(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतीय क्रिकेटपटू सी. एस. नायडू

    ते जेव्हा क्षेत्ररक्षण करण्यास येत असत तेव्हा ते निळी कॅप घालत असत परंतु ते गोलंदाजी करत असताना ते ती कॅप बदलून रंगीत टोपी घालत. फलंदाज म्हणून ते बिग हिटर होते , त्यांनी मारलेला उतुंग षटकार साईट स्क्रीनवर अनेकवेळा आदळत असे. मला आठवतंय त्यांना सुमारे २२ वर्षांपूर्वी मी पत्र लिहिले होते , त्यांचे उत्तर आले अर्थात ते पत्र त्यांच्या कुटूंबातील कोणीतरी लिहिले होते आणि पत्राखालील स्वाक्षरी मात्र त्यांची होती.

      April 18, 2021


  • ज्येष्ठ कथाकार सखा कलाल

    सखा कलाल मूळचे बेळगावचे. ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. ग्रामीण जीवनातल्या वेदना आणि दु:ख सखा कलाल यांनी आपल्या कथांमधून मांडलं आहे. त्यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांच्या तोंडचे संवाद परिणामकारक असतात. सखा कलाल हे कोल्हापूर भागातले प्रसिद्ध साहित्यिक आहेत. सखा कलालांनी आपल्या कथेतून माणसापुढे निर्माण होणाऱ्या अनेक गुंतागुंती मांडल्या. दुःखाची जटीलता माणसाचे सहजसुलभ जगणे कसे अवघड करते याविषयी विचार मांडला.

    ग्रामीण माणसाचे दुःख किती गहिरे असते हे त्यांची कथा वाचून समजते. त्यांच्या कथेत दुःखांनी घेरलेली माणसे येतात. गरिबीतून बाहेर पडता येत नाही, मृत्यूचे सावट सतत असते, अकाली वैधव्यामुळे संघर्ष निर्माण होतो आणि संकटांना टाळता येत नाही, अशा हवालदिल जीवनाचा उलगडा त्यांच्या कथा करतात. एकूणच दुःखांनी बांधून टाकणाऱ्या माणसांची अस्वस्थ करणारी कथा सखा कलाल लिहितात. त्यामधील संवाद हे वाचकांना चिंतनशील बनवतात. 'ढग' आणि 'सांज' हे दोन कथासंग्रह त्यांनी 'पार्टी'आधी प्रसिद्ध केले. त्यातल्या 'ढग'ला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार लाभला, तर 'सांज'ला ते ज्या विद्यापीठात शिकले, त्याच विद्यापीठात क्रामिक पुस्तकाचा दर्जाही मिळाला. कलालांचं लेखन त्याउप्परही सुरु होतंच.

    विविध नियतकालिकांतून कलालांनी लेख लिहिले. त्या लेखांचा संग्रह म्हणजे 'पार्टी'. हे फावल्या वेळचं लेखन नव्हे, हे स्पष्ट होतंच पण लेखकाची त्यामागची आंतरिक तळमळही जाणवत राहते. लेखनातला नितळ आत्मपर भाव आणि त्यांची घटना- प्रसंगांच्या निवेदनाची समर्थ शैली हळुवार बोचकारे घेत वास्तवाचं भान देत जाते, संस्कारांचं दर्शन घडवीत जाते आणि जगण्याचं वेगळं भान आणि अर्थ देऊन जाते. एक चांगला, विचारगर्भ लेखसंग्रह वाचल्याचा आनंद 'पार्टी' देत राहतो.

    सखा कलाल यांच्या ‘सांज’ या कथासंग्रहातील ‘नीती’ ही कथा वाचकांना अस्वस्थपणाचा अनुभव देते. समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचाही त्यांचा अभ्यास आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 2, 2019


  • कथाकार अच्युत बर्वे

    अच्युत बर्वे यांची अनुभवसृष्टी ही स्वतंत्र आणि स्वयंभू होती. त्यांची कथातंत्रावरची पकड असामान्य होते. त्यांचा मानवी स्वभावाचा अभ्यासही मनोवैज्ञानिकालाही नवीन वाटेल, असे होते.

      April 16, 2022


  • सुविख्यात नृत्यांगना सीतारादेवी

    नर्तिका म्ह्णून त्यांनी चित्रपटात कामे केली तसेच अभिनयातही त्या उत्तम असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिकाही साकारायला मिळाली. मोठमोठया कलाकारांचा सानिध्य त्यांना लाभले त्यामध्ये पं .रविशंकर , उस्ताद अल्लारखाँ , बडे गुलाम अली खाँ यांनी सीतारादेवी यांच्या नृत्याचे कौतुक केले.

      December 8, 2021


  • अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड विल्सन रेगन

    राजकारणात प्रवेश करण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होते.

      February 6, 2022


  • ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर

    सुहास भालेकरांनी कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली.

      March 5, 2017


  • सशक्त नायिकाप्रधान भुमिका करणाऱ्या माला सिन्हा

    ६० आणि ७० च्या दशकांत आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री माला सिन्हा यांचा आव्हानात्मक, वैविध्यपुर्ण व चाकोरीबाह्य भुमिका स्वीकारण्याकडे नेहमी कल होता. अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटात अभिनय करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रियकाराला नाकारुन एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करणार्‍या तरुणीच्या या भुमिकेसाठी आधी मधुबालाचे नांव गृहित धरण्यात येत होते. माला सिन्हाने या भुमिकेला योग्य तो न्याय दिला व हा चित्रपटच तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला.

      May 13, 2019


  • माणिक वर्मा

    जेष्ठ गायिका माणिक वर्मांचा जन्म १६ मे १९२६ रोजी झाला. त्यांची आज पुण्यतिथी, १० नोव्हेंबर.
    माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच, किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला...(गाणं -घन निळा लडीवाळा...) किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या कोंदणाने सजलेल्या गीतरामायणातील काही गाणी माणिक वर्मायांनीदेखिल गायलीयत. मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. या स्वर्गीय सुरांच्या साथीने संगीतालं एक सुरेल पर्व सुरू झालं. अखंड संगीताचा ध्यास घेतलेल्या माणिक वर्मा यांची संगीतिक कारकिर्दी फुलली ती घरातच. माणिक ताईंच्या आईने त्यांचं गाणं ख-या अर्थाने विकसित केलं आणि मग त्यांच्या आयुष्याचचं सुंदर गाणं झालं. तसंच अनेक संगीतदिग्गजांकडे संगीताचे धडे घेत आणि किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या कोंदणाने सजलेल्या गीतरामायणातील काही गाणी माणिक वर्मा यांनी देखिल गायलीयत माणिकबाईंचा विवाह अमर वर्मा यांच्याशी झाला. राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, चित्रपट-अभिनेत्री भारती आचरेकर व नाट्य-चित्रपट-दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेत्री वंदना गुप्ते या त्यांच्या कन्या होत. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी. रंगशारदा महोत्सव योजनेअंतर्गत १९९८ सालापासून तीन दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. माणिक वर्मा यांच्या स्वरांचा सन्मान पद्मश्री पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, यांसारख्या पुरस्कारांनी करण्यात आलाय. माणिक वर्मा यांनी आयुष्यभर सुरेल आराधना केली आणि त्यांचा हा स्वर अमृताहूनी गोड असाच होता, आहे आणि रसिकांच्या हृदयात चिरंतन राहिल. माणिक वर्मा यांचे १० नोव्हेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    माणिक वर्मा यांची काही गाणी
    घन निळा लडीवाळा
    शरदाचे चांदणे मधुवनी
    नका विचारु देव कसा
    अमृताहुनी गोड
    विजयपताका श्रीरामाची
    डोईवरी पाण्याचा ग माठ
    गोकुळीचा राजा माझा
    रंगले का घेऊनी

      November 10, 2016


  • भारतीय महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम

    घरचा विरोध असतानाही २००० साली १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचं बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पधेर्चं जेतेपद मिळवले; वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला.

      March 1, 2022


  • जेष्ठ कलाकार नयना आपटे

    त्यांची आई शांता आपटे यांची कडक शिस्त, व बाबुराव आपट्यांची करडी नजर या वातावरणात नयना आपटे लहानाच्या मोठ्या झाल्या.त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९५० रोजी झाला.लहानपणापासून अंगभूत कलागुणांना खतपाणी घालत त्यांची निगराणी करत, परिस्थितीशी जुळवून घेत नयना आपटे एक कलाकारी व्यक्तिमत्त्व घेऊन लोकांसमोर आल्या आणि रसिकमान्य झाल्या. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी आईकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. 'आयुष्यात कुठलाही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही,' हे तत्त्व आयुष्यभर अमलात आणलेल्या शांताताईंनी ते छोट्या नयनाच्याही मनात उतरवलं. शिक्षणाबरोबर गाण्याचा रियाज आणि शरीरसौष्ठव जपण्यासाठी पोहणे, बॅडमिंटन, नृत्य इ. क्षेत्रांत त्याना आवड होती. बॅडमिंटन कोर्ट, स्विमिंग पूल अशा सर्व सुखसोयींनी सज्ज असंच घर होतं. त्यामुळे बाहेरच्या जगाशी, वातावरणाशी नयनाचा फारसा संबंधच येत नसे. त्यामुळे मित्र-मैत्रिणीही नव्हत्या.

    नयना आपटे यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी मराठी नाटकातून कामं केली. पाचव्या वर्षी 'पुण्यप्रभाव' या नाटकात युवराजचं काम केलं. वयाच्या सातव्या वर्षांपासून सलग पाच वर्षं रोहिणी भाटे यांच्याकडे नयना कथकही शिकत असे. त्याच सुमारास सरस्वती बोडसांच्या 'झाशीची राणी' या चित्रपटात झाशीच्या राणीचा छोटा मुलगा दामोदर याचं काम तिने केलं. १९५८ साली 'रणजित स्टुडिओ'चे मालक नानूभाई मिस्त्री यांच्या 'चंडीपूजा' या हिंदी चित्रपटातली काम केले. निरुपा रॉय यांच्या या पहिल्या चित्रपटात छोट्या निरुपा रॉयचं काम मा.नयना आपटे यांनी केले होते. २४ फेब्रुवारी १९६४ ला मा.शांता आपट्यांचं दु:खद निधन झालं. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून शांताताईंच्या पाथिर्वाला अग्नी नयनानेच दिला. वय वर्ष होतं फक्त चौदा. अठरा वर्षं पूर्ण होईपर्यंत तिच्या मालकीचं काहीच होणार नव्हतं. त्यामुळे राहता बंगला, खूप मोठी मालमत्ता याची मालकीण असूनही बंगल्याला सील ठोकण्यात आलं. त्याही स्थितीत एस्.एस्.सी.ला ८४ टक्क्यांनी उत्तीर्ण होण्याची उत्कृष्ट कामगिरी तिने केली होती. आई गेल्यावर ती काही महिने पुण्याला जाऊन राहिली. पण स्वत:च्या पायांवर उभं राहाण्याची जिद्द, अभिनय, महाविद्यालयीन शिक्षण, शास्त्रीय संगीताच्या जोरावर त्या पुन्हा मुंबईत परत आल्या. अशातच १९६५ मध्ये दत्ता धर्माधिकारींच्या 'दैवे लागला चिंतामणी'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६७ साली 'अंमलदार' या मराठी नाटकात राजा गोसावींबरोबर नायिका रंगवल्यावर नयना आपटेंची पुढे १५ वर्षं राजा गोसावींबरोबर जोडी जमली. साठ विनोदी नाटकांतून या जोडीने कामं केली. या नाट्यप्रवासात त्यांना चित्तरंजन कोल्हटकर, शशिकांत निकते, अरविंद देशपांडे, दाजी भाटवडेकर, दामू केंकरे यांच्याकडून गद्य नाटकातील भूमिकांमधले बारकावे अभ्यासता आले. मा.नयना आपटे यांनी आजवर ६५ मराठी नाटकांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. गुजराथी नाटकांमधूनही त्यांच्या भूमिका खूप गाजल्या आहेत. 'मिली', 'चुपके चुपके' या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत. सहा गुजराथी चित्रपट, दूरदर्शनवरील हिंदी-मराठी मिळून १६ मालिका त्यांच्या नावांवर आहेत. एवढी कामगिरी बजावूनसुद्धा त्या कधीच थकल्या नाही. महाराष्ट्राची शान ठरलेल्या संगीत रंगभूमीसाठी कोणी नुसता आवाज दिला तरी मी माझी सर्व कामे बाजूला ठेवून तिच्या सेवेला हजर राहीन, असं म्हणणा-या नयना आपटेंचा उत्साह आजही केल्यानंतरही तितकाच अदम्य आहे. तरुणांनाही लाजवणारा आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 22, 2017