(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर

    कार्व्हर चित्रकलेत आणि पियानो वाजवण्यात निष्णात होते. त्यांनी काढलेलं चित्र पॅरिसच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेलं आहे. जर त्यांनी ठरवलं असतं तर जगात सर्वश्रेष्ठ चित्रकार म्हणून प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवता आला असता. पण या मार्गाने समाजाचा आणि मुख्यतः आपल्या निग्रो बांधवांचा जीवनोद्धार करता येणार नाही म्हणून ‘ध्येय’ क्षेत्र निवडलं – शेती , केमर्जी आणि मायकोलोजी.

      January 5, 2022


  • ज्येष्ठ गायिका कांचन शहा

    ज्येष्ठ गायिका कांचन शहा

    ह्या जोडीने भारतातला हा गुजराथी लोकसंगीताचा प्रकार जगभर प्रसिद्ध केला, नुसताच प्रसिद्ध केला नाही तर डिस्को दांडिया ह्या संगीत प्रकाराचा जन्म किंवा उगम ह्या बाबला व कांचन ह्या जोडीने च केला.

      March 16, 2022


  • दिग्दर्शक संजय भाकरे

    संजय भाकरे यांनी अनेक नाटकातून साकारलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाची अनेक पदके त्यांना लाभली आहे. अघोर, ओली रे माती, मन उदास आदी चित्रपटातून त्यांनी भूमिकाही केल्या आहेत. संजय भाकरे यांचे स्वत:चे ‘संजय भाकरे फाउंडेशन’ असून संजय भाकरे फाऊंडेशन च्या माध्यमातून दर महिन्यात एकांकिका सादर करण्याचे व त्या माध्यमातून नवीन कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम व नाटकांच्यासाठी नवी पिढी तयार करण्याचे कार्य २०१४ पासून सुरू आहे.

      April 9, 2022


  • क्रिकेटपटू अजित वाडेकर

    अजित लक्ष्मण वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी मुबंईत झाला. मध्यमवर्गीय कुटूंबात असते तसे वातावरण त्यांच्या घरचे वातावरण होते. दादरला शिवाजी पार्कजवळ ते रहात असत. अजित वाडेकर यांचा स्वभाव लहानपणी थोडा अबोल आणि गंभीर होता. ते सदोदित वाचनात गर्क असायचे . जेम्स हॅडली चेस त्यांचा आवडता लेखक होता . त्यांना क्रिकेटमध्ये फारशी गोडी नव्हती . त्यांचे गणित चांगले होते , त्यांना इंजिनीअरिंगला जायचे होते. एस. एस. सी . ची परिक्षा ते उत्तमपणे ७९ टक्क्यांनी पास झाले होते. उत्तम गुण कां म्हणतो मी , कारण त्यावेळी गुणांची खिरापत वाटत नव्हते. त्यांचे शिक्षण दादरच्या बॉईज हायस्कूलमध्ये झाले. एस. एस. सी . नंतर त्यांनी एल्फीस्टन महाविद्यालयात शास्त्र विभागात प्रवेश घेतला , आणि इथेच अजित वाडेकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा प्रारंभ अचानक झाला. एक आंतर महाविद्यालयीन सामना होता त्यावेळी एक खेळाडू कमी पडला अजित वाडेकर त्यावेळी पहिल्या वर्गात शिकत होते. त्यांना खेळायचा आग्रह केला आणि ते तो सामना खेळले परंतु खेळण्यापेक्षा जो काही अडीच-तीन रुपयाचा अलाउन्सवर त्यांचा डोळा होता. त्यावेळी अडीच ते तीन रुपये उपहारासाठी देण्यात येत .

    दुसऱ्या वर्षी अजित वाडेकर यांनी कॉलेज बदलले आणि घराजवळ असलेल्या रुईया कॉलेजमध्ये जाऊ लागले , पुढे त्यांची कॉलेजच्या संघात आणि विद्यापीठाच्या संघात निवड झाली. विशेष महत्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी पहिल्याच आंतर विद्यापीठ सामन्यात दिल्ली विद्यापीठाविरुद्ध ३२३ धावा केल्या. हा त्यांचा विक्रमच होता पुढें हा विक्रम १९७० साली सुनिल गावस्कर यांनी मोडला. हा विक्रम केला त्याच वर्षी अजित वाडेकर यांनी शिवाजी पार्क जिमखान्यात आपले नाव नोंदवले आणि ते रणजी ट्रॉफी सामन्यात ते मुबई संघाकडून मद्रास संघाविरुद्ध खेळले .त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला १९५८-५९ साली सुरवात केली. त्यांची कसोटी सामन्यासाठी निवड होत नव्हती. माधव मंत्री आणि निवड समितीने त्यांना संधी द्यायचे ठरवले तेव्हा अजित वाडेकर यांनी त्या संधीचा भरपूर फायदा घेतला. पतौडीच्या जागी ते कप्तान झाले कारण अनेक वर्षे ते मुबईकडून कप्तानी करत होते. त्यावेळी भारतीय संघात सुनील गावस्कर , गुंडाप्पा विश्वनाथ , फारूख इंजिनीअर , सलीम दुराणी आणि जोडीला गोलनंदाजीतले ' त्रिदेव ' म्हणजे बिशनसिंग बेदी , प्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर हे होते आणि जोडीला वेंकट राघवन हें होते. १९७१-७२ चे वेस्ट इंडीज आणि इंग्लंड विरुद्ध आपण सिरीज पहिल्यांदा जिंकली. त्याचे शिल्पकार अजित वाडेकर आणि संपूर्ण संघ होता.

    अजित वाडेकर खऱ्या अर्थाने पहिले ' कॅप्टन कूल ' म्हणावे लागतील आपण आता धोनीला कॅप्टन कूल म्हणतो ते खरे नाही . पाहिले कॅप्टन कूल अजित वाडेकरच . अत्यंत अभ्यासू वृत्ती आणि अचूक निर्णयक्षमता त्यांनी दाखवली ती वेस्ट इंडिजच्या पहिल्या सामन्यात. पावसामुळे पहिला दिवस फुकट गेला होता . त्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. सामना चार दिवसाचा झाला होता. भारतीय संघाने १५८.४ षटकात ३८७ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजने ९३.५ षटकात २१७ धावा केल्या . म्हणजे १७० धावांचा लीड होता. तेव्हा अजित वाडेकर यांच्या लक्षात आले की सामना जर पाच दिवसाचा असेल तर फॉलोऑन साठी २०० धावा कमी लागतात . इथे तर १७० धावा होत्या परंतु चार दिवसाच्या सामन्यात नियमाप्रमाणे १५० धावा कमी असल्या तर फॉलोऑन देता येतो . हे त्यांच्या लक्षात आले . सर गॅरी सोबर्सला ' फॉलोऑन ' सांगण्यासाठी अजित वाडेकरांनी सुनील गावसकरांना सांगितले . सुनील गावसकर सांगतात मी त्यांच्या ड्रेसिंग रूममधला दरवाजा नॉक केला , आतमध्ये हसण्याचे आवाज येत होते जरा वेळाने दार उघडले आणि सुनील गावस्करानी सोबर्सला सांगितले तुम्हाला फॉलोऑन दिलेला आहे , कुणालाही हा नियम माहीत नव्हता . सगळीकडे शांतता पसरली. सुनील गावस्कर म्हणाले मी तांबडतोब निरोप देऊन तिथून सटकलो. त्यावेळी ' हे गॅरी , यू हॅव टू फॉलोऑन ' हे वाक्य फेमस झाले होते. तो सामना अनिर्णयीत सुटला . पुढला दुसरा सामना ओव्हलवर होता इथे मात्र वेस्ट इंडिजचा संघ सावधपणे खेळू लागला आणि इथेच घोळ झाला . वेस्ट इंडिजचा संघ २१४ धावात कोसळला. पुढील तीनही सामने अनिर्णयीत झाले आणि भारताने १-० ने ती मालिका जिंकली. इंग्लंडच्या विजयाबद्दल तर सर्वाना माहीत आहे तो ऐतिहासिक विजय ठरला . भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने . परंतु १९७४ साली सपाटून मार खावा लागला. शेवटी क्रिकेट हा ' वर्तमानकाळातील ' खेळ आहे . पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. तिथे सगळ्या फॅक्टस , निर्णय स्वीकारावे लागतात. अजित वाडेकर यांनी ३७ कसोटी सामन्यात २,११३ धावा केल्या त्यात त्यांचे एक शतक आणि १४ अर्धशतके होती , तर त्यांचे सर्वोच धावसंख्या हॊती १४३ . तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २३७ सामन्यात १५, ३८० धावा केल्या त्यात ३६ शतके आणि ८४ अर्धशतके होती, त्यात त्यांचे सर्वीच धावसंख्या होती ३२३ . त्यांनी कसोटी सामन्यात ४६ झेल पडले तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २७१ झेल पकडले . अजित वाडेकर अत्यंत चपळतेने क्षेत्ररक्षण करत . त्यांनी असे काही अप्रतिम झेल पकडले आहेत की त्यावेळी सामना भारताच्या बाजूला झुकला आहे. त्यांनी फक्त २ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत . त्यात त्यांची सर्वीच धावसंख्या होती नाबाद ६७. अजित वाडेकर १९९० साली भारतीय संघाचे मॅनेजर होते. त्याचप्रमाणे ते मुंबईमधील बँकेत मोठ्या हुद्यावर काम करत होते. '

    अजित वाडेकर यांना भारत सरकारने ' अर्जुन अवॉर्ड ' आणि ' पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्याचप्रमणे सी. के. नायडू लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला .

    15 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले.

    सतीश चाफेकर

      April 1, 2021


  • पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी

    १९९४ मध्ये इंद्रा नूई पेप्सिकोमध्ये सामील झाल्या त्यांना पेप्सिकोच्या दीर्घकालीन विकास धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते.

      October 28, 2021


  • ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते चंद्रशेखर

    आपल्या करीयर मध्ये त्यांनी ११० हून अधिक चित्रपटात अभिनय केला. १९९८ साली आलेल्या ‘रामायण’मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती. चंद्रशेखर व रामानंद सागर चांगले मित्र होते. त्यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी आर्य सुमंतची भूमिका स्वीकारली होती.

      June 16, 2022


  • मुक्ता बर्वे

    मुक्ता बर्वेचे वडील श्री वसंत बर्वे टेल्को कंपनीत नोकरी करत होते, तसेच आई विजया बर्वे या शिक्षिका तसेच नाट्यलेखिका होत्या. मोठा भाऊ देबू बर्वे कमर्शियल आर्टिस्ट आहे तसेच त्याने लहानपणी काही चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. तिचा जन्म १७ मे १९८१ रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे झाला. रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. मुक्तावर कलेचे संस्कार लहानपणापासून घरातूनच होत होते. मूळचा लाजाळू आणि बुजरा स्वभाव कमी व्हावा यासाठी मुक्ताच्या आई विजया बर्वे यांनी "रुसू नका फुगू नका" हे बालनाट्य लिहिले, यात भित्रा ससा आणि परी राणी अश्या दुहेरी भूमिका मुक्ताने साकारल्या. अश्या पद्धतीने वयाच्या चौथ्या वर्षी मुक्ताचे रंगभूमीवर पदार्पण झाले.

    दहावीच्या परीक्षेनंतर "घर तिघांचे हवे" या रत्ना्कर मतकरी लिखित नाटकात मुक्ताने भूमिका साकारली. या नंतर नाटकाविषयी ओढ निर्माण झाल्याने त्यात करियर करायचे ठरविले. इयत्ता ११ आणि १२ वी चे शिक्षण सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे येथे घेतले. यानंतर ललित कला केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नाट्य शास्त्र विषयात पदवी घेतली आणि सोबतच 'ड्रामा' या विषयातून तिने बॅचलर डिग्री सुद्धा मिळवली आहे. १९९९ मध्ये 'घडलंय बिघडलंय' या कार्यक्रमातून मुक्ताने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. तिचं पहिलं नाटक होतं 'आम्हाला वेगळं व्हायचंय' आणि तिचा पहीला चित्रपट होता २००२ मध्ये प्रदर्शित झालेला 'चकवा' त्यासाठी तिला पदार्पणातच पुरस्कार मिळाला.

    मुक्ता प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. थांग, सावर रे, माती माय, एक डाव धोबी पछाड, बदाम राणी गुलाम चोर, ऐका दाजीबा, हायवे, मंगलाष्टक वन्स मोअर, जोगवा, मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई -२, डबल सिट असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मुक्ताने दिले. मुक्ताने घर तिघांचं असावं, देहभान, फायनल ड्राफ्ट, छापा काटा, रंग नवा, इंदिरा इ. नाटकात काम केले आहे. तसेच पिंपळपान, बंधन, बुवा आले, चित्त चोर, आभाळमाया, अग्निशिखा, मधू इथे चंद्र तिथे या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे तिने केल्या आहेत. मुक्ता ने जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले.

    २०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती. मुक्ताने महाराष्ट्र स्टेट फिल्म अॅवार्डचे उत्कृष्ट पदार्पणासाठी एक, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून चार पुरस्कार जिंकले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 17, 2017


  • बॉडीबिल्डींगमधील सुवर्ण पदक !

    श्री संतोष भिवंदे या तरुणाचे बॉडीबिल्डींग मधील स्वप्न ऐन पन्नाशीत लखलखत्या सुवर्णपदकाने झाले हे श्री अनुप दळी यांच्या दिनांक १५ जानेवारी, २०१४च्या दैनिक ‘प्रत्यक्ष’ मधील राष्ट्रगंगेच्या तीरावरील सदरात एका स्पेशल लेखाद्वारे वाचण्यात आले. या नेत्रदीपक यशा बद्दल श्री संतोष भिवंदे यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील स्वप्नपूर्तीसाठी अनिरुद्ध शुभेच्छा..!! 

      January 22, 2014


  • चित्रकार रायबा

    रायबा यांची जुन्या मुबईचे चित्रण असलेली चित्रमालिका खूप लोकप्रिय झाली. त्यांनी कॅनवासच्या ऐवजी ज्यूट म्हणजे पोत्याचा वापर केला. त्यांनी काहीसे भडक रंग वापरून ती चित्रे रंगवली होती. त्यातून मुबईचे बहुरंगी स्वरूप प्रकट होत असे. ज्यूट आणि कॅनव्हासवर चित्रे काढता काढता त्यांनी म्युरल्स म्हणजे काचेवरील चित्रे काढायला सुरवात केली. त्यांची अनेक म्युरल्स एअर इंडिया , सिडनी विमातळावर , अशा अनेक ठिकाणी आहेत . इजिप्तच्या म्युझियममध्ये रायबांची चित्रे जशी पाहायला मिळतात तशी ती नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक संग्रहालयात आणि महाराष्ट्रात नागपूर येथेही आहेत.

      April 5, 2021


  • श्रीपाद रेडीओचे मालक व रेडीओचे संग्राहक श्रीपाद कुलकर्णी

    श्रीपाद कुलकर्णी १९७८ साला पासून रेडिओचे संग्रह करत आहेत. श्रीपाद कुलकर्णी यांनी १९७८ साली चिपळूण येथे नोकरीला असताना एका स्थानिक स्टोअरमधून विकत घेतलेला फिलिप्स रेडिओ सेट हा त्यांचा पहिला सेट. श्रीपाद कुलकर्णी यांच्या कडे ४० हून अधिक vintage रेडिओ सेट्स आहेत.

      February 28, 2024