्त्व. जो चांगला खातो, पितो तो गवई. त्यामुळे मी कुठलेही पथ्यपाणी करत नाही. पाण्यानं पोट बिघडतं, वगैरे मनाचे खेळ. कैरीचं लोणचं चाखताना, खोकला येणार असं मनात आलं तर खोकला येणारच; नाही तर काही होत नाही. खाणाऱ्यानं, गाणाऱ्यानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं!
`आरती, तुझं हे सकाळी हल्ली पेपरात प्रवचन येतं तसं चाललंय. तो तुझा स्वभाव नाही. थेट काय मन:पूर्वक खायला आवडलं ते सांग.’ `पालकाची मीठ पेरून भाजी, घट्ट साईचं दही, मेथीचं वरणं, त्यावर लाल सुक्या मिरच्यांची फोडणी आणि पुरणाचे कडबू प्रचंड आवडतात. मात्र खाताना गणित कच्चं पाहिजे, तरचं भरपेट जेवलं जातं. मुळात आम्हा धारवाडकडच्या लोकांना कुठल्याही प्रकारचे पोहे कधीही खायला आवडतात. झोप येत नसली तरी खा पोहे! हसू नका, खरंच सांगतेय! कार्यक्रमापूर्वी दोन दिवस मात्र पचायला हलकं खाणं पसंत करते. चहा रोज मी स्वत: करूनच पिते. ब्रेकफास्टला गरम पोळी भाजी. मग तासाभरानं दूध. जेवण संपूर्ण शाकाहारीच आवडतं, चाळीशीपर्यंत तिखट जास्त आवडायचं. वाचन, फिरणं वाढलं. जेवणातल्या व्हॅल्यूज कळल्या आणि मसालेदारपणा कमी केला. मात्र मिळमिळीत चालतच नाही. विशेषत: दुधीभोपळ्याची भाजी तर शक्यच नाही.’
उदय (टिकेकर) पक्का मांसाहारी. त्याला चिकन -फिश आवडतं. मी खात नसले तरी करते. कॉन्टिनेंटल ते भाकरी सगळंच करायला आवडतं. स्वानंदीच्या डिमांडस् पहिल्या पुरवते. जराशी तिखट, सर्व प्रकारची सँडविचेस, माझ्या हातचा डोसा सर्वांना आवडतो. पीठ कालवून तापत्या तव्यावर विशिष्ट लयीत, विशिष्ट प्रेशरनं फिरवणं ही कला आहे. डोशाखेरीज टम्म फुगलेली, एकही डाग नसलेली कागदासारखी भाकरी मी उत्तम बनू शकते. अर्थात, स्वयंपाक करायची वेळ कमी येते’.
एक तर माझ्या सासूबाई (सुमती टिकेकर) उत्तम स्वयंपाक करतात. त्या शेवयाची खीर, फ्रूट सॅलड, साजूक तुपातला शिरा, बासुंदी अप्रतिम बनवतात आणि उदयचं शूटिंगमुळे शेडय़ुल अनिश्चित असतं. तो रात्री उशिरा आल्यावर स्वयंपाकाचा सरंजाम मांडण्यापेक्षा आम्ही हॉटेलात जाणं पसंत करतो. चर्चगेटचं `पिझेरिया’, गिरगावातलं `ग्रीन हाऊस’, नाना चौकातला `श्रीकृष्ण’ उडपी किंवा आमच्या शास्त्री हॉलजवळचं `स्वाती स्नॅक्स!’
`स्वाती’मध्ये एकतर अतिशय स्वच्छता असते. शुद्ध पाण्याचा वापर असतो. `पानगी फदुरा खिचडी’ केळीच्या पानावर आली की मी फस्तच करते. फलाफल इथं मिळतं. सीताफळ शेक इथे उत्तम असतो. तुमच्या पुण्यात आले की माझ्या सर्व शिष्या आमच्या घरी जमतात. तिथे आठ तास रियाज, उरलेल्या वेळात पीठ पेरलेल्या पालेभाज्या आणि पोळ्या आम्हीच सगळ्याजणी करतो नि खातो. पुण्यात वाडेश्वरचा `डोसा’ आणि वैशालीची इडली आणि खूप चटणी.
`दौऱ्यात ठळकपणे लक्षात राहिलेली चव?’
`कोलकात्यातले टपरीवरचे रसगुल्ले, इंदौरचा सराफा, अमेरिकेत मॅकडोनॉल्डचं सॅलड, अमृतसरची गरमागरम तंदुर रोटी आणि काळी डाळ, ओ। हो।हो। सुभान अल्ला! जिथे जाते तिथून ताज्या भाज्या आणायला मला आवडतं. गाजर, मुळा, मटार, फ्लॉवर, कोबी घरी स्वयंपाक करताना त्या ताज्या भाज्यांच्या गंधात मूड लागतो. डोक्यात रुंजी घालत असलेला `राग’ गुणगुणणं सुरू होतं. जीवन पुरी किंवा अहीर भैरव गुणगुणायला लागले की, माझा उत्तम मूड जमल्याचं माझं मला जाणवतं.
लेखक - सुधीर गाडगीळ
संकलन - संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 28, 2017
हेमामालिनी यांचे पूर्ण नाव हेमामालिनी चक्रवर्ती. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी झाला. हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती ह्या तमिळ चित्रपटाच्या निर्मात्या होत्या, त्यामुळे घरी आधीपासूनच चित्रनगरीशी जुळवून घेणारे वातावरण होते. आपल्या चार दशकाहूनही अधिक काळापासून सिनेसृष्टीत यशस्वी कलाकार म्हणून आणि कित्येक सुपरह हिट चित्रपट देणाऱ्या हेमामालिनी यांना सुद्धा सुरवातीच्या काळात निर्माते आणि निर्देशक यांनी म्हंटले होते कि त्यांच्यात स्टार अपील नाही. तमिळ दिग्दर्शक श्रीधर यांनी तिला चित्रपटात घेण्यासाठी नकार दिला होता. हेमामालीनी यांना पहिला ब्रेंक मिळाला तो राजकपूर सोबतच चित्रपट ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटात त्यांना ‘ड्रीमगर्ल’ म्हणून प्रचारित करण्यात आले होते, फिल्म बॉक्स ऑफिस वर फारशी यशस्वी ठरली नाही पण हेमा मालिनी यांचे कौतुक झाले आणि दर्शकांनी त्यांना पसंद केले होते. त्यानंतरच्या काही चित्रपटांनमध्ये सुद्धा त्यांना ड्रीमगर्ल म्हणून समोर आणल्या गेले होते आणि आश्चर्य बघा कि नंतर १९७७ मध्ये त्यांना घेऊन प्रमोद चक्रवर्ती यांनी ड्रीमगर्ल नावाचा सिनेमाच पडद्यावर आणला आणि तो गाजला सुद्धा होता. त्यांचा पहिला हिट सिनेमा होता ‘जॉनी मेरा नाम’, देव आनंद सोबतच्या त्या चित्रपटाने त्यांचे करियर उचलून धरले. आणि लोकांनी त्या जोडीची खूप प्रशंसा केली होती. त्यानंतर आलेल्या रमेश सिप्पी यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटातल्या अभिनयाने हेमा मालिनी यांनी दर्शकांना मंत्रमुग्ध करून टाकले होते.
रमेश सिप्पी यांचाच चित्रपट ‘सीता और गीता’ मध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि ती फिल्म त्यांच्या करियर मध्ये निर्णायक ठरली होती. या चित्रपटानंतर त्या प्रसिध्यीचा शिखरावर पोहचल्या होत्या. या चित्रपटातील अतिशय सुंदर अभिनयामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा एकमेव फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सुरवातीला ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटासाठी वैजयंतीमाला यांची निवड झाली होती पण त्यांनी वेळेवर त्यांच्या विवाहामुळे त्या चित्रपटात काम करायला आपली असमर्थता दाखवली आणि त्याऐवजी हेमामालिनी यांना संधी मिळाली होती. तसेच ज्या चित्रपटाने त्यांना प्रसिद्ध्यीच्या शिखरावर पोहचवले होते त्या ‘सीता और गीता’ मध्ये रमेश सिप्पी यांना मुमताज यांना घ्यायचे होते. पण काही कारणास्तव त्या या चित्रपटात काम करू शकल्या नाही आणि पर्यायाने तो चित्रपट हेमा मालिनी यांना मिळाला आणि मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले होते.
वैजयंतीमाला यांच्या निवृती नंतर शास्त्रीय नृत्यांगना असलेली अभिनेत्री ची जागा हेमा मालिनी यांनी भरून काढली. १९७० साली आलेल्या ‘शरारत’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा धर्मेंद्र सोबत काम केले होते आणि १९७९ मध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या सोबतच लग्न केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र सोबत एकूण २८ चित्रपटांमध्ये काम केले होते. सहसा विवाहानंतर अभिनेत्रीची कारकीर्द संपुष्टात येते, पण हेमा मालिनी यांनी जिद्दीने आणि आपल्या परिश्रमाने विवाहानंतर सुद्धा बरेच यशस्वी चित्रपट दिलेत. जसे ‘क्रांती’, ‘नसीब’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘रजिया सुलतान’, एक नई पहेली’, ‘अंधा कानून’ आणि ‘अलिबाबा और चालीस चोर’ आणखी बरेच. उतरार्धात सुद्धा त्यांनी आपला चित्रपटाचा प्रवास सुरूच ठेवला ‘बागबान’ या भूमिकेबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. ‘वीरजारा’ मधील भूमिकेबद्दल पण त्यांची बरीच प्रशंसा झाली होती. त्यांनी आतापर्यंत सीता औऱ गीता, शोले, संन्यासी, धर्मात्मा, प्रतिज्ञा, सत्ते पे सत्ता, बागबान यांसारखे १५० चित्रपट केले आहेत. ड्रीम गर्ल अशी हेमामालिनी यांची ओळख आहे.
भरतनाट्यम मध्ये निपुण असलेल्या हेमामालिनी जगभर अनेक ठिकाणी आपल्या नृत्यांचे कार्यक्रम पण केले आहेत. सोबतच त्यांनी ‘दिल आशना है’ या शाहरुख खान आणि दिव्या भारती अभिनित चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले होते. राजकारणात पण त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्या भारतीय जनता पार्टी च्या जनरल सेक्रेटरी होत्या आणि सध्या मथुरा येथील भा.ज.पच्या खासदार आहेत. भरतनाट्यममध्ये विशारद असलेल्या हेमामालिनी यांनी १९६८ मध्ये ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 5, 2017
चांगल्या कामासाठी “नाही” हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..हो अगदी बरोबर ओळखलं…”डॉ. प्रकाश बाबा आमटे” या भाऊंच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये आपले नाना पाटेकर ज्यांना “येम्पलवार” म्हणून बोलावतो ना … तीच ही व्यक्ती.‘मनोहर नारायण येम्पलवार’ ……
June 18, 2019
सद्दाम हुसेन हे भारताचा मोठा फॅन होते. सद्दाम हुसेन प्रोग्रेसिव्ह विचाराचे होते. त्यांच्या काळात मुलीना शिक्षणासाठी बंदी नव्हती. मुली आधुनिक कपडे घालू शकत होत्या, नोकरी करू शकत होत्या. इंदिरा गांधीसारखी महिला भारतासारख्या मोठ्या देशावर राज्य करते याचे त्यांना आश्चर्य वाटायचं. इंदिराजी जेव्हा इराक दौऱ्यावर गेल्या होत्या तेव्हा त्यांची सुटकेस सुद्धा सद्दाम हुसेन यांनी उचलली होती. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला पाठींबा देणारा सद्दाम हुसेनच होते. अस म्हणतात की भारताच्या प्रेमातुन त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचं नाव उदय ठेवलं.
April 28, 2022
दियाने कॉलेज शिक्षण चालू असतानाच मॉडेलिंगला सुरूवात केली. २००० सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत दियाने तिसरे स्थान मिळवले. भारतातर्फे २००० मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दियाने ही स्पर्धा जिंकली. तिचा जन्म ९ डिसेंबर १९८१ रोजी हैदराबाद येथे झाला.
याच कार्यक्रमात दियाला मिस ब्युटिफूल स्माइल, द सोनी च्वॉइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दियाने बॉलिवूडकडे येण्यास सुरुवात केली. दियाने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्या अपोझिट आर. माधवन बघावयास मिळाला. वास्तविक या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखविली नाही, परंतु चित्रपटाच्या संगीताने आजही प्रेक्षकांवर मोहिनी घातलेली आहे. त्यानंतर दियाने ‘दिवानापन’ आणि सलमान खानसोबत ‘तुमको न भूल पाएंगे’ या चित्रपटांमध्ये काम केले.
सलमानने अनेक अभिनेता, अभिनेत्री आणि कम्पोजरला इंडस्ट्रीमध्ये संधी दिली आहे. त्यापैकीच एक नाव अभिनेत्री दिया मिर्झाचे आहे. दिया मिर्झाला इंडस्ट्रीत सलमानेच आणले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरेनट
December 9, 2017
मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्रला माहीत आहेत. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९११ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या गावी झाला.
शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते. मा.मनमोहन नातू यांनी लिहिलेले हे गीत, मा.वाटवे यांची चाल आणि शब्द.
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला..’
नववधूला स्त्रीसुलभ भावनेमुळे मैत्रिणींच्या गराडय़ात पतीचे नाव घेताना वाटणारा लज्जायुक्त संकोच या गीतात आढळतो. ही संकोचाची भावना कवी मनमोहनांच्या शब्दांत पुरेपूर दिसून येते. या गीतातल्या नानाविध प्रश्नांतून ती अभिव्यक्त झाली आहे. ही नववधू शालीन आहे. सुसंस्कृत घरातली आहे. हे गाणे म्हणजे तिने मैत्रिणींशी केलेले हितगूजच आहे..
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला नका विचारू स्वारी कशी?
दिसे कशी अन् हासे कशी?
कसं पाडलं मला फशी?
कशी जाहले राजीखुशी?
नजीक येता मुहूर्तवेळा, काय बोललो पहिल्या भेटी
कसे रंगले स्वप्न पहाटी? कशी रंगली लाली ओठी?
कसा जाहला जीव खुळा? मैत्रिणींनो..
अर्थ उलगडे समरसतेचा, सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा,
धुंद बने बुलबुल जिवाचा
घरी यायची झाली वेळां, मैत्रिणींनो..’
राधे तुझा सैल आंबाडा, बापूजींची प्राणज्योती... ह्या त्यांच्या गाजलेल्या रचना. अतिशय साधं रहाणीमान असलेला हा कवी आपल्या कवितेत मनातील प्रतिबिब उभं करत असे. ते लिहितात, राजकीय पुरुषांची कीर्ती, मुळीच मजला मत्सर नाही । आज हुमायुन बाबरापेक्षा, गलिब हृदये वेधित राही । युगायुगांचे सहप्रवासी, अफुच्या गोळ्या, उद्धार, शिवशिल्पांजली हे त्यांच्या नावावर असलेले काव्यसंग्रह. मा.मनमोहन यांचे पुस्तक वा पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झालेले अनेक काव्यसंग्रह आहेत. त्यातले ‘ताई तेलीण’, ‘सुनीतगंगा’, ‘कॉलेजियन’, ‘शंखध्वनी’, ‘अफूच्या गोळ्या’, ‘दर्यातील खसखस’, ‘कुहू-कुहू’, ‘शिव शिल्पांजली’ हे संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘दर्यातील खसखस’ या पुस्तकाचे प्रकाशक आर. बी. समुद्र लिहितात- ‘उदयोन्मुख कविपंचकात मनमोहन या तरुण व प्रतिभासंपन्न कवीचे स्थान फार वरचे आहे. आपल्या प्रखर बुद्धीने आणि विशिष्ट मनोवृत्तीने काव्यरचना करून त्यांनी प्रचलित काव्यपद्धतीला विजेचे धक्के दिले आहेत. त्यांच्याइतकी सुंदर प्रेमगीते मराठीत दुसऱ्या कोणत्याही कवीला लिहिता आली नाहीत.’ कवी ज. के. उपाध्ये यांना गुरुस्थानी मानणाऱ्या कवी मनमोहनांची कविता स्वतंत्र होती. त्यांच्या कविता तर उत्तम होत्याच; परंतु ध्वनिमुद्रिकांमधील भावगीतांतून त्यांना जास्त नाव मिळालं. वाटवे यांनी त्यांच्या काही कविता स्वरबद्ध केल्या आणि ती गाणी लोकप्रिय झाली. सर्व विषयांना आपल्या कवितेत स्पर्श करणारे लोककवी पत्नीच्या निधनानंतर आपल्या भावना शब्दबद्ध करताना म्हणतात. वृंदावनातील तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा, त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे,‘कलेवर कवीचे जाळू नका हो,जन्मभर तो जळतच होता. फुले तयावर माळू नका हो,जन्मभर होत फुलतच होता’ यात ते स्वतःबद्दलच्या भावना हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त करताना ते दिसतात. मनमोहन नातू यांचे ७ मे १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 8, 2017
कुंबळेची जिद्द, त्याचा करारीपणा मैदानावर सातत्याने दिसून यायचा. त्याने आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवले आहे. पाकिस्तानी खेळाडू तर हे कधीही विसरणार नाहीत.
February 7, 2022
वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते.
November 13, 2021
आज ९ ऑक्टोबर
आज संगीतकार रवींद्र जैन यांची पुण्यतिथी
जन्म:- २८ फेब्रुवारी १९४४
भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार मा.रवींद्र जैन यांची खासियत होती. अभिनेता राज कपूर यांनी रवींद्र जैन यांना खूपच मदत केली. ‘राम तेरी गंगा मैली’, ‘दो जासूस’, ‘हिना’ अशा राज कपूरच्या चित्रपटांना जैन यांनी संगीत दिले. राजश्री प्रॉडक्शन आणि रवींद्र जैन यांचे एक समीकरण बनले होते. याशिवाय, सुजाता, सुखम सुखकरम, आकाशा थिंटे निरम अशा प्रादेशिक चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. हिंदी चित्रपटांमध्ये जम बसत असताना रवींद्र जैन यांनी एक वेगळा प्रयोग करत धार्मिक चित्रपट आणि मालिकांच्या गीतांना संगीत देण्यास सुरुवात केली. ‘वनरात्री’, ‘गोपाल कृष्ण’, ‘जय करोली माँ’, ‘हर हर गंगे’ अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. रामायण, श्रीकृष्ण, साईबाबा, श्री ब्रह्मा विष्णू महेश, द्वारकाधीश, जय गंगा मैय्या, वीर योद्धा पृथ्वीराज चौहान अशा मालिकांना त्यांनी संगीत दिले आणि मालिकांची गीतेही बरीच गाजली. दाक्षिणात्य गायक येसुदासला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक देण्याचे संपूर्ण श्रेय रवींद्र जैन यांना जाते. ओ गोरिया रे, बीती हुअी रात की, गोरी तेरा गाव अशी रवींद्र जैन यांनी संगीत दिलेली गाणी येसूदास यांनी गायली. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांमध्ये सचिन आणि रंजीतावर चित्रित झालेले ‘अखियों के झरोकोंसे..’ हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. विरोधाभास एवढाच की दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या या संगीतकाराने आपल्या संगीतामधून कधीच आपली वेदना जाणवू दिली नाही. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांमधून रविंद्र जैन यांनी अनेक हळूवार भावगीतांमधून सुरांची पखरण केली. प्रत्येक संगीतकाराचा आपला एक आवडता गायक किंवा गायिका असते. जैन यांच्या संगीताचे नाते जोडले गेले ते गायक येसूदास यांच्याशी.. किंबहूना दक्षिणेकडच्या या गायकाला हिंदी चित्रपटांमध्ये आणणाऱ्या जैन यांचे त्यांच्याशी इतके घट्ट नाते होते की जर आपल्याला दृष्टी मिळालीच तर पहिले येसूदास यांचा चेहरा पहायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. मा.रवींद्र जैन यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या संगीतात बदल केला तरी त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याची गोडी सुरेख होती. संगीतकार जैन यांनी फक्त चित्रपटांमधील गीतांना नव्हे तर प्रायव्हेट अल्बम, गझल, पौराणिक मालिकांनाही त्यांनी दिलेल्या संगीताला वेगळे महत्त्व होते. मा.रवींद्र जैन यांचे ‘दिल की नजर से’ हे शायरीवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. शायरीवर पुस्तक लिहिणारे ते पहिले संगीतकार आहेत.*मा.रवींद्र जैन* यांचे ९ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.रवींद्र जैन यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ:- इंटरनेट
मा.रवींद्र जैन यांची गाजलेली गाणी
’आजसे पहेले आजसे जादा
’गोरी तेरा गाव बडा प्यारा
जब दिप जले आना
’राम तेरी गंगा मैली,
सुन सायबा सुन
October 9, 2016
लवासा विरोधी आंदोलन, पश्चिम घाट संवर्धन, भूसंपादन कायदा, शाश्वत विकास, लोकाधिकाराच्या चळवळी ते अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आंदोलनात तसेच आम आदमी पार्टीच्या स्थापनेत सक्रिय सहभागी राहिलेले आहेत.
June 18, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti