हिंदी चित्रपट सृष्टीत हास्य अभिनेता म्हणून स्थान मिळविणारा पहिला अभिनेता म्हणून बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ़ जॉनी वॉकर यांचे नाव व व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२० रोजी झाला. सदाबहार व्यक्तिमत्व असणार्याब या कलाकाराने विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत अढळ पद संपादन केले आहे.
जॉनी वॉकर यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत गेलं. जॉनी वॉकर यांनी सुरुवातीच्या काळात बेस्ट मध्ये बस कंडक्टर म्हणून काम केले होते. बसमध्ये प्रवाशांबरोबर मजामस्ती करुन त्यांचे मनोरंजन करत होते. हे पाहून बलराज साहनी प्रभावित झाले होते. बलराज साहनी यांनी त्यांची भेट गुरु दत्त यांच्याशी करुन दिली. १९५० साली आलेल्या ’ आखरी पैगाम” द्वारे ते' रसिकांच्या पुढे आले.त्याच वर्षी नवकेतनचा ’बाजी’ झळकला आणि जॉनी वॉकर यांनी मागे वळून पाहिले नाही.
बाजीमधील त्यांच्या दारुड्याच्या अभिनयामुळे खूष होऊन गुरुदत्त यांनी त्यांना "जॉनी वॉकर" हे जगप्रसिद्ध व्हिस्कीच्या ब्रँडचे नाव दिले आणि बद्रुद्दीन जमालुद्दीन काझीचा 'जॉनी वॉकर' झाला. बिमल रॉय सारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाच्या ’मधुमती’त जॉनी वॉकर यांनी दारूड्याची भूमिका एवढी अप्रतिम केली की समीक्षकांनी त्यांना त्या वर्षाचा सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार बहाल केला गेला.
जॉनी वॉकर यांनी आयुष्यात कधी दारूला स्पर्श ही केला नाही पण दारूड्याचे बेअरींग एवढे झकास सांभाळले की बिमलदा म्हणाले 'हा माणूस दारूला स्पर्श देखील करीत नाही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही.’देव आनंद यांच्या सोबत 'सीआयडी'त तर त्यांनी कमाल केली होती. 'ऐ दिल है मुश्कील जीना यहां जरा हठ के जरा बच के ये है बॉंम्बे मेरी जान’ हे गाणं तर त्या वर्षीच बिनाका टॉपचं गाणं ठरलं! वॉकर यांची विनोदातील लोकप्रियता एवढी होती की ’जॉनी वॉकर’नावाचा एक सिनेमा पन्नासच्या दशकात आला होता यात त्याने मुख्य भूमिका केली होती.
श्रीमंत मेहुणा पाहिजे या मराठी सिनेमात देखील त्यांनी भूमिका केली होती. जवळपास प्रत्येक सिनेमात वॉकर यांच्यावर गाणं चित्रित केलेले असायचं. आपल्या ३५ वर्ष्याच्या करीयर मध्ये जॉनी वॉकर यांनी ३२५ चित्रपटात काम केले. मिस्टर कार्टून एम.ए., खोटा पैसा, मिस्टर जॉन, नया पैसा, रिक्षावाला आदी चित्रपटात जॉनी वॉकर यांनी नायक म्हणून काम केले होते. जॉनी वॉकर यांनी काळाची पावले ओळखून सत्तरच्या दशकात निवृत्ती पत्करली पण हृषिकेश मुखर्जी यांच्या आग्रहावरून 'आनंद' व गुलज़ार यांच्या आग्रहावरून 'चाची ४२०' या चित्रपटात काम केले होते. जॉनी वॉकर यांचे २९ जुलै २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 17, 2017
कृष्ण गणेश फुलंब्रीकर तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला.
आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव.
त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशी झाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले.
१९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या. गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली.
त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत. वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नं केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो.
मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
October 20, 2021
‘खेड्यामधले घर कौलारू”,”या कातर वेळी ”हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली.
December 27, 2021
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा जन्म ७ ऑगस्ट १९४८ रोजी झाला.
ग्रेग चॅपेल हे ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. ग्रेग चॅपेल यांनी १९७० साली पर्थ येथे ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड या सामन्याने कसोटीत पदार्पण केले. व १९७१ साली वन डे मध्ये पदार्पण केले. ४८ कसोटीत त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराची भूमिका बजावली होती. ७००० धावांचा टप्पा ओलांडणारे ते पहिले ऑस्टेलियन खेळाडू होते. ग्रेग चॅपेल यांनी ८७ कसोटीत ५३.८६च्या सरासरीने ७११० धावा केल्या. ग्रेग चॅपेल यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी त्यांच्या पदार्पणातील व शेवटच्या कसोटीत शतक नोंदवले होते. कर्णधारपद मिळाल्यावरही पहिल्या व दुसर्या डावात शतक नोंदवले.
भाऊ इयान चॅपेल बरोबर खेळताना दोघांनी एकाच कसोटीत शतक नोंदवले होते. त्यांचा आणखी एक विक्रम म्हणचे प्रथम दर्जाच्या सामन्यात त्यांनी १९७५-७६ या वर्षांत १५४७ धावा काढल्या. हा त्यांचा विक्रम २३ वर्षे अबाधित होता. ऑन साईडला त्याने मारलेले फटके आकर्षक असत. क्रिकेटच्या त्यांच्या या योगदानाबद्दल १९७३ मध्ये विस्डेनतर्फे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले. २००२ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेमनेही त्यांना गौरविले. १९८४ साली त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. चॅपेल यांनी २००५ ते २००७ या काळात भारतीय संघाला प्रशिक्षण दिले होते.
त्यांनी या काळात बरेच प्रयोग केले. मात्र, यात कुठल्याही निष्कर्षाप्रत आले नाहीत. त्यामुळे २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत संघ पहिल्याच फेरीत गारद झाला. त्यानंतर त्यांनी हे पद सोडले. त्या दरम्यान धोनी हा क्रिकेट कारकिर्दीत नव्याने पाऊल ठेवले होते. त्यावेळी चॅपेल यांचे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंशी मतभेद होते. यामध्ये तत्कालिन संघाचा कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश होता. ग्रेग चॅपेल यांनी समालोचक म्हणूनही काम पाहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 7, 2021
बासरी वादक, संगीतकार, नृत्य निर्देशक, कवि व लेखक पंडित विजय राघव राव यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९२५ रोजी मद्रास येथे झाला.
पंडित राघव राव सहा दशकाहून संगीत बरोबर जोडलेले होते. त्यांनी भरतनाट्यममध्ये मध्ये सुद्धा प्रशिक्षण घेतले होते. आकाशवाणी दिल्ली चे कलाकार होते. पंडित रविशंकर यांना त्यांनी गुरु मानले होते. पंडित विजय राघव राव हे फिल्म डिव्हिजनचे मुख्य संचालक राहिले होते. भारत सरकारने पंडित राघव राव यांना १९७० साली पद्मश्री व १९८२ मध्ये संगीत नाटक अकादमीने सन्मानित केले होते. पंडित राघव राव यांचे ३० नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विजय राघव राव यांचे बासरी वादन
https://www.youtube.com/watch?v=C8UEw0Hvqys
https://www.youtube.com/watch?v=tAm0VDYkADQ
November 24, 2019
पठ्ठे बापूरावांचे खरे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. पठ्ठे बापूराव यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली येथे झाला.
ग्रामीण भागात गायल्या जाणार्या जात्यावरच्या ओव्यां ऐकूनऐकून पठ्ठे बापूराव यांनी त्यात ही नवे बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी ` लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन पठ्ठे बापूराव यांना आपल्याकडे बोलवून घेतले. पठ्ठे बापूराव यांचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! ` ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले.
नंतर हे शाहीर, मुंबईत आले, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातत पसरली. १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्याप स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.
पठ्ठे बापूराव यांचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 11, 2016
ट्रीक सिन्स ही नानासाहेबांची खासियत. ते त्यांच्या नाटकाचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य असे. ‘परीक्षेपूर्वीच्या सात रात्री’ सारखे, वेगळ्या विषयावरचे देखील नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले. १९७० पर्यंत त्यांचा या व्यवसायात जम बसला.
April 5, 2022
दिल्लीत जन्मलेली सुनिधी प्रतिभावंत असल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या बालपणीच ओळखले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९८३ रोजी झाला. वयाच्या केवळ सुनिधी चौहानचे बालपणीचे नाव निधी चौहान असे होते. चौथ्या वर्षापासून तिने मंदिरात गायन सुरु केले होते.
शालेय जीवनात सुनिधी दिल्लीत अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत होती. याच काळात टीव्ही अँकर तबस्सुम यांची नजर सुनिधीवर पडली. त्यांनी आपल्या एका शोमध्ये सुनिधीला गाण्याची संधी दिली आणि तिच्या कुटुंबाला मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला. तबस्सुम यांनीच सुनिधीची भेट प्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी सोबत घालून दिली. त्यांनी सुनिधीला त्यांच्या ग्रुपमध्ये गाण्याची संधी दिली होती.
वयाच्या १३व्या वर्षी 'मेरी आवाज सुनो' या शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी सुनिधीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. मस्त या सिनेमातील रुकी रुकीसी जिंदगी... हे तिने गायलेले पहिले बॉलिवूड गाणे आहे. हे गाणे जबरदस्त हिट ठरले. या गाण्यासाठी सुनिधीला तब्बल 14 वेगवेगळ्या अवॉर्ड्ससाठी नॉमिनेशन मिळाले होते. यापैकी दोन अवॉर्ड्स सुनिधीने आपल्या नावी केले. त्यानंतर सुनिधीने कधीही मागे वळून पाहिले नाही.
सुनिधीने केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपुरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळी भाषेत गाणी गायली आहेत. सुनिधी चौहानने लग्न २००२ मध्ये वयाच्या १८ वर्षी दिग्दर्शक बॉबी खानबरोबर केले होते. पण फार काळ त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि या दोघांचा घटस्फोट झाला. एप्रिल २०१२ मध्ये सुनिधीने दुसरे लग्न केले. बालपणीचा मित्र आणि म्युझिक डायरेक्टर हितेश सौनिकबरोबर सुनिधीने संसार थाटला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 18, 2017
संगीताच्या क्षेत्रात भावगीत या प्रकाराला अमाप लोकप्रियता मिळवून देणारे भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचे २०१७ हे जन्मशताब्दी वर्ष.त्यांचा जन्म ८ जून १९१७ रोजी झाला.‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला सायंतारा’ आणि ‘यमुनाकाठी ताजमहाल’ यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज एकविसाव्या शतकात करता येणं अशक्य. गजानन वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. आणि त्यांच्या या प्रयत्नाला लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की, पुढे बराच काळ वाटवे म्हणजे भावगीत हे समीकरण झाले. गजानन वाटवे यांच खास वैशिष्टय़ म्हणजे कवितांना सुंदर चाली लावून त्या रेकॉर्ड व पुस्तकांतून त्यांनी घराघरांत व गल्लोगली लोकप्रिय केल्या. गजानन वाटवे यांच्या भावगीतांना कवितांतून जन्म मिळाला. प्रथमच कवितांना चाल लावली जाते व ती गोड गळ्याने म्हटली जाते हे रसिकांच्या ध्यानात आले. वाटवे यांचा हा प्रयत्न सुरुवातीलाच एवढा गाजला व त्याला एवढी प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याकाळी गजानन वाटवेंचे भावगीत गायनाचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ लागले गजानन वाटवेंची भावगीतातील कारकीर्द म्हणजे भावगीतांचा सुवर्णकाळ होता. ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘चंद्रावरती दोन गुलाब’, ‘राधे तुझा सल अंबाडा’, ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’, ‘गेला दर्यापार घरधनी’, ‘आई तुझी आठवण येते’, ‘गर्जा जयजयकार’, ‘ती पाहा ती पाहा बापूजींची प्राणज्योती..’ अशा अनेक रचनांतून ‘वाटवे-युग’ निर्माण झाले, गाजले. अनेक नामवंत कवींच्या कविता त्यांनी अत्यंत आत्मीयतेने गायल्या. भावाविष्काराचा परमोच्च बिंदू ते साधत आणि त्याचमुळे अनेक वर्षे रसिकांच्या मनावर या साऱ्या गीतांचा पगडा होता. आपल्या कार्यक्रमात ते स्वत: लावलेल्या चालीच बहुधा ते म्हणत. त्यामुळे प्रत्यक्ष गाताना हवे ते बदल ते करून घेत. त्यामुळे त्यात ठराविकपणा येत नसे. प्रत्येक वेळी ते काव्य नवीनच वाटे.
लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी कधी लावण्या, नाटय़संगीत, सिनेसंगीत इतर काही प्रकार त्यांच्या कार्यक्रमात आणले नाहीत. द्वंद्वगीते नाहीत. साधेसुधे शब्द, साध्यासुलभ चाली यांचं जणू मनोमीलन त्यावेळच्या भावगीतात झालं आहे. दुधात साखर पडावी अशी भावगीतं पानफुटीसारखी जमून गेली आहेत की या भावगीतातील शब्दासाठी चाल जन्माला आली की चालीसाठी शब्द जन्माला आले, अशा गोड संभ्रमात भावगीतांचे रसिक पडतात, मनात घर करणारी व ओठावर रेंगाळणारी ही गोड गोड भावगीते महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ झाले. हा सांस्कृतिक ठेवा अवीट आहे. खरं तर या साध्या कविता होत्या, त्यांना गजानन वाटवेंनी सहज सुलभ चाली लावल्या. आश्चर्य म्हणजे गजानन वाटवे कवितेतील एकाही शब्दाचा बदल न करता त्यांना सुंदर चाली लावलेल्या आहेत. मात्र एक काळ गजानन वाटवे यांनी गाजवला होता, हे मात्र नक्की. कवी मनमोहन यांच्या ‘राधे तुझा सैल अंबाडा’ आणि राजा बडे लिखित ‘नका मारू खडा शिरी भरला घडा’ या गीतांनी पुण्या-मुंबईत खळबळ उडवून दिली. दोन्ही गीतं अश्लील असल्याचं शिक्कामोर्तब संस्कृतीरक्षकांनी केले होते. रेडिओने दोन्ही गाण्यांवर बॅन टाकला. त्याकाळच्या लोकप्रिय सिनेमातल्या गाण्यांच्या रेकॉर्डस्पेक्षाही अधिक विक्री या दोन प्रायव्हेट गाण्यांच्या रेकॉर्ड्सने केली. गजानन वाटवे यांच्या स्वरातलं भावदर्शन ही त्याकाळच्या तरुण पिढीची गरज होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून थेट साठच्या दशकातील सुरुवातीपर्यंत गजाननरावांच्या भावगीतांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. गांधी हत्येनंतर महंमद रफीचं‘सुनो सुनो ए दुनियावालों बापू की अमर कहानी’ ऐकून गजाननरावांनी कवी मनमोहन यांना गांधीजींच्या जीवनावर कविता लिहिण्याची विनंती केली. तुफान लोकप्रियता हे ‘गजानन वाटवे’ या नावासरशी जणू घट्ट चिकटलं होतं. गजानन वाटवे यांचे २ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गजानन वाटवे यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=pYqBj-cduu8
https://www.youtube.com/watch?v=u8LD6_Q4OKQ
https://www.youtube.com/watch?v=C316cQP3EYI
https://www.youtube.com/watch?v=Zdfh5gVMA60
https://www.youtube.com/watch?v=8EJxW0rNF7k
June 8, 2017
आपल्याला जरी त्या फक्त 'हेलन' म्हणून माहीत असल्या तरी त्यांचे पूर्ण नाव हेलन जयराग रिचर्डसन आहे व त्या जन्माने अॅग्लो बर्मीज. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ रोजी बर्मा मध्ये झाला. ती बॉलिवुड मध्ये त्यांच्या अनेक विवीध भुमिकांमुळे व विशेष करून नृत्याविष्कारामुळे 'हेलन' या भरपूर गाजल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३ मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. मुंबईत स्थायिक झाल्यावर हेलनच्या आई नर्स म्हणून काम करत असे पण मिळणार्या पगारात कुटुंब चालवणे कठिण झाल्याने त्यांच्या व स्वत:च्या चरितार्थासाठी हेलन यांनी शाळा सोडून देऊन नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्यांची एक कुटुंब स्नेही अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूड मधली एक अग्रगण्य नर्तिका म्हणून ओळखली जायच्या, त्यांच्या ओळखीने हेलन यांना अतिशय लहान वयातच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळाले.
हेलनचं अॅंग्लो व बर्मिस सौंदर्य हे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला मोठा अडथळा ठरले. त्या काळी आयटम नंबरसाठी ओळखल्या जाणा-या हेलन यांनी हावडा ब्रिज या सिनेमापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांचे सौंदर्य, शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या 'भारतीय नारी रोल'च्या विरूद्ध बऱ्याचदा 'हायलायटींग' म्हणून वापरले जायचे. त्यामुळे चंद्रशेखर ते अमिताभ बच्चन यांसारख्या 'लिडींग' हिरोंबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम करून सुद्धा हेलन यांना खरे नाव व प्रसिद्धी ही त्यांच्या अनेक 'व्हॅम्प' व 'निगेटिव्ह' रोल्सनीच दिली. हेलन या त्यांच्या काळात जबरदस्त प्रसिद्ध होत्या. रस्त्यावरून जाताना त्यांना कधीही उघड चेहऱ्याने बाहेर फिरता आले नाही. कायम काहीतरी मुखवटासदृश घालून वावरावे लागे. १९५८ च्या 'मेरा नाम चिं चिं चू' पासून ते १९७० च्या दशकातील 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' पर्यंत हेलन यांनी चित्रपटसृष्टीवर 'कॅब्रे क्विन' म्हणून अधिराज्य गाजवले.
१९७० च्या दशकात नवीन प्रवेश झालेल्या नट्यांनी शरिरप्रदर्शनाची तयारी दाखवली तेव्हा हेलन यांची प्रसिद्धी बरीच खालावली व त्या आर्थिक अडचणीतही सापडल्या. त्या वेळी त्यांना साथ लाभली ती प्रसिद्ध लेखक सलिम खान यांची. जावेद अख्तर यांच्या बरोबर लिहित असलेल्या २ चित्रपटात उदा. इमान धरम, डॉन यात त्यांनी हेलन यांना चांगली भूमिका देऊ केली. हेलनच्या गाजलेल्या सर्व गाण्यांच्या यशात गाणाऱ्या गायिकांचे ही महत्व तितकेच आहे. 'मेरा नाम चिं चिं चू' व इतर बरीच गाणी गीता दत्त यांनी, तर साठ च्या दशकात व सत्तर च्या दशकाच्या सुरवातीला आशा भोसले यांनी ही हेलनसाठी पार्श्वगायन केले. 'तिसरी मंझिल' चित्रपटातील 'ओ हसिना जुल्फोवाली जानेजहाँ...' हे गाणं 'रॉक अॅलन्ड रोल' या संगीत प्रकारावर आधारलेलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. या व्यतिरिक्त 'शोले' चित्रपटातलं "मेहबूबा मेहबूबा..." 'इन्तेकाम' मधलं "आ जानेजा...पुढे त्या सलिम खान यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. सलिम खान हे आधीपासून विवाहीत होते. आजचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा त्यांचा मुलगा. आजच्या आघाडीच्या अभिनेत्र्या सुद्धा अजूनही तिची गाजलेली गाणी व त्यावरचे डान्स हे इंटरनॅशनल स्टेज शोज मध्ये सादर करतात. हेलन यांच्या विग पासून ते हेवा वाटावा अश्या तिच्या वॉर्डरोबपर्यंत सर्व काही अत्यंत प्रभावी होतं आणि त्याचा प्रभाव आजही चित्रपटसृष्टीवर आणि तिच्या चाहत्यांवर आहे. भारत सरकारने मा.हेलन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 28, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti