लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी सतत सत्तावीस वषे एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेलेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते.
October 14, 2021
ज्यांच्या बॉर्न फ्री पुस्तकावर चित्रपट निघाला अशा वन्यजीव लेखीका जॉय अॅडम्सन यांचा जन्म २० जानेवारी १९१० रोजी ऑस्ट्रियामध्ये रोजी झाला. जॉय अॅडम्सन या आपल्या एल्सा सिंहिणीवरच्या पुस्तकामुळे सर्व निसर्गप्रेमी आणि जंगलप्रेमी मंडळींमध्ये विशेष प्रसिद्ध असणारी लेखिका. जॉर्ज अॅडम्सन या वन्यरक्षकाशी लग्न करून त्या केनियामध्ये स्थायिक झाल्या.
एकदा जॉर्ज अॅडम्सन यांनी स्वसंरक्षणार्थ मारलेल्या सिंहिणीचे तीन छावे त्यांना मिळाले. त्यातले दोन प्राणिसंग्रहालयाला देऊन एक तिने आपल्याजवळ ठेवला आणि तिचं नाव ‘एल्सा’ ठेवलं आणि तिला अगदी आपल्या घरातच वाढवलं. पुढे तिची पूर्ण वाढ होऊन एल्सालाही छावे झाल्यावर ती त्यांना भेटत राहिली. त्या सर्व अनुभवांवर जॉय अॅडम्सनने तीन पुस्तकं लिहिली ‘बॉर्न फ्री’, ‘लिव्हिंग फ्री’ आणि ‘फॉरेव्हर फ्री.’
बॉर्न फ्रीची कथा आहे एल्सा सिंहिण आणि तिचे पालक जॉय आणि जॉर्ज अॅीडम्सन या जोडप्याची. केनियाच्या जंगलात जंगलरक्षक असलेल्या जॉर्जने एकदा त्याच्या अंगावर चालून आलेल्या सिंहांवर स्वसंरक्षणार्थ रायफल चालवली आणि सिंह-सिंहीण ठार झाल्यावर त्याला दिसले ते या जोडीचे तीन छावे. या पिल्लांच्याच संरक्षणासाठी सिंह जॉर्जवर चालून गेले होते.
मग या तीन छाव्यांना जॉय आणि जॉर्जने वाढवले. त्यातलीच एक एल्सा. तिला आणि तिच्या भावंडांना वाढवताना आलेल्या अनुभवांवर अॅजडम्सनने बॉर्न फ्री हे अनुभवकथनपर पुस्तक लिहिलं आणि पुढे दिग्दर्शक जेम्स एच. हिल्स याने या जोडप्याच्या विलक्षण अनुभवांवर याच नावाचा सुंदर चित्रपट काढला.
एल्सा आणि तिची दोन भावंडं अॅअडम्सनच्या घरातच लहानाचे मोठे होतात. त्यापैकी दोघांची रवानगी रॉटरडॅमच्या प्राणीसंग्रहालयात केली जाते. पण एल्सा त्यांच्याबरोबरच राहत असते. दररोज धमाल मस्ती, जॉर्ज वा जॉयबरोबर भटकंती ही तिची दिनचर्या. पण तिचा खेळकरपणा इतरांना महाग पडत असतो.
एकदा ती हत्तींच्या कळपाच्या पाठी लागल्याने बिथरलेले हत्ती तिथल्याच एका गावात शिरतात, वस्तीची पार वाताहात करतात. या नासधुशीला कारणीभूत ठरलेल्या मस्तीखोर एल्साला आता एकतर जंगलात सोडायचे नाहीतर प्राणीसंग्रहालयात पाठवायचे अशी वेळ ओढवते. त्यावेळी जॉय मनसोक्त बागडणा-या, स्वच्छंद एल्साला जंगलात सोडायचा निर्धार करते.
पण, अॅतडम्सन कुटुंबात एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे वाढलेल्या एल्साला जंगलचा कायदा, शिकारीच्या त – हा कोण शिकवणार? वन्य प्राण्यांना आत्मसंरक्षणाचे, शिकारीचे बाळकडू त्यांच्या आईकडून मिळत असते. एल्सा तर पोरकी असते. शेवटी जॉयचं तिला प्रशिक्षण देते, शिकार कशी करायची ते शिकवते, जंगलातील वास्तव्यासाठी तयार करते. एल्साची जंगलात पाठवणी करून जॉय आणि जॉर्ज तिचा जड अंतकरणाने निरोप घेतात.
एल्सा जंगलात टिकाव धरेल का, इतर सिंह तिला स्वीकारतील का अशा अनेक प्रश्नांचं काहूर त्यांच्या मनात उठलेलं असतं. पण वर्षभरानं लंडनहून परतलेल्या या दोघांना एल्सा पुन्हा भेटते, ओळखते. मधल्या काळात एल्साचं जंगलाशी आणि तिथल्या सिंहांशीही नातं जुळलेलं असतं. तिच्याबरोबर तिचे तीन छावेही असतात.. या सगळ्या अनुभवांवरील पुस्तक म्हणजे बॉर्न फ्री.
ही तिन्ही पुस्तकं जगभर तुफान गाजली आणि त्यावर सिनेमे निघाले. पुढे त्यांनी चित्त्याचं ‘पिप्पा’ नावाचं एक पिल्लूही पाळलं आणि त्या पिप्पाच्या जीवनावर ‘दी स्पॉटेड स्फिंक्स’ हे पुस्तक लिहिलं. तेही लोकप्रिय झालं. बिबट्यांसंबंधी त्यांनी लिहिलेलं ‘क्वीन ऑफ शेबा’ हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. ‘दी सर्चिंग स्पिरीट’ हे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा गाजलं होतं. ३ जानेवारी १९८० रोजी एका माथेफिरूने भोसकून जॉय अॅडम्सन यांची हत्या केली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 20, 2019
आज ९ ऑक्टोबर
आज संगीतकार रवींद्र जैन यांची पुण्यतिथी
जन्म:- २८ फेब्रुवारी १९४४
भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार मा.रवींद्र जैन यांची खासियत होती. अभिनेता राज कपूर यांनी रवींद्र जैन यांना खूपच मदत केली. ‘राम तेरी गंगा मैली’, ‘दो जासूस’, ‘हिना’ अशा राज कपूरच्या चित्रपटांना जैन यांनी संगीत दिले. राजश्री प्रॉडक्शन आणि रवींद्र जैन यांचे एक समीकरण बनले होते. याशिवाय, सुजाता, सुखम सुखकरम, आकाशा थिंटे निरम अशा प्रादेशिक चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. हिंदी चित्रपटांमध्ये जम बसत असताना रवींद्र जैन यांनी एक वेगळा प्रयोग करत धार्मिक चित्रपट आणि मालिकांच्या गीतांना संगीत देण्यास सुरुवात केली. ‘वनरात्री’, ‘गोपाल कृष्ण’, ‘जय करोली माँ’, ‘हर हर गंगे’ अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. रामायण, श्रीकृष्ण, साईबाबा, श्री ब्रह्मा विष्णू महेश, द्वारकाधीश, जय गंगा मैय्या, वीर योद्धा पृथ्वीराज चौहान अशा मालिकांना त्यांनी संगीत दिले आणि मालिकांची गीतेही बरीच गाजली. दाक्षिणात्य गायक येसुदासला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक देण्याचे संपूर्ण श्रेय रवींद्र जैन यांना जाते. ओ गोरिया रे, बीती हुअी रात की, गोरी तेरा गाव अशी रवींद्र जैन यांनी संगीत दिलेली गाणी येसूदास यांनी गायली. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांमध्ये सचिन आणि रंजीतावर चित्रित झालेले ‘अखियों के झरोकोंसे..’ हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. विरोधाभास एवढाच की दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या या संगीतकाराने आपल्या संगीतामधून कधीच आपली वेदना जाणवू दिली नाही. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांमधून रविंद्र जैन यांनी अनेक हळूवार भावगीतांमधून सुरांची पखरण केली. प्रत्येक संगीतकाराचा आपला एक आवडता गायक किंवा गायिका असते. जैन यांच्या संगीताचे नाते जोडले गेले ते गायक येसूदास यांच्याशी.. किंबहूना दक्षिणेकडच्या या गायकाला हिंदी चित्रपटांमध्ये आणणाऱ्या जैन यांचे त्यांच्याशी इतके घट्ट नाते होते की जर आपल्याला दृष्टी मिळालीच तर पहिले येसूदास यांचा चेहरा पहायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. मा.रवींद्र जैन यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या संगीतात बदल केला तरी त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याची गोडी सुरेख होती. संगीतकार जैन यांनी फक्त चित्रपटांमधील गीतांना नव्हे तर प्रायव्हेट अल्बम, गझल, पौराणिक मालिकांनाही त्यांनी दिलेल्या संगीताला वेगळे महत्त्व होते. मा.रवींद्र जैन यांचे ‘दिल की नजर से’ हे शायरीवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. शायरीवर पुस्तक लिहिणारे ते पहिले संगीतकार आहेत.*मा.रवींद्र जैन* यांचे ९ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.रवींद्र जैन यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ:- इंटरनेट
मा.रवींद्र जैन यांची गाजलेली गाणी
’आजसे पहेले आजसे जादा
’गोरी तेरा गाव बडा प्यारा
जब दिप जले आना
’राम तेरी गंगा मैली,
सुन सायबा सुन
October 9, 2016
के. आर. नारायणन यांना केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अनेक मानसन्मान मिळाले. साहित्यातही त्यांची विशेष रुची होती. शालेय स्तरापासूनच त्यांनी विशेष श्रेणी मिळवली होती. परिवारातील बंधूत त्यांचा चौथा क्रमांक होता.
November 9, 2023
चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी झाला.
अंतराळवीर बनण्याआधी नील आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि त्या वेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता. ते एअरोस्पेस इंजिनीअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापकदेखील होते.
नौसेनेतील नोकरीनंतर आर्मस्ट्राँग यांनी पुरूडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झाले. तेथे टेस्ट पायलट म्हणून त्यांनी ९०० पेक्षा जास्त वेळा उड्डाण केले. आर्मस्ट्राँग यांनी जेमिनी मोहिमेदरम्यानही अंतराळ प्रवास केलेला होता. त्यांचे वडील स्टीफन हे ओहायो येथे सरकारी अंकेक्षक होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय ओहायोच्या अनेक भागांमध्ये भ्रमण करीत होते.
नील यांच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांची किमान २० ठिकाणी बदली झाली होती. याच काळात नील यांना हवाई उड्डाणाचे वेड लागले. आर्मस्ट्राँग यांनी आपल्या १६ व्या वाढदिवशीच स्टुडण्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळविले होते आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वत: विमान उडविले होते. त्या वेळी त्यांच्याजवळ विमान उडविण्याचा परवानाही नव्हता.नंतर नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेत नील आर्मस्ट्राँग १९७१ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी सिनसिनाटी विद्यापीठात अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले.
२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. अपोलो ११ नावाच्या यानातून आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले, तेव्हा ते ३८ वर्षाचे होते. बझ अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या सहका-यांसोबत चार लाख किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत नील आर्मस्ट्राँग यांनी केला. या तीन दिवसांत काय होणार याच्या उत्सुकतेने तमाम पृथ्वीवासीयांच्या हृदयाचे ठोके चुकत होते.
१९६१ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी याच दशकात अमेरिका माणसाला चंद्रावर उतरवून सुखरूप परत आणेल, असे आश्वासन दिले होते. रशियाबरोबर सुरू असलेल्या शीतयुद्धात त्यामुळे अमेरिकेचा हा मोठा विजय ठरला.
नील यांच्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी त्यांचा सहकारी अल्ड्रिनही चंद्रावर उतरला. नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर सुमारे २ तास ३२ मिनिटांचा काळ व्यतित केला होता. चंद्रावर अमेरिकी झेंडा फडकावून, काही दगड सोबत घेऊन आणि शास्त्रीय प्रयोगांची सुरुवात करून हे दोघे अंतराळवीर यानात परतले होते. परतल्यानंतर रेडिओद्वारे नील आर्मस्ट्राँग यांनी म्हटलेले ‘हे एका माणसाचे छोटेसे पाऊल आहे. पण अखिल मानवजातीसाठी खूप मोठी झेप आहे,’ हे वाक्य अजरामर झाले आहे.
चांद्रमोहीम आणि अंतराळवीर असे वलय असूनही नंतर ते अत्यंत साधेपणानेच आयुष्य जगले.
नील आर्मस्ट्राँग यांचे २५ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 5, 2021
ऊर्जेचे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे पाणी, कोळसा, जंगल, खनिज तेल आणि वायू यांचा साठा मानवाच्या उथळपट्टीने संपत आलेला आहे. तमाम मानव जातीला अपारंपारिक उर्जा स्त्राsतांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. उर्जा निर्मिती तिपटीने वाढवण्यासाठी अपारंपारिक उर्जेचा वापर प्रामुख्याने असणार आहे. अमृता सारख्या उर्जा क्षेत्रात काम करणाऱया तरूण संशोधकांना हे मोठे आव्हान आहे. मला खात्री आहे की हे आव्हान आपले तरूण संशोधक नक्कीच स्विकारतील.
October 9, 2018
‘नयन तुझे जादूगार’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मानापमान’ अशा विविध संगीत नाटकांतून व्यावसायिक रंगभूमीवर आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला.
मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकीआणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाट्यशास्त्राचे धडे घेतले. १९६४ साली त्यांनी ’यशवंतराव होळकर’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाटय़शास्त्राचे धडे घेतले. १९६४ साली आलेल्या ‘यशवंतराव होळकर’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘नयन तुझे जादूगार’, ‘घनश्यान नयनी आला’, ‘बावनखणी’, ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकांबरोबरच ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत विद्याहरण’, ‘रामराज्य वियोग’, ‘संगीत शारदा’ अशा संगीत नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. नाटकातील अभिनयाबरोबरच संगीत प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे प्रसन्न व्यक्तिमत्त्व लाभलेले पिळगांवकर आजही नाट्यसंगीताचे धडे देण्यासाठी कुठेही जाण्यास तयार असतात.
संगीत रंगभूमीचा जिताजागता संदर्भकोश असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. १९६४ साली त्यांनी 'मुंबई मराठी साहित्य संघा'च्या 'यशवंतराव होळकर' या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतरचे त्यांचे महत्त्वाचे नाटक म्हणजे 'वासवदत्ता'. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या 'नयन तुझे जादूगार' आणि'घनश्याम नयनी आला' या दोन्ही संगीत नाटकांत त्यांनी प्रमुख भूमिका केल्या 'नयन तुझे जादूगार' मधील 'उडुनी जा पाखरा' हे त्यांचे पद अतिशय लोकप्रिय झाले होते. 'साहित्य संघा'च्याच 'धाडिला राम तिने का वनी' या नाटकात त्यांनी भरताची भूमिका अप्रतिमपणे साकारली होती. त्यातील 'कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला' हे पद ते सुरेख सादर करीत.
'सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'मानापमान', 'शारदा', 'स्वयंवर', 'विद्याहरण', 'कान्होपात्रा' या संगीत रंगभूमीवरील सर्व महत्त्वाच्या नाटकांत अरविंद पिळगांवकरांनी भूमिका केल्या. 'सौभद्रा'त त्यांनी सर्व प्रमुख भूमिका केल्या. 'मानापमाना'त ते धैर्यधरही झाले आणि लक्ष्मीधरही झाले. 'कान्होपात्रा'त चोखोबा आणि राजा अशा दोन्ही भूमिका त्यांनी केल्या. त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य म्हणजे ते विचारपूर्वक अर्थानुरूप गाणे पेश करत. गाण्यातील भाव उठावदार करत. 'कान्होपात्रा'तील 'जोहार मायबाप' या गाजलेल्या पदाच्या चालीत त्यांनी किंचित बदल करून त्यातील भाव ठळक केले होते. त्यांनी पं. के. डी. जावकर यांच्याकडे प्रथम संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांचा सहवास त्यांना लाभला.
अभिषेकीबुवांना ते तंबोऱ्यावर साथ करीत. पं. गोविंदराव अग्नी हेही त्यांचे संगीतातले गुरू होते. अभिनयाचे पाठ मात्र त्यांनी दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या कडून घेतले. मामा वरेरकरांचे 'हाच मुलाचा बाप', विद्याधर गोखले यांचे 'बावनखणी' अशा वेगळ्या प्रकृतीच्या नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. परंतु रंगभूमीवरच्या अशा प्रत्यक्ष कामगिरीबरोबरच त्यांनी या रंगभूमीच्या प्रसाराचे काम अनेक प्रकारे केले. वृत्तपत्रांतून त्यांनी या रंगभूमीविषयी लेखन केले. 'सौभद्र' आणि 'कान्होपात्रा' या नाटकांच्या संकलित आवृत्त्या तयार केल्या. 'साहित्य संघ' आणि 'विद्याधर गोखले प्रतिष्ठान' या संस्थांतर्फे नाट्यसंगीत शिक्षणाचे मोलाचे काम त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 2, 2017
बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी झाला. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकीर्दीस सुरुवात केली. दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. त्यांनी पं.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. मा. दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक होते.
खरे तर दशरथ यांना पुजारी शास्त्रीय संगीतात पुढे वाटचाल करायची होती पण विधिलिखित काही वेगळेच होते. पुढे काही गोष्टी अशा घडल्या की ते भावगीतांकडे वळले आणि मग मराठी भावगीतांना एक अवीट गोडीचा गायक आणि उत्तम संगीतकार लाभला. गायक म्हणून त्यांना जास्त संधी मिळाली नाही तरी त्यांनी गायलेली सगळीच गाणी विलक्षण गाजली. त्यामानाने संगीतकार म्हणून तर त्यांची कारकीर्द खूपच भव्य झालेय. मा. दशरथ पुजारी ह्यांनी स्वत: गायलेली गाणी तशी खूपच कमी आहेत. वर सांगितलेले 'अशीच अमुची आई असती ' तसेच ' अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ' किंवा 'हरी भजनाविण काळ घालवू नको रे ' हे भक्तिगीत काय, ही सगळी गाणी गाजलेली आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेली अवीट गोडीची आणि गाजलेली कैक गाणी सुमन कल्याणपूर आणि माणिक वर्मा ह्यांनी गायलेली आहेत.
दशरथ पुजारी यानी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकीर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, सुधांशु, योगेश्वीर अभ्यंकर, मधुकर जोशी यांसारख्या गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. 'झिमझिम झरती श्रावणधारा', 'अशीच अमुची आई असती', 'चल ऊठ रे मुकुंदा', 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा', 'मृदुल करांनी छेडित तारा' इत्यादी गाणी त्यांच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी आहेत. संगीत-संयोजक अनिल मोहिले हे उमेदवारीच्या काळात मा. दशरथ पुजारी यांचे सहाय्यक होते. दशरथ पुजारी यांनी 'अजून त्या झुडपांच्या मागे' हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले होते. कवी पी. सावळाराम हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना तसेच 'चतुरंग संगीत सन्मान ' पुरस्कार मिळाला होता. दशरथ पुजारी यांचे १३ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दशरथ पुजारी यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=1e1Pnb_v0co&list=PLfCW_Yd-eqbARk1Aa5-yi6OPFjYDLvA62&index=1
https://www.youtube.com/watch?v=oE7ol4Zvlyo
https://www.youtube.com/watch?v=-zV-It-mW9A
https://www.youtube.com/watch?v=ZUu6bM9ldWc
August 30, 2017
“केसरी’ गणेशोत्सवातील दहा दिवसांचे सांस्कृतिक कार्यक्रम लोकप्रिय करण्यात खेर यांचा मोठा वाटा असे. जयंतराव टिळक, वि. स. माडीवाले, हरिभाऊ कुलकर्णी, रामभाऊ जोशी आदींच्या “केसरी’च्या आवारात जमणाऱ्या मैफिलीतील गप्पा, हास्यविनोद आणि एकमेकांची थट्टा हा एक अविस्मरणीय अनुभव होता. स. गर्गे यांनी संपादित केलेल्या “यशवंतराव चव्हाण आणि पत्रकार’ या पत्रसंवाद ग्रंथांतील भा. द. खेर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील पत्रव्यवहार वाचल्यानंतर खेरांच्या ’लेखनध्यास’ किती होता हे ध्यानात येते.
June 21, 2022
आज १ नोव्हेंबर.. शरद तळवलकर यांची जयंती. शरद तळवलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१९ झाला.
शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असतांना त्यांनी मिलीटरी अकौंटस् मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता माझा मुलगा. तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता.
नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर एकच प्यालातील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला.
पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. कलाकार ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. भावबंधन मधील कामण्णा, अपराध मीच केला मधील गुप्तेकाका, दिवा जळू दे मधील गोळे मास्तर अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. अप्पाजींची सेक्रेटरी आणि सखी शेजारीण या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण सबंध नाटक पेलून धरणार्या दमदार अशाच होत्या.
अतिशय बोलक्या चेहऱ्याचा हा विनोदी कलावंत ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराने गौरविले गेले. शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. जावई विकत घेणे मधील म्हातार्याच्या भूमिकेचे आणि एकटीतील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते.
शरद तळवलकर हे १९९२ मध्ये वाशी येथे भरलेल्या ७२ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
शरद तळवलकर यांचे निधन २१ ऑगस्ट २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 1, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti