(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या उषाकिरण

    उषा मराठे हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी झाला.एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषा आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोघी मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले. वयाच्या बाराव्या वर्षी उषा मराठे यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. लवकरच त्यांना कुबेर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. नंतर उषा किरण यांना ’सीता स्वयंवर’ हा सिनेमा मिळाला. त्यातही त्यांची छोटी भूमिका होती. पण ’मायाबाजार’ मध्ये त्यांना रुक्मिणीची मोठी भूमिका मिळाली. मंगल पिक्चर्सचा ’जशास तसे’ आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित ’क्रांतीवीर वासुदेव बळवंत’ यांत केलेल्या त्यांच्या भूमिकांमुळे उषाकिरण यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली. त्यांनी अमेय चक्रवर्ती सारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकासोबतही काम केले. मात्र १९५० मध्ये ’श्रीकृष्ण दर्शन’ मध्ये काम करत असतानाच स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून त्यांनी ते उषाकिरण असे केले. पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या. उषाकिरण यांनी ’जशास तसे’ मध्ये डोंबारीण आणि ’पुनवेची रात’मध्ये तमासगिरीण तर ’बाळा जो जो रे’मध्ये ’सोशिक स्त्री’ अशा लक्षवेधी भूमिका अप्रतिम साकारल्या. माधव शिंदेंच्या ’शिकलेली बायको’ आणि ’कन्यादान’मध्ये त्यांच्यातले अद्भुत अभिनय सामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभली. ’पतिता’ मध्ये देव आनंद, ’दाग’ मध्ये दिलीपकुमार, ’काबुलीवाला’मध्ये बलराज साहनी तर ’नजराना’मध्ये राज कपूर या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. डॉ. मनोहर खेर यांच्याशी त्यांचा १९५४ मध्ये त्यांचा विवाह झाला. सिनेमातून संन्यास घेतल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. मुंबईच्या लोकपाल (शेरीफ) होण्याचा मान त्यांना मिळाला. उषाकिरण यांचे यांचे ९ मार्च २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      March 9, 2017


  • फारसी आणि उर्दू कवी मिर्झा गालिब

    वयाच्या ११ व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले.

      December 27, 2021


  • ख्यातनाम मराठी लोकशाहीर अमर शेख

    मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९१६ रोजी झाला. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले.

    राष्ट्रीय चळवळीत ते १९३०-३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता.

    जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्‌स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.

    कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला. लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे. अमर शेख यांचे २९ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मराठी विश्वकोश

      August 29, 2017


  • ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव

    अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातही त्यांनी चौफेर मुशाफिरी केली होती. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. मा. आनंद यादव यांना यादव यांच्या नटरंग कादंबरीवरून चित्रपटनिर्मिती झाली होती. मा.आनंद यादव यांनी सुमारे ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

    आनंद यादव यांचे २७ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 18, 2019


  • पुण्यातील निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ ह. वि. सरदेसाई

    एमबीबीएसला त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयांत डिस्टिंक्शन तर स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळालं होतं. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एम.डी. करून १९६० ला ते भारतात परतले.

      April 12, 2022


  • मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर

    भाऊसाहेब पाटणकर यांना ‘ जिंदादिल ‘ भाऊसाहेब पाटणकर म्ह्णून ओळखले जात होते. मराठीत गजल मोठ्या प्रमाणात लिहली जात असताना स्वतंत्र शेर मात्र कमीच म्हणजे जवळ जवळ लिहीले जात नसत . गंमत म्हणजे गजलांचा सुकाळ व्हायाच्या आधी मराठीत उच्च दर्जाचे शेर लिहणारा एक जबरदस्त शायर निर्माण झाला होता तो शायर म्हणजे भाऊसाहेब पाटणकर ते यवतमाळ येथे रहावयास होते.

      July 20, 2021


  • सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी

    सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी झाला. 'सुधारक' या पत्राचे संपादक वि. रा. जोशी हे त्यांचे वडील. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९१३), एम्.ए. (१९१६) झाले. पाली भाषेचा विशेष व्यांसग. १९२० पासून बदोद्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. प्रथम आठ वर्षे बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक. १९२८ पासून बडोदा सरकारचे दप्तरदार. १९४९ मध्ये निवृत. बडोद्याच्या वास्तव्यात गुजराती भाषेशी त्यांचा उत्तम परिचय झाला.निवृत्तीनंतर पुण्यास आल्यावर मराठी साहित्य परिषदेच्या कार्यात सहभाग.

    बडोद्याच्या 'सहविचारिणी सभे' च्या विद्यमाने निघणा-या 'सहविचार' ह्या नियतकालिकाचे ते एक संपादक होते. 'अ मॅन्युअल ऑफ पाली सध्दम्मप्पकासिनि' (संपादन), 'पाली कंकॉर्डन्स' (कोश), 'जातकांतील निवडक गोष्टी... (१९३०)', 'शाक्यमुनि गौतम' (१९३५), 'बुध्दसंप्रदाय व शिकवण' (१९६३) , ही त्यांची ग्रंथनिर्मिती त्यांच्या पालीच्या व्यासंगाची द्योतक आहे; पण याहीपेक्षा चाळीसांवर पुस्तके लिहून त्यांनी मराठी विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्त्वाची होय.

    विनोदी लेखनाची प्रेरणा त्यांना कोल्हटकर-गडक-यांच्या कोटित्वयुक्त लेखनातून मिळाली व त्याचा ठसा आपणास त्यांच्या प्रारंभीच्या 'एरंडाचे गु-हाळ... (१९३२)' मधील लेखन व 'चिमणरावांचे च-हाट... (१९३३)', मधील विवाहविषयक लेख यांवर स्पष्ट दिसतो. या मराठी लेखकांबरोबरच मार्क ट्वेन, डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार त्यांच्यावर झाले.

    पूर्वीच्या विनोदकरांप्रमाणे त्यांनीही चिमणराव व गुंडयाभाऊ अशी मानसपुत्रांची जोडगोळी जन्मास घातली आणि तिला विविध लोकव्यवहारांतून फिरवून आणले. पण त्यांच्या चित्रणात अतिशयोक्तीपेक्षा स्वभावोक्तीवर आणि समाजसुधारणेच्या मंडनापेक्षा मानवी स्वभावातील साध्यासुध्या विसंगतींच्या दर्शनावर भर राहिला. त्यांची निवेदनशैलीही मर्मभेदक कोटित्वापेक्षा मार्मिक व स्वभाविक संवादानी नटलेली आहे.

    त्यामुळे त्यांचे लेखन निबंधरूप होण्या ऐवजी त्याला ललित कथेचा घाट प्राप्त झाला व त्यातून मध्यमवर्गीयांचे एक अस्सल व स्वयंपूर्ण विश्व साकार झाले. वर उल्लेखिलेल्या पुस्तकांशिवाय वायफळाचा मळा' (१९३६), आणखी चिमणराव (१९४४), ओसारवाडीचे देव (१९४६), गुंडयाभाऊ (१९४७), रहाटगाडगं (१९५५), हास्यचिंतामणी (१९६१), बोरीबाभळी (१९६२), हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह प्रसिध्द आहेत. 'चिमराव स्टेट गेस्ट' ह्या त्यांच्या एका कथेवरुन काढण्यात आलेला 'सरकारी पाहुण' हा चित्रपट महाराष्ट्रात विलक्षण गाजला होता. चिं.वी.जोशी यांचे निधन २१ नोव्हेंबर १९६३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२२३०१७३३
    संदर्भ. ग्लोबल मराठी

      January 19, 2019


  • फिअरलेस नाडिया म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री मेरी इवान्स

    फिअरलेस नाडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाडियाचे खरे नाव ‘मेरी इवान्स’ असे होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९०८ रोजी पर्थ येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील फिअरलेस नाडिया ही एक दिग्गज अभिनेत्री होती. जे बी एच आणि होमी वाडिया यांनी १९३० साली वाडिया मुव्हिटोन स्टुडिओची स्थापना केली होती. त्यांनीच ‘स्टंट क्वीन’ असलेल्या फिअरलेस नाडियाला लाँच केले होते.

    मूळची ऑस्ट्रेलियन असलेल्या नाडियाने भारतात अनेक अॅक्शन चित्रपट केले आणि अल्पावधीतच ती स्टार झाली. ती तिच्या बहारदार नृत्यासाठी, अ‍ॅक्शन्ससाठी प्रसिद्ध होतीच. शिवाय तिला चाबूकवाली म्हणूनही ओळखले जायचे. नाडियाने होमी वाडियाशी लग्न केले. नाडिया लहान असतानाच तिच्या आई-वडिलांसह भारतात आली. तिचे वडील ब्रिटीश आर्मीमध्ये सैनिक होते. पेशावरमध्ये मोठी झालेली नाडिया तेथेच घोडेस्वारी शिकली.

    लहानपणीच त्यांनी घोडेस्वारी, जिमनॅस्टिक, बॅले डान्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सर्कशीत प्रवेश केला व यानिमित्ताने त्या भारतभर फिरल्या. पहिल्या महायुद्धात तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती आणि तिची आई मुंबईत स्थलांतरित झाल्या. त्यानंतर उत्तम नोकरी मिळावी याकरिता मेरीने (नाडिया) शॉर्टहॅण्ड टायपिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जाड असलेल्या मेरीने वजन कमी करण्याचाही निर्णय घेतला होता, त्यासाठी तिने रशियन नृत्य प्रशिक्षक मदाम अस्त्रोवा यांच्या नृत्यकला शाळेत नाव नोंदवले. त्यावेळी मदामनेच मेरीमध्ये असलेले कलागुण जाणले आणि भारतभर फिरण्या-या त्याच्या नृत्य/थेएटर ग्रुपमध्ये तिला सहभागी करून घेतले. त्याच्याच सांगण्यावरून तिने आपले नाव मेरीवरून नाडिया असे ठेवले.

    नाडियाच्या एकाही चित्रपटाची डीव्हीडी सध्या उपलब्ध नाही. पण जे बी एच वाडिया यांचे नातू रियाद विन्सी वाडिया यांनी तिच्यावर १९९३ साली एक सुंदर माहितीपट तयार केला होता. त्याचे नाव ‘फिअरलेस : द हंटरवाली स्टोरी’ असे आहे. यात नाडियाच्या काही छायाचित्र आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिचे आयुष्य आणि करिअर दाखविण्यात आले आहे.
    द हंटरवाली उर्फ मेरी इवान्स यांचे ९ जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.

    भारतातील पहिल्या महिला 'स्टंटवुमन' म्हणून ओखळल्या जाणाऱ्या 'फिअरलेस नाडीया' यांना गुगलने डूडलद्वारे आज त्यांच्या जन्मदिनी श्रद्धांजली वाहिली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://youtu.be/Y0A6a09C7hM
    https://youtu.be/dcZ_ab5LcuQ

      January 8, 2018


  • महान गायक उस्ताद बडे गुलाम अली खान

    लाहोर येथे जन्मलेले बडे गुलाम अली खान फाळणीनंतर तेथेच राहिले. त्यांचा जन्म २ एप्रिल १९०२ रोजी झाला. पहिले काही वर्ष ६ महिने भारत आणि ६ महिने पाकिस्तानात येथे राहत. त्यांनी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना भारताचे नागरिकत्व मिळण्याकरता मदतीची विनंती केली. आणि खासाहेब हिंदुस्थानचे नागरिक झाले. मैफलीत खांसाहेबाना अपेक्षित ठेका तबलजीकडून मिळाला नाही कि फक्त ठुमऱ्या गाऊन वेळ मारून नेत. कै जी एनन जोशी ऐक आठवण जरूर सांगतात एकदा खांसाहेब त्यांच्या घरी आंब्यांच्या दिवसात दुपारी आले होते तेव्हा साहजिकच भोजनास आमरस पुरीचा बेत होता. खासाहेब तब्येतीत जेवले जेवण संपल्यावर आमरस एवढा आवडला कि नंतर त्यांनी चार वाट्या रस प्यायले. आणि नंतर गायचा मूड लागला तेव्हा तंबोरे लावून २-३ आस तब्येतीत गायले.

    ख्यालगायकी प्रमाणे ठुमरी म्हणण्यात त्यांचा हातखंड होता. मारवा आणि पुरिया सारखे जवळचे स्वर असलेले राग ऐका पाठोपाठ गात नाहीत कारण राग जरी जवळचे असले तरी दोन वेगळे राग वेगळे वातावरण निर्मिती करतात त्यामुळे ऐका पाठोपाठ शक्यतो गाऊ नयेत असे जाणकार सांगतात!! पण खांसाहेबांचे गायकीवरचे प्रभुत्व उच्च दर्जाचे होते!! १९४४ साली मुंबईत प्रथम झालेल्या मैफलीत मारवा आणि पुरिया ऐका पाठोपाठ म्हणून खासाहेबांनी रसिकांची तसेच जाणकारांची वाह व मिळवली होती. मैफलीत त्याकाळी पाच हजार रुपये खासाहेब घ्यायचे. जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गाणे म्हणण्यासाठी जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा खासाहेबांनां गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन मागितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले. जेव्हा ध्वनीमुद्रण सुरु होते तेव्हा त्यांनी ऐक आक्रमक तान घेतली आणि नौशाद म्हणाले यागाण्यात आक्रमक तान नको आहे पण त्यांना काही सुचत नव्हते तेव्हा ते म्हणाले मला केलेले चित्रीकरण दाखवा!! चित्रीकरण बघताना जवळ बसलेल्या उस्ताद निझामुद्दीन खान (तबलजी) यांना म्हणाले ये लौंडीया (अभिनेत्री मधुबाला) तो बहोत खुबसुरत है!!

    लतादीदी या त्यांच्या ऐक मोठ्या चाहत्या होत्या. बडे गुलाम अली खान यांचे २५ एप्रिल १९६८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    बडे गुलाम अली खान यांचे गायन
    https://www.youtube.com/watch?v=Gy75Hipt8IQ

    https://www.youtube.com/watch?v=BViraiWfRqU

    https://www.youtube.com/watch?v=JXxe9dU9N0U

      April 25, 2017


  • गिटारवादक, गायक, गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते जॉर्ज हॅरिसन

    बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून जॉर्ज हॅरिसन यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४३ रोजी झाला.जॉन लेनन, पॉल मॅकर्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार या चौघांनी ‘बीटल्स’ या नावानं जे काही सर्वसाधारणपणे केलं, ते मात्र यापेक्षा पुष्कळच सौम्य, मध्यममार्गी बहुसंख्य श्रोत्यांना रुचेल असं होतं. त्यामुळेच ते गाजले. आजही ‘बीटल्स’चे चाहते जगभर पसरलेले आहेत. बीटल्सनं इंग्लंडमधून अमेरिकेवर जणू सांगीतिक हल्लाबोलच केलं. मागोमाग अनेक ब्रिटिश रॉक बँड्स अमेरिकेत डेरेदाखल झाले. त्या घटनेला ‘ब्रिटिश इन्व्हेजन’ असंच म्हणतात. अमेरिकेत असणारे अनेक बँड्स त्या ब्रिटिश तडाख्यात नामोहरम झाले, त्यांचं अस्तित्व लयास गेलं. ‘दि रोलिंग स्टोन्स’सारखा कंपू हा ‘बॅड बॉईज’ची प्रतिमा सांभाळत ‘ब्ल्यूज रॉक’ वाजवत राहिला. ‘बीटल्स’ मात्र पॉपजवळचं रॉक गात होते. ते तरुण होते. देखणे होते. उत्साही होते. नवनवं शिकून आत्मसात करणारे होते. अजिबात प्रसिद्धीविन्मुख नव्हते. आणि त्यांचं गाणंदेखील अगदी तसंच होतं. सगळय़ात मोलाची गोष्ट ही, की ते प्रयोगशील होतं. तत्कालीन रेकॉर्डिग यंत्रणांच्या मर्यादा ध्यानात घेऊन बीटल्सच्या गाण्यांकडे बघितलं की त्यांचे सांगीतिक प्रयोग किती काळाच्या पुढचे होते, हे कळतं. कधी बाटल्यांचा आवाज काढ, कधी वाद्याच्या पुढय़ात माइक न ठेवता पोटात ठेव, कधी पौर्वात्य वाद्य वापर.. असं सारं त्या चौकडीनं यशस्वीरीत्या केलं. त्यांनी रॉकला कधी पॉपमध्ये बुचकळलं. कधी लॅटिन अमेरिकन सुरांमध्ये. आणि सरतेशेवटी भारतीय वाद्यांमध्ये त्यांना रॉकचा नवा अन्वयार्थ सापडला. पं. रविशंकरांची सतार जॉर्ज हॅरिसनला इतकी भावली, की ‘रागा रॉक’चा (Raga Rock) उदय झाला. ‘बीटल्स’नं संगीतामधले अनेक पायंडे प्रथमच पाडले. ‘म्युझिक व्हिडीओ’ची संकल्पना नक्की कुणाची, यावर अभ्यासकांचं एकमत नसलं तरी श्रोत्यांपर्यंत पहिल्यांदा पोचलेलं व्हिडीओ संगीत हे बीटल्सचं होतं, याबद्दल कुणालाच संशय नाही. ‘अल्बम’ हा प्रकार केवळ सात-आठ गाण्यांना कोंबून धरणारा प्रकार नव्हे, तर त्यामागे एखादं वैचारिक सूत्र पाहिजे, हेदेखील बीटल्सनं बिनचूक ओळखलं. अल्बमच्या कव्हरपासून ते विक्रीपर्यंत बीटल्सनं निर्मितीक्षम नजरेनं पाहिलं. ‘Lucy in the Sky with Diamonds’सारख्या गाण्यामधून त्यांनी ‘सायकेडेलिक रॉक’ म्हणजे काय, ते दाखवलं. अमली पदार्थ घेतल्यावर माणसाला कसं भिरभिरल्यासारखं, तरंगल्यासारखं वाटतं, हेही त्या रॉकनं दाखवलं. पुढे हॅरिसन भारतीय आध्यात्मवादाकडे झुकले आणि अन्य बीटल्सना त्याचप्रमाणे पाश्चिमात्य श्रोत्यांना त्याचा परिचय करून दिला. जॉर्ज हॅरिसन यांचा बीटल्स हा बँड फुटल्यानंतर हॅरिसन यांनी सोलो आर्टिस्ट या नात्याने काम केले. पुढे ट्रॅव्हलिंग विल्बरीज बँडचे संस्थापक सदस्यही झाले. रोलिंग स्टोनमासिकाने प्रसिद्ध केलेल्या १०० महान गिटारिस्टच्या यादीत हॅरिसन यांना ११ वे स्थान दिले. बीटल्सची बहुतांश गीते लेनन आणि मॅकार्टनी यांनी लिहीली असली तरी प्रत्येक अल्बममध्ये एखाद दुसरे गाणे हॅरिसन यांनीही लिहीलेले असायचे. १९६०च्या दशकाच्या मध्यावर हॅरिसन यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व स्वीकारले. हरेकृष्ण चळवळ आणि सतारीचे संगीत पाश्चिमात्य जगात पसरवण्यात त्यांनी मदत केली. पंडित रविशंकर यांच्यासोबत त्यांनी चॅरिटी कॉन्सर्ट फॉर बांगलादेश हा पहिला मोठा मदतीसाठीचा कार्यक्रम (चॅरिटी शो) त्यांनी १९७१ मध्ये सादर केला. हॅरिसन यांनी दोन वेळा विवाह केला. ऑलिव्हिया त्रिनीदाद अरायस या दुस-या पत्नीपासून त्यांना एक मुलगाही झाला. आय, मी, माईन हे हॅरिसन यांचे आत्मचरित्र १९८० मध्ये प्रसिद्ध झाले. आत्मचरित्र प्रसिद्ध करणारे बीटल्सपैकी ते एकमेव होते. जॉर्ज हॅरिसन यांचे निधन २९ नोव्हेंबर २००१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 27, 2017