अनुताई ह्या स्वातंत्र्यानंतर ‘ सुराज्य ‘ निर्माण करण्याच्या ध्येयामुळे प्रेरित होऊन त्यांनी हुजूरपागा शाळेमधील नोकरी सोडली आणि कस्तुरबा ट्रस्टच्या आयोजित केलेल्या मुंबईमधील शिक्षक शिबीरात गेल्या तेथे त्यांची ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली .
September 10, 2021
भावुक डोळे, साधारण सौंदर्य व ओठांखाली असलेला तीळ, ठेंगणी मुर्ती असं व्यक्तीमत्व असलेल्या व आपल्या उत्साहाने भारलेल्या मा.बेबी नंदा यांनी अनेक दशकं चित्रपट सृष्टी गाजवली. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. बेबी नंदा या मराठी चित्रपट सृष्टीतले एकेकाळचे आघाडीचे दिग्दर्शक निर्माते असलेल्या मास्टर विनायक यांच्या कन्या. मा.बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. मास्टर विनायक यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यासाठी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम सुरू केले. १९५० सालाच्या आसपास आलेल्या ‘जग्गु’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. बालपण संपल्यानंतर त्यांनी बहिणीच्या वगैरे भूमिका केल्या. त्यांचा या पर्वातला त्यांचा पहिला चित्रपट होता ‘तुफान और दिया’. यात बहिण भावाच्या नात्याची एक विलक्षण कथा व्ही शांताराम यांनी मांडली होती. यातल्या बहिणीच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष बेबी नंदा यांच्याकडे गेले. त्या पाठोपाठ १९५७ साली आलेल्या ‘भाभी’ या चित्रपटामधली त्यांची भूमिकाही विशेष गाजली. या भूमिकेसाठी त्यांना पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. ‘काला बाजार’ या देवआनंद यांच्या चित्रपटातली त्यांची भूमिकाही अशीच गाजली होती. त्या पाठोपाठ आलेल्या ‘धूल का फुल’ या चित्रपटातही त्यांनी एक लहान भूमिका केली होती. नायिका म्हणून बेबी नंदा यांचा पहिला चित्रपट होता तो एल व्ही प्रसाद यांचा ‘छोटी बहन’. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून लगेच प्रस्थापित केले. त्याच वर्षी ‘हम दोनो’ या चित्रपटात त्यांनी देव आनंद यांच्या पत्नीची भूमिका केली. ‘अल्ला तेरो नाम..’ या गाण्याच्या वेळचा तिचा अभिनय आजही अनेकांना आठवत असेल. १९६० साली आलेल्या ‘आचल’ या चित्रपटासाठी बेबी नंदा यांना पहिल्यांदाच फिल्मफेअरचा सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे नामांकन मिळाले होते. बेबी नंदा यांनी अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले असले तरी शशी कपूर बरोबरची त्यांची जोडी विशेष गाजली. ‘चार दिवारी’ व ‘मेंहदी लगी मेरे हाथ’ या त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफीसवर चांगलेच यश मिळाले. त्य़ांच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी स्विकारलेले नसले तरी १९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’ या चित्रपटाने या जोडीला मोठं यश मिळवून दिलं. बेबी नंदा यांची काश्मिरी वेषातली छबी अनेक रसिकांच्या मनात घर करुन गेली. या सिनेमातली सगळी गाणी गाजली असली तरी ‘ये समा..’ या गाण्यातला त्य़ांचा अभिनय विशेष गाजला. याच वर्षी आलेल्या ‘गुमनाम’ या चित्रपटातला बेबी नंदा यांचा अभिनयही विशेष गाजला. ‘इत्तेफाक’ या कोणतेही गाणे नसलेल्या चित्रपटातली राजेश खन्ना बरोबरची त्यांची भूमिकाही चांगलीच गाजली. मनोज कुमार यांचा ‘शोर’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून ‘छलिया’, ‘नया नशा’ अशा काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. या चित्रपटांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी नायिका म्हणून काम करणे थांबवले. ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटात पद्ममिनी कोल्हापुरे च्या आईच्या भूमिकेत त्यांनी चरित्रभूमिकांद्वारे पुनरागमन केले. ‘मजदूर’ व ‘प्रेमरोग’ या चित्रपटातल्या भूमिकांनंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. १९९२ साली दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याशी नंदा यांचा साखरपुडा झाला. मात्र, त्यानंतर मनमोहन देसाई यांचे अपघाती निधन झाले. नंदा आयुष्यभर अविवाहितच राहिल्या. नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 27, 2017
ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी धुळे येथे झाला. .
तवडील आणि गायकनट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर चंद्रकांत कामत यांनी बालनट म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नाटक कंपनीच्या दौऱ्यांमध्येच त्यांनी तबलावादकांकडून तबल्याचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली.
१९५५ मध्ये आकाशवाणीमध्ये त्यांनी परीक्षा दिली आणि १९५६ पासून ते १९९१ अशी तब्बल पस्तीस वर्षे त्यांनी आकाशवाणीत तबलावादक म्हणून काम केले. आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केलेच; पण त्याचप्रमाणे कला जगतात मानाच्या असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये त्यांनी १९५४ पासून साथसंगत करण्यास सुरूवात केली आणि प्रदीर्घ काळ ती सुरू होती.
शास्त्रीय गायनापासून ते नृत्यापर्यंतच्या आणि संगीत नाटकांपासून ते अभंगवाणीतील ‘इंद्रायणी काठी’ सारख्या रचनेपर्यंतच्या अनेकविध कलाप्रकारांना समर्थपणे साथ देणारे ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा तबल्यावरील त्यांच्या विलक्षण हुकमतीमुळे कामत यांचा उल्लेख ‘अनुभवसिद्ध लययात्री’ असा करण्यात येत असे.
सवाई गंधर्व संगीत महोत्सव, सुधीर फडके यांचे ‘गीतरामायण’, गजानन वाटवे, बबनराव नावडीकर यांची भावगीते, सुलोचना चव्हाण यांची लावणी, बेगम अख्तर-गिरीजादेवी यांची ठुमरी अशा विविध कार्यक्रमांमध्ये चंद्रकांत कामत यांची संगत विशेष रंगत आणीत असे. प्रत्येक कार्यक्रमाचा बाज आणि शैली लीलया पेलून ते तो कार्यक्रम जिवंत करीत. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले. भारतातील अनेक मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी मा.कामत यांना मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘स्व. वसुंधरा पंडित पुरस्कार’ तर मिळाले, व पुणे महापालिकेकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला.
चंद्रकांत कामत यांचे दोन्ही चिरंजीव भरत कामत आणि सुभाष कामत हे तबलावादनाचा वारसा सांभाळतात.
चंद्रकांत कामत यांचे निधन २८ जून २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
July 11, 2017
‘लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायनने लिटिल चॅम्प या कार्यक्रमात आपल्या आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः मोहून टाकले होते. या कार्यक्रमात मुग्धा सर्वात तरुण सदस्य होती आणि सर्वांनी त्याला ‘लिटल मॉनिटर’ म्हणून संबोधले होते.
April 5, 2022
आपल्या अभिनयाने व डान्सने सगळ्यानांच भारावून टाकणारा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता हृतिक रोशन याचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी झाला.
हृतिक रोशनच्या वाटचालीचा विचार करायचा झाला तर, वडील राकेश रोशन यांच्याकडून मिळालेला अभिनयाचा वारसा घेऊन आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात हृतिक यशस्वी ठरला. ‘कहो ना प्यार है’ या पहिल्याच चित्रपटात आपले नाणे खणखणीत असल्याचे त्याने सिद्ध केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘फिजा’, ‘मिशन काश्मीर’, ‘कोई मिल गया’ या चित्रपटानंतर तो प्रस्थापित नायक बनला. ‘कहो ना प्यार है’ हा पहिला चित्रपट सुपर-डुपर हिट ठरल्यानंतर तो त्याची मैत्रीण सुझान हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. विवाहापूर्वी सुझानशी त्याची मैत्री होती. त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या १२ वर्षापासून त्यांचा संसार सुखाने सुरू होता. त्यांना रेहान व रिधान ही दोन मुले आहेत. विवाहसंस्थेचा पूर्णपणे सन्मान ठेवून हृतिकने अत्यंत जड अंत:करणाने पत्नीशी विभक्त झाला. हृतिक हा बॉलिवुडमधील सुजाण व विचारी अभिनेता म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रातील बहुतेक मंडळी केवळ फॅशनेबल कपडे आणि इतर प्रकारचे बडेजाव करत फिरत असताना हृतिक मात्र पुस्तकात रमतो. प्रत्येक भूमिकेचा तपशीलवार अभ्यास आणि ती परिपूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतो. याच हृतिकने आपल्या खासगी जीवनात बाब उघड करताना सभ्य व सुजाणपणाचे दर्शन घडवले. पडद्यावरील आदर्श सुपरमॅनप्रमाणेच खासगी आयुष्यात त्याने आपले सभ्यपण जपले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 11, 2017
कसोटीत तीनशेहून अधिक विकेट आणि चार हजारहून अधिक धावा करणाऱ्या भारताचा महान अष्टपैलू कपिलदेव आणि इंग्लंडचा इयन बोथम यांच्या पंक्तीत व्हेटोरीने स्थान मिळवलेय. त्यानं ६ शतके आणि २३ अर्धशतके ठोकलीत. ३४ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये व्हेटोरीने ३८ विकेट घेतल्यात. कर्णधार म्हणूनही डॅनियल व्हेटोरी यशस्वी ठरलाय.
January 27, 2022
‘थिएटर अॅककॅडमी’ सारख्या संस्थेची नाटकं आणि काही चित्रपट-टीव्ही मालिकांत छोटया भूमिकांत दिसणारे परेश मोकाशी ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ या नाटकामुळे ख-या अर्थाने प्रकाशात आले ते लेखक- दिग्दर्शक म्हणून. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते. पुण्यात ‘केसरी’, ‘ब्लिट्झ’ वगैरेमध्ये ते काम करायचे. मोकाशी यांनी सातवीत असताना पहिलं नाटक केलं आणि तेही हिंदी, ‘नही नही कभी नही’. पुढील शिक्षण मॉडर्न कॉलेजमध्ये पुण्यात. कॉलेजमध्ये असतानाचा ‘थिएटर अॅहकॅडमी’ मध्ये जाण्यास मोकाशी यांनी सुरवात केली. त्याचा मोकाशी यांना खूप उपयोग झालाय. परेश मोकाशी एका मुलाखतीत म्हणतात, थिएटर अॅतकॅडमीने खरोखरंच माझा मेंदू उघडला. तोपर्यंत हिंदी-इंग्रजी चित्रपट किंवा जी काही व्यावसायिक नाटकं उपलब्ध असतात, तेवढयापुरतंच तुमचं विश्व मर्यादित असतं. थिएटर अॅहकॅडमीमुळे पहिल्यांदा माझी जागतिक रंगभूमी, जागतिक नाटक, जागतिक सिनेमा यांच्याशी ओळख झाली. तो एक नवा नाद लागला. मग वेगळ्या प्रकारचं साहित्य, संगीत अशा सगळ्या गोष्टींनी संपुक्त असलेली ती संस्था होती. जब्बार पटेल नाटक बसवताहेत, मोहन आगाशे काम करताहेत, सतीश आळेकर अफलातून नाटक लिहिताहेत, समर नखाते, माधवी पुरंदरे यांच्यासारखे तज्ज्ञ आहेत, संस्थेमध्ये ‘घाशीराम कोतवाल’सारखं नाटक होतंय, ‘महानिर्वाण’सारखं होतंय, ‘बेगम बर्वे’सारखं होतंय.. हे म्हणजे अलिबाबाची गुहाच. सगळं फॅण्टॅस्टिक असायचं. तिथे आल्यावर पहिल्यांदा मी गंभीरपणे मी या क्षेत्राचा विचार केला असावा, असं मला वाटतं. याचं सगळं श्रेय थिएटर अॅदकॅडमीचं. २००१ मध्ये ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ हे नाटक केले. त्यानंतर ‘लग्नकल्लोळ’, ‘मेकअप’, ‘मंगळावरचे मुंडके’, ‘समुद्र’ अशी व्यावसायिक-प्रायोगिक नाटकं करता करता त्याने थेट ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचललं. या पहिल्याच चित्रपटाने त्याला ऑस्करच्या दारापर्यंत नेलं.
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाबद्दल बोलताना परेश मोकाशी सांगतात. ‘समुद्र’ झाल्यावर एके दिवशी बापू वाटवेंनी लिहिलेलं दादासाहेब फाळके यांचं चरित्र माझ्या वाचनात आलं. त्यानंतर माझ्या डोक्यावर वीज कोसळावी असं झालं. मग ठरवलं की, ही अफलातून कथा आहे. ही आपल्याला कशी काय ठाऊक नव्हती? यावर अजून काहीच कसं झालेलं नाही? त्यानंतर पंधरा दिवसांत माझी स्क्रिप्ट लिहून झाली. माझी सगळ्यात वेगवान लिहून झालेली कलाकृती म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. मी लिहायला लागलो आणि एक-दोन प्रसंग लिहिल्यावरच माझ्या लक्षात आलं की, ही माझ्या नेहमीच्या नाटकाच्या फॉर्ममधलं नाही. याचा चित्रपट करावा लागेल. मी जाणीवपूर्वक थोडंसं चित्रपटाच्या दृष्टीने काय करावं लागेल, ते डोक्यात ठेवून लिहायला लागलो. त्या दृष्टीने प्रसंग रचायला लागलो. २००५ मध्ये संहिता तयार झाली आणि पुढची तीन वर्ष मला चित्रपटासाठी पैसे मिळाले नाहीत. आम्ही सगळे कॉन्टॅक्टस वापरले, पण अशा प्रकारचा सिनेमा कसा करायचा, असं सगळ्यांना वाटत होतं. त्यात कुणी स्टार असणार नाही, त्यात गाणं असणार नाही अशा माझ्या काही अटी होत्याच. तसंच ती साधी सिंपल गोष्ट असणार. साधारणपणे पडद्यावर ज्या प्रमाणे चरित्र दाखवण्याची लार्जर दॅन लाइफ, देवत्व दिल्यासारखं चित्रित करण्याची पद्धत आहे, तसा हा चित्रपट नसणार होता. फाळके हे एक साधे माणूस कसे होते आणि तरीही त्यांच्या हातून हे मोठं काम कसं झालं, याची ही कहाणी असणार होती. मुळातच मला चरित्र सांगायचं नव्हतं तर फाळके यांनी पहिला चित्रपट कसा केला त्याची ही गोष्ट होती. हे माझे निर्णय महत्त्वाचे ठरले. मला कुणीतरी सुचवलं होतं की, हा चित्रपट हिंदीत करू या. कारण हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. पण मी मराठीत कम्फर्टेबल आहे. मुळात फाळके मराठी होते. त्यामुळे ते मराठीत जास्त चांगल्या प्रकारे येईल, असं माझं म्हणणं होतं. या सगळ्या अटी असल्याने हा चित्रपट काढायला कुणी धजावेना. मग अखेर मी निर्णय घेतला की, आता आपणच धाडस करूया. वडील आणि काकाही मागे उभे राहिले. मग आम्ही पैसे उभे केले आणि २००८ मध्ये शूटिंग सुरू केलं. सहा महिन्यांत आमच्या हातात सेन्सॉरचं सर्टिफिकेट होतं, इतक्या झपाटयाने आम्ही काम केलं. साधी-सोपी तरीही वैचित्र्यपूर्ण हाताळणी ही शैली बनलेल्या परेश यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 8, 2017
गाईड, प्यासा, चौदहवीं का चाँद, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी वहिदा रेहमान यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३६ रोजी तामिळनाडूतील चेंगलपेट येथे झाला. वहिदा रेहमान यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र नशीबाने त्या बॉलिवूडमध्ये आल्या. वहीदा रहमान यांनी आपल्या बहिणीसोबत भरतनाट्यमचे धडे गुरु त्रीचुंबर मिनाक्षी सुंदरम पिल्लई आणि मुंबई येथे गुरु जयलक्ष्मी अल्वा यांच्या कडून घेतले होते. वाहिदांनी आपल्या करिअरची सुरुवात १९५५ मध्ये ‘राजूला मरायी’ या तेलगु चित्रपटापासून केली व या चित्रपटात त्यांना यशही मिळाले. त्यांनी आपली कारकीर्द तामीळ आणि तेलुगू सिनेमांपासून सुरू केली असली तरी त्यांच्या हिंदी सिनेमांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या. त्यांना त्यांच्या करिअरमधला मोठा ब्रेक 'सीआयडी' सिनेमात खलनायिकेच्या रुपात मिळाला. तामिळ सिनेमातील वहिदा यांचा जबरदस्त अभिनय बघून गुरुदत्त भारावले होते. अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या वहिदा यांना कमी वयामुळे चित्रपटाच्या करारावर सहीदेखील करण्यास कायद्याने मुभा नव्हती. परंतु, गुरूदत्त यांच्या नाव बदलण्याच्या सल्याला त्यांनी खंबिरपणे नकार दिला. त्यावेळी आपण खूप जिद्दी असल्याचे सांगत, या प्रसंगाची आठवण कथन करताना वहिदा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, दिलीप कुमार आणि अन्य कलाकारांचे उदाहरण देत चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी मला नावात बदलण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, मी खंबिरपणे यास नकार दिला. त्यांच्या मते माझे भले मोठे नाव न भावणारे होते. यामुळे स्वत्वाला ठेच पोहोचल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. वहिदाने नाव बदलण्यास सरळ सरळ नकार दिल्याने सीआयडी चित्रपटासाठी तिची निवड करण्यासाठी गुरूदत्त आणि राज खोसला यांना तीन दिवस लागले. वहीदा ह्या गुरुदत्त यांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत होत्या. हे दोघे आपल्या खासगी आयुष्यातही जवळ आले होते. 'प्यासा' या सिनेमानंतर रिलीज झालेला 'कागज के फूल' हा सिनेमा या दोघांच्या प्रेमावरच आधारित असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर या दोघांनी 'चौदहवीं का चाँद' आणि 'साहिब बीबी और गुलाम' या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. गुरुदत्त आणि वहीदा रहमान ही जोडी भारतीय सिनेमातील ऑन स्क्रिनवरील सर्वोत्कृष्ट जोड्यांपैकी एक होती. गुरुदत्त आणि वहीदा रहमान यांचे प्रेम उमलण्याआधीच कोमेजले. १० ऑक्टोबर १९६४ रोजी गुरुदत्त यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे वहीदा रहमान कोलमडून गेल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःला सावरत १९६५ साली 'गाईड' सिनेमात काम केले. हा सिनेमा तुफान गाजला होता. या सिनेमाला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. 'गाईड'नंतर १९६८ मध्ये रिलीज झालेल्या 'नीलकमल' या सिनेमाने वहीदा यांना यशोशिखरावर पोहोचवले. १९७४ साली त्यांनी अभिनेता कमलजीतबरोबर लग्न करुन आपला संसार थाटला. लग्नानंतर वहीदा बंगळूरूमध्ये स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुले आहेत. अनेक वर्षे सिनेमांमधून ब्रेक घेतल्यानंतर १९९१ साली 'लम्हे' या सिनेमाद्वारे त्या मोठ्या पडद्यावर परतल्या. २००० साली पतीच्या निधनामुळे त्यांना मोठा झटका बसला होता. मात्र पुन्हा एकदा स्वतःला सावरत त्यांनी 'दिल्ली 6' आणि 'रंग दे बसंती' या सिनेमांमध्ये काम केले. ‘गाइड’ आणि ‘साहेब बीबी और गुलाम’ या चित्रपटांतील सुंदर अभिनयामुळे नावाजलेल्या मा.वहीदा रहमान यांना भारत सरकारने १९७२ साली पद्मश्री आणि २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आले. वहीदा रहमान यांना गाईड व नील कमल या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार व रेशमा और शेरा या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपिडीया / इंटरनेट
वहीदा रहमान यांचे गाजलेले काही हिंदी सिनेमे.
साहब बीबी और गुलाम, कागज के फूल, कूली, गाईड, चौदहवी का चाँद, तीसरी कसम, नीलकमल, प्यासा, रेशमा और शेरा, सी.आय.डी., सोलवाँ साल, दिल्ली 6, रंग दे बसंती.
February 3, 2017
शंकर जयकिशन या संगीतकारातील जोडीतील जयकिशन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल. हा सुरांचा जादुगार! दुसरा शब्द नाही. जयकिशन लहानपणापासूनच ते हार्मोनियमवर गाणी वाजवत. सुप्रसिद्ध गुजराती दिग्दर्शक चंद्रवदन भट्ट यांच्याकडे संधीसाठी चकरा मारत असतानाच त्यांची गाठ मा.शंकर (शंकरसिंह रघुवंशी) या आणखी एका होतकरू संगीतकाराशी पडली. मा.शंकरही संधीच्या शोधात फिरत होते. जयकिशन त्या काळी पृथ्वी थिएटरसाठीसुद्धा काम करत. त्यामुळे पृथ्वीराज कपूर यांच्याशी ओळख झाली.
शंकर यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्या ला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते. दुसर्यात चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या.शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला. त्याचे नाव राज कपुर. पृथ्वी थिएटर ची निर्मिती "बरसात" या चित्रपटासाठी राज कपूर हे संगीतकार म्हणून नवीन जोडीच्या शोधात होते त्यांनी शंकर आणि जयकिशन यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. आणि १९४८ साली प्रदर्शित झालेल्या "बरसात" ची गाणी सुपरहिट झाली आणि इथून पुढे शैलेंद्र, हसरत जयपुरी, लता मंगेशकर, मुकेश आणि शंकर - जयकिशन यांनी भारतीय संगीत क्षेत्रात एक इतिहास घडवला. हे दोघेही काही काळ त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल- भगतराम यांच्या हाताखाली सहायक म्हणून काम करत होते. शंकर - जयकिशन या जोडीने जवळजवळ १७० हून जास्त चित्रपटांना संगीतसाज चढवला. ज्यामध्ये विशेष संगीतामुळे गाजलेले बादल, सीमा, बसंत बहार, चोरी - चोरी, कठपुतली, यहुदी, अनाडी, छोटी बहन, दिल अपना और प्रीत पराई, जिस देश मे गंगा बहती है, जंगली, प्रोफेसर, दिल अपना और प्रीत पराई, हमराही, राजकुमार, आम्रपाली, सुरज, तिसरी कसम, मेरा नाम जोकर, असली नकली इत्यादी चित्रपटाचा समावेश होतो. त्यांना चोरी - चोरी , अनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सुरज, ब्रम्हचारी, मेरा नाम जोकर, पहचान, आणि बेईमान या चित्रपटासाठी एकूण नऊ वेळा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफ़ेअर पुरस्कार मिळाला आहे. शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो व मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो. 'शंकर-जयकिशन' यांनी गोपनीयता म्हणून कुठल्याही गीताची चाल वैयक्तिक कुणी बांधली ते कुणालाही सांगायचे नाही असा एक अलिखित नियम पाळला होता. मात्र संगम चित्रपटातील एक गीत "ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज न होना!" हे बिनाका गीतमाला या नभोवाणीवरील एका कार्यक्रमामध्ये खूप दिवस प्रथम क्रमांकावर वाजू लागले आणि जयकिशन यांनी हे गीत मी रचले असे सांगून तो नियम मोडला. मो. रफी आणि राज कपूर यांनी त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण केला. गोरापान चेहरा, गोबरे गाल व कपाळावर रुळणाऱ्या रेशमी काळ्याभोर बटा - एखाद्या हिरोला लाभावे असे व्यक्तिमत्व. पण टेबलवरील हार्मोनियमवर बोटे फिरू लागली की, त्यातून स्वर्गीय गोडीचे सुर पाझरू लागत. संगीतकार जयकिशन यांचे हेच तर वैशिष्ट्य होते. 'शंकर-जयकिशन' या संगीतकार जोडीतील संगीतकार ... संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंतरही १६ वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
January 3, 2017
कोकणातील मुरूड या छोट्याशा खेडेगावात 18 एप्रिल 1858 ला त्यांचा जन्म झाला. ते एकविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. सत्ताविसाव्या वर्षी गणित विषय घेऊन पदवीधर झाले. तर एकतिसाव्यावर्षी प्राध्यापक झाले. अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली ती समाजसेवेची, समाजसुधारणेची. अण्णा सुधारक होते पण फक्त शाब्दिक सुधारणा नव्हती तर ते क्रियाशील सुधारक होते. पुण्याच्या फर्ग्यसन महाविद्यालयात ते 22 वर्षे प्राध्यापक होते. त्यावेळेस 1899 साली त्यांनी `अनाथ बालिकाश्रम’ काढला
August 8, 2009
Copyright © 2025 | Marathisrushti