‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’,‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा’, ‘पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई’ अशा अनेक अजरामर शब्दरचनांनी काव्यरसिकांवर अनेक दशके गारूड करणारे प्रा. शंकर वैद्य यांना वयाच्या सहाव्या वर्षापासूनच कवितेची गोडी लागली.
June 15, 2021
आग्रा घराण्याचे गायक आणि बंदिशकार म्हणून पंडित बबनराव हळदणकर यांची ओळख होती.
November 19, 2016
शिक्षण संपवून तब्बल पाच वर्षे अ.भा.वि.प. चे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. त्या काळातले त्यांचे गुरू व मार्गदर्शक प्रा.यशवंतराव केळकर, ह्यांना ते कधी विसरू शकणार नाहीत. ‘कार्यकर्ता म्हणून मी जो काही आहे त्याचे सगळे श्रेय केळकर ह्यांना आहे’ असे ते म्हणतात.
November 10, 2021
नागपूर आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असलेले आनंद देशपांडे मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यावर मुंबई केंद्रावर रुजू झाले. सुरुवातीला ‘ऐसी अक्षरे’ आणि ‘शालेय चित्रवाणी’ अशा कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. मात्र, त्यांनी निर्मिती केलेल्या ‘ज्ञानदीप’ने त्यांना घरांघरात पोहोचवले.
March 13, 2022
डोनर यांनी ‘एक्स 15’ च्या माध्यमातून फिचर फिल्मच्या दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली १९७६ साली रिलीज झालेल्या ‘द ओमेन’मधून.
July 5, 2022
अत्यंत बिकट परिस्थितीतही धीरोदात्तपणा न सोडणारे, निगर्वी, सरळ, प्रेमळ अंत:करणाचे मा.भार्गवराम आचरेकर यांना नाट्य व्यवसायातील चारुदत्त असे संबोधिले जात असे.त्यांचा जन्म १० जुलै १९१० रोजी झाला. स्थानिक शाळेच्या मदतीसाठी केलेल्या शारदा नाटकाच्या प्रयोगात त्यांनी वल्लरीचे काम इतके अप्रतिम केले की त्याचा सर्वत्र बोलबाला झाला. त्यावेळी ललितकलादर्शचा मुक्काम मालवणला होता. बापूसाहेब पेंढारकरांच्या कानी या बालनटाची कीर्ती पडली. त्यांनी भार्गवरामांचे गाणे ऐकले आणि आपल्या संस्थेत दाखल करून घेतले. ललितकलादर्शन मधील १९२५ ते १९३७ ही बारा वर्षे म्हणजे भार्गवराम आचरेकरांच्या नाट्य जीवनाची चढती कमान होती. ललितकलादर्शच्या बापूसाहेब पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली मा.भार्गवराम आचरेकर यांना विविध भूमिका करण्याचे भाग्य लाभले. ‘कुंजविहारी’ नाटकातील ‘कृष्ण’ ही भार्गवरामांची पहिली व्यावसायिक भूमिका. यानंतर ‘वधूपरीक्षा’, ‘शारदा’, ‘पुण्यप्रभाव’ इत्यादी अनेक नाटकांत ते भूमिका करू लागले. बापूसाहेब पेंढारकर आजारी पडल्यानंतर त्यांनी ‘मानापमाना’तील धैर्यधर, आणि ‘शिक्काकट्यार’ मधील ‘शाहू’ या अवघड संगीत भूमिका भार्गवरामांवरच सोपविल्या. ‘ललितकलादर्श’ मंडळीत पणशीकर बुवा, विष्णुपंत पागनीस, कागलकरबुवा, वझेबुवा आणि शिवरामबुवा वझे यांची तालीम मिळाल्याने त्यांची गायकी कसदार आणि दर्जेदार झाली होती. बापूसाहेबांनी भार्गवरामांच्या अभिनयाकडेही बारीक लक्ष पुरविले आणि म्हणूनच ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील फटकळ पण सरळ स्वभावाच्या बिजलीची तडफदार तेजस्वी भूमिका भार्गवरामांनी अप्रतिम साकार केली. जणू त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच वरेरकरांनी ती भूमिका लिहिली होती. अभिनय, गायन आणि रूप यांचा त्रिवेणी संगम या तडफदार भूमिकेत झाला होता. बिजली म्हणजे भार्गवराम आणि भार्गवराम म्हणजे बिजली असे समीकरण त्याकाळी झाले होते. पुढे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील भानुशंकरांच्या भूमिकेमुळे नव्या पिढीला भार्गवरामांचा नाट्याभिनय व गायनाची करामत ऐकण्याची संधी मिळाली. भार्गवराम नुसते नटच नव्हते तर चांगले ख्याल गायकही होते. साध्या आणि अनवट रागातील चीजांचे बरेच मोठे भांडार त्यांच्यापाशी होते. अशा या प्रसन्न वृत्तीच्या, निकोप प्रकृतीच्या, धार्मिक श्रद्धेच्या, नम्र स्वभावाच्या आणि निर्व्यसनी, निष्कलंक चारित्र्याच्या गुणशाली कलाकाराला नाट्य परिषदेने ‘बालगंधर्व पदक’ देऊन गौरविले होते. भार्गवराम आचरेकर यांचे २७ मार्च १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 28, 2017
महाराष्ट्रातल्या एकपात्री प्रयोग करणाऱ्या प्रमुख पाच-सहा नावांमध्ये डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची गणना होईल. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए., पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.
१९८० ते २००० डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागात विविध विषयांवर चर्चासत्र, शिबिर त्यांनी आयोजित केली. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाटय़कथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाटय़-चित्रपट कारकीर्द होती. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री 'नटसम्राट'चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले. डॉ. देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा हा बहुमान त्यांना वऱ्हाड निघालय लंडनला ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. . ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८० मध्ये झाली.
लक्ष्मण देशपांडे यांनी 'वऱ्हाड..'च्या सुमारे २८०० प्रयोगांतून अवघा महाराष्ट्र पालथा घातलाच; पण या नाटकाला खरोखरीच सातासमुद्रापार लंडनला नेलं होतं. अफाट उर्जा आणि दर्जेदार अभिनयानं एक अख्खं कथानक ते सहजगत्या उभं करायचे. 'लंडनला शिकायला गेल्यावर तिथ जुडीच्या प्रेमात पडलेला काशीनाथ', 'मला बोलीलं का बाप्पा', असं सारखं बोलून बाप्पाला भंडावून सोडणारा बबन्या, 'मायवं हे बुईंग वर गेलं आनी पल्डं तंर', असे प्रश्न करीत विमानात सगळ्यांच्या छातीत धस्स करणारी अनेक कार्टी, 'वंस, सासूबाई, सून यांच्यातील रुसवे फुगवे', हे असं सारं म्हणजे थोडक्यात गावच्या भाषेत ज्याला आपण 'बारदान' अं म्हणतो ते अख्ख मराठवाड्याचं गाव आणि जोडी इंग्रजीची फोडणी देणारे ज्युडी, जानराव या सगळ्यांना घेऊन डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी नाट्यरसिकांना प्रचंड हसवलं, रडवलंही.
‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या त्यांच्या एकपात्री नाटय़प्रयोगाने ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्यांनी नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे या नाटक सध्या संदीप पाठक करत आहे. त्यांनी पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि नागपूर या संस्थेवर महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते.
१९८६ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या अपना उत्सव या राष्ट्रीय व सांस्कृतिक एकात्मता कार्यक्रमात त्यांनी कला दिग्दर्शन केले. १९८७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात समन्वयक म्हणून कार्यरत होते. १९८८ मध्ये झोपडपट्टी भागात साक्षरतेचे वर्ग घेण्यात ते आघाडीवर होते. १९९३ ते १९९५ या कालावधीत औरंगाबादेत कला आणि नाटय़ प्रदर्शनाद्वारे साक्षरता अभियानात संचालक म्हणून कार्यरत. केंद्र शासनाच्या नाटय़ विभागातर्फे कलावंत निवडण्याच्या समितीत सदस्य म्हणून सहभाग. ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. १९९९ मध्ये केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने आयोजित पहिल्या राष्ट्रीय थिएटर महोत्सवात ते सहभागी होते.
'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' ने गौरव केला होता. स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार, बेंडे स्मृती पुरस्कार, पुणे महानगरपालिका पुरस्कार, पुण्याचा राम श्रीधर पुरस्कार, मुंबईत उत्तुंग पुरस्कार, मराठवाडा विकास मंडळातर्फे मराठवाडा गौरव पुरस्कार. छत्रपती शाहू महाराज पुरस्कार. अखिल भारतीय नाटय़संमेलन ठाणे आणि नाशिक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकांकिका महोत्सवात पुरस्कार, मुंबई आकाशवाणीतर्फे पुरस्कार, सजाजीराव महाराज पुरस्कार (बडोदा) , कै. वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार, नाटय़ क्षेत्रात केलेल्या कार्याचा महाराष्ट्र शासनातर्फे गौरव. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांना असे अनेक पुरस्कार मिळाले होते.
प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटक
https://www.youtube.com/watch?v=atIEn0ODN5k
https://www.youtube.com/watch?v=hVEu5uWb18E
December 5, 2017
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी कार्मिक व्यवस्थापनात काम केलं होतं. त्यांचे वडील, कामगार नेते पी. जी. सावंत हे सीटू या कामगार संघटनेत सक्रिय होते. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतील हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी प्रयत्ने केले. मुंबईतील जुन्या चाळी आणि त्यांची पुनर्बांधणी व त्यावरील मालमत्ता करासाठी आंदोलनात पुढकार घेतला.
April 11, 2022
गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. गदीमांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली.
त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही तीन चित्रकथा ही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहे. युद्धाच्या सावल्या ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली.
मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. गदीमा हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या चित्रपटकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी होत्या. गदिमांनी तब्बल १५८ मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केले, यातील अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवादही त्यांच्याच लेखणीतून उतरले. मात्र त्यांचा संचार केवळ मराठी चित्रसृष्टीतच नव्हता, तर हिंदीतही त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कथेवर सुमारे २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली असून त्यात ‘तुफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’ आदींचा समावेश आहे. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’ची मूळ कथाही गदिमांचीच होती, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदीमा यांचीच.
गदिमांचा उल्लेख कोणी महाकवी असा केला, की ते गमतीने म्हणत असत- अहो, मी महाकवी नाही, महाकाय कवी आहे! त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते.
ग.दि.माडगूळकर यांचे १४ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया
संदर्भ.शशांक गिरडकर /gadima.com
October 1, 2017
आज चैत्यन्याचा रुपेरी झरा अशा वैशिष्ट्याने पडद्यावर वावरलेल्या देव आनंद यांची जयंती. त्यांनी आपल्या अजरामर भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले. त्यातील सर्वोत्तम दहा चित्रपट.
१. गाईड (दिग्दर्शक विजय आनंद)
राजू गाईड(देव आनंद) व विवाहीत रोझी (वहिदा रेहमान) यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होते, पण हे प्रकरण खूप वेगळे वळण घेते. या चित्रपटातील देव आनंद यांचा अभिनय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सर्वोत्तम अभिनय ठरला. चित्रपटाच्या शेवटी त्याचा मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे, हा देखील त्यांच्या कारर्किदीतील दुर्मिळ योग.
२. ज्वेल थीफ (दिग्दर्शक विजय आनंद)
देव आनंद यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट. आपण चित्रपटाच्या नायकावर( अर्थात देव आनंद) तोच गुन्हेगार असल्याचा संशय ठेवतो (हे दिग्दर्शकाचे कसब). चित्रपटाचा शेवट धक्कादायक. वैजयंती माला आणि अशोक कुमार महत्त्वाच्या भूमिकेत.
३. जॉनी मेरा नाम (दिग्दर्शक विजय आनंद)
देवचा सर्वोत्तम गुन्हेगारी पट. हेमा मालिनीशी त्याची जोडी छान शोभली. प्रेमनाथ, प्राण, पद्मा, रंधावा अशा कितीतरी कलाकारांनी हा मसालापट खुलवला. प्रत्येक गाण्यात देव आनंद यांचा मस्तच वापर करण्यात आला आहे.
४. तेरे घर के सामने (दिग्दर्शक विजय आनंद)
गाण्यांतून दिसणारा देव आनंद..अनुभवणाऱयांसाठी हा चित्रपट उत्तम! ‘एक घर बानाऊंगा तेरे घर के सामने’ असो वा ‘दिल का भंवर करे पुकार’ असो पडद्यावर गाणे कसे सजवायचे हे देव आनंद यांनी दाखवून दिले. अर्थात नूतन यांनीही तितक्याच ताकदीने योगदान दिले आहे.
५. तेरे मेरे सपने (दिग्दर्शक विजय आनंद )
सायकलवरचे एक मैने कसम ली असो अथवा जीवन की बगियाँ महकेगी असो मुमताजसोबतची देव यांची जोडी मस्त जमली. गाण्यातून दिसणारा देव आनंद हा देखील त्यांच्या व्यक्तीमत्त्व व अभिनयाच्या शैलीचाच प्रकार.
६. हरे राम हरे कृष्ण (दिग्दर्शक देव आनंद)
देवने प्रेम पुजारी पासून दिग्दर्शनात पाऊल टाकले, पण ठसा मात्र हिप्पी संस्कृतीवरील हरे राम..मध्येच उमटला. झीनत अमानची हिप्पी गर्ल खूपच धाडसी. काठमांडूच्या परिसराने विषय प्रवाभी ठरला.
७. देस परदेस (दिग्दर्शक देव आनंद)
विदेशात विशेषत: इंग्लंडमध्ये रोजगारासाठी जाणाऱया भारतीयांच्या वाट्याला नेमके काय येते? या विषयाची ‘देव’ शैलीत मांडणी.
८. हम दोनो (दिग्दर्शक अमरजीत)
देव आनंदची दुहेरी भूमिका. जोडीला साधना व नंदा, तर जयदेवच्या संगीतामुळे आणखी आकर्षण वाढले. मूळचा हा कृष्णधवल चित्रपट कालांतराने रंगीत स्वरुपात आला. देवने आपण नवीन चित्रपटाच्या तयारीत गुंतलो आहोत हा व्यक्त केलेला आशावाद सतत पुढेच पाहायचे ही त्याची वृत्ती दर्शवणारा होता.
९. वॉरंट (दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती)
सत्तरच्या दशकातील तद्दन मसालापट. त्यात पन्नाशीपार देव आनंदचा झीनत अमानला उद्देशून केलेला ‘रुक रुक..रुक झाला हमसे दो बाते करके जाना, यह मौसम हे दिवाना’ हा आग्रह त्यालाच शोभला व देव आनंद यांनी रौप्य महोत्सवी यश संपादन केले.
१०. फंटूश (दिग्दर्शक चेतन आनंद)
दूखी मन मेरे सून मेरा कहना जहाँ नही चैना वहा नही रहना.. देवची भावूक मुद्रा व्यक्त करणारे हे सर्वकालीन लोकप्रीय गीत. याच चित्रपटात ‘ए मेरी टोपी पलट के आ’ गात सवयीने तो मोकळेपणाने वावरलाही. शैला रामाणी या चित्रपटात नायिका होत्या.
देव आनंद यांची रुपेरी वाटचाल खूपच मोठी आहे. प्रभातच्या हम एक है (१९४६) पासून नवकेतनच्या ‘जाना जा दिलसे दूर’पर्यंत (२०१० हा चित्रपट अप्रकाशीत) देव आनंद सतत खुलला. फुलला.
चार्जशीट(२०११) हा त्याचा त्यानेच दिग्दर्शित केलेला व प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट..
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
December 3, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti